Skip to main content

न्यू-जर्सी कट्टा: २३ एप्रिल, न्यूपोर्ट मॅाल, जर्सी सिटी, सकाळी ११ वाजता

लेखक राघवेंद्र यांनी शुक्रवार, 14/04/2017 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका हो जर्सीकर, मेरील पार्क, इजलीन इथे भेळ-कट्टा करायचा विचार आहे. अधिक पार्कची माहिती इथे मिळेल. भेळेचे साहित्य घरून आणायचे आहे. ऍक्टिव्ह आणि रोमातील मिपाकर यांनी बाहेर येऊन धाग्याला प्रतिसाद देऊन आपली उपस्थिती कळवावी. येत्या विकांताचे हवामान छान आहे त्यामुळे लवकरात लवकर तारीख निवडावी. एप्रिल १५, शनिवार सायंकाळी ४ वाजता एप्रिल १६, रविवार सायंकाळी ४ वाजता

वाचने 21206
प्रतिक्रिया 110

प्रतिक्रिया

लाईट्निंग स्पीडने आणलात की धागा!! भेळेचे सामान आणुयात की भेळच करुन आणुयात? की ज्याला जे जमेल ते आणुया आणि ते एकत्र करुन त्याला भेळ म्हणुया!? मला कोणतीही तारिख चालेल.

कट्ट्याला शुभेच्छा ! सचित्र वर्णन येईलच, त्याची प्रतिक्षा आहे.

मी आणि आमचे कुटुंब नक्की ...तारीख कोणतीही चालेल

आधी कळले असते तर सहज येऊ शकलो असतो. असो. कट्ट्यासाठी शुभेच्छा. भेळ वगैरे म्हणजे काय ऐश आहे!

न्यू राघवेंद्र भय्या भेळ सेंटर, न्यूजर्सी. आमच्या इथे पावचटनी,भेळ, पाणीपुरी, कचोरी,स्पेशल दहिवडा मिळेल. . . आणि गाड्यात नहेरु शर्ट पायजाम्यावर बसलेला राघवभय्या. . ओ तै, स्पेशल करू का भेळ?

In reply to by अभ्या..

अरे अभ्या, कर चेष्टा लेका!!! पाव-चटणी खाऊन बरीच वर्षे झाली आहेत आणि त्याची आठवण काढू नकोस. हरिभाई ला १०० वर्षे झाली मला पावचटणी ला मिळाली नाही म्हणून वाईट वाटते. काय ते शाळेचे संस्कार .... भेळेमुळे लोक धाग्याला प्रतिसाद द्यावेत असा हेतु आहे.

या वर्षी तरी काही करून मिपा कट्ट्याला हजेरी लावायचीच असं ठरवलं होत. खरंतर मीच एक धागा काढणार होते. पण.. हा पण फार वाईट आहे.. हा धागा आला तेव्हा मस्त वाटल.. आणि तारखा बघून थोड वाईट.. इतक्या अचानक आणि कमी वेळ असताना या तारखा आल्या आहे. मला दिसतंय की छान हवामानामुळे कट्टा या तारखांना ठरवला गेला असावा. काही इतर कार्यक्रम आधीच ठरले आहेत. तरी प्रयत्न करून बघते. कट्ट्याला शुभेच्छा. अजून एखादा कट्टा मे जून मधे इकडे connecticut मधे करायचा विचार आहे. कोणाला जमेल का यायला?

उद्या एप्रिल १५ ला संध्यकाळी ४ वाजता आपण सर्व जण मेरील पार्क मध्ये मुलांची खेळणी असलेल्या भागातील बेंच वर भेटू. माझा मोबाईल नंबर व्यक्तिगत संदेशातून कळवेल.


आता आठ दिवस सुट्टी असल्यानं मोठ्या आशेनं तारखा बघितल्या, पण................लगेच उद्या काऽऽऽय........कसं जमवायचं माणसानं. ते कनेटिकटवाले येऊन नाही र्‍हायले तर आम्हाला कसं जमावं?

In reply to by रेवती

आम्ही येऊन राहिलो बघा रेवती तै.. आणि कट्टा पण पुढे ढकलला आहे.. तरी येण्याचे करावे ही विनंती.. नव्हे आग्रहच..

नम्स्कार ! मला कोणीतरी लिफ्ट देतील अशी आशा आहे आणि विनंतीही आहेच....

In reply to by जयंत कुलकर्णी

अजिबात चिंता करु नका... राघवेंद्र करतीलच काही तरी =)) आता @बाकी सगळे... पुढच्या वीकांताला कट्टा केला तर याल का? कोण कोण येऊ शकेल? मला जमणार आहेच. हवामान वाईट असले तर विचार करु त्याचा. इनडोअर कट्टा जमेल का ते पाहु. पण तुम्ही लोक नक्की येणार असाल तरच...

बॅाम्बे टाॅक जवळच आहे. तिकडे वडापाव, भेळ मस्त मिळेल. घरुन आणायला किती जण तयार असतील?? जयंत काका, तुम्ही या माझ्या बरोबर.

In reply to by राघवेंद्र

हो मग खादाडीची सोय जवलच असेल तर राहु देत मग! तिथेच जाऊया! डन मग! उद्या संध्याकाळी ४ वाजता भेटु!

पुढच्या म्हणजे २१-२२ येप्रिल? येऊ शकतो. नक्की कळवा काय ते. आणि जमल्यास न्यूयॉर्कमधून सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी पटकन पोचता येईल अश्या ठेवल्यास अधिक सुलभ होईल. उत्तराच्या प्रतीक्षेत.

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

तू उठ आत्ता आणि ये! रेवाक्काला तरी लोकांना जेवु घालायचंय.. पुढच्या आठवड्यात मेजोरिटीला जमणार असेल तर करु. सईबाई येणार का? राघवेंद्र, तुमचे काय मत?

In reply to by पिलीयन रायडर

पुढच्या आठवड्यात शनिवारी जमेल. म्हणजे अजून एक कट्टा ठरवायचं म्हणत आहात कि हाच कट्टा पुढे ढकलायचा म्हणत आहात ?

In reply to by सही रे सई

आमाला पावर नाय! =)) उद्या सकाळी लोक मला उचलून (म्हणजे, pickup करून) क्रिकेट खेळायला नेणारेत आणि मग दुपारी आलो की आयकर भरायचे कंटाळवाणे काम आहे. तेव्हा उद्याचे नाय जमणार. परवाचं.... नको, धावपळ होईल फार फूडच्या शनिवारचं बघा की....

In reply to by सही रे सई

एक चांगला उन्हाळी कट्टा नियोजन करून करू. त्यात सगळ्यांना सामील करता येईल. जयंत काकांना उद्या भेटू !!!

बरेच मिपाकर पुढच्या विकांताला भेटू म्हणत आहेत. तर पुढील आठवड्याची तारीख नक्की करा आणि उद्याचा कट्टा पुढील आठवड्यात नक्की करू. ४/२२ - सकाळी ४/२२- संध्याकाळी ४/२३- सकाळी ( CT , MA , DC ,PA , VA च्या मिपाकरांच्या सोयोयीचे) ४/२३ - संध्याकाळी कृपया लवकर प्रतिसाद द्या

In reply to by राघवेंद्र

बापरे, म्हंजे आता यावेच लागेल :प बा/तेवीस काहीही चालेल... ठिकाण ठरवा आणि कळवा

मग काय तिकडे (इर्शाद आहे तिथे) करायचा का कट्टा? मला चालेल. मिपासाठी मुलाखत घेऊ हवं तर सादरकर्त्यांची :D

काय ठरलं नक्की? अच्छा, मला ना शक्यतो तेवीस चालेल २२ ला काम आहे जरा

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

मलाही २३ जास्त चांगली वाटतेय. इर्शादला जायचं असेल ते जातील. मला तर ते जमणार नाहीये. स्रुजा पण प्रयत्न करणारे!!!! इस्ट कोस्ट कट्टा होतोय हा मस्त!!

In reply to by पिलीयन रायडर

माझा प्रयत्न फेल होणारे. मी कालच तिकीटं बघत होते. एक तर ४०० $ वगैरे ला जातायेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला थेट विमान मिळत नाहीये. ७ तासांचा प्रवास होतोय विमानाने तो ही एकीकडे. जेमतेम दिड तासाचा प्रवास आहे जर थेट विमान मिळालं अस्तं तर. त्यामुळे कट्ट्याला कोरड्या शुभेच्छा देऊन गप बसावं लागणारे :(

मी न्यू हॅम्पशायर आणि मास्सेचूसेट्स च्या सीमेवर (नाशुहा) राहतो. मिसळपाव चा नियमित वाचक आहे. या भागात कुणी मिपाकर असतील तर त्यांच्या संपर्कात यायला आवडेल.

अधिक आगाऊ सूचना असती तर बरे झाले असते. लांब असले तरी पुढील वेळी नक्की प्रयत्न करेन... ई-भेट शक्य आहे का? -समर्पक कोलोरॅडोकर

समर्पक, कट्टा करायला आम्ही केंव्हाही तयार असतो. कधी इकडे आलात तर अवश्य कळवा.

२३ तारीख ही सर्वांच्या सोयीची दिसत आहे पण तो पावसाचा दिवस असल्यामुळे आणि बरेच जण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत असल्यामुळे जर्सी सिटी न्यू पोर्ट मॉल चा विचार चालू आहे.

न्यू पोर्ट मॉल चांगली, सोयीची आणि चांगल्या सोयींची जागा दिसते आहे. किती वाजता? आणि सकाळी भेटतोय तर भेळेचा बेत आहे की अजून काही?

एक आइड्याची कल्पना आली आहे.. त्या दिवशी ज्यांना तिथे प्रत्यक्ष येणे शक्य नाही त्यांच्या साठी ई कट्टा करायचा का? म्हणजे एखादा वेब्मिनार करू सुरु आणि बाकी सगळे त्याला ऑनलाईन जॉईन होतील. न्यु पोर्ट मॉल मधे वाय फाय आहे का?

In reply to by सही रे सई

मी ई-कट्ट्यास येईन. बाहेर किंवा मॉल मधे हे कसे जमेल हे तिकडे पहावे लागेल. गेल्या वेळी मिपा-भटकन्ती-महागुरु म्हात्रे काका आलेले तेव्हाही इच्छा होती, पण जमले नाही...

आयडिया चांगली आहे! आणि वायफाय नसले तरी लोड नाही, फोनच्या हॉटस्पॉट वरून करता येईल इ-कट्टा...

वेबिनारची आयडीया मस्तच! सई तू दे इथे डिटेल्स. ज्यांना जॉइन व्हायचे आहे हे ते जॉईन होऊ शकतील! आदगा, सकाळी सकाळी भेळ कुठे करणार आणि खाणार कुठे? त्यापेक्षा तिथल्या फुडकोर्टलाच जाऊया. सकाळी ११ च्या सुमारासची वेळ आत्ता गृहित धरत आहे. तर मंडळी.. आत्ता ह्या क्षणाला फायनल झालेले डिटेल्स - २३ एप्रिल, सकाळी ११ वाजता, न्युपोर्ट मॉल येथे भेटुया. येणारे सदस्य :- उत्सवमुर्ती - जयंत कुलकर्णी! १. राघवेंद्र, वृषाली आणि पिल्लु २. पिरा, मि.पिरा आणि पिल्लु ३. नुमविय कुटुंबिय आणि पिल्लु ४. आषाढ दर्द गाणे ५. सही रे सई ६. मिहिर ७. रोशनी, मि.रोशनी आणि पिल्लु अजुन कुणाकुणाचे नक्की आहे?

In reply to by राघवेंद्र

क्या बात!!! ज्यांच्या फेसबुकच्या पोस्टवरुन हा विषय निघाला त्यांचा मिपा आयडी काय आहे? आणि ते (आणि त्यांना ट्रेनमध्ये अचानक भेटलेले दुसरे मिपाकरही) येणारेत का?

In reply to by पिलीयन रायडर

उत्सवमुर्ती ? :-) काय चेष्टा लावली आहे पिरा..... तुम्ही सगळे भेटणार आहात वेळ काढून हाच उत्सव आहे....

In reply to by जयंत कुलकर्णी

बास का काका!! तुमच्यासाठी काहिही करुन ३०च्या आत भेटायचे आहे! बाकी सगळे इथेच आहेत. आहातच तुम्ही उत्सवमुर्ती! {पण खादाडीचं बिल आपापलं द्यायचंय हे लक्षात ठेवा रे =)) }

स्काईप वर ग्रुप व्हिडिओ काल्लिंग उपलब्ध आहे असे दिसते. दुसरा ऑप्शन webminar किंवा gotomeeting करू शकतो? काय जास्त सोयीचे होईल?

In reply to by सही रे सई

ग्रुप स्काईपसाठी लॅपटॉप वापरला आहे, पण मोबाईलवरुन ग्रुप कॉलिंगला इश्यु येतो. वेबिनार ऑफिसमध्येच वापरले आहे, पण ग्रुप व्हिडिओ कॉल केलेला नाही.