Skip to main content

मन(mind)म्हणजे काय!!!!मनाची तुमची व्याख्या काय आहे???

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी बुधवार, 19/04/2017 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
मन (mind)म्हणजे काय याचा उहापोह गेली अनेक शतके चालू आहे.सुरवातीला तत्वज्ञानाचा प्रांत असलेला मनाचा अभ्यास आता न्युरोसायन्सच्या प्रगतीमुळे विज्ञानाचाही प्रांत झाला आहे.ज्याला आपण मन किंवा mind म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत जाणीव किंवा consciousness असे म्हण्टले जाते.वेगवेगळ्या धर्मांमध्ये मनाची व्याख्या केली गेली आहे.हिंदू धर्मामध्ये आत्मा ही संकल्पना आहे.प्रत्येक जीवामध्ये अभौतिक (immaterial essence)स्वरुपात आत्मा नावाची गोष्ट असते असे हिंदू धर्म मानतो.बाकीच्या धर्मातही कमीअधिक प्रमाणात अशीच व्याख्या केली गेली आहे. सतराव्या शतकात फ्रेन्च तत्वज्ञानी रेने देकार्त याने प्रथम याविषयाची सुसंगत मांडणी केली.ज्याला आज mind body problem असे म्हण्टले जाते.देकार्त हा द्वैतवादी होता.म्हणजे मन आणि शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे त्याचे म्हणने होते.विज्ञानाकडे जाणीवेचे (consciousness)कोणतेही स्पष्टिकरण नसल्याने या विषयाला अनेक शतके हात घातला गेला नाही .विसाव्या शतकात वर्तणूकशास्त्राचा(behaviorism) विज्ञानावर पगडा होता.पण यातून मनाचा कोणताच थांग लागत नव्हता.पुढे न्युरोसायन्सचा व आधुनिक इमेजिंग टेक्नॉलॉजीचा जन्म झाल्यानंतर मेंदूचा सखोल अभ्यास झाला.वेगवेगळे विचार ,भावना ,हरकती मेंदूत कुठे उगम पावतात याची सखोल माहीती मिळाली.याला neural correlates of consciousness असे म्हणतात.पण यात एक गंमत आहे.correlation is not explaination ह्या नुसार फक्त कारण शोधुन उपयोग नाही तर मानवी मनाचे पुर्ण विस्तृत असे विवरण दिले गेले पाहीजे.यात न्युरोसायन्स अपयशी ठरले आहे. Hard problem of consciousness.-- ऑस्ट्रेलीयन फिलॉसॉफर डेव्हीड चामर्स यांनी आधुनीक काळात या विषयात खुप मोठे योगदान दिले आहे.१९९६ साली अमेरिकेत centre for consciousness studies इथे प्रथमच भरलेल्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी hard problem of consciousness ही संकल्पना मांडली. काय आहे हार्ड प्रॉब्लेम? एखादा व्यक्ती निरभ्र निळ्या आकाशाकडे पहात आहे.भौतिक अनुषंगाने याचे स्पष्टीकरण करता येईल.ठराविक तरंग लांबीच्या प्रकाशलहरी त्याव्यक्तीच्या दृष्टीपटलावर(retina) आदळतात.त्याच्या दृष्टीपटलाकडून विद्युत संकेत मेंदूकडे पाठवले जातात.त्याच्या मेंदूतील दृष्टीकेंद्रात(visual cortex) चेतापेशींचे संभाषण होते(neuronal activity) व त्याला निळ्या रंगाचे आकलन होते.यात भौतिक(materialist) अनुषंगाने सगळी प्रक्रीया जरी मापली गेली तरी त्यात "निळा रंग'' कुठेच सापडणार नाही.निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही.देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे.तसे अजुनही स्पष्ट करता आलेले नाही.याला इंग्रजीत first person subjective experience असे म्हणतात व या वेगवेगळ्या अनुभुतींना qualia असे संबोधन आहे.हेच स्पर्श,चव,आवाजाची अनुभुती,विविध भावना याबाबतीतही सत्य आहे.मेंदुत घडणार्या या प्रक्रीया आपल्याला रंगाची,आवाजाची ,चवीची ,भावनेची अनुभुती का देतात हा आजच्या न्युरोसायन्स समोरचा एकमेव महत्वाचा असा प्रश्न आहे.यालाच हार्ड प्रॉब्लेम असे म्हणतात. mind डेव्हीड चामर्स यांच्या म्हणन्यानुसार कूठलही भौतिक विज्ञान आपल्याला consciousness अर्थात जाणिवेचे उत्तर देऊ शकत नाही.चामर्स यांच्या मांडणीनुसार जाणीव( consciousness)ही अवकाश ,काळ याप्रमाणेच विश्वात मुलभुत स्वरुपात आहे.याला panpsychism असे म्हणतात.यानुसार अगदी मुलभुत कणांनाही जाणिव असते(miniscule consciousness).एकदंर संपुर्ण विश्व जाणीवेने भरलेले आहे.तुम्ही हातात घेतलेला मोबाईल वा तुमच्या समोरचा काँम्प्युटरही काही प्रमाणात conscious आहे.अर्थात extraordinary claims requires extraordinary proof नुसार अजुनहि याविषयी खात्रीशीर माहीती उपलब्ध नाही. याचा अर्थ विज्ञानाने याकडे पाठ फिरवावी असे नव्हे.अमेरिकन भुलतज्ञ स्टुर्ट हॅमेरॉफ व नोबेलविजेते रॉजर पेनरोज यांनी quantum mind हा सिद्धांत मांड्ला आहे.त्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदूत पुंजपातळीवर एकत्रीत साठवलेली माहीती आहे(information stored at quantum level). इटालीयन अमेरिकन न्युरोसायंटीस्ट ग्युलिओ टोनोनी यांनी मनाची व्याख्या करताना integrated information theory मांडली आहे.सध्याची विज्ञान जगतात फार गंभिर दखल घेतलेली ही थेअरी आहे. व्यक्तीगत मला डेव्हीड चामर्स यांचा ॲप्रोच योग्य वाटत असल्याने त्याविषयी विस्तृत लिहीले आहे. बाकी तुमची मन म्हणजे काय याविषयीची मते जाणुन घ्यायला आवडेल. १.मनाची तुमची व्याख्या काय आहे? २.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय? ३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे? ४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?

वाचने 44265
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

मन म्हणजे काय
आमिर खान चा शिनेमा . . गाणी चांगली हैत.. पण स्टोरी कंटाळवाणी होती

In reply to by अद्द्या

ट फीं चा धागा आहे म्हणून हा प्रतिसाद तुमच्या कडून अपेक्षित होताच. या धाग्यावर वर पण गाण्याच्या भेंड्या सुरु होतील, अपेक्षे प्रमाणे. "कारण काय लिहलंय या पेक्षा कोणी लिहलंय याला खूप महत्व आले आहे". असो (अवांतर: "काय लिहलंय या पेक्षा कोणी लिहलंय हे महत्वाचं" अभ्या च्या टी-शर्ट मस्त वाक्य आहे नाही.)

In reply to by विशुमित

हा प्रतिसाद तुमच्या कडून अपेक्षित होताच
एकतर .. मी यांचे धागे नॉर्मली उघडत नाही .. पहिल्या ३-४ मध्ये दिसला तरच . त्यातल्या त्यात प्रतिसाद कमीच .. आणि ते सगळ्याच धाग्यावर .. त्यामुळे " तुमच्याकडून " हा शब्द च खटकतोय मला :) आणि मी कर्नाटकात वाढलो असल्यामुळे मराठी गाणी येत नाहीत. त्यामुळे इथे गाण्याच्या भेंड्या खेळत नाही मी .. ( एकुणातच गाणी लक्षात ठेऊन ती ऐनवेळी आठवणे.. हि कलाच नाहीये माझ्यात.. ) त्यामुळे तो हि मुद्दा बाद .. राहिला मुद्दा " काय लिहिलंय पेक्षा कोण लिहिलंय " वगैरे .. तर मी हा धागा कोणीही टाकला असता.. अगदी माझा स्वतःचा असता.. तरीही दिलाच असता.. " अध्यात्म , मन , ज्योतिष " इत्यादी विषय मला कधी पटले नाहीत.. ना कधी पटतील.. त्यामुळे मी शक्यतो दुर्लक्ष करतो .. किंवा अगदीच कंटाळा येत असेल अश्या पिंका टाकत असतो .. तुम्हाला आवडत नसेल.. तर इग्नोर करा.. संपादकांना आवडलं नाही तर ते उडवतीलच :) एक आठवण बारी करून दिलीत ती .. @अभ्या.. तू मला टीशर्ट पाठवणार होतास.. त्याच काय झालं ??

In reply to by अद्द्या

आदिसावकारु, तुम्ही डिझाईन सांगणार होतासा मालक, तरीबी तुला खुल्ली ऑफर आहेच की भावा. कधीबी ये, पाहिजे तितके, पाहिजे तसले शर्टं घेऊन जा.

In reply to by अभ्या..

देवा , चित्रकला परीक्षा पण कॉपी करून पास होणारा माणूस आहे मी .. घंटा डिजाईन सांगणार मी =]] तुला आवडेल ते कर .. तयार झाले कि सांग . पुढे काय ते बघूच :D

In reply to by अद्द्या

अद्द्या भाड्या, रेट कार्ड छापू का आता? क्वार्टरला टीशर्ट हापला ट्रॅक पँट खंब्याला ट्रॅक सूट छोट्या कॅणला शॉर्ट्स मोठ्या कॅणला हूडी. . लै म्हागात जाणारे बर्का आपल्याला हे. ;)

In reply to by अभ्या..

च्यायला .. मी इथे कमिशन मारून तुला अर्धी बाटली देणार होतो.. पण तू फक्त क्वार्टरला लाच शर्ट देणार.. कसा व्हायचा धंदा अश्याने

अवकाश व काळ या॑ना वेगवेगळे अस्तित्व नसून अवकाश व काळ या॑चे एकात्मिक (इ॑टिग्रेटेड) असे "दिक्काल" (स्पेस-टाईम) हे वितान (क॑टिन्युअम) मूलभूत आहे असे आधुनिक विज्ञान मानते. panpsychism नुसार "जाणीव " जर मूलभूत आहे तर ती सुद्धा याच वितानात अनुस्यूत आहे काय?

In reply to by अनन्त्_यात्री

१) अवकाश व काळ या॑ना वेगवेगळे अस्तित्व नसून अवकाश व काळ या॑चे एकात्मिक (इ॑टिग्रेटेड) असे "दिक्काल" (स्पेस-टाईम) हे वितान (क॑टिन्युअम) मूलभूत आहे असे आधुनिक विज्ञान मानते मूळात काल असं अस्तित्वात काहीही नाही. ती प्रक्रियामापनासाठी मानवानी केलेली कल्पना आहे. पण अवकाश आहे कारण त्याच्याशिवाय अस्तित्वाची निर्मिती, चलन आणि लय असंभव आहे. panpsychism नुसार "जाणीव " जर मूलभूत आहे तर ती सुद्धा याच वितानात अनुस्यूत आहे काय? जाणीव आणि अवकाश एकच आहेत. वैज्ञानिक ज्याला अवकाश म्हणतात त्याला अध्यात्मिक जाणीव म्हणतात इतकाच फरक आहे. अणुरेणियां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥ असं तुकाराम म्हणतात तेव्हा त्यांची जाणीव देहाच्या आरपार होऊन आकाशाएवढी व्यापक (अनलिमीटेड स्पेस) झालेली असते. आणि जनसामान्य जेव्हा देहातच जगतात (किंवा वैज्ञानिक प्रश्नावर फोकस करतात) तेव्हा ते व्यापक अवकाश देहबद्ध जाणीव झालेलं असतं.

In reply to by संजय क्षीरसागर

काळ हा अस्तित्वात नाही, ती एक कल्पना आहे असे ठामपणे म्हणता. मग उष्मागतिकीच्या दुसऱ्या नियमात (सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स) अंतर्भूत असलेल्या व वैश्विक स्तरावर प्रत्यक्षानुभूती ( empiricism) व सांख्यिकीय सत्यता ( स्टॅटिस्टिकल रियालिटी) या दोन्ही कसोटयांवर उतरून "सतत वृद्धिंगत होणाऱ्या वैश्विक अव्यवस्थेतून" (ever increasing entropy) प्रतीत होणाऱ्या काल-बाणाची (arrow of time ) तार्किक व्यवस्था (अर्थात मेटॅफिजिक्स व /वा अध्यात्मात न शिरता) कशी लावणार ? हां, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स किंवा एंट्रॉपी वगैरे संकल्पनाही निरर्थक किंवा काल्पनिक आहेत अशी सब-गोलन्कारी भूमिका घेतल्यास मग प्रश्नच उरणार नाही !

In reply to by संजय क्षीरसागर

काळ हा अस्तित्वात नाही, ती एक कल्पना आहे असे ठामपणे म्हणता. मग उष्मागतिकीच्या दुसऱ्या नियमात (सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स) अंतर्भूत असलेल्या व वैश्विक स्तरावर प्रत्यक्षानुभूती ( empiricism) व सांख्यिकीय सत्यता ( स्टॅटिस्टिकल रियालिटी) या दोन्ही कसोटयांवर उतरून "सतत वृद्धिंगत होणाऱ्या वैश्विक अव्यवस्थेतून" (ever increasing entropy) प्रतीत होणाऱ्या काल-बाणाची (arrow of time ) तार्किक व्यवस्था (अर्थात मेटॅफिजिक्स व /वा अध्यात्मात न शिरता) कशी लावणार ? हां, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स किंवा एंट्रॉपी वगैरे संकल्पनाही निरर्थक किंवा काल्पनिक आहेत अशी सब-गोलन्कारी भूमिका घेतल्यास मग प्रश्नच उरणार नाही !

In reply to by अनन्त्_यात्री

त्या प्रकियेच्या मोजमापाचं साधन म्हणून कालाची उपयोगिता आहे पण मुळात `काल' असं काही नाही. तुमचा हा `काल-बाण' अदृश्य आहे. तो `प्रतीत' होतो म्हणजे नक्की काय होतं? बाय द वे, एकतर तुम्ही सरळ इंग्रजीत लिहा (देवनागरीत इंग्रजी शब्द लिहीले तरी चालतील) किंवा मग मराठीत, माझं दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे. पण कृपया सरमिसळ करु नका.

In reply to by संजय क्षीरसागर

-मुळात `काल' असं काही नाही हे जरा सिद्ध करा....... केवळ बेधडक व प्रवचनी विधान नको. -काल-बाणाचे अस्तित्व विविध भौतिकीय क्षेत्रात (Thermodynamics, cosmology, weak nuclear forces, quantum mechanics) गणिताने सिद्ध झालेले आहे. काल-बाण "अदृश्य" आहे , तो प्रतित होतो म्हणजे त्याचे अस्तित्व गणितीय आकलनाच्या कक्षेत येते. प्रतित वगैरे शब्दा॑चा कीस पाडणे निरर्थक आहे. - तुमचे दोनच काय कितीही भाषांवर प्रभुत्व असू शकते, मग?

In reply to by अनन्त्_यात्री

कालासंबंधी माझं मत काहीसं संक्षि यांच्या मतासारखेच आहे. त्यामुळे कालाचे अस्तित्व विज्ञानाच्या पातळीवर मान्य झालं आहे यावर अधिक सखोल वाचायला आवडेल. तुम्ही इथे लिहिलंत तर उत्तम. नुसते Thermodynamics, cosmology, weak nuclear forces, quantum mechanics यांसारखे "बझवर्ड्स" नकोत :)

In reply to by सतिश गावडे

इट्स अ टेण्डन्सी ऑफ ट्रान्स्फॉर्मेशन. काळ आणि वेळ हे भिन्न कन्सेप्ट आहेत. वेळ हि काळ मोजायचं युनीट म्हणता येईल एकवेळ, जसं डावं-उजवं, वर-खाली हे अवकाश मोजायचं युनीट आहे. हात डाविकडुन उजवीकडे फिरला. या त्याच्या दोन अवकाशस्थ स्थिती आहेत. हात 'आधि' डाविकडे होता, 'आता' उजवीकडे आहे. या दोन कालस्थ स्थिती आहेत. स्पेस मधलं कुठलंही ट्रान्सफॉर्मेशन काळाच्या पट्टीवर देखील एस्टेब्लीश होतं. अवकाश सत्य पण काळ भ्रम हे म्हणजे किर्चॉफचा लॉ ऑफ व्होल्टेज बरोबर आहे पण लॉ ऑफ करंट भ्रम आहे असं म्हणण्यासारखं आहे. जर काळ भ्रम असेल तर अवकाश देखील भ्रम आहे... कारण अल्टीमेटली दोघेही ट्रान्स्फॉर्मशनचे अ‍ॅक्सीस आहेत. य अ‍ॅक्सीसचं इक्वेशन क्ष = ०, तर क्ष अ‍ॅक्सीसचं इक्वेशन य = ०. एकतर दोघेही खरे आहेत किंवा दोघेही खोटे.

In reply to by अर्धवटराव

एकदाच सांगतो. कळलं तर बघा. काळ हे मोजमापाचं एकक नाहि इट्स अ टेण्डन्सी ऑफ ट्रान्स्फॉर्मेशन. तेच वर सांगितलंय. बदल घडण्याला कालाची आवश्यकता नाही. घड्याळ नसेल तरी अन्न पचेल. पण पचण्यासाठी अन्न हलायला जागा (स्पेस) हवीच ! इव्हन अन्न खराब होतं म्हणजे अकुंचन पावतं असं समजलं तरी त्या हलचाली सुद्धा जागा हवीच. वेळ किंवा कालाचा प्रक्रिया घडण्याशी काहीएक संबंध नाही. वेळ हि काळ मोजायचं युनीट म्हणता येईल एकवेळ, जसं डावं-उजवं, वर-खाली हे अवकाश मोजायचं युनीट आहे. हात डाविकडुन उजवीकडे फिरला. तुमच्या फंडातच घोळ आहे. प्रक्रिया मोजायचीच नसेल आणि तिच्यासाठी (वर म्हटल्याप्रमाणे) कालाची आवश्यकताच नसेल तर वेळेला अर्थ उरत नाही. वास्तविकात काल आणि वेळ हे पर्यायवाची शब्द आहेत पण फंडा क्लिअर नसले की घोळ होतो.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्हाला काळ आणि वेळ यातला फरकच कळत नाहि म्हटल्यावर आणखी काहि टंकण्यात अर्थ नाहि. अवकाश आणि काळ एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. काळ प्रक्रिया मोजायला नव्हे तर प्रक्रिया घडायला आवष्यक असतो. अर्थात, त्याकरता सर्वप्रथम प्रक्रिया म्हणजे काय हे कळायला हवं. असो.
तुमच्या फंडातच घोळ आहे.
फंडा क्लिअर नसले की घोळ होतो.
गार्बेजशिवाय लेखणी चालतच नाहि म्हणायची. चालायचच.

In reply to by अर्धवटराव

काळ प्रक्रिया मोजायला नव्हे तर प्रक्रिया घडायला आवष्यक असतो. समजा काल काढून टाकला तर तुमचं अन्न पचणार नाही का ? अवकाश आणि काळ एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. हे कुणी सांगितलं ? अवकाशाच्या असण्याचा कालाशी काहीएक संबंध नाही. सर्वप्रथम प्रक्रिया म्हणजे काय हे कळायला हवं. तुमच्या लेखी अन्न पचन ही प्रक्रिया नाही काय ?

In reply to by संजय क्षीरसागर

समजा काल काढून टाकला तर तुमचं अन्न पचणार नाही का ?
काळ कसा काढुन टाकणार ते तर सांगा.
तुमच्या लेखी अन्न पचन ही प्रक्रिया नाही काय ?
डेफिनेटली आहे. स्थळ-काळाची मिळुन एक गंमत आहे ति. असो. काळ आणि वेळ, दोन्हि एकच आहेत, शिवाय ते मिथ्या आहे हिच तुमची धारणा असेल तर हा विषय येथेच क्लोस केलेला बरा.

In reply to by अर्धवटराव

१) काळ कसा काढुन टाकणार ते तर सांगा. काल हा तुमच्या निव्वळ कल्पनेत आहे. ती कल्पना सांडली तर काल अस्तित्वातच नाही. २) तुमच्या लेखी अन्न पचन ही प्रक्रिया नाही काय ? डेफिनेटली आहे. स्थळ-काळाची मिळुन एक गंमत आहे ति. अ) हा तुमचा काल नक्की कुठे आहे ? ब) अन्नात की पोटात ? की अन्न खालेल्या पोटात? ते एकदा क्लिअर करा. क) शिवाय तो जर अन्न खाल्यावर (प्रक्रियेनंतर) सुरु होतो असं तुमचं म्हणणं असेल तर तुमचं विधान संपूर्ण निरर्थक आहे. कारण त्याचा अर्थ काल प्रक्रियेपूर्वी ही नव्हता आणि प्रक्रिया थांबल्यावर पण नसेल. थोडक्यात, पचनक्रियेच्या मापनासाठी ती मानव निर्मित कल्पनाये हे सिद्ध होतं. ड) आणि शेवटी प्रक्रियेसाठी कालाची आवश्यकता नाही हेच ठरतं !

In reply to by संजय क्षीरसागर

एक रबरबॅण्ड डोळ्यासमोर धरा. तुमची नजर रबरबॅण्डला परपॅण्डीक्युलर आहे. रबरबॅण्डवर एक ठिपका मार्क करा. त्याला क्ष म्हणुया. आता जर रबरबॅण्ड ताणला तर त्या ठिपक्याचे प्रसरण होईल. बराच ताणला तर ओरिजन ठिपक्याच्या दोन टोकांवर दोन वेगवेगळे ठिपके नमुद करण्याचा स्कोप निर्माण होईल. त्याला क्ष१, क्ष२ म्हणुया. आता ज्या दिशेने रबरबॅण्ड ताणला त्याच दिशेने प्रक्रियेकडे बघा. प्रथम क्ष होता. मग तो क्ष१ झाला. नंतर क्ष२ झाला. क्ष१, क्ष२ मधलं अंतर आपल्याला दिसणार नाहि कारण क्ष हाच क्ष१, व तोच क्ष२ आहे. क्ष चं क्ष१, क्ष२ असं रुपांतरण म्हणजे प्रक्रिया. रबरबॅण्डची इलॅस्टीसिटी म्हणजे काळ. ति जर 'काढुन' टाकली प्रक्रियेची शक्यताच समाप्त झाली. इलॅस्टीसिटी जर प्रचंड असेल तर क्ष१, क्ष२ मधलं 'अंतर' देखील प्रचंड असेल, व्हाईसे-व्हर्सा. क्ष हा शुण्य लांबि-रुंदी-ऊंचीचा पॉईण्ट हि नाण्याची एक बाजु. त्याचं आकुंचन-प्रसरण हि नाण्याची दुसरी बाजु. कुठलिही बाजु 'काढुन' टाकली तर हाती खोटा सिक्का येतो.

In reply to by अर्धवटराव

ते क्ष, य, झ सोडा. त्या तुमच्या कल्पना आहेत. त्यांनी काहीही सिद्ध होत नाही. मी साधा प्रश्न विचारला आहे : पचन ही प्रक्रिया आहे हे तुम्हाला मान्य आहे. प्रक्रियेसाठी काल लागतो असा तुमचा दावा आहे. आता मी काय विचारलंय ते पुन्हा वाचा आणि त्या अनुरोधानं उत्तर द्या : अ) हा तुमचा काल नक्की कुठे आहे ? ब) अन्नात की पोटात ? की अन्न खालेल्या पोटात? ते एकदा क्लिअर करा. क) शिवाय तो जर अन्न खाल्यावर (प्रक्रियेनंतर) सुरु होतो असं तुमचं म्हणणं असेल तर तुमचं विधान संपूर्ण निरर्थक आहे. कारण त्याचा अर्थ काल प्रक्रियेपूर्वी ही नव्हता आणि प्रक्रिया थांबल्यावर पण नसेल. थोडक्यात, पचनक्रियेच्या मापनासाठी ती मानव निर्मित कल्पनाये हे सिद्ध होतं.

In reply to by संजय क्षीरसागर

तुमचीच नाहि तर स्वतःची देखील माफी मागितली मी मनातल्या मनात. तुमच्या प्रश्नाच्या उत्तरार्थच प्रक्रिया म्हणजे काय, त्यात अवकाश आणि काळाची भुमीका काय हे समजावुन सांगायचा प्रयत्न केला होता. ते एकदा कळालं असतं तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असती. त्या केवळ कल्पना आहेत हे ठरलं ना एकदा. मग असु द्या.

In reply to by अर्धवटराव

अन्नात, पोटात की प्रक्रियेत ? इतका साधा प्रश्न आहे. उगीच रबर घ्या, ते ताणा, त्याच्यावर अशी नजर धरा, त्याच्यावरच्या अमुक बिंदूला क्ष म्हणा तमुकला झ म्हणा....ही लफडी कशाला ? एकतर सरळ कुठे असतो ते सांगा किंवा मग तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगा. प्रश्न मिटला !

In reply to by संजय क्षीरसागर

जिथे जिथे स्पेस आहे तिथे तिथे काळ आहे. अन्नपचनाची संपूर्ण प्रक्रिया स्पेस+टाईम चं युनीक फंक्शन आहे. अन्न, त्याच्या पचनाची यंत्रणा वगैरे सर्व स्पेसचं एक रूप आहे. काळामुळे स्पेसला हि रुपांतरणं घडवणं शक्य होतं.

In reply to by अर्धवटराव

मी तुमच्या वादात पडत नाहीये. पण माझी उत्सुकता चळवली गेलीये म्हणुन विचारते (कदाचित ह्याचा पश्चाताप होऊही शकतो..) हे प्रश्न दोघांनाही आहेत. ह्या चर्चेत काळ = टाईम (साधारणतः फिजिक्स मध्ये वापरला जाणारा पॅरॅमीटर) असे मानले, तर खरंच अन्नाचे पचन ह्या प्रक्रियेमध्ये काळ हा घटक कुठे आहे? म्हणजे ह्या प्रक्रियेचं काही समीकरण बनवलं तर त्यात "काळ" हा घटक येईल का? किंवा दुसर्‍या शब्दात, अन्नाचे पचन ही प्रक्रिया "टाईम डिपेंडंट" आहे का? आणि संक्षी.. ज्या प्रक्रिया टाईम डिपेंडंट असतात त्यांचे काय? तुम्ही अनाचे पचन हे असे उदाहरण घेतले आहे ज्यात कदाचित वेळ महत्वाची नाहीये, पण जगात इतर अनेक गोष्टी आहेत ज्यात "वेळ" हा घटक प्रक्रियेला बदलु शकतो. (ह्या प्रक्रियांसाठी एक गणिती समीकरण बनवले तर त्यात काळ हा पॅरेमीटर असेल) तुम्ही दोघं ह्याच अर्थाने "काळ" हा शब्द वापरत आहात ना? की तुम्हाला काही वेगळे अभिप्रेत आहे?

In reply to by पिलीयन रायडर

काळ हा घटक सर्वत्र आहे. समजा अन्नपचन एक सिनेमा आहे. सिनेमा सुरु असताना जर काळ 'निघुन' गेला तर तुम्हाला त्या अगोदरची फ्रेम पडद्यावर कायम दिसेल. नो प्रोग्रेस इन द प्रोसेस फर्दर.

In reply to by संजय क्षीरसागर

-मुळात `काल' असं काही नाही हे जरा सिद्ध करा....... केवळ बेधडक व प्रवचनी विधान नको. -काल-बाणाचे अस्तित्व विविध भौतिकीय क्षेत्रात (Thermodynamics, cosmology, weak nuclear forces, quantum mechanics) गणिताने सिद्ध झालेले आहे. काल-बाण "अदृश्य" आहे , तो प्रतित होतो म्हणजे त्याचे अस्तित्व गणितीय आकलनाच्या कक्षेत येते. प्रतित वगैरे शब्दा॑चा कीस पाडणे निरर्थक आहे. - तुमचे दोनच काय कितीही भाषांवर प्रभुत्व असू शकते, मग?

In reply to by अनन्त्_यात्री

१) काल-बाण "अदृश्य" आहे , तो प्रतित होतो म्हणजे त्याचे अस्तित्व गणितीय आकलनाच्या कक्षेत येते. गणितीय आकलनाची कक्षा म्हणजे काय ? जर काल-बाण "अदृश्य" आहे आणि गणित ही सुद्धा मानवानं स्वतःच्या सोयीसाठी केलेली संकल्पनाच आहे तर अश्या सिद्धतेला काय अर्थ आहे ? ती केवळ मनाची समजूत आहे. मुळात `काल' असं काही नाही हे जरा सिद्ध करा.... काल ही केवळ `प्रक्रिया मापनासाठी' मानवानं योजलेली संकल्पना आहे. काल या कल्पनेचा उगम पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या एका फेरीला लागणारा वेळ (२४ तास, मग त्याची मिनीटे, त्यांचे सेकंद वगैरे) यावर बेतलेला आहे हे कुणालाही मान्य होईल. थोडक्यात, पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्याच्या एक राऊंड या प्रक्रियेची मोजणी म्हणजे २४ तास. त्यातून पुढे सगळा कालाचा पसारा झाला आहे. पण मूळात काल असं काहीही नाही. थोडक्यात काल हा भासमान आहे कारण पृथ्वी कायमच फिरते आहे त्यामुळे एकाबाजूला दिवस आणि दुसरीकडे रात्र भासते. जर मापनाचा हव्यास सोडला तर कालाला अर्थ उरत नाही. इतकी साधी गोष्ट आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

"गणित ही सुद्धा मानवानं स्वतःच्या सोयीसाठी केलेली संकल्पनाच आहे तर अश्या सिद्धतेला काय अर्थ आहे ? ती केवळ मनाची समजूत आहे." -म्हणजे एकूणच गणिताला व "द्रुश्य" नसलेल्या / अमूर्त अशा कोणत्याही गणिती स॑कल्पनेच्या सिद्धतेला अर्थ नाही कारण ती मनाची समजूत आहे. बरे झाले गणित मोडीत निघाले. आता या विषयावर अधिक चर्चा म्हणजे भिन्तीवर डोके फोडून घेणे आहे इतकी साधी गोष्ट आहे! -इत्यलम !!! -पूर्णविराम !!!!

In reply to by संजय क्षीरसागर

"गणित ही सुद्धा मानवानं स्वतःच्या सोयीसाठी केलेली संकल्पनाच आहे तर अश्या सिद्धतेला काय अर्थ आहे ? ती केवळ मनाची समजूत आहे." -म्हणजे एकूणच गणिताला व "द्रुश्य" नसलेल्या / अमूर्त अशा कोणत्याही गणिती स॑कल्पनेच्या सिद्धतेला अर्थ नाही कारण ती मनाची समजूत आहे. बरे झाले गणित मोडीत निघाले. आता या विषयावर अधिक चर्चा म्हणजे भिन्तीवर डोके फोडून घेणे आहे इतकी साधी गोष्ट आहे! -इत्यलम !!! -पूर्णविराम !!!!

In reply to by अनन्त्_यात्री

पण काल्पनिक गोष्टींना तुम्ही वास्तविक समजत असाल तर माझा नाईलाज आहे . एक तर तुमचा तो काल- बाण का काय तो 'अदृष्य! ' त्याला सिद्ध कशानं करणार तर म्हणे गणितानं ! हे म्हणजे बाण गोल आहे, गोल गणितानं सिद्ध आहे आणि गोल आहे म्हणून बाण आहे ! असा 'अदृष्य बाण' सिद्ध करण्याचा प्रकार झाला .

In reply to by संजय क्षीरसागर

अवकाश या मराठी शब्दाचा प्रचलित अर्थ "पृथ्वीभोवतालची विराट पोकळी" (इंग्रजीत space) असा आहे. तुम्ही अवकाश हा शब्द याच अर्थी वापरला असेल तर ते तत्वज्ञान/अध्यात्माच्या बरोबर असेलही, भौतिक पातळीवर ते साफ चुकीचे आहे. जाणिवेच्या कक्षा अवकाशाईतक्या रुंदावल्या हा उपमा अलंकार आहे. :)

In reply to by सतिश गावडे

@
अवकाश या मराठी शब्दाचा प्रचलित अर्थ "पृथ्वीभोवतालची विराट पोकळी" (इंग्रजीत space) असा आहे. तुम्ही अवकाश हा शब्द याच अर्थी वापरला असेल तर ते तत्वज्ञान/अध्यात्माच्या बरोबर असेलही, भौतिक पातळीवर ते साफ चुकीचे आहे. जाणिवेच्या कक्षा अवकाशाईतक्या रुंदावल्या हा उपमा अलंकार आहे. :)
››› सगा. सर , .तुम्ही सहज कळेल असं आणि वास्तविक लिहिताय. म्हणूनच ते खोटं आहे. ;) कळ्ळं ना? तेंव्हा अनाकलनीय लिहा. म्हणजे किमान आत्मभ्रमात्मक-भाव मिळेल!

छान आहे लेख! मन म्हणजे आतला आवाज..जो आपल्याला योग्य दिशा दाखवतो. मन आणि आत्मा एकमेकांना रिलेट करतात...

१.मनाची तुमची व्याख्या काय आहे? मन म्हणजे मेंदूत अविरत चाललेला दृक-श्राव्य चलतपट. अर्थात, मनाचे ( किंवा मेंदूचे) ऐच्छिक आणि अनैच्छिक असे दोन भाग आहेत. अनैच्छिक भाग हे शरीर चालवण्याचं सॉफ्टवेअर आहे आणि ऐच्छिक भाग हे विचार, अभिव्यक्ती, हालचाल आदी करण्याचं साधन आहे. उपरोक्त व्याख्या अर्थात, मेंदूच्या ऐच्छिक प्रणालीची आहे. २. आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय? आत्मा म्हणजे आपण स्वतः ! ती कल्पना नसून वस्तुस्थिती आहे. `मी नाही' असं कुणीही आणि कधीही म्हणू शकत नाही हा त्याचा पुरावाये. ३. हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे? यात प्रॉब्लम काय आहे ? अ) निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही. तो अनुभव आपण घेतो ! त्यात ज्ञात नसण्यासारखं काय आहे ? ब) देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे. देहाला अनुभव येण्यासाठी त्यात अनुभवणारा (म्हणजे आपण) हजर पाहिजे. समजा आकाशाकडे पाहतांना व्यक्ती गतप्राण झाली तर डोळे उघडे असतील, आकाश समोर असेल पण अनुभव येणार नाही. तस्मात, देहाला अनुभव येत नाही तर देहाच्या माध्यमातून आपल्याला अनुभव येतो. ४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय? हा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे. अ) देकार्तचं मूळ विधान `I think, therefore I am संपूर्णतः चुकीचं आहे. ते गाडी मागे घोडा जोडण्यासारखं आहे . वस्तुस्थितीशी सुसंगत विधान I am therefore I think असं हवं कारण आपण प्रथम आणि विचार नंतर आहे. आपण आहोत म्हणून विचार करु शकतो. विचार करु शकतो म्हणून आपण नाही. ब) बॉडी-माइंड असा सुद्धा प्रश्न कुठे आहे ? शरीर चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर हवं ते मेंदूत आहे. तस्मात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकावेळी चालू असेल तरच सिस्टम काम करेल. तद्वत, मेंदूचा ऐच्छिक भाग योग्यप्रकारे काम करत असेल तर ऐच्छिक क्रिया (चालणं, बोलणं, लिहीणं, आठवणं वगैरे) योग्य होतील.

In reply to by संजय क्षीरसागर

मनाचे ( किंवा मेंदूचे) ऐच्छिक आणि अनैच्छिक असे दोन भाग आहेत. अनैच्छिक भाग हे शरीर चालवण्याचं सॉफ्टवेअर आहे आणि ऐच्छिक भाग हे विचार, अभिव्यक्ती, हालचाल आदी करण्याचं साधन आहे.
याचा एखाद्या संदर्भ ग्रंथातील किंवा संशोधन पत्रातील संदर्भ देता का?

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

उदा. पचनसंस्था अनैच्छिक आहे तिच्यावर मेंदूचा ताबा नाही का ? आणि चालणं ऐच्छिक आहे ते मेंदूच्या मदतीनंच घडत नाही काय ?

मला प्रचंड आवडला आहे लेख. कसलं भारी लिहिलंय. जबरदस्तच. एकेक शब्द लावून वाचला. काही कळले नाही ह्याचा अर्थ जबरदस्त लिहिलंय. पुंजपातळी हा शब्द तर अगदी डोस्क्यातच बसलाय माझ्या.

१.मनाची तुमची व्याख्या काय आहे? ››› मिपावर मन१ असा आयडी आहे. तीच मना"ची व्याख्या (ख्या ख्या ख्या ख्या! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-043.gif ) २.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय? ›› http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-050.gif मीच मला अयोग्य कसा वाटेण??? ३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे? ››› दिसातून दहावेळा दिसेल त्याला ल्लूल्लूल्लूल्लूल्लू http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif करा. सगळे प्रॉब्लेम संपतील. ४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय ››› बॉडि ताब्यात तर माइंड ताब्यात! अशे आमच्या नवीपेठ तालमीचे वस्ताद न्हेमी म्हनायचे! त्ये दटावलं, म्हून सांगितलं!

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मुस कैसन बा. हे ""बॉडि ताब्यात तर माइंड तांब्यात!"" असे वाचल्या गेलय ;) स्वारी बर का ;)

ट.फि. भौ झपाटल्यागत जबरदस्त अभ्यास आहे राव तुमचा. काय तो एक एक अभ्यासपुर्ण लेख असतो तुमचा, अमेरीकन, फ्रेंच, ऑस्ट्रेलियन तत्ववेत्तयां विषयी चा काय तो अभ्यास, आम्हा पामरांना घर बसल्या बोधिसत्वाचि मेजवानि असते आपला एक एक लेख. रच्याकने, एक विचारू का ? नाहि म्हणजे प्रश्नांचि सरबत्ती असणारे आपले अभ्यासपुर्ण लेख आम्हि वाचतो, सुचेल अशा प्रतिक्रियाहि देतो पण तुम्हि नंतर काय बि कलवत नाहि, असे का ब्रे. कदाचित मिपा सशुल्क नसल्याने असे होत असावे.

मन म्हणजे काय? सर्वांत सोप्पे उत्तर इथे बघावयास मिळेल. या व्याख्येत कोणताच वाद संभवत नाही, मग अगदी संक्षींसारखे डॉन लोक्स असले तरीही.

संजय क्षीरसागर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. त्याच्याशी बहुतांश सहमत आहे. फक्त तुम्ही केलेल्या मनाच्या व्याख्येत थोडी दुरुस्ती सुचवू इच्छितो. तुम्ही म्हणता की मन म्हणजे मेंदूत अविरत चाललेला दृक-श्राव्य चलतपट. यावरून ग्रह होतो की मन आणि मेंदू एकंच आहेत. तो बऱ्याच अंशी उचित असला तरी काही अपवादात्मक परिस्थितींत मन हे मेंदूच्या बाहेरही कार्यरत असल्याचा अनुभव येतो. अवयव प्रत्यारोपणाच्या घटनांमध्ये ग्राहकास दात्याच्या आवडीनिवडी चिकटतात असं आढळून आलं आहे. इथे एक इंग्रजी लेख सापडला : http://www.telegraph.co.uk/news/health/news/11393771/The-life-saving-op… त्यामुळे मनाची व्याख्या केवळ मेंदूच्या संदर्भात करू नये, असं माझं मत पडतं. मात्र करायची झालीच तर पूर्ण शरीराच्या संदर्भात करावी म्हणून सुचवेन. नेमक्या याच कारणासाठी माझ्या मते मनाची व्याख्या 'आत्मा आणि निसर्ग यांना जोडणारा दुवा' अशी करावी. सांख्यांच्या भाषेत पुरुष आणि प्रकृती यांना सांधणारा दुवा म्हणजे मन. आ.न., -गा.पै.

हा प्रश्न जिथे उत्पन्न झाला, त्याच्या उत्तरार्थ जिथे एव्हढा सगळा उहापोह झाला ते ठिकाण म्हणजे मन.

टफिंचे काही धागे एकदम बकवास असतात तर काही टिपटॉप! कळतच नाही खरे टफि कोण आणि किती आहेत!

संजय क्षीरसागर,
थोडक्यात काल हा भासमान आहे कारण पृथ्वी कायमच फिरते आहे त्यामुळे एकाबाजूला दिवस आणि दुसरीकडे रात्र भासते. जर मापनाचा हव्यास सोडला तर कालाला अर्थ उरत नाही.
मापनाचा हव्यास सोडला तरी आपण म्हातारे होतंच असतो. या काळाचा मापनाशी संबंध नाही. तसंच काळ आभासी नाही, कारण की त्याचा प्रत्यय येतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वय शरीराला आहे जाणीवेला ( म्हणजे आपल्याला ) नाही ! कालाचा प्रत्यय कधीही येणं शक्य नाही कारण तो अस्तित्वातच नाही. प्रक्रियेचा प्रत्यय येतो . उदा. उजेड कमी झाला किंवा वाढला ( रात्र -दिवस), अमुकतमुक शरीरिक बदल झाले ( वय झाले), इथून तिथे पोहोचलो (हालचाल) वगैरे .

मला संक्षींचे "काळ" ह्या संकल्पने विषयीचे प्रतिसाद चक्क कळत आहेत ह्या धाग्यावरचे.. आणि धागाही टफिंचा आहे.. क्या बात है! फक्त... संक्षी केवळ संकल्पना मांडत असते आणि आपण स्वतः किंवा समोरचा ह्यांच्या आकलन किंवा इतर कोणत्याही "क्षमतां"बद्दल अवाक्षरही बोलत नसते तर...

In reply to by पिलीयन रायडर

प्रतिसाद चक्क कळत आहेत ह्या धाग्यावरचे.. आणि धागाही टफिंचा आहे.. क्या बात है!
तुम्ही नक्की स्वप्नात नाहीत ना ? एका खात्री करा .. काही उपाय पुढील प्रमाणे १) समोर कॉफी / चहा तत्सम एखाद वाफाळतं पेय असेल.. तर एकदा त्यात बोट घालून बघा.. २) एखादा गाणं इथे टाईप करून बघा.. त्याला उत्तर गाण्यातच मिळालं कि तुम्ही सुटलेत . ३) एकदा मिपा रिफ्रेश करून बघा.. तिसऱ्या सेकंदाला जर पेज ओपन झालं .. तर तुम्ही स्वप्नात आहेत.. जर एखादा एरर आला आणि १५-३० सेकंदास पुन्हा रिफ्रेश केल्यानंतर मिपा उघडलं.. तर तुम्ही जाग्या आहेत ..

In reply to by पिलीयन रायडर

फक्त... संक्षी केवळ संकल्पना मांडत असते आणि आपण स्वतः किंवा समोरचा ह्यांच्या आकलन किंवा इतर कोणत्याही "क्षमतां"बद्दल अवाक्षरही बोलत नसते तर... जसा प्रश्नाचा रोख तसं उत्तर ! जर मला कुणी कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला, तर मला तुमच्या संकल्पनेत बेसिकच घोळ आहे ! असंच म्हणावं लागतं नाही का ? याउलट इथलेच (किंवा कुठलेही) गामाजींचे प्रश्न आणि माझी उत्तरं वाचलीत तर डेकोरम सांभाळणं म्हणजे काय याची तुम्हालाही यथार्थ कल्पना येईल.

वर अर्धवटरावांचे म्हणने पटतेय.अ वस्तु ब मध्ये रुपांतरीत होतेय तर तिचे मापण स्पेस टाईम मध्येच होईल.त्यामुळे स्पेस टाईम कॉन्टिनम विश्वाचे मूलभूत कणा आहे हे स्पष्ट होते. पण काळाचे सर्वात छोटे मापक कीती? १ सेकंदाचे कीती भाग करता येतील? मला वाटते अनंत भाग करता येतील.जर एका सेकंदाचे अनंत भाग होत असतील तर तो सेकंद कधीच संपणार नाही.here quantum mechanics kicks in.पुंजभौतिकीत planks scale नावाचा मापक आहे.त्यानुसार प्लांक टाईम हा सर्वात छोटा काळाचा मापक आहे.यापेक्षा कमी कालावधी अस्तित्वात नाही.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

पण काळाचे सर्वात छोटे मापक कीती? १ सेकंदाचे कीती भाग करता येतील? मला वाटते अनंत भाग करता येतील.जर एका सेकंदाचे अनंत भाग होत असतील तर तो सेकंद कधीच संपणार नाही :-) इंटरेस्टींग! हे म्हणजे १ किमी अंतर मोजण्याचं दुसरं एखादं परिमाण अत्यंत सूक्ष्म असल्यानं, १ किमी अंतर कधीच संपणार नाही असं म्हणणं झालं. कदाचित अतिसूक्ष्म, नॉर्मल आणि अतिविराट अशा स्टेट्स मधले भौतिकीचे नियम म्हणूनच वेगवेगळे आहेत.

निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही. रा भि जोशी यांच्या नर्मदा परिक्रमावरील लेखातील एका अनुभवाची आठवण झाली. ते परिक्रमा करीत असताना एका डोंगरामध्ये असणाऱ्या गुहेच्या बाहेर लिहिलेले होते १० पैशात ब्रम्हदर्शन ( १९५६ सालची गोष्ट). ते १० पैशात ब्रम्हदर्शन कसे होते ते पाहण्यासाठी आत गेले तेथे एक साधू महाराज बसले होते. त्यांनी १० पैसे त्यांच्या समोर ठेवले. साधू नि त्यांना एक खडीसाखरेचा खडा दिला आणि खा म्हणाले. खडीसाखर खाल्ल्यावर विचारले कसा लागला? जोशी म्हणाले गोड लागला. गोड म्हणजे कसा? जोशी म्हणाले गोड म्हणजे कसा ते कसे सांगणार? ते स्वतः अनुभव घेऊन पाहायला लागेल. यावर साधू महाराज म्हणाले ब्रम्हदर्शनही असेच आहे. स्वतः अनुभूती झाल्याशिवाय काही नाही.