आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी
काय आहेत संपावर जाणार्या शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या ?
१) शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.
२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.
३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.
४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.
५) शेतकर्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.
६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.
७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.
८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे.
का केल्या शेतकर्यांनी ह्या मागण्या?
शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली.
मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी?
राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले.
सरकार शेतकर्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का?
दररोज शेतकर्यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्यांन्ची कोंडी केली आहे.
शेतकर्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का?
अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे.
संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.
वाचने
73767
प्रतिक्रिया
349
मिसळपाव
प्रतिक्रिया
समजले नाही.
In reply to दोन्ही गोष्टी कशा शक्य आहेत? by गॅरी ट्रुमन
परस्परविरोधी
In reply to समजले नाही. by अप्पा जोगळेकर
गॅरी ट्रुमन...!!
In reply to परस्परविरोधी by गॅरी ट्रुमन
धन्यवाद. हमीभाव, मालाची आयात
In reply to परस्परविरोधी by गॅरी ट्रुमन
निदान दुधासारख्या नाशवंत
In reply to धन्यवाद. हमीभाव, मालाची आयात by अप्पा जोगळेकर
खट साहेब
In reply to कर्जमाफी हआ चुकीचा पायंडा by खटासि खट
१,७५,००० कोटी रूपयांची बँकेची बुडीतकर्जे राईट ऑफ झाली यावर बोलायला हवे.सर्वप्रथम बुडीत कर्जे म्हणजे काय हे किती संपकरी आणि समर्थकांनी समजून घेतले आहे? कर्ज देण्यापासून ते बुडीत खाती जमा होण्यासाठी बराच मोठा कालावधी लागतो. तुम्हाला जर का हे कसे होते आणि हे करणे का गरजेचे असते हे माहित नसेल तर सांगा, मी संपूर्ण प्रोसेस सांगतो. तसेच यात एखाद्या संपूर्ण उद्योगक्षेत्राची कर्जे माफ केलेली नाहीत. म्हणजे शेती हे जर एक उद्योगक्षेत्र समजले आणि सगळ्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी ही मागणी असेल तर बुडीतकर्जे राईट ऑफ हे कुठल्याही संपूर्ण उद्योगक्षेत्रासाठी (उदा. सर्व मेकॅनिकल उद्योगांसाठी) झालेले नाही.राईट ऑफ केलेली कर्जे वसूल झाल्याची उदाहरणे देऊनच राईट ऑफ आणि माफ यातला फरक कळवण्याची तसदी घ्यावी ही नम्र विनंती.कर्ज राईट ऑफ केले म्हणजे वसुली थांबली असा पण प्रकार नसतो. सध्याचे ताजे उदा. घेऊ (यात कोणाचीही बाजू घ्यायचा उद्देश नाही). मल्ल्याने ९००० कोटीचे कर्ज काढून पळून गेला, म्हणजे सगळे पैसे बुडाले आणि ९००० कोटी मल्ल्याच्या खिश्यात पडले अशी सरसकट समजूत आहे. पण खरंच तसे आहे का? तर मल्ल्याला जे कर्ज दिलेले असेल त्यात व्याज मिळून ती रक्कम ९००० कोटी पर्यंत पोचली. ही रक्कम वेळोवेळी वेगवेगळ्या बँकांकडून मल्ल्याला कर्जाऊ मिळाली जी त्याने त्याच्या कंपनीत गुंतवली. म्हणजे लोकांचे पगार, ऑफिस घेणे, विमानं लीजवर घेणे वगैरे साठी हे पैसे वापरले गेले. कंपनी (२००३ साली) उभारताना, ती १०-१२ वर्षानंतर बुडवायची आणि सगळे पैसे घेऊन फरार व्हायचे हा मल्ल्याचा प्लॅन नसावा. आपण तग धरू शकत नाही म्हणल्यावर किंगफिशरने आपले ४८% समभाग इतिहाद एअरवेजला विकायचं नक्की केलं होतं. त्यावेळच्या सरकारातील काही मंत्र्यांनी ते डील जेट एअरवेजला मिळावं म्हणून प्रयत्न करून ते डील जेटला मिळवून दिलं. मूळ ६००० कोटीच्या आसपास असलेले कर्ज व्याजामुळे वाढत वाढत गेले. याची वसुली करण्यासाठी मल्ल्याची जी प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे त्याची किंमत ६००० कोटींपेक्षा