शब्द,शपथा,भाव,कविता..बेअसर झाले
बोललो नाही कधी पण दुःख तर झाले!
चेहऱ्यावरची न रेषा एकही ढळली
वार काही काळजाच्या खोलवर झाले!
लागला धक्का असा अन् सांडला पेला...
पान दुष्काळी कथेचे ओलसर झाले!
या इथे,खेळायची ती सूर-पारंब्या
हेच अंगण..आज त्याचे माजघर झाले!
तू दिलेली डायरी अन् पीसही जपले
डायरी आकाश माझे..पीस पर झाले!
व्हायचे असतेच ते होवून जाते पण
नेमके कळले कुठे जे आजवर झाले?
—सत्यजित
काव्यरस
वाचने
1537
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली
धन्यवाद संदिपजी!
In reply to आवडली by संदीप-लेले
वाह रे मभाया... !
धन्यवाद!
In reply to वाह रे मभाया... ! by अत्रुप्त आत्मा