आर्थिक स्वावलंबन - स्वप्नांच्या वाटेवर
"ए राजा, ऊठ"
"झोपू दे गं आई अजून थोडं..."
"अरे, शाळेत जायला उशीर होईल."
"होऊ दे.
दररोज मी का जायचं शाळेत याची दोन चांगली कारणं दे, तरच उठतो."
"एक म्हणजे तू आता पन्नास वर्षांचा घोडा आहेस आणि दुसरं म्हणजे तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस." हा विनोद आपण पूर्वी ऐकला असेल आणि हसून सोडून दिला असेल किंवा मनात असंही आलं असेल कदाचित की हो ना राव, मलाही नाही जायचं रोज उठून काम करायला.
मला माझा आवडता छंद जोपासायचा आहे, माझ्या जोडीदाराबरोबर, छकुल्यांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे, हे करायचं आहे आणि ते करायचं आहे..... पण जगण्यासाठी आणि कुटुंबाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी नोकरी तर केलीच पाहिजे. मग काय, लागतो आपण त्याच मार्गाला आणि करतो नोकरी इमानेइतबारे आयुष्यभर. कारण आयुष्यभर काम केलं, तरच आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होऊ शकतील असा एक पगडा आपल्या मनावर असतो. माझ्या कुटुंबासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निवृत्तीनंतरच्या आरामदायक जीवनासाठी मला आत्ता झटून काम केलंच पाहिजे ह्या विचाराचं मनावर इतकं पक्कं गारूड असतं की नोकरी कायमस्वरूपी टिकवण्याच्या ध्यासाने आपण पछाडले जातो. मग ऑफिसमधला वेळ वाढतो, प्राणप्रिय छंदांनाही आठवड्यातून एकदा / महिन्यातून एकदा अशी टाइमलाईन येते. माझ्या आवडत्या गोष्टींना मला वेळ द्यायचा आहे, कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायचा आहे, मनसोक्त भटकायचं आहे आणि हवं तेव्हा हवं ते करायचं आहे हे विचार 'निवृत्तीनंतर करू, तेव्हा वेळच वेळ असेल' असं म्हणत हळूहळू बाजूला पडतात.
खरं तर आपण निवृत्तीपर्यंत काम का करतो? कारण बऱ्याचदा आपण गृहीतच धरलेलं असतं की आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्यभरात ज्या काही सगळ्या गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला नियमानुसार ठरवून दिलेल्या निवृत्तीचा दिवस येईपर्यंत काम केलंच पाहिजे. अशा वेळी जर तुम्हाला कोणी म्हणालं की "तुम्ही तुमच्या तिशीत, चाळीशीत किंवा आपण काम करण्याचं जे सर्वमान्य वय ठरवलं आहे, त्यापेक्षा लवकरच नोकरी सोडून देऊ शकता आणि आणि जे काही इमले मनात रचले आहेत, ते पूर्ण करू शकता", तर तुम्ही अशा वक्तव्यावर काय म्हणाल? "कसं शक्य आहे हे?" "सडाफटिंग लोकांना शक्य असेल, संसारी लोकांना कसं जमेल?" , "हम्म्म... असेल, पण मला शक्य होईल असं मला वाटत नाही" असं काहीतरी, की "खरंच, काय बरं करावं लागेल यासाठी? बघू या तरी आपल्याला जमतंय का?" असं काही? चला तर मग बघूच या हा प्रकार काय आहे.
आपण नोकरी करतो ते दर महिना ठरावीक उत्पन्न मिळवण्यासाठी आणि भविष्यातल्या आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी. मग नोकरी न करता असं ठरावीक उत्पन्न आपल्याला मिळालं, तर त्याचा अर्थ आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीवर विसंबून राहायची गरज नाही. आर्थिक बाबतीत आता आपण स्वावलंबी झालो. म्हणजेच आपण जर नोकरी ही केवळ अर्थार्जनासाठी करत असू, तर ती करण्याची काही गरज अशा वेळी राहत नाही. 'आर्थिक स्वावलंबन' हे आपलं अंतिम ध्येय नसून आपल्याला गोष्टी हव्या तेव्हा करता येणं हे आहे. अर्थातच आर्थिक स्वावलंबन हा अंतिम ध्येय गाठण्यासाठीचा रस्ता आहे. मात्र आर्थिक स्वावलंबनापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक टप्पे आहेत. सगळ्यात आधी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही आघाड्यांवर कोणकोणत्या गोष्टींना प्राध्यान्य आहे हे ठरवणं. प्राधान्य असणाऱ्या या गोष्टींपैकी पैसा किती गोष्टींसाठी लागणार आहे, किती लागणार आहे आणि कधी लागणार आहे? याप्रमाणे नजीकच्या आणि लांबच्या काळातल्या गरजा यांसाठी किती रक्कम लागेल? अशा प्रकारे साधारण रूपरेषा ठरली की त्यानुसार पैशाची तरतूद कशी करायची ते बघता येतं.
आमच्या बाबतीत सांगायचं झालं, तर आम्ही तसं उशिराच - म्हणजे तिशी ओलांडताना आर्थिक स्वावलंबन मिळवण्याचा विचार करू लागलो. मी मुलीच्या जन्माच्या वेळी भारतात गेले असताना आम्ही - म्हणजे मुख्यत्वे माझा नवरा गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधण्यासाठी बरीच पुस्तकं वाचत होता आणि आंतरजालावरही शोध घेत होता. लग्नापूर्वी त्याने शेअर मार्केटमध्ये आणि मी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली होती, पण ती फारशी काही फलदायी ठरली नव्हती. गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय शोधायला हवा, ही जाणीव झाल्यामुळे जास्त परतावा देणाऱ्या आणि तुलनेने भरवशाच्या अशा गुंतवणूक पर्यायांचा शोध सुरू झाला होता.
