✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गावाकडच्या मावळतीचे रंग बिलोरी

अ — अनन्त्_यात्री, Tue, 05/30/2017 - 14:06
गावाकडच्या मावळतीचे …….रंग बिलोरी प्रसन्न पिवळे, गडद गुलाबी निवांत निळसर, कबरे करडे पाहून निवती माझे डोळे …....निब्बर शहरी प्रसन्न पिवळ्या संध्याकाळी खेळ अ॑गणी रंगुनी जावा दावण तोडुन, आचळ सोडुन ....अचपळ गोऱ्हा .....पिऊन वारा.... उधळत जावा गडद गुलाबी संध्याकाळी शुक्र जरासा तेजाळावा उडता उडता पुन्हा थव्याची .........नक्षी मोडुन...... .........चुकार पक्षी...... उतरून यावा निवांत निळसर संध्याकाळी फड गप्पांचा मस्त जमावा सळसळ रोखून वृद्ध वडाने ........टाळीसाठी........ .......पारंबीला....... झोका द्यावा कबऱ्या करड्या संध्याकाळी धूसर ढग ओथंबुन यावा पायतळीच्या वाटेवरचा .......भिरभिरणारा....... ........एक काजवा....... लखलख व्हावा

प्रतिक्रिया द्या
7434 वाचन

💬 प्रतिसाद (33)

सुरेख !

संजय क्षीरसागर
Tue, 05/30/2017 - 14:57 नवीन
.
  • Log in or register to post comments

छान कविता. आकृतिबंधदेखील

एस
Tue, 05/30/2017 - 15:16 नवीन
छान कविता. आकृतिबंधदेखील आशयाइतकाच सुंदर आहे.
  • Log in or register to post comments

फार सुरेख जमलीय कविता.

पद्मावति
Tue, 05/30/2017 - 17:41 नवीन
फार सुरेख जमलीय कविता. अर्थपूर्ण, लयबद्ध आणि अतिशय प्रसन्न. पहिल्या कडव्यात काही रंग छटान्चा उल्लेख करून नंतर एक एक करून त्या रंगावर एकेक कडवे रचलेय ही कवितेची रचना खूप आवडली.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

सत्यजित...
Wed, 06/21/2017 - 02:35 नवीन
कविता वाचतानाच,कवीच्या कुंचल्याने चितारलेले चित्र,त्यातिल विविध रंग-ढंग,त्यांच्या च्छटा ई. बारकाव्यांसह पाहू शकणारा,आपल्यातील रसिक वाचक,अत्यंत अभिनंदनीय आहे! याआधीही,काही कवितांवर आपण दिलेल्या प्रतिसादांत ही बाब जाणवते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

जबरदस्त खुप आवडली

स्पा
Tue, 05/30/2017 - 17:55 नवीन
जबरदस्त खुप आवडली
  • Log in or register to post comments

_____/\_______

अनन्त्_यात्री
Wed, 05/31/2017 - 10:32 नवीन
स॑जय, एस, पद्मावति, स्पा -आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

झकास..

पुंबा
Wed, 05/31/2017 - 11:48 नवीन
झकास.. खुप खुप आवडली. रादर मिपावरिल सर्वाधिक आवडलेल्या कवितांत ही असेल. विलक्षण चितारलायत तो सारा माहौल तुम्ही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, सौरा

अनन्त्_यात्री
Wed, 05/31/2017 - 13:28 नवीन
_____/\_____
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/31/2017 - 15:13 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

अगदी चित्र उभं केलंत. खूप

प्राची अश्विनी
Wed, 05/31/2017 - 15:55 नवीन
अगदी चित्र उभं केलंत. खूप आवडली कविता.
  • Log in or register to post comments

+१

अभिजीत अवलिया
Wed, 06/21/2017 - 09:57 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

लयबद्धता फार आवडली, आणि

पिशी अबोली
Wed, 05/31/2017 - 19:07 नवीन
लयबद्धता फार आवडली, आणि कवितेचा फॉर्म तर विशेष आवडला. ज्या सहजपणे वर्णन केलेत, त्यावरून तर बाकीबाब आठवले.. अवांतर-बिलोरी म्हणजे नक्की काय?
  • Log in or register to post comments

पिशी अबोली, धन्यवाद! बिलोरी म्हणजे....

