✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तिचे अभंग, तिची गाथा

न — नंदन, Tue, 02/05/2008 - 21:01

प्रतिक्रिया द्या
18740 वाचन

💬 प्रतिसाद (54)
च
चित्रा Tue, 02/05/2008 - 21:03 नवीन

खूप आवडली

नंदन, कविता सुरेख आहे. खूप आवडली. चित्रा
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 02/05/2008 - 21:12 नवीन

फार छान

खूपच सुंदर अगदी मुंबईतली रोज दिसणारी स्त्री...फारच रिकलिस्टिक.....झकास जमलेय....
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 02/05/2008 - 21:13 नवीन

हे

हे सगळ्यात जास्तं आवडलं... पुनश्च हासून | पदर खोचून | देई ती झोकून | हुरुपाने ||
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 02/05/2008 - 21:13 नवीन

वा आवडले

फारच छान. कल्पना चांगली आहे, आणि माध्यम उत्कृष्ट. शब्दही नेमके सापडले आहेत. एकदोन ओळी बदलता येतात का बघा : > तरीही अखंड | आशा ही अभंग | > _मनी_अनिर्बंध_ | तेवतसे || हे "मनीअ - निर्बंध" असे वाचावे लागते. ते बरे वाटत नाही. > खरी की आभासी | आशा ही जिवासी | > _दिलासा_ अविनाशी_ | देई खरा || हे कसे झाले!!! :-)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 02/05/2008 - 21:27 नवीन

आमचे "ताजमहालाला विटाकाम" :-)

> तरीही अखंड | आशा ही अभंग | > _मनी_अनिर्बंध_ | तेवतसे || >हे "मनीअ - निर्बंध" असे वाचावे लागते. ते बरे वाटत नाही. हा स्टँडर्ड यतिभंग आहे. यात चूक नाही. > खरी की आभासी | आशा ही जिवासी | > _दिलासा_ अविनाशी_ | देई खरा || हे निश्चितच हुकलेले आहे. पहा आमच्या विटा चालतात का : ;-) खरी की आभासी | आशा ही जिवासी | शाश्वत धीरासी | देई खरी|| (धीरासी देणे मधे "स, ला , ते" हा द्वितीयेचा प्रत्यय लावला आहे. धीरासी देणे = धीर देणे. "आशा खरा , अविनाशी दिलासा देते" च्या ऐवजी "खरी आशा धीर देते " असे बनले. त्यामुळे त्याचे लिंग बदलले. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
न
नंदन Tue, 02/05/2008 - 21:36 नवीन

शाश्वत धीरासी

चालू शकेल. अर्थ आणि वजनाला फिट बसते आहे. तेव्हा ताजमहालाला विटाकाम नाही म्हणता येणार, तर अस्ताव्यस्त झालेले घर नीटनेटके करावे तसे काहीसे म्हणायला हवे :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चतुरंग Tue, 02/05/2008 - 21:14 नवीन

नंदन,

फारच छान! अगदी पटले, जिवाची कुतरओढ करत ह्या कसरती आयुष्यभर करणारी 'ती' खरंच अशीच आहे. विचार अभंगाच्या ठेक्यात सुंदर गुंफले आहेत. चतुरंग
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 02/05/2008 - 21:23 नवीन

बापरे

तीन मिनिटांत पाच प्रतिसाद :). धन्यवाद, मंडळी. धनंजय, ६,६,६,४ चे सूत्र पाळायचा प्रयत्न केला पण यमक जुळवण्याच्या भानगडीत मनीअ निर्बंध हा यतिभंग काही टाळता आला नाही. तीच गोष्ट अविनाशीची. पर्यायी तीन अक्षरी शब्द शोधण्यासाठी डोकं बरंच खाजवलं, पण काही सुचलं नाही :(. [बाकी, दिलासा मिळतो तो मुलाकडे पाहून असं म्हणायचं आहे.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 02/05/2008 - 21:27 नवीन

क्रॉस्-पोस्टींग झाले ...

:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
सहज Tue, 02/05/2008 - 22:06 नवीन

वाह!

यथार्थ वर्णन | करी तो नंदन | होऊ दे मंथन | आता घरोघरी || आवडले. अवांतर - केशवसुमार कच्चा माल पाहून खुश होतील. :-)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 02/05/2008 - 22:52 नवीन

हेच,

अवांतर - केशवसुमार कच्चा माल पाहून खुश होतील. :-) हेच म्हणतो! केशवा, टेक युअर ओन टाईम पण येऊ दे एखादे फर्मास विडंबन... आपला, (नंदन आणि केशव, दोघांचाही क्रॉम्प्टन फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
स्वाती दिनेश Tue, 02/05/2008 - 22:13 नवीन

सुंदर...

सुंदर रचना नंदन, पुनश्च हासून | पदर खोचून | देई ती झोकून | हुरुपाने || हे विशेष आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/05/2008 - 22:19 नवीन

मस्त

नंदन, अभंग आवडले. (फ. मु. शिंदेंच्या फकिराच्या अभंगाची आठवण झाली )
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 02/05/2008 - 22:35 नवीन

वा!

नंदनशेठ, एकदम कडक अभंग..आमचा सलाम.. केशवसुमार.. अवांतर अभियांत्रीकी महाविद्यालयात असताना आम्ही असे च ३०-४० ओव्या खरडल्या होत्या त्याची आठवण झाली..धन्यवाद बारावीच्या वर्षास | करी कसून अभ्यास| उत्तमगुण तयास | मिळती विश्वासे | | उत्तम गुण मिळता | भविषाची चिंता| डॉक्टर की अभियंता| मातापीता ठरवती | | ...... ...... प्रत्येक विषया | चारच दिवस | या हिशोबे अभ्यास| पास होण्या पुरेसा | | .... वेळेला बॉयलर सुट| इतर वेळी फॅशन| अशी ही जीन | कधीतरी धुवावी | | तेव्हा जाल/ संकेतस्थळे वगैरे नव्हत .. आता जुना पसारा शोधला पाहिजे..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 02/05/2008 - 22:42 नवीन

नंदन सायबा,

नंदन सायबा, अरे यार किती छान लिहिलं आहेस! वाचून खूप बरं वाटलं! लागते टोचणी | भिजते पापणी | जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? || काया रे शिणते | मनही कण्हते | कुणी का गणते | श्रम माझे? || समस्त मुंबईकर कष्टकरी महिलावर्गाचे विचार मांडले आहेस रे नंदनशेठ! धन्य आहे तुझी... पुनश्च हासून | पदर खोचून | देई ती झोकून | हुरुपाने || क्या बात है.. यातला मुंबईकर जिन्दादीलपणा खास वाखाणण्याजोगा! नंदनसायबा, तुझ्या या कवितेने मिपाची उंची खूप वाढली आहे एवढेच या क्षणी म्हणावेसे वाटते! तुझाच, तात्या.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 07/03/2010 - 17:49 नवीन

हे फक्त

हे फक्त मुंबईच्या तमाम कष्टकरी महिलांचे विचार नाहीत तात्या! जगातल्या सगळ्या आया (होय हो, परदेशातल्यासुद्धा!) आपापल्या मुलांशी अश्याच जिवाभावाने बांधलेल्या असतात आणि नोकरी किंवा इतर गोष्टींपायी त्यांच्या मनाची अशीच कुतरओढ होते. मुले लहान असताना, लहान आहेत म्हणून तर मोठी झाल्यावर 'आता मोठी झालीत' म्हणून काळजी हा प्रकार कोणत्याही आईला चुकत नाही. आईच्या मायेला स्थल कालाचे बंधन नाही. व्हिसाचीही गरज नाही. भारतात बसलेली आई परदेशातल्या मुलाजवळ मनाने असतेच. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सौ साधना डोंगरे Tue, 02/05/2008 - 23:14 नवीन

तिचे अभंग तिची गाथा

स्त्री जन्मा ही तूझी कहाणी एकवीसाव्या शतकातील ही वीराणी.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/05/2008 - 23:48 नवीन

वा नंदन वा!