जास्त आहे. ही प्रॉपर्टी विकून ही थकीत रक्कम वसूल केली जाईल. आता यात व्याजामुळे जी रक्कम वाढलेली आहे त्याचा प्रश्न उरतो. तर ते कदाचित राईट ऑफ केलं जाईल, म्हणजेच बँकेच्या नेहमीच्या येणे पुस्तकातून (receivables) व प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मध्ये दाखवलं जाणार नाही. परंतु म्हणून ते पैसे सोडून दिले असं नाही. हे पैसे मिळवण्यासाठी शक्य ते मार्ग वापरून शक्य तेवढी रक्कम मिळवली जाईल. हे प्रकरण उच्चन्यायालयात आहे त्यामुळे ते तिथेच चालेल, पण इतर अनुत्पादित व बुडीत कर्ज प्रकरणांसाठी वेगळी कोर्ट्स (लवाद) असतात त्यात ते प्रकरण चालून एक सेटलमेंट प्लॅन तयार होतो. अशी रक्कम, अगदी पै न पै नाही तरी बऱ्याच अंशी वसूल होते. त्यामुळे राईट ऑफ म्हणजे बँकेच्या रोजच्या येणे पुस्तकातून (receivables) आणि प्रॉफिट लॉस मधून काढून टाकून त्याच्या वसुलीसाठी वेगळ्याप्रकारे प्रयत्न केले जातात. अधिक माहिती इथे वाचा. आता माफी म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची गरज नसावी. पण विचारलंय तर सांगून टाकतो - माफी म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज म्हणून दिलेले पैसे विसरून जा. बँकेने समजा शेतकऱ्याला ५०००० रुपये कर्ज दिलं असेल आणि व्याज (असलंच तर) मिळून ५५००० झालं असेल तर सगळे ५५००० रुपये सरकारने बँकेला द्यायचे. म्हणजेच शेतकरी ५५००० रुपयातील एकही पैसा देण्यास बांधील नाही. सरकार आणि बँक काय ते बघून घेईल.महाराष्ट्रातल्या शेतक-यांना ३१००० कोटी रूपये लागणार आहेत.हा या वर्षीचा आकडा झाला. हे एकदा दिले की सगळे प्रश्न सुटणार आहेत का? परत यापुढे कर्जमाफीची गरज लागणार नाही का? याउप्पर या शेतकऱ्यांना परत मोफत हव्या असलेल्या वस्तू आणि सेवा पण पाहिजेतच. लक्षात घ्या, शेती जशी हवामानावर आणि मालाच्या मागणीवर अवलंबून आहे त्याचप्रमाणे इतर उद्योगधंदे स्थानिक ते जागतिक परिस्थितीवर अवलंबून आहेत. या परिस्थितीमध्ये स्थानिक ते जागतिक सरकारी नियमांपासून ते कमी जास्त होणारी मागणी आणि अटीतटीची स्पर्धा आहे. उदा. द्यायचं झालं तर अमेरिकेत झालेल्या सरकारबदलामुळे आणि नवीन धोरणांमुळे कित्येक IT कंपन्या अडचणीत आलेल्या आहेत. नेहमीप्रमाणेच सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे कर्मचारी कपात करणे हा अमलात आणणे चालू आहे. मग आता या कर्मचाऱ्यांचे वाली कोण? कित्येक नोकरीपेशा लोकांकडे जमीन, घर ई ऍसेट नसतात. घर असलंच तर कर्जाचे हप्ते चालू असतात. शिक्षणासाठी भरपूर पैसे, श्रम आणि आयुष्यातली २२-२५ वर्षे घातलेली असतात. वयाच्या चाळीशीत असलेला एखादा कर्मचारी या बदलांमुळे कंपनीला नकोसा झाला तर त्याने काय करायचं? इमानदारीत १५-१८ वर्ष नोकरी करून व मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरून एक दिवस जर बेकार होणार असेल तर सरकारी मदत मिळायला पाहिजे ना? कारण ना त्याच्याकडे शेतकऱ्याकडे असते तशी जमीन असते ना या वयात एकदम दुसरं क्षेत्र निवडण्याची संधी असते. कंपनी मोठ्या शहरात असल्याने त्या शहरात नाईलाजाने राहायला लागतं व खर्च तसेच वाढलेले असतात. याला सांगा बघू उपाय! मग या कर्मचाऱ्यांनी पण कर्जमाफीची मागणी करावी का? निषेध म्हणून विविध आस्थापनातल्या संगणक प्रणालींमध्ये व्हायरस सोडावा का? बाजारातील अनिश्चिचिततेमुळे व सरकारी धोरणबदलांमुळे कित्येक छोटे कारखानदार व उद्योगधंदे करणारे अडचणीत येतात. त्यातले जे बदलाला सामावून घेऊ शकत नाहीत ते देशोधडीला लागतात. मग या सर्वांना सरकारने मदत का करू नये? तुमचे माननीय CA साहेब शेतकऱ्यांची आणि कंपन्यांची तुलना करत आहेत म्हणून हा प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं चक्क दिशाभूल करणारं आणि चिथावणीखोर आहे.अमेरिकेत कशी शेती होते व त्या
In reply to खट साहेब by ट्रेड मार्क
डांगेंजी
In reply to अमेरिकेत कशी शेती होते व त्या by संदीप डांगे
सविस्तर प्रतिसादासाठी व
In reply to डांगेंजी by ट्रेड मार्क
माझा या विषयावर अभ्यास नाही हे आधीच स्पष्ट केलं आहे.
