"जरासा उशीर होईल, पोचतोचे"
राघवेंद्र ह्यांच्या आलेल्या फोनवरची माझी दिलगिरी ऐकून
"पण तू जाऊन नक्की करणार काय तिथे? ओळख आहे का कोणाशी?" मित्राच्या वडिलांनी विचारले.
"अहो काही नाही तर खफवर मारतो तश्या रँडमगप्पा मारून येईन..." मी.
"कश्यावर?" मित्रवडील
एक तर गोरज मुहूर्तावर न्यूयोर्कात आल्यापासून सबवेने वेळेचं गणित आधीच चुकवलेलं.
वरुन 'मिसळपाव' काये, गेल्या आठवड्यातून ह्या आठवड्यात कट्टा कसा ढकलला गेला आणि मी सात तास बसमध्ये बसून वर्जिनियातून त्याच्या घरी नक्की कशाला उलथलो ह्या सगळ्याचे मित्रास (सहकुटूंब. त्याचे.) स्पष्टीकरण्यात कट्ट्याचा अकराचा मुहूर्त टळून गेलेला.
"जाऊ दे ना काका; सांगतो आल्यावर" बूट चढवत म्हणालो.
हाड(वैरी)मित्राच्या "यशस्वी व्हा!" अश्या टोमणाशिर्वादाला ऐकून न ऐकल्यासारखे करत पावतास लांब असणाऱ्या न्यू पोर्ट मॉलला यायला सुटलो.
वाटेत जर्सीतल्या एका अज्ञात नंबरावरून फोन आला.
'हॅलो' म्हणण्याच्या आधीच (पुणेकर ना शेवटी!) "पावणेबारा ही काय वेळ आहे यायची? आम्ही गेलो निघून!" असं कोणी विदुषी सात्विक संतापात वद(डाफर)ल्या.
इराणी 'उबर'ड्रायवरला 'लवकर, लवकर' अशी चारी बोटांनी हवा पुढे झटकण्याची, फक्त भारतीयांनाच कळणारी खूण करत "इटीए ११:३९ आहे, हा काय आलोच" असं, आवाजतली दिलगिरी शक्य तितकी वाढवत उत्तरलो.
"अच्छा. कोण बोलतंय कळलं का?" पलीकडून पिलीयन रायडर(च असू शकणाऱ्या) म्हणाल्या.
"येतंय ध्यानात. भेटतो फूडकोर्टात." म्हणून फोन ठेवला. पोचलो होतो. आतला नजारा पाहून 'आ' वासला होता.
'भव्य,नेत्रदीपक की प्रासादतुल्य' ह्यातले कुठले विशेषण मॉलसाठी वापरता येईल हा प्रश्न मनात घोळवत सरकत्या जिन्यांनी तिसऱ्या मजल्यावर पोचून मी इकडे-तिकडे निरखताना बाहेर पडलेल्या स्वच्छ उन्हापेक्षाही अधिक प्रसन्नेतेने माझ्याकडे पाहून हसणारा, हमखास मराठीच असू शकणारा एक स्त्री-पुरुष संमिश्र (नॉनव्हॉट्सअँप) घोळका बसलेला दिसला आणि 'यहीं मेरे अपने हैं!' असं मनात म्हणत जोडटेबलावर जमा झालो.
राघवेंद्रांशी त्यांचे नाव ऐकत हात मिळवला आणि सही रे सई ह्यांना 'अहो उभं राहायची गरज नाही, बसा ना' अशी कोपरखळी मारत आसन ग्रहण केले. कनेटिकटवरून अडीच तास प्रवास करून आल्याचा थकवटा जाणवू न देत त्या हसल्या.
पश्चात अस्मादिकांची जकासर, मिहीर ह्यांना ओळख करून दिली. बच्चे मंडळींना 'हॅलो' म्हटले.
चेहरे पक्के पण नावं अजिबात लक्षात न राहणे(ठेवणे?) हा जन्मतःच जडलेला रोग असल्याने मी कोणालातरी चुकून भलतीच हाक मारणार ही धास्ती मनात होती. शिवाय राघवेंद्र, पिलीयन रायडर आणि जयंत कुलकर्णीसर ह्यांची आधीच काहीतरी चर्चा चालू होती.
गोंधळलेल्या मनःस्थितीत मोजून दहा मिनिटे नुसतीच बत्तीशी दाखवून माझे गाल दुखायला लागल्यावर इ-कट्ट्याचे प्रयत्न चालू झाले.
शेकडो मैलांवरून स्रुजा, श्रीरंग आणि समर्पक हे मिपाकर व्हिडियो कॉलद्वारा जोडले गेले.
मॉलच्या गोंधळात ऐकायला अजिबात येत नव्हते, म्हणून मग 'हा अमुक, तो तमुक' असा एकतर्फी संवाद आणि फोन हाती घेऊन 'हाय, बाय' करून ई-कट्टा साजरा झाला.
सही रे सई ह्यांनी कामाच्या जागी मिसळपाववर मुशाफिरी करताना आलेल्या विनोदी अनुभवांची उजळणी केली आणि सगळे मनमुराद हसले
जकासरांनी त्यांच्या अमेरिकेतल्या वास्तव्याविषयी आणि पुढच्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. तेवढ्यात मिपाकर नसणारे पण कट्ट्याला आलेले श्रीयुत पिलीयन रायडर आणि श्रीयुत सही रे सई हे दोन सदगृहस्थ कुठेतरी एकाच जागी काम करत होते/आहेत अशी काहीतरी ओळख निघाली आणि त्यांनाही ऐन रविवारी उठून कट्ट्याला आल्याचे मानसिक समाधान लाभले (असावे असा तर्क. चूभूद्याघ्या). अजून काही मिपाकर येणार असल्याची चर्चा चालू होती.
यथावकाश 'भोजन उरकून घेऊ' असा प्रस्ताव मांडला गेला आणि मंडळी खाणे आणायला पांगली.
[राघवेंद्र ह्यांची जबरदस्त थाळी]
भारतीय, अभारतीय पदार्थांची पंगत जमली. बर्याच दिवसांनी चांगले 'चाट' खायला मिळाल्याने मजा आली. जेवणावर गप्पा रंगल्या (रंगायच्याच).
राघवेंद्र ह्या मनुष्यकोषातून (मानविकीतून? 'ह्युमन एन्सायक्लोपीडिया' ह्यार्थी) माहितीचा ओघ वहाणे तेव्हापासून सुरु झाले (जे कट्टा संपेपर्यंत चालूच होते) जर्सीत राहणे, एकंदर अमेरिकेत काम करणे वगैरे विषय चर्चेला घेतले गेले. मीही चार-दोन शंकांचे निरसन करून घेतले.
सही रे सई ह्यांची कन्या आंबा खाताना बघून 'इथे हापूस कसा मिळवून खाता येईल' ह्यावर मौलिक चर्चा घडली.
'जॅक बावर' ह्या मिपाकरांचे तेव्हापर्यंत आगमन झाले होते, त्यांची ओळख झाली.
पलीकडे बसलेले 'मिहीर' हेही माझ्यासारखे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत हे कळले (एव्हाना माझ्या डोक्यात नावे आणि चेहरे जोडले जायला सुरवात झाली होती) आणि मग आम्हा समदुःख्यांनी उच्च शिक्षणास लागणाऱ्या प्रचंड वेळेची आणि मेहनतीची उजळणी करून शुष्क उसासे टाकले.
त्यावर (हमखास मिळणाऱ्या) सहानुभूतीचा मुखवास चघळताना मॉलच्या बाहेर कुठेतरी बागेत जायचं ठरलं आणि मंडळी निघाली.
वाटेत 'अफूची निर्यात करणारी टोळी' अजिबात वाटणार नाही अशी दक्षता घेत एक छानसा फोटो घेतला.
