Skip to main content

अँबी वॅली - बियाँड दि हेवन !

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 30/03/2017 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
अँबी वॅली हा काय माहौल आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इतकाच या लेखनाचा उद्देश आहे. माझ्या असिस्टंटनं आमच्यासाठी ही काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती. तिचा पती तिथे डिरेक्टर आहे आणि त्यानं डे-वन पासून अँबी वॅलीची संपूर्ण निर्मिती गेल्या तेवीस वर्षात केलीये. तिथे वी वेअर ट्रिटेड अ‍ॅज इनवेस्टर्स पण अदरवाइज ते एकूण प्रकरण आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सुब्रता रॉय, सहारा कंपनी, सुप्रीम कोर्ट केस, पिकनिक अफोर्डेबिलीटी हे विषय बाजूला ठेवलेत तर पोस्टचा आनंद नक्की घेता येईल. (आयडेंटिटी सिक्युरिटीसाठी पोस्टमधे नांवं बदलली आहेत) ______________________ `वी मीट अ‍ॅट द साइट ऑफिस सर', रिया म्हणाली. `वी विल बी देअर इन अनदर टेन मिनीटस' म्हणून पत्नीनं फोन ठेवला. एकाच वेळी रियाची आणि आमची गाडी ऑफिससमोर आली. `यू विल बी रिलेटेड टू द वॅली आफ्टर सीइंग द टोटल साइट प्लान’ विस्मय म्हणाला आणि मला साइट ऑफिस हा मिटींग पॉइंट का ठेवला ते कळलं. भारतातली सर्व हिलस्टेशन्स ब्रिटीशांनी वसवली आहेत. भारतीयांनी वसवलेलं, एखादं जगातलं सर्वोत्तम, अत्यंत हाय-फाय पण तरीही कमालीचं सौंदर्यपूर्ण हिलस्टेशन असावं या कल्पनेनं सुब्रता रॉयनी, अकराहजार एकरांवर साकारलेली जादुमयी दुनिया म्हणजे अँबी वॅली सिटी. या अफाट परिसराची हद्द म्हणजे तीन नालाकृती डोंगर आहेत. अँबीचं स्वत:चं एअरपोर्ट आहे, गेली तीन वर्ष जगातलं सर्वोत्तम ठरलेलं गोल्फ कोर्स आहे, सदासर्वकाळ वाहाणारी नयनरम्य नदी आहे, या नदीवर बांधलेली तीन धरणं आहेत, सिनेमात असतात तसे वॉटर स्पोर्टस आहेत, अशक्यप्राय भासावी अशी जायंट अ‍ॅक्वा-बस आहे (जी जमीनीवरुन सरळ पाण्यात शिरते आणि तुम्हाला वॉटर-राइड घडवते), स्वत:च्या खर्चानं सतरा/अठरा किलोमिटर्स लाईन टाकून नॅशनल ग्रीडमधून घेतलेली अखंड पुरवठा करणारी वीज आहे, एकर/ दोन एकर अशा विस्तीर्ण परिसरात वसलेल्या अलीशान विलाज आहेत, सेवन स्टार हॉटेल्स आहेत, एकसोएक स्वीमिंग पूल्स आहेत, अफलातून बांधलेले शॅलेज आहेत आणि पर्यटकांना आत फिरण्यासाठी मर्सिडीज बेंझ गाड्यांची फ्लीट आहे. एवरीथींग इज अ ग्राउंड रिअ‍ॅलिटी ! अँबी वॅली सिटीची झलक ! माइंड यू, एवरीथींग इज अ ग्राउंड रिअ‍ॅलिटी ! हे सगळं जसच्या तसं तिथे आहे. सहाराच्या कोर्ट केसची जरा सुद्धा सावली इथे कशावरही नाही. _________________ विस्मी, जस्ट टेल मी वन थिंग....वॉट मेक्स अ विस्मी... हू कॅन चेंज इलेवन थाउंजड एकर्स ऑफ लँड इंटू समथिंग विज इज बियाँड द हेवन ? अँबीच्या अलीशान साइट ऑफिसमधल्या ऑडिटोरियममधून बाहेर पडल्यावर, तो विस्तीर्ण परिसर अंतर्बाह्य बदलणार्‍या विस्मयला, मी मनातला नेमका प्रश्न विचारला. ‘सर, देअर इज अ टाइम एवरी फॉर्म इन द एक्झिस्टंस अंडरगोज अ चेंज. वन हॅज टू वेट फॉर दॅट टाइम!’ ‘माय गॉड, वॉट अ थॉट मॅन ! आय हॅव कम अक्रॉस अ पर्सन आफ्टर अ लाँग टाइम, हूम आय वूड लव टू लिस्टन अवर्स टुगेदर ! मी अगदी मनापासून म्हणालो. . (अँबी साईट ऑफिस ! डाव्याबाजूला इन्व्हेस्टर्सना अँबी वॅलीची फिल्म बघण्यासाठी मिनी थिएटर आहे) ________________________________ . (एंटर दि अँबी वॅली !) . (अँबी रिसेप्शन) एखाद्या लावण्यवतीचं केवळ बाह्यरुप बदलणं अनेकांना शक्य असेल. पण जिथे सौंदर्य इतकं रहस्यमय आहे की ते बदलतांना जराशी जरी चूक झाली तर सगळ्या रंगाचा बेरंग होईल... तिथे सृष्टीच्या स्वत:त बदल घडवायच्या वेळेचा सही अंदाज़ बांधू शकणारी व्यक्तीच, ते आव्हान पेलायला समर्थ आहे. प्रश्न सृष्टीवर विजय मिळवण्याचा कदापीही नाही... तर तिच्या मनाचा अंदाज़ घेत तेवीस वर्ष तिचं अंगप्रत्यांग बदलून टाकायचा आहे. म्हणजे जी लावण्यखणी स्वत:च्या रहस्यमय, रौद्रभिषण, कमालीच्या रमणीय रुपामुळे कुणाला जवळही फिरकू देत नाही, तिच्या कलाकलानं घेत, तिचे सर्व कॉंट्युअर्स एकसोएक तर्हेनं आकर्षक करायचे. कधी त्यांच्यावर बंगले बांधायचे, कधी त्यांना वळसे घालून बंगले बांधायचे तर कधी त्यांच्या पायथ्याशी इमला उभारायचा. कधी दोन विस्तीर्ण टेकड्यांच्यामधे जगातलं पहिल्या क्रमांकाचं गोल्फ कोर्स तयार करायचं. तर कधी हवेची दिशा, वैमानिकाची सोय, विमानांच्या आकाराचा आवाका लक्षात घेऊन, एअरपोर्ट तयार करायचा. तर कधी तीनतीन धरणं बांधायची. स्वत:च्या विलाजचं बांधकाम बघायला येणार्‍या अब्जाधिशांना सुखासिन वाटतील आणि तिथल्या पावसाळ्यात कमालीच्या रौद्र तांडवाशी जुळवून वर्षानुवर्ष दिमाखात उभे राहातील असे शॅलेज बांधायचे. जगातल्या अत्याधुनिक सोयी पुरवणारं हॉस्पिटल बांधायचं जिथे पेशंटची रुम पाचहजार चौरसफूटाची असेल, अत्युच्च सिस्टम असलेलं सिनेमा थिएटर बांधायचं, हॉर्स रायडींगसाठी ट्रॅक्स तयार करायचे, शाही लग्नसोहोळ्यांसाठी अद्वितीय लोकेशन्स तयार करायची, कल्पवृक्षाखाली बसलोयं असं वाटावं अशी अप्रतिम रेस्टॉरंटस तयार करायची.....आणि हे सर्व एका आयुष्यात करायचं, माय गॉड जस्ट अनइमॅजीनेबल ! ______________________ . (आमचा दुमजली शॅले) . (पहिल्या मजल्यावरचं सिटींग) . (वरच्या मजल्यावरचं मास्टर बेड) . ( मास्टर बेडरुम मधला जॅकुझी) . (जॅकुझीतनं दिसणारा बाहेरचा नजारा) . (सिटींग मधली डायनिंग स्पेस) . (डायनींगच्या समोर असलेला बार) . (डायनींगच्या डाव्याबाजूचं फुल्ली फंक्शनींग किचन) . (स्वीमिंगपूल, इथे दीड तास पोहोल्यावर रेस्टॉरंटमधे ब्रेकफास्ट करणं म्हणजे परम सुख !) . (प्रॅक्टीस गोल्फ कोर्स!) . (वॉटर स्पोर्टस - जेट्टी) . (स्पीड बोट) . (क्रूझ) . (अ विला - स्पॅनिश स्टाईल. नो कपांउडस अलाउड !) (तिथला विलोभनीय फाऊंटन शो)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34769
प्रतिक्रिया 125

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

नाही हो दणगेआहेब, त्या पातळीला मी जात नाही, टी तुमची खासियत आहे आणि आजवर बऱ्याच धाग्यांवर पाहिली आहे, नपेक्षा, काय लिहिलंय हे तुम्ही आधी पाहिलं असतं ना? ह्याच धाग्यावर किती कोलांट्या खाल्यायत ते बघा एकदा, अर्थात, जमल्यासच हं. असो.

In reply to by संदीप डांगे

कुत्रे-मांजरी पाळणे आणि बाकी कोंबड्या, मटण खाणे हा ज्याच्यात्याच्या इच्छेचा व गरजेचा विषय आहे. असंबद्ध वगैरे नाही. तुम्हाला गैरसोयीचा वाटला म्हणून टाळले असेल तर ओके. शिवाय माझे प्रतिसाद तुम्हाला विचारुन 'ओके आहे ना. कोणाला त्रास तर होत नाही ना' असे तपासून घ्यावेत अशी अपेक्षा ठेवू नका. बरं तुम्हाला डोंगरदर्‍याच कन्स्ट्रक्शन आवडत नाही, त्यासाठी कारणीभूत होऊ नये म्हणून तुम्ही काय करताय? हा काय फालतू प्रश्न आहे. मला रस्त्यावर ट्रॅफिक सुद्धा आवडत नाही. मग लगेच ही वाहतूक कोंडी टाळायला तुम्ही काय करताय वगैरे प्रश्न विचारायचे का. बाकी ते जाणीव बिणीव ठेवायला कोणी सांगितले असेल तर मला ठाऊक नाही. मी मला काय आवडत नाही इतपतच लिहिले होते. तुम्ही इतरांनी कसे प्रतिसाद द्यायला पाहिजेत असे सल्ले देउन वर दुसर्‍यालाच भोचक म्हणत आहात हे रोचक वाटले. माझा चॉईस सौंदर्यशास्त्राशी व भारतीयपणाशी संबंधीत आहे. तुमचाही तोच आहे काय? नाही. मला डोंगर आवडतात. दुसर्‍याची ती मौजमजा, आपली ती गरज, दुसर्‍याचे ते क्रूरपणे ओरबाडणे, आपले ते निसर्गाशी एकरुप होणे अशी सेन्सरींग कोणी करत असेल तर काय म्हणाल? अस कोणी केल आहे ?

In reply to by संदीप डांगे

अरेच्चा हे कसं सुटलं माझ्याकडुन?
२. सेन्सारिंग वगैरे नै करत बॉ... मला वाटलं ते बोललो भोचक प्रतिक्रियांवर.. जर त्या भोचक नसतील तर अंगावर घेऊ नये संबंधितांनी.. पण घेतल्या आहेत असे दिसले त्यामुळे मेरी बात में कुच्छ तो दम होयेंगाच... सो सिम्पल!
चालु दे हा निरर्थक अत्मकुंथन. असं करा एक नथुगुग्गुळाची मात्रा ३ सुलटे आणि ५ उलटे वळसे घालुन दिवसभर चाटण म्हणुन घ्या बरं. लग्गेचं उतारा पडतो स्वमतांधतेच्या आजारावर. बाकी नेरोलॅक का एशियन ते कळवा. आपण लगेचं एजन्सी मिळवुन देतो. aaa

फोटो काय अप्रतिम आहेत हो हे. मस्तं अनुभव शेअर केलाय इथे. बाकी निगेटिव्ह कमेंटिंना फाट्यावर मारा. लेकचे वगैरे फोटो असतील तर तेही येउ द्या.

बरयाचदा गेलोय ऍम्बी व्हॅली ला . तथाकथित पर्यावरण रक्षकांना एक सांगतो तिथे शेतकरी वैगरे नव्हता हो त्या भागात . कोणाला उजाड उध्वस्त करून तो प्रोजेक्ट नाहीये . निसर्गाची हानी म्हणजे काल काश्मीर मध्ये बोगदा झाला अनेक वर्षांपासून काम चालू होते . तेव्हा म्हणायचं हे गरजेचं आहे . आणि ऍम्बी व्हॅली अली कि म्हणण्याचं निसर्गाचं नुकसान . अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील . लवासा बाबतीत पण तेच आहे . आवाज उठवणारे आता गप्प आहेत नर्मदा आंदोलन वाले . निळू दामले ह्यांचं लवासा पुस्तक वाचा किंवा एकदा खरी परिस्थिती जाणून घ्या. अचानक भाव वाढल्यावर पडीक जमिनीसाठी काय दर लावले . ह्याला कोणी एक जबाबदार नाहीये . सगळेच जबाबदार आहेत . वृत्ती असली कि सगळेच तसं करतात . अजित गुलाबचंद ह्यांच्यासारख्या माणूस हताश झाला लवासा मूळे झालेल्या राजकारणाने . सांगायला खूप गोष्टी आहेत तूर्तास थांबतो .

In reply to by वरुण मोहिते

लवासा पुस्तक वाचले आहे वरुण भाऊ आणि निळू भाऊंची मुलाखतही घेतली आहे त्या पुस्तकाला अनुषंगून. मिपावरचे श्रावण मोडक ही होते तेव्हा उपस्थित. बर्‍याच प्रश्नांची उत्तरे निळूभाऊंकडे नव्हती तेव्हा. लवासा विषयावर पर्यावरणतज्ञांचे (वाद्यांचे नव्हेत) लेखही वाचावेत, असे सुचवेन.

विश्वंभर चौधरींकडून पण ऐकलीये दुसरी बाजू .मी माझ्या दृष्टिकोनातून बोलो. सगळ्याच वेळी पर्यावरण नाही बोलू शकत आपण . फार कमी प्रोजेक्ट महाराष्ट्रात इतक्या विस्तीर्ण जागेवर तयार झालेत . ह्यासाठी म्हटलं . काळजी प्रत्येकाला आहे पण नियम असतात कॉर्पोरेट कंपन्यांना जितकी झाडे तोडली तितकी लावा किंवा पर्यावरण निधी साठी मदत करा असे बरेच ऍक्ट असतात .

आंबी नदीचे खोरे ती आंबी वॅली असे कोणीतरी सांगितलेले आठवतेय. शिवाय स्पेलिंग मध्येसुद्धा सुरुवातीचा'आ' उच्चार दर्शवणारे डबल ए (दोन ए) आहेत.

सरांनी एखादी गोष्ट केली म्हणजे भारीच असणार, इतर कोणी केली तर फालतूच. एखादा स्वित्झर्लंडला जाऊन आला तरी त्याचं आयुष्य वाया जात असणार पण सर आंबी व्हॅलीला जाऊन आले म्हणजे आहाहा.... वर गावडेजी विचारत होते "त्यावेळी तुम्ही ऑफिसच्या पैशाने "हेवनला" जेवण्याचा अनुभव दुय्यम दर्जाचा ठरवला होता. तुमचा हा आताचा अनुभवही तसाच कॉम्प्लिमेंटरी असल्याने दुय्यम मानावा काय?". पण आपण कोणाला विचारतोय याचे त्यांना भान नसावे. अहो सर एकटेच काम करत असूनही त्यांच्या असिस्टंटने काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती, आहात कुठे? तुम्ही आम्ही तर एक साधे नोकर आणि कंपनी कुठे तरी पाठवते किंवा पार्टी देते त्यात काय विशेष? फरक लक्षात घ्या भाऊ. सरांनी नुसता श्वास घेतला तरी तो उत्सव असतो आणि बाकीचे श्वास घेतात तो म्हणजे नाईलाज हो. देवाने नाक दिलंय आणि बाहेर हवा असतेच, ती उगाच आत बाहेर करत राहते. बाकी ते फोटू दिसत नाहीयेत त्यामुळे त्यावर बोलू शकत नाही हे जाहीर करतो नाहीतर उगाच इतक्या चांगल्या माहितीपूर्ण आणि समस्त जगाला उपयोगी पडणाऱ्या धाग्यावर अवांतर बोलल्याबद्दल आरोप व्हायचे. बाकी समस्त मिपाकरांनी हे लक्षात ठेवा की धाग्यावर असे ढिस्क्लेमर लावत जा, नाहीतर सर कुठल्याही धाग्यावर त्यांचा उत्सव साजरा करू शकतात.

सुंदर प्रचित्रे अन सुरेख लेखन ! संक्षीसर, मझा आ गया !व इथं कधी मिपाकट्टा केला तर सांगा, आपण येका पायावर तैय्यार !

१) संदीपचा हा ज्योक अत्यंत आवडला ! डोहाळजेवणाला जाऊन 'आजकाल लोकसंख्या किती वाढली, काय लोकं भसाभसा पोरे काढतात' असे होणार्‍या आईला सुनवण्यासारखे आहे. पत्नी माझं कोणतंही लेखन वाचत नाही त्यामुळे ज्योक ऐकवल्यावर, ती ज्याम हसली त्याबद्दल संदीपचे विशेष आभार्स. २) लेखाची लिंक रियाला पाठवल्यावर, केवळ दहा मिनीटात तिचा रिप्लाय आला आणि ती ज्याम खुष झाली. हे पोस्टचं आणखी एक श्रेय. ३) इतर पोस्टवर माझ्या प्रतिसादांना पूर्ण सहमती दर्शवून सपशेल लोटांगण घालणार्‍यांनी, तो स्कोर इथे सेटल करण्याचा प्रयत्न केला. ३० वर्ष स्टँडींग असणार्‍य प्रोफेशनलला (पूर्वी सुद्धा कधी) असिस्टंटच असू शकत नाही असा दिव्य निष्कर्श काढून आणि इतरही काहीबाही बरळून, पुन्हा एकदा स्वतःची मानसिक दुर्दशा झळकवली त्याबद्दलही आभार्स !

In reply to by संजय क्षीरसागर

बाकी ते असिस्टंटबद्दल मी नव्हे तर इथे तुम्हीच म्हणालात. फक्त आत्ताच्या क्षणामध्ये जगणाऱ्याने भूतकाळाचे धागे सांभाळून ठेवलेत म्हणायचं तर. बाकी तुम्हाला अडचणीच्या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं टाळण्याची तुमची कला वाखाणण्याजोगी आहे. असिस्टंटबद्दल जो प्रश्न यात विचारला त्यात तुम्ही फिरवून उत्तर दिलंत. वर गावडेजींनी विचारलेला प्रश्न पूर्णपणे टाळलात.

छान फोटो! उत्कृष्ट सोयी सुविधा असणारच आत मध्ये पण यापेक्षा थोडा वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर वायनाड ला जावा! रिसॉर्ट ची लिंक एक्दम क्लास! वायफाय वगैरे सोयी देत नाहीत ते अगदी टीव्ही देखील नाही... निसर्गाच्या जवळ इलेक्ट्रॉनिक उपकरणे जरा बाजूला ठेऊन मजा घेण्याची कल्पना आहे त्यांची... काही फोटो देतोय खाली बघा.. तुम्हाला आवडेल कदाचित हे ठिकाण! villa 1 villa 2 याच्या खाली टोटल काच आहे पारदर्शक! आणि खाली खाजगी पूल! :) bridge villa

In reply to by संजय क्षीरसागर

जंगली प्राणीबिणी आवडत असतील तर वायनाडचे एक रिसॉर्ट सांगतो. जेथे डायनिंग एरीया आहे तेथेच जवळ एक पाण्याचे तळे आहे. (आणि दोन्हीमध्ये जिवंत विद्युतप्रवाहाचे मजबुत तारेचे कुंपण) ..तर आपण चहा घेत घेत / जेवताना समोर जंगली हत्ती, चितळ, हरीण आणि रानडुकरे वगैरे प्राणी त्यांच्या फॅमिलीसकट पाणी प्यायला येतात. आणखी अ‍ॅडव्हेंचरची हौस असेल तर त्या रेसॉर्ट वाल्यांनी मचाण बांधून ठेवली आहेत. तेथे जाऊन बसायचे.

संक्षी सेठ, लेखन माहितीपूर्ण आहे. संधी मिळाली तर नक्की जाईन. छायाचित्रे सुंदर....! -दिलीप बिरुटे

In reply to by सतिश गावडे

अँबीची आजची वॅल्यू १,१३,००० कोटी आहे आणि सुब्रता रॉयचं एकूण देणं (फक्त) ५,००० कोटी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

वरच्या लिंक मध्ये काहीतरी वेगळेच दिले आहे स्वामीजी. असो, तुम्ही टुरिष्ट म्हणून गेला होतात त्यामुळे सहाराची जबाबदारी घेऊन भांडत बसू नका.

In reply to by मोदक

न्यूज पाहा : In March, the Supreme Court had said that it would auction off Sahara's prime Aamby Valley property in Pune, if the company failed to deposit Rs 5,000 crore of the Rs 14,000 crore outstanding by April 17. Sahara values the property at Rs 34,000 crore. देणं मी म्हटल्याप्रमाणे ५,००० कोटीच आहे. मी एकूण प्रॉपर्टी पाहिली आहे. तिथला एकूण तामझाम बघता ३४,००० कोटी हे वॅल्युएशन फार किरकोळे . लेट अस सी.

In reply to by संजय क्षीरसागर

साहेब एखादा दिवाळखोरीत जातो तेव्हा तयाची किंमत खूप कमी होते. भले हि ती प्रॉपर्टी काही करोडोंची असेल. यासाठी मल्ल्या यांचे उदाहरन समोर ठेवण्यात यावे. गाओ येथी प्रॉपर्टी पहिल्यादा ९० crore ठेवली होती ती ७२ crore ला विकली गेली. असे सुद्धा अँबी वॅली बद्दल होऊ शकते. मी प्रॉपर्टी बघितली नाही त्यामुळे ३४००० का ३४ कोटी हे सांगू शकत नाही.

if the company failed to deposit Rs 5,000 crore of the Rs 14,000 crore outstanding शुद्ध मराठीत याचा अर्थ काय होतो ते सांगा बघू..! बहुदा तुम्हाला आधीचे प्रतिसाद वाचायची सवय दिसत नाही. एकूण देणं १४,००० कोटींचं आहे हे मान्य, पैकी सध्या ५,००० कोटींचा तगादा असला तरी अँबीची आजची वॅल्यू १,१३,००० कोटी आहे मी तर फुल एंजॉय केलीये अँबी वॅली. सो नो डिफरंस फॉर मी. शिवाय आपण इथे चर्चा करुन काही फरक पडत नाही. मला जी इन-साइड माहिती आहे आणि जे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे त्यावरनं अँबी वॅलीची किंमत ३४,००० कोटींपेक्षा कित्येक पट जास्त आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

गिर्‍या तो भी टांग उपर - याचा अर्थ माहिती आहे ना..? नसला तरी हरकत नाही. ;) सुब्रता रॉयचं एकूण देणं (फक्त) ५,००० कोटी आहे. एकूण देणं १४,००० कोटींचं आहे हे मान्य तुमचीच वाक्ये आहेत ना..? मुद्दाम लाल रंगात दिली आहेत. तुमच्या प्रकृतीला बरोब्बर फिट बसतील. असो.. गेट वेल सून.

In reply to by मोदक

सुद्धा दिग्विजय मिळवल्याचा आनंद होतो. माझा आणि सहाराच्या अर्थिक परिस्थितीचा काहीएक संबंध नाही. तरी थोडा फार प्रकाश पडावासा वाटत असेल तर कंजूसना दिलेला प्रतिसाद आहेच. जमल्यास वाचावा, वास्तविक परिस्थिती कळू शकेल. असो !

In reply to by संजय क्षीरसागर

येथे तुमच्या दोन वाक्यातील विसंगती आहे हीच वास्तविक परिस्थिती आहे. ते तुम्ही बेशर्त मान्य करणार नाहीच. त्यामुळे टांग उपरच राहुदे. गेट वेल सून.

मला वाटतं या प्रॅाजिक्टमध्ये १)बाहेरून कर्ज काढून भांडवल उभे करण्याची मर्यादा जी प्रत्येक कंपनीस दिलेली असते ती ओलांडून { अधिक} रक्कम कर्जाउ घेणे गुन्हा आहे आणि ती परत करायची आहे ताबडतोब. २) हे पैसे देणाय्रांनी त्यांना कबूल केलेले व्याज मिळत नाही अथवा पैसेही परत देत नाही कंपनी असा तगादा लावलेला आहे का? - बहुतेक नाही. यांपैकी कोणी एखाददुसरा मागणी करायला आल्यास ते पैसे देत असतीलच. - वरचा पाच हजार को चा प्रतिसाद आल्यावर हे लिहिले कारण लेखाचा आर्थिक अनियमितता विषय नव्हता. असो.

In reply to by कंजूस

सध्या सहारा ग्रुप लिक्विडिटी क्रायसिसमधे दिसतो (रोख रकमेची चणचण) त्यामुळे त्यांना पैसे परत करता येत नाहीत. परंतु त्यांची मालमत्ता देण्याच्या रकमेपेक्षा कित्येक पट आहे. उदा. एअरपोर्ट, गोल्फ-कोर्स, त्यांची धरणं, त्यांनी नॅशनल ग्रीडमधून घेतलेली स्वतःची पॉवर लाईन, त्यांच्याकडे असलेला ७,००० एकरचा थीम पार्कसाठी राखून ठेवलेला संपूर्ण स्वतंत्र विस्तार, तिथली हॉटेल्स, हॉस्पिटल्स, कम्युनिटी सेंटर्स, स्वतःचे शॅलेज .... शिवाय सुब्रता रॉय मल्यासारखे देशसोडून परागंदा झालेले नाहीत त्यामुळे (वर एका सदस्यानं म्हटल्याप्रमाणे) त्यांची मालमत्ता बेवारस पडलेली नाही आणि तिची किंमतही मातीमोल होण्याजोगी नाही. मी वर म्हटल्याप्रमाणे, जरी सहाराला वॅली विकायला लागली ( तशी शक्यता दुरापास्तच) तरी ते रिसॉर्ट म्हणूनच राहील आणि लोकांना तिथं हवं तेव्हा जाता येईल (अर्थात, मी तर नक्कीच जाईन कारण माझ्या क्लायंटचा तिथे शॅले आहे आणि अदरवाईज सुद्धा मला तिथल्या खर्चाची फिकीर नाही). तस्मात, वर उपस्थित केलेले मुद्दे सेन्सेशनल (आणि केवळ चर्चा भरकटवण्यासाठी असले) तरी अँबी वॅलीचा आनंद घेण्याकरता, ज्यांची तशी टेस्ट आहे त्यांच्या दृष्टीनं गैरलागू आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

परंतु त्यांची मालमत्ता देण्याच्या रकमेपेक्षा कित्येक पट आहे
मग "जस्ट फॉर चेंज" म्हणून इतके दिवस गजाआड काढले का ?

In reply to by संजय क्षीरसागर

>>तस्मात, वर उपस्थित केलेले मुद्दे सेन्सेशनल ~~>> मी लिहिलंच आहे लेखाचा विषय नाही परंतू वर एक मुद्दा आला तो कशाबद्दल यावर टाइम्समध्ये सविस्तर लेख वाचल्याचं आठवतय. पैसे परत मागायला इन्वेस्टर आलेले नाहीत परंतू कंपनी लॅा MOAतल्या तरतुदींचा भंग हे स्वरूप असा आर्थिक गुन्हा आहे. सुखसोयींचा आढावा यास भरकटवण्याचा हेतू नाही.

In reply to by कंजूस

पैसे परत मागायला इन्वेस्टर आलेले नाहीत
कारण ते हवेतले इन्वेस्टर्स आहेत. हा राजकारण्यांचा धुवायला काढलेला पैसा होता म्हणे जो यांनी लाखो लोकांच्या मायक्रो इन्वेस्ट्मेंट म्हणून दाखवला होता.

In reply to by अनुप ढेरे

तसं असेल तर ज्यांच्या नावे पैसे गुंतवलेत असं दाखवलंय ते "आपले" पैसे मागू शेतात. =))

In reply to by कंजूस

Sahara India Real Estate Corp आणि Sahara Housing Investment Corp - या दोन कंपन्यातून ऑप्शनली फुल्ली कन्वर्टिबल डिबेंचर्स (OFCDs) इश्यू करुन उभे केलेले पैसे, त्यांना इन्वेस्टर्सना परत करता येत नाहीत असा तो गुन्हा आहे. एनी वे, वर म्हटल्याप्रमाणे माझी पोस्ट अँबी वॅलीच्या माहौल बद्दल आहे आणि मालकी बदलली तरी त्यात काहीएक फरक पडणार नाही.

एन पी ए रिकव्हरी साठी कर्जाची थकबाकी पाच रुपयेसुद्धा कर्जदार भरत नसेल तर बँका मालमत्तेचा लिलाव करून आपले पाच रुपये वसूल करून घेऊ शकतात. कर्जाच्या अ‍ॅग्रीमेंटमधे तसे कर्जदाराने मान्य केलेले असते. त्यामुळे कर्ज एन पी ए झाल्यानंतर मालमत्तेची बाजारभावाने किंमत काय हा मुद्दा संपूर्णपणे गैरलागू असतो. सूचना देऊनही पाच सहा लाखाची घरकर्ज थकबाकी काही कारणाने कर्जदार भरू शकला नाही तर बँक त्या घराचा लिलाव करून आलेल्या रकमेतून आपले कर्ज कापून घेते आणि शिल्लक रक्कम कर्जदाराला देऊन टाकते. अशा वेळी ६०/७० लाखाचा फ्लॅट घेणारा किती किंमतीला घेतो आहे याचे बँकेला सोयरसुतक नसते. लिलाव बहुधा मालमत्तेच्या डिस्ट्रेस व्हॅल्यूला होतो. बँकेची पाच सहा लाख थकबाकी वसूल झाल्याशी कारण.

In reply to by पैसा

पण अँबी वॅली सदर प्रकरणात गहाण नाही. अन्यथा त्यांना आदेश वगैरे देण्याची गरज नव्हती, कोर्टानंच लिलाव केला असता.

फोटो मस्तच आहेत. परन्तु बाहेरच्या उंच कमानींच्या वर AMABY असे, तर आतील काऊंटरावर AAMBY लिहीले आहे, यात काही विशिष्ट हेतु आहे, चूक आहे की हा काही चमत्कार आहे ? नेमके नाव अँबी की अंबे की आम्बे आहे ?

आमच्यासाठी ही काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती!!!! काँप्लिमेंटरी पिकनिकला जाणाऱ्याला खर्चाची कसली फिकीर....