डोळ्यांची/नजरेची काळजी कशी घ्यावी ?
मलासे वाटते मनुष्यजातीच्या आजवरच्या इतिहासात कधी नव्हे एवढी दृष्टीविषयक व्याधींची समस्या आजच्या घटकेला निर्माण झालेली आहे. काही काळ आधीपर्यंत नेत्रविकार तज्ञांकडे वयस्क आणि वृद्ध लोक जास्त आलेले दिसत. आताशा लहान वयाच्या मुला-मुलींचा भरणा जास्त दिसतो, ही बाब अत्यंत चिंतादायक आहे.
हल्ली कुणाकडेही जा, लहान मुले मोबाईल वा टीव्हीला चिकटलेली दिसतील. अगदी आठ-दहा महिने वयाच्या बाळांना देखील दूध पीताना वा काही खाताना कार्टून लावून दिले नाही, तर ती खात-पीत नाहीत, असे त्यांच्या आया सांगताना दिसतात. तीन-चार वर्षे वयाची मुले आपण 'बोर' होत असल्याचे सांगतात, त्यावर उपाय एकच. त्यांच्या हातात मोबाईल पकडवणे वा टीव्ही लावून देणे. हे कार्य त्यांचे आई-वडील अगदी इमाने इतबारे करत असताना दिसतात, कारण असे केले की खुद्द ते मोबाईलची चाळवाचाळव करायला मोकळे होतात.
व्हॉट्सॅपवरील फालतू चुटके, खरेखोटे ज्ञान, व्हिडियो, गुडमॉर्निंगे, ह्याप्पी बर्थडे, मदर डे, अमूक डे - तमूक डे वगैरे बघण्यात वेळेपरी वेळ तर जातच असतो, त्याहीपेक्षा वाईट म्हणजे दृष्टी झपाट्याने खराब होत जाते.
आगगाडीतून प्रवास करताना मी वयाच्या सहासष्ठाव्या वर्षी सुद्धा खिडकीतून बाहेरचा निसर्ग वगैरे बघत बसतो, पण तरूण मंडळी आणि अगदी लहान मुले सुद्धा सरसकट मोबाईलात गुंतलेली दिसतात.
मोबाईल, टीव्ही आणि तत्सम साधनांचा डोळ्यांवर नेमका काय परिणाम होतो? त्यातून काय काय समस्या निर्माण होतात ? त्याचे कोणते परिणाम पुढील आयुष्यात भोगावे लागतात ? यावर उपाय काय ? घरात वा कामाच्या जागी कोणत्या प्रकारचे दिवे लावावेत, जेणेकरून डोळ्यांवर कमीत कमी ताण पडेल ? डोळे कोरडे पडणे -- आणि -- सतत पाणी वाहू लागणे -- या दोन्ही प्रकारांची कारणे आणि उपाययोजना काय आहेत ? या आणि अश्या सर्व विषयांवर मिपावरील डॉक्टर आणि अन्य तज्ञ मंडळींनी आवश्यक माहिती देऊन सर्वांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती करतो. सर्व वाचकांनी आपापले प्रश्नही इथे दिल्यास दृष्टीविषयक सर्व माहितीया धाग्यावर मिळत राहील.
चष्मा स्वच्छ करण्याविषयी मला चष्मेवाल्याने सांगितले की वाहत्या पाण्याखाली चष्मा किंचितसे साबण लावून धुवावा आणि मऊ (उदा. बनियानचे कापड) कापडाने टिपून कोरडा करावा. असे करण्यातून काचेवरील धूळ वाहून जाते आणि चष्म्याच्या फ्रेमच्या लहानश्या बिजागर्यांवर साठणारी घामाच्या क्षाराची पुटे देखील वेळोवेळी स्वच्छ होत रहाण्याने फ्रेमचे आयुष्य वाढते.
या विषयावर यापूर्वी धागा निघालेला असल्यास कृपया त्याचा दुवा द्यावा.
वाचने
16321
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
१) सतत स्क्रीनसमोर बसू नका.
लै झोंबते
In reply to १) सतत स्क्रीनसमोर बसू नका. by मोदक
*कांदा
In reply to लै झोंबते by इरसाल कार्टं
अगदी, अगदी!
In reply to *कांदा by इरसाल कार्टं
?
In reply to अगदी, अगदी! by एस
त्यातले घटक. एकदाच डोळ्यांत
In reply to ? by मोदक
तुम्ही दोघे पतंजली बद्दल
In reply to त्यातले घटक. एकदाच डोळ्यांत by एस
होय.
In reply to तुम्ही दोघे पतंजली बद्दल by मोदक
गाजर ...
In reply to १) सतत स्क्रीनसमोर बसू नका. by मोदक
गाजर व इतर भडक भगव्या/पिवळ्या
In reply to गाजर ... by अभिदेश
ओके
In reply to गाजर व इतर भडक भगव्या/पिवळ्या by डॉ सुहास म्हात्रे
औषधांच्या किंमती
In reply to गाजर ... by अभिदेश
शक्यतो मोबाईल, कॉम्पुटर,
डोळ्यांचा कोरडेपणा
कोरडे डोळे
In reply to डोळ्यांचा कोरडेपणा by यशोधरा
डोळ्यांचा कोरडेपणा कमी
In reply to कोरडे डोळे by चित्रगुप्त
स्त्रीयांना मेनोपॉजनंतर ड्राय
डोमा बंद
गुलाब पाणी
माझे काही प्रश्न
पहिल्या प्रश्नाचे उत्तर मी
In reply to माझे काही प्रश्न by हेमंत८२
आजकाल डॉक्टर डोळ्यांची लेसर
In reply to माझे काही प्रश्न by हेमंत८२