In reply to सविस्तर प्रतिसादासाठी व by संदीप डांगे
शिवाय कर्ज देणे व त्याचे
In reply to खट साहेब by ट्रेड मार्क
बँका जर सरकारे नसत्या तर
In reply to शिवाय कर्ज देणे व त्याचे by जयंत कुलकर्णी
असे आहे का ?
अप्पा जोगळेकर हे नाव देखील
In reply to असे आहे का ? by अप्पा जोगळेकर
माझ्या माहीतीप्रमाणे राईट ऑफ
आपल्या माहितीप्रमाणे राईट ऑफ
In reply to माझ्या माहीतीप्रमाणे राईट ऑफ by अनुप ढेरे
४ दिवस झाले मी इथे सर्व
दुसरी बाजू ऐकून घेण्याच्या
या मागण्या सेन्सिबल आहेत खूपच
In reply to दुसरी बाजू ऐकून घेण्याच्या by खटासि खट
खरे इथेच आहेत. नक्की नाहीत.
In reply to या मागण्या सेन्सिबल आहेत खूपच by अप्पा जोगळेकर
खट,
In reply to दुसरी बाजू ऐकून घेण्याच्या by खटासि खट
गरज नसलेल्या आणि चुकीच्या
In reply to खट, by संदीप डांगे
डांगे अण्णा तुमच्या नाशिकचे
In reply to खट, by संदीप डांगे
खरी आहे
In reply to डांगे अण्णा तुमच्या नाशिकचे by विशुमित
कसला वास येतो ?
In reply to खरी आहे by Ujjwal
डांगे अण्णा
In reply to खट, by संदीप डांगे
नविन समितीचे प्रमुख बच्चू कडू
In reply to डांगे अण्णा by खटासि खट
खट साहेब
In reply to दुसरी बाजू ऐकून घेण्याच्या by खटासि खट
हि परिस्थिती असताना आणि पाऊस
In reply to खट साहेब by सुबोध खरे
खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील
महेन्द्र ढवाण अत्यंत
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
तेव्हा अशा चर्चांमधून शेती
In reply to महेन्द्र ढवाण अत्यंत by खटासि खट
,सर्व वस्तू चे भाव जागतिक
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
मस्तं प्रतिसाद.
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
हमिभावाविषयी लयी वेळा सहमत
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
१२. कमाल जमीन धारणा कायदा
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
चांगला प्रतिसाद.
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
@ महेंद्र ढवाण....
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
ज्यांना भारतात ठिकठिकाणी
शेतकरी आणि टॅक्स
जे भरतात ते पण चिरीमिरी
In reply to शेतकरी आणि टॅक्स by कपिलमुनी
या विषयावर मायबोलीवर
लयच खतरनाक सातारी जर्दा आहे
In reply to या विषयावर मायबोलीवर by धर्मराजमुटके
काही हरकत नाही. पण आर्मी
In reply to लयच खतरनाक सातारी जर्दा आहे by विशुमित
खरंच चांगली चर्चा चाललीये
In reply to या विषयावर मायबोलीवर by धर्मराजमुटके
बरोबर , जॉर्ज बुश सुद्धा असेच
In reply to खरंच चांगली चर्चा चाललीये by शब्दबम्बाळ
मेंबत्ती गैंग
मी स्वतः शेतकरी कुटुंबातील
टंकनचूक
In reply to मी स्वतः शेतकरी कुटुंबातील by अमितदादा
तीन वर्षातील १.५४ लाख कोटी
प्रतिसादात लिंका राहून गेल्या.
In reply to तीन वर्षातील १.५४ लाख कोटी by खटासि खट
फक्त तीन वर्षात जर २ लाख
In reply to तीन वर्षातील १.५४ लाख कोटी by खटासि खट
सौ सोनार की...
In reply to फक्त तीन वर्षात जर २ लाख by मृत्युन्जय
आता हे त्या चावरे पाटलांना
In reply to फक्त तीन वर्षात जर २ लाख by मृत्युन्जय
एनपीए काय असतं आणि राईट ऑफ
In reply to फक्त तीन वर्षात जर २ लाख by मृत्युन्जय
तुमचे म्हणणे अजुन स्पष्टपणे
In reply to एनपीए काय असतं आणि राईट ऑफ by खटासि खट
Govt cancels Rs 200-crore
ख ख जी ...!!
In reply to Govt cancels Rs 200-crore by खटासि खट
खट साहेब
In reply to Govt cancels Rs 200-crore by खटासि खट
खरेसाहेब
In reply to खट साहेब by सुबोध खरे
डब्ल्युटीओ मध्ये भारताने जे
विरोधी पक्ष
नोटाबंदीच्या काळात सहकारी
रोचक माहिती.
In reply to नोटाबंदीच्या काळात सहकारी by मार्मिक गोडसे
काही मूलभूत शंका
२०१४आणि २०१५ चे संकट हे
हे समजले नाही
२०१४आणि २०१५ चे संकट हे
काही लोकांचे प्रश्न बघता,