Skip to main content

मी गेल्यावर वि़झुनी जातील--

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 19/02/2009 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेल्यावर वि़झुनी जातील रत्नदीप आकाशी मी गेल्यावर थांबून राहील वीज तशी मेघाशी मी गेल्यावर पोर्णिमेसही चंद्र यायचा नाही मी गेल्यावर रवी तळपूनी तेज द्यायचा नाही मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ शूरवीर बलशाली राजे किती जाहले येथे स्मरण तयांचे या जगताला कुठे आज रे होते नररत्नांची ही पहा अवस्था काय आपुले आहे आपुल्यानंतर कशास वेड्या नाव आपुले राहे चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती तरीही वाटे मनास माझ्या नाव इथे होणार गेल्यानंतर दोन अश्रुही कोण तुला देणार
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2552
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

पुष्कराज, मित्रा जिंकलस! चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती फार सुंदर! अजुन येउ दे. सालो

मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ ..... सुंदर सुरेख कविता !!!

>> चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती या ओळी विशेष आवडल्या. भा. रा. तांबेंची 'जन पळभर म्हणतील हाय हाय' आठवली. तसेच सुधीर मोघेंच्या 'दयाघना...'मधील या ओळी आठवल्या -- बालपण उतू गेले तारुण्य नासले वार्धक्य साचले

सुंदर कविता. :) तुमच्या आधीच्या कविता अन् ही कविता - एकदम वेगळी प्रकृती/मांडणी/शब्दयोजना. सुंदर. येऊ द्यात अजून :) मुमुक्षु

वाहवा सुंदर कविता. :) आवडलीच. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984