Skip to main content

ताज्या घडामोडी : भाग ४

लेखक संदीप डांगे यांनी शनिवार, 25/02/2017 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागाचे ३०० प्रतिसाद झालेत म्हणून नवीन धागा... विषय ताज्या घडामोडी असल्याने मागचा दुवा देणे संयुक्तिक वाटत नाही. ------------------------------------------------ अलिबागमध्ये.... शिवसेना+भाजप्+कॉन्ग्रेस महायुती.... 1 इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्‍या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))

वाचने 62617
प्रतिक्रिया 309

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद_१९८२

आशुतोष बहुतेक सांपतिक स्थितीबद्दल बोलत नसून विचारसरणीबद्दल बोलत असावा. म्हणजे संपन्न विचारसरणी विरूद्ध भोंदू विचारसरणी असे काहीतरी असावे.

मुंबई: सत्ताधारी पक्षांच्या मुख्य प्रतोदांना राज्यमंत्र्याचा दर्जा; लाल दिव्याच्या गाडीसह सरकारी बंगलाही मिळणार, विधानसभेत विधेयक मंजूर.

अमेरिकेने सीरियावर क्षेपणास्त्रे डागून हल्ला चढविला आहे. काही दिवसांपूर्वी सीरियाने आपल्याच नागरिकांना रासायनिक शस्त्रांच्या सहाय्याने मारले होते.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, रशियाच्या मते २०१४ साली सीरियातली सर्व रासायनिक अस्त्रे अमेरिकेच्या देखरेखीखाली बाहेर काढण्यात आली होती. एकंदरीत ट्रंपूदादांना बशर अल असद पसंत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

एकूणच ट्रम्पही ओबामा-बुश यांच्याप्रमाणेच युध्दखोर आहे असे दिसते. ही वाईट गोष्ट आहे. फेसबुकावर विविध पेजवर म्हटले जात आहे की सौदी मंत्र्याची भेट घेतल्यानंतर ट्रम्पसाहेबांनी सिरीयावर हल्ला केला आणि यापूर्वीच्या अध्यक्षांप्रमाणेच ट्रम्पलाही सौदीने विकत घेतले आहे!! असेही म्हटले जात आहे की सिरीयातील ज्या बेसवरून आयसिसवर हल्ले केले जात होते त्याच बेसवर अमेरिकेने हल्ला केला आहे आणि तो बेस मोडून काढला आहे. तसे असेल तर एकीकडे शांततेचे नोबेल पारितोषिक घेऊन दुसरीकडे सिरीयातील असादविरूध्द आयसिससारख्या भस्मासूराला मदत करणार्‍या बराक ओबामा नामक खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असलेल्या ढोंगी अध्यक्षापेक्षा ट्रम्प वेगळे नाहीत असे दिसते. जगदंब जगदंब. खरेखोटे भगवंताला ठाऊक.

In reply to by गॅरी ट्रुमन

शस्त्रास्त्र लॉबीला शांती परवडणारी नाही आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला शस्त्रास्त्र लॉबीला दुखावणे. ट्रंपला सिस्टीमच्या बाहेर असल्याने कदाचीत हे माहित नसेल. आता आला लाईनवर. एकूण काय ट्रंप कसा आमच्यासाठी चांगला असा विचार करणाऱ्या प्रत्येक गटाला हा येडबंबू तोंडघशी पाडणार असं दिसतंय.

In reply to by गॅरी ट्रुमन

>>सिरीयातील असादविरूध्द आयसिससारख्या भस्मासूराला मदत करणार्‍या बराक ओबामा नामक खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असलेल्या ढोंगी अध्यक्षापेक्षा ट्रम्प वेगळे नाहीत असे दिसते. गॅरी, याबद्दल विस्तृत वाचायला आवडेल.

In reply to by अनुप ढेरे

मस्त लेख ढेरेशास्त्री.. प्रवीण स्वामी, ब्रह्मा चेल्लानी आणि सी राजमोहन हे doyens आहेत परराष्ट्र धोरणविषयक विश्लेषकांमधले.

In reply to by आनंदयात्री

याबद्दल विस्तृत वाचायला आवडेल.
ओबामांनी सुरवातीच्या काळात असादविरोधी बंडखोरांना मदत केली आणि त्यातूनच पुढे आयसिसचा भस्मासूर वाढला. याविषयी http://www.breitbart.com/national-security/2016/08/12/fact-check-obama-… हा लेख आणि त्यात दिलेल्या लिंका वाचनीय आहेत. मागच्या वर्षी अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांवर धागा काढला होता त्यावेळी हिलरींवर मिडल-ईस्ट प्रकरणी टिका झाली होती हे बघितलेच होते. झालेल्या घटनेची परराष्ट्रमंत्र्यावर सगळी जबाबदारी पण अध्यक्ष मात्र नामानिराळे असे होऊ शकणार नाही ना?

In reply to by गॅरी ट्रुमन

लिंक्स साठी तुमचे आणि अनुपचे धन्यवाद. वाचतो आणि प्रश्न असतील तर विचारतो.

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीमध्ये नक्की कोणाचा अधिकार चालणार--- दिल्ली सरकारचा की केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या नाय्ब राज्यपालांचा याविषयी अनेकदा खटके उडाले. प्रकरण कोर्टात गेले आणि कोर्टाने नायब राज्यपालांना डावलून केजरीवाल सरकारने परस्पर घेतलेल्या निर्णयांवर ताशेरे ओढले. त्यानंतर याविषयी भारताचे माजी Comptroller and Auditor General व्ही.के. शुंगलू यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून केजरीवाल सरकारने नायब राज्यपालांना डावलून घेतलेल्या निर्णयांचा तपास करण्यात आला. ही समिती तत्कालीन नायब राज्यपाल नजीब जंग यांनी नेमली होती. या समितीने डिसेंबर २०१६ मध्ये अहवाल सादर केला. या समितीने केजरीवाल सरकारवर ताशेरे ओढले आहेत. १. केजरीवाल सरकारवर 'नेपोटिझम' चा ठपका ठेवण्यात आला आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकसाठीच्या "दिल्ली स्टेट हेल्थ मिशन" वर सल्लागार म्हणून आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांची कन्या सौम्याची नियुक्ती सरकारने केली. महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्यसेवेविषयी सल्लागार म्हणून काम करण्यासाठी संबंधित व्यक्ती किमान डॉक्टर असावी ही अपेक्षा असली तर त्यात काय चुकीचे आहे? पण सौम्या जैन आहे आर्किटेक्ट. तरीही तिची त्या सल्लागारपदावर नियुक्ती झाली. याविषयी मी "केजरूके गुलाम" या धाग्यावरही लिहिले होते. ती आरोग्यमंत्र्यांची मुलगी असणे हा केवढा मोठा योगायोग आहे नाही का? २. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची पत्नी सुनिता यांच्या नातेवाईकांपैकी एक निकुंज अगरवाल यांची नियुक्ती आरोग्यमंत्र्यांसाठीचे "ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी" या पदावर नियुक्ती अशा नेमणुका करण्यासाठीच्या सगळे नियम, पध्दती, प्रोसिजर इत्यादींना धाब्यावर ठेऊन केली गेली. ३. दिल्ली सरकारच्या मालकीचा २०६, रोज अ‍ॅव्हेन्यू हा बंगला आम आदमी पक्षासाठी कार्यालयासाठी देण्यात आला. शुंगलू समितीच्या मते दिल्ली सरकारला असा निर्णय घ्यायचा अधिकार नव्हता. ४. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल आणि आमदार अखिलेश त्रिपाठी यांना बंगले देण्यात आले यावरही शुंगलू समितीने ताशेरे ओढले. सामान्य परिस्थितीत असा निर्णय घ्यायचा अधिकार दिल्ली सरकारला नाही पण असामान्य परिस्थितीत नायब राज्यपालांच्या संमतीवरून असा निर्णय घेता येऊ शकतो. या प्रकरणात नायब राज्यपालांना डावलून सरकारने परस्पर निर्णय घेतला. आजच नवे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आम आदमी पक्षाने दिल्ली सरकारच्या बंगल्यात थाटलेले कार्यालय रिकामे करावे असा आदेश दिला आहे. या प्रकरणावरून अरविंद केजरीवालांचे एकेकाळचे गुरू अण्णा हजारे यांनीही केजरीवालांना सत्तेची नशा चढली आहे या शब्दात त्यांची नाराजी व्यक्त केली. एकूणच ज्यांना केजरीवालांपासून फार मोठ्या अपेक्षा होत्या त्यांचे एकामागोमाग एक अपेक्षाभंग करत आहेत. मी तरी या मनुष्यापासून कसल्याही आणि कधीही अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. त्यामुळे हे अपेक्षाभंगाचे दु:ख मला तरी नाही. अजूनही अशी अपेक्षा ठेवणारे अनेक लोक आहेतच. त्यांचेही अपेक्षांचे विमान दाणकन जमिनीवर आदळविण्याची अमर्याद क्षमता केजरीवालांमध्ये नक्कीच आहे.

