सावर ग स्वतःला .....
लेखनविषय:
सावर ग स्वतःला
आवर तुझ्या मनाला...
निघून गेलेले क्षण
मुठीतील वाळू
दोन्ही सारखेच
घट्ट पकडशिल
तितके वाहून जाती
आठवाणीचे झुले
मन झुलवता झुलवता
सरतील सांज वाति
निरव शांततेची उरेल
रात एकटीच भवती
गेले वाहून घर
लाटे सवे तरी
पुन्हा नवे बांधत होतो
बालपणीची जिद्द सखे
वापर या घडीला
सावर ग स्वतः ला
आवर तुझ्या मनाला...
वाचने
2175
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
छान आहे कविता ..
छान
In reply to छान by प्राजु
१+
निघून
सुंदर कविता...
धन्यवाद..
सावरलस