सांगा

अरूण गंगाधर कोर्डे जे न देखे रवी...
बंधने झुगारणे माझ्याच हाती मानणे ना मानणे माझ्याच हाती कापलेले पंख किती उडणार सांगा प्रगतीची वाटचाल कशी करणार सांगा दूर चाललेले ध्येय कधी गाठणार सांगा वेग मोकळा कसा मी सोडणार सांगा छत्र पित्याचे हरवले कसे सांगणार सांगा रांगणाऱ्या बालकाला कशी समजावणार सांगा जीवनाला ऊत आला , भोवताली काळ माजला हरवलेले सर्वस्व तिला कसे मिळणार सांगा
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

2 टिप्पण्या 1,066 दृश्ये

Comments

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

जीवनाला ऊत आला , भोवताली काळ माजला हरवलेले सर्वस्व तिला कसे मिळणार सांगा
सुरेख. लिहित राहा. अजून कसदारपणे लिहिता येईलच. -दिलीप बिरुटे