यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे.
दोन राज्यातील तीन लोकसभा (जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आणि अनंतनाग तसेच केरळमधील मल्लापुरम) आणि १० राज्यांमधील १२ विधानसभा (आसामातील धेमाजी, हिमाचल प्रदेशातील भोरांज, मध्य प्रदेशातील अटेर आणि बांधवगड, पश्चिम बंगालमधील कांथी दक्षिण, राजस्थानमधील धोलपूर, कर्नाटकातील नंजनगड आणि गुंडुलपेट, तामिळनाडूतील डॉ. राधाकृष्ण नगर, झारखंडमधील लिटिपारा, सिक्किममधील अपर बुर्तुक आणि दिल्लीमधील राजौरी गार्डन) या मतदारसंघात दोन टप्प्यांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम (९ आणि १२ एप्रिल) निवडणुक आयोगाने जाहिर केला होता. त्यापैकी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील तर तामिळनाडूमधील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक निवडणुक आयोगाने रद्द केली आहे. इतर मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात ९ एप्रिलला मतदान पूर्ण झाले तर उरलेल्या मतदारसंघांमध्ये १२ एप्रिलला मतदान होईल. मतमोजणी १३ एप्रिलला होईल.
श्रीनगर मतदारसंघातून २०१४ मध्ये निवडून गेलेल्या पी.डी.पीच्या खासदाराने मागच्या वर्षी बुरहान वाणी प्रकरणानंतर उसळलेल्या असंतोषादरम्यान राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुक जाहिर करण्यात आली. पण या मतदारसंघात अवघे साडेसहा टक्के मतदान झाले. तसेच मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही झाला. त्यामुळे निवडणुक आयोगाने राज्यातील अनंतनाग या मतदारसंघातील पोटनिवडणुक सध्या रद्द केली आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये पी.डी.पी च्या मेहबूबा मुफ्ती लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर पोटनिवडणुकीत विजय मिळवून जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
तामिळनाडूतील चेन्नई शहरातील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातून २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललितांचा विजय झाला होता. त्यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. ही पोटनिवडणुक प्रतिष्ठेची होती. अण्णा द्रमुकच्या शशीकला नटराजन गटाने पक्षाचे ज्येष्ठ नेते टी.टी.व्ही.दिवाकरन यांना तर ओ.पन्नीरसेल्वम गटाने ई.मधुसुदनन यांना उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर जयललितांच्या भाचीने-- जे. दीपानेही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. ही पोटनिवडणुक जिंकेल त्या गटाला जयललितांचा वारसा मिळेल असे म्हटले जाईल हे नक्कीच. त्यामुळे या निवडणुका दोन्ही गटांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या निवडणुकांसाठी पैशाचा महापूर वाहिला. तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांच्या घरावर आयकर विभागाचा ढापाही पडला. त्यातून निवडणुक आयोगाने ही पोटनिवडणुक रद्द केली.
दिल्लीमधील राजौरी गार्डन मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे. या मतदारसंघात २०१५ मध्ये आआपचे जरनेलसिंग निवडून गेले होते. त्यांनी दिल्ली विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पंजाबमधील लांबी मतदारसंघात प्रकाशसिंग बादल यांच्याविरूध्द निवडणुक लढवली. पण त्याच मतदारसंघातून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही निवडणुक लढवली. प्रकाशसिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग या महारथींपुढे जरनेलसिंगची डाळ शिजली नाही आणि लांबीमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. हातात असलेली दिल्लीतील आमदारकी उगीचच त्यांनी सोडली. आता आआपने त्यांना उमेदवारी न देता हरजितसिंग या नव्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. भाजप-अकाली दल युतीतर्फे अकाली दलाचे मनजिंदरसिंग सिरसा (२०१३ मधील विजयी उमेदवार) यांना तर काँग्रेसतर्फे मिनाक्षी चंदेला यांना उमेदवारी दिली गेली आहे. या मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे कारण हा निकाल लागल्यानंतर १० दिवसातच दिल्ली महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत याची कल्पना राजौरी गार्डनमधील निकालामुळे येईल. दिल्लीच्या पश्चिम भागात असलेल्या या मतदारसंघात १९४७ मध्ये पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या शीखांची (आणि त्यांच्या वंशजांची) संख्या लक्षणीय आहे. तसेच पंजाबशी या भागातील शीख मतदारांचे जवळचे संबंध आहेत. अनेकांचे नातेवाईक पंजाबमध्ये आहेत. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला त्याचा फायदा उठवायचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. तसेच काँग्रेस नेते अजय माकन यांचा पूर्वीचा हा मतदारसंघ आहे. अजय माकन राजौरी गार्डनमधून १९९३, १९९८ आणि २००३ या ३ निवडणुकांमध्ये दिल्ली विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांचे घरही राजौरी गार्डनच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे काँग्रेस इथे चांगलाच जोर लावत आहे. या मतदारसंघात भाजपचा विशेष जोर नाही. आतापर्यंत एकदाच २०१३ मध्ये भाजप-अकाली दल युतीने ही जागा जिंकली होती. २०१५ मध्ये आआपने तर इतर सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. या मतदारसंघात पराभव झाल्यास आआपच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर नक्कीच परीणाम होईल आणि १० दिवसांनंतर असलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी ते पुरेशा आत्मविश्वासाने सामोरे जाणार नाहीत हे नक्कीच. त्या दृष्टीने आआप आणि केजरीवालांसाठी ही पोटनिवडणुक महत्वाची आहे.
