Skip to main content

||ओम नमः शिवाय ||

लेखक मृगनयनी यांनी सोमवार, 04/08/2008 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमन माझे तुला नटवरा.. हे शिवशंभो, भोळ्या शंकरा.. कृपासिंधो तू, हे गौरीहरा.. प्रसन्नवदन तू , कर्पूरगौरा.. तांडव करुनि, तु ब्रह्मांड पेलिसी.. प्राशुनि हलाहल, नीलकंठे मिरविसी.. फासुनि विभुती, तू हिमालये वससि.. उमापती शिव, हस्ती त्रिशूल घेसी.. मस्तकी तुझिया चंद्र विराजे.. हाती डम डम डमरू वाजे... तुझ्या जटा-मुकुटातुनि वाहे मुक्त मंदाकिनी.. सर्प-भुजंग खेळति देहावरी, तू शूलपाणिनी.. मुंडक-माला धारिसी तू, चिता-भस्म विलेपुनि, विश्वजननी महामाया , असता तुझी अर्धांगिनी.. महेश्वर तू, महादेव तू, धन्य धन्य देवी सती.. पुन्हा मिळविण्या तुज भूपती, जन्मली ती पार्वती.. अनाथांचा नाथ असुनि, निराकार तू, नि:संग तू.. काळपुरूषाचा काळ रेखिसी, त्राही त्राही भगवान तू.. नमन माझे तुला नटवरा.. हे शिव-शंभो भोळ्या शंकरा.. ||ओम नम: शिवाय||
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 10719
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

छानच..... (जय भोलेनाथ) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

वा! सुंदर काव्य... जय भोलेनाथ! आपला, (भांगप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

वा! सुंदर काव्य... असेच म्हणतो .. आणि खफ वरील काव्यप्रतिभेस इकडच्या जंगलात मायग्रेट केल्याबद्दल अभिनंदन .. अजुन येऊ देत ... वाचतोय ... (भांगप्रेमी) तात्या. =)) =)) मला पण आरशात पाहून भांग पाडायला फार आवडते .. मी पण भांगप्रेमी -- ( टारझन ऊर्फ खवीस )

ओम नम: शिवाय| आजच्या महाशिवरात्रीच्या शुभदिनी, वाचण्यास यथायोग्य असेच तुझे काव्य वाटते, नयनी. ही रचना तुझी स्वतःचीच आहे ,की अजून कोणाची? (सहज म्हणुन विचारलं, कृपया राग मानु नकोस.) (राधिका.)

In reply to by राधिका

ही रचना तुझी स्वतःचीच आहे ,की अजून कोणाची? :) राधिका जी, ही माझी स्वत:चीच "रचना" आहे. श्रावणातल्या सोमवारी ही "शिवस्तुती" प्रकटित करण्यात आलेली होती.... अर्थात माझ्याकडूनच! आज महाशिवरात्रीच्या दिवशी आपण ती शोधुन काढून, वाचून त्यावर प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल खरोखर आभारी आहे मी! :) || ओम नम: शिवाय|| युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

सुंदर ! नितांत सुंदर !! जय हो बोले बाबा की !!!! Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

In reply to by दशानन

धन्यवाद राजे! जय हो -----भोलेनाथ!!! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

आधी वाचली नव्हती. छानच वाटलं आजच्या महाशिवरात्री दिवशी सकाळी वाचल्यावर. सुंदर रचनेबद्दल मृगनयनी यांचे आणि धागा शोधून काढल्यामुळे वाचनाची संधी मिळाल्याबद्दल राधिका यांचे आभार!

In reply to by सहज

सहजरावांशी सहमत ... ॥ ओम नमो: शिवाय ॥ अवांतर : दाक्षिणात्य भागात उपवासला "इडली" चालते हे ऐकुन तुम्हाला काय वाटले ??? ------ ( दिवसभर "उपास" घडणारच ह्या काळजीने भयभीत ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

मी पण सहमत. शेखर >> अवांतर : दाक्षिणात्य भागात उपवासला "इडली" चालते हे ऐकुन तुम्हाला काय वाटले ??? अवांतर उत्तरः गणपती दुध पीत असेल तर इडली पण चालु शकते ;)

In reply to by छोटा डॉन

पीठ वाटले आणि खाल्ली. सुंदर रचना

In reply to by

आधी वाचली नव्हती. छानच वाटलं आजच्या महाशिवरात्री दिवशी सकाळी वाचल्यावर. सुंदर रचनेबद्दल मृगनयनी यांचे आणि धागा शोधून काढल्यामुळे वाचनाची संधी मिळाल्याबद्दल राधिका यांचे आभार!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत !! जय शिवशंकर ! जय भोलेनाथ !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

धन्यावाद मृगनयनी महाशिवरात्रीच्या दिवशी घरी काही वाचता नाही आले पण इथे वाचायला मिळाले महादेवावर. ||ओम नमः शिवाय ||

छान! || ॐ नमः शिवाय ||

नैनीबाई, धन्यवाद! छान रचना :) -(नंदी) ध मा ल. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

अप्रतिम आणि सुंदरच.... आज महाशिवरात्रीच्या दिवशी एवढी सुंदर शिवस्तुती वाचून मन प्रसन्न झाले अशाच छान रचना करीत रहा मृगनयनी.... ||ॐ नमः शिवाय || (शिवभक्त) सागर

||ॐ नमः शिवाय || --अवलिया

महशिवरात्रीनिमित्त लालबागच्या राजाच्या वडिलांचा विजय असो.. :) आपला, (गणेशभक्त) तात्या.

मला शिव बध्दल जास्त माहीत नाही पण तु लिहलेल्या ओळी सुंदर आहेत .. स्पेशली ... अनाथांचा नाथ असुनि, निराकार तू, नि:संग तू.. काळपुरूषाचा काळ रेखिसी, त्राही त्राही भगवान अप्रतीम ... ~ वाहीदा

मी ही वाचलीच नव्हती. खूपच सुंदर आहे हे काव्य. :) नयनी.. अभिनंदन इतक्या सुंदर रचनेबद्दल. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

काय गं नयनी!... किती वर्षं या एकाच शिवस्तुती'वर महाशिवरात्र साजरी करायची! :) नवीन लिहि काही तरी ओम नमः शिवाय |

In reply to by मृगनयनी

मृगनयनीजी, आजच नाडीग्रंथांवरील प्रतिक्रियांच्या संदर्भात आपले नाव आठवले आणि पहातो तो महाशिवरात्रीला आपण काव्यरचना घेऊन अवतरित! असो.
ज्यांच्या प्रेरणेचा अदभूत चमत्कार - नाडीग्रंथ अशा शिवशक्तीला
शिव भक्ती लागी तनु ही झिजू दे| शिव चरणकमली मन हे निजू दे । शिव स्मरणी ठेवी ही वाचा रिझाया | नमस्कार माझा तुला शिवराया ||
|| ओम नम: शिवाय ||

In reply to by शशिकांत ओक

आहो णाडीचार्य , त्या ३ वर्षांपुर्वीच अवतारल्या होत्या ... णाडीवर णिट लिहील्या नाहीये का ? Mon, 04/08/2008 हे पहावं :) - शिस्पेंसिल टोक

---------------------------- शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थासि जाऊ नको ! योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्र तपें तीं नको ! काळाचें भय मानसीं धरु नको दुष्टांस शंकूं नको ! ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको !!! ------------------------ अमोल

॥ओम नमः शिवाय॥ मी दर श्रावणी सोमवारी तुझी ही कविता वाचते. ;) तूर्तास, तू काहीतरी नवे लिहावेस्, अशी अपेक्षा. :)