आमच्या गुंतवणुकीची गाडी योग्य मार्गाला लावण्याचं सगळं श्रेय मी माझ्या नवऱ्याला देते. वेळोवेळी वेगवेगळी पुस्तकं आणि जालावरच्या या विषयावरचे ब्लॉग्स वाचून त्यानेच आमच्या बचतीची आणि गुंतवणुकीची रूपरेषा ठरवली. इतकंच नाही, तर या सगळ्या किचकट गोष्टी मला सोप्या भाषेत समजावून सांगून पैशाच्या बाबतीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयप्रक्रियेत नेहमी माझं मतही घेतलं. यातूनच आम्हाला ओळख झाली ती आर्थिक स्वावलंबनाची आणि मग सुरू झाला प्रवास एका ध्येयाकडे. आपण नोकरी का करतोय असा प्रश्न स्वतःला विचारला, तेव्हा खरं तर 'एवढं शिकलो ते यासाठीच ना? नाहीतर मग कशाला केली असती एवढी धडपड?' हा पहिला विचार होता. पण योगायोग असा की दोघंही ज्या विषयाचे पदवीधर आहोत, त्या विषयाशी संबंधित अगदी कमी काम करतो. निदान माझा नवरा त्याच्या पदव्युत्तर क्षेत्रात काम करतो. माझ्या कामाचा आणि माझ्या पदवीच्या विषयाचा आता काही संबंध उरलेला नाही. अनेकांचं होत असेल असं आणि ते ठरवून असेल तर उत्तमच आहे. पण माझ्या बाबतीत तरी अर्थार्जन या एकाच हेतूने मी नोकरीची कास धरलेली आहे आणि मला नोकरी न करण्याचा पर्याय मिळाला तर काय करता येईल, अशा चार-पाच गोष्टी तरी मनात नक्कीच आहेत. नवऱ्याला त्याचं काम आवडतं, पण अमेरिकेत आल्यापासून त्याने काही छंद जोपासले आहेत, ज्यासाठी जास्त वेळ द्यायला त्याला नक्कीच आवडेल. शिवाय आमची मुलगी हे मुख्य कारण आहेच. आम्हाला तिला भरपूर वेळ द्यायचा आहे, तिच्यासोबत भरपूर भटकायचं आहे आणि तिला अनुभवसमृद्ध करून त्यातून तिचं जीवन फुलवायचं आहे.... असा सगळा विचार करता करता लक्षात आलं की हे सगळं करायचं, तर आधी आर्थिक स्वावलंबन हवं.
सुरुवात केली ती आमचा महिन्याचा खर्च लिहून काढण्यापासून. किती खर्च होतो आणि किती बचत होते, याचा साधारण अंदाज घेतला. बचत वाढवण्यासाठी खर्चात कुठे कुठे कपात करता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिलं. शिवाय कंपनीकडून उपलब्ध असलेल्या सगळ्या सोयींचा पुरेपूर फायदा घेतला. सगळ्या टॅक्सपूर्व खात्यांची मर्यादा कमाल केली. आमच्या सुदैवाने अमेरिकेत आम्ही ज्या गावात राहत होतो, ते साधारण पन्नास हजार लोकवस्तीचं गाव होतं, त्यामुळे भाड्याने घर घेऊन राहण्याचा खर्च आणि रोजचा कामासाठी प्रवास वगैरे गोष्टींसाठी लागणारा खर्च मोठ्या शहरात राहण्याच्या मानाने कमी होता. इथे आमच्या मित्रपरिवारातली बरीच कुटुंबं आमच्या दोघांसारखीच एकाच कंपनीत काम करणारी होती. एकाच कंपनीत असलो, तरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑफिस लोकेशन्समध्ये कामाला होतो. गाव छोटं असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक अगदी नगण्य म्हणण्याइतपत होती. तासाला एक बस अशी बसची वारंवारता होती. आमच्यासारख्याच परिस्थितीत असणाऱ्या इतर बऱ्याच कुटुंबांमध्ये नवरा-बायको दोघांकडे वेगवेगळ्या गाड्या होत्या. आम्ही मात्र दोघांत एकच गाडी वापरायचा निर्णय घेतला. गाव छोटं असल्यामुळे एक जण दुसऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये सोडून सहज आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत जाऊ शकत होता. क्वचित प्रसंगी थोडी कसरत करावी लागली, तरी जोपर्यंत आम्ही तिथे राहत होतो, तोपर्यंत ही व्यवस्था आमच्यासाठी कामी आली. शिवाय तिथे नोकरी सुरू झाली की लगेच घर घेण्याचा सर्वसाधारण कल होता. दोघांना नोकरी आहे, घराची किंमत आवाक्यात, गृहकर्ज कमी व्याजदरात उपलब्ध आहेत, शिवाय घरभाडं देत छोट्या अपार्टमेंटमध्ये राहण्यापेक्षा महिन्याला तेवढाच हप्ता भरून स्वतःच्या मोठ्या घरात राहता येत असेल तर घर का घेऊ नये? असा सर्वसाधारण समज होता. यामुळे आम्हाला घर न घेण्यावरून बरीच विचारणा होता असे. पण घर घेणं म्हणजे एक मोठी आर्थिक जबाबदारी घेण्यासारखे होतं. थोडी शोधाशोध केल्यावर न्यूयॉर्क टाइम्सचा एक धागा सापडला, ज्यात त्यांनी घर भाड्याने घ्यावं की विकत याचा निर्णय घेण्यासाठी एक छोटा आराखडा तयार केला होता. एका तक्त्यात घर विकत घेणं आणि भाड्याने घेणं या संदर्भातले वेगवेगळे आकडे (उदा., वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स, विकत घेऊ पाहणाऱ्या घराचा प्रकार, घरभाडे, राहण्याचं ठिकाण इ.) टाकले, की त्या गावात घर विकत घ्यायचं असेल तर ती गुंतवणूक फलदायी ठरण्यासाठी साधारण किती वर्षं त्या घरात राहणं आवश्यक आहे, याचे आकडे मिळत होते. त्यानुसार आम्ही घर घेतलं, तर आम्हाला त्या ठिकाणी साधारण पाच-सहा वर्षं तरी राहणं गरजेचं होतं. अमेरिकेत मिडवेस्ट भागातल्या या ठिकाणी आम्ही तेवढा काळ राहू याची आम्हाला खातरी नव्हती, शिवाय कामाच्या ठिकाणी दर दोन-तीन वर्षांतून होणारी मनुष्यबळ कपात यासारख्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही घर विकत न घेण्याचाच निर्णय घेतला. या झाल्या मोठ्या गोष्टी. आम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही बचत कशी होईल ते पाहतो. मोबाइल फोनचं बिल आम्हा दोघांचं मिळून साधारण महिन्याला शंभर डॉलर येत असे. थोडी शोधाशोध करून प्लॅन आणि सुविधा देणारी कंपनी बदलून ते चाळीसवर आणलं. यात एक विशिष्ट प्रकारचा फोनच वापरायचा आणि किती डेटा वापरायचा यावर मर्यादा होत्या, पण आमच्या आवश्यक गरजा यातून पूर्ण होत होत्या, त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीला मुकतोय असं कधीच वाटलं नाही. शिवाय शक्य होईल तेवढं घरून डबा घेऊन जाणं आणि कँटीनमध्ये विकत घेऊन खाणं टाळलं. याचा दुहेरी फायदा होतो - पैसे तर वाचतातच, त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जास्त आरोग्यदायक गोष्टीही खाल्ल्या जातात. अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी करून खर्चावर मर्यादा आणता येते. प्रत्येक गोष्ट करताना 'हे आपल्या ध्येयाला धरून आहे ना?' असा प्रश्न करत असतो. त्यामुळे वायफळ खर्चाला आपोआप चाप बसतो.
