✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

टायपो ( कथा )

स
सिरुसेरि यांनी
Mon, 04/10/2017 - 20:32  ·  लेख
लेख
टायपो ( कथा ) ( काल्पनीक ) घनदाट जंगलांनी व्यापलेला अ‍ॅमॅझॉन खो-याचा विस्तीर्ण आणी तेवढाच दुर्गम भुभाग . या जंगलामधे अनेक नरभक्षक रानटी टोळ्या , जंगली हिंस्त्र श्वापदे यांचा कितीतरी शतकांपासुन वावर आहे . किवागो ही या रानटी टोळ्यांमधली एक शक्तीशाली जमात . किवागो योद्धे हे कायम आपल्या हद्दीच्या रक्षणासाठी विषारी तीरकामठे घेउन पहारा देत असत . कुणा इतर टोळीने येथे प्रवेश करायचा प्रयत्न जरी केला तरी त्यांची खैर नसे . किवागो योद्धयांच्या विषारी बाणांना ते एका क्षणात बळी पडत . दिवस संपुन हळुहळु अंधार पडु लागला होता . नेहमीप्रमाणेच किवागो योद्धे आपल्या हद्दीवर डोळ्यात तेल घालुन पहारा देत होते . त्यांच्या हातात विषारी तीरकामठे सज्ज होते . पाठीवरच्या भात्यांमधे विषारी बाण भरलेले होते . तर काही किवागो योद्धे हातात भाले घेउन गस्त घालत होते . अचानक त्यांना समोर विजा चमकल्याचा भास झाला . पण तो भास नव्हता . समोर खरोखरच विजेच्या ठिणग्या पडत होत्या . काही क्षणांत या ठिणग्या नाहिशा झाल्या . त्या ठिणग्यांमधुन अवतरला एक अजस्त्र महाकाय मनुष्य . एखाद्या राक्षसासारखा भासणारा तो महाकाय मनुष्य किवागोंच्याच दिशेने संथपणे एकेक पाउल टाकत येत होता . त्याच्यापुढे किवागो योद्धे एखाद्या खेळण्यासारखे दिसत होते . किवागो आधी थोडे चरकलेच . पण लगेच सावध होउन त्यांनी आपापली शस्त्रे सरसावली , आणी ते त्या अजस्त्र मनुष्यावर विषारी बाणांचा , भाल्यांचा वर्षाव करु लागले . पण त्या महाकाय मनुष्यावर त्या बाणांचा काहिच परिणाम झाला नाही . त्याच्यासमोर एखाद्या सुईसारखे नाहितर काडीसारखे वाटणारे ते बाण त्याच्या अंगाला आपटुन खाली पडले . किवागो घाबरुन मागे मागे सरकु लागले . ते पुरते गोंधळुन गेले . तेवढ्यात त्या राक्षसी आकाराच्या मानवाच्या डोळ्यांतुन प्रखर प्रकाश किरण बाहेर पडु लागले . किवागो अजुनच घाबरले . त्यांच्यामधे पुरता गोंधळ उडाला . त्याच वेळी या प्रसंगापासुन कितीतरी वर्षे दुर असलेल्या एका सैनिकी केंद्रामधे बरीच गडबड चालु होती . त्या केंद्राचे प्रमुख आपल्या केबिनमधे आतुरतेने येरझारा घालत होते . ते कशाची तरी अधीरतेने वाट पाहात होते . तेवढ्यात केबिनमधला फोन खणखणला . त्यांनी तो त्वरेने उचलला . त्यांना अपेक्षित असलेला तो फोन त्यांच्या सहका-याचाच होता . केबिनजवळच्या संगणक कक्षातुन त्याने तो फोन केला होता . " यस ?" प्रमुखांनी आतुरतेने विचारले . " सर ... द फिनीक्स हॅज लँडेड सक्सेसफुली ." पलिकडुन आवाज आला . एका अत्यंत महत्वाच्या आणी अत्यंत खर्चीक अशा सैनिकी प्रोजेक्टचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्याचा तो सांकेतीक भाषेतला संदेश होता . प्रमुखांच्या चेह-यावर समाधानाचे हसु उमटले . "दॅट्स अ ग्रेट न्युज . कॉन्ग्रॅटस टु ऑल ." असे म्हणुन त्यांनी फोन ठेवला आणी ते त्वरेने केबिनजवळच्या संगणक कक्षामधे गेले . त्यांची टीम तिथेच बसलेली होती . सर्वांनी प्रमुखांचे हसुन स्वागत केले . प्रमुखांनीही परत सर्व टिमचे अभिनंदन केले . आता त्यांना उत्सुकता लागुन राहिली होती , ती या प्रोजेक्टच्या पुढल्या टप्प्याची . " ग्रेट जॉब जोकर्स . सो द फर्स्ट फेज ऑफ द प्रोजेक्ट T- 333/301 इज डन . द मोस्ट अ‍ॅडव्हान्स्ड अ‍ॅन्ड स्ट्रॉन्गर मॉडेल डेव्हलपड बाय अस . हाऊ द नेक्स्ट फेज इस गोईंग ऑन ? हॅव वी रिसीव्हड स्नॅप्स फ्रॉम द T- 333 आफ्टर लँडिंग ? " प्रमुखांनी चौकशी केली . "यस सर . T- 333 हॅज स्टार्टेड टु ट्रान्समीट द स्नॅप्स ऑफ द सरांउंडिंग्स थ्रु सिग्नल्स . " टिममधील एकाने उत्तर दिले . आणी समोरच असलेल्या मॉनीटरकडे बोट केले . T- 333 ने पाठवलेली छायाचित्रे तिथे दिसत होती . प्रमुख बारकाईने ती छायाचित्रे पाहु लागले . त्यांच्या कपाळावर किंचीत आठ्या पडल्या . " बट .. दिज स्नॅप्स डजंट लुक लाईक ऑफ अ डेव्हलप्ड एरीया ? कॅन यु चेक अगेन ? " त्यांनी टिमकडे पाहुन विचारले . टिममधल्या लोकांनाही तो फरक लक्षात आला . सगळे गोंधळुन एकमेकांकडे पाहु लागले . कुणीच काही बोलेना . नक्की काय गडबड झाली असेल ते कुणालाच समजत नव्हते . " लँडींग पॅनलपाशी कोण होतं ? हु वॉज ऑपरेटींग द लँडींग पॅनल ? " प्रमुखांनी कठोर आवाजात विचारले . एका गटाण्या डोळ्याच्या माणसाने हात वर केला . "मिबीन तु ? तुला कोणी तिथं बसवलं ? समवन चेक व्हॉट हि हॅज डन . " प्रमुखांनी फर्मावले . टिममधल्या एकाने तत्परतेने मिबीनचे पॅनल , त्यावरील याआधी रन केलेले कोड तपासले . काय प्रकार झाला ते त्याच्या लक्षात आले . तो काळजीने प्रमुखांना म्हणाला . "सर . इट वॉस अ टायपो . मिबीनने २०१७ च्या जागी १०१७ टाइप केले . हि टाइप्ड 1017 अ‍ॅट द फेज ऑफ लँडींग " "टायपो ? व्हॉट डु यु मीन बाय टायपो ? हा टायपो आपल्याला केवढ्याला पडला ? डु यु हॅव एनी आयडीया ? ज्या T- 333 ला २०१७ सालामधे पाठवायचे होते , त्याला तु १०१७ सालामधे पाठवले ? हा टायपो आपल्या मानवजातीला केवढा भारी ... " संतापाच्या भरात प्रमुखांच्या तोंडुन शब्द फुटेनासे झाले . ते मिबीनकडे पाहुन रागारागाने नुसतेच हातवारे करु लागले . "उं.. म्याउ..." म्हणत मिबीन घाबरुन तिथल्या एका खुर्चीखाली जाउन लपुन बसला . त्याचवेळी समोरच असलेल्या मॉनीटरवर T- 333 कडुन आलेले पुढचे संदेश झळकत होते . "वेटिंग फॉर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन.." , "वेटिंग फॉर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन.." , "वेटिंग फॉर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन.." , "वेटिंग फॉर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन.." . आता लवकर काहितरी निर्णय घेणे भाग होते . प्रमुखांनी स्वताला कसेबसे सावरले . आपल्या पुढ्यातला स्पिकर त्यांनी ऑन केला . ते बोलु लागले . " T- 333 , धिस इज द चीफ ऑफ द मिशन फिनीक्स . द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन फॉर यु इज , धिस मिशन हॅज बीन टर्मिनेटेड . स्टार्ट द सेल्फ डिस्ट्र्क्शन प्लान नाउ . " " रॉजर दॅट ." "आय रिपीट , गो अहेड फॉर द सेल्फ डिस्ट्र्क्शन ." प्रमुखांनी परत जड आवाजात सुचना केली . "आय आय सर ." "ओव्हर अ‍ॅन्ड आऊट ." असे बोलुन प्रमुखांनी पुढ्यातला स्पिकर ऑफ केला . मिबीन आता शांतपणे खुर्चीखालुन बाहेर आला . किवागो योद्ध्यांच्या दिशेने सरकणारा तो अजस्त्र महाकाय मनुष्य अचानक जागच्या जागी थांबला . त्याच्या डोळ्यांतुन बाहेर पडणारे प्रखर प्रकाश किरणही आता बंद झाले होते . किवागो योद्धे जरा सावरुन त्याच्याकडे बघत होते . मनातल्या मनात आपल्या टोळीच्या किवारा देवाचा ते धावा करत होते . या अमानवी संकटातुन आता तोच आपल्याला वाचवेल अशी त्यांना शेवटची आशा होती . त्या अजस्त्र मनुष्याने अचानक आपल्या डाव्या मनगटावर असलेल्या यांत्रिक कळीवर दाब दिला . समोरच्या किवागो योद्ध्यांकडे पाहुन तो पुटपुटला . "आय विल बी बॅक ." त्याच्या नुसत्या पुटपुटण्यानेही किवागो योद्धे घाबरुन परत मागे सरकले . तो आवाज त्यांच्या कानात चांगलाच घुमला . पुढच्याच क्षणी एक मोठा स्फोट झाला . त्या अजस्त्र महाकाय मनुष्याच्या शरीराच्या पार चिंधड्या उडाल्या . त्यामधुन धातुंचे असंख्य तुकडे उडुन इकडे तिकडे विखरुले गेले . त्याच्या शरीराचे अनेक भाग दुरवर जाउन पडले . आपल्यावर चालुन आलेल्या राक्षसाचा नाश झालेला पाहुन किवागो योद्धे खुश झाले . आनंदाने बेभान होउन ते विजयोत्सव साजरा करु लागले . ही आपल्या किवारा देवाचीच किमया असे समजुन ते आकाशाकडे हात करुन देवाचे आभार मानु लागले . किवागो योद्धे आनंदाने बेभान होउन नाचत होते . विजयोत्सव साजरा करत होते . दुरवर एका दगडांच्या ढिगाखाली दोन यांत्रिक दिवे बराच वेळ लुकलुकत होते . -------------- समाप्त --------------- काल्पनीक ------ एका गाजलेल्या चित्रपटावर आधारीत फॅन फिक्शन -------------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
6771 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

जबरी हो!

जव्हेरगंज
Mon, 04/10/2017 - 21:21 नवीन
जबरी हो! भारी कल्पना!!! बादवे, कोणता चित्रपट?
  • Log in or register to post comments

Terminator ..

अमु१२३
Tue, 04/11/2017 - 11:09 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

मस्तच जमलीय हो सिरुसेरीजी,

अभ्या..
Mon, 04/10/2017 - 21:24 नवीन
मस्तच जमलीय हो सिरुसेरीजी, खूप आवडली. लिहित राहा आपण, शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

जबरी कथा! आवडली.

रुपी
Tue, 04/11/2017 - 02:04 नवीन
जबरी कथा! आवडली.
  • Log in or register to post comments

भारी कथा..

पुंबा
Tue, 04/11/2017 - 10:46 नवीन
भारी कथा..
  • Log in or register to post comments

छानच आहे ! पण अशीच म्हणजे

दाह
Tue, 04/11/2017 - 11:22 नवीन
छानच आहे ! पण अशीच म्हणजे संपूर्ण नाही पण याच्याशी थोडंसं सार्धम्य असणारी संकल्पना माझ्या मनात रुळत होती. त्यावर थोडं लिहिलंही होत. आता हा विषय येऊन गेल्याने लिहिता येणार नाही याच वाईट वाटतंय.
  • Log in or register to post comments

येऊ द्या हो

जगप्रवासी
Wed, 04/12/2017 - 13:01 नवीन
लिहा तुम्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दाह

टेर्मिनेटर

सुमीत
Tue, 04/11/2017 - 15:26 नवीन
आवडली कथा, अस्ताला विस्ता
  • Log in or register to post comments

कथा आवडली!

अत्रे
Wed, 04/12/2017 - 05:55 नवीन
कथा आवडली! बादवे इतर सर्व वाक्ये इंग्रजीत बोलणाऱ्या प्रमुखाचे "हे केवढ्याला पडलं आपल्याला" हे मधेच मराठीतले वाक्य वाचून हसू आलं. म्हणजे कोणी हॉलिवूड पात्र ते एकदम मराठी मध्यमवर्गीय माणूस :)
  • Log in or register to post comments

कथेतला हा टायपो लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद

सिरुसेरि
Wed, 04/12/2017 - 15:46 नवीन
हा हा हा . कथेतला हा टायपो लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद . मराठी आणी ईंग्रजीचा ताळमेळ साधताना कसरत झाली .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

भारी कथा

जगप्रवासी
Wed, 04/12/2017 - 13:04 नवीन
अत्रे म्हणाले तसे नेमकं तेच वाक्य वाचून मी ही हसलो "आपल्याला केवढ्याला पडला"
  • Log in or register to post comments

छान कथा.

एस
Wed, 04/12/2017 - 13:41 नवीन
छान कथा.
  • Log in or register to post comments

आपणा सर्वांचे

सिरुसेरि
Wed, 04/12/2017 - 15:42 नवीन
आपणा सर्वांचे खुप आभार .
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Wed, 04/12/2017 - 16:07 नवीन
मस्त कथा!
  • Log in or register to post comments

मस्त!

मितान
Wed, 04/12/2017 - 16:28 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

चांगली कथा

मराठी कथालेखक
Wed, 04/12/2017 - 16:47 नवीन
पण संवाद मराठीतून मराठीतून असायला हवे होते.. कथानकातले पात्र जरी परदेशी असतील तरी वाचक देशी असल्याने संवाद मराठीतून असावेत असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

टर्मिनेटर / TERMINATOR

सिरुसेरि
Mon, 05/03/2021 - 15:19 नवीन
टर्मिनेटर / TERMINATOR
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा