लाल दिवा . . . . . .

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
29 May 2017 - 10:53 pm

होय मी लाल दिवा बोलतोय . . . . . . माझं मन आज पहिल्यांदाच मांडतोय . . . . .

मी तोच ज्याची शान आगळीच होती . . . प्रतिष्ठेची एक खूण म्हणून मजा वेगळीच होती . . .

दुतर्फा रस्ते रिकामे व्हायचे, कित्येकजण दर्शनासाठी तिष्ठायचे . . "टोल"वाटोलवी म्हणजे काय ते तर मला कधीही नाही समजायचे . . . .

गाडीवर असता विराजमान . . . पाहिले फक्त जोडलेले हात अन् झुकलेली मान . . . .

माझ्या अस्तित्वाने गाडीतले व्हायचे माजोरी . . . भरतच राहिले ते आपापली तिजोरी . . .

जनतेच्या पैशाने जनतेचेच प्रश्न सोडवायचे . . . . पैसे मिळायचे साहेबांना पण प्रश्न तसेच रहायचे . . . .

आजूबाजूला कायम लवाजमा . . . आतल्या साहेबांना नव्हती कधीच कसली तमा . . .

मी पाहिल्यात कौतुकयुक्त हेटाळणीच्या नजरा आणि आशाळभूतही . . . . .साहेब बदलत राहिले पण मला कधी पर्यायच उरला नाही . . .

दिसत होतं सगळं पण काहीच नाही बोलायचं. . . . फटफट्यांच्या कानठळ्यात मग सगळं विसरून जायचं . . .

जाईन तिथे सन्मान . . . . मागाहून यथेच्छ अपमान . . . सवय झाली सगळ्यांची नंतर ,काम केलं गपगुमान . . .

लालबत्तीच्या बाईची माडी अन लाल दिव्याच्या साहेबांची गाडी . . . . एकदा मागे लागले की पळता भुई थोडी . . . .

एक मे ला आला अध्यादेश . . . . माझ्या दर्शनाला कायमचा पारखा झाला देश . . . .

एक लाल कहाणी संपली अचानक अशी . . . . . जनता म्हणे आणली अधिक जवळ साहेबांपाशी . . .

आता काम होतंय की रेंगाळतंय हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल . . . पहायचं आता तुम्ही कारण माझी नजर तिथे नसेल !

मुक्त कविताशांतरसव्यक्तिचित्रणराजकारणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 May 2017 - 8:48 am | प्रचेतस

:)

ह्या कवितेमुळे पूर्वी गाजलेल्या मी बोर्ड बोलतोय... ह्या गुर्जी कवितेची आठवण झाली.