Skip to main content

शेतकर्‍यांचा संप

लेखक मार्मिक गोडसे यांनी गुरुवार, 01/06/2017 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी काय आहेत संपावर जाणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या ? १) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा. २) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी. ३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा. ४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा. ५) शेतकर्‍यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. ६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा. ७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा. ८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे. का केल्या शेतकर्‍यांनी ह्या मागण्या? शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्‍यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्‍याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली. मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी? राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्‍यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्‍यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले. सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का? दररोज शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्‍यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्‍यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्‍यांन्ची कोंडी केली आहे. शेतकर्‍यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का? अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे. संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्‍याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्‍याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.

वाचने 73767
प्रतिक्रिया 349

प्रतिक्रिया

In reply to by स्वधर्म

अामच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटाचे एक सदस्य म्हणाले होते, की शेतकर्याचे मुख्य उत्पादन त्याला जमिनीतून मिळते. न पैसे देता! त्यामुळे शेतकर्याला काहीही तसंच मिळालं पाहिजे, अशी सवय लागते. अतिशयोक्ती सोडून द्या, पण मुद्दा अाहे विचार करण्यासारखा. मी शेतकरी नाही पण या विधानाशी तीव्रपणे असहमत आहे. शेतकर्‍याला जमिनीतून उत्पादन पैसे न देता मिळते हा चुकीचा विचार आहे. बियाणे, खते, जमिनीची मशागत यांपासून ते माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे या संपूर्ण साखळीत अनेकठिकाणी पैसे खर्च करावे लागतात. (त्याला तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणू शकता) म्हणून मुख्य उत्पादन पैसे न देता मिळते हे चुकीचे विधान आहे.

In reply to by मोदक

…काहीही तसंच मिळालं पाहिजे, अशी सवय लागते, या विधानातील अतिशयोक्ती सोडून द्या असे म्हटले होते. ते विधान तांत्रिक नसून एकूण सवय सांगण्यासाठी अाहे. खाली पैसा यांनीही याच प्रमाणे त्यांचे निरिक्षण नोंदवले अाहे. उदा. अख्ख्या वाड्याच्या वाड्या सरकारी मदतीवर जगत…फुकटचे पुख्खे झोडायची सवय आधीच लागलेली आहे… ई. हेच विधान उलट करूनही पाहू शकता: शेतकरी सहसा थोडासा शेतमाल जर कुणाला दिला तर पैसे घेत नाही. मूळ मुद्द्यावर तुमचं काय म्हणणं अाहे? सरसकट कर्जमाफीमुळे ज्या शेतकर्यांनी कर्ज फेडले अाहे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही का?तसेच शेती ही मुळात उद्योगासारखी नाही. जेवढे इनपुट घालात तेवढे प्लॅंटमधून अाऊटपुट येते, असा उद्योग चालतो, शेती नाही. ती जिवंत व्यवस्थाप्रणाली (इकोसिस्टीम) अाहे. शेतकरी ह्या समजुतीतून बाहेर येईल तो सुदीन.

In reply to by स्वधर्म

…काहीही तसंच मिळालं पाहिजे, अशी सवय लागते, या विधानातील अतिशयोक्ती सोडून द्या असे म्हटले होते. ते विधान तांत्रिक नसून एकूण सवय सांगण्यासाठी अाहे. खाली पैसा यांनीही याच प्रमाणे त्यांचे निरिक्षण नोंदवले अाहे. उदा. अख्ख्या वाड्याच्या वाड्या सरकारी मदतीवर जगत…फुकटचे पुख्खे झोडायची सवय आधीच लागलेली आहे… ई. हेच विधान उलट करूनही पाहू शकता: शेतकरी सहसा थोडासा शेतमाल जर कुणाला दिला तर पैसे घेत नाही. ओके, मग तुमच्याशी सहमत. शेवटच्या वाक्याशी तर हजार वेळा सहमत. मूळ मुद्दा कर्जमाफीचा.. कर्जमाफी देऊ नये. सरसकट किंवा कशीही, कुणालाही..

In reply to by मोदक

>> मूळ मुद्दा कर्जमाफीचा.. कर्जमाफी देऊ नये. सरसकट किंवा कशीही, कुणालाही.. कमीत कमी यापुढील काळासाठी एक केस स्टडी म्हणुन दाखवता येईल अन FB , Whats App वर फॉरवर्ड करता येईल.

In reply to by स्वधर्म

> ज्या शेतकर्यांनी कर्ज फेडले अाहे, त्यांना यातून काय मिळेल? सरकार कडून धन्यवाद आणखीन काहीही नाही. पण लक्षांत घ्या कर्जमाफी फक्त बॅंके कडून घेतलेल्या कर्जावर मिळते. बहुतेक वेळा सावकार मंडळी बँके कडून कमी दारावर कर्ज घेऊन जास्त दरावर शेतकऱ्यांना देते. ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही पण सावकाराला कर्जमाफी मिळते. हा वाईट पायंडा आधीच पडला आहे.

कुठेतरी याला शहरी विरुद्ध शेतकरी असे स्वरूप येत आहे .. हा असा संघर्ष नाहीच आहे ... शहरी माणूस शेतकऱ्यांचा शत्रू कधीच नव्हता ,, पण आता इथल्या प्रतिक्रिया बघितल्या तर हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही .. मुळात हा शेतकऱ्यांचा संप नाहीच .. संपात सामील नसलेल्या अनेकांच्या (परराज्यातील देखील ) गाड्या अडवल्या .. दूध रस्तावर ओतले .. भाज्या फेकून दिल्या .. हा संप नाही .. हे जोरजबरदस्ती आहे .. कायदा मोडणाऱ्या या सर्वांना पाठिंबा ? शहरी माणसाला वेठीला धरून जास्तीतजास्त त्रास देणे .. यावर संपाचे यश अवलंबून आहे .. तरच विरोधी पक्षांना पुढच्या निवडणुकीत भविष्य आहे .. तेंव्हा कृपया जागे व्हा

In reply to by पुंबा

संपूर्ण लेख ग्राहक/उपभोगता, व्यापारी आणि राजकारणी धार्जिणा आहे. (i) Will it be appropriate to fix MSP in such a mechanical manner? (ii) What will be its effect on consumers (particularly, the poor), on inflation, and the overall growth rate of the economy? (iii) Will it be in consonance with the Food Security Act? (iv) Are the political parties, across the board, sincere to implement Swaminathan MSP or are they simply doing politics over it? (v) Will any government be able to implement Swaminathan MSP even if it is sincere to implement it? (vi) And above all, will it provide a long-term solution to agrarian crisis and farmers’ distress? लेखाचे लेखक स्पर्धा परीक्षा देणारे आहेत का ? हे जर भरती झाले तर शेतकऱ्यांचे काय भले करणार कपाळ..!!

In reply to by विशुमित

हे जर भरती झाले तर शेतकऱ्यांचे काय भले करणार कपाळ..!! माझ्यामते भरती झालेल्या माणसात शेतकर्‍यांचे जास्ती भले करण्याची क्षमता असते. (मी पूर्ण लेख वाचलेला नाही, तुमच्या दोन वाक्यांबद्दल बोलत आहे.)

In reply to by विशुमित

स्पर्धा परीक्षा अभ्यास करा , अन तुम्ही व्हा भरती. घ्या चांगले निर्णय अन कर अंमल्ब्बजावणी. हा का , ना का.

In reply to by विशुमित

साहेब, लेखक पंजाब विद्यापिठात अर्थशास्त्र शिकवतात. लेख पुर्ण वाचला का? केवळ स्वामिनाथन एमएसपीला विरोध एवढेच याचे स्वरूप नाहीय. भारतिय शेतीच्या इतर प्रश्नांचा देखिल यात वेध घेतला आहे.
Ironically, these other recommendations are of a more fundamental nature and have the potential to provide a long-term solution to the agrarian crisis and farmers’ distress. Those recommendations are mainly in the domain of land reforms, irrigation, productivity, credit, insurance, food security, bio-resources, and public investment in agriculture, human development, and the rural non-farm sector. The NCF has thus looked for solutions to agrarian crisis and farmers’ distress both in agriculture as well as beyond agriculture. Within agriculture, the main challenge is to raise the productivity of land and labour, and thereby increase the per capita income of the agricultural workforce.
विशेषतः हे तर किती महत्वाचे आहे?

