मन(mind)म्हणजे काय!!!!मनाची तुमची व्याख्या काय आहे???
मन (mind)म्हणजे काय याचा उहापोह गेली अनेक शतके चालू आहे.सुरवातीला तत्वज्ञानाचा प्रांत असलेला मनाचा अभ्यास आता न्युरोसायन्सच्या प्रगतीमुळे विज्ञानाचाही प्रांत झाला आहे.ज्याला आपण मन किंवा mind म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत जाणीव किंवा consciousness असे म्हण्टले जाते.वेगवेगळ्या धर्मांमध्ये मनाची व्याख्या केली गेली आहे.हिंदू धर्मामध्ये आत्मा ही संकल्पना आहे.प्रत्येक जीवामध्ये अभौतिक (immaterial essence)स्वरुपात आत्मा नावाची गोष्ट असते असे हिंदू धर्म मानतो.बाकीच्या धर्मातही कमीअधिक प्रमाणात अशीच व्याख्या केली गेली आहे.
सतराव्या शतकात फ्रेन्च तत्वज्ञानी रेने देकार्त याने प्रथम याविषयाची सुसंगत मांडणी केली.ज्याला आज mind body problem असे म्हण्टले जाते.देकार्त हा द्वैतवादी होता.म्हणजे मन आणि शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे त्याचे म्हणने होते.विज्ञानाकडे जाणीवेचे (consciousness)कोणतेही स्पष्टिकरण नसल्याने या विषयाला अनेक शतके हात घातला गेला नाही .विसाव्या शतकात वर्तणूकशास्त्राचा(behaviorism) विज्ञानावर पगडा होता.पण यातून मनाचा कोणताच थांग लागत नव्हता.पुढे न्युरोसायन्सचा व आधुनिक इमेजिंग टेक्नॉलॉजीचा जन्म झाल्यानंतर मेंदूचा सखोल अभ्यास झाला.वेगवेगळे विचार ,भावना ,हरकती मेंदूत कुठे उगम पावतात याची सखोल माहीती मिळाली.याला neural correlates of consciousness असे म्हणतात.पण यात एक गंमत आहे.correlation is not explaination ह्या नुसार फक्त कारण शोधुन उपयोग नाही तर मानवी मनाचे पुर्ण विस्तृत असे विवरण दिले गेले पाहीजे.यात न्युरोसायन्स अपयशी ठरले आहे.
Hard problem of consciousness.--
ऑस्ट्रेलीयन फिलॉसॉफर डेव्हीड चामर्स यांनी आधुनीक काळात या विषयात खुप मोठे योगदान दिले आहे.१९९६ साली अमेरिकेत centre for consciousness studies इथे प्रथमच भरलेल्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी hard problem of consciousness ही संकल्पना मांडली.
काय आहे हार्ड प्रॉब्लेम?
एखादा व्यक्ती निरभ्र निळ्या आकाशाकडे पहात आहे.भौतिक अनुषंगाने याचे स्पष्टीकरण करता येईल.ठराविक तरंग लांबीच्या प्रकाशलहरी त्याव्यक्तीच्या दृष्टीपटलावर(retina) आदळतात.त्याच्या दृष्टीपटलाकडून विद्युत संकेत मेंदूकडे पाठवले जातात.त्याच्या मेंदूतील दृष्टीकेंद्रात(visual cortex) चेतापेशींचे संभाषण होते(neuronal activity) व त्याला निळ्या रंगाचे आकलन होते.यात भौतिक(materialist) अनुषंगाने सगळी प्रक्रीया जरी मापली गेली तरी त्यात "निळा रंग'' कुठेच सापडणार नाही.निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही.देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे.तसे अजुनही स्पष्ट करता आलेले नाही.याला इंग्रजीत first person subjective experience असे म्हणतात व या वेगवेगळ्या अनुभुतींना qualia असे संबोधन आहे.हेच स्पर्श,चव,आवाजाची अनुभुती,विविध भावना याबाबतीतही सत्य आहे.मेंदुत घडणार्या या प्रक्रीया आपल्याला रंगाची,आवाजाची ,चवीची ,भावनेची अनुभुती का देतात हा आजच्या न्युरोसायन्स समोरचा एकमेव महत्वाचा असा प्रश्न आहे.यालाच हार्ड प्रॉब्लेम असे म्हणतात.
डेव्हीड चामर्स यांच्या म्हणन्यानुसार कूठलही भौतिक विज्ञान आपल्याला consciousness अर्थात जाणिवेचे उत्तर देऊ शकत नाही.चामर्स यांच्या मांडणीनुसार जाणीव( consciousness)ही अवकाश ,काळ याप्रमाणेच विश्वात मुलभुत स्वरुपात आहे.याला panpsychism असे म्हणतात.यानुसार अगदी मुलभुत कणांनाही जाणिव असते(miniscule consciousness).एकदंर संपुर्ण विश्व जाणीवेने भरलेले आहे.तुम्ही हातात घेतलेला मोबाईल वा तुमच्या समोरचा काँम्प्युटरही काही प्रमाणात conscious आहे.अर्थात extraordinary claims requires extraordinary proof नुसार अजुनहि याविषयी खात्रीशीर माहीती उपलब्ध नाही.
याचा अर्थ विज्ञानाने याकडे पाठ फिरवावी असे नव्हे.अमेरिकन भुलतज्ञ स्टुर्ट हॅमेरॉफ व नोबेलविजेते रॉजर पेनरोज यांनी quantum mind हा सिद्धांत मांड्ला आहे.त्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदूत पुंजपातळीवर एकत्रीत साठवलेली माहीती आहे(information stored at quantum level).
इटालीयन अमेरिकन न्युरोसायंटीस्ट ग्युलिओ टोनोनी यांनी मनाची व्याख्या करताना integrated information theory मांडली आहे.सध्याची विज्ञान जगतात फार गंभिर दखल घेतलेली ही थेअरी आहे.
व्यक्तीगत मला डेव्हीड चामर्स यांचा ॲप्रोच योग्य वाटत असल्याने त्याविषयी विस्तृत लिहीले आहे.
बाकी तुमची मन म्हणजे काय याविषयीची मते जाणुन घ्यायला आवडेल.
१.मनाची तुमची व्याख्या काय आहे?
२.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय?
३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे?
४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?
डेव्हीड चामर्स यांच्या म्हणन्यानुसार कूठलही भौतिक विज्ञान आपल्याला consciousness अर्थात जाणिवेचे उत्तर देऊ शकत नाही.चामर्स यांच्या मांडणीनुसार जाणीव( consciousness)ही अवकाश ,काळ याप्रमाणेच विश्वात मुलभुत स्वरुपात आहे.याला panpsychism असे म्हणतात.यानुसार अगदी मुलभुत कणांनाही जाणिव असते(miniscule consciousness).एकदंर संपुर्ण विश्व जाणीवेने भरलेले आहे.तुम्ही हातात घेतलेला मोबाईल वा तुमच्या समोरचा काँम्प्युटरही काही प्रमाणात conscious आहे.अर्थात extraordinary claims requires extraordinary proof नुसार अजुनहि याविषयी खात्रीशीर माहीती उपलब्ध नाही.
याचा अर्थ विज्ञानाने याकडे पाठ फिरवावी असे नव्हे.अमेरिकन भुलतज्ञ स्टुर्ट हॅमेरॉफ व नोबेलविजेते रॉजर पेनरोज यांनी quantum mind हा सिद्धांत मांड्ला आहे.त्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदूत पुंजपातळीवर एकत्रीत साठवलेली माहीती आहे(information stored at quantum level).
इटालीयन अमेरिकन न्युरोसायंटीस्ट ग्युलिओ टोनोनी यांनी मनाची व्याख्या करताना integrated information theory मांडली आहे.सध्याची विज्ञान जगतात फार गंभिर दखल घेतलेली ही थेअरी आहे.
व्यक्तीगत मला डेव्हीड चामर्स यांचा ॲप्रोच योग्य वाटत असल्याने त्याविषयी विस्तृत लिहीले आहे.
बाकी तुमची मन म्हणजे काय याविषयीची मते जाणुन घ्यायला आवडेल.
१.मनाची तुमची व्याख्या काय आहे?
२.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय?
३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे?
४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?
वाचने
44166
वाचनखूण
प्रतिक्रिया
118
तज्ज्ञांच्या प्रतिक्रियांच्या
मन म्हणजे काय
In reply to मन म्हणजे काय by अद्द्या
ट फी छान लिहलंय..!!
In reply to ट फी छान लिहलंय..!! by विशुमित
"कारण काय लिहलंय या पेक्षा
In reply to ट फी छान लिहलंय..!! by विशुमित
हा प्रतिसाद तुमच्या कडून
In reply to हा प्रतिसाद तुमच्या कडून by अद्द्या
आदिसावकारु,
In reply to आदिसावकारु, by अभ्या..
देवा ,
In reply to आदिसावकारु, by अभ्या..
मला एक "गप रांव, वशाड मेलो!!"
In reply to मला एक "गप रांव, वशाड मेलो!!" by सूड
एक ओल्ड मोंक =]]
In reply to एक ओल्ड मोंक =]] by अद्द्या
पण तो तर तुझा ब्रँड आहे ना?
In reply to पण तो तर तुझा ब्रँड आहे ना? by सूड
अभ्या पण त्यातलाच आहे ..
In reply to अभ्या पण त्यातलाच आहे .. by अद्द्या
अद्द्या भाड्या, रेट कार्ड
In reply to अद्द्या भाड्या, रेट कार्ड by अभ्या..
च्यायला .. मी इथे कमिशन मारून
In reply to एक ओल्ड मोंक =]] by अद्द्या
मला बी! एक आरसी लागू!
आणखी एक उप-प्रश्न...
In reply to आणखी एक उप-प्रश्न... by अनन्त्_यात्री
हे एकदम थोडक्यात असं आहे
अवकाश व काळ या॑ना वेगवेगळे अस्तित्व नसून अवकाश व काळ या॑चे एकात्मिक (इ॑टिग्रेटेड) असे "दिक्काल" (स्पेस-टाईम) हे वितान (क॑टिन्युअम) मूलभूत आहे असे आधुनिक विज्ञान मानतेमूळात काल असं अस्तित्वात काहीही नाही. ती प्रक्रियामापनासाठी मानवानी केलेलीकल्पनाआहे. पणअवकाश आहेकारण त्याच्याशिवाय अस्तित्वाची निर्मिती, चलन आणि लय असंभव आहे.panpsychism नुसार "जाणीव " जर मूलभूत आहे तर ती सुद्धा याच वितानात अनुस्यूत आहे काय?जाणीव आणि अवकाश एकच आहेत. वैज्ञानिक ज्याला अवकाश म्हणतात त्याला अध्यात्मिक जाणीव म्हणतात इतकाच फरक आहे.अणुरेणियां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥असं तुकाराम म्हणतात तेव्हा त्यांची जाणीव देहाच्या आरपार होऊन आकाशाएवढी व्यापक (अनलिमीटेड स्पेस) झालेली असते. आणि जनसामान्य जेव्हा देहातच जगतात (किंवा वैज्ञानिक प्रश्नावर फोकस करतात) तेव्हा ते व्यापक अवकाश देहबद्धजाणीवझालेलं असतं.In reply to हे एकदम थोडक्यात असं आहे by संजय क्षीरसागर
सन्जयजी, फारच बाळबोध आहे तुमच॑ विधान...
In reply to हे एकदम थोडक्यात असं आहे by संजय क्षीरसागर
सन्जयजी, फारच बाळबोध आहे तुमच॑ विधान...
In reply to सन्जयजी, फारच बाळबोध आहे तुमच॑ विधान... by अनन्त्_यात्री
सतत वृद्धिंगत होणारं अस्तित्व ही `प्रोसेस' आहे
मोजमापाचं साधनम्हणूनकालाची उपयोगिताआहे पण मुळात `काल' असं काही नाही. तुमचा हा `काल-बाण'अदृश्यआहे. तो `प्रतीत' होतो म्हणजे नक्की काय होतं? बाय द वे, एकतर तुम्ही सरळ इंग्रजीत लिहा (देवनागरीत इंग्रजी शब्द लिहीले तरी चालतील) किंवा मग मराठीत, माझं दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे. पण कृपया सरमिसळ करु नका.In reply to सतत वृद्धिंगत होणारं अस्तित्व ही `प्रोसेस' आहे by संजय क्षीरसागर
मुळात `काल' असं काही नाही हे ....
In reply to मुळात `काल' असं काही नाही हे .... by अनन्त्_यात्री
कालासंबंधी माझं मत काहीसं
In reply to कालासंबंधी माझं मत काहीसं by सतिश गावडे
काळ हे मोजमापाचं एकक नाहि
In reply to काळ हे मोजमापाचं एकक नाहि by अर्धवटराव
एकदम सोपी गोष्ट आहे
काळ हे मोजमापाचं एकक नाहि इट्स अ टेण्डन्सी ऑफ ट्रान्स्फॉर्मेशन.तेच वर सांगितलंय. बदल घडण्याला कालाची आवश्यकता नाही. घड्याळ नसेल तरी अन्न पचेल. पण पचण्यासाठी अन्न हलायला जागा (स्पेस) हवीच ! इव्हन अन्न खराब होतं म्हणजे अकुंचन पावतं असं समजलं तरी त्या हलचाली सुद्धा जागा हवीच. वेळ किंवा कालाचा प्रक्रिया घडण्याशी काहीएक संबंध नाही.वेळ हि काळ मोजायचं युनीट म्हणता येईल एकवेळ, जसं डावं-उजवं, वर-खाली हे अवकाश मोजायचं युनीट आहे. हात डाविकडुन उजवीकडे फिरला.तुमच्या फंडातच घोळ आहे. प्रक्रिया मोजायचीच नसेल आणि तिच्यासाठी (वर म्हटल्याप्रमाणे) कालाची आवश्यकताच नसेल तर वेळेला अर्थ उरत नाही. वास्तविकात काल आणि वेळ हे पर्यायवाची शब्द आहेत पण फंडा क्लिअर नसले की घोळ होतो.In reply to एकदम सोपी गोष्ट आहे by संजय क्षीरसागर
घड्याळ म्हणजे काळ नाहि
In reply to घड्याळ म्हणजे काळ नाहि by अर्धवटराव
.
काळ प्रक्रिया मोजायला नव्हे तर प्रक्रिया घडायला आवष्यक असतो.समजा काल काढून टाकला तर तुमचं अन्न पचणार नाही का ?अवकाश आणि काळ एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत.हे कुणी सांगितलं ? अवकाशाच्या असण्याचा कालाशी काहीएक संबंध नाही.सर्वप्रथम प्रक्रिया म्हणजे काय हे कळायला हवं.तुमच्या लेखी अन्न पचन ही प्रक्रिया नाही काय ?In reply to . by संजय क्षीरसागर
:)
In reply to :) by अर्धवटराव
काल ही तुमची कल्पना रद्द झाल्याशिवाय विषय कसा संपेल ?
काळ कसा काढुन टाकणार ते तर सांगा.काल हा तुमच्या निव्वळ कल्पनेत आहे. ती कल्पना सांडली तर काल अस्तित्वातच नाही. २)तुमच्या लेखी अन्न पचन ही प्रक्रिया नाही काय ? डेफिनेटली आहे. स्थळ-काळाची मिळुन एक गंमत आहे ति.अ) हा तुमचा काल नक्की कुठे आहे ? ब) अन्नात की पोटात ? की अन्न खालेल्या पोटात? ते एकदा क्लिअर करा. क) शिवाय तो जर अन्न खाल्यावर (प्रक्रियेनंतर) सुरु होतो असं तुमचं म्हणणं असेल तर तुमचं विधान संपूर्ण निरर्थक आहे. कारण त्याचा अर्थ काल प्रक्रियेपूर्वी ही नव्हता आणि प्रक्रिया थांबल्यावर पण नसेल. थोडक्यात, पचनक्रियेच्या मापनासाठी ती मानव निर्मित कल्पनाये हे सिद्ध होतं. ड) आणि शेवटी प्रक्रियेसाठी कालाची आवश्यकता नाही हेच ठरतं !In reply to काल ही तुमची कल्पना रद्द झाल्याशिवाय विषय कसा संपेल ? by संजय क्षीरसागर
एक उदाहरण देतो...
In reply to एक उदाहरण देतो... by अर्धवटराव
प्रश्न काय आणि उत्तर काय !
In reply to प्रश्न काय आणि उत्तर काय ! by संजय क्षीरसागर
मला क्षमा करा.
In reply to मला क्षमा करा. by अर्धवटराव
माफी कशाबद्दल ?
In reply to माफी कशाबद्दल ? by संजय क्षीरसागर
काय समजावुन सांगतोय...
In reply to काय समजावुन सांगतोय... by अर्धवटराव
अन्न पचनाच्या प्रक्रियेत काल नक्की कुठे असतो ?
In reply to अन्न पचनाच्या प्रक्रियेत काल नक्की कुठे असतो ? by संजय क्षीरसागर
काल नक्की कुठे आहे...
In reply to काय समजावुन सांगतोय... by अर्धवटराव
मी तुमच्या वादात पडत नाहीये.
In reply to मी तुमच्या वादात पडत नाहीये. by पिलीयन रायडर
पचन ह्या प्रक्रियेमध्ये काळ हा घटक कुठे आहे?
In reply to मी तुमच्या वादात पडत नाहीये. by पिलीयन रायडर
.
In reply to सतत वृद्धिंगत होणारं अस्तित्व ही `प्रोसेस' आहे by संजय क्षीरसागर
मुळात `काल' असं काही नाही हे ....
In reply to मुळात `काल' असं काही नाही हे .... by अनन्त्_यात्री
यात्री !
काल-बाण "अदृश्य" आहे , तो प्रतित होतो म्हणजे त्याचे अस्तित्व गणितीय आकलनाच्या कक्षेत येते.गणितीय आकलनाची कक्षा म्हणजे काय ? जर काल-बाण "अदृश्य" आहे आणि गणित ही सुद्धा मानवानं स्वतःच्या सोयीसाठी केलेली संकल्पनाच आहे तर अश्या सिद्धतेला काय अर्थ आहे ? ती केवळ मनाची समजूत आहे.मुळात `काल' असं काही नाही हे जरा सिद्ध करा....काल ही केवळ `प्रक्रिया मापनासाठी' मानवानं योजलेली संकल्पना आहे. काल या कल्पनेचा उगम पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या एका फेरीला लागणारा वेळ (२४ तास, मग त्याची मिनीटे, त्यांचे सेकंद वगैरे) यावर बेतलेला आहे हे कुणालाही मान्य होईल. थोडक्यात, पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्याच्या एक राऊंड या प्रक्रियेची मोजणी म्हणजे २४ तास. त्यातून पुढे सगळा कालाचा पसारा झाला आहे. पण मूळात काल असं काहीही नाही. थोडक्यात काल हा भासमान आहे कारण पृथ्वी कायमच फिरते आहे त्यामुळे एकाबाजूला दिवस आणि दुसरीकडे रात्र भासते. जर मापनाचा हव्यास सोडला तर कालाला अर्थ उरत नाही. इतकी साधी गोष्ट आहे.In reply to यात्री ! by संजय क्षीरसागर
अहाहा ! अति-सुलभिकरणाची कोला॑टीउडी पाहून भरून पावलो !
In reply to यात्री ! by संजय क्षीरसागर
अहाहा ! अति-सुलभिकरणाची कोला॑टीउडी पाहून भरून पावलो !
In reply to अहाहा ! अति-सुलभिकरणाची कोला॑टीउडी पाहून भरून पावलो ! by अनन्त्_यात्री
काय करावं हा तुमचा प्रश्न आहे
In reply to हे एकदम थोडक्यात असं आहे by संजय क्षीरसागर
अवकाश या मराठी शब्दाचा
In reply to अवकाश या मराठी शब्दाचा by सतिश गावडे
@
छान आहे लेख!
टफी, मस्त विषय आणि योग्य मांडणी
मनाची तुमची व्याख्या काय आहे?मन म्हणजे मेंदूत अविरत चाललेला दृक-श्राव्य चलतपट. अर्थात, मनाचे ( किंवा मेंदूचे) ऐच्छिक आणि अनैच्छिक असे दोन भाग आहेत. अनैच्छिक भाग हे शरीर चालवण्याचं सॉफ्टवेअर आहे आणि ऐच्छिक भाग हे विचार, अभिव्यक्ती, हालचाल आदी करण्याचं साधन आहे. उपरोक्त व्याख्या अर्थात, मेंदूच्या ऐच्छिक प्रणालीची आहे. २.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय?आत्मा म्हणजे आपण स्वतः ! ती कल्पना नसून वस्तुस्थिती आहे. `मी नाही' असं कुणीही आणि कधीही म्हणू शकत नाही हा त्याचा पुरावाये. ३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे?यात प्रॉब्लम काय आहे ? अ)निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही.तो अनुभव आपण घेतो ! त्यात ज्ञात नसण्यासारखं काय आहे ? ब)देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे.देहाला अनुभव येण्यासाठी त्यात अनुभवणारा (म्हणजे आपण) हजर पाहिजे. समजा आकाशाकडे पाहतांना व्यक्ती गतप्राण झाली तर डोळे उघडे असतील, आकाश समोर असेल पण अनुभव येणार नाही. तस्मात, देहाला अनुभव येत नाही तर देहाच्या माध्यमातून आपल्याला अनुभव येतो.४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?हा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे. अ) देकार्तचं मूळ विधान `I think, therefore I amसंपूर्णतः चुकीचं आहे. ते गाडी मागे घोडा जोडण्यासारखं आहे . वस्तुस्थितीशी सुसंगत विधानI am therefore I thinkअसं हवं कारण आपण प्रथम आणि विचार नंतर आहे. आपण आहोत म्हणून विचार करु शकतो. विचार करु शकतो म्हणून आपण नाही. ब) बॉडी-माइंड असा सुद्धा प्रश्न कुठे आहे ? शरीर चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर हवं ते मेंदूत आहे. तस्मात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकावेळी चालू असेल तरच सिस्टम काम करेल. तद्वत, मेंदूचा ऐच्छिक भाग योग्यप्रकारे काम करत असेल तर ऐच्छिक क्रिया (चालणं, बोलणं, लिहीणं, आठवणं वगैरे) योग्य होतील.In reply to टफी, मस्त विषय आणि योग्य मांडणी by संजय क्षीरसागर
मनाचे ( किंवा मेंदूचे) ऐच्छिक
In reply to मनाचे ( किंवा मेंदूचे) ऐच्छिक by वेशीवरचा म्हसोबा
इतक्या उघड गोष्टीला संदर्भाची गरज काय ?
मला प्रचंड आवडला आहे लेख.
In reply to मला प्रचंड आवडला आहे लेख. by अभ्या..
एकेक शब्द लावून वाचला
१.मनाची तुमची व्याख्या काय
In reply to १.मनाची तुमची व्याख्या काय by अत्रुप्त आत्मा
दुनिया करे
In reply to १.मनाची तुमची व्याख्या काय by अत्रुप्त आत्मा
बॉडि ताब्यात तर माइंड ताब्यात!
In reply to बॉडि ताब्यात तर माइंड ताब्यात! by सचु कुळकर्णी
@""बॉडि ताब्यात तर माइंड
ट.फि. भौ
मन म्हणजे काय? सर्वांत सोप्पे
संजय क्षीरसागर यांची मनाची व्याख्या
मन(mind)म्हणजे काय!!!!
भारी!
कालमापनाचा हव्यास
In reply to कालमापनाचा हव्यास by गामा पैलवान
गामाश्री,
In reply to गामाश्री, by संजय क्षीरसागर
कालाचा प्रत्यय कधीही येणं
मला संक्षींचे "काळ" ह्या
In reply to मला संक्षींचे "काळ" ह्या by पिलीयन रायडर
प्रतिसाद चक्क कळत आहेत ह्या
In reply to मला संक्षींचे "काळ" ह्या by पिलीयन रायडर
@ पिराबाई,
फक्त... संक्षी केवळ संकल्पना मांडत असते आणि आपण स्वतः किंवा समोरचा ह्यांच्या आकलन किंवा इतर कोणत्याही "क्षमतां"बद्दल अवाक्षरही बोलत नसते तर...जसा प्रश्नाचा रोख तसं उत्तर ! जर मला कुणी कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला, तर मला तुमच्या संकल्पनेत बेसिकच घोळ आहे ! असंच म्हणावं लागतं नाही का ? याउलट इथलेच (किंवा कुठलेही) गामाजींचे प्रश्न आणि माझी उत्तरं वाचलीत तर डेकोरम सांभाळणं म्हणजे काय याची तुम्हालाही यथार्थ कल्पना येईल.वर अर्धवटरावांचे म्हणने पटतेय
In reply to वर अर्धवटरावांचे म्हणने पटतेय by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
पण काळाचे सर्वात छोटे मापक
https://en.m.wikipedia.org
https://en.m.wikipedia.org
निळ्या रंगाची अनुभुती हा त्या
जसे सुचले तसे
संगणकविश्र्वही कविता वाचावी.* ही मेंदूची प्रक्रिया काही अंशी जनुकीय आणि त्यानंतर अनुभवातून घडत जात असावी. २.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय? सर्वसामान्य पणे आत्मा ही संज्ञा ज्या अर्थाने वापरली जाते, त्या अर्थाने योग्य वाटत नाही. याचे कारण इथे देण्यापेक्षा मी मिपा वर लिहिलेलीजीवात्माही कविता वाचावी. आत्मा या भारतीय संकल्पने मध्ये तर्कसंगती कशी नाही या विषयी त्यात मुद्दे मांडले आहेत.* आत्मा या संकल्पनेचा नवा काही अर्थ लावून त्याचा विचार करणे इथे अप्रस्तुत आहे. ३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे? 'अनुभुती का देतात' याचे उत्तर वर प्र.. १ मध्ये आले आहे. अनुभूती कशी होते हे कोडे विज्ञान सोडवू शकेल असे वाटते. ४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय? वर म्हणल्याप्रमाणे हा प्रश्न विज्ञान सोडवू शकेल असे वाटते. ता. क. १. *माझी कविता वाचावी म्हणुन हे इथे लिहिले नसून त्यातले मुद्दे इथे लागू होतात म्हणुन लिहिले आहे. २. काळ हा मानवाला प्रतीत होणारा भास आहे हे पटणे कठीण आहे. ज्यांना याविषयी खरेच जाणून घ्यायचे असेल त्यांना Quantum Theory आणि Relativity समजून घ्यावी लागेल. त्यासाठी सोप्या इंग्रजीत लिहिलेली अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. याशिवायPBS Space Timeही मालिका पहावी.In reply to जसे सुचले तसे by संदीप-लेले
छान.
In reply to छान. by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
टफी तुमचा हा धागा खरंच यशस्वी
In reply to जसे सुचले तसे by संदीप-लेले
मी फुत्कार !
आजूबाजूच्या वातावरणाचा पृथ्वीवर जगण्याच्या दृष्टीने शरीराला उपयुक्त असा अर्थ लावण्याची मेंदूची प्रक्रिया म्हणजे मन असे म्हणता येईल.सहमत आहे. एका अर्थानं मेंदूही जगण्यासाठी लागणारे निसर्गाकडून येणारे सर्व सिग्नल्स डिकोड करणारी यंत्रणा आहे. त्यामुळे व्यक्ती निसर्गानुरुप जगू शकते. पण सदर लेख हा मेंदूच्या सायकॉलॉजिकल भागावर फोकस करतो.काळ ही मानवी संकल्पना आहे आणि मनाला होणारा तो एक भास आहे असे विज्ञान मानते.१०० % सहमत ! कारण हेच मी वर म्हटलंय पण याचा वैज्ञानिक पुरावा तुमच्याकडे असेल तर कृपया द्यावा. २)आत्मा या भारतीय संकल्पने मध्ये तर्कसंगती कशी नाही या विषयी त्यात मुद्दे मांडले आहेआत्मा म्हणजे आपण ! यात काहीही विसंगती नाही. तुमचा अध्यात्माचा अभ्यास पुरेसा नसावा त्यामुळे `संकल्पना' `तर्कसंगती नाही' असे शब्द आले आहेत. (३) आणि (४) या विषयी वर लिहीलं आहे .In reply to मी फुत्कार ! by संजय क्षीरसागर
Illusion of Time
Illusion of Timeया ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल. Relativityआणि Quantum Theory ची तोंडओळख किंवा अधिक माहिती असल्यास हे समजण्यास मदत होईल.In reply to Illusion of Time by संदीप-लेले
धन्यवाद !
प्रक्रिया आणि प्रत्यय
In reply to प्रक्रिया आणि प्रत्यय by गामा पैलवान
गामाश्री,
शरीर जिवंत राहणे ही एक प्रक्रिया आहे. तिचा प्रत्यय सतत येतंच असतो. काळ अस्तित्वात नसता तर हा प्रत्यय आला नसता.कालाचा आणि जाणीवेचा काहीएक संबंध नाही. शरीर जीवंत आहे हे आपल्याला कळतं, त्यात कालाचा संबंध कुठे येतो? २)एकदा का दैहिक जीवन प्राप्त झालं की कालातीत 'मी'चं काळाशी लग्नं लागतं. मग काळाच्या इशाऱ्यावर नाचणं आलंच.हे थर्मामिटरला ताप चढला म्हणण्यासारखं आहे ! गामाजी, जाणीवेला काहीही होत नाही. काल अस्तित्वातच नाही म्हटल्यावर जाणीवेचं (म्हणजे आपलं) त्याच्याशी लग्न लागेलच कसं ? ३)यालाच निसर्गाचे नियम पाळणं म्हणतात. वस्तुत: ते काळाचे नियम आहेत. 'मी'ला काळाचे नियम धुडकावून जगण्याचं स्वातंत्र्य आहे, मात्र त्या नियमांना नाकारण्याचं स्वातंत्र्य नाही.प्रक्रियेला अनुसरुन जगणं हे सूज्ञाचं लक्षण आहे. उदा. गुरुत्वाकर्षणामुळे वस्तू खाली पडत असेल तर वरच्या मजल्यावरुन उडी घेण्यात अर्थ नाही किंवा भूक लागल्यावर जेवणं श्रेयस आहे तर भूकेशी मुकाबला करण्यात हाशिल नाही. यात कालाचा कुठेही संबंध येत नाही. ४)काळ अस्तित्वात असल्याचा आजून एक पुरावा म्हणजे सृष्टीचं अस्तित्व. सृष्टी परस्परविरोधी तत्त्वांवर चालते. विरोधविकासवाद हे सृष्टीचं मूलभूत अंग आहे. जर काळाचं अस्तित्व नसतं तर हा विरोध मुळातून निर्माण झालाच नसता.यासाठी अवकाश आणि उत्पत्ती, स्थिती आणि लयीचे नियम पुरेसे आहेत. कालाची आवश्यकता नाही. ५)काळ म्हणजे बदल. काळाखेरीज बदल संभवत नाही.आपण पुन्हा तिथेच आलो ! बदल ही प्रक्रिया आहे ती स्वयेच किंवा कुणी घडवल्यानं घडू शकते त्यासाठी कालाची आवश्यकता नाही. काल ही त्या प्रक्रियेच्या मापनासाठी योजलेली मानवी कल्पना आहे.In reply to गामाश्री, by संजय क्षीरसागर
यातील काही कामी येतं का बघा
काळ आणि जाणीव
In reply to काळ आणि जाणीव by गामा पैलवान
एकाच मुद्यात सगळं कव्हर करतो !
शुद्ध अस्तित्वाच्या जाणीवेचा काळाशी संबंध नाही. मात्र शारीरिक जाणीव काळाशीच बांधली गेलेली आहे.२)तापमापकास जर तापंच चढला नाही, तर तो काय मापणार?३)शुद्ध जाणीव आणि दैहिक जाणीव दोन्ही एकाच वेळेस नांदू शकतात.४)काळ अस्तित्वात नसता तर गुरुत्वाकर्षणही अस्तित्वात आलं नसतं. देहही अस्तित्वात आला नसता.५)ज्याअर्थी प्रक्रियेचं आवर्तन होतंय त्याअर्थी काळ अस्तित्वात आहे. रोचक गोष्ट अशी की एखाद्या आवर्तनाच्या सहाय्यानेच तो मापता येतो. अन्यथा नाही.६)उस्थिल या स्थिती काळामुळे वेगवेगळ्या भासतात. वस्तुत: अस्तित्व एकच आहे आणि ते या स्थितींपेक्षा वेगळं आहे.________________________________ मुळात जाणीव एकच आहे तिचं कोणत्याही प्रकारे विभाजन होऊ शकत नाही बोध सिद्धत्वाकडे नेतो. पण वस्तुस्थिती कायम राहाते ती म्हणजेजाणीव आकाशासारखी अविभाज्य आहे.तस्मात शारीरिक जाणीव, कालाची जाणीव, बायकोची जाणीव, कुत्रं भुंकल्याची जाणीव... हेमेंदूनं जाणीवेचं केलेलं डिकोडींग आहे. प्रक्रियांसाठी कालाची आवश्यकता नसून अवकाशाची आवश्यकता आहे. उदा. आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी त्या दोन ठिकाणातआवकाश आवश्यक आहे. काल अनावश्यक आहे. पण तो मनात इतका मुरला आहे की प्रक्रियेसाठी कालाची आवश्यकता आहे अशी आपली समजूत झाली आहे. जी गोष्ट प्रक्रियेची तीच तिच्या आवर्तनाची. उलस्थि कालामुळे वेगवेगळ्या भासतात हे योग्य आहे कारणकाल हे प्रक्रिया मापनाचं साधन आहे.. काल ही प्रक्रियेसाठी अनिवार्यता नाही.'जे आहे' त्याचा बोध होणे
कालप्रवाहातील प्रतिबिंबे
In reply to कालप्रवाहातील प्रतिबिंबे by गामा पैलवान
एकाच मूळ जाणीवेची कालप्रवाहात पडलेली प्रतिबिंबे...
In reply to कालप्रवाहातील प्रतिबिंबे by गामा पैलवान
गामाश्री,
मांडुक्योपानिषदात जाणीवेचं त्रिभाजन कसं प्रत्ययास येतं त्याविषयी श्लोक आहेत.त्याला उपनिषदाची गरज नाही. तो स्टँड असा आहे : समोर एक स्त्री आल्याची जाणीव झाली, मग मेंदूनं ती डिकोड केली आणि तुम्हाला कळलं `अरे, ही तर आपली पत्नी ! यात ट्रायो असा आहे : तुम्हीज्ञाते, पत्नी हेज्ञातआणि दोहोतला संबंध (नातं) हेज्ञान. पण हा शरीरबद्ध जाणीवेमुळे झालेला भ्रम आहे. कारण कुणाला ती स्वतःची मुलगी वाटेल (तुमचे सासू-सासरे), कुणाला बहिण (तिचा भाऊ), तर कुणाला फक्त स्त्री (त्रयस्थ). व्यावहारिक दृष्ट्या हे डिकोडींग आवश्यक आहे पण अध्यात्मिक दृष्ट्या ते अविभाज्य जाणीवेचा थांग लागू देत नाही. थोडक्यात, हे जाणीवेचं विभाजन नाही तर ते शरीरबद्ध जाणीवेतून झालेलंडिकोडींगआहे. म्हणून मी वर म्हटल्याप्रमाणे :मुळात जाणीव एकच आहे तिचं कोणत्याही प्रकारे विभाजन होऊ शकत नाही२) पुढे तुम्ही म्हटलंय :शारीरिक जाणीव, बायकोची जाणीव वगैरे एकाच मूळ जाणीवेची कालप्रवाहात पडलेली प्रतिबिंबे का समजू नयेत?आरश्यात प्रतिबींब पडायला कालाची गरज नाही. आरसा आणि व्यक्ति समोर असले की झालं! ३) अरांना मधे पडायला हरकत नाही पण मग निरुत्तर झाल्यावर ते माफीनामा सादर करतात. त्यांनी आपला गैरसमज पुन्हा उघड केला आहे :ति एकाच जाणिवेची प्रतिबिंबे आहेतच.जाणीवेत प्रतिबींब पडेल पण जाणीवेचं प्रतिबींब पडणं असंभव आहे. थोडक्यात, आरश्यात प्रतिबींब पडेल पण आरश्याचं आरश्यात प्रतिबींब पडणं अशक्य आहे.In reply to गामाश्री, by संजय क्षीरसागर
जाणीव म्हणजे काय तर येणाऱ्या
In reply to जाणीव म्हणजे काय तर येणाऱ्या by सुबोध खरे
हे पण पहाhttps://en.wikipedia
In reply to हे पण पहाhttps://en.wikipedia by सुबोध खरे
https://en.wikipedia.org/wiki
In reply to https://en.wikipedia.org/wiki by सुबोध खरे
एक राहिलच
In reply to एक राहिलच by अर्धवटराव
अरा, कमाल करता राव !
मेंदुने डिकोडींग वगैरे केल्यावर 'आपल्या'पर्यंत'बोध' आपोआप पोचतो. तिथे काहि यंत्रणा वगैरे लागत नाहि. नर्व्हससिस्टीमचं ते काम नाहि. कारण डिकिडींग मेंदुत आणि 'बोध' मेंदु बाहेरच्या 'आपल्याला'. त्याला जाणिव वगैरे म्हटलं कि झालं. सगळं कसं अॅबस्ट्रॅक्ट व्हायला हवं.मेंदूनं भूक लागल्याची जाणीव दिल्यानंतर तुम्ही काय कुणाला फोनबिन लावता का ? मेंदूनं `पत्नी' असा संदेश दिल्यावर तुम्ही गुगल सर्च मारता का ? तुमचा मेंदू आणि नर्वस सिस्टम वेगवेगळी आहेत का ? नर्वस सिस्टमची तुमची कल्पना काय आहे ? मेंदू तुम्ही नर्वस सिस्टमचाच भाग मानत नाही का ? तुमच्या माहितीसाठी ही नर्वस सिस्टमची व्याख्या :The nervous system consists of the brain, spinal cord, sensory organs, and all of the nerves that connect these organs with the rest of the body. Together, these organs are responsible for the control of the body and communication among its parts.२) आपण कायम विदेह आहोत पण तुम्हाला मनापलिकडे जगच माहिती नाही. तुमची तर इतकी हद्द आहे की `आपण' (किंवा स्व) ही तुम्हाला मनाचीच कल्पना वाटते ! स्वचा शोधच तर अध्यात्म आहे. पण तुमच्या धारणांचा चक्का इतका जाम आहे की उलगडा असंभव ! `मानतल्या मनात' मधे तुम्ही जे काय हृदगत खोललंय ते तुमच्या सर्व सायकॉलॉजिकल आणि अध्यात्मिक आकलनाचं सार आहे. तिथे तुम्ही `मन शट डाऊन करणं' वगैरेचा उपरोध करुन मला इनवाइट केलंत आणि तो गुंता सोडवता न आल्यानं आता इथेतिथे सरकास्टिक कमेंटस करतायं ! यू आर ट्राइंग इंपॉसिबल.In reply to अरा, कमाल करता राव ! by संजय क्षीरसागर
नाहि हो...
In reply to जाणीव म्हणजे काय तर येणाऱ्या by सुबोध खरे
नाहि. त्यामागे आध्यात्म आहे.
In reply to जाणीव म्हणजे काय तर येणाऱ्या by सुबोध खरे
@ डॉ खरे,
जाणीव म्हणजे काय तर येणाऱ्या संदेशांचे पृथक्करण.पण मेंदू असे पृथक्करण करण्याकडे दुर्लक्ष करेल तर जाणीव हि राहणारच नाही. उदा मेंदूच्या काही भागांना इजा झाली तर त्यांच्या कडे शरीराच्या दुसऱ्या भागाकडून(कॉन्ट्र लॅटरल) येणाऱ्या संदेशांकडे तो मेंदू दुर्लक्ष करतो. म्हणजे शरीराला जाणीव होते आणि ती मेंदूकडे पोहोचते सुद्धा पण मेंदू त्याचे काहीच करीत नाही.मेंदू हा प्रोसेसर आहे. त्यानं प्रोसेस केल्याशिवाय कोणताही स्टिम्युलस डिकोड होणार नाही. आणि तो डिकोड झाल्याशिवाय आपल्याला वस्तुस्थितीचा बोध होणार नाही. उदा. एक व्यक्ती समोर आली आणि मेंदूतली स्मृती तो सिग्नल व्यवस्थित प्रोसेस करु शकली नाही (व्यक्तीची चेहेरा ओळख आणि नांव) तर ती व्यक्ती आपली पत्नी असेल तरी आपल्या लक्षात येणार नाही ! त्यामुळे जाणीव म्हणजेयेणाऱ्या संदेशांचे पृथक्करणनाही, तर त्या पृथक्करणानंतर आपल्याला होणारा बोध ! याचा अर्थ मेंदू डिसफंक्शनल झाला तर योग्य बोध होणार नाही. पण बोध मेंदूत होत नाही, फक्त प्रोसेसिंग होतं आणि बोधआपल्यालाहोतो. त्याला जाणीव म्हटलंय. २) अरांनी सरकॅस्टीक कमेंट मारुन पुन्हा स्वतःचच हसू करुन घेतलं आहे :देहाचा/मेंदुचा 'अनुभव' घेणारे 'आपण' ठरवतो मेंदुच्या कुठल्या संदेशांना प्रोसेस करायचं ते.मेंदूनं कसं प्रोसेस करायचं ते आपण ठरवू शकत नाही. ती बायॉलॉजी आहे. तसं असतं तर अल्झायमर झालाच नसता. तद्वत, अन्न काय खायचं ते आपण ठरवू शकतो पण कसं पचवायचं ते शरीर ठरवतं. त्यामुळे अध्यात्म मेंदूच्या कुठल्या संदेशांना प्रोसेस करायचं ते ठरवत नाही तर मेंदूला नक्की काय प्रोसेस करायला द्यायचं आणि मिळालेल्या संदेशाचा काय अर्थ काढायचा याचं शास्त्र आहे. अध्यात्म कोणत्याही विज्ञानाच्या विरोधात नाही तर ती उपलब्ध विज्ञानाच्या आधारे (मग ते शरीरशास्त्र असो, फिजिक्स असो, सध्या उपलब्ध असलेल्या डिजिटल किंवा प्रिंट मधलं लेखन असो, योग शास्त्र असो की प्राणायाम......) स्वतःप्रत येण्याची प्रक्रिया आहे. डॉक्टर एक रिक्वेस्टे, मी दुवे देतही नाही आणि वाचत नाही. तुम्ही सुद्धा तुमचा अनुभव इथे सरळ मांडला तर प्रतिसाद देणं सुलभ होईल. तुमच्या सचोटीबद्दल खात्री आहे त्यामुळे लिंकची आवश्यकता नाही.In reply to @ डॉ खरे, by संजय क्षीरसागर
हा "आपण" म्हणजे नक्की कोण?
In reply to हा "आपण" म्हणजे नक्की कोण? by सुबोध खरे
@ डॉ खरे,
हा "आपण" म्हणजे नक्की कोण?तुम्ही आहात याबद्दल तुम्हाला संशय आहे का ? २)आणि तो मेंदूपासून वेगळा कसा काढणार?मेंदूला जाणणारा मेंदूपेक्षा वेगळा नाही का ? ३)पण अध्यात्म "ज्ञानाच्या शिखरावर" पोहोचले आहे हे तरी कसं मान्य करायचं? म्हणजे अध्यात्मिक लोक तास आव आणताना सर्वत्र दिसतात म्हणून म्हटले आहे.अध्यात्म करुनच त्याची शहानिशा होऊ शकते. सो, ते जाऊं द्या. ४)अध्यात्म मेंदूच्या कुठल्या संदेशांना प्रोसेस करायचं ते ठरवत नाही तर मेंदूला नक्की काय प्रोसेस करायला द्यायचं आणि मिळालेल्या संदेशाचा काय अर्थ काढायचा याचं शास्त्र आहे. हे गृहीतक आहे आणि याला पुरावा काहीच देता येत नाही. ते 'आम्ही म्हणतो म्हणून" असं कसं मान्य करायचं?अध्यात्मिक वाटेवर जायचं नाही हे तुम्ही ठरवलंय की आणखी कुणी ? एखाद्या सदस्याचं लेखन किंवा प्रतिसाद वाचायचे किंवा नाही हे कोण ठरवतं? ५)अध्यात्म हे सर्व शास्त्रांच्या "वरचं" आहे असा एक अहंभाव घेऊन असतं आणि याचा प्रतिवाद करणे कठीण असतं.जर प्रतिवाद लॉजिकल असेल तर अहंकार त्यापुढे टिकणार नाही. कारण नुसतं `मी ग्रेट' म्हणून कोण ऐकून घेईल ? ते निर्विवाद सिद्ध झालं पाहिजे. ६)बऱ्याच वेळेस भौतिक शास्त्र जाणणारे अध्यात्मिक किंवा पारलौकिक शास्त्राशी वाद नको म्हणून गप्प बसतात म्हणजे मुद्दा मान्य झाला असे नाही.इथे जगभरातले आपापल्या क्षेत्रातले माहिर लोक सदस्य आहेत. उगीच वाद नको म्हणून माघार घेतली का प्रतिवाद होऊ शकत नाही म्हणून विषय संपला याची शहानिशा लेखी, तारीख-वार आणि इतरांच्या उपस्थितीत होते. अजून काय हवं ?एक सुधारणा
नोबेलविजेते रॉजर पेनरोजरॉजर पेनरोज यांना नोबेल पुरस्कार अजून मिळालेला नाही. बाकी चालू द्या.गणित ही सुद्धा मानवानं
हे मिथ्या काय भानगड असते
असल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची
विभाजित जाणीव
साला काय मानसिक मैथुन सुरुये
In reply to साला काय मानसिक मैथुन सुरुये by स्पा
काय बोललात !
In reply to साला काय मानसिक मैथुन सुरुये by स्पा
आला गं.. बाई आला गं , बाई आला
सर्वप्रथम टफी यांचे अश्या
In reply to सर्वप्रथम टफी यांचे अश्या by बोलघेवडा
बोलघेवडाजी, मनःपूर्वक आभार्स !
चर्चा उत्तम चालू आहे पण
In reply to चर्चा उत्तम चालू आहे पण by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मी हा एक लेख लिहिला होता. तो
In reply to चर्चा उत्तम चालू आहे पण by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
हे ऑलरेडी डील झालंय !
यात प्रॉब्लम काय आहे ? अ) निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही. तो अनुभव३. हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे?आपणघेतो ! त्यात ज्ञात नसण्यासारखं काय आहे ? ब) देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे. देहाला अनुभव येण्यासाठी त्यात अनुभवणारा (म्हणजे आपण) हजर पाहिजे. समजा आकाशाकडे पाहतांना व्यक्ती गतप्राण झाली तर डोळे उघडे असतील, आकाश समोर असेल पण अनुभव येणार नाही. तस्मात, देहाला अनुभव येत नाही तर देहाच्या माध्यमातून आपल्याला अनुभव येतो. २. शिवाय तुमच्या बॉडी-माइंडचा इशू पण सोडवला आहे :४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?हा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे. अ) देकार्तचं मूळ विधान `I think, therefore I am संपूर्णतः चुकीचं आहे. ते गाडी मागे घोडा जोडण्यासारखं आहे . वस्तुस्थितीशी सुसंगत विधान I am therefore I think असं हवं कारण आपण प्रथम आणि विचार नंतर आहे. आपण आहोत म्हणून विचार करु शकतो. विचार करु शकतो म्हणून आपण नाही. ब) बॉडी-माइंड असा सुद्धा प्रश्न कुठे आहे ? शरीर चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर हवं ते मेंदूत आहे. तस्मात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकावेळी चालू असेल तरच सिस्टम काम करेल. तद्वत, मेंदूचा ऐच्छिक भाग योग्यप्रकारे काम करत असेल तर ऐच्छिक क्रिया (चालणं, बोलणं, लिहीणं, आठवणं वगैरे) योग्य होतील.विशुमीत साहेब
@ पिरा,
(कदाचित ह्याचा पश्चाताप होऊही शकतो..)जोपर्यंत तुम्ही (स्वतःच्या धारणांना किंवा तुमच्या रोल मॉडेल्सना धक्का बसल्यानं), फ्रस्ट्रेट होऊन ते माझ्यावर काढण्यासाठी, काहीबाही आणि बालीश लिहीत नाही (उदा. संक्षी सर्वज्ञ आहेत किंवा अहंकार वगैरे), तोपर्यंत काळजीचं काहीच कारण नाही. निर्धास्त राहा! आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर : १)ह्या चर्चेत काळ = टाईम (साधारणतः फिजिक्स मध्ये वापरला जाणारा पॅरॅमीटर) असे मानले, तर खरंच अन्नाचे पचन ह्या प्रक्रियेमध्ये काळ हा घटक कुठे आहे? म्हणजे ह्या प्रक्रियेचं काही समीकरण बनवलं तर त्यात "काळ" हा घटक येईल का? किंवा दुसर्या शब्दात, अन्नाचे पचन ही प्रक्रिया "टाईम डिपेंडंट" आहे का?मूळात काल (ज्याला व्यावहारात वेळ म्हणतात) असं अस्तित्वात काहीही नाही. काल ही प्रक्रिया मोजण्याची, मानव निर्मित कल्पना आहे. अर्थात, कल्पना ज्याम उपयोगी आहे पण ती वास्तविकात कुठेही नाही. तस्मात, अन्नपचनासाठी (किंवा कोणत्याही प्रक्रियेसाठी) कालाची आवश्यकताच नाही. कल्पना उपयोगी अश्या दृष्टीनं आहे की अन्न पचायला नक्की किती वेळ लागतो हे ठरवायचं असेल तर तिचा उपयोग जरूर आहे. पण खुद्द पचनासाठी काल हा घटक निरर्थक आहे. विज्ञान कायम प्रक्रियेत इंटरेस्टेड आहे ( हाऊ ?) त्यामुळे सर्वच्या सर्व वैज्ञानिकांचा (पार आइन्स्टाईन, न्यूटन ते स्टीफन हॉकींग्ज) एक गैरसमज आहे की प्रक्रिया कालाधारित आहे. वैज्ञानिक कालाशिवाय कामच करु शकत नाहीत कारण त्यांचा फोकस प्रक्रिया कशी घडते हे शोधण्यावर आहे. त्यामुळे वैज्ञानिक असं धरुनच चालतात की काल हा रुपांतरणासाठी आवश्यक घटक आहे. वास्तविकात मात्र तसं काहीही नाही.आणि संक्षी.. ज्या प्रक्रिया टाईम डिपेंडंट असतात त्यांचे काय? तुम्ही अनाचे पचन हे असे उदाहरण घेतले आहे ज्यात कदाचित वेळ महत्वाची नाहीये, पण जगात इतर अनेक गोष्टी आहेत ज्यात "वेळ" हा घटक प्रक्रियेला बदलु शकतो. (ह्या प्रक्रियांसाठी एक गणिती समीकरण बनवले तर त्यात काळ हा पॅरेमीटर असेल)प्रक्रियेची लय परिणामात बदल घडवेल पण तो त्या लयीचा अंगभूत गुणधर्म असेल त्याचा कालाशी वरकरणी संबंध जोडता येईल पण त्यामुळे कालाची वास्तविकता सिद्ध होत नाही. उदा. सावकाश चालणं आणि धावणं या दोन प्रक्रियात शरीरात वेगवेगळे बदल होतील पण तो प्रक्रियेच्या लयीचा परिणाम आहे, कालाचा नाही. किंवा धावणारा थांबला तर त्याच्या श्वासात फरक पडतो पण तो प्रक्रिया बदलामुळे आहे, वेळेमुळे नाही. ३)तुम्ही दोघं ह्याच अर्थाने "काळ" हा शब्द वापरत आहात ना? की तुम्हाला काही वेगळे अभिप्रेत आहे?काल नाही हे मला माहिती आहे त्यामुळे काल म्हणा की वेळ माझ्या दृष्टीनं दोन्हीही अस्तित्वात नाहीत. अरांना वाटतंय ( युनिवर्सल वैज्ञानिक गैरसमज) की काल का प्रक्रियेतच दडलेला आहे किंबहुना कालाशिवाय प्रक्रियाच असंभव आहे, तस्मात काल आणि प्रक्रिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि वेळ म्हणजे प्रक्रियेसाठी लागलेला कालावधी ! पण मी ऑलरेडी म्हटल्याप्रमाणे काल आशी गोष्टच या अस्तित्वात नाही त्यामुळे रुपांतरणासाठी अवकाशाची गरज आहे कालाची नाही. अस्तित्वातली सगळीच्या सगळी रुपांतरणं अवकाशात घडत राहातील त्यांचा कालाशी काहीही संबंध नाही कारण तशी काही चिज़च अस्तित्वात नाही.In reply to @ पिरा, by संजय क्षीरसागर
प्रतिक्रिया द्यायचं कारण
In reply to प्रतिक्रिया द्यायचं कारण by चतुरंग
थिअरी ऑफ रिलेटिवीटी
In 1905, Albert Einstein determined that the laws of physics are the same for all non-accelerating observers, and that the speed of light in a vacuum was independent of the motion of all observersआणि त्याचा कोअर पार्ट हा आहे :As a result, he found that space and time were interwoven into a single continuum known as space-time. Events that occur at the same time for one observer could occur at different times for another.थोडक्यात,स्पेशिओ -टाईमही आईन्स्टाईनची संकल्पना आहे (म्हणजे काल आणि अवकाश एकच आहेत) आणि ती ऑब्झर्वर रिलेटेड कन्क्लूजन्सला येते. तस्मात,आईन्सटाईन टाईम डिनाय करत नाही.त्या थोर शास्त्रज्ञांपुढे माझा काहीच पाडाव नाही. पण एकूण मुद्दा वेगळाच आहे. माझं फक्त एकच म्हणणं आहे की ज्या प्रमाणे पुजारी देव नाकारुच शकत नाही, तद्वत प्रत्येक वैज्ञानिक काल आहे हे धरुनच चालतो. आणि वास्तविकात मात्र काल नाही. फक्त अवकाश आहे आणि प्रक्रिया आहेत.In reply to थिअरी ऑफ रिलेटिवीटी by संजय क्षीरसागर
समजा आपण एखादे ताल वाद्य ऐकत
In reply to समजा आपण एखादे ताल वाद्य ऐकत by मराठी_माणूस
तेच तर मी वर म्हटलंय
In reply to तेच तर मी वर म्हटलंय by संजय क्षीरसागर
शाळेत
काल
सर्व प्रतिसाद काही वाचले नाहीत....
In reply to सर्व प्रतिसाद काही वाचले नाहीत.... by शरभ
हे तुमचे विचारेत
ज्याना हे पटत नाही त्यानी वेळ काढून (आणि काळ ठरवून) आपल्या घरातील कोनाड्यात (स्पेस) भौतिकशास्त्राचा अभ्यास वाढवावा. असल्या लोकाबरोबर कुठ्लाही प्रतिवाद केला जाणार नाही, त्यानी आपला आणि आमचा वेळ वाया घालवू नये.प्रतिवादाची इतकी भीती असेल तर प्रतिसादाचा धोकाच पत्करायचा नव्हता. आता तुम्हाला कळावा म्हणून इंग्रजीत प्रतिसाद देतो. आणि आम जनतेसाठी त्याखाली मराठीत लिहीतो. २)The in(famous) double slit experiment has thrown all the particle physics in uncertainty for the same reason. For those interested please do watch Youtube videos (such as Dr. Quantum) on double slit experiment and especially its delayed choice modifications.First of all, you do not know what is consciousness. You have based all your theory on a false assumption that mind is equal to consciousness. You don't know even logic. If mind is consciousness then who will know the mental activity ? With little intelligence & simple common sense, any one can understand that : The knower has to be separate from the known. तुम्हाला जाणीव म्हणजे काय याचा पत्ताच नाही. तुमची सर्व आधांतरी विधानं मन म्हणजे जाणीव या गृहितकावर बेतली आहेत. तुमच्याकडे तर्काचा लवलेशही नाही. जर `मन म्हणजे जाणीव' असेल तर मनात काय चालललंय हे कोण जाणतो ? थोडी फार बुद्धी आणि सामान्य ज्ञान असलेला सुद्धा ज्ञात हा ज्ञेयापेक्षा भिन्न हवा इतकी उघड गोष्ट समजू शकेल. ३)Mind in my opinion, is a logical worm- hole which opens up in the universe around us. The better one master is, better is your control on the Universe.I appreciate your guts to make such an insensible statement on a public forum ! You say that if one can control the mind, one can control the universe ! Forget about the universe, can you control your urination? or even your sneeze ? भर पब्लिकमधे तद्दन विधानं करण्याच्या तुमच्या धाडसाचं कौतुक आहे. तुम्ही म्हणता की मनावर ताबा असलेला विश्वाचं नियंत्रण करु शकतो. विश्वाचं राहूं द्या, कधी स्वतः लाच लागलेली घाईची किंवा येणारी जोरकस शिंक कंट्रोल करुन काय होतंय ते पाहा, सगळ्या विश्वाची विस्मृती होईल. 4)I am more of a believer of concept that instead of me being created in the Universe, the Universe been created in me. Honestly, this all cannot be described over few lines.My God ! You seem to have gone totally cuckoo ! When did you create the universe ? If you have created it, can you destroy it & finish with any arguments ? That will be a real proof of your audacity ! तुमचे फंडाज पुरते गंडले आहेत. तुम्ही कधी विश्व निर्माण केलं? आणि मग आता प्रतिसाद देण्याऐवजी संपूर्ण विश्वाचा संहारच घडवून का टाकत नाही ? त्यानं सर्वांनाच तुमच्या या अचाट पॉवरची सिद्धता पटेल. 5)Again, these are my thoughts and those need not be correct/accurate.They are not only utterly wrong but funny. Take care that you don't expose yourself in public again. तुमची विधानं केवळ चूकच नाहीत तर अत्यंत विनोदी आहेत. आता पुन्हा पब्लिकमधे स्वतःला जास्त उघडं करु नका. _________________________________ इथून पुढे इंग्रजी प्रतिसाद फाट्यावर मारण्यात येतील. केवळ तुम्हाला तुमच्या अज्ञानाचा बोध व्हावा म्हणून हा द्विभाषीय प्रतिसाद दिला आहे. हे मराठी संकेतस्थळ आहे आणि इथे मराठीतूनच संवाद व्हावा अशी अपेक्षा आहे.