अनेक वर्षांपूर्वी इराक साठी पण हाच गेम झाला होता . भयभीत करणे तुमच्याकडे जे आहे ते वाईट आहे .

तेलंगणमधील भाजप आमदार राजा सिंग याने अयोध्येत राममंदिर बांधण्यास विरोध करणार्‍यांचा 'शिरच्छेद' करायला हवा असे तालिबानी विधान केले आहे. असल्या लोकांकडे बघून यांना भारताचा हिंदू पाकिस्तान बनवायचा आहे असेच वाटायला लागते. आमदार या बर्‍यापैकी वरीष्ठ पदापर्यंत असे लोक पोहोचले ही नक्कीच चिंतेची गोष्ट आहे. अशा लोकांनी दिलेल्या प्रत्येक वक्तव्याबद्दल मोदी जबाबदार नसले तरी अशी बेताल बडबड करायच्या घटना वारंवार घडायला लागल्या तर २०१९ मध्ये नाही तरी दुसर्‍या टर्ममध्ये लोक मोदींनाच जबाबदार ठरवायला लागतील. निदान या आमदाराला हाकलून देऊन असली बेताल बडबड सहन केली जाणार नाही हा संदेश द्यायला हवा. http://www.ndtv.com/hyderabad-news/bjp-legislator-wants-to-behead-those…

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन, काश्मिरातल्या हिंदूंना मुस्लिम अतिरेकी जिवंत जाळंत होते तेव्हा कोणीही काहीही बोललं नव्हतं. आता हिंदूंनी जरा आवाज केला तर एव्हढं चिंताग्रस्त व्हायचं कारण काय? हिंदूंनी प्रत्यक्ष कोणाचा शिरच्छेद केला आहे काय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तो नेता सरकारचे प्रतिनिधित्व करत असल्याने अधिक जबाबदारीपूर्ण वर्तनाची अपेक्षा आहे. या वाचाळवीरांमुळे ढोंगी निधर्मांध लोकांच्या हाती विनाकारण कोलीत मिळते

गोरक्षकांच्या तालीबानी उन्मादावर वाचलेला सर्वात उत्तम लेख. या झुंडींकडे दुर्लक्ष करण्याचे कॉन्स्टिट्युशनल हझार्डस भारताला परवडणार नाहीत हे मोदींना जेवढे लवकर कळेल तेवढे बरे.

In reply to by पुंबा

कायदा मोडणाऱ्या ह्या झुंडीकडे लक्ष देणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच किंबहुना गहुभर जास्तच लक्ष कायदा मोडणाऱ्या समोरच्या झुंडीकडेही देणे गरजेचे आहे.