शेतकर्‍यांच्या मागण्या अवास्तव आहेत. या जगात फुकट काही मिळत नाही. सरकारने कर्जमाफी दिली तर ते दुसर्‍या दाराने कोणतेतरी टॅक्स वाढवून वसूल करतील. मोदी सत्तेवर येताना "सबसिड्या बंद करू, आणि सर्वाना काम देऊ" म्हणत होते. त्यानी काम दिले तरी करायची इच्छा असली पाहिजे. कोकणात शेतावर कामाला मजूर मिळत नाहीत. अख्ख्या वाड्याच्या वाड्या सरकारी मदतीवर जगत बोंबलत फिरत असतात, पण कामाला या, पैसे, कपडे, जेवण सगळे देतो म्हटले तरी तयार होत नाहीत. फुकटचे पुख्खे झोडायची सवय आधीच लागलेली आहे ती बंद करून मागेल त्याला काम मिळेल अशी संस्कृती आली पाहिजे. अर्थसाक्षरता नसणे, उत्पादनाबाबत माहितीचा अभाव, निस्वार्थी कार्यकर्ते आणि संघटन यांचा अभाव असे सगळे जे शेतकर्‍यांचे मूळ प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजेत. कर्जमाफी आणि फुकट वीज आणि पेन्शन हे कायमस्वरूपी उपाय नव्हेत. ते व्यवहार्यही नाहीत. 'आपली ताकत दाखवून द्या' असे काहीतरी व्हॉट्स अ‍ॅप मेसेज फिरत आहेत म्हणे. तीच ताकत शेतकर्‍यांना मदत करून त्यांच्या आत्महत्या रोखायला का वापात नाहीत हे बाहुबली? या आंदोलनाच्या मुळीशी फडणविसांना काहीही करून पायउतार करणे हा एकच उद्देश असावा असं मला राहून राहून वाटत आहे. मराठा मोर्चाचे हत्यारही अयशस्वी झाल्यामुळे हा बिनतोड उपाय काढलेला दिसतो आहे.

या राजकीय छुप्या अजेंड्यामुळे मराठा समाज विरुध्द इतर सर्व असे चित्र दिसु लागले आहे. मराठा मोर्च्यामुळे या वेळच्या नगरपालिका निवडणुकीत याचा फायदा भाजपाला मिळाला असे माझे मत आहे. या संपामुळे हे समीकरण घट्ट होणार आणि मराठा समाजाची राजकारणावरील पकड भावी काळात आणखी सैल होणार हे नक्की. यामागे मराठा समाजातील विरोधी पक्षातील नेत्यांची हरणार्‍या जुगार्‍यासारखी बुध्दी काम करते आहे. यापुर्वी यांनी शिक्षण आणि विकासाच्या घटकांकडे लक्ष न देता राजकारणात अहंकार जोपासायचे काम केले. त्याचीच ही फळे.

In reply to by जानु

पिंपरी चिंचवडला जगताप आणि लांडगे पॅनेलचे लोक कसे काय निवडून आले? अभ्यास वाढवा...

In reply to by जानु

शेती करणारा समाज हा अधिकाधिक मराठा समाज आहे. (सरसकट नाही, आता आमच्याकडे कुठे शेती आहे, वगैरे तो मुद्दा नाही) पारंपरिक शेतीचे मालक झालेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी सुखात का आहे याचा थोडा शोध घेतला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातल्या किती शेतकर्‍यांनी रस्त्यावर माल ओतला त्याचाही शोध घेतला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, शेती कर्ज माफ केले पाहिजे, पिक विमा मिळाला पाहिजे. कर्ज तातडीने आणि मोठे मिळाले पाहिजे, अरे मागायचं कोणासाठी आणि घेत कोण आहे. शेतकर्‍याच्या आडून एका समाजाचे हित जोपासायचे हेही लपून राहणार नाही. गरीब शेतकरी असा रस्त्यावर माल कधीच फेकून देणार नाही, रस्ते अडवणार नाही, दुधाचे टँकर रिकामे करणार नाहीत, करणारे हात वेगळे आहेत, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठा मोर्चा पासूनच तुमचा मराठा समाजाप्रती असलेला "कळवळा" दिसत राहिलेलाच आहे, त्यामुळे चालू द्यात.. असेही मिपावर "मराठा" समाजावर काहीही टिप्पणी करता येते, ब्राह्मणांवर एक शब्द काढला कि नेहमीचे भिडू जाज्वल्य अभिमान घेऊन पार अज्ञातवासातूनदेखील हक्कांचे रक्षण आणि निषेध करायला परत येतात हे वारंवार सिद्ध झालेले आहे. सिनियर सदस्यांचे वर्तन आणि विचार असे आहेत! जबाबदारी मात्र याला विरोध करण्याने पाळावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे आम्ही सांगू तोच "खरा शेतकरी" हे अभ्यासू लोकांनी सतत सांगत राहावे. शेतकऱ्यांनाही पटेल काही दिवसांनी ते! इथे असेही बरेच जाज्वल्य देशप्रेमी आणि मुख्यमंत्रीप्रेमी आहेतच. काहीही झालं तरी आम्ही आमच्या "अभ्यासू" मंत्र्यांना पाठिंबा देणारच आणि पवारांना दिवसरात्र शिव्या घालणारच! संप मिटला म्हणे, आता लगेच स्वतःला संपाच्या बाजूने म्हणणार्यांनी अभ्यासपूर्ण माहिती द्या अशा थाटाचे डायलॉग मरणार्यांनी जर संप "खऱ्या" शेतकऱ्याचा नव्हता तर चर्चा तरी का झाली हे ही सांगावे.

In reply to by शब्दबम्बाळ

दुर्दैवाने सहमती नोंदवतो. इथली चर्चा या संकेतस्थळाच्या लौकीकास साजेशी झालेली नाही. अभिनिवेश टाळून उत्तम चर्चा अजूनही होऊ शकते. दुसरी बाजू ऐकायची नाही हे एकदा ठरले की मग चर्चेला अर्थ राहत नाही. फेसबुकवरचा राग इकडे काढण्यासाठी हा धागा असेल तर तसे कुणीतरी स्पष्ट करावे.

शहरी माणसाला वेठीला धरून........
काहीही काय ? शहरी माणुस कसा काय वेठीला धरला जाईल ? तो तर सेल्फ सफीशीअंट आहे ना ? त्याला कसली टंचाई ? बाकीचे देश काय ओस पडले आहेत का ? (मिलो आठवत असेल ना) शिवाय शास्त्र तंत्र आहेच सोबतीला. फक्त गरज पडेल तेंव्हा शहराच्या "समॄध्दी" साठी जमीन वगैरे लागणार असेल तर ती मात्र खळखळ न करता बीनबोभाट दीली गेली पाहीजे.

मराठी_माणूस प्रतिसाद नीट वाचा शेतकऱ्यांच्या संपाच्या नावाखाली जी जोरजबरदस्ती चालू आहे .. अनेक गाड्या अडवल्या आहेत ... महाराष्ट्रातल्या व इतर राज्यातल्याही .. या कृतीचा रोख सामान्य माणसास वेठीस धरणे हाच आहे .. शेतकयांच्या संपत इतरांच्या गाड्या अडवणे कसे बसते?

In reply to by अमर विश्वास

तुमच्या प्रतिसादातील वाक्याचा उपयोग केला आहे , प्रतिसाद तुम्हाला नव्ह्ता . तो कोणाला आहे ते समजलेच असेल.

सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी आहेत विदर्भात (आकडे माहिती नुसार), कापसाची हालत खराब आहे तिकडेच (ऐकीव माहिती) , त्यामुळे सर्वात जास्त शेतकरी तिथूनच सहभागी व्हायला हवे होते त्या भागातून. आहे तसं चित्र? कुठं असली आकडेवारी तर शेतकरी हितरक्षक सदस्यांनी द्यावी, जर तसे नसेल तर ह्या संपाचा कार्यकारण भाव शेतकरी हित सोडून भलताच आहे असे म्हणले तर वावगे ठरावे का? चित्रे दिसतात ती फक्त विदर्भ सोडून सगळीकडची असतात. मुख्य प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो, जिथले शेतकरी सगळ्यात जास्त अस्मानी अन सुलतानी ने नाडलेले आहेत तेच जर ह्या संपात नसले तर ह्या संपाची वैधता काय??

In reply to by जेम्स वांड

अहो जेम्स बाबा असे प्रश्न विचारायचे नसतात ... मग उत्तर देताना फेफे उडते ... आंदोलन कुठल्या जिल्ह्यात जोरात सुरु आहे? नगर जिल्ह्यात कुठला रोड अडवला आहे ? नगर कल्याण मार्ग ... का? ठाणे / मुंनाई चा पुरवठा तोडायला नगर जिल्हा कोणासाठी प्रसिद्ध आहे ? विखे पाटलांसाठी ...

In reply to by अमर विश्वास

आंदोलन कुठल्या जिल्ह्यात जोरात सुरु आहे? नगर जिल्ह्यात कुठला रोड अडवला आहे ? नगर कल्याण मार्ग ... का? ठाणे / मुंनाई चा पुरवठा तोडायला ######### बरोब्बर!! ह्याच्या सोबत अजून एक फॅक्ट आहे अमर साहेब. नगर जिल्हा सगळ्यात मोठा, प्रस्तावित सुवर्ण महामार्ग का कुठला तो महत्वाकांक्षी महामार्ग आहे तो पण जातो नगर मधून, आता विखे विकास होऊ देतील तर मतं विकासकर्त्यांकडे जाणार ना!!! मग शेतकरी संपाचं नाव घ्या अन करा येळकोट सुरु, कसं? ;)

In reply to by विशुमित

विशुमितजी फडवीसांचा काय संबध ? आधी माझे दोनही प्रतिसाद नीट वाचा .. मग प्रतिक्रिया द्या (झेपले तर )

http://images.indianexpress.com/2017/06/milk-759.jpg http://images.financialexpress.com/2017/06/milk.jpg http://www.pudhari.news/news/Satara/farmer-conflict-satara-at-karad/1.j… दूध ओतणार्‍यांची वृत्तपत्रातून आलेली काही छायाचित्र दुवे हे कृत्य करणार्‍यांपैकी काही जणांच्या चेहर्‍यावरचे हसू आणि उत्साह कशाचे सूचक आहे ? कृष्णाप्रमाणे दहीहंडी फोडल्याचा आनंद आहे का ?

In reply to by माहितगार

अहो ते दूध आणि शेतकरी खरे नाही आहेत. कोणी माजलं नाही चांगलं दूध फेकून द्यायला. डेरी वाल्यांचे खराब झालेले दूध असते. कालच बघितलंय आमच्या कारखान्याच्या गावात. जे टोमॅटो रस्त्यावर फेकले आहेत त्याला बिलकुल भाव नाही आहे. स्वच्छ भारतच्या वेळेस हिरवा कचरा झाडणारे कसे फोटो काढायचे त्या कॅटेगिरीमधले आहेत हे लोक.

In reply to by माहितगार

आपण म्हणता ते १००% सत्य खर्‍या शेतकर्‍याला अशा प्रसंगी आनंद होणे शक्य नाही. काल नाशकाला चाललो होतो कुठे तरी आंदोलन झालेले होते दुध फेकून झालेले होते. सर्व दुधाची पावडर होती. संप यशस्वी झालेला होता. -दिलीप बिरुटे

हा कसला संप ? सगळे तर मिळते आहे मार्केट मधे. कसली घंट्याची अडवणूक. शेतकरी म्हटले की पूर्वी सहानुभूती वाटायची. आता चेष्टा करतात.

In reply to by अप्पा जोगळेकर

आत्ता जाणवणार नाही पण हा संप असाच सुरू राहिला तर भाजी व दूध या दोन वस्तूंचे भाव वाढतील आणि सरकार टीकेचे धनी होईल अशी काहीशी अपेक्षा असावी. जाणती राजकारणी खेळी आहे.

In reply to by मोदक

काही होणार नाही. थोड्या दिवसात धीर सुटेल. खरे तर आंदोलनाला फारसा पाठिंबा आहेच कुठे ? राजू शेट्टी, शरद पवार वगैरे जनाधार नसलेल्या लोकांचे हे आंदोलन आहे. चालू दे. काही बिघडत नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

शरद पवार वगैरे जनाधार नसलेल्या लोकांचे हे आंदोलन आहे. चालू दे. काही बिघडत नाही.
यह जो डर है ना,यह बहुत अच्छा है।

आताच ऑफिस मध्ये ब्लॅक टी मिळाला. ब्लॅक टी चे कारण विचारले तर उत्तर मिळाले "आज दूध आले नाही ". विसरलोच होतो शेतकरी संपावर आहेत ते. (तरीच म्हणतोय सकाळी चहा कसा नाही मिळाला ऑफिस मध्ये)

विशुमितजी हे पहा आपल्याला ब्लॅक टी मिळण्याचे कारण सोलापुरात पुलावरून दूध ओतून दिले .. हे आंदोलन आहे का फोटो ऑप ? हे आहेत गरीब शेतकरी ... काय तो नम्र पणा ... यांना कर्जमाफी द्या ,

In reply to by विशुमित

विशुमितजी सावरा स्वात:ला दूध खरे नाही? म्हणजे आन्दोलन पण खरे नाही ? :) हा फोटो न्युज चॅनेल वर आहे ... तुम्ही म्हणता दूध खरे नाही ? का हो ? चव घ्यायला गेला होतात ? हाच माज आहे .. नम्रपणा हे उपहासाने लिहिले होते .. पण हे सगळं तुम्हाला का सांगतोय ? सॉरी विसरलोच होतो .. तुम्ही म्हणाल बरोबर आणि बाकी सारे चुकीचे नाही का ? फोटोत दिसणारा हा माजच यांना रसातळाला जाईल

In reply to by अमर विश्वास

दूध जुने असण्याची शक्यता जास्त आहे. कोण स्वतःचे नुकसान करुन घेईल. इथे चिंचवडात तर सगळ्या डेअर्‍या भरुन वाहताहेत. नगरचे माऊली दूध फक्त आले नाही बहुतेक. ठाण्यात पण दूध आले. भाज्या फळांनी काय अडते. आठवडाभर उसळी दाळी खाऊन राहतील लोक. हे आंदोलन फारसे सीरीयसली घेतलेच नाहीये कोणी. आंदोलन कर्त्यांनी पण. गाजराची पुंगी... असे काहीसे असावे.

In reply to by अप्पा जोगळेकर

हे आंदोलन फारसे सीरीयसली घेतलेच नाहीये कोणी.>> ==>> बरोबर आहे. जनजीवन बिलकुल विस्कळीत झालेले नाही आहे.

In reply to by विशुमित

दूध जुने असण्याची शक्यता जास्त आहे. कोण स्वतःचे नुकसान करुन घेईल.>>> ==> आई ने दूध आटवून मस्त बासुंदी आणि खावा बनवला आहे. खूप वर्षातून असा घरचा खावा खायला मिळणार आहे. संप झाला नसता तर कदाचित हे भाग्य मिळाले नसते. फडणवीस सरकार की जय हो...!!

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पाजी दूध चांगले कि वाईट हा प्रश्न नाहीच,,, संप "घडवणाऱ्याचे" खरे स्वरूप दाखवण्याचा एक प्रयत्न होता

In reply to by अमर विश्वास

प्रतिसाद वाचायचे थोडे कष्ट घेता का माझे ? माझा पहिलाच प्रतिसाद वाचा म्हणजे कळेल आंदोलन खरे आहे का खोटे. चव घ्यायला गेला होतात ?>>> ==> चव कशाला घायची वासावरून समजते दूध खराब झाले का ते? आमच्या गावाशेजारी कारखाना आहे तिथे काल आंदोलन चालू होते मी डोकावून आलो होतो. हाच माज आहे>> ==>> मग मी काय करू. आणि तुम्ही तरी काय करू शकणार आहात. निषेद म्हणून दूध पायच सोडून द्या कायमचे. आमचे काही म्हणणे नाही. नम्रपणा हे उपहासाने लिहिले होते>> ==>> त्यातून तुमच्या नम्रपणा ची व्याख्या समजली. तुम्ही म्हणाल बरोबर आणि बाकी सारे चुकीचे नाही का ?>> ==>> बाकी सगळे चुकीचे हे कोठे म्हणालो दाखवून द्या. फोटोत दिसणारा हा माजच यांना रसातळाला जाईल>> ==> प्रतिष्ठित संकेतस्थळावर असला बालिशपणा करायचे सोडून द्या. जे फोटोत आणि गुगलून दिसते त्याच्यावर जास्त विश्वास ठेवत जाऊ नका. नम्र सल्ला. रसातळाला जातील नाहीतर पाताळात जातील त्यांचं ते बघून घेतील. तुम्ही आज मस्त बर्गर हाना. हा प्रेमाचा सल्ला.

In reply to by विशुमित

विशुमितजी संपाचे खरे स्वरूप समोर आणलेले फारच लागले वाटते तुम्हाला .. काही हरकत नाही .. तुम्ही जो शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी गळा काढता व इतरांविरुद्ध गरळ ओकता .. त्याला हे सुसंगतच आहे निषेद म्हणून दूध पायच सोडून द्या कायमचे. (संपादित) ,,,, असल्या (संपादित) लोकांसाठी माझ्या सवयी बदलू ?

In reply to by शब्दबम्बाळ

लाल चिखल आणि आत्ताचा संप यात काही संबंध नाही. वैताग वैताग होऊन एक क्षणाच्या इंपल्स मध्ये आबा(बहुधा, नाव चुकत असेल) ने केलेला लाल चिखल आणि आधी ठरवून केलेली दुसऱ्याच्या मालाची नासधूस याची तुलना करणे चूक आहे.

In reply to by अमर विश्वास

स्वत: नोकरी करून इतर नोकरी करणाऱ्यांचा द्वेष करत नाही>>> ==>> नोकरी करणाऱ्यांचा द्वेष. हा हा पु वा. शेतकऱ्यांच्या नावावर स्वत:ची राजकीय पोळी भाजणाऱ्या >> ==> शेतकऱ्यांच्या प्रश्ना पेक्षा राजकारणात ज्यास्त इंटरेस्ट दिसतोय. शेतमाल रस्तावर फेकणाऱ्या माजोरड्यांना "अरे हाड" म्हणण्यात मला तरी गैर वाटत नाही ..>>>> ==> बाजार समितींमध्ये शेतकऱ्यांचा शेतीमाल फेकून द्यावा लागतो तेव्हाचा हुंदका गिळलेला दिसलाय का?

In reply to by अमर विश्वास

एवढाच राग असेल शेतकऱ्यांबद्दल तर शेतकऱ्यांची उत्पादन वापरणं सोडून द्या ,अगदी प्रामाणिक पणे २ दिवस तरी बघा जमतंय का , मग येऊन प्रतिक्रिया द्या . निवांत बसून कीबोर्ड शेतकर्यांविरोधात बडवायचा आणि घरी जाऊन त्यांचीच उत्पादने वापरायची. दूध शेतकऱयांकडूनच येते ,त्याची कुठे फॅक्टरी नाही. (आता म्हणू नका फुकट नाही वापरत वगैरे )

In reply to by बापू नारू

बापू नारू प्रतिसाद नीट वाचावे ... शेतकऱ्यांच्या नावावर स्वत:ची राजकीय पोळी भाजणाऱ्या असे स्पष्ट लिहिले आहे .. तसेच माझा पहिला प्रतिसाद नीट वाचावा .. शेतकऱ्यांवर राग नाही .. पण त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांवर आहे

In reply to by अमर विश्वास

राजकारणी लोकांचा विरोध मी ही करतो ,पण तो करताना शेतकऱ्यांचा विरोध नको . शेतकऱ्यांच्या मागण्यातील १,४,७,८ हे मुद्दे मला अजिबात पटले नाहीत ,पण म्हणून शेतकऱ्यांचा विरोध नाही करणार. हे मुद्दे जाणीवपूर्वक घुसवले असतील ,याचे कारण- शेतकरी कर्ज घेतात ते सोसायटी-पतसंस्था किंवा लोकल बँकांकडूनच घेतात , या सगळ्या बँकांचे चेअरमन-संचालक (बँक मालक) हे राजकीय पुढारीच असतात , शेतकऱ्याने कर्ज बुडवलं तर त्यांचं नुकसानच होणार ,मग ते वसूल करायची हि पद्धत... शेतकरी तोट्यात आणि त्यांच्या साठी बनवलेल्या सोसायट्याना फायदाच-फायदा

In reply to by अमर विश्वास

दूध खरे नाही? म्हणजे आन्दोलन पण खरे नाही ? जाहीरातदारतरी जाहीराती तयार करताना कुठे खरे पदर्थ वापरतात, फोटो चांगला हसरा आला म्हणजे झाले, त्यासाठी दुधा एवजी चुनखळीच चांगली !

ह्या चर्चेत जुनेच सगळे भिडू आहेत, तरीही ते सेम प्रश्न वारंवार विचारत आहेत ज्यांची उत्तरे अलरेडी डिस्कस करुन झाली आहेत. तरीही मग इतक्या आवेशपूर्ण प्रतीसादांचे कारण काय? अभ्या, शब्दबंबाळ तुम्हा दोघांचेच प्रतिसाद नवीन मॅटर असणारे व सेन्सिबल वाटले, तेवढ्यासाठी प्रतिसाद देत आहे. बाकीचे सर्व नेहमीचेच दळण आहे. विशुमित, गोष्ट राजकारणावरच येते नेहमी. आणि उत्तरदायित्व टाळायला कारण मिळते.

एक टोक 'फडणीसंसाठी आटापिटा' केल्याचा आरोप करणारं अन दुसरं टोक 'जमिनी गेल्याची' जाहिरात करणारं, एकंदरीत ह्या धाग्यात चर्चा होणार नव्हतीच, विचारलेल्या कळीच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही ते नाहीच. चालायचंच.

In reply to by जेम्स वांड

विचारलेल्या कळीच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही मी दिलेले सर्व दुवे एकदा शांत पणे वाचून पहा. यात कोणतंही "माझं मत" नाही. स्वामिनाथन समितीने काय सांगितलं आहे आणि त्याचं सरकार काय करत आहे किंवा हरित क्रांती आणि ऑपरेशन फ्लड बद्दल सर्व दुवे दिले आहेत.

In reply to by सुबोध खरे

माझा कळीचा प्रश्न हा होय, आता ह्याच्याशी स्वामिनाथन वर्गीस कुरियन वगैरे संबंध कसा हे जमल्यास सांगा, मी फक्त संपाच्या पॉलिटिकल मोटिव्ह बद्दल बोलत होतो, जमल्यास आपणही एकेकदा प्रतिसाद वाचूनच घेत चला.

ह्या संपाच्या निमित्ताने 'स्वामिनाथन आयोग' काय आहे ह्याची लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली हे ही नसे थोडके. आज संपाचा दुसरा दिवस. लोकं संपाबद्दल उलट सुलट चर्चा करत आहेत. एकंदरीत संपाची दखल घेतली जात आहे. ह्या मंथनातून नवनीत निघेल ह्याची आता खात्री वाटू लागली आहे. भारतीय हवामान खातं दरवर्षी हवामानाचा अंदाज वर्तवतं एखादे वर्षी हवामान खातं जेव्हा सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवतं त्या दिवशी शेअर बाजारात उत्साह का निर्माण होतो? कदाचीत ह्याचे उत्तर Dr. M.S. Swaminathan Report मध्ये सापडू शकेल.

एकंदरीत महाराष्ट्रात लायक, क्षमतावान शेतकर्‍यांची वानवा आहे असे वाटते. अशा अक्षम लोकांनी दूध ओतले काय, भीका मागितल्या काय किंवा आत्महत्या केल्या काय कोणाचे काय अडणार आहे. खरे सक्षम शेतकरी नविन रस्ते चोखाळत असतील असे वाटते. थोडा भुईवरचा भार कमी होईल इतकेच.

In reply to by अप्पा जोगळेकर

एकंदरीत महाराष्ट्रात लायक, क्षमतावान शेतकर्‍यांची वानवा आहे असे वाटते. काय वाटेल ते बोलताय का सरजी ? संपाचा राग असणे, त्याच्या राजकीय कार्यकारणभावावर व्यक्त होणे एक गोष्ट, अन कोणाच्या कार्यक्षमतेवर शंका घेणे दुसरे. ह्याला गरळ ओकणे म्हणतात. आकडेवारी ह्याच्या विरुद्ध चित्र देते. असो.

थोडा भुईवरचा भार कमी होईल इतकेच. असा भुईवरचा भार कमी झालेल्या कुटुंबाला कधी भेटलाय का हो तुम्ही कधी?