शब्द. ..
काव्यरस
सगळे शब्द कधी कधी साथ सोडून निघून जातात
दूर दूर रानात एकटे पळून जातात..
मन घिरट्या घालत रहातं वटवाघळांसारखं
पटकन फांदि न मिळणाय्रा..
प्रयत्न करतो मी खूप. शब्दांना पुन्हापुन्हा माझ्या दावणीला बांधायचा.
पण ते गेले एकदा,की जातातच.
पुन्हा परत भेटेपर्यंत!
शब्दांचा हा पाठशिवणीचा खेळ.
हेच माझं अटळ प्राक्तन आहे की काय
असं वाटेपर्यंत...
ते त्याच खेळाचा भाग म्हणून मला करवंदीच्या जाळीअडून डोकावणाय्रा उनाड पोरासारखे लांबून हळूच बघायला लागतात.
मी म्हणतो त्यांना "साल्यांनो, या की लवकर माझ्या गळाभेटीला? का असे दुष्टपणे बघता माझ्याकडे.. लांबून.. अगंतूकासारखे? "
ते ही मग खट्याळपणे उत्तरतात... "अरे गाढवा!, जीवनापासून पळून जाऊ नकोस लांब लांब.. मग आंम्ही तुझ्या बरोबरच राहू सदैव.. कारण , जीवन हाच आमचा प्राण आहे.. आणी सहजता हा श्वास.. "
मी ही समजलो मग... हा उन पावसाचा खेळ आहे... चालायचा असाच! शब्दांना आनंदाने बाय बाय केले.. म्हटलं. .., "हवे तेंव्हा या.. तुम्ही जसे माझे तसा मीही तुमचाच आहे"
हसून निघून गेले ते . जाताना मात्र म्हणाले एव्हढेच... "आठवण आली आमची तर हाक मार हं आंम्हाला! लाजू नकोस!"
==================
अतृप्त. .
वाचने
4123
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
छान लिहिलंय. आवडले.
छान लिहिलंत अत्रुप्त.
वा. बरेचं दिवसांनी आज?
(No subject)
साथ, बाइबाइ काढा. "आठवण आली
वा, बुवा!
कविता दवणिय झाली आहे.
In reply to कविता दवणिय झाली आहे. by सतिश गावडे
प्रती साद आ दरणीय जाहला आहे.
मस्तच हो गुरुजी....
बुवांच्या मैतराची प्रतिक्रिया
सर्वांसी धन्यवादम्.
थोडक्यात ककाय बुवाची प्रतिभा
In reply to थोडक्यात ककाय बुवाची प्रतिभा by स्पा
पावभाजीत चीज पडलं हो