Skip to main content

लेगिंग्स ,शॉर्ट्स ......महिलांचे हे काय चालू आहे?????????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी गुरुवार, 30/03/2017 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच एक बातमी वाचनात आली.अमेरीकेतील युनायटेड एअरलाईन्स या विमान सेवेच्या विमानात लेगिंग्स घातलेल्या दोन महीलांना ,inappropriate attire म्हणून विमानात बसू दिले नाही.कंपणीच्या म्हणण्यानुसार लेगिंग्स हे डिसेंट दिसत नाही.पुढे नेहमीप्रमाणे निओफेमिनीस्टांनी इंटरनेटवर धुमाकुळ घातल्यावर कंपणीने सारवासारव केली. यावरुन बरेच दिवस लीहायचा विचार असलेला विषय डोक्यात आला.थोडं स्पष्ट लीहीणार आहे.कदाचीत संस्थळाच्या धोरणात बसेल की नाही सांगता येत नाही.तसा मी जेंडर इक्व्यालीटीवाला असलो तरी काही बाबतीत मला स्त्री पुरुष यांनी ठराविक संकेत पाळावेत असे वाटते. तर,गेल्या काही वर्षापासून लेगिंग्स हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.चाळीशीच्या काही काकवांपासून ते लहान मुलींपर्यंत हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.यात शरीराला पक्षी कमरेपासून खालच्या भागाला अगदी घट्ट बसेल (स्कीन टाईट) असा हा कपड्याचा प्रकार आहे.बरेच जण यावर आक्षेप घेतात याचे कारण यात स्त्रीयांचे अंग प्रत्यांग, अगदीच स्पष्ट बोलायचे तर नितंब, मांड्या ,पोटर्या त्यांच्या मुळ आकारात स्पष्ट दिसतात.बॉडी टाईट अटायर असल्याने हे होते.मुली महीला लेगिंग्सवर शॉर्ट टॉप घालत असल्याने कमरेपासुन घालचा भाग दृगोच्चर होतो.हा प्रकार त्यामुळेच डिसेंन्सीच्या जवळपासही जाणारा नाही.यातून स्त्रीयांचे सौंदर्य न दिसता वासनेला खतपाणी घालणारे शरीरसौष्ठव दिसते. लेगिंग्स घातलेल्या मुली बहुविध वयाच्या पुरुषांचे लक्ष खेचून घेतात.यातून कोणता संदेश जातो पुरुषांकडे? .असे कपडे घालते म्हणजे चालू आहे असा अर्थ झोपडपट्टीछाप पुरुषच न्हवे तर सुशिक्षीत पुरुषही काढतात.त्यामुळे leggings is inappropriate attire हे अमेरीकन विमानकंपणीचे म्हणने मला पटते. आणखी एक प्रकार म्हणजे सलवार कमीज.यावर आक्षेप नाही ,पण यातही आजकान आले आहे.सलवार कमीजपैकी सलवार स्कीन टाईट शिवायचा व कमीजचा वा टॉपचा साइड कट कमरेच्याही वरपर्यंत ठेवायचा ,जेणेकरुण संपुर्ण भाग उघडा पडावा.अश्या महीला मुली दुचाकी चालवताना त्यांचा पुर्ण लेग पीस (हो!,खाजगीत पुरुष हाच शब्द वापरतात्) दिसत राहतो व आंबटशौकीनांची मात्र चंगळ होते. यात आणखी भर म्हणजे आजकालच्या नुकत्याच वयात आलेल्या मुली घरात शॉर्ट्स घालतात,त्या अर्ध्या चड्डीत सोसायटी खालच्या दुकानात सामन अणायला वा रात्री फिरायला जातात.आमच्याच इथे (सातार्यात्) ही परिस्थीती आहे तर पुण्या मुंबईत काय असेल हे मी सांगायला नकोच. हवे ते कपडे घालण्याचे स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक संकेतांना पायदळी तुडवने नव्हे. कपड्यांमुळे बलात्कार होतात यावर माझा विश्वास न्हवता.पण आजकालच्या महीलांचे व मुलींचे कपडे बघितल्यावर मी ही थोडा कंझर्वेटीव विचाराचा झालो आहे,भडक कपडे घालण्याचा बलात्कार होण्याशी थेट संबंध नसला तरी तो एक प्रमुख डिसाईडींग फॅक्टर् आहे या विचाराप्रत मी आलो आहे. हे प्रकटन वाचून डिसेंन्सी आणि वल्गर यातला फरक कुणा महीलेला कळला तर लेख सफल झाला असे म्हणेन.