१३ एप्रिलला पोटनिवडणुकांचे निकाल आल्यावर ते इथे पोस्ट करेनच.
वर्गीकरण
वाचने
59366
प्रतिक्रिया
300
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिल्ली महापालिका निवडणुका-- आआप सरकारवरील सार्वमत इति सिसोदिया
समजा दिल्लीतील ३ पैकी किमान २
In reply to दिल्ली महापालिका निवडणुका-- आआप सरकारवरील सार्वमत इति सिसोदिया by गॅरी ट्रुमन
प्लिज नवीन धागा सुरू करा,
In reply to दिल्ली महापालिका निवडणुका-- आआप सरकारवरील सार्वमत इति सिसोदिया by गॅरी ट्रुमन
हे मतदान दिल्लीतील अरविंद
In reply to दिल्ली महापालिका निवडणुका-- आआप सरकारवरील सार्वमत इति सिसोदिया by गॅरी ट्रुमन
हे मतदान दिल्लीतील अरविंद केजरीवालांच्या आआप सरकारच्या कारभारावरील सार्वमत असेल असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.सिसोदिया केजरीवालांइतकेच धूर्त आहेत. त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा आहे. त्यांनी मुद्दामच हे विधान केले आहे. जर निवडणुकीत आआपला बहुमत मिळाले तर आमच्या चांगल्या कामामुळेच महापालिकेत आम्हाला बहुमत मिळाले हे सांगायला ते मोकळे. जर आआपचा निवडणुकीत पराभव झाला तर आआपच्या मूर्खपणाला मतदारांनी मतपेटीतून थप्पड दिली आहे असे माध्यमे सांगायला सुरूवात करणार कारण सिसोदियांनीच तसे सांगितले आहे आणि जर केजरीवालांनी राजीनामा द्यावा ही जोरदार मागणी सुरू होऊन केजरीवाल पायउतार झाले तर त्यांच्याजागी सिसोदियांची वर्णी लागेल. दिल्लीत आआपचा पराभव होणार याची चाहूल सिसोदियांना लागलेली दिसते. म्हणून मुद्दामच केजरीवालांची अडचण करण्यासाठी हे मतदान दिल्लीतील अरविंद केजरीवालांच्या आआप सरकारच्या कारभारावरील सार्वमत असेल असे त्यांनी आधीच बोलून ठेवले आहे. केजरीवाल जितके अडचणीत येतील तितकी सिसोदिया मुख्यमंत्री बनण्याची संधी वाढत जाईल.सिसोदिया केजरीवालांइतकेच धूर्त आहेत
In reply to हे मतदान दिल्लीतील अरविंद by श्रीगुरुजी
दिल्ली महापालिका निवडणुका एक्झिट पोल्स
एक्झिट पोलसाठी ई.व्ही.एम लागत
In reply to दिल्ली महापालिका निवडणुका एक्झिट पोल्स by गॅरी ट्रुमन
+1
In reply to दिल्ली महापालिका निवडणुका एक्झिट पोल्स by गॅरी ट्रुमन
नवा धागा
In reply to +1 by दशानन
>>> अपेक्षेप्रमाणे
In reply to दिल्ली महापालिका निवडणुका एक्झिट पोल्स by गॅरी ट्रुमन
एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर
In reply to दिल्ली महापालिका निवडणुका एक्झिट पोल्स by गॅरी ट्रुमन
एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर विविध चॅनेलवरील चर्चेत आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी त्या निकालांसाठीही ई.व्ही.एम ला जबाबदार ठरवले आहे--- केजरीवाल आणि कंपनीच्या ह्या दाव्यावर केंद्रिय गृहराज्यमंत्री किरण रिजजू ह्यांनी खालील ट्विट केले आहे. --नाचता येईना *गण वाकडं
Reports from all over Delhi
दिल्लीचे मंत्री गोपाल राय उवाच
छत्तीसगडमध्य़े 300 हून अधिक
छत्तीसगडमध्य़े 300 हून अधिक नक्षलवाद्यांचा हल्ला, CRPF चे 26 जवान शहीद
--- --- http://abpmajha.abplive.in/india/naxal-attack-on-crpf-soldiers-in-sukma…प्रज्ञा सिंह ठाकूरला
ओह्ह ... खूपच धक्कादायक आहे
In reply to प्रज्ञा सिंह ठाकूरला by श्रीगुरुजी
न्यायालय फारसे काही करू शकत
In reply to ओह्ह ... खूपच धक्कादायक आहे by विशुमित
हो मग बरोबर आहे तुमचं..!!
In reply to न्यायालय फारसे काही करू शकत by श्रीगुरुजी
हे एका ठिकाणी वाचायला मिळाले
In reply to हो मग बरोबर आहे तुमचं..!! by विशुमित
विनोद खन्नांचे निधन
अलविदा दयावान
In reply to विनोद खन्नांचे निधन by गॅरी ट्रुमन
के.पी.एस.गिल यांचे निधन
गॅरी भाऊ तुमचीच आठवण काढत
तीन महापालिका निवडणुकांचे निकाल
In reply to गॅरी भाऊ तुमचीच आठवण काढत by राघवेंद्र
http://indianexpress.com
केवळ गर्हणिय.. परंतु, दाऊदी
In reply to http://indianexpress.com by श्रीगुरुजी
१-२ वर्षांपूर्वी एका बोहरा
In reply to केवळ गर्हणिय.. परंतु, दाऊदी by पुंबा
खरे आहे. शनीमंदीर, शबरीमाला,
In reply to १-२ वर्षांपूर्वी एका बोहरा by श्रीगुरुजी
प्रणॉय रॉयच्या घरांवर धाडी
'भ्रष्ट असूनसुद्धा
In reply to प्रणॉय रॉयच्या घरांवर धाडी by गॅरी ट्रुमन
हा उघडउघड माध्यमस्वातंत्र्य व
In reply to प्रणॉय रॉयच्या घरांवर धाडी by गॅरी ट्रुमन
या धाडींचा निषेध
In reply to हा उघडउघड माध्यमस्वातंत्र्य व by श्रीगुरुजी
लष्करप्रमुखांची तुलना जनरल डायरशी
उडदामाजी काळेगोरे ....
In reply to लष्करप्रमुखांची तुलना जनरल डायरशी by गॅरी ट्रुमन
अडानींचा ऑस्ट्रेलियातील कोळसा प्रकल्प मार्गी
ट्रुमन, एक बँकर म्हणून खाजगी
खासगी बँकादेखील
In reply to ट्रुमन, एक बँकर म्हणून खाजगी by संदीप डांगे
हे पण वाचा.
In reply to ट्रुमन, एक बँकर म्हणून खाजगी by संदीप डांगे
दोन लेख
In reply to ट्रुमन, एक बँकर म्हणून खाजगी by संदीप डांगे
घटनाक्रम -
शेतकर्यांचा संप १ जुन ला
In reply to घटनाक्रम - by श्रीगुरुजी
संपादक मंडळ ..!!
In reply to शेतकर्यांचा संप १ जुन ला by मोदक
स्वतःबद्दल इतके संवेदनशील
In reply to संपादक मंडळ ..!! by विशुमित
राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी निवडणुक
राष्ट्रपतीपदाचा विरोधी
In reply to राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी निवडणुक by गॅरी ट्रुमन
आज राष्ट्रपती निवडणुकीचा
In reply to राष्ट्रपतीपदाचा विरोधी by श्रीगुरुजी
काहीही काय बोलताय? त्यांना
In reply to आज राष्ट्रपती निवडणुकीचा by खेडूत
ब्रिटनमधली सार्वत्रिक निवडणूक मतदान
गापै, कॉर्बीन तर मॉनार्की
In reply to ब्रिटनमधली सार्वत्रिक निवडणूक मतदान by गामा पैलवान
जनमतचाचण्या
In reply to ब्रिटनमधली सार्वत्रिक निवडणूक मतदान by गामा पैलवान
ब्रितनमधील इस्लामी
In reply to जनमतचाचण्या by गॅरी ट्रुमन
वरकरणी वाटते
In reply to ब्रितनमधील इस्लामी by पुंबा
गणवेशातील पोलीस अधिकाऱ्याने
हा माज आहे. पण राष्ट्रप्रेमी
In reply to गणवेशातील पोलीस अधिकाऱ्याने by अत्रे
कॉर्बिन मान्य राणीला
धन्यवाद गापै..
In reply to कॉर्बिन मान्य राणीला by गामा पैलवान
http://abpmajha.abplive.in
स्वप्नात येणाऱ्या
रस्ता दुरुस्त करण्याची पै न
In reply to स्वप्नात येणाऱ्या by अभिजीत अवलिया
हा मूर्खपणा भारतात नवीन नाही.
In reply to स्वप्नात येणाऱ्या by अभिजीत अवलिया
ब्रिटिश निवडणुका
आव्हान नाही आवाहन
In reply to ब्रिटिश निवडणुका by गॅरी ट्रुमन
एक बातमी नजरेतून सुटली होती
ही घडामोड ताजी नाही त्यामुळे
आधार कार्ड-पॅन कार्ड संलग्न करायच्या निर्णयाला स्थगिती
अनेक लोकांनी (बिझनेस
In reply to आधार कार्ड-पॅन कार्ड संलग्न करायच्या निर्णयाला स्थगिती by गॅरी ट्रुमन
पळवाटा
In reply to अनेक लोकांनी (बिझनेस by अत्रे
आहे ती व्यवस्था (पॅन कार्ड)
In reply to पळवाटा by गॅरी ट्रुमन
व्यवस्था (पॅन कार्ड) सुधारता येईल का?
In reply to आहे ती व्यवस्था (पॅन कार्ड) by अत्रे