याचा अर्थ असा नाही की आम्ही काही सगळी मजा बंद करून फक्त पै न पै साठवत बसलो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, कोणत्या गोष्टीला प्रधान्य द्यायचं त्याची एक साधारण यादी सुरुवातीलाच तयार केली होती. त्यात सहकुटुंब वर्षातून एकदा एक मोठी सहल आणि वीकान्ताला जवळपास भटकंती, कँम्पिंग आणि नवऱ्याच्या रॉक क्लायंबिंग आणि माउंटेनिअरिंग या छंदासाठी वाजवी खर्च करण्याची आमची तयारी होती. या सगळ्या गोष्टींसाठी साहित्य घेताना आम्ही नेहमी उत्तम दर्जाचंच घेतो. पण जिथे पैसे वाचवणं शक्य आहे, तिथे या गोष्टी करतानाही वाचवतो. उदा., चांगलं साहित्य घेतानाही कुठे आणि कधी डिस्काउंट मिळतं ते बघून तेव्हा ते घेतो. सहली ठरवताना बऱ्याच आधी ठरवतो, त्यामुळे विमान तिकिटावर जास्तीचा खर्च वाचतो. शिवाय हॉटेल्स बुक करताना 'एअर बी अँड बी'सारख्या साइटवरून शोध घेऊन जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल ते बघतो. बाहेरच्या देशात गेलो, तरी लोकल ट्रान्स्पोर्टने फिरणं, स्वयंपाक करण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी राहणं अशा गोष्टी केल्याने कमी खर्चात नवनवीन देश आणि जागा पाहण्याची संधीदेखील मिळत आहे. वर्षातून एकदा आम्ही सगळ्या गुंतवणुकीचा आणि खर्चाचा आढावा घेतो. प्रत्येक गोष्ट करतानाच आपल्या अंतिम ध्येयाला अनुसरूनच ही गोष्ट आहे ना, याचा काटेकोरपणे विचार करतो.
वेगवेगळ्या ठिकाणी राहून तिथले अनुभव घेण्यावर कुटुंब म्हणून आमचा कल आहे. शिवाय आउटडोअर गोष्टी करण्याकडे जास्त ओढा असल्यामुळे अशा संधी त्या मानाने कमी उपलब्ध असणाऱ्या मिडवेस्टमधून बाहेर पडण्याचा आमचा विचार चालू होता. आमचं आर्थिक गणित कोलमडू न देता वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून अखेर आम्ही सहा महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये स्थलांतरित झालो. त्या वेळी आढावा घेताना लक्षात आलं की आपण आर्थिक स्वावलंबनाच्या जवळ येऊन पोहोचलो आहे. इथेसुद्धा एक गाडी, ऑफिसच्या जवळच भाड्याने घर या गोष्टी तशाच चालू ठेवल्या आहेत. कॅनडामध्ये गुंतवणुकीचे काय चांगले पर्याय आहेत याचा शोध चालू आहे. इथे काही वर्षं राहिल्यानंतर कदाचित आणखी काही गोष्टी कळतील किंवा नव्या संधी समोर येतील आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल कदाचित बदलतही जाईल. आमच्या सध्याच्या वार्षिक खर्चाच्या २५ पट रक्कम आमच्या पोर्टफोलिओमध्ये जमा झाली की आम्हाला नोकरी संदर्भात वेगवेगळे प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य मिळेल हे नक्की. आम्ही चाळीशी गाठेपर्यंत, म्हणजे आणखी पाच-सहा वर्षांत हे होईल अशी अपेक्षा आहे.
एक मजेचा भाग म्हणून आपल्याला आर्थिक स्वावलंबन मिळवायला किती वेळ लागेल हे इथे चटकन बघता येईल. हे गणित कदाचित फक्त अमेरिकेत लागू असेल, भारतात यातल्या गणितात थोडा फार बदल होईल, पण मूळ संकल्पना तशीच राहील.
शेवटी हा लेख म्हणजे हिमनगाचं एक टोक आहे. एखाद्याला यातली संकल्पना आवडलीच, तर त्यांनी स्वत: अभ्यास करून यातल्या खाचाखोचा जाणून घ्यायला हव्यात. अमुक अमुक एक गोष्ट करा आणि तुम्ही खातरीशीररित्या आर्थिक दृष्टीने लवकरात लवकर स्वावलंबी व्हाल असं मी सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या गरजा, इच्छा, आकांक्षा वेगवेगळ्या. पैसा साठवणं हे अंतिम ध्येय नसून आपल्याला हवी ती गोष्ट करण्याचं स्वतंत्र्य मिळवणं हे आहे. आम्ही निवडलेला मार्ग हा आम्हाला योग्य वाटलेला मार्ग आहे. प्रत्येकाला तोच पटेल असं नाही. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे ज्याचं त्यानं स्वत:च ठरवायचं आहे.
मला जरी या विषयातलं खूप जास्त ज्ञान नसलं, तरी आम्ही (म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे मुख्यत्वे माझ्या नवऱ्याने) खालील पुस्तकं आणि ब्लॉग्ज फोरम्स वाचले / अजूनही वाचत आहोत :
आर्थिक स्वावलंबन, मुदतपूर्व निवृत्ती आणि गुंतवणूक यासाठी वाचलेल्या पुस्तकांची यादी.
- इंटेलिजंट इन्व्हेस्टर - बेंजामिन ग्रॅहम
- बॉगलहेड्स,गाईड टु इन्व्हेस्टींग
- कॉमन स्टॉक्स फॉर अनकॉमन प्रॉफिट्स
- अर्ली रिटायरमेंट एक्स्ट्रीम
- सिंपल पाथ टू वेल्थ
- द वेल्दी बार्बर
- द वेल्दी रेंटर
- हाऊ टू रिटायर हॅपी, वाईल्ड अँड फ्री
यू एस ब्लॉग्स / फोरम्स
१.एमएमएम
२. बॉगलहेड्स फोरम
३. मॅडफिएन्टिस्ट
भारतातल्या गुंतवणुकीसाठी आम्ही खालील संस्थळांचा वापर केला :
१. जागो इन्व्हेस्टर
२. सुब्रमनी
३. फ्री फिन कॅल
कॅनडा ब्लॉग्स / फोरम्स
१. फायनान्शिअल विस्डम
२. केनेडिअन काउच पोटेटो
तुम्हीसुद्धा असं काही करत असाल किंवा करायची इच्छा असेल, तर तुमचे अनुभव इथे शेअर करा. या वाटचालीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचंही स्वागत आहे.
धन्यवाद!

वाचने
74483
वाचनखूण
प्रतिक्रिया
140
In reply to संक्षी by ट्रेड मार्क
पितळ उघडं पडलं!
हा तुमचा दिनक्रम नाही.२)स्वतःची लाल करणाऱ्यांवर चढायला पण मला खूप आवडतं, जे मी तुम्हाला दिलेले प्रतिसाद वाचून कळलंच असेल.या वाक्यामुळे तुमचा आयडी जाऊ शकेल ! अशी भाषा दोनच गोष्टी दर्शवते ; एक उद्विग्नता आणि दोन अपब्रींगींग ! इतक्या खालच्या लेवलला मला उतरता येत नाही. सो लेट मी कन्क्लूड, १) विकेंडस आणि रजा यामधे जमेल तेवढी मजा करणं यात काहीही विषेश नाही. गोरगरीब सुद्धा स्वतःच्या एपतीप्रमाणे ते करतातच. २) आर्थिक स्वातंत्र्य जर सर्वांगिण स्वातंत्र्य देऊ शकले नाही तर व्यर्थ आहे. सर्वांगिण स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक दिवस आणि संपूर्ण आयुष्य मनसोक्त जगण्याचं स्वातंत्र्य. ते लेखात अपेक्षित असलेलं आणि तुम्ही मिळवलेलं लिमीटेड स्वातंत्र्य नाही. ३) खरं तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक विवंचनेपासून स्वातंत्र्य. ज्याची नजर अजूनही पैश्यावरच आहे आणि ज्याच्या दिवसाचा प्राइम टाईम अर्थार्जनासाठीच जातो, तो अजूनही आर्थिक गुलामीतच आहे. ४) ज्याच्या दृष्टीनं स्वेच्छा प्रथमआणि पैसा दुय्यम (नीट वाचा, दुय्यम. निरुपयोगी नाही), तो खरा आर्थिक दृष्टीनं स्वतंत्र. थोडक्यात, सर्वांगिण स्वातंत्र्य म्हणजे खुला आणि मुक्त दिनक्रम. मी मागे म्हटल्याप्रमाणेअशा व्यक्तीची प्रत्येक रात्र सॅटरडे नाइट आणि प्रत्येक दिवस संडे असतो.अशी व्यक्ती प्रत्येक दिवस इहलोकी सहलीला आल्यासारखा जगते ! ५) असं सर्वांगिण स्वातंत्र्य मिळवायला कमालीची आकलन क्षमता हवी. ज्या आयुष्यात पुढच्या श्वासाचा भरवसा नाही तिथे भविष्यकालीन स्वातंत्र्याची अपेक्षा मूढता आहे. आणि जिथे साहस नाही तिथे पैसा केवळ मानसिक दिलासा आहे. जे स्वातंत्र्य पैश्याच्या आधारावर मिळवलेलं आहे ते कुचकामी आहे कारण ज्याचा आधार घेतला आहे तो पैसा वापरतांना, आधार सुटण्याची भीती कायम आहे. थोडक्यात, जी गोष्ट वापरायची तीच जीवनाचा आधार म्हणून घेण्याचा तो वेडेपणा आहे. आणि जी गोष्ट जीवनाचा खरा आधार आहे, तो श्वास, ज्या वर्तमानाचा उत्सव करायला सांगतो आहे, त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मूर्खपणा आहे. जी गोष्ट क्षणोक्षणी संपते आहे आणि जिच्यावर सर्वस्व अवलंबून आहे तीचा अव्हेर करुन, निर्जीव वस्तूला जीवनाचा आधार मानण्याची ती मूढता आहे. अशा स्वप्नांच्या वाटेवर चालणारे कधीही मुक्त आणि स्वच्छंद होऊ शकणार नाहीत.In reply to तुम्हाला नक्की काय त्रास आहे ? by संजय क्षीरसागर
साहेब,
In reply to साहेब, by अप्पा जोगळेकर
स्वतःची परिस्थिती बघा !
माझ्यासारखे जगून दाखवा असे आव्हान तुम्हीच दिले होते ना मी त्या संदर्भात विचारले होते.तुम्ही पुन्हा न वाचताच ठोकाठोकी चालू केली. परत नीट वाचा :७) एखादा आयडी जर मी सुद्धा स्वतंत्र आहे, मला हवं तसं जगू शकतो, तुम्ही जगता त्या पॅटर्नमधे काही विषेश नाही वगैरे म्हणत असेल आणि वास्तविकात परिस्थिती नेमकी उलट असेल तर समजावून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.आता तुम्ही म्हणतायं :मिळमिळीत, महत्वाकांक्षा विरहीत जीवनासाठी शुभेच्छा. एखादा माणूस भरभरुन जगतो एखादा मरत नाही म्हणून जगतो.आता खरंच हिंमत असेल तर तुमच्या रसभरीत आणि दुर्दम्य महत्वाकांक्षी जीवनाचा सारीपाट इथे उलगडा ! तुमच्याकडे तसं काहीही नाही हे प्रतिसादातली उद्विग्नताच दर्शवते तरीही एक ट्राय मारुन पाहा. ट्रेमा, उदय, म्हसोबा आणि तुमच्या परिस्थितीत, अत्याधिक जळजळ, या एकाच लक्षणाचा फरक आहे, हे तुम्ही स्वतःच दाखवून द्याल !तरी आर्थिक स्वावलंबन म्हणजे
In reply to तरी आर्थिक स्वावलंबन म्हणजे by अप्पा जोगळेकर
याच्याशी मात्र संपूर्ण सहमत आहे !
तरी आर्थिक स्वावलंबन म्हणजे आपली व्यावसायिक कौशल्ये सतत विकसित करत राहणे, तंदुरुस्त राहणे आणि मरेपर्यंत काम करत राहणे असावे असे व्यक्तिशः वाटते.याच्याशी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असण्याचा काहीएक संबंध नाही. सकाळी लवकर उठणं, योगा, प्राणायाम, फिरायला जाणं मोफत आहे. व्यावसायिक कौशल्ये सतत विकसित करत जाणं हे आर्थिक स्थितीशी फारसं संबधित नाही, ते वृत्तीशी संबधित आहे.त्या हिशोबाने रिटायरमेंट हा कन्सेप्ट पटत नाही.काम हा छंद केल्यावर तो रोजचा आनंद आहे, त्यामुळे त्याचाही आर्थिक स्वावलंबनाला मोठा हातभारच आहे.वायफळ असेल तर एरवीसुद्धा तो केला जात नाहीचयेस, वेरी अॅप्ट. बट अ कॉमनसेंस ऑबजर्वेशन.100 :D
In reply to 100 :D by सानझरी
+1
In reply to +1 by पिशी अबोली
हे तुमच्या आकलनानुसार वर्शन झालं !
http://www.maayboli.com/node
संक्षींशी सहमत
In reply to संक्षींशी सहमत by आजानुकर्ण
मायला !
In reply to मायला ! by संजय क्षीरसागर
+१००००
In reply to संक्षींशी सहमत by आजानुकर्ण
हे अगदी टोकाचं उदाहरण झालं
'अमुकतमुक पैसा' हे कायमच मूविंग टारगेट राहते.हे बरोबर आहे. म्हणून ऊर फुटेस्तोवर पैश्याच्या मागे लागू नये. पण म्हणून पैसे वाचवूच नयेत, साठवूच नयेत हा दृष्टिकोन बरोबर आहे का? पैसे मिळवण्याचा वेळ आणि आयुष्यातले आनंद घेण्याचा वेळ यांच्यात समतोल असावा. प्रस्तुत लेखात लेखिका हेच सांगायचा प्रयत्न करत असावी. आपल्या आनंदात कमतरता न आणता अनावश्यक खर्च कमी करून ते पैसे गुंतवले तर काय चूक आहे? थोडक्यात फिक्स टारगेट न ठेवता आपल्या आवडीनिवडी व छंद जोपासून पण अनावश्यक खर्चात काटछाट करून जे साठेल ते साठेल. त्याची गुंतवणूक करायची का नाही, कशी व कुठे करायची ज्याचं त्याचं ती व्यक्ती ठरवेल. इथे फक्त लेखिकेने तो विषय आणि ते काय करतात याची माहिती सादर केली. माझे लेख, ज्यावर संक्षींनी टिपण्णी केली आहे, वाचलेत तर नेहमीच्या वापरातल्या गोष्टींमधून मी कसा फायदा मिळवला अथवा थोडे प्रश्न विचारून समोर आलेल्या अडचणीतून कसा मार्ग सापडला हे सांगितलं आहे. यात कुठलेही जीवनाविषयक तत्वज्ञान आम्ही सांगत नाहीये. बरं हेच आणि असंच सगळ्यांनी करावं असाही आग्रह नाहीये. पण प्रॉब्लेम कुठे येतो की या धाग्यांवर एक मिपाकर येऊन मी बघा कसं जगतो नाहीतर तुम्ही, तुमचं जिणं म्हणजे गळ्यातलं लोढणं असं सांगतो. विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं न देता दूषणं देत बसतो. एक साधा सरळ उपाय आहे, आपण ज्या विषयाला महत्वाचं मानत नाही त्या विषयांशी संबंधित धाग्यांवर न येणे. ही अर्थात सूचना आहे. किंवा तुम्ही जसे सांगितलेत की हे "मूविंग टारगेट" आहे हे ठीक. मग यावर चर्चा होऊ शकते. पण उद्या समजा तुम्ही कामाच्या ठिकाणी चालणाऱ्या राजकारणावर धागा लिहिलात आणि यावर येऊन मी तुम्हाला सांगत बसलो की कसली नोकरी आणि कसलं राजकारण, मारायची लाथ सगळ्यावर. नाहीतर तुमच्या जीवनाला अर्थ नाही. तुम्ही म्हणजे काय करायचं हे परत परत विचारूनसुद्धा मी जास्त स्पष्टीकरण न देता एकच पालुपद चालू ठेवलं तर तुम्ही काय कराल? हे एकापेक्षा अधिक धाग्यांवर झालं तर तुम्ही काय कराल? डांगेंजी:आपआपली टार्गेट्स अचिव्ह करायला समद्यांस्नी शुभेच्छा!हेच तर मान्य नाहीये ना. सगळ्यांचं टारगेट एकच पाहिजे वेळकाळाचं बंधन नसलेलं आणि टार्गेट नसलेलं स्वच्छंदी जीवन. असो. आधीच वेळ फुकट घालवून दोष आणि अपमान पदरी पडलेला आहेच. त्यामुळे रजा घेतलेली बरी.अधून मधून चर्चेवर नजर टाकत होतो.
In reply to अधून मधून चर्चेवर नजर टाकत होतो. by चतुरंग
कुठे उगवला सूर्य आज ?
In reply to कुठे उगवला सूर्य आज ? by संजय क्षीरसागर
सूर्य उगवायचा तिथेच उगवला!
In reply to सूर्य उगवायचा तिथेच उगवला! by चतुरंग
यू हॅव मेड माय डे गाइज !
In reply to अधून मधून चर्चेवर नजर टाकत होतो. by चतुरंग
आजानुकर्ण आणि चतुरंग
"पैसा तुमच्यासाठी आहे, तुम्ही पैशासाठी नाही"हे तत्वज्ञान कधीच मान्य केलंय. एवढं सगळ्यांनी सांगून झालं की अगदी १२ महिने २४ तास पैश्यांचा विचार कोणीच करत नाही. प्रत्येकाचे आयुष्य, ते जगायचा दृष्टिकोन, छंद, अडचणी हे वेगळंच असणार आहे. त्यात प्रत्येकाने संक्षींसारखंच जगावं हा अट्टाहास का? आणि जे वेगळं जगत असतील ते यःकश्चित हा दृष्टिकोन का? माझ्या क्रेडिट कार्डच्या धाग्यावर मी फक्त क्रेडिट कार्ड्स वापरून मी कसा फायदा करून घेतला हे सांगितलं. त्यात इतरांनी त्यांचे अनुभव सांगावे, अडचणी सांगाव्या आणि त्यातून सगळ्यांना फायदा होऊ शकेल हा उद्देश होता. त्यात सुद्धा संक्षी कर्ज घेणाऱ्या सगळ्यांचं आयुष्य निरर्थक आहे हे सांगत बसले. वर स्वतः क्रेडिट कार्ड्स वापरतात हे पण सांगितलं. पण कर्ज काढून घर घेऊ नये यावर क्रेडिट कार्डच्या धाग्यात वाद घालत होते. डाऊन पेमेंटचे पैसे नसताना पूर्ण किंमत देऊन घर कसं घ्यायचं याचं मार्गदर्शन मात्र करू शकले नाहीत. पूर्ण स्वच्छंदी जीवन जगायला कोणाला आवडणार नाही? पण ते कसं साध्य करायचं हे ते समजावून सांगत नाहीत. नुसतंच फक्त आताच्या क्षणात जगा, पुढचा विचार करू नका आणि कर्ज काढू नका हे सांगतात आणि हे जर तुम्ही करत नसाल तर तुमचं आयुष्य व्यर्थ आहे हे ठासून सांगतात. तुम्ही आधीच्या आणि या धाग्यांवरचे प्रतिसाद नीट वाचले असतील तर संक्षींनी सगळ्यांचे आयुष्य निरर्थक ठरवूनही माझ्यासकट सगळे सभ्य भाषेत विचारत होते. पण मग पुढे त्यांनीच फेफरं येईल, तोंडाला फेस येईल, पितळ उघडं पडेल अशी भाषा सुरु केली. एकतर पहिल्यापासून सगळ्यांना यःकश्चित प्राणी समजत आहेत आणि वर ही भाषा ३ वेळा तरी वापरली आहे. यावर एकदोघे सोडून कोणाला आक्षेप घ्यावा वाटला नाही. मी एकदा बोललो तर ते एवढं लागलं? मग त्यावर माझ्या अपब्रींगींग वर म्हणजेच माझ्या आईवडिलांवर गेले आणि वर म्हणतात की इतक्या खालच्या लेवलला ते जाऊ शकत नाहीत. मी यापूर्वीही त्यांचेच प्रतिसाद दाखवून ते कसे गोंधळलेले आहेत हे दाखवून दिलं आहे. तरीही आता त्यांनी दिलेल्या मुद्द्यांवर प्रतिवाद करायचा तर -विकेंडस आणि रजा यामधे जमेल तेवढी मजा करणं यात काहीही विषेश नाही. गोरगरीब सुद्धा स्वतःच्या एपतीप्रमाणे ते करतातच.