सौरा, मला तरी साध्वी प्राचींच्या वक्तव्यात काही आक्षेपार्ह सापडलं नाही. तिहेरी तलाक हा मुसलमान स्त्रीला हिंदू धर्मात परतायचा राजमार्ग बनला पाहिजे. यात चुकीचं ते काय? हिंदू धर्माची निंदानालस्ती करून पोपचे चमचे धर्मांतर करवितात तेंव्हा त्यांना कोणी बोल लावीत नाही. जणू हिंदूंचं धर्मांतर हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. मग उलटी गंगा वाहू लागली तर ओरड कशास्तव? गोरक्षकांने केलेली हिंसा चुकीचीच आहे. ती गैरसमजातून झालेली आहे. मुसलमान समाजही गायीविषयी अशाच चुकीच्या धारणा बाळगून आहे. त्या ठीक केल्यास दोन्ही बाजूंनी सुसंवाद प्रस्थापित व्हायला मदत होईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गापै, कुठल्याही बाईला तू अमक्या अमक्याला 'आय लव्ह यू' म्हण तो तुझ्याशी लग्न करेल असं सांगणं मला तरी असभ्यपणाचं वाटतं. बळजबरीने ब्रम्हचर्य लादल्यामुळे ह्या साधू- साध्व्यांना असलं सुचतं असं मला वाटतं.

In reply to by पुंबा

सौरा, कुठल्याही बाईला असं काही सांगणं तुम्हाला असभ्यपणाचं वाटतं. त्याप्रमाणेच मला तुम्ही हिंदू साधूसाध्वीवर बळजबरीने ब्रह्मचर्य लादल्याचा केलेला आरोप असभ्य वाटतो. आ.न., -गा.पै.

डोकलाम वादावर आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट शब्दांत सरकारची भूमिका मांडली. कोणत्याही समस्येवर युद्ध हा पर्याय असू शकत नाही म्हणूनच आम्ही चर्चेच्या मार्गानेच 'डोकलाम'वर तोडगा काढण्यासाठी आग्रही आहोत. द्विपक्षीय चर्चेतून हा प्रश्न सुटेल. संयम आणि धैर्याने आम्ही या समस्येला सामोरे जात आहोत, असे सुषमा म्हणाल्या. . ( हा गांधी बुद्धांचा देश आहे , हे मोदींचे वाक्य ॲडायचे बाईंकडून राहून गेले. ) नेहरुंच्या हिंदी चिनी भै भै वर टीका करणारे , नेहरु चिनबरोबर कसे हरले याच्यावर ३० - ३० वर्षे विनोद करणारे वाचाळवीर भा ज पे आता बोलतात .. युद्ध नको, चर्चा करू .. ... एक शंका .... चायनाबरोबर युद्ध झाले तर हंबानीच्या नव्या स्कीमला चायना मोबाइल कुठून मिळणार ?

In reply to by babubobade

नेहरुंच्या हिंदी चिनी भै भै वर टीका करणारे , नेहरु चिनबरोबर कसे हरले याच्यावर ३० - ३० वर्षे विनोद करणारे वाचाळवीर भा ज पे आता बोलतात .. युद्ध नको, चर्चा करू ..
आता काय भाजपे हिंदी चिनी भैन भैन म्हणताहेत का? भांडण आहेच म्हणताहेत ना? नेहरू कसे हरले ही आजदेखील विनोदाचीच बाब आहे, आज युद्ध टाळणं वेगळं आणि मूर्खासारखं युद्ध उकरून काढणं, हरणं वेगळं.
चायनाबरोबर युद्ध झाले तर हंबानीच्या नव्या स्कीमला चायना मोबाइल कुठून मिळणार ?
युद्ध क्षणकालिक असतं, व्यापार सातत्याचा असतो. चायनाच्या स्वस्त आयाती थांबण्याचं डिसअ‍ॅडवांटेज प्रत्येकालाच (आणि काही काळ) असेल ना?