"ए राजा, ऊठ"
"झोपू दे गं आई अजून थोडं..."
"अरे, शाळेत जायला उशीर होईल."
"होऊ दे.
दररोज मी का जायचं शाळेत याची दोन चांगली कारणं दे, तरच उठतो."
"एक म्हणजे तू आता पन्नास वर्षांचा घोडा आहेस आणि दुसरं म्हणजे तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस." हा विनोद आपण पूर्वी ऐकला असेल आणि हसून सोडून दिला असेल किंवा मनात असंही आलं असेल कदाचित की हो ना राव, मलाही नाही जायचं रोज उठून काम करायला.
मला माझा आवडता छंद जोपासायचा आहे, माझ्या जोडीदाराबरोबर, छकुल्यांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे, हे करायचं आहे आणि ते करायचं आहे..... पण जगण्यासाठी आणि कुटुंबाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी नोकरी तर केलीच पाहिजे. मग काय, लागतो आपण त्याच मार्गाला आणि करतो नोकरी इमानेइतबारे आयुष्यभर. कारण आयुष्यभर काम केलं, तरच आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होऊ शकतील असा एक पगडा आपल्या मनावर असतो. माझ्या कुटुंबासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निवृत्तीनंतरच्या आरामदायक जीवनासाठी मला आत्ता झटून काम केलंच पाहिजे ह्या विचाराचं मनावर इतकं पक्कं गारूड असतं की नोकरी कायमस्वरूपी टिकवण्याच्या ध्यासाने आपण पछाडले जातो. मग ऑफिसमधला वेळ वाढतो, प्राणप्रिय छंदांनाही आठवड्यातून एकदा / महिन्यातून एकदा अशी टाइमलाईन येते. माझ्या आवडत्या गोष्टींना मला वेळ द्यायचा आहे, कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायचा आहे, मनसोक्त भटकायचं आहे आणि हवं तेव्हा हवं ते करायचं आहे हे विचार 'निवृत्तीनंतर करू, तेव्हा वेळच वेळ असेल' असं म्हणत हळूहळू बाजूला पडतात.
खरं तर आपण निवृत्तीपर्यंत काम का करतो? कारण बऱ्याचदा आपण गृहीतच धरलेलं असतं की आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्यभरात ज्या काही सगळ्या गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला नियमानुसार ठरवून दिलेल्या निवृत्तीचा दिवस येईपर्यंत काम केलंच पाहिजे. अशा वेळी जर तुम्हाला कोणी म्हणालं की "तुम्ही तुमच्या तिशीत, चाळीशीत किंवा आपण काम करण्याचं जे सर्वमान्य वय ठरवलं आहे, त्यापेक्षा लवकरच नोकरी सोडून देऊ शकता आणि आणि जे काही इमले मनात रचले आहेत, ते पूर्ण करू शकता", तर तुम्ही अशा वक्तव्यावर काय म्हणाल? "कसं शक्य आहे हे?" "सडाफटिंग लोकांना शक्य असेल, संसारी लोकांना कसं जमेल?" , "हम्म्म... असेल, पण मला शक्य होईल असं मला वाटत नाही" असं काहीतरी, की "खरंच, काय बरं करावं लागेल यासाठी? बघू या तरी आपल्याला जमतंय का?" असं काही? चला तर मग बघूच या हा प्रकार काय आहे.
आपण नोकरी करतो ते दर महिना ठरावीक उत्पन्न मिळवण्यासाठी आणि भविष्यातल्या आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी. मग नोकरी न करता असं ठरावीक उत्पन्न आपल्याला मिळालं, तर त्याचा अर्थ आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीवर विसंबून राहायची गरज नाही. आर्थिक बाबतीत आता आपण स्वावलंबी झालो. म्हणजेच आपण जर नोकरी ही केवळ अर्थार्जनासाठी करत असू, तर ती करण्याची काही गरज अशा वेळी राहत नाही. 'आर्थिक स्वावलंबन' हे आपलं अंतिम ध्येय नसून आपल्याला गोष्टी हव्या तेव्हा करता येणं हे आहे. अर्थातच आर्थिक स्वावलंबन हा अंतिम ध्येय गाठण्यासाठीचा रस्ता आहे. मात्र आर्थिक स्वावलंबनापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक टप्पे आहेत. सगळ्यात आधी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही आघाड्यांवर कोणकोणत्या गोष्टींना प्राध्यान्य आहे हे ठरवणं. प्राधान्य असणाऱ्या या गोष्टींपैकी पैसा किती गोष्टींसाठी लागणार आहे, किती लागणार आहे आणि कधी लागणार आहे? याप्रमाणे नजीकच्या आणि लांबच्या काळातल्या गरजा यांसाठी किती रक्कम लागेल? अशा प्रकारे साधारण रूपरेषा ठरली की त्यानुसार पैशाची तरतूद कशी करायची ते बघता येतं.
आमच्या बाबतीत सांगायचं झालं, तर आम्ही तसं उशिराच - म्हणजे तिशी ओलांडताना आर्थिक स्वावलंबन मिळवण्याचा विचार करू लागलो. मी मुलीच्या जन्माच्या वेळी भारतात गेले असताना आम्ही - म्हणजे मुख्यत्वे माझा नवरा गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधण्यासाठी बरीच पुस्तकं वाचत होता आणि आंतरजालावरही शोध घेत होता. लग्नापूर्वी त्याने शेअर मार्केटमध्ये आणि मी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली होती, पण ती फारशी काही फलदायी ठरली नव्हती. गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय शोधायला हवा, ही जाणीव झाल्यामुळे जास्त परतावा देणाऱ्या आणि तुलनेने भरवशाच्या अशा गुंतवणूक पर्यायांचा शोध सुरू झाला होता.
आमच्या गुंतवणुकीची गाडी योग्य मार्गाला लावण्याचं सगळं श्रेय मी माझ्या नवऱ्याला देते. वेळोवेळी वेगवेगळी पुस्तकं आणि जालावरच्या या विषयावरचे ब्लॉग्स वाचून त्यानेच आमच्या बचतीची आणि गुंतवणुकीची रूपरेषा ठरवली. इतकंच नाही, तर या सगळ्या किचकट गोष्टी मला सोप्या भाषेत समजावून सांगून पैशाच्या बाबतीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयप्रक्रियेत नेहमी माझं मतही घेतलं. यातूनच आम्हाला ओळख झाली ती आर्थिक स्वावलंबनाची आणि मग सुरू झाला प्रवास एका ध्येयाकडे. आपण नोकरी का करतोय असा प्रश्न स्वतःला विचारला, तेव्हा खरं तर 'एवढं शिकलो ते यासाठीच ना? नाहीतर मग कशाला केली असती एवढी धडपड?' हा पहिला विचार होता. पण योगायोग असा की दोघंही ज्या विषयाचे पदवीधर आहोत, त्या विषयाशी संबंधित अगदी कमी काम करतो. निदान माझा नवरा त्याच्या पदव्युत्तर क्षेत्रात काम करतो. माझ्या कामाचा आणि माझ्या पदवीच्या विषयाचा आता काही संबंध उरलेला नाही. अनेकांचं होत असेल असं आणि ते ठरवून असेल तर उत्तमच आहे. पण माझ्या बाबतीत तरी अर्थार्जन या एकाच हेतूने मी नोकरीची कास धरलेली आहे आणि मला नोकरी न करण्याचा पर्याय मिळाला तर काय करता येईल, अशा चार-पाच गोष्टी तरी मनात नक्कीच आहेत. नवऱ्याला त्याचं काम आवडतं, पण अमेरिकेत आल्यापासून त्याने काही छंद जोपासले आहेत, ज्यासाठी जास्त वेळ द्यायला त्याला नक्कीच आवडेल. शिवाय आमची मुलगी हे मुख्य कारण आहेच. आम्हाला तिला भरपूर वेळ द्यायचा आहे, तिच्यासोबत भरपूर भटकायचं आहे आणि तिला अनुभवसमृद्ध करून त्यातून तिचं जीवन फुलवायचं आहे.... असा सगळा विचार करता करता लक्षात आलं की हे सगळं करायचं, तर आधी आर्थिक स्वावलंबन हवं.
सुरुवात केली ती आमचा महिन्याचा खर्च लिहून काढण्यापासून. किती खर्च होतो आणि किती बचत होते, याचा साधारण अंदाज घेतला. बचत वाढवण्यासाठी खर्चात कुठे कुठे कपात करता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिलं. शिवाय कंपनीकडून उपलब्ध असलेल्या सगळ्या सोयींचा पुरेपूर फायदा घेतला. सगळ्या टॅक्सपूर्व खात्यांची मर्यादा कमाल केली. आमच्या सुदैवाने अमेरिकेत आम्ही ज्या गावात राहत होतो, ते साधारण पन्नास हजार लोकवस्तीचं गाव होतं, त्यामुळे भाड्याने घर घेऊन राहण्याचा खर्च आणि रोजचा कामासाठी प्रवास वगैरे गोष्टींसाठी लागणारा खर्च मोठ्या शहरात राहण्याच्या मानाने कमी होता. इथे आमच्या मित्रपरिवारातली बरीच कुटुंबं आमच्या दोघांसारखीच एकाच कंपनीत काम करणारी होती. एकाच कंपनीत असलो, तरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑफिस लोकेशन्समध्ये कामाला होतो. गाव छोटं असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक अगदी नगण्य म्हणण्याइतपत होती. तासाला एक बस अशी बसची वारंवारता होती. आमच्यासारख्याच परिस्थितीत असणाऱ्या इतर बऱ्याच कुटुंबांमध्ये नवरा-बायको दोघांकडे वेगवेगळ्या गाड्या होत्या. आम्ही मात्र दोघांत एकच गाडी वापरायचा निर्णय घेतला. गाव छोटं असल्यामुळे एक जण दुसऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये सोडून सहज आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत जाऊ शकत होता. क्वचित प्रसंगी थोडी कसरत करावी लागली, तरी जोपर्यंत आम्ही तिथे राहत होतो, तोपर्यंत ही व्यवस्था आमच्यासाठी कामी आली. शिवाय तिथे नोकरी सुरू झाली की लगेच घर घेण्याचा सर्वसाधारण कल होता. दोघांना नोकरी आहे, घराची किंमत आवाक्यात, गृहकर्ज कमी व्याजदरात उपलब्ध आहेत, शिवाय घरभाडं देत छोट्या अपार्टमेंटमध्ये राहण्यापेक्षा महिन्याला तेवढाच हप्ता भरून स्वतःच्या मोठ्या घरात राहता येत असेल तर घर का घेऊ नये? असा सर्वसाधारण समज होता. यामुळे आम्हाला घर न घेण्यावरून बरीच विचारणा होता असे. पण घर घेणं म्हणजे एक मोठी आर्थिक जबाबदारी घेण्यासारखे होतं. थोडी शोधाशोध केल्यावर न्यूयॉर्क टाइम्सचा एक धागा सापडला, ज्यात त्यांनी घर भाड्याने घ्यावं की विकत याचा निर्णय घेण्यासाठी एक छोटा आराखडा तयार केला होता. एका तक्त्यात घर विकत घेणं आणि भाड्याने घेणं या संदर्भातले वेगवेगळे आकडे (उदा., वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स, विकत घेऊ पाहणाऱ्या घराचा प्रकार, घरभाडे, राहण्याचं ठिकाण इ.) टाकले, की त्या गावात घर विकत घ्यायचं असेल तर ती गुंतवणूक फलदायी ठरण्यासाठी साधारण किती वर्षं त्या घरात राहणं आवश्यक आहे, याचे आकडे मिळत होते. त्यानुसार आम्ही घर घेतलं, तर आम्हाला त्या ठिकाणी साधारण पाच-सहा वर्षं तरी राहणं