बरोब्बर. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे मजा करतातच हे त्यांनी मान्य केलंय. त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपामुळे ते त्यांना जमेल तेव्हा काम करू शकतात. सगळ्यांना ती सवलत असेलच असं नाही. विशेषतः नोकरी करणारा सोमवार ते शुक्रवार या मध्ये सुट्टी/ रजा न घेता मन मानेल तसं वागू शकणार नाही हे सर्वमान्य सत्य आहे. त्यावर मला चॅलेंज देण्यात काय अर्थ आहे? तरीही, नोकरी करत असूनही, मी बऱ्यापैकी माझ्या टर्म्सवर काम करतोय हे मी दाखवून दिलं आहे. पण ते त्यांना मान्यच करायचं नाहीये.आर्थिक स्वातंत्र्य जर सर्वांगिण स्वातंत्र्य देऊ शकले नाही तर व्यर्थ आहे.हेच आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं ते स्टेप बाय स्टेप सांगा अशी सगळ्यांची विनंती होती आणि अजूनही आहे. यावर नुसतंच पैसे दुय्यम आहे, मनाला येईल तसं जगा, भविष्याचा विचार करू नका, पूर्ण पैसे असल्याशिवाय घर घेऊ नका या सांगण्याला काय अर्थ आहे? तुम्हाला हे स्वातंत्र्य कसं मिळवायचं हे कळलं तर कृपया मलाही सांगा. संक्षींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं कळण्याएवढी माझी आकलनशक्ती नाही. तुम्ही प्रयत्न करून बघा. समजलं तर माझ्या निरर्थक आयुष्याला जरा अर्थ येऊ शकेल.खरं तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक विवंचनेपासून स्वातंत्र्य. ज्याची नजर अजूनही पैश्यावरच आहे आणि ज्याच्या दिवसाचा प्राइम टाईम अर्थार्जनासाठीच जातो, तो अजूनही आर्थिक गुलामीतच आहे.दिवसाचा प्रत्येक क्षण आर्थिक विवंचना करावी एवढी वाईट परिस्थिती नाहीये. पण म्हणून मी कामधंदा सोडून बसावं का? नोकरीची जी वेळ ठरलेली आहे तीचं काय करणार? म्हणून तर त्यांना विचारत होतो की असा कुठला व्यवसाय आहे की जो प्रत्येकाला त्याच्या मर्जीने करता येईल पण पैश्याची चिंता मात्र नसेल.सर्वांगिण स्वातंत्र्य म्हणजे खुला आणि मुक्त दिनक्रम. मी मागे म्हटल्याप्रमाणे अशा व्यक्तीची प्रत्येक रात्र सॅटरडे नाइट आणि प्रत्येक दिवस संडे असतोनोकरी करत असताना किंवा नोकरी न करता माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आजच्या सगळ्या गरजा भागवल्या जातील आणि आम्ही सगळे रोज मनाला येईल तसे उत्सव साजरे करत कसे जगू शकतो याचे मार्गदर्शन करावे हीच तर पहिल्यापासूनची मागणी आहे.जी गोष्ट क्षणोक्षणी संपते आहे आणि जिच्यावर सर्वस्व अवलंबून आहे तीचा अव्हेर करुन, निर्जीव वस्तूला जीवनाचा आधार मानण्याची ती मूढता आहे.कुठे काय अव्हेरलं? जे मला आवडतं ते मी करतोय हेच मी कधीपासून सांगतोय. तुम्हाला आवडतं ते आणि तुम्ही करता तेच मी करावं हा आग्रह का? तुम्हाला कराओकेवर गायला आवडतं, मला नाही आवडत. मला ऐकायला आवडतं. मला पुस्तकं वाचायला, निसर्गसौन्दर्य; ग्रहतारे; पक्षी; नवनवीन ठिकाणं बघायला, विविध खाद्यपदार्थ खायला आवडतं. मला जमेल तसं, जमेल तेव्हा मी हे करत असतो. म्हणून माझी आवड हीन दर्जाची आहे? मी चांगलं आयुष्य जगतच नाहीये? एक उदाहरण घेऊन बघू, कदाचित समजायला सोपं पडेल. समजा एखाद्याकडे एक महिना पुरेल एवढे पैसे आहेत. संक्षींचा सल्ला मानून त्याने मन मानेल तसं वागायला सुरुवात केली. परिणामी त्याची नोकरी गेली. तरीही त्याने आपलं व्रत सोडलं नाही. महिन्याने त्याची बायको म्हणाली आज संध्याकाळी खायला काही नाही, तर मग याने काय सांगायचं की आत्ताचं बघ संध्याकाळची चिंता कशाला करतेस? भाड्याचं घर आहे पण भाडं भरलं नाही म्हणून घरमालकाने घर सोडायला सांगितलं आहे. या उदाहरणात त्याने आणि त्याच्या कुटुंबाने कसं वागावं याचं मार्गदर्शन संक्षी किंवा ते जे सांगतात ते पटलेल्या/ समजलेल्या कोणीही करावे. का मला एक माणूस, ओळख पाळख नसताना, तुझं आयुष्य व्यर्थ आहे हे परत परत सांगतोय? बरं मग कसं करायचं काय करायचं हे विचारल्यावर समाधानकारक उत्तर मात्र देत नाही. पैसे व्यर्थ आहे असा उपदेश करणारे बरेच बाबा/ बुवा हे सांगण्याचे मोजून पैसे घेताना बघितलेलं आहे. इथे जरा वेगळं काही ऐकायला मिळेल असं वाटलं पण पैसे गेलेले परवडले असं वाटेल, असा दोष आणि अपमान मात्र पदरी पडला.In reply to अधून मधून चर्चेवर नजर टाकत होतो. by चतुरंग
अश्लाघ्य भाषा
In reply to अश्लाघ्य भाषा by उदय
संक्षिंची भाषाही
एक उदाहरण घेऊन बघू, कदाचित
In reply to एक उदाहरण घेऊन बघू, कदाचित by संदीप डांगे
हे ठीक आहे
मन मानेल तसे म्हणजे मला हवे तितके पैसे मिळवायला मला किती काम कुणाचे करुन द्यायला लागेल तेवढे प्रयत्न करणे, आणि ते करत असतांना मनावर जबाबदारीचे कोणतेही दडपण नसणे. करत असलेले काम आवडीने करणे, रस घेऊन करणे, क्षण आणि क्षण आनंदात जगणे.बरोबर. मी तेच तर करतोय हे मी उदाहरणाने सांगितलं आहे. मला वाटेल तेव्हा मी सुट्टी घेतो, ऑफिसच्या वेळेत बायकोबरोबर लंचला सुद्धा जातो. पण मला ती सोय आहे म्हणून सगळ्यांनाच असेल असं नाही. किंबहुना माझ्याच बरोबर काम करणाऱ्यांनासुद्धा असेल असं नाही. मलाही कायम उपलब्ध असेल असंही नाही. फरक व्यवसायाच्या फॉरमॅटमध्ये आहे. मी एखाद्या डॉक्टरला डिवचलं की काय तुझं आयुष्य कॉल आला की जायला लागतं, तर तो माझी कीव करेल. इथले CPA फेब्रुवारी ते जून मरेस्तोवर काम करतात मग उर्वरित महिने निवांत असतात. त्यातल्या एखाद्याला मी म्हणलं दर महिन्याला एक बाहेरची ट्रिप आणि आठवड्याला एक पार्टी करू (उदाहरण चुकलं का?) तर या ५ महिन्यांच्या काळात येईल का? हां, व्यवसाय सेम असल्याने संक्षी याच्याशी तुलना करू शकतात. पण तरीही असलेल्या जबाबदाऱ्या, वय, आवड यामुळे फरक राहणारच.एकूणच पैसा गाठीला असणे, नसण्याने मनुष्य म्हणून आपल्या जगण्याच्या स्वच्छंदतेवर परिणाम होऊ नये असा संक्षि अर्थ सांगत आहेत.अध्यात्मिक उपदेश म्हणून बरोबर आहे. आता माझे प्रतिसाद वाचून तुम्हाला कळलं असावं मी काय काय करतो. आता यात तुम्हाला मी माझ्या मनाप्रमाणे जगत नाही असं वाटतं का? मी एकटा काम करत नसल्याने दिवसात ज्या मिटींग्स ठरवलेल्या असतात त्या अटेंड करणे मी स्वीकारलेल्या जबाबदारीचा भाग आहे. यातही मी आज येणार नाही हे मी सांगू शकतो. मला एकट्याने जे काम करायचं आहे ते दिवसाच्या याच वेळेत करायचंय असं बंधन नाहीये. पैश्याचा विचार न करता मला पाहिजे ते मी करू शकतो. फक्त मी मनाला आलं म्हणून रिबॉक असं लिहिल्यामुळे १००० रुपयाला मिळणारे मोजे घेणार नाही. थोडक्यात आवडीचं आहे आणि जबाबदारी म्हणून जे काम माझ्याकडे आहे ते मी करतो, त्याबदल्यात मला पैसे मिळतात. त्यावर अजून जास्त पैसे मिळावे म्हणून मी बाकी सगळं सोडून पैश्याच्या मागे धावत नाही. फक्त जे खर्च मी करणार आहे ते तारतम्याने करतो. पैसे जे हातात आहेत ते योग्य ठिकाणी गुंतवतो. एक फ्लॅट कर्ज काढून घेतला, ते ४ वर्षात फेडून टाकलं. त्या ४ वर्षांत बाकी लाईफस्टाईलमध्ये फरक नव्हता. आता अजून एक तयार होतंय (दुसरं घेऊन किमती वाढवल्याबद्दल आधीच दोष स्वीकारतो). तेही कर्ज फार नाही. पण मग यात माझं आयुष्य निरर्थक वाया चाललंय का?संक्षि जे म्हणत आहेत तो नदीचा किनारा आणि तुम्ही तिघे-चौघे जे म्हणत आहात तो नदीचा दुसरा किनारामाझा किनारा कसा छान आहे आणि तुमचा किती घाण आहे असं ते नुसतंच खिजवत आहेत. आम्ही त्या किनारी कसं यायचं याचं मार्गदर्शन करायला सांगितलं की आत्ताचा क्षण महत्वाचा, आहे नाही ते सगळं सोडून या किनारी यायचं म्हणतात. ते तिथे कसे गेले यावर मला साक्षात्कार झाला म्हणतात. पण नदीत मगरी आहेत त्यांना कसं टाळायचं, होडी कशी बांधायची, कुठे पूल आहे का हे सांगत नाहीत. वर खिजवणं आहेच. आम्ही कुठलाही किनारा तर सोडाच पण नदीत गटांगळ्या खाणारे यःकश्चित मानव आहोत. किनाऱ्याला कसं लागायचं तेच तर कळत नाहीये. तुम्ही अर्धवट का होईना किनाऱ्याला लागलेले दिसताय, जरा हात द्या की आम्हाला.In reply to हे ठीक आहे by ट्रेड मार्क
तुमच्याशी असहमतीचा प्रश्न येत
In reply to एक उदाहरण घेऊन बघू, कदाचित by संदीप डांगे
पैसा मिळवणे हे काही फार कठीण
पैसा मिळवणे हे काही फार कठीण काम नाही."If wishes were horses, beggars would ride."मन मानेल तसे म्हणजे मला हवे तितके पैसे मिळवायला मला किती काम कुणाचे करुन द्यायला लागेल तेवढे प्रयत्न करणे, आणि ते करत असतांना मनावर जबाबदारीचे कोणतेही दडपण नसणे. करत असलेले काम आवडीने करणे, रस घेऊन करणे, क्षण आणि क्षण आनंदात जगणे.बरं, मी जर म्हणालो की हे मी करतो तर तुम्ही मला किंवा इतर कुणाला "आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र" म्हणाल का? (हा धागा आर्थिक स्वावलंबनाबद्दल आहे, हे लक्षात घ्या.)In reply to पैसा मिळवणे हे काही फार कठीण by उदय
नक्कीच! शेवटी ती एक मनाची
In reply to नक्कीच! शेवटी ती एक मनाची by संदीप डांगे
+१००
वा वा!
In reply to वा वा! by पैसा
हाहाहा
In reply to हाहाहा by इडली डोसा
हेहेहे!
अजानुकर्ण, चतुरंग, संदीप
उत्तर
In reply to उत्तर by आजानुकर्ण
कर्णश्री,
त्यामुळं आहे त्या परिस्थितीत जर तुम्ही मनसोक्त, सुखी, स्वावलंबी जगत आहात असे वाटत नसेल तर अमुकतमुक आकडा गाठल्यावर तसे जगाल ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे.याचं कारण फार साधं आहे. भविष्यकाल हे मनाचं मृगजळ आहे. ते गाढवासमोर त्याच्या दोन कानांच्या मधोमध, वर बसलेल्या मालकानं धरलेल्या गाजरासारखं आहे.गाढव कितीही चाललं तरी गाढव आणि गाजर यातलं अंतर कायम राहील.आणि सर्वात मोठा पॅराडॉक्स म्हणजेते गाजर (भविष्यकालीन आनंदाची आशा), आपणच स्वतःसमोर धरलंय! पण इतकी साधी गोष्ट सुद्धा ज्याला कळत नाही त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही.गंमत म्हणजे घर, कुटुंब, लग्न, नोकरी, शिक्षण, परदेशप्रवास, प्रमोशन, डॉलर्समध्ये पगार, वगैरे सर्व गोष्टी मनासारख्या मिळाल्यावरही गावात राहत असताना मित्रांबरोबर गोट्या खेळायचो ते दिवस सर्वात आनंदी होते असं वाटतंय.यात थोडीशी सुधारणा हवी. जसा भविष्यकाल कधीही येत नाही तसाचभूतकाल मृत व्यक्तीसमान आहे, त्याच्या आठवणी खेरीज त्याचा कुठेही लवलेश नाही.नाऊ इट इज अप टू अस, गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत वर्तमान व्यर्थ करायचा की `इट इज ओके' म्हणूनसांप्रत क्षणाचा उत्सव करायचा.उत्तम विषय, मस्त चर्चा.
परफेक्ट ऑब्सर्व्हेशन्स बाय अर्धवटराव
ट्रे मा दादा, मला बरेचदा
In reply to ट्रे मा दादा, मला बरेचदा by वीणा३
उत्तम निरीक्षण
In reply to ट्रे मा दादा, मला बरेचदा by वीणा३
वीणाजी,
हा दृष्टीकोन मला फारसा व्यवहारी वाटत नाही. कदाचित याची पुढील कारण असू शकतील. १. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मला उद्या यायची सवय झालीये.........आणि आजही त्यात फरक नाही. यापेक्षा मानसिकता न बदलण्याचा दुसरा उघड उदाहरण काय हवं ? हीच मानसिकताआजबदलावी लागते ! अदरवाइज व्यक्ती फक्त उद्याकडे डोळे लावून जगते आणि ही `उद्याची सवय' म्हणजे`स्वप्नांची वाट आहे'. २)बरेचदा मला असाही वाटतं कि त्यांना प्रॉब्लेम समजत नाही कारण ते तो प्रॉब्लेम "जगले" नाहीयेत.उलट आहे. मी प्रश्न मुक्त आहे ! कारण आय डोंट हॅव अ टुमारो . आणि मजा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न फक्त डोक्यातच आहेत ! ज्या अर्थी सदस्य इथे टाईमपास करु शकतो म्हणजे त्याचं पोट भरलेलं आहे ! इतकी उघड गोष्ट तरी निदान निर्विवाद आहे. ३)मला वाटत कि जर तुम्ही खालीलपैकी कुठल्याही गटात बसत असाल तर संक्षी ना तुमचे प्रॉब्लेम्स कधीच समजणार नाहीत, त्यांची उत्तर चंद्र ताऱ्यांवर जातील.....नीट वाचलात तर तुमचंच गृहित तुम्हाला बालीश वाटेल. हे सर्व जग परास्परावलंबी आहे. माझे क्लायंटस माझ्यावर अवलंबून आहेत, मी त्यांच्यावर आहे. माझ्या संसाराचंही तेच आहे, अँड सो ऑन. फक्त आगीचे बंबवाल्यांना वगैरे इमर्जन्सी असते असं वाटणं ही वैचारिक मर्यादा आहे. ४)कारण पैशाचा तुटवडा हा प्रॉब्लेम ते (बहुधा ) "जगले" नाहीयेत.हा ज्योक वाटतोयं का पाहा. मी राजघराण्यात जन्मलोय असं वाटतंय का ? एक गोष्ट नक्की, मला पैश्याचामानसिक तुटवडा नाहीजो इतरे जनांना कायम भासतो. कारण उद्याची किंवा कोणतीही कल्पना मला दहशत घालू शकत नाही. ५)इथेच मिपा वर खूप वर्षांपूर्वी वाचलेल "दुर्लक्ष हि सर्वात मोठी शिवी आहेम्हणून तर मी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं नाही ! आणि ज्यांनी प्रतिसादातून आपले सभ्यतेचे संस्कार , प्रच्छन्नपणे दाखवले (आणि पुन्हा उलटी बोंबे मारतायंत) त्यांना पूर्णपणे बेदखल केलंय. ६)व्यासंग आणि छंद ह्यात खूप फरक असतो.तुम्हाला उपयोगी होईल म्हणून सांगतो, छंदाचाच पुढे व्यासंग होतो. जे स्वतः कडून, डायरेक्ट झाकीरसारखा तबला, सुरुवातीलाच वाजावा अशी अपेक्षा ठेवतात, ते जन्मात तबलाच वाजवू शकत नाहीत. ७)त्याचे अध्यात्मावरचे प्रतिसाद / विचार संपूर्ण चुकीचे नाहीयेत असा अनेक लोकांनी इथे बरेचदा सांगितलंय. फक्त ते ज्या पद्धतीने सांगतात ती बऱ्याच लोकांना त्रासदायक वाटते आणि त्यातून वाद वाढतात. त्यात ते भलत्या धाग्यावर भलत्या गोष्टी बोलतात, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया (ज्यात काही गोष्टी कदाचित सगळ्यांना पटू शकतात), वादग्रस्त होतात.आता हे खरं तर तुम्ही आऊट ऑफ काँटेक्स्ट लिहीलंय . त्यामुळेभलत्या धाग्यावर भलत्या गोष्टी बोलतातहे याला अॅप्लिकेबल होतंय का पाहा. तरी तुम्ही विषय काढलायं म्हणून लिहीतो. माझे प्रतिसाद कळायला काही सदस्यांना पाच वर्ष लागली, काहींना आणखी पाच लागतील आणि काहींना समजणारच नाहीत. ओशो म्हणायचे `आय कांट डायल्यूट मायसेल्फ फरदर, यू विल हॅव टू रेज योरसेल्फ टू अंडरस्टँड मी'. मीही तेच सांगतो. ज्या अर्थी आयुष्य जगलेले आणि प्रत्यक्ष उदाहरणं पाहिलेले सदस्य विचारसरणी मान्य करतात (अर्थात त्यांची मान्यता मला उपयोगी नाही कारण मी तर ऑलरेडी तसं जगतोच आहे)...... त्या अर्थी, अजून स्वप्नपूर्ती न झालेले किंवा त्या वाटेवर चालू इच्छिणारे काय म्हणतायंत याला शून्य अर्थ आहे.In reply to ट्रे मा दादा, मला बरेचदा by वीणा३
+१०० खरंच उत्तम निरीक्षण
टोटल करमणूक धागा ट्याक्स फ्री
छान लेख. गुंतवणूकीबद्दल