✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काही कविता अशा..तर काही तशा! - भाग १

प — पद्मावति, Sun, 04/23/2017 - 18:43
काही कविता मनात अलगद उतरतात, काही कविता अगदी खोलवर रुततात.. काही कविता हातात येता येता सूळ्ळकन निसटतात तर काही धडधडत वेगाने डोक्यावरून जातात काही मनाला पटतात तर काही पटुनही नकोशा वाटतात काही टच्चकन डोळ्यात पाणी आणणार्‍या, काही मात्र फक्त शब्द उधळणार्या... काही कविता अंतर्मुख करणार्‍या तर काही कविता सुंदर पण परकाश्या वाटणार्या काही असतात फील गुड कविता तर काही असतात 'काहीही हं' टाईप्स कविता .... काही कविता मात्र सहज समजतात, मनमोकळ्या भेटतात, लयीत गुंफतात, जिभेवर वसतात, मनात भिनतात.....या कविता 'आहा..क्या बात है' अशी उत्स्फूर्त दाद क्षणार्धात घेऊन जातात!! अशीच एक नितांत सुंदर कविता-- मिपाकर अनन्त्_यात्री यांची रचना-- 'मध्यरात्री' या सुरेख रचनेचा हिंदीत स्वैर अनुवाद करायचा मी प्रयत्न केलाय... मूळ कविता मध्यरात्री गजबजावे नभ वितळत्या चा॑दण्याने भरुनी जावा ओ॑जळीचा चषक त्या फेनिल प्रभेने मध्यरात्री सळसळावे बेट पिवळे केतकीचे भरुनी जावे आसम॑ती ग॑ध थरथरत्या तृणांचे मध्यरात्री कुजबुजावा मेघ बिलगुनी पर्वता त्या ध्वनीने विरत जावी दाट गहिरी शा॑तता मी केलेला स्वैर अनुवाद/ भावानुवाद आसमाँ में आज कुछ चहल पहल सी है चंदा की चाँदनी भी पिघली पिघली सी है रात के प्याले में फेनील सी मदिरा उमड़ती, मचलती छलकी छलकी सी है हवाओं मे केरुआ छिड़का छिड़का सा है धरतीं का आँचल भी कुछ लहका लहका सा है फिर अचानक ये हंगामा सा क्यों है मौसमका मिजाझ यूं बदला बदलासा क्यो है वादीयोँ में मची ये हलचल सी क्यो है निशब्द रात बनी तार तार सी क्यो है पर्बत के सीने से जा बादल टकराया है बिछड़ा हुआ कोई अपना जैसे घर लौटके आया है ( केरुआ- केवड़ा)

प्रतिक्रिया द्या
4140 वाचन

💬 प्रतिसाद (22)

धरतीं का आँचल भी कुछ लहका

यशोधरा
Sun, 04/23/2017 - 18:56 नवीन
धरतीं का आँचल भी कुछ लहका लहकासां हैं
क्या बात! :) सुरेख जमला आहे भावानुवाद.
  • Log in or register to post comments

माझी एखादी कविता

अनन्त्_यात्री
Sun, 04/23/2017 - 20:29 नवीन
-माझी एखादी कविता भावानुवादास योग्य वाटली हे वाचून जितक॑ बर॑ वाटल॑ त्याहीपेक्षा अधिक आन॑द आपण केलेला समर्पक व चित्रदर्शी भावानुवाद वाचून झाला! -मनाला भिडलेल्या, भावलेल्या अन मनात भिनलेल्या कवितेचा मनासारखा अनुवाद्/भवानुवाद जमेपर्य॑त कशी घालमेल होते याचा मीही अनुभव घेतलाय !
  • Log in or register to post comments

थॅंक्स यशो :)

पद्मावति
Sun, 04/23/2017 - 21:59 नवीन
थॅंक्स यशो :) अनन्त्_यात्री, तुमच्या इतक्या सुंदर कवितेचा भावनुवाद करण्याचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला हे कळवल्याबद्दल मन:पूर्वक आभार तुमचे. मनाला भिडलेल्या, भावलेल्या अन मनात भिनलेल्या कवितेचा मनासारखा अनुवाद्/भवानुवाद जमेपर्य॑त कशी घालमेल होते याचा मीही अनुभव घेतलाय ! +१
  • Log in or register to post comments

सुंदर ! भावानुवाद छान जमलाय..

स्रुजा
Mon, 04/24/2017 - 04:53 नवीन
सुंदर ! भावानुवाद छान जमलाय..
  • Log in or register to post comments

बहोत खूब!

सत्यजित...
Mon, 04/24/2017 - 05:12 नवीन
अतिशय सुरेख भावानुवाद! मालिकेची प्रस्तावनाही सुंदरच! पुलेशु.
  • Log in or register to post comments

सुंदर!!!

प्रीत-मोहर
Mon, 04/24/2017 - 10:24 नवीन
सुंदर!!!
  • Log in or register to post comments

सुंदर

मंजूताई
Mon, 04/24/2017 - 11:20 नवीन
जमलाय भावानुवाद!
  • Log in or register to post comments

मस्त जमलाय भावानुवाद

अभ्या..
Mon, 04/24/2017 - 11:45 नवीन
मस्त जमलाय भावानुवाद शेवटच्या ओळीचे उत्तर जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

वाह !

सस्नेह
Mon, 04/24/2017 - 11:52 नवीन
सुंदर अनुवाद !! 'ये रात भीगी भीगी..' या जुन्या गाण्याची आठवण झाली !
  • Log in or register to post comments

छान भावानुवाद.

एस
Mon, 04/24/2017 - 15:27 नवीन
छान भावानुवाद.
  • Log in or register to post comments

सुरेख !

सपे-पुणे-३०
Mon, 04/24/2017 - 17:27 नवीन
सुरेख ! मस्त भावानुवाद. पिघली पिघली, छलकी छलकी अशा शब्दांच्या पुनरावृत्तीमुळे मजा आली. नकळत जुन्या हिंदी सिनेगीतांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

सुरेख जमलाय भावानुवाद. अजून

अजया
Mon, 04/24/2017 - 18:05 नवीन
सुरेख जमलाय भावानुवाद. अजून कवितांच्या प्रतीक्षेत..
  • Log in or register to post comments

कविता अन् भावानुवाद, दोन्ही

प्राची अश्विनी
Mon, 04/24/2017 - 18:33 नवीन
कविता अन् भावानुवाद, दोन्ही सुरेख! अजून येऊ दे.
  • Log in or register to post comments

वा.. सुंदर भावानुवाद!

रुपी
Tue, 04/25/2017 - 02:08 नवीन
वा.. सुंदर भावानुवाद!
  • Log in or register to post comments

मस्त , आवडले.

प्रमोद देर्देकर
Tue, 04/25/2017 - 06:03 नवीन
मस्त , आवडले.
  • Log in or register to post comments

सुंदर भावानुवाद !!

स्मिता चौगुले
Tue, 04/25/2017 - 10:15 नवीन
सुंदर भावानुवाद !! बादवे तो केरुआ गाण्यातला केरुआ रंग कसला असतो असा प्रश्न इतके दिवस होता. .. ;-) आता अर्थ कळला
  • Log in or register to post comments

भावानुवाद आवडला

पैसा
Tue, 04/25/2017 - 10:23 नवीन
भावानुवाद आवडला. अजून येऊ देत.
  • Log in or register to post comments

मस्त....

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 04/25/2017 - 11:25 नवीन
हिंदी आणि उर्दू भाषां मधे प्रचंड गोडवा भरलेला आहे. या भाषांमधल्या कविता वाचताना कधी कधी डायबिटीस होईल असे वाटते. अनंत यात्रींची कविता म्हणजे देवगड हापुस होता, तर पद्मावती ताईंची कविता म्हणजे जणू दाट मलाईदार बासुंदीच. अनंत यात्रींच्या मनातुन कागदावर उतरलेल्या कवितेचा भावानुवाद तितक्याच ताकदीने झाला आहे. दोन्ही कविता अतिशय आवडल्या पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

सुदंर अनुवाद !!!

मितान
Tue, 04/25/2017 - 12:59 नवीन
सुदंर अनुवाद !!!
  • Log in or register to post comments

दोन्ही

चाणक्य
Tue, 04/25/2017 - 15:16 नवीन
रचना चांगल्या आहेत. पण मूळ कवितेत मला वाटते 'असे व्हावे, तसे व्हावे' अशी शब्दयोजना आहे आणि अनुवादात 'असे झाले आहे, तसे झाले आहे' अशी. त्यामुळे मला मूळ कविता वाचल्यावर जे भाव उमटतात, तसे अनुवाद वाचून नाही उमटले असे वाटले. तुमचा अनुवाद एक स्वतंत्र रचना म्हणून चांगलीच आहे, पण 'भावानुवाद' या कसोटीवर मला वाटले ते सांगितले. गैरसमज नसावा.
  • Log in or register to post comments

सर्वांचे खूप खूप आभार.

पद्मावति
Tue, 04/25/2017 - 16:26 नवीन
सर्वांचे खूप खूप आभार. पैजारबुआ =)) स्मिता..तो गाण्यातला शब्द गेरुआ आहे...म्हणजे नारिंगी रंग :) थोडं केरुआ विषयी सांगते. केरुआ म्हणजे केवडा असा अर्थ कुठेतरी वाचल्याचे अंधुक आठवते..पण नक्की नाही. त्यामुळे मी स्वत:लाच बेनिफिट ऑफ डाउट दिला आणि थोडीफार काव्यात्मक स्वातंत्र्य म्हणतात ते घेतलंय :) चाणक्य, धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल. तुम्हाला काय म्हणायचंय ते मी समजू शकते आणि आदर आहेच. काय झालं नं ही कविता पहिल्यांदा वाचत होते तेव्हाच इतकी आवडली आणि मनात या ओळी भरभर उलगडत गेल्या..अगदी सहजपणे. तो उत्स्फूर्तपणा तंतोतंत अनुवाद करायला गेले तर हरवून जाईल असे मला वाटले म्हणून मी थोडेफार संस्कार करून तेच शब्द, त्याच ओळी राहू दिल्या. मे बी, मी जे लिहिलंय त्याला भावानुवाद यापेक्षा स्वैर अनुवाद हा जास्ती योग्य शब्द वाटेल.
  • Log in or register to post comments

भावानुवाद सुंदर

Madhavi1992
गुरुवार, 11/02/2017 - 19:21 नवीन
भावानुवाद सुंदर
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा