Skip to main content

न्यू-जर्सी कट्टा: २३ एप्रिल, न्यूपोर्ट मॅाल, जर्सी सिटी, सकाळी ११ वाजता

लेखक राघवेंद्र यांनी शुक्रवार, 14/04/2017 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका हो जर्सीकर, मेरील पार्क, इजलीन इथे भेळ-कट्टा करायचा विचार आहे. अधिक पार्कची माहिती इथे मिळेल. भेळेचे साहित्य घरून आणायचे आहे. ऍक्टिव्ह आणि रोमातील मिपाकर यांनी बाहेर येऊन धाग्याला प्रतिसाद देऊन आपली उपस्थिती कळवावी. येत्या विकांताचे हवामान छान आहे त्यामुळे लवकरात लवकर तारीख निवडावी. एप्रिल १५, शनिवार सायंकाळी ४ वाजता एप्रिल १६, रविवार सायंकाळी ४ वाजता

वाचने 21206
प्रतिक्रिया 110

प्रतिक्रिया

In reply to by सही रे सई

बहुतेक २५ जणांची लिमीट आहे पण त्याला. नुसतेच लाइव्हस्ट्रीम करायचे असेल तर ustream चांगला पर्याय आहे.

न्यूपोर्ट मॉल हा उत्तम उपाय आहे.. मुख्य म्हणजे पार्किंग चा प्रश्न सुटला...:)... नक्कीच भेटू..

चला, न्यूपोर्ट मॉलात वीर आणि वीरांगना दौडूदेत सात! एक शंका, खाण्याचे काही विशेष उल्लेखनीय ऑप्शन्स नाही दिसत तिथे... म्हणजे मला काही नाही, पण शाकाहार्यांसाठी पंचाईत होऊ शकते. जाणकार काय म्हणतात ह्यावर?

In reply to by पिलीयन रायडर

ओह अच्छा, बरंच काही मिळतं असं दिसतंय #पडलोतोंडघशी रच्याकने, आख्खा तीनबायतीन कोलाज न टाकता निव्वळ 'आहेत बरेच पर्याय' म्हटलं असतं तरी चाललं असतं =)) #कर्बयुअरएंथ्युझियाझम #आवरा

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

या मॉलमधे पहील्या माळ्यावर एक फुडकोर्ट आहे. तीथे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. चिकन तेरीयाकी हा एक बर्‍यापैकी मिळणारा आणि परवडणारा प्रकार आहे. दुपारी जेवणाच्या वेळेत गेलात तर तीथल्या हाफीसातल्या लोकांना जेवायला एक मोठी जागा आहे तीथे भारतीय जेवणही मिळते. बाजुलाच हडसन नदी आहे तीथे जाउन या. काही वर्षापूर्वी त्या नदीवर एका विमानाचे आपात्कालीन लँडींग झाले होते. जे लोक पाथ रेल्वेने जाणार असतील ते पुढे जाउन ३३ स्ट्रीटला जाउन न्युयोर्कमधील काही प्रेक्षणीय स्थळे बघू शकतात.

चेपू वरती व्हिडीओ कॉल्लिंग सुरु झालेले दिसतय.. कोणी आधी वापरलं आहे का? इथे अधिकची माहिती मिळू शकेल http://www.theverge.com/2016/12/19/14006752/facebook-messenger-group-vi…

आता जर २३ तारीख, ठिकाण आणि वेळ नक्की झाली असेल तर धाग्याच्या नावात बदल करायला पाहिजे, नई का?

In reply to by पिलीयन रायडर

मॉल मध्ये कुठे ? फूड कोर्ट AMC सिनेमा च्या समोर असे काही तर असायला हवे .

In reply to by राघवेंद्र

हो की! मागच्या वेळेसारखे नको व्हायला! वातावरण चांगले असेल तर? मग बागेत जायचे आहे ना? १. मॉलच्या पाथ स्टेशनच्या बाजुने - चिपोतले समोर २. मॉलच्या पार्किंगच्या बाजुने - तिसर्‍या मजल्यावर फुडकोर्ट वर - ए.एम.सी समोर असे दोन पर्याय ठेवु. पण बागेत जायचे असेल तर २रा पर्याय कटकटीचा आहे.

In reply to by पिलीयन रायडर

पावसाचा अंदाज ७०% वरून ९०% झाला आहे. त्यामुळॆ न्यू पोर्ट ग्रीनला विचार मॉल मध्ये आल्यावर करू.

In reply to by राघवेंद्र

वातावरण चांगलं असेल तर आधी ३ र्‍या मजल्यावर जाऊन मग बागेत जाऊन परत खायला यायचं की आधी निवांत खाऊन पिऊन मग वाटलं तर बागेत जायचंय?!

रविवारचे वातावरण मस्त होत आहे. पाऊस नसेल बहुतेक. त्यामुळे कट्टा जोरात होऊन जाऊदे.

In reply to by राघवेंद्र

अगदी अगदी.. मी कालपासून बघत आहे तर पाऊस हळूहळू कमी होऊन अता तर दिसेनासा च झाला.. मी आणि माझा नवरा मुलगी थोडेसे उशीरा पोहोचू.. साधारण ११:३० - १२ पर्यंत.

वाह! कट्ट्याला आगामी शुभेच्छा राखून ठेवल्या जात आहेत. सचित्र वृत्तांत आला की मग मिपाच्या परंपरेनुसार तेव्हा दिल्या जातील! :-P

कट्ट्याला खुप सार्‍या शुभेच्छा ! ई कट्ट्याला हजर राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. पिराकडे माझे सगळे डिटेल्स आहेतच.

तर मंडळी, उद्या म्हणजे रविवारी सकाळी ११ वाजता न्यू पोर्ट मॉल मध्ये AMC सिनेमा समोर फूड कोर्ट मध्ये भेटू.

धन्यवाद उपस्थित आणि इ-उपस्थित मिपाकर !!! कट्टा जोरदार झाला आणि आता वृंतान्तातची प्रतीक्षा. सूर्याजीपंत आणि नूमविय तुमची अनुपस्थिती जाणवली.

काही कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागल्याने कट्टा चुकला ... रुख रुख राहील जोपर्यंत परत कट्टा होत नाही....

येणार येणार... वृतांत लवकरच येणार..! नवमिपाकर आषाढ दर्द गाणे ह्यांना घोड्यावर बसवण्यात आलेले आहे! @ अभ्या - फेसबुकवर "मिपाकर" असा ग्रुप आहे. त्यात आम्ही लाईव्ह गेलो होतो. तिथे तुला पिरा नावाचा माणुस दिसेल!!

In reply to by पिलीयन रायडर

येणार येणार... वृतांत लवकरच येणार..! नवमिपाकर आषाढ दर्द गाणे ह्यांना घोड्यावर बसवण्यात आलेले आहे!
उतरलेलो आहे. वृत्तांत इथे वाचा.