अनन्त्_यात्री
Wed, 05/31/2017 - 20:29 नवीन
-बिलोरी = crystalline = नितळ. -मोल्स्वर्थ च्या मराठी-इ॑ग्रजी शब्दकोषानुसार बिलोर हा शब्द पर्शिअन भाषेतून मराठीत आला आहे. -बाकीबाबा॑च्या शब्दकळेची जातकुळीच वेगळी अन अतुलनीय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

अत्रुप्त आत्मा, प्राची अश्विनी ____/\_____

अनन्त्_यात्री
Wed, 05/31/2017 - 20:48 नवीन
____/\_____
  • Log in or register to post comments

वाहवा!

पैसा
Wed, 05/31/2017 - 21:29 नवीन
खूपच छान लिहिलंय!
  • Log in or register to post comments

__/\__

प्रीत-मोहर
Wed, 05/31/2017 - 22:19 नवीन
__/\__ कवितेचा फॉर्मॅट, आशय, तिचं चित्रस्पर्शी असणे हे सगळंच खूप जास्त आवडलय. असेच लिहिते रहा.
ज्या सहजपणे वर्णन केलेत, त्यावरून तर बाकीबाब आठवले.
ह्यच्याशी सहमत!!
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

उल्का
Wed, 05/31/2017 - 22:21 नवीन
खूप आवडली.
  • Log in or register to post comments

सुरेख कविता!

रुपी
गुरुवार, 06/01/2017 - 01:46 नवीन
सुरेख कविता!
  • Log in or register to post comments

पैसा, प्रीत-मोहर, उल्का, रुपी ____/\______

अनन्त्_यात्री
गुरुवार, 06/01/2017 - 09:12 नवीन
____/\_____ !
  • Log in or register to post comments

सुंदरच!!

सूड
Fri, 06/02/2017 - 18:59 नवीन
सुंदरच!!
  • Log in or register to post comments

सूड, धन्यवाद!

अनन्त्_यात्री
Fri, 06/02/2017 - 20:32 नवीन
____/\____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सुरेख कविता.. खूप आवडली!!

सानझरी
Sat, 06/03/2017 - 07:09 नवीन
सुरेख कविता.. खूप आवडली!! लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद सानझरी!

अनन्त्_यात्री
Sat, 06/03/2017 - 10:56 नवीन
_______/\_______
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

काय सुंदर !!!!!

मितान
Sat, 06/03/2017 - 17:07 नवीन
खूप आवडली !
  • Log in or register to post comments

छान कविता, आवडली.

दशानन
Sat, 06/03/2017 - 21:55 नवीन
छान कविता, आवडली.
  • Log in or register to post comments

परत वाचली परत आवडली

स्पा
Sat, 06/03/2017 - 23:07 नवीन
परत वाचली परत आवडली शेवट एकदम गूढसा ,:)
  • Log in or register to post comments

मितान, दशानन, स्पा...

अनन्त्_यात्री
Sun, 06/04/2017 - 21:24 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

एक काजवा...लखलख व्हावा!

सत्यजित...
Wed, 06/21/2017 - 02:24 नवीन
क्या बात है! क्या ब्बात है!!
  • Log in or register to post comments

सत्यजित, अभिजीत अवलिया...

अनन्त्_यात्री
Wed, 06/21/2017 - 10:34 नवीन
प्रतिसादा॑बद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

अप्रतिम रे...

दिनेश५७
Tue, 09/26/2017 - 23:01 नवीन
अप्रतिम रे...
  • Log in or register to post comments

दिनेश५७, मनःपूर्वक

अनन्त्_यात्री
Wed, 09/27/2017 - 09:22 नवीन
दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

सुरेख!

यशोधरा
Wed, 09/27/2017 - 10:10 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

यशोधरा

अनन्त्_यात्री
Wed, 09/27/2017 - 10:37 नवीन
____/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा