कथा आणि व्यथा
इंग्लीश स्कूलचं फॅड
गावचा नामा त्या दिवशी भेटला.
बॅंकेच्या दारात.गडी जरा घाईतच होता.हातात बरीचं कागद होती.
त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं होतं.
मी:अरे कर्ज कशाला काढतो?"
तो:"कशाला म्हंजे? पोरग टाकलं की शाळात"
मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?"
तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं.
रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला."
मी: "किती पैसं भरलं ?
तो:आता भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचं वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला.रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून ."
मी:"आरं,एवढ पैसं कशी आणणाऱ ?"
तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्ह? उचल घेणारं .बायको भी समजदार. ती पण म्हंती काय भी करू.कुणाचा गू काढू पण पोरग इंग्जीतच शिकू.मुकादम उचल देतो की.त्याच्या मेहूण्याचीच शाळा जनू"
मी:" पोराचं काय वय?"
तो:" चौथं लागलं असलं बघा आवंदा."
मी: "अजून त्याचं वय नाही की झाली शाळाचं "
तो:आता पोटातचं असल्या पासून शिकशान सुरू होतं .उग कशाला याड घेता.?
मी:गावात शाळा आहे सरकारी.अंगणवाडी आहे बरं सारं फुकाटं उग़ कशाला खर्चात पडतो ?
तो:गावात हाय.सार हाय .फुकाट हाय
पण ते मराठी हाय. आपल्याला इंग्रजी पायजे"
मी:"का ?मराठी भाषा आपली "
तो: कोण शिकतं मराठी ?"
मी: "मुकादम पैसं देणाऱ मग कर्ज कशाला?"
तो: " पुस्तकं.कपडे घ्यावी लागतात.त्याचं सात हजारं दयाचेत"
मी:अरे,सारं फुकटंच सोडून का खर्चात पडतो? अजून तर त्यांच शाळाचं वय नाही ."
तो:सर, ठरलं एकदा .पोरग इंग्लीस स्कूलातचं शिकणार .आमचं जिनं गेलं पाचाटात .त्याला नाय या नरकात येऊ दयायचो. मोठा सायब करणार
घाणं राहू पण इंग्लीशचं शिकू "
माझी बोलती बंद झाली. एेपत नसतानी हा कसा शिकवणाऱ . महागडया फिस कशा भरणाऱ?
महत्त्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.
आपली दकानं चालवण्यासाठी सरकरी शाळा व शिक्षक यांना बदनाम केले जात आहे. उंदड झाली इंग्लीश स्कूल पण सरकार कां राहतं थंडा थंडा कूल ? इंग्लीश स्कूल म्हंजे ब्रम्ह देवाचा हात नाही तिथं गेलं की साहेब व्हायला.पण हे कुणाला सांगावा ? कसं सांगाव? आपलीच कथा आपलीच व्यथा ....!!
(परशुराम सोंडगे,पाटोदा बीड . . . . . 9673400928)
. .
वाचने
3320
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदीच चूक नाही.
एकदम बरोबर
In reply to अगदीच चूक नाही. by सौन्दर्य
विंग्लिश मुक्त पीठ..!
निसटती बाजू
आर टी ई
In reply to निसटती बाजू by माहितगार
शिक्षण मराठीतून अथवा
करीयरच्या स्पर्धेत इंग्रजी /
In reply to शिक्षण मराठीतून अथवा by वकील साहेब
याचं उत्तर बायनरी असतं तर बरं
In reply to करीयरच्या स्पर्धेत इंग्रजी / by मोदक
माझ्या अंदाजानुसार अद्ययावत
In reply to याचं उत्तर बायनरी असतं तर बरं by आदूबाळ