अत्यंत वाह्यात , भयंकर वांड अशा शिनोसुके बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याचं वय आहे ५ वर्षे. हा जपानच्या कासुकाबे शहरात राहतो. ह्याच्या आईच नांव मित्सी(मिसाई) आणी वडलांचे नांव हॕरी(हिरोशी). ह्याला एक धाकटी बहीण पण आहे , तिचं नाव हिमा(हिमावारी).
तुम्ही आत्तापर्यंत ओळखलंच असेल की मी आपल्या लाडक्या शिनचॕनबद्दल लिहिलं आहे.
ब-याच जणांच्या लहानपणच्या आठवणींचा बराचसा भाग ह्याने व्यापलेला आहे. ह्याच्या व्रात्यपणा मधे हसवण्याची कला दडलेली आहे.
शिनचॕनचे मित्र म्हणजे कझामा , नॕनी , मसाउ आणि सुझूकी.
ह्याचे अडल्ट प्रँक्स काही काही लोकांना वैतागवाणे वाटले होते. म्हणून भारत सरकारच्या सेन्साॕर बोर्डाने शिनचॕनचे प्रसारण रौखलेही होते. पण आता आक्षेपार्ह भाग वगळून प्रसारण सुरु आहे.
खरंतर ह्या व्रात्य मुलाच्या आगाऊ आणि तरीही हसवत ठेवणार्या गोष्टीमागे एक दुख:द किनार आहे.
खरोखरच्या शिनचॕनची आई शेजारणीशी एकदा बोलत होती. हिमावारी तितक्यात रांगत रांगत रस्त्यावर गेली. वेगात येणार्या गाडीखाली आपली बहीण जाते आहे हे पाहुन शिनचॕन तिला वाचवायला धावला. पण दुर्दैवाने ह्या अपघातात त्या दोघांचाही जीव गेला. पोटच्या पोरांचा हा भीषण अंत पाहून मिसाई कोसळली.
मिसाईला अतीव धक्क्याने हॉस्पिटलमध्ये अॕडमिट करावं लागलं . बरी हौऊन आल्यावर तिने शिनचॕनबद्दल काही पेन्सिल स्केचेस बनवली. त्यातुनच पुढे गौरोगोरो कॉमिक आणि आसाही टिव्हीने शिनचान सिरीज सुरू केली. आज जगभरात शिनचॕनचे लाखो फॕन्स आहेत.
जपान सरकारने ह्या अपघाताची दखल घेउन रस्ते सुरक्षा ट्रेनिंग सर्व शाळांमधे आनिवार्य केले.
तर अशी आहे शिनचॕनची कहाणी. पुढील भागात आपण शिनचॕन व्यतिरिक्त अजून पात्रांची ओळख करुन घेऊ.
वाचने
3731
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच. पु.भा.प्र.
तुमचा धागा वाचल्यानंतर
तो उल्लेख खरा नसेल तर फार बरं
In reply to तुमचा धागा वाचल्यानंतर by कानडाऊ योगेशु
शिनचानबद्दल माहिती whatsapp
म्हणजे तुम्ही व्हाट्सअपवर
In reply to शिनचानबद्दल माहिती whatsapp by औरंगजेब
फक्त रेफरन्स घेतला आहे. बाकी
In reply to म्हणजे तुम्ही व्हाट्सअपवर by प्रचेतस
म्हणजे बाकी सगळे तुम्ही
In reply to फक्त रेफरन्स घेतला आहे. बाकी by औरंगजेब
अरे काय हे? आधी लिहुतर दे
In reply to म्हणजे बाकी सगळे तुम्ही by अभ्या..
सॉरी पाटीलबाबा
In reply to अरे काय हे? आधी लिहुतर दे by संजय पाटिल
नाही हो मनाचे काहीही नाही.
In reply to अरे काय हे? आधी लिहुतर दे by संजय पाटिल
तरीच म्हणले एखादी आई आपल्या
मिसाई ने अडल्ट प्रँस
In reply to तरीच म्हणले एखादी आई आपल्या by जेम्स वांड