रामगढचे ते लहानसे रेल्वे स्टेशन. एकच प्लॅटफॉर्म!
ट्रेन मधून खाकी यूनिफॉर्म मधला एक माणूस उतरतो. त्याची वाट पाहत असलेला रामलाल या माणसाला घेऊन स्टेशनच्या बाहेर पडतो. दोघेही घोड्यावर बसून रामगढच्या दिशेने दौडत निघतात......
आणि बॅकग्राउंडला सुरू होते ते हिंदी चित्रपटांच्या आजवरच्या इतिहासातले एक अतिप्रचंड दिलखेचक, जबरदस्त पार्श्व संगीत.
गाण्यांपेक्षा कधी कधी बॅकग्राउंड स्कोर भाव खाऊन जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शोलेचा हा टायटल ट्रॅक. नेहमीप्रमाणे इथेही जूनियर बर्मनदा गाण्यांइतकाच पार्श्व संगीतातही जीव ओततात.
आता शोले हा चित्रपट!
या चित्रपटाविषयी काय काय बोलावं आणि काय काय आठवावं?
सलीम-जावेदचे तूफ़ानी संवाद, अरे ओ सांबा चा धाक, वीरूची नौटंकी, बसंतीची नॉनस्टॉप बडबड, जय आणि ठाकूर बहूचे अबोल अव्यक्त प्रेम...
संजीव कुमारचा सुडाने धगधगलेला ठाकूर, रामलालची खंबीर स्वामीनिष्ठा, पुत्रवियोगाने कोसळलेले इमाम साहेब आणि अँग्रेझोँके जमानेके जेलर... अनेकांच्या बाळपणाची नाळ या आठवणींशी अशी अगदी घट्ट जोडली गेलीय, निदान माझी तरी. अहो, या चित्रपटावर, त्याच्या संवादांवर आमची एक आक्खी पिढी पोसली आहे.
नॉर्मली मुलं कशी, रामायण, महाभारतातल्या कहाण्या ऐकत मोठी होतात…तसे आम्ही जय-विरुच्या स्टोरया ऐकत मोठे झालो =))
कोणाचं काय तर कोणाचं काय? पण शोले चित्रपट हा माझ्यासाठी मात्र एक रेशीमधागा आहे- भुतकाळाशी मला जोडणार्या अनेक धाग्यांपैकी एक. शोले म्हणजे सत्तर एम एमच्या पडद्यावरचा लार्जर दॅन लाईफ थरार आहे, घोड्यांच्या टापांचा छाती दडपुन टाकणारा खडखडाट आहे आणि आज मल्टिप्लेक्सच्या जमान्यात सिंगल स्क्रीनची जपून ठेवलेली आठवण आहे.
म्हणूनच शोलेचे हे टायटल संगीत मला क्षणार्धात 'अभी तो पार्टी शुरू हुई' वाल्या मोड मधे नेतं. हे संगीत माझ्यासाठी पुढल्या सुखद प्रवासाची नांदी असते, तूफानी मनोरंजनाची ग्यारन्टी असते, गब्बरच्या, बसंतीच्या पुनर्भेटीचा आनंद असतो आणि आठवणींची उजळणी असते.
आजही हे संगीत पडद्यावर सुरू झाले ना की माझ्या अंगावर काटा येतो. मनात कुठेतरी "सीट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द राइड" अशी घोषणा होते....ओठांवर कळत नकळत एक स्मितहास्य येतं...
मी आता सीटवर अशी मस्तॅंपैकी सैलावून बसते, भवतालच्या जगाला तात्पुरता टाटा बाय बाय करते आणि मग पुढचे तीन-साडे तीन तास शोले नावाच्या त्या रंगीत, जादुभर्या दुनियेत निवांत विरघळून जाते....स्वत:ला पार हरवून बसते.. पूर्णपणे....
मंडळी, तुमच्याही काही आवडीचे, लक्षात राहीलेले, मनात रुतुन बसलेले टायटल ट्रॅक्स, ओपनिंग सीन्स किंवा गाणी असतील ना? असतील तर येऊ द्यात...अभी तो पार्टी शुरू हुई हैं :)
वाचने
7336
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी नेमक्या भावना व्यक्त
आह्ह्ह्ह
In reply to अगदी नेमक्या भावना व्यक्त by Madhavi1992
दोन बीटस पडल्या गिटारच्या की
In reply to आह्ह्ह्ह by अभ्या..
निर्विवादपणे जबराट म्युझिक
In reply to आह्ह्ह्ह by अभ्या..
भारी धागा..
नॉर्मली मुलं कशी, रामायण,
ऐसी होना, बाप!
In reply to नॉर्मली मुलं कशी, रामायण, by टवाळ कार्टा
माय हार्ट विल गो ऑन..
अंगूर
वरील सर्व आवडते आहे.
वरील सर्व आवडते आहे.
वाचून छान वाटलं. शोले सिनेमा
माझीही एक आठवण.सूचना:
तमाम शोले
प्रश्न चुकला, खरे नाव
In reply to तमाम शोले by अभिदेश
गब्बर सिंग वल्द हरी सिंग.
वाह
In reply to गब्बर सिंग वल्द हरी सिंग. by पद्मावति
मस्त लिहिलेस पद्माक्का. रुपी,
शोले बसंत थिएटरमध्ये याच
शीर्षक आणि लेखिका वाचून दचकले
>>>ते मेट्रो हायजॅक करतात तो
In reply to शीर्षक आणि लेखिका वाचून दचकले by मितान
वरील सगळे प्रतिसाद वाचतेय,
दोन-तीन तास टाईमपास ची फुल्ल गॅरंटी!!
अगागागागा......
https://www.youtube.com/watch
सिनेमा मध्ये गब्बर सिंगचे खरे
...