वाचने 28894
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

लै भारी हो संक्षी सर. तुम्ही कविताच लिहित जावा. तुमच्या वस्त्राला आमचे ठिगळ. कच्च्या कैरीपेक्षा हापूस आंबा भारी आणि वासनेला पडतो टफि भारी, बायांनो मारा हवी तेवढी सेंटे न्यारी, शुक्रजन्य उत्थानाला फाट्यावर मारी आला मिलनाचा काळ, पेटलेल्या ललना जाळ, मी तो वैराग्यरुपी काळ, टफी म्हणे येई तरुणी लाडात, म्हणे तू त्या 'मोजक्यां'त, सजवू लॉजची खोली लाभ होईल अमॄताचा पुरे झाली लाडीगोडी, नेस तू वस्त्रे आधी, जडली वैराग्याची व्याधी आधुनिक ऋषी जणू, टफी सांगावा.

दे रे सगळ्यांना सातारी झटका

लेगीन्स घालणा-यांना अडचण नसेल तर कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये असं माझं मत आहे. मला लेगीन्स आणि वर मस्त टॉप घातलेल्या स्रिया नेहमीच आवडल्या आणि आकर्षक वाटल्या आहेत, हे नम्र नमूद करतो. बाकी चालू द्या ! -दिलीप बिरुटे (जगात जे जे सुंदर असेल त्याचा फ्यान असलेला)

एका चांगल्या विषयाचं पोटेन्शीयल असलेल्या धाग्याचा कचरा करायला मिपाकरांनकडून शिकावं. आणि सातार्याचं नाव् बदनाम कसं होईल? सातारमधल्या स्त्रीयांनी जरी डीसेंट कपडे घातले तर सातारचं नावच होईल.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

धाग्याचा कचरा करायला...
टफि, हे खरयंकी लोक चांगल्या जागी सुद्धा कचरा टाकू शकतात, पण प्रथमतः उपरोक्त धागा लेखाला 'चांगला' या शब्दाची व्याख्या लागू होते का या बद्दल सांशकताच आहेत. डिसेंन्सी आणि वल्गर यातला फरक इतरांना समजावण्या आधी घागा लेखाकास स्वतःस समजलेला आहे का ? हा प्रश्न धागालेखा बद्दल उपस्थित होत असताना धागा लेखक काय स्तुती सुमनांची अपेक्षा करत आहेत किंवा कसे. आपल्या ह्या प्रतिसादावरून तुम्हाला उपरोधिक भाषेतून दाखवून दिलेल्या तार्कीक उणीवा लक्षात येण्यास अडचण जाणवते आहे असे वाटते आहे. फुलांच्या दुकानातून सुगंध येतो म्हणून फुलांची दुकाने लुटण्याचे समर्थन होते का ? भूक लागलेल्या माणसाला फळे आणि खाद्य पदार्थाचे आकर्षण वाटते म्हणून इतरांची फळे किंवा कुणाच्या स्वैपाकघरातून खाद्य पदार्थाचा सुवास आला म्हणून दुसर्‍याचे स्वैपाकघर लुटण्याचे समर्थन होते का ? मानवाला सुंदर वाटणार्‍या सर्व वस्तुंवर बुरखा घालावा असा तुमचा विचार आहे का ? स्त्री आणि पुरषांना खोक्यांचे पोषाख करुन दिले, किंवा चित्रपटात फक्त जोडलेल्या डब्ब्यांप्रमाणे रोबोटला स्त्रीचा आवाज दिला (किंवा पुरुषाचा दिलातरी) परस्पर आकर्षण थांबते का ? पुरुषजरी बुरखा घालून फिरलातरी लक्ष जात नाही का ? कि बुरखा घालून सुद्धा सार्वजनिक ठिकाणी फिरु नये आणि जायचे असेल तर मुलगा/पती/बाप/भाऊ सोबत असावा असा सौदी दृष्टीकोण आपल्या विचारात आहे ? परदेश असो वा भारत बलात्कारा बद्दलच्या गुन्ह्यांबद्दलची सांख्यिकी आणि अभ्यास अधिकतम बलात्कारांच्या केसेस स्त्रीस परिचीत व्यक्तींकडून होतात -बर्‍याचदा घरातल्या व्यक्तीकडूनही- सौदीआशिर्वादीत समाजात स्त्रीच्या जबानीस अर्धेच मुल्य असते असे काहिसे आहे त्या शिवाय त्यांच्यावरच उलटा आरोप होऊन जमिनीत पुरुन दगडांनी ठेचले जाण्यासारख्या शक्यता भयंकर गोष्टीमुळे शिवाय बहुतेक विवाह नातेवाईकांशी त्यामुळे त्यांच्याकडची खरी आकडेवारी बाहेर येत नाही-, त्या शिवाय आकर्षणा पेक्षा वर्चस्व दाखवण्याची इच्छा अथवा अपमानांदीचा बदला घेण्या प्रकारातून होणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असते या बद्दल धागा लेखकाचा काय अभ्यास आहे? सांख्यिकींचा अभ्यास नसेल, आणि धागा लेखक काही चित्रपट पहात असतील तर पारंपारीक भारतीय पोषाख करुनही अथवा बुरखे घालून घरात बसूनही स्त्रीयांना ज्या संकटांना जावे लागते ते लागतेच हे वास्तव धागा लेखक आणि त्यांच्या प्रमाणे विचार करणारी मंडळी का लक्षात घेत नाहीत. तिसरा महत्वाचा भाग सासंकृतिक आहे आवडलेल्या गोष्टीचे कौतुक करु शकता, हवी असल्यास विनंती करु शकता घेण्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही हा स्वमनावर करावयाच्या संस्काराचा भाग आहे. कायद्याचा धाक असतोच आणि असावयास हवा पण केवळ कायदा आहे म्हणून नव्हे बलात्कार न करणारे पुरुष(आणि स्त्रीया) बहुसंख्य असतात आणि संस्कारी असतात म्हणून तसे करत नाहीत. आपण हा धागा काढलाच आहे आपल्या किंवा आपल्यासारखा विचार करणार्‍या कुणा वाचकाचा सुयोग्य संस्कार कुठे ढळू पहात असेल तर त्याला चांगल्या संस्कारावर नेण्याची हिच वेळ आहे असे समजून स्वतःस सुसंस्कृत करुन घेणे चांगले. आजकालच्या स्त्रींयाची अपेक्षा त्यांच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा आदर करुन स्त्रीला स्त्री म्हणून स्विकारावे अशी असते. त्यातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर स्त्रीला स्त्री म्हणून समजून घेणे हे जमत नसेल त्यांनी परस्त्री कडे हवे तर बहीणीच्या अथवा मातेच्या जागी पहावे. संक्षींनी त्यांच्या प्रतिसाद ओळीतम्हटले आहे, 'माझ्यासाठी इथे-तिथे ,कुणी माय, कुणी भगीनी |' मग मातेनी काय पोषाख केला याने तुम्हास फरक पडण्याचे कारण नाही बहीणीच्या अथवा मातेच्या जागी पाहूनही कुणाला आकर्षण वाटत असेल तर कदाचित मनोवैद्यकीय सल्ल्याची समुपदेशनाची गरज आहे पाहून मानसशास्त्रीय तज्ञांकडे संपर्क करणे सयुक्तीक आहे किंवा कसे ते पहावे. सार्वजनिकरित्या दृष्टीस पडलेली अथवा दृष्टीस पडणारी प्रत्येक गोष्ट सार्वजनिक नसते, सार्वजनिकरीत्या उपलब्ध नसते, हा साधा कॉमनसेन्स आहे. (अगदी बुरखाधारी संस्कृतीत सुद्धा) एखादी गोष्ट कितीजरी आवडली असेल तर विनंती करुन मागावी लागते आणि देणार्‍याची मर्जी नसेल तर नकार गोड मानून घ्यावा लागतो. बहुसंख्य स्त्री पुरूष नकार गोड मानून घेऊ शकतात, जे नकार पचवू शकत नाहीत त्यांना कायद्याचा सामना करावा लागतो. वर एका यांच्या प्रतिसादात त्यांनी 'Don’t tell girls what to wear; teach the boys not to stare.' हे सांगितले आहेच. सातारच्या ईश्वरदास यांची संस्कृतीरक्षक धागे काढून पुरोगामी सातारच नाव घालवत असल्याची तक्रार आहे. लास्ट बट नॉट लीस्ट , युनायटेड एअरलाईन्सच्या बातमी बद्दल काढलेला आपला निष्कर्ष अपुर्‍या माहितीचा आणि तार्कीक उणीवेचा परीपाक असावा, वस्तुतः युनायटेड एअरलाईन्सचा नियम त्यांच्या एम्प्लॉयीज (आणि फ्री तिकीट दिलेल्या नातेवाईकांना) फॉर्मल ड्रेस पुरताच मर्यादीत असावा त्यांच्या एम्प्लॉईजनी प्रवासात कॅज्यूअल ड्रेस घालू नये हे समजण्यासारखे आहे. अर्थात दहावर्षाच्या मुलीवर ड्रेसकोडचे बंधन घालणे हा बिनडोकपणाच. असो.

In reply to by माहितगार

देवा , का आपली मेहनत वाया घालवताय .. ते हि या धाग्यावर. बाकी राजकीय आणि इतर धुरळ्यातून मजा मस्ती करायला असे धागे असतात.. यापेक्षा जास्त काही नाही :) वर खेळतेत तशी अंताक्षरी खेळा , सुचल्याच तर वाट्टेल तशी यमक जुळवून कविता करा. आणि आपली चांगली लिहिण्याची / प्रतिसाद देण्याची शक्ती दुसऱ्या सिरीयस धाग्यावर उपयोग करा

माहितगार, Don’t tell girls what to wear; teach the boys not to stare असं वर म्हंटलेलं आहे. पण यासंबंधी उलटा युक्तिवादही होऊ शकतो. बायकांकडे टक लावून पाहिल्याने त्यांच्या अंगास भोकं पडतात का? नाही ना? मग तसं बघितलं तर काय बिघडलं? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

इंटरेस्टिंग प्रश्न आहे! http://www.thehindu.com/news/national/kerala/Staring-at-a-woman-can-lan… नुसार
The provisions were introduced in the penal code after the Nirbhaya incident at New Delhi to deal with sexual harassment and punishment for sexual harassment. If one stares at a woman continually for some time, he could be booked for stalking or even voyeurism,” Mr. Singh told The Hindu.

In reply to by अत्रे

ऑफीशीअल लिगल पोझीशन कदाचित तशी नसावी. * हि क्वोरा वरील चर्चा पहावी * पण ३५४ डी आणि 509 ही स्टॉकींग विरोधी प्रोव्हीजन्स वाकड्या नजरेने बघण्या आधी दोनदा विचार करावा इतपत म्हणजे बर्‍या पैकी स्ट्राँग आहेत.

In reply to by माहितगार

वाकड्या नजर वाकड्या नजर ही खुप व्हेग टर्म आहे ! असो ह्या विषयात चर्चा करण्यात रस राहिलेला नाही पण तरीही एक किस्सा आठवला म्हणुन सांगतो : एकदा आमच्या ग्रुप मधल्या एकदम फ्रँकली बोलणार्‍याला मुलीला मी स्पष्ट विचारले होते की जेव्हा मुली प्लंगिंग नेकलाईन , ट्रान्स्परंट , बॅकलेस, स्किनटाईट वगैरे अस्से काहीसे "रीव्हीलींग" कपडे घालत असतात , तेव्हा पोरांनी पहाणे , इंप्रेस होणे , अ‍ॅप्रोच करणे अपेक्षित असते की पाहु नये , डोळे मिटुन घ्यावेत नजर फिरवुन घ्यावी असे अपेक्षित असते ? तेव्हा तिने उत्तर दिले होते की " काही मोजक्या मुलांनी" पहाणे अपेक्षित असते आणि "इतरांनी" पाहु नये असे अपेक्षित असते ! ज्यांनी पहावे असे वाटत असते पण त्यांनी पाहिले नाही तर तो टाईप २ एरर ( ट्रु निगेटिव्ह ) होतो पण ज्यांनी पाहु नये असे अपेक्षित असते त्यांनी पाहिले की तो टाईप १ एरर ( फॉल्स पॉसिटीटीव्ह) होतो !! ह्या अचाट तर्काला कोपरापासुन दंडवत __________________________/\_____________________________

In reply to by प्रसाद गोडबोले

अरे मग आमच्या टक्याल्या अशी कोणी इ इ इ ईंप्रेस करणारी कशी रे अजुन भेटत नाहीये. तो आशा लावुन बसलाय ना बिचारा!

In reply to by प्रसाद गोडबोले

" काही मोजक्या मुलांनी" पहाणे अपेक्षित असते आणि "इतरांनी" पाहु नये असे अपेक्षित असते ! ज्यांनी पहावे असे वाटत असते पण त्यांनी पाहिले नाही तर तो टाईप २ एरर ( ट्रु निगेटिव्ह ) होतो पण ज्यांनी पाहु नये असे अपेक्षित असते त्यांनी पाहिले की तो टाईप १ एरर ( फॉल्स पॉसिटीटीव्ह) होतो !!
बहुधा असेच काहीसे ते आहे , अर्थात बर्‍याचदा स्वत:स छान वाटावे म्हणूनही पोषाख केले जातात प्रत्येक वेळेस भलता अर्थ काढलाच पाहीजे असे ही नसावे, अर्थात त्यांचे गणित पुरुषांना कसे कळावे हा तुमचा प्रश्न आहे पण २०१३ ची कायद्यातील अमेंडमेंट्स पाहता स्त्री प्रथम स्वत: होऊन तुमच्या जवळ पुरावा असेल असे मागत नाही तो पर्यंत टाईप १ची एरर कायदेशी दृस्ग्ट्या त्यातल्या त्यात सेफ असावी पण तुम्ही टाईप १ची एरर करताय म्हणून टाईप २ची एरर केल्याचा आरोप झाला तर देदाचा धावा करावा हे उत्तम

In reply to by माहितगार

सॉरी वरचे वाक्य नेमके उलटे लिहिले, टाईप २ची एरर कायदेशी दृस्ग्ट्या त्यातल्या त्यात सेफ असावी पण तुम्ही टाईप २ची एरर करताय म्हणून टाईप १ची एरर केल्याचा आरोप झाला तर देदाचा धावा करावा हे उत्तम असे वाचावे

In reply to by सूड

स्वतःच्या रिक्स वर शेयर करा ... परवानगी आहे :) पण पुनरेकवार हे पहा : सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् । नासत्यं च प्रियं ब्रूयात् एष धर्मः सनातनः ॥

In reply to by माहितगार

धन्यवाद. http://devgan.in/ipc/section/354/ यात अजून माहिती मिळाली. त्यात तुम्ही कोना स्त्रीला फॉलो / कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असाल (तिला इंटरेस्ट नसताना) तर तो गुन्हा आहे असे म्हटले आहे. पण यात फक्त "वाकड्या नजरेने बघणे" याचा समावेश होतो असे वाटत नाही. https://indiankanoon.org/doc/68146/ प्रमाणे "वाकड्या नजरेने बघणे" चा अंतर्भाव खालील प्रकारात टाकता येईल असे वाटते
gesture or act intended to insult the modesty of a woman

In reply to by अत्रे

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. माझ्या प्रतिसादात मी ते स्टॉकींबद्दल आहे असे म्हटले आहे. बेसिकली सांगण्याचा मुद्दा कायदा खूप स्ट्रिक्ट आहेच त्या शिवाय स्त्रीशी केलेल्या कोणत्याही संपर्कास अधिक सहजतेने अनवाँटेडचा शिक्का मारण्याचा आधिकार स्त्रीयांना पोहोचतो आहे; की ज्यामुळे वाकड्या नजरेने पहाणेचा समावेश कायद्यात नसला तरी तुम्ही म्हणता तसे अन वाँटेड जेश्चर म्हटले की संपले, 'वाकड्या नजरेने' हा शब्द प्रयोग मी 'पापी नजरेने' (संदर्भ दातेकर्वे शब्दकोश) अशा अर्थाने आणि सोबतची 'वाकडी पावले/कृती' इंप्लिसीट धरुन केला.

बरेच दिवस ट्फिंचे दर्शन झाले नव्हते.. त्यामुळे धागालेखकाचे नाव न वाचता धागा वाचला. पण जसाजसा धागा वाचत पुढे गेलो तशी तशी शंका यायला लागली, म्हणून लेखकाचे नाव वाचले. आणि खात्रीच पटली.. शुभेच्छा..

लेखातील मतांशी बर्‍याच अंशी सहमत आहे आम्ही रस्त्यावर ना*ड्या नाचू , पण पुरुषानी शान्त राहावे ,अशी जर कोणा निओफॅमिनिस्ट / महिलान्ची मते असतील , तर जमणार नाही या जगात नैतिकता कशासाठी आहे त्याचा आधी विचार करा . समाजव्यवस्था सुरळीत चालावी यासाठी नीति धर्म शास्त्रे यांची निर्मिती झाली असे असताना "मॉरल पोलिसिंग" ला नाके मुरडणार्‍या बालिकानी आपण स्वतःसाठीच खड्डा खणत आहोत याचे भान राखावे , उद्या खड्ड्यात पडल्यावर जगाच्या नावाने बोंब मारून काहीच उपयोग होणार नाही सुज्ञास अधिक सांगणे नलगे

नैतिक कशास म्हणावे ? या देशात गुरुंनी सन्मान्य मान्यता देऊन नग्न स्त्री संत होऊन गेल्या आहेत, गावातील पुरुषांनी कोणत्याही त्रास न देता ग्राम देवता हनुमानास नग्नपणे दोक्यावरुन पाणी नेऊन अभिषेक झाले आहेत, पाऊस नाही पडला तर शेतात काही प्रदेशातील आदीवासी स्त्रीयांनी त्यांच्या समाजातील पुरुषांची अडकाठी न येता नग्न नृत्येही केली आणि समाजाने तरीही त्यांना बाधा न येऊ देणारे पुरुष सुसंस्कृत आणि नैतिक ? कि स्त्रीयांना त्यांच्या व्यक्तिगत निवडींना नाकारुन धाकात ठेऊ इच्छिणारे तालीबानी पुरुष अधिक नैतीक? बालिकांपेक्षा पुरुषॉफरच अधिक असुरक्षीत का बरे ? बालिका सुज्ञ आहेत यावर विश्वास असेल तर रस्ता कोणता आणि खड्डा कोणता आणि खड्डे दाखवणारा सुयोग्य मार्गदर्शक त्यांच्या त्या निवडतील आणि निवडतही असतात. हा धागा वाचण्यासाठी आणि उत्तरे देण्यासाठी कोणी बालीका आली आहे असे कुणाच्या पहाण्यात आहे का ? कशाला स्विकारावे आणि कशाला फाट्यावर मारावे हे त्यांनाही समजत असावे. नग्न स्त्रीस सुद्धा सुरक्षेची आश्वासन देऊ शकेल अशी संस्कृती आणि संस्कार जोपासावेत किंवा कसे ? समाजाने काळजी कुणाच्या नैतिकतेची करावी , स्त्रीला सर्व परिस्थितीत सुरक्षेची आश्वस्तता न देऊ इच्छणार्‍या बाळगणार्‍या मेंदूंत शिरलेल्या असंस्कृत विचारांची आणि चुकींच्या कृतीची की अशा विचार आणि गैरकृतीस कारण शोधणार्‍या अपप्रवृत्तींची पाठराखण करावी ? याचा सुज्ञ वाचक नक्कीच विचार करतील.

In reply to by माहितगार

नग्न स्त्रीस सुद्धा सुरक्षेची आश्वासन देऊ शकेल अशी संस्कृती आणि संस्कार जोपासावेत
अजिबात जमणार नाही तुम्ही भले अशा कल्पनाविलासात दन्ग राहा ... पण फेमिनिस्टास माझे असे स्वच्छ सांगणे आहे की उद्या नग्न अवस्थेत प्रक्षोभक वर्तन करीत रस्त्याने गेला तर तुम्ही सहन कराल का? जेन्डर इक्व्यालिटी हवी तर आपल्यापुरती सोयिस्कर असून चालणार नाही इफ यू विल वियर प्रवोकेटिव्ह ड्रेसेस , डोन्ट ब्लेम अदर्स इफ यू आर मोलेस्टेड!

In reply to by झपाटलेला फिलॉसॉफर

की उद्या नग्न अवस्थेत *एखादा पुरुष* प्रक्षोभक वर्तन करीत रस्त्याने गेला तर तुम्ही सहन कराल का? जेन्डर इक्व्यालिटी हवी तर आपल्यापुरती सोयिस्कर असून चालणार नाही

In reply to by झपाटलेला फिलॉसॉफर

की उद्या नग्न अवस्थेत *एखादा पुरुष* प्रक्षोभक वर्तन करीत रस्त्याने गेला तर तुम्ही सहन कराल का? जेन्डर इक्व्यालिटी हवी तर आपल्यापुरती सोयिस्कर असून चालणार नाही
इथे सुद्धा प्रक्षोभक शब्दाची व्याख्या सापेक्षच ठरते, भारतात विवीध पंथांमध्ये विवीध साधू संत नग्न रहात आले आले आहेत, लकुलीशासारखेसुद्धा अवतारी पुरुष होऊन गेले आणि त्यांच्या पावित्र्याचा सहसा आदरच केला गेला आहे. यात सोईस्करपणाचा संबंध कुठे आहे उलटपक्षी सोईस्करपणाच्या आरोपास संस्कृतीच्या कवचा आडून असंस्कृततेचे समरथन करणारे भक्षकच अधिक पात्र असतात किंवा कसे हे अभ्यासण्याची गरज असावी.

In reply to by झपाटलेला फिलॉसॉफर

मान ना मान मै तेरा मेह्ममान ? प्रोव्होकेटीव्हची व्याख्या सापेक्ष आहे हे वर इतर सदस्यांच्या उपरोधपुर्ण प्रतिसादातून लक्षात आले नाही का ? स्त्रीयांना बुरखा घालण्यास लावणारे बुरखेतरांसाठी हिच भाषा वापरतात बुरखा न घातलेली मग कितीही पोषाख केलेली स्त्री (किंवा पुरुष सुद्धा) तथाकथीत प्रोव्होकेटीव्ह असू शकतो. सगळ शरीर झाकल फक्त डोळे उघडे ठेवले तरी प्रोव्होकेटीव्ह असू शकतात. डोळे बांधले तरी आवाज पण प्रोव्होकेटीव्ह असू शकतो. आवाज बंद केला बुरख्यात पुरुष फिरवला आणि आत माहित नसेल कोण आहे तरीही बुरखाधारीचे अस्तीत्वही प्रोव्होकेटीव्ह वाटू शकते. दुसरे सभ्य ड्रेसेससुद्धा तुमच्या व्याख्येत नग्नतेत मोडत असतील तर त्याला कोण काय करू शकेल. आणि सरते शेवटी कायदा हातात घेतल्या मुळे स्त्रीचा, स्त्रीच्या कुटूंबीयांचा जशास आणि कायद्याचा बडगा आल्यामुळे जे परिणाम होतात त्याबद्दलही ब्लेम करण्यास अर्थ नसतो. (सगळेच कुटूंबीय हातावर हात धरुन बसत नाहीत आणि त्यांनीही कायदा हातात घेणार्‍यास जशास तशाने उत्तर द्यायचे ठरवले तर हे शूरवीर कुठे पहातील ? )

चोरी हा गुन्हाच आहे त्याबद्दल शंका नाहीच. आणि आपले घर उघडे ठेआणि, त्यातील संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन करणे हे कायद्याने किंवा नैतिकतेने चूक नसेलही परंतु ते चोरांना निमंत्रण देणारे ठरते हा विवेक असावा एवढेच म्हणणे आहे. "कड्या कुलुपे लावूनही" चोर्या होतातच पण म्हणून घराला कुलूप न लावता गावाला जाणे कितपत शहाणपणचे आहे हे प्रत्येकाने स्वतः ठरवावे.

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, हाच तर्क संगणक व त्यावरील विषाणूंनाही लागू पडतो. झाकून ठेवायचा डेटा उघड्यावर (सा)पडला तर ताबडतोब चोरला व विकला जातो. आ.न., -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

मानवी संस्कृती असुरक्षीततेकडून सुरक्षीततेकडे प्रवास करत आली आहे, हा प्रवास माणसाच्या सुसंस्कृत होत जाण्याने वाल्याचा वाल्मिकी बनवत, प्रसंगी रावण दुर्योधन अशा दुष्प्रवृत्तींवर चाप बसवून होत आला आहे पण चोरी आणि दरोडेखोरीच्या समर्थनाने अथवा त्याची दहशत स्विकारुन नव्हे. इथे चर्चा केवळ संपत्तीची नव्हे हाडा मांसाच्या व्यक्तिची होत आहे ज्यात त्याच्या त्वचेला ऊन पाऊस वारा प्राणवायू मिळवण्याचे तसेच पोषाखातून स्वतःचा आत्मविश्वास जोपासता येणार्‍या स्वातंत्र्याचा समावेश असावा, जेथे निवड स्वातंत्र्यच नसेल सभ्यतेचे बुरखे घातलेल्या चोरांचे समर्थन अथवा दहशत असेल अशा संस्कृतीत व्यक्तिंची आत्मविश्वास आत्मप्रतिष्ठा आणि मन मारले जात असल्यास व्यक्ति व्यक्तिंनी मिळून बनलेला सबंध समाजच सांस्कृतीक उन्नयना वाचून वंचीत राहण्याची शक्यता असते. व्यक्ति स्वातंत्र्य नाकारणे सांस्कृतिक प्रगतीचे नव्हे सांस्कृतीक विकासाच्या पायातील बेड्या आहेत त्या बेड्या शक्य तेवढ्या कापून साचलेल्या तळ्यातील पाण्याला प्रवाहीपणे वाहण्याची संधी देण्यासाठी लागणारा विवेक ही नाण्याची दुसरी बाजू असावी किंवा कसे.

In reply to by सुबोध खरे

खतरनाक उपमा डॉक्टर साहेब ....पण हे असे स्पष्ट लिहिले की " तुम्ही चोरी करण्याच्या मनोवृत्तीचे समर्थन करत आहात" असे आरोप होतात .

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्ही चोरी करण्याच्या मनोवृत्तीस फेससेव्हर नक्कीच मिळतो नेमक्या डॉक्टरांच्या प्रतिसादानंतर धागालेखक महाशय 'वावा' करत वापस आले आणि घागरीवरून पाणि वाहून गेल्याचे निष्पन्न झाले त्यात काय ते समजावे.

माहितगार,
पोषाखातून स्वतःचा आत्मविश्वास जोपासता येणार्‍या स्वातंत्र्याचा समावेश असावा
लो कट ब्लाऊज परिधान करून आत्मविश्वासाची जोपासना होते हे कळल्याने स्वर्ग म्हणतात तो केवळ दोन बोटेच उरला आहे आम्हांस! उगीच नाही शास्त्रेपुराणे पुण्य कमवायला सांगीत हो!! आपला नम्र, -गामाशास्त्री पंडित

In reply to by गामा पैलवान

पोषाख परिधानाची जी काही अनेक कारणे असू शकतात त्यात अगदी स्वतःचा आत्मविश्वास दिसून येतो. पहाणार्‍यांच्या काहींचा आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीच्या आत्मविश्वासाने डळमळीत होत असेल तर ज्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो त्यांनी जिथून आत्मविश्वास डळमळीत होतो तिकडे न बघण्याचे काळजी घेणे कदाचित श्रेयस्कर असावे.

हा धागा वाचून श्री संत अक्की कुमारांच्या गरम मसालेदार जन्मावतारात असतानाच्या "तुम लडकी को इज्जत दो..." अशी सुरवात असणार्या सुवचनाची आठवण झाली =))