[डावीकडून सही रे सई, श्रीयुत सही रे सई आणि ज्युनियर सही रे सई, राघवेंद्र, जयंत कुलकर्णी, जॅक बावर, मिहिर, मी (आषाढ_दर्द_गाणे), पिलीयन रायडर आणि ज्युनियर पिलीयन रायडर]
न्यूपोर्ट ग्रीन बागेत पोचून न्यू यॉर्कच्या स्तिमित करणाऱ्या आकाशरेखेचे प्रदर्शन करणारा एक कट्टा शोधला. आसपास गगनचुंबी काचमहाल लांब, आडव्या सावल्या पाडत उभे होते. सुरजचाचू बाहेर आल्याने मस्त वाटत होतं!
पण सरतेशेवटी पलीकडे पाण्याजवळच्या गजांपाशी मंडळी उभ्याउभ्याच गोळा झाली आणि कट्टा चांगलाच रंगला.
मिपाचा इतिहास, नागरिकशास्त्र आणि काही अंशी भूगोलही चघळल्या गेला.
नवख्या मंडळींनी शंकानिरसन करून घेतले. अस्सल मर्हाटी चर्चेत सतत हास्यफवारे उडत होते. त्यावर चमकून आकृष्ट होणाऱ्या नजरांची पर्वा न करत मंडळी बडबड करत होती.
[ओव्हरएक्सपोज सेल्फीत (फ्रंट कॅमेरा हो, काही बोलायची सोय नाही!) डावीकडून मिहिर, जॅक_बावर, राघवेंद्र, मी, श्री सही रे सई, सही रे सई, जयंत कुलकर्णी, पिलीयन रायडर (फोटो नीट बसवण्यासाठी श्री. पिलियन रायडर ह्यांना हटवावे लागले. क्षमा असावी)]
पुढे मग ज्युनियर पिलीयन रायडर आणि ज्युनियर सही रे सई जिथे खेळात मग्न होते त्याजागी जाऊन, तिथे आधीच बाकड्यांवर बसलेल्यांना मोठ्याने गप्पा मारून हुसकावल्यावर मंडळी स्थानापन्न झाली. मिपावर अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या मंडळींचे कौतुक झाले. पुढच्या कट्ट्यावेळी, काव्यवाचन, कथाकथन असा काहीतरी छोटासा उपक्रम करावा अशी सूचना जकासरांनी केली, जी सगळ्यांनीच उचलून धरली. शेवटचे सेल्फी घेतले गेले.
आणि सगळं चानचान चालू असताना अचानक कट्ट्याचा वृत्तांत लिहिण्याच्या जबाबदारीचा नारळ 'तू सगळ्यात नवा सदस्य आहेस' असं म्हणत माझ्या हाती दिला गेला. ह्या धर्मसंकटात पडल्याने माझ्या मनावर आलेलं मळभ आकाशी दाटून आलं होतं.
परत मॉलपाशी येता येता जर्सीत राहण्याच्या अजून काही गमती राघवेंद्रांनी सांगितल्या. काही मंडळी आपलं आपल्या वाटेने निघाली,
चारचा सुमार झाला होता, 'डंकिन'मध्ये भारतातल्यासारखा चहा मिळतो' ही खुफिया माहिती (अजून कोण) राघवेंद्र ह्यांनी दिल्यावर अजून कट्ट्याहून निघावेसे न वाटणाऱ्या उरलेल्या मंडळींनी तिकडे मोर्चा वळवला. पण तिथे चहा संपल्याने स्टारबक्सच्या दिशेने प्रयाण केले. मग कॉफ्यांच्या निमित्ताने अजून एक लघुकट्टा झाला. शेवटी एकमेकांना नंबर देऊन परत भेटायची सदिच्छा व्यक्त करत मंडळी पांगली.
तर ह्याठिकाणी अश्याप्रकारे अज्ञातच म्हणाव्या (अर्धज्ञात?) अश्या काही मराठी व्यक्ती मिपाच्या माध्यमातून एकत्र आल्या.
वेगवेगळ्या पार्श्वभूमी असणारे, वेगवेगळ्या वयोगटाचे, वेगवेगळ्या वेळी मिपावर जोडलेले लोक, एका सामायिक सांस्कृतिक संचिताच्या (cultural capital) जोरावर दिवसभर गप्पा मारु शकले, मजेत वेळ घालवू शकले ह्याचे परतताना अप्रूप वाटत होते.
मित्रगृही आलो.
"काय रे, झाला का कट्टा? दिवसभर गप्पा मारून मजा आलेली दिसतेय!" मित्रतीर्थरूप.
"बाडीस!" मी.
- आषाढ_दर्द_गाणे

याद्या
14792
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
बेष्ट!
छान कट्टा
In reply to बेष्ट! by मिहिर
फोटू व वृत्तांत आवडला.
छान फोटो आणि वृत्तांत.
क्या बात है..
छान
तर असं झालं की चेपुवरच्या
मस्तच
मस्त!
मस्त झाला की कट्टा!
चांगलंय... मित्र मैत्रिणी
मस्तच लिहिलाय वृ! लिहिते रहा.
(पण जिलब्या पाडू नका :) )
In reply to मस्तच लिहिलाय वृ! लिहिते रहा. by यशोधरा
वाह
धन्यवाद!
In reply to वाह by श्रीरंग_जोशी
आमच्या भागातही मिपाकरांची
In reply to वाह by श्रीरंग_जोशी
+१
In reply to वाह by श्रीरंग_जोशी
अरे वा! भारी कट्टा!! भारी
धन्यवाद!
In reply to अरे वा! भारी कट्टा!! भारी by एस
फोटो आणि वृत्तांत दोन्ही भारी
भारी
छान !
त्याच्या एका संशोधनाच्या विषयावर मिपावर धागा टाकलास तर तुझा पेपर लोकंच लिहुन देतील असंही सांगितलं.ही खास पिरा स्टाईल फार आवडली !नान आणि भात
हाहा, अहो हि शंका मलाही आली
In reply to नान आणि भात by अत्रन्गि पाउस
पंजाबी भाज्या कमी खाण्यासाठी
In reply to नान आणि भात by अत्रन्गि पाउस
टिम्ब
In reply to पंजाबी भाज्या कमी खाण्यासाठी by राघवेंद्र
फेसबूकवर मिपा कट्टा लाईव
अधउन मधुन प्रतिसाद गायब होत आहेत का?
पहिलटकर असून बरं लिहीलंत की!!
टिम्ब
In reply to पहिलटकर असून बरं लिहीलंत की!! by सूड
दादा, अभ्यास वाढवला की कळेल
In reply to टिम्ब by आषाढ_दर्द_गाणे
हा #पळपुटेपणा झाला
In reply to दादा, अभ्यास वाढवला की कळेल by यशोधरा
सच्चा मिपाकर वोही जो जिलब्या
In reply to हा #पळपुटेपणा झाला by आषाढ_दर्द_गाणे
पहिलटकर कट्ट्याच्या बाबतीत
In reply to हा #पळपुटेपणा झाला by आषाढ_दर्द_गाणे
आदगा - इथे काही संदर्भ मिळतील
In reply to टिम्ब by आषाढ_दर्द_गाणे
अरे वा ! मजा आली वाचताना !
कट्ट्याची भूक लागली आता हे
In reply to अरे वा ! मजा आली वाचताना ! by मितान
भन्नाट झाला की कट्टा ! आदगा
टिम्ब
In reply to भन्नाट झाला की कट्टा ! आदगा by डॉ सुहास म्हात्रे
अरे वा! हाच काय तो फेबुवरचा लाइव्ह कट्टा?
न्यूयॉर्क कट्ट्यानंतर आम्ही
In reply to अरे वा! हाच काय तो फेबुवरचा लाइव्ह कट्टा? by बोका-ए-आझम
पुण्यात म्हणजे नक्की कुठे...
In reply to न्यूयॉर्क कट्ट्यानंतर आम्ही by सूड
विदाउट पिंचीकर
In reply to पुण्यात म्हणजे नक्की कुठे... by टवाळ कार्टा
नाही.... मी पुण्यालाच असतो...
In reply to अरे वा! हाच काय तो फेबुवरचा लाइव्ह कट्टा? by बोका-ए-आझम
जबर! हा माणूस अगदी वृत्तांत
(फेसबुकवर पहाच सरळ!)
त्यासाठी हा ग्रुप जॉइन करावा
In reply to (फेसबुकवर पहाच सरळ!) by संजय क्षीरसागर
आम्हाला जॉईन करता येईल का?
In reply to त्यासाठी हा ग्रुप जॉइन करावा by पिलीयन रायडर
हो, सर्वच मिपाकरांसाठी खुला
In reply to आम्हाला जॉईन करता येईल का? by ट्रेड मार्क
छान माहिती .
ज्जे बात!
हाहाहा एक नंबर वृत्तांत.
आणि सगळं चानचान चालू असताना अचानक कट्ट्याचा वृत्तांत लिहिण्याच्या जबाबदारीचा नारळ 'तू सगळ्यात नवा सदस्य आहेस' असं म्हणत माझ्या हाती दिला गेला. ह्या धर्मसंकटात पडल्याने माझ्या मनावर आलेलं मळभ आकाशी दाटून आलं होतं.ह्याला रॅगिंग म्हणतात. सुमडीत अडकवलं गेलं ;) मिपाकट्ट्यावर नवीन येऊन गप्पा मारणार्यांबद्दल नेहमीच कौतुक वाटतं. कालच्या माझ्या कॉलमध्ये रेंज बिंज नव्हती म्हणुन मी सुटले नाही तर अशा वेळी एक टॉपिक सुचेल बोलायला तर शपथ ! पिराचा खास अनसेन्सॉर्ड वृत्तांत मी फोनवर ऐकला आहे त्यामुळे या वृत्तांताची वाट पाहतच होते. इतरांनीही पुरवण्या जोडा पटापट.झकास आहे वृत्तांत!
झकास झकास. वॄतांत झकास.
In reply to झकास आहे वृत्तांत! by आदूबाळ
छान
जोरात झालाय कट्टा
जोर्दार कट्टा!
मस्तच......
मिपाकट्टा करू पुढच्या ट्रीपला
In reply to मस्तच...... by प्रभू-प्रसाद
प्रसादरावांचा कै उपयोग नाही.
In reply to मिपाकट्टा करू पुढच्या ट्रीपला by राघवेंद्र
तो अजून थोडेच दिवस रिकामा आहे
In reply to मिपाकट्टा करू पुढच्या ट्रीपला by राघवेंद्र
हेच म्हणतो
In reply to तो अजून थोडेच दिवस रिकामा आहे by सही रे सई
अभ्याचे लग्न ठरलेय? अभिनंदन
In reply to हेच म्हणतो by आनंदयात्री
च्यामारी, कोणाय रे ते? कैपण
In reply to अभ्याचे लग्न ठरलेय? अभिनंदन by पिलीयन रायडर
अभ्याची विवाहनोंदणी होणारे?
In reply to च्यामारी, कोणाय रे ते? कैपण by अभ्या..
आहेरपाकीट राघवाकडे जमा करणे
In reply to अभ्याची विवाहनोंदणी होणारे? by पिलीयन रायडर
:)
In reply to आहेरपाकीट राघवाकडे जमा करणे by अभ्या..
हेच म्हणतो
In reply to अभ्याची विवाहनोंदणी होणारे? by पिलीयन रायडर
*अभ्याला
In reply to हेच म्हणतो by आनंदयात्री
आयच्या गावात...
जर्सी कट्टा - २
पिराताईंचा चष्मा आवडला. एकदम
कट्टा वृत्तांत आवडला!
फोटो दिसत नाहीत.
भारी झाला आहे कट्टा. जयंत
:)
आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल
In reply to :) by मुशाफिर
नक्की..
In reply to आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल by राघवेंद्र
व्रूत्तांत तर लई झकास .