गरजेचं होतं. अमेरिकेत मिडवेस्ट भागातल्या या ठिकाणी आम्ही तेवढा काळ राहू याची आम्हाला खातरी नव्हती, शिवाय कामाच्या ठिकाणी दर दोन-तीन वर्षांतून होणारी मनुष्यबळ कपात यासारख्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही घर विकत न घेण्याचाच निर्णय घेतला. या झाल्या मोठ्या गोष्टी. आम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही बचत कशी होईल ते पाहतो. मोबाइल फोनचं बिल आम्हा दोघांचं मिळून साधारण महिन्याला शंभर डॉलर येत असे. थोडी शोधाशोध करून प्लॅन आणि सुविधा देणारी कंपनी बदलून ते चाळीसवर आणलं. यात एक विशिष्ट प्रकारचा फोनच वापरायचा आणि किती डेटा वापरायचा यावर मर्यादा होत्या, पण आमच्या आवश्यक गरजा यातून पूर्ण होत होत्या, त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीला मुकतोय असं कधीच वाटलं नाही. शिवाय शक्य होईल तेवढं घरून डबा घेऊन जाणं आणि कँटीनमध्ये विकत घेऊन खाणं टाळलं. याचा दुहेरी फायदा होतो - पैसे तर वाचतातच, त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जास्त आरोग्यदायक गोष्टीही खाल्ल्या जातात. अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी करून खर्चावर मर्यादा आणता येते. प्रत्येक गोष्ट करताना 'हे आपल्या ध्येयाला धरून आहे ना?' असा प्रश्न करत असतो. त्यामुळे वायफळ खर्चाला आपोआप चाप बसतो.
याचा अर्थ असा नाही की आम्ही काही सगळी मजा बंद करून फक्त पै न पै साठवत बसलो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, कोणत्या गोष्टीला प्रधान्य द्यायचं त्याची एक साधारण यादी सुरुवातीलाच तयार केली होती. त्यात सहकुटुंब वर्षातून एकदा एक मोठी सहल आणि वीकान्ताला जवळपास भटकंती, कँम्पिंग आणि नवऱ्याच्या रॉक क्लायंबिंग आणि माउंटेनिअरिंग या छंदासाठी वाजवी खर्च करण्याची आमची तयारी होती. या सगळ्या गोष्टींसाठी साहित्य घेताना आम्ही नेहमी उत्तम दर्जाचंच घेतो. पण जिथे पैसे वाचवणं शक्य आहे, तिथे या गोष्टी करतानाही वाचवतो. उदा., चांगलं साहित्य घेतानाही कुठे आणि कधी डिस्काउंट मिळतं ते बघून तेव्हा ते घेतो. सहली ठरवताना बऱ्याच आधी ठरवतो, त्यामुळे विमान तिकिटावर जास्तीचा खर्च वाचतो. शिवाय हॉटेल्स बुक करताना 'एअर बी अँड बी'सारख्या साइटवरून शोध घेऊन जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल ते बघतो. बाहेरच्या देशात गेलो, तरी लोकल ट्रान्स्पोर्टने फिरणं, स्वयंपाक करण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी राहणं अशा गोष्टी केल्याने कमी खर्चात नवनवीन देश आणि जागा पाहण्याची संधीदेखील मिळत आहे. वर्षातून एकदा आम्ही सगळ्या गुंतवणुकीचा आणि खर्चाचा आढावा घेतो. प्रत्येक गोष्ट करतानाच आपल्या अंतिम ध्येयाला अनुसरूनच ही गोष्ट आहे ना, याचा काटेकोरपणे विचार करतो.
वेगवेगळ्या ठिकाणी राहून तिथले अनुभव घेण्यावर कुटुंब म्हणून आमचा कल आहे. शिवाय आउटडोअर गोष्टी करण्याकडे जास्त ओढा असल्यामुळे अशा संधी त्या मानाने कमी उपलब्ध असणाऱ्या मिडवेस्टमधून बाहेर पडण्याचा आमचा विचार चालू होता. आमचं आर्थिक गणित कोलमडू न देता वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून अखेर आम्ही सहा महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये स्थलांतरित झालो. त्या वेळी आढावा घेताना लक्षात आलं की आपण आर्थिक स्वावलंबनाच्या जवळ येऊन पोहोचलो आहे. इथेसुद्धा एक गाडी, ऑफिसच्या जवळच भाड्याने घर या गोष्टी तशाच चालू ठेवल्या आहेत. कॅनडामध्ये गुंतवणुकीचे काय चांगले पर्याय आहेत याचा शोध चालू आहे. इथे काही वर्षं राहिल्यानंतर कदाचित आणखी काही गोष्टी कळतील किंवा नव्या संधी समोर येतील आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल कदाचित बदलतही जाईल. आमच्या सध्याच्या वार्षिक खर्चाच्या २५ पट रक्कम आमच्या पोर्टफोलिओमध्ये जमा झाली की आम्हाला नोकरी संदर्भात वेगवेगळे प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य मिळेल हे नक्की. आम्ही चाळीशी गाठेपर्यंत, म्हणजे आणखी पाच-सहा वर्षांत हे होईल अशी अपेक्षा आहे.
एक मजेचा भाग म्हणून आपल्याला आर्थिक स्वावलंबन मिळवायला किती वेळ लागेल हे इथे चटकन बघता येईल. हे गणित कदाचित फक्त अमेरिकेत लागू असेल, भारतात यातल्या गणितात थोडा फार बदल होईल, पण मूळ संकल्पना तशीच राहील.
शेवटी हा लेख म्हणजे हिमनगाचं एक टोक आहे. एखाद्याला यातली संकल्पना आवडलीच, तर त्यांनी स्वत: अभ्यास करून यातल्या खाचाखोचा जाणून घ्यायला हव्यात. अमुक अमुक एक गोष्ट करा आणि तुम्ही खातरीशीररित्या आर्थिक दृष्टीने लवकरात लवकर स्वावलंबी व्हाल असं मी सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या गरजा, इच्छा, आकांक्षा वेगवेगळ्या. पैसा साठवणं हे अंतिम ध्येय नसून आपल्याला हवी ती गोष्ट करण्याचं स्वतंत्र्य मिळवणं हे आहे. आम्ही निवडलेला मार्ग हा आम्हाला योग्य वाटलेला मार्ग आहे. प्रत्येकाला तोच पटेल असं नाही. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे ज्याचं त्यानं स्वत:च ठरवायचं आहे.
मला जरी या विषयातलं खूप जास्त ज्ञान नसलं, तरी आम्ही (म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे मुख्यत्वे माझ्या नवऱ्याने) खालील पुस्तकं आणि ब्लॉग्ज फोरम्स वाचले / अजूनही वाचत आहोत :
आर्थिक स्वावलंबन, मुदतपूर्व निवृत्ती आणि गुंतवणूक यासाठी वाचलेल्या पुस्तकांची यादी.
- इंटेलिजंट इन्व्हेस्टर - बेंजामिन ग्रॅहम
- बॉगलहेड्स,गाईड टु इन्व्हेस्टींग
- कॉमन स्टॉक्स फॉर अनकॉमन प्रॉफिट्स
- अर्ली रिटायरमेंट एक्स्ट्रीम
- सिंपल पाथ टू वेल्थ
- द वेल्दी बार्बर
- द वेल्दी रेंटर
- हाऊ टू रिटायर हॅपी, वाईल्ड अँड फ्री
यू एस ब्लॉग्स / फोरम्स
१.एमएमएम
२. बॉगलहेड्स फोरम
३. मॅडफिएन्टिस्ट
भारतातल्या गुंतवणुकीसाठी आम्ही खालील संस्थळांचा वापर केला :
१. जागो इन्व्हेस्टर
२. सुब्रमनी
३. फ्री फिन कॅल
कॅनडा ब्लॉग्स / फोरम्स
१. फायनान्शिअल विस्डम
२. केनेडिअन काउच पोटेटो
तुम्हीसुद्धा असं काही करत असाल किंवा करायची इच्छा असेल, तर तुमचे अनुभव इथे शेअर करा. या वाटचालीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचंही स्वागत आहे.
धन्यवाद!

वाचने
74645
प्रतिक्रिया
140
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख अावडला...
या धाग्यावर उल्लेख केलेला
अतिशय उपयुक्त लेख! आभार
गंभीरपणे दिलेला प्रतिसाद
इतकी भीती ?
In reply to गंभीरपणे दिलेला प्रतिसाद by उदय
जर तुमचे टंपरामेंट (मराठी?) व्यवस्थित असेल आणि तुम्ही नियमित बचत केली आणि नशीबाने साथ दिली तर आर्थिक स्वावलंबन सहज शक्य आहे.थोडक्यात तुमचा भर बचत, नशीब, टेंपरामेंट असल्या गोष्टींवर आहे आणि सर्वांच इप्सित `सो कॉल्ड आर्थिक स्वातंत्र्य' मिळवणं आहे. इतक्या कुचकामी लॉजिकवर जगणारे काहीही साहस करु शकणार नाहीत. कारण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे इतके पैसे अशी गोष्टच या जगात नाही. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आता, या क्षणी आणि कधीही, पैसा मला नमवू शकत नाही. पैसा माझ्या जीवनाची दिशा ठरवू शकत नाही. मी प्राथमिक आहे आणि पैसा दुय्यम आहे हे आकलन. अर्थात इतकी वैचारिक उंची गाठायला कितपत जमेल हे ज्याचं त्यानं ठरवावं.संजयजी
In reply to इतकी भीती ? by संजय क्षीरसागर
माझा
In reply to संजयजी by ट्रेड मार्क
तो लेख वाचला आहे
In reply to माझा by संजय क्षीरसागर
दादा,
In reply to तो लेख वाचला आहे by ट्रेड मार्क
पैसा हे सर्वस्व नक्कीच नाही पण पैश्यांशिवाय काम होतही नाही.हा एकमेव गैरसमज जेव्हा दूर होईल तेव्हा तो लेख तुम्हाला समजेल. १) श्वास पैश्यानं चालत नाही. श्वास चालू आहे म्हणून पैश्याला अर्थ आहे. २) मुळात श्वास चालू असणं हे कोट्यावधी फॅक्टर्सवर अवलंबून आहे पण आपल्याला ते कळत नाही. ३) श्वास चालू असणं हे अठरा कोटी किलोमिटर्स दूर असणारा सूर्य तळपत राहाण्यावर अवलंबून आहे. तिकडे सूर्य विझला तर इकडे आपण संपलो. ४) या अठरा कोटी किलोमिटर्सच्या त्रिज्येभोवती पृथ्वी कायम एकसमान अंतर ठेवून फिरायला हवी. ५) पृथ्वीच्या या परिक्रमेत कोणत्याही ग्रहानं चुकून जरी प्रवेश केला तर एका क्षणात सगळा खेळ खलास होईल. ६) पृथ्वी चुकून स्वतःभोवती फिरायची थांबली तर सूर्यासमोरचा भाग खाक होईल आणि पलिकडचा थंडीनं निर्जीव होईल. ७) पृथ्वी असाशी कलली आहे म्हणून ऋतू आहेत, हा अँगल बिघडला तर वातावरणात उलथापालथ होईल. ८) या अँगलमुळे समुद्र चंद्राशी संधान राखून आहेत आणि समुद्र आहेत म्हणून पर्जन्य आहे आणि पर्जन्य आहे म्हणून वृक्ष आहेत आणि त्यांचा उत्छ्वास आपला श्वास आणि आपला उत्छ्वास हा त्यांचा श्वास आहे. १०) शरीर जीवंत राहायला श्वास प्रमुख असला तरी इतर सर्व सिस्टीम्स जसे की हृदय, न्यूरो सिस्टम, ब्लड सर्क्युलेशन, आणि तदनुषंगिक अनेक अज्ञात प्रक्रिया चालू राहाण्यावर जीवंत असणं अवलंबून आहे. हे तुम्हाला समजतील इतके ज्ञात फॅक्टर्स झाले.ते सर्व या क्षणी हजर असतील तरच जीवनात एखादी घटना घडू शकेल.... आणियातला एक जरी फॅक्टर कोसळला तरी घटना घडणार नाही. ते सर्वच्या सर्व फॅक्टर्सआपल्या नियंत्रणा बाहेर आहेत. आणि यातल्या एकाही फॅक्टरचापैश्याशी शाट संबंध नाही! खुद्द बिल गेटस सुद्धा यातला एकही फॅक्टर नियंत्रित करु शकत नाही. थोडक्यात, आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपल्याला खायला मिळतंय आणि खायला मिळतंय म्हणून आपला श्वास चालू आहे असं समजणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. ते नोबेल देणारे आणि घेणारे हे सर्व पॅरामिटर्स न जाणताच, आणि त्यामुळेच गृहित धरुन, `पैश्यामुळे घटना घडली' असा कमालीचा अज्ञान मूलक अर्थ काढतायंत. पण वस्तुस्थिती अशीये की इतक्या अब्जावधी नियंत्रणबाह्य फॅक्टर्सवर आधारित असलेली घटना, ते फॅक्टर्स कायम राहातील असं गृहित धरुन केवळ पैश्यामुळे घडली असं मानणं हे निर्बुद्धपणाचं लक्षण आहे. इट इज द अदर वे राऊंड,घटना घडायची नसेल तर पैसा हे केवळ निमित्त होतंआणिघटना घडायचीच असेल तर पैसा शाट काही करु शकत नाही.साहेब
In reply to दादा, by संजय क्षीरसागर
ते सर्व या क्षणी हजर असतील तरच जीवनात एखादी घटना घडू शकेल.... आणि यातला एक जरी फॅक्टर कोसळला तरी घटना घडणार नाही. ते सर्वच्या सर्व फॅक्टर्स आपल्या नियंत्रणा बाहेर आहेत. आणि यातल्या एकाही फॅक्टरचा पैश्याशी शाट संबंध नाहीज्योतिष सांगणारे आणि नियती, नशीब मानणारे लोक हेच तर म्हणतात. हे जे सांगताय ते तुम्ही व्यवहारात किती आणलंय? तुम्ही म्हणता की मला वाटेल तेव्हा काम करतो, बाकी छंद जोपासतो, पैश्यांची चिंता करत नाही. पण म्हणजे तुम्ही काम करताच ना? ते तरी कशाला करता? बरं ते ही छंद म्हणून करता असं मानलं तर त्याचे पैसे कशाला घेता? वर उदय यांनी म्हणल्याप्रमाणे आहे ते सगळं सोडून, जवळ एकही पैसा न ठेवता हिमालयात एक महिना राहून दाखवा. म्हणूनच मी वरच्या प्रतिसादात विचारलेले प्रश्न परत एकदा वाचा आणि त्याची खरी खरी उत्तरं द्या. कृपया तुम्हाला सोयीस्कर असलेले मुद्दे घेऊन चर्चा करू नका. सर्व प्रश्नांची, जरी तुम्हाला अडचणीचे वाटले तरी, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कदाचित जी चर्चा होईल ती तुमच्या आणि आमच्याही फायद्याची असेल.यू आर ज्योकींग !
In reply to साहेब by ट्रेड मार्क
कदाचित जी चर्चा होईल ती तुमच्या आणि आमच्याही फायद्याची असेल.तुम्हाला अजूनही पैश्यामुळेच घटना घडते हा भ्रम आहे, त्यामुळे चर्चा (मी लिहीलं तर) तुम्हाला उपयोगी होईल.हे जे सांगताय ते तुम्ही व्यवहारात किती आणलंय? तुम्ही म्हणता की मला वाटेल तेव्हा