Skip to main content

पहाट

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 20/02/2009 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट नहाली दवाच्या कुशीत रात्र विरघळे रेशमी मिठीत.. झाले बघ दूर झुन्जुर्-मुंजुर दूर जाणे तरी तुला ना मंजूर.. निरोप घेई रे एकेक चांदणी तरी ही सुखाने जडावे पापणी.. किरणे नाजुक सोनपावली स्वप्नांची रात्र तरी ना सरली... मिठीत तुझ्या मी तुझीच होवून पहाट उमले प्राजक्त होउन
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3106
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मिठीत तुझ्या मी तुझीच होवून पहाट उमले प्राजक्त होउन... खपलो ! :)

सुंदर कविता ! आवडेच !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..