पहाट नहाली दवाच्या कुशीत
रात्र विरघळे रेशमी मिठीत..
झाले बघ दूर झुन्जुर्-मुंजुर
दूर जाणे तरी तुला ना मंजूर..
निरोप घेई रे एकेक चांदणी
तरी ही सुखाने जडावे पापणी..
किरणे नाजुक सोनपावली
स्वप्नांची रात्र तरी ना सरली...
मिठीत तुझ्या मी तुझीच होवून
पहाट उमले प्राजक्त होउन
वाचने
3114
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आईऽऽ ग्गं!
एक अप्रतिम शृंगारिक कविता!
प्रत्येक ओळ सुंदर आहे.. शेवट खासच..
जियो!!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
मस्त गं!
मस्त गं!
छान
कविता आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
सुरेख कविता
सुरेख कविता .. आवडली.
वा!
मिठीत तुझ्या मी तुझीच होवून
पहाट उमले प्राजक्त होउन...
खपलो ! :)
छान आहे कविता
तरी ही सुखाने जडावे पापणी..
:-)
मस्त आहे
छानच आहे पहाट.
मीनल.
छान
कविता आवडली.
कविता आवडली.
फुलवाताई,
सुंदर कविता केली आहेस.. :)
सुरेख कविता
केव्हा तरी पहाटे या गीताची आठवण झाली
सुरेख कविता
अजून येऊ देत.... :)
झुंजुर-मुंजुर
काय सुरेख शब्दरचना आहे.
(झुंजुमुंजु माहिती होतं !)
कविता आवडली.
सह्ही
सह्ही कविता !!
https://bhagyashreee.blogspot.com/
+१
सुंदर कविता ! आवडेच !!!
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..