वा नंदन वा! सगळी कविताच झकास!! त्यातहि मस्टर धोक्यात | छकुला डोक्यात | आयुष्य ठेक्यात | बसेचिना || ठेवा तो सुखाचा | निर्व्याज स्मिताचा | विसर जगाचा | पाडी झणीं || पुनश्च हासून | पदर खोचून | देई ती झोकून | हुरुपाने || हे अधिक भावले आणि वीकांत ही आवडला ;) पण कवितेचे नाव तितकेसे रुचले नाहि. अधिक नेटके आणि नेमके हवे असे वाटले (पण दुसरे सुंदर नाव सुचले नाहि सुचल्यावर सांगिनच :)) खूप मस्त!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 02/05/2008 - 23:54 नवीन

उत्तम

उत्तम अभंगवाणी. आवडली. (वारकरी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/06/2008 - 00:29 नवीन

तेव्हाही

तेव्हाही आराम | असतो हराम | कामे ती तमाम | उरकावी || सत्य स्थिती.. कामसू सचिव | सखीही रेखीव | गृहिणी आजीव | प्रियशिष्या || हे हि खरंच आहे.. तरीही अखंड | आशा ही अभंग | मनी अनिर्बंध | तेवतसे || आशा आहे म्हणून तर जग चालू आहे.. पुनश्च हासून | पदर खोचून | देई ती झोकून | हुरुपाने || काय करणार... दुसरा पर्याय काय आहे? अप्रतिम कविता आहे... - प्राजु
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 02/06/2008 - 02:33 नवीन

आशा

आशा आहे म्हणून तर जग चालू आहे.. यावरून एक सुभाषित आठवले. ते येथे उधृत करण्याचा मोह आवरत नाही. विशेष म्हणाजे हे सुभाषित आशा भोसलेला कुणीतरी तिच्याच वाढदिवसादिवशी भेट म्हणूनही ऐकवले होते; आणि ते आशाताईंना शोभूनही दिसते - आशा नाम मनुष्याणाम् काचिदाश्चर्यशृंखला यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत् अर्थ - आशा ही माणसांना बांधून ठेवणारी अशी शृंखला आहे की जिने बांधले असता (जिच्या प्रभावाखाली) सगळे (कसल्यातरी आशेने, आसेने) पळत राहतात आणि जिच्यापासून मुक्त असलेले पांगळ्याप्रमाणे एका जागी अडकून पडतात/राहतात. (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मुक्तसुनीत Wed, 02/06/2008 - 00:55 नवीन

नंदनराव

करंदीकरांची आठवण करून दिलीत :-)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/06/2008 - 03:01 नवीन

वा..

बेसन लाडू, छान आहे सुभाषित. मला रेडिओवरील कार्यक्रमाला कुठेतरी उपयोगी पडेल हे... धन्यवाद. - प्राजु
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 02/06/2008 - 09:01 नवीन

उत्तम!

आता नंदन खर्‍या अर्थाने कवि म्हणून प्रस्थापित झाला. रचना सोपी,सुटसुटीत आहे. आवडली.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 02/06/2008 - 09:54 नवीन

वा!!!!!

अभंग आवडले. अप्रतिम! (वारकरी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 02/06/2008 - 10:18 नवीन

छान

सुंदर अभंग .. आवडले.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/07/2008 - 04:22 नवीन

आपली कविता कोणत्याही विटकामशिवायही छान आहे..

आपल्याला तर बुवा आवडली फार.... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार गुरुवार, 02/07/2008 - 15:10 नवीन

लावून झापड

लावून झापड | शिवावे कापड | तळावे पापड | निगुतीने || मोजके आणि परिणामकारक शब्द असल्याने थेट संवादाच्या रूपात येणारे अभंग आवडले. शेवटच्या पदात अभंग प्रथमपुरुषातून बाहेर पडतात तेव्हा कवीचा वेगळेपणा एकदम जाणवतो. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनिला गुरुवार, 02/07/2008 - 22:11 नवीन

वरील सुरेख कविता.

स्त्रीसूक्त या नावाचे आष्विनी धोगडे यान्चे पुस्तक १९८८ ल प्रसिध्ध झाले होते. त्यात अशाच पुश्कळ कविता आहेत, मिळल्यास वाचाव्या. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 02/08/2008 - 14:31 नवीन

मनःपूर्वक आभार

मंडळी. तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे. केशवराव, तुमच्या जुन्या ओव्या वाचायला नक्कीच आवडतील. अनिला, सुचवणीबद्दल आभार. स्त्रीसूक्त नक्कीच मिळवून वाचायचा प्रयत्न करेन. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Fri, 02/08/2008 - 22:33 नवीन

मस्त

मस्त! कविता आवडली. शेवट सुद्धा.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/24/2008 - 16:01 नवीन

मस्त

मस्त कविता... तेव्हा वाचायची राहून गेली होती बहुतेक. खूपच सुंदर. आधुनिक गृहिणीचे यथार्थ वर्णन. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 11/24/2008 - 17:39 नवीन

++++++++++११११

प्राजु ,तात्या अनिल बिपिन भो याच्याशी अगदी सहमत आहे आजच्या धावपळिच्या युगात किति कष्ट घेते स्त्री मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 11/24/2008 - 19:38 नवीन

सुरेख !

स्त्री गाथा आवडली. :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 11/24/2008 - 19:51 नवीन

मस्तच रे

मस्तच रे नंदन :)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 11/24/2008 - 20:56 नवीन

जियो नंदन

खूपच सुरेख कविता... खूप खूप आवडली रे मित्रा... कुठल्या ओळी इथे देऊ, सगळी कविताच आवडलीय !! -------- अवांतरः तुझ्या वडिलांना स्टार माझाच्या ऑफिसमधे भेटून आनंद झाला. त्यांना नमस्कार कळव.
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 11/25/2008 - 00:15 नवीन

मस्त कविता

छान कविता... खूप आवडली चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अन्वय Tue, 11/25/2008 - 13:46 नवीन

ज॒बरदस्त

ज॒बरदस्त रे भाऊ! लगे रहो...
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 11/25/2008 - 21:31 नवीन

छान कविता

नंदन, छान झाली आहे कविता. खूप आवडली. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Tue, 11/25/2008 - 22:16 नवीन

प्रतिक्रियेसाठी शब्द नाहीत...

नंदनजी ही कविता वाचून महानगरात घड्याळाच्या काट्याबरोबर धावणार्‍या, आनि परिस्थितीसमोर काहीशा अगतिक बनलेल्या आजच्या स्त्रीचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे राहते.त्या स्त्रीचा हा सल तुम्ही नेमका शब्दात पकडला आहे. तिच्या भूमिकेशी तद्रुप झाल्याशिवाय हा नेमकेपणा अशक्य आहे. तुमचे मनापासून अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 11/26/2008 - 11:54 नवीन

धन्यवाद

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. (शेवटून दुसर्‍या चरणातला यतिभंग दुरूस्त केला आहे.)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 07/03/2010 - 00:05 नवीन

किती

किती सुंदर रे कविता ! पुन्हा वाचली .. फार छान वाटले.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sat, 07/03/2010 - 11:26 नवीन

अप्रतिम !!

नंदन....खूप दिवसांनी तुझी कविता वाचली. उच्च !! नोकरी करणार्‍या स्त्रीचं वर्णन फार सुरेख केलं आहेस. शेवट तर जबरी !! खूप खूप आवडेश :)
  • Log in or register to post comments
आ
आनंद Sat, 07/03/2010 - 13:00 नवीन

सुंदर

सुंदर कविता ! कुसुमाग्रजांची आगगाडी आणि जमीन आठ्वली..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/03/2010 - 13:19 नवीन

मस्तच

मस्तच ... नंदन, किती दिवस आणखी लेखणी म्यान करून ठेवणार? अदिती
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 07/03/2010 - 18:09 नवीन

+१

नंदनशेठ किती भाव खाल अजुन? तुमच्यासारखे लिहत नाहीत वर तिकडे लोक नाव ठेवतात दर्जा नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मस्त कलंदर Sat, 07/03/2010 - 18:34 नवीन

+२

लवकर लिही रे नंदन... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ऋ
ऋषिकेश Sun, 07/04/2010 - 12:11 नवीन

+३

वाट किती बघायला लावायची लोकांना! ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 07/04/2010 - 21:03 नवीन

-१

कोण नंदन? धन्यवाद. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
राजेश घासकडवी Sat, 07/03/2010 - 17:24 नवीन

उशीर जाहला

उशीर जाहला | जीव हा गुंतला | प्रपंची वेढला | चहूबाजूं || या कवितेत शहरी स्त्रीच्या कुतरओढीचं चित्रण केलं असलं तरी वरच्या ओवीमुळे (व इतरही काही पंक्तींमुळे) ही कविता ध्येय न सापडलेल्या, कुठे जातोय याचा निवार न करता प्रवाहात पडलेल्या, व तरण्यासाठी अविरत केविलवाणे हातपाय मारणार्‍या व्यक्तीची वाटते. राजेश
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा