Skip to main content

सावर ग स्वतःला .....

लेखक मितालि यांनी सोमवार, 16/02/2009 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
सावर ग स्वतःला आवर तुझ्या मनाला... निघून गेलेले क्षण मुठीतील वाळू दोन्ही सारखेच घट्ट पकडशिल तितके वाहून जाती आठवाणीचे झुले मन झुलवता झुलवता सरतील सांज वाति निरव शांततेची उरेल रात एकटीच भवती गेले वाहून घर लाटे सवे तरी पुन्हा नवे बांधत होतो बालपणीची जिद्द सखे वापर या घडीला सावर ग स्वतः ला आवर तुझ्या मनाला...
लेखनविषय:

वाचने 2189
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आठवाणीचे झुले मन झुलवता झुलवता सरतील सांज वाति निरव शांततेची उरेल रात एकटीच भवती हे सुंदर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

निघून गेलेले क्षण मुठीतील वाळू दोन्ही सारखेच घट्ट पकडशिल तितके वाहून जाती हे आवडले. मिताली छानच आहे कविता.

सुंदर कविता... खास करुन निघून गेलेले क्षण मुठीतील वाळू दोन्ही सारखेच घट्ट पकडशिल तितके वाहून जाती अशी पाखरे येती आणिक स्मृती देऊनी जाती..... दोन दिसांची रंगत संगत , दोन दिसांची नाती.... या गीताची आठवण झाली.... शब्दसामर्थ्य खूप छान वापरले आहे.... अजून येऊ द्यात कविता.... (कविताप्रेमी) सागर

निघून गेलेले क्षण मुठीतील वाळू दोन्ही सारखेच खरं आहे ... सावरलंस... धन्यवाद....