मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अखंड महाराष्ट्र की वेगळा विदर्भ

प्रविण गो पार्टे · · काथ्याकूट
सध्या वेगळ्या विदर्भाचे सोन्ग उठले आहे.. माझे मत आहे की आपला महाराष्ट्र अखंड राहावा.. विकासाच्या नावाखाली काही मूठभर राजकारण्याच्या नादी लागून वेगळी चूल मांडण्यात काही अर्थ आहे का.. आपले काय मत आहे मित्रानो वेगळा विदर्भ व्हावा की अखंड महाराष्ट्र राहावा..

वाचने 11609 वाचनखूण प्रतिक्रिया 47

In reply to by मराठी_माणूस

मी मुंबईतला आणि मूळचा कोकणातला असलो तरी जितकी आत्मियता आणि अभिमान मला कोकणचा आहे तितकाच विदर्भाचा आहे. विकसाबद्दलमाझे मत विचारल तर विकास हा सर्व ठिकाणी समान पातळीवर झाला पाहिजे.. फक्त मुंबई पुण्याचा विकास म्हणजे संपूर्ण राज्याचा विकास नव्हे.. नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद या शहरांचा विकासही तितक्याच ताकदीने झाला पाहिजे. विदर्भात दुर्लक्षित असलेल्या विभागामधे सरकारने नीट लक्ष दिले पाहिजे.. तेथील नागरी सुविधा वाढविल्या पाहिजे, शहरांचा विकास करून जर रोजगार निर्मिती केली तर साहजिकच विदर्भातील खेड्यातील लोकजीवन सुधारेल आणि वेगळा विदर्भाचा मुद्दा आपोआप बाजूला पडेल कारण शेवटी विकास महत्वाचा आहे. आणि विदर्भातील लोकानी लक्ष द्याव की इकडे मुंबई पुण्यात तर परराज्यातुन लोक येऊन नोक्र्यामधे आपल बस्तान बांधतात मग आपण का येऊ नये.. तुम्ही तर आपल्या महाराष्ट्राचे भुमीपुत्र आहात.. तुमचा तर पहिला हक्क आहे त्यावर.. एखादा परप्रांतीय येऊन इकडे नोकरी बाळकवण्यापेक्षा विदर्भातील माझ्या भावाने ती का करू नये.

In reply to by कपिलमुनी

गॅरी ट्रुमन Wed, 06/21/2017 - 15:23
महाराष्ट्राचे तुकडे पाडाल तर याद राखा. मुंबई किंवा विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची भाषा करणार्‍याच्या नरडीचा घोट घेऊ. हलके घ्या हे वेगळे न सांगणे लागे.

सागर Wed, 06/21/2017 - 16:21
वेगळे व्हायचे की नाही ते विदर्भवासियांनाच ठरवू देत. आपण त्यावर काथ्याकूट करणे म्हणजे स्वतःचा वेळ वाया घालवणे. महाराष्ट्रात अगोदरच बेळगाव नाहिये. आता विदर्भ वेगळा झाला तर होउ देत. मनाने मात्र सर्व मराठी लोकांनी एकत्र रहा रे. राजकारणी नेत्यांना फाळणी हा प्रिय विषय असतो. त्यात आपले संबंध आणू नका.

In reply to by सागर

विशुमित Wed, 06/21/2017 - 16:26
वेगळे व्हायचे की नाही ते विदर्भवासियांनाच ठरवू देत. ==>> राष्ट्रवादीचे का ? आमचे साहेब विदर्भाबाबत नेहमी असेच उत्तर देत असतात म्हणून विचारलं. कृपया गैरसमज नसावा.

In reply to by सागर

विशुमित Wed, 06/21/2017 - 16:33
वेगळे व्हायचे की नाही ते विदर्भवासियांनाच ठरवू देत. ==>> राष्ट्रवादीचे का ? आमचे साहेब विदर्भाबाबत नेहमी असेच उत्तर देत असतात म्हणून विचारलं. कृपया गैरसमज नसावा.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Wed, 06/21/2017 - 18:46
साहेब आधी म्हणायचे की वेगळं व्हायचं का नाही ते विदर्भवासियांनाच ठरवू द्या. नंतर ते म्हणायला लागले की विदर्भवासीय जे ठरवतील त्याला आमचा पाठिंबा असेल. नंतर ते म्हणाले की स्वतंत्र विदर्भाला आमचा विरोध आहे. आगामी काळात अजून बर्‍याच कोलांट्या उड्या अपेक्षित आहेत.

In reply to by सागर

कपिलमुनी गुरुवार, 06/22/2017 - 16:37
वेगळे व्हायचे की नाही ते विदर्भवासियांनाच ठरवू देत. इथे विदर्भच्या जागी काश्मीर घातला तर ?

In reply to by कपिलमुनी

sagarpdy Fri, 06/23/2017 - 00:25
लोकशाही च्या तत्त्वांना धरूनच आहे. फक्त काश्मीर मधील सर्वमतासाठी असलेल्या पूर्वअटी अमलात आल्या पाहिजेत - सैन्य नसणे. यात आधीच्या करारानुसार काश्मीर भारताचा भाग असल्याने पाकिस्तान ने सैन्य आधी मागे घेतले पाहिजे(पाकव्याप्त काश्मीर), मग भारताने, नंतर सार्वमत. विदर्भात या भानगडी नाहीयेत.

In reply to by कपिलमुनी

काश्मीरसंबंधीच्या युएन रिझॉल्युशन्सबद्दल (U.N.Resolution on J&K August 13, 1948) विधाने करणार्‍यांपैकी ९९% लोकांनी, आंतरजालावर सहजपणे उपलब्ध असलेले हे रिझॉल्युशन मूळातून वाचण्याची तसदी घेतलेली नाही असेच वारंवार दिसते... हा झाला त्या लोकांच्या अज्ञानाबद्दलचा किंवा बेजबाबदारपणाबद्दलचा, पण तरीही त्यांच्या बुद्धीमत्तेचा अपमान न करणारा शेरा ! ...जो फारच मवाळ शेरा आहे. :) ते रिझॉल्युशन आणि त्यातले क्लॉजेस इतक्या साध्या भाषेत आणि इतके स्पष्ट आहेत की 'केवळ सर्वसामान्य स्तराचे इंग्लिश' समजण्याइतके प्राविण्य असलेल्या माणसाला त्याचा अर्थ सहजपणे समजेल. कोणतेही रिझॉल्युशन त्याच्या सर्व क्लॉजेससकट पूर्णपणे वाचायचे असते व त्याचा तसाच अर्थ लावणे अपेक्षित असते. आणि कोणत्याही प्रामाणिक माणसाने त्याचा तसाच अर्थ लावायचा असतो. त्यामुळे, ते रिझॉल्युशन मूळातून नीट वाचले असल्यानंतरही, जर दिशाभूल करणारे शेरे मारले जात असले तर त्या प्रयत्नांमागे स्पष्टपणे 'काहीतरी गुप्त कपटी हेतू' असल्याचा संशय घेण्यास नक्की जागा असते. असे प्रयत्न... साधारणपणे पाकिस्तान, पाकिस्तानचे हस्तक, कम्युनिस्ट, अतिरेकी, इत्यादी... त्यांचे कपटी हेतू साध्य करण्यासाठी नेहमी करत असतात. तेव्हा, स्वतःच्या सचोटीपूर्ण प्रतिमेची काळजी असणार्‍या कोणीही त्या रिझॉल्युशनचा निर्देश किंवा त्याबद्दलची शेरेबाजी विचारपूर्वक व जबाबदारीने करावी, असा अनाहुत सल्ला आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गॅरी ट्रुमन Fri, 06/23/2017 - 10:17
_/\_ मस्त. काश्मीरच्या नावावर जो पुरोगामी बुद्धीभेद नेहमी चालू असतो त्याचा छान समाचार घेतला आहे डॉक्टरसाहेबांनी.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी Fri, 06/23/2017 - 08:01
>>> इथे विदर्भच्या जागी काश्मीर घातला तर ? काहीही हं मुनी. विदर्भवासीय वेगळे राज्य मागताहेत, वेगळा देश नाही.

In reply to by कपिलमुनी

गामा पैलवान Fri, 06/23/2017 - 11:41
कपिलमुनी, इथे काश्मीरच्या जागी शौचालय हा शब्द चपखल बसेल. नवं वाक्य :
सध्या वेगळ्या शौचालयाचे सोन्ग उठले आहे.. माझे मत आहे की आपलं माळरान अखंड राहावं.. विकासाच्या नावाखाली काही मूठभर राजकारण्याच्या नादी लागून वेगळी चूल मांडण्यात काही अर्थ आहे का.. आपले काय मत आहे मित्रानो वेगळं शौचालय व्हावं की अखंड माळरान राहावं..
आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे Fri, 06/23/2017 - 19:11
संपादक मंडळ (असल्यास), सदर सदस्य स्वतंत्र विदर्भाची शौचालयाशी तुलना करत आहे. हे निदर्शनास आणून देत आहे.

In reply to by संदीप डांगे

गामा पैलवान Fri, 06/23/2017 - 23:55
संदीप डांगे, विदर्भात केवळ #गायलाच बसावे असं कुठेही म्हंटलं नाहीये. तरीपण तुमच्या समाधानासाठी म्हणून शौचालयाच्या जागी जकात शब्द टाकतो. नवं वाक्य :
सध्या वेगळ्या जीएसटीचे सोन्ग उठले आहे.. माझे मत आहे की आपली जकात अखंड राहावी.. विकासाच्या नावाखाली काही मूठभर राजकारण्याच्या नादी लागून वेगळी चूल मांडण्यात काही अर्थ आहे का.. आपले काय मत आहे मित्रानो वेगळा जीएसटी व्हावा की जकात अखंड राहावी..
विदर्भाची जीएसटीशी तुलना केली आहे. दिल खूष? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

समझा बबनचा विदर्भ वेगळा झाला तर टोलनाके वेगळे होतील का? झाले तर मालवाहु वाहनं जसंकी ट्रक टेंपो इ.इ.ना टोल कॅशमधे भरावा लागेल का कार्ड पेमेंट? बाकी हागणदारीचा आणि विदर्भाचा संदर्भ वरच्या प्रतिक्रियेत आढळला नाही तस्मात असलेल्या संपादक मंडळाने अवांतरवाद्यांना फाट्यावर मारावे हि नम्र विनंती.

सतिश गावडे Wed, 06/21/2017 - 21:35
जर विदर्भवासीयांना वेगळे विदर्भ राज्य हवे असेल तर काय हरकत आहे वेगळा विदर्भ व्हायला? उत्तरेत नाही का अनेक मोठ्या राज्यांचे विभाजन झाले? काय नुकसान झाले झाले त्यामुळे? किंवा वेगळा विदर्भ झाल्याने काय नुकसान होणार आहे कुणाचे? मात्र उत्तर कर्नाटकातील मराठी भाषिक गावेही मग महाराष्ट्रात आणावीत वेगळा विदर्भ करणाऱ्यानी. जर राज्यकर्ते विदर्भातील जनतेची वेगळ्या विदर्भाची विनंती अंमलात आणणार असतील तर उत्तर कर्नाटकातील मराठी जनतेचा आक्रोशही त्यांनी ऐकला पाहिजे.

In reply to by सतिश गावडे

दशानन Wed, 06/21/2017 - 22:10
त्या डुक्कर खिंडीचे नाव काढू नका, आज चांगले 2-3 तास वाया गेले, NHAI च्या ऑफिसरची व्हिजिट होती. डोक्याला ताप झाला तो रोड साईडला पडलेला उच्चभ्रू कचरा पाहून :( त्याला सांगून पटेना की लोक पॉश कार मध्ये येऊन येथे कचरा टाकतात, नशीब त्याच्या समोर एक पॉश कारवाला कार मधून मोठी काळी प्लास्टिकची पिशवी बाहेर रस्त्याच्या बाजूला टाकताना त्याने स्वतः पाहिले :D

गॅरी ट्रुमन Mon, 06/26/2017 - 13:14
मागच्या वर्षी महाराष्ट्राचे सॉलिसिटर जनरल श्रीहरी अणे यांनी विदर्भ आणि मराठवाडा ही राज्ये वेगळी करावीत असे विधान केले होते. त्यावर लिहिले होते (माझे आजचे मतही तसेच आहे): विदर्भाचे वेगळे राज्य करा, मराठवाड्याचे वेगळे राज्य करा वगैरे मागण्यांवरून गेल्या दोन-तीन दिवसात बरीच धूळ उडलेली दिसली. अशी नवी राज्य बनवावीत का? मला माहित नाही. माझ्या मते राज्ये म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी देशाच्या नकाशात आखलेल्या कृत्रिम रेषा आहेत.तेव्हा आणि ती राज्ये बनवली किंवा बनवली नाहीत तरी व्यक्तिश: मला अजिबात फरक पडणार नाही. मला वाटते की महाराष्ट्रातून विदर्भ/मराठवाडा वेगळा करून स्वतंत्र राज्य बनविण्याचा (for that matter कुठल्याही राज्यातून कुठल्याही प्रदेशाचे वेगळे राज्य बनविण्याचा-- उदाहरणार्थ बंगालमधून गुरखाभूमी किंवा उत्तर प्रदेशातून हरित प्रदेश इत्यादी) निर्णय केवळ तसे केल्याने प्रशासकीय सोय/ निर्णयप्रक्रीया लवकर होऊन निर्णयांची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम पध्दतीने होणे/ आर्थिक फायदे इत्यादी गोष्टी साध्य होणार आहेत का एवढाच मापदंड असावा.या प्रश्नांची उत्तरे जर हो अशी असतील तर खुशाल विदर्भ आणि मराठवाड्याचे स्वतंत्र राज्य करावे. श्रीहरी अणे यांनी ती मागणी केल्यानंतर अनेक जण अक्षरश: पिसाळले. जसे काही विदर्भ/मराठवाड्याचे स्वतंत्र राज्य करायची मागणी करणे म्हणजे महंमद अली जीनाने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्यासारखेच आहे!! जसे काही विदर्भ/मराठवाड्याचे स्वतंत्र राज्य केल्यास जशी काही भारत-पाकिस्तानसारखी फाळणीच होणार आहे आणि १९४७ प्रमाणे कत्तली होणार आहेत तसेच लाखो लोक जीवाच्या आकांताने रेल्वेगाड्या भरून विदर्भ/मराठवाडा सोडून ’महाराष्ट्रात’ पळून येणार आहेत!! बहुसंख्य विरोधकांचा या मागणीला विरोध अशी नवी राज्ये करून आर्थिक/प्रशासकीय वगैरे गैरसोय होईल म्हणून विरोध नव्हताच तर तो विरोध होता ’मराठी बाणा’ दुखावला जाईल म्हणून. एक गोष्ट कळत नाही. अशी नवी राज्ये बनवली किंवा बनविली नाहीत तरी एक सामान्य माणून म्हणून माझ्यात आणि माझ्या फेसबुक फ्रेंडलीस्टमधील अगदी प्रत्येकाला त्यामुळे नक्की काय फरक पडणार आहे? हे असले मराठी बाणे वगैरे अगदी फाट्यावर मारायच्या गोष्टी आहेत. त्या मातोश्री आणि कृष्णकुंजवरील गावगुंडांच्या राजकारणाला साजेशा आहेत. आपल्यासारख्या सामान्यांना या असल्या कोंबड्यांच्या झुंजींमध्ये पडायचे अजिबात काहीही कारण नाही. मागे कोणीतरी फेसबुकवर एक फोटो शेअर केला होता.तो मला भलताच आवडला होता.आपण जन्माला येताक्षणी आपल्याला समाजातील इतर लोक धर्म, जात, देश, भाषा इत्यादी लेबले चिकटवतात.जन्माला येताना त्यापैकी कोणतेही लेबल आपण घेऊन येत नाही.तरीही इतरांनी आपल्याला चिकटविलेल्या या लेबलांना defend करायला आपण आयुष्यभर भांडत राहतो. अर्थातच सध्याच्या जगात हा भाबडा आदर्शवाद झाला--विशेषत: तालिबानी, आयसिसवाले आपल्याला हिंदू आणि भारतीय म्हणून लक्ष्य करत असतील तर.समजा ’हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली तर मी हिंदू, भारतीय इत्यादी थोडीथोडकी लेबले वागवतो ती एका क्षणात फेकून द्यायला तयार आहे. या दोन लेबलांविषयी आपण काही करावे अशी परिस्थिती सध्या नाही तेव्हा त्याविषयी फार काही करता येणार नाही.पण त्याउपर हे मराठी हे लेबल वागवायचे असेल तरी त्याचा अभिमान धरणे, हमरीतुमरीवर येणे या गोष्टी कशाकरता? आपण अमुक एका जातीत जन्माला आलो यात आपले कर्तुत्व काय--आपण नक्की काय केले होते म्हणून त्या जातीत आपला जन्म झाला असे प्रश्न विचारणारेच परत मराठी बाणे वागवतात हे बघून खरोखरच आश्चर्य वाटते. आपण अमुक एका जातीत जन्माला यावे यासाठी काही केले नसेल त्याचप्रमाणे मराठी घरात जन्माला यावे यासाठी नक्की काय केले होते? मराठी बाणेवाल्यांपैकी कोणी सांगू शकेल का?

गामा पैलवान Mon, 06/26/2017 - 17:11
गॅरी ट्रुमन, तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. एकेक मुद्दे विचारात घेऊया. १.
त्याचप्रमाणे मराठी घरात जन्माला यावे यासाठी नक्की काय केले होते?
काहीही केलेलं नव्हतं. येळ्ळूरमधल्या मराठीभाषिकांनीही मराठी घरात जन्मण्यासाठी काहीच केलं नव्हतं. मात्र तरीही कर्नाटकी सरकारने त्यांच्यावर भीषण अत्याचार केलेच ना? ते कोणत्या नियमाखाली? २.
... प्रशासकीय सोय/ निर्णयप्रक्रीया लवकर होऊन निर्णयांची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम पध्दतीने होणे/ आर्थिक फायदे इत्यादी गोष्टी साध्य होणार आहेत का ...
याबाबत छत्तीसगड झारखंड इत्यादिंचा अनुभव निराशाजनक आहे. नव्या राज्यांनी केवळ नेतेलोकांची आणि नोकरशहांची चरायची आणि चारायची सोय होते. जनतेचा फायदा शून्य. ३.
काही विदर्भ/मराठवाड्याचे स्वतंत्र राज्य केल्यास जशी काही भारत-पाकिस्तानसारखी फाळणीच होणार आहे आणि १९४७ प्रमाणे कत्तली होणार आहेत तसेच लाखो लोक जीवाच्या आकांताने रेल्वेगाड्या भरून विदर्भ/मराठवाडा सोडून ’महाराष्ट्रात’ पळून येणार आहेत!!
तसं काही होणार नाहीये. आता फाळणीचा विषय निघालाच आहे, तर एक निरीक्षण नोंदवतो. इंग्रजी सत्तेविरोधी स्वातंत्र्यलढ्यात पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र ही राज्ये अग्रेसर होती. ही राज्ये जरी स्वातंत्र्योत्तर काळी निर्मिली गेलेली असली तरी ते प्रांत आधीपासून अस्तित्वात होते. आज पंजाब आणि बंगाल अर्धे कापले जाऊन पाकिस्तानवासी झालेले आहेत. ज्या मोगलांचा १७ वेळा पराभव केला त्या आसामचीदेखील फाळणी होऊन सिलहाट जिल्हा पाकिस्तानात गेला. परंतु सिंधची फाळणी करून हिंदूबहुल थरपारकर जिल्हा भारतात आणला गेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र हे एकमेव राज्य फाळणीपासून मुक्त आहे. एव्हढंच नव्हे तर हैदराबाद या फुटीरतावादी संस्थानाचा मराठवाडा हा भाग सामील करून निर्माण झालेलं आहे. तर, भारताला बलिष्ठ करणारी महाराष्ट्राची ओळख पुसून टाकावी का? समजा जर महाराष्ट्र राज्य विलग केलं तर महाराष्ट्रीय ओळखीची (=आयडेण्टिटीची) पुनर्बांधणी करावी लागेल. ती करण्यासाठी मालोजी, शहाजी, शिवाजी, शंभूराजे या चार पिढ्या खर्ची पडल्या होत्या हे आवर्जून सांगावंसं वाटतं. माझ्या मते जोवर पाकिस्तान अस्तित्वात आहे तोवर महाराष्ट्र राज्य अखंड राहिलंच पाहिजे. ४.
हे असले मराठी बाणे वगैरे अगदी फाट्यावर मारायच्या गोष्टी आहेत. त्या मातोश्री आणि कृष्णकुंजवरील गावगुंडांच्या राजकारणाला साजेशा आहेत.
कृष्णकुंज वा मातोश्री यांनी एखादी संकल्पना स्वत:च्या फायद्यासाठी वापरली तरी ती मुळातून टाकाऊ ठरंत नसते. तुम्हीआम्ही विचारवंत आहोत. नव्या महाराष्ट्रधर्माची व्याप्ती ठरवण्यासाठी आपली नक्कीच मदत होऊ शकेल. तशी आपल्यापैकी कोण्या विचारवंताने केली आहे का? ५.
पण त्याउपर हे मराठी हे लेबल वागवायचे असेल तरी त्याचा अभिमान धरणे, हमरीतुमरीवर येणे या गोष्टी कशाकरता?
नेमकं हेच टाळण्यासाठी मराठी माणसाला मराठी विचारवंतांकडून मार्गदर्शन हवंय. कृष्णकुंज वा मातोश्रीवर टीका खुशाल करावी. फक्त त्यातून मराठी माणसाला काय बघायला आवडेल आणि काय बघायला नकोय याविषयी मंथन व्हावं. आ.न., -गा.पै.