डॉक्टरपेक्शा रुग्णाला रोगाची जास्त माहीती असणार का?
रस्त्यावरचे प्रश्न हे किडलेल्या व्यवस्थेचे फक्त लक्षण आहे, व्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासनालाच प्रयत्न करावे लागतात.
अधिकारी परीक्षा फक्त सामान्य ज्ञानावर पास होत नाहीत, आणि अधिकारी बनण्याअगोदर त्यांना प्रशासन कसे करावे हे शिकवेच लागते.
सार्वजनिक सेवा मग ती पुण्यातील असो की डोंबोलीतील की नागपूर,सोलापूर, संभाजीनगर मधली.........ती बोजवारा उडवणारीच असते.
अरुंद रस्ते, वाहतूकीचे साधे नियम न पाळणारे पादचारी आणि वाहनधारक.
शिवाय, आपले कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही, अशा गुर्मीत असणारा कर्मचारी वर्ग.
वेळेवर बसेस येत नाहीत कारण पुरेशा बसेस आणि वाहक-चालक उपलब्ध नाहीत.
बसेस नादूरस्त आहेत कारण, त्या वेळेवर आणि सुयोग्य रित्या दुरुस्त केलेल्या नसतात.(कामगारांची अकुशलता आणि अरेरावी, हे पण उपप्रश्र्न आहेतच.)
योग्य त्या मटेरियल अभावी आणि योग्य त्या प्रमाणात मटेरियल नसल्याने, आहेत तशा बसेस चालवा.
शिवाय जर सार्वजनिक सेवा व्यवस्थित असेल तर रिक्षावाल्यांची एक गठ्ठा मते कशी मिळणार? ही नगरसेवकांची आणि पर्यायाने महापौरांची अडचण.
असो,
कुठल्याही मोठ्या शहरात कामाशिवाय न जाणे, हाच सध्या तरी मी निवडलेला पर्याय.
बादवे,
मी कधीही पुण्याला गेलो तरी जास्तीत जास्त प्रवास पी.एम.टी. नेच करतो. सगळ्यात स्वस्त वाहन तरी हेच आहे.
आणि वेळ भरपूर असतो.
भारतात, प्रत्येक रिक्षाचे मीटर वेगवेगळ्या वेगात फिरते, हा स्वानुभव.पुण्यातले रिक्षावाले बंगलोरच्या रिक्षावाल्यांपेक्षा थोडे तरी बरे, निदान पुण्यातले रिक्षावाले मराठी तरी बोलतात.बंगलोरचा रिक्षावाला बसण्यापुर्वी ३० रु. सांगतो आणि मग उतरण्याच्यावेळी ३०० रू. वसूल करतो, अशी ऐकीव माहिती.
बसची वाट पहाण्याच्या १-२ तासात आणि प्रवासाच्या १-२ तासात अशा २-४ तासात १०० रु. वाचले तरी मला चालतात.(त्यात एक एल.पी. माइल्ड बियर येते.नाहीतरी माझ्या पैशाने तो रिक्षावाला तेच करणार असतो.दारू न पिणारा रिक्षावाला हजारात एखादा असलाच तर.....)
थोडक्यात,
तुमच्यापाशी भरपूर वेळ असेल आणि सूट्टे पैसे असतील आणि स्वखर्चाने प्र्वास करत असाल तर, महाराष्ट्रात तरी सार्वजनिक वाहनांना पर्याय नाही.
आणि काल सिंहगड रोड ते पुणे स्टेशन पी.एम.टी.नेच प्रवास केला.
दोन्ही वेळी १५-१५ रुपये दिले. हवे असल्यास तिकीटाच्या दराची खात्री करून घ्या.
तुम्ही आज धागा कढणार असे माहीत असते आणि तुम्हाला जर अशी शंका येईल.असे वाटले असते तर, दोन्ही तिकिटे जप्पुन ठेवली असती आणि तुम्हाला कुरियरने पाठवली असती.
असो,
सिंहगड रोड म्हणजे बिग बझार स्टॉप.
आणि जिथे-जिथे बस स्टॉप असेल तिथेच रिक्षा लावायच्या हा अखिल भारतीय रिक्षावाल्यांचा नियम त्या स्टॉपला पण लागू होताच.त्यामुळे बसची वाट बघत न बसता, शांतपणे एक तास उभे राहून वाट बघायला लागली. बेशीस्तीचा ठेका ही आजकाल फक्त पुण्याच्याच अभिमानाची गोष्ट राहिलेली नाही.
असो,
आजकाल पुण्यातली कुठलीही गोष्ट जगावेगळी नाही किंवा अभिमानास्पद पण नाही.......काही उत्तम मिपाकर आणि उत्तम मित्र पुण्याला राहतात म्हणूनच पुण्याला येणे होते.नाहीतर मूद्दाम सिंहगड बघायला किंवा रेल्वे म्युझियम बघायला किंवा केळकर म्युझियम बघायला पुण्याला जायची आजकाल तरी इच्छा होत नाही.
गेली 7 /8 वर्ष रिक्षातिल इलेक्ट्रॉनिक मीटर बनवणाऱ्या कं काम करत असल्या मुळे पूर्ण देशात फिरलो , तर ' मीटर प्रमाणे देय भाड़े ' ही चांगली पद्धत फक्त महाराष्ट्रातील पुणे व मुंबई तच वापरली जाते बाकी च्या ठिकाणी फक्त आर टी ओ पासिंग च्या वेळी मीटर चालू करतात . काही अवगुणी रिक्षा वाले डिकी मध्ये 12 वोल्ट च्या मोटर ला समांतर सेंसर लावून मीटर फास्ट करतात . शक्यतो करून हे रिक्षा वाले रेल्वे स्टेशन , एस टी स्टैंड ला रात्री च्या आलेल्या प्रवाशांना मामा बनवतात .
आता या यूपीएससी आणि एमपीएससी वाल्यांची पण एक अडचण असते. त्यांना परीक्षेत अमेरीकेचे पहीले राष्ट्राध्यक्ष कोण ? पृथ्वीचे चंद्रापासूनचे अंतर किती ? असले प्रश्न सोडवावे लागतात. पण निगडी ते कात्रज अंतर किती आणि पीएमटीची कोणती बस पकडावी हे ज्ञान त्यांना नसते. यामुळे आपल्या कारभारात ते फारसा प्रभाव पाडू शकत नाहीत.
"पूर्वीच्या काळी महानगरपालिकेमधले नगरसेवक, विरोधी पक्ष नेते हे सुद्धा बसने प्रवास करत. अशा वेळी त्यांना पीएमटीची स्थिती इतर कुणी सांगण्याची गरजच भासत नसे. त्यामुळे असलेले प्रश्न सुटायला मदत होत असे."
मी ह्या दृष्टीकोना कडे बघत होतो.
एकाच लेखात अनेकविध विचारांचे पैलू असू शकतात.त्यामुळे तुमचा मूद्दा मान्य आहे.
पूर्वीच्या काळी महानगरपालिकेमधले नगरसेवक, विरोधी पक्ष नेते हे सुद्धा बसने प्रवास करत. अशा वेळी त्यांना पीएमटीची स्थिती इतर कुणी सांगण्याची गरजच भासत नसे. त्यामुळे असलेले प्रश्न सुटायला मदत होत असे."
इतकं साधं सरळ आणि सोपं नसतं ते साहेब.
पी एम टी ची सेवा पहिल्यापासून यथातथाच आहे. माझ्या आठवणीत (१९८३ पासून पुढे) किंवा वाचनात( १९८३ च्या अगोदर) पुण्याची बससेवा कधीच "बेस्ट" नव्हती. एकंदर राजकारणी तेथील बाबू लोक यांनी ते एक चरायचे कुरण म्हणून वापरलेले आहे. ( हीच परिस्थिती बहुतांश सार्वजनिक सेवांची आहे).
उत्तमराव खोब्रागडे या आय ए एस अधिकाऱ्याने( देवयानी खोब्रागडेंचे तीर्थरूप) मुंबईत चिनी बस किंग लॉन्ग (सेरिता) विकत घेतल्या आणि त्याचे पुढे काय झाले.त्याने बेस्टला जोरदार तोटा कसा झाला. या आणि अशा अनेक गमती जमती आपल्याला वाचायला मिळतील गुगलून पहा.
बेस्टला ५० व्हॉल्वो बसेस त्यावर जाहिरातीचे हक्क १५ वर्षे देण्याच्या कराराने फुकट मिळणार होत्या. पण प्रत्यक्षात ६ च बस घेतल्या गेल्या. बाकी हा करार पूर्णत्वास का गेला नाही याची करणे गुलदस्त्यातच राहिली. आपण तर्क करू शकता.
https://swarajyamag.com/infrastructure/why-indias-top-cities-cant-run-ac-buses
एअर इंडियाने बाबू आणि मंत्री खासदार यांनी दशकानुदशके प्रवास केला तरी एअर इंडिया ची परिस्थिती डबघाईलाच का होती/ आहे/ आणि असेल. याचे समर्पक उत्तर शोध त्यात आपल्या प्रश्नाचे उत्तर सापडेल.
डॉ. श्रीकर परदेशींनी पीएमपीएमएल मधे केलेल्या कामाबद्दल तुम्ही जे लिहिलेलं आहे त्यावर मतभेद आहेत. उण्यापुर्या ४ महिन्यात त्या माणसानं भरपूर काम केलेलं होतं. साधं गूगल केलं तरी बरीच माहिती मिळेल. ते पीएमओला गेलेत त्यात पीएमपीएमएलचं आणि पर्यायानं पुण्याचं खूप नुकसान झालेलं आहे असं माझं तरी वैयक्तीक मत आहे.
तुकाराम मुंढेंबद्दल अजून नीटसं ठरवता येत नाहीये, पण ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांचा विरोध वाढतोय त्यावरून एवढं खास जाणवतंय की कुणाचे तरी पंचे ओढल्या गेलेले आहेत. काही निर्णय वाचलेत त्यांचे पण अजून विशेष मत ठरवता येत नाही.
2 जुलै 2017 या तारखेलाही हेच
...
In reply to 2 जुलै 2017 या तारखेलाही हेच by मोदक
http://www.misalpav.com/node
In reply to ... by आशु जोग
...
In reply to http://www.misalpav.com/node by मोदक
क्रुपया एमैल सेन्द करा
डॉक्टरपेक्शा रुग्णाला रोगाची
धागा जरी पी.एम.टी. बद्दल असला तरी....
शेवटचे वाक्य वगळता उर्वरीत
In reply to धागा जरी पी.एम.टी. बद्दल असला तरी.... by मुक्त विहारि
माझ्याकडे रिक्षावाल्यांना द्यायला पैसे नसतात...
In reply to शेवटचे वाक्य वगळता उर्वरीत by श्रीगुरुजी
मग उतरण्याच्यावेळी ३०० रू.
In reply to माझ्याकडे रिक्षावाल्यांना द्यायला पैसे नसतात... by मुक्त विहारि
मग उतरण्याच्यावेळी ३०० रू. वसूल करतो, अशी ऐकीव माहितीपीएमटीवरही तुम्ही ऐकीवच लिहीलंय हे ध्यानात येतंयपरवा पुणे स्टेशन ते कोथरूड बस स्टँड.....
In reply to मग उतरण्याच्यावेळी ३०० रू. by आशु जोग
आणि हो....
In reply to परवा पुणे स्टेशन ते कोथरूड बस स्टँड..... by मुक्त विहारि
नमस्कार....
In reply to मग उतरण्याच्यावेळी ३०० रू. by आशु जोग
पीएमटीवरही तुम्ही ऐकीवच लिहीलंय हे ध्यानात येतंय....
In reply to मग उतरण्याच्यावेळी ३०० रू. by आशु जोग
आज ९ जुलै
In reply to मग उतरण्याच्यावेळी ३०० रू. by आशु जोग
तिकिटाबद्दल आपण अत्यंत अमूल्य
In reply to आज ९ जुलै by मुक्त विहारि
रिक्षा वाले
In reply to माझ्याकडे रिक्षावाल्यांना द्यायला पैसे नसतात... by मुक्त विहारि
कधी कोल्हापूरला गेला आहात का?
In reply to रिक्षा वाले by सोमनाथ खांदवे
mpsc वर एवढा राग का
त्यांचा वैयक्तिक रोख...
In reply to mpsc वर एवढा राग का by एकुलता एक डॉन
आता या यूपीएससी आणि एमपीएससी
In reply to त्यांचा वैयक्तिक रोख... by मुक्त विहारि
ओके.... हा पण एक दृष्टीकोन मान्य....
In reply to आता या यूपीएससी आणि एमपीएससी by एकुलता एक डॉन
पूर्वीच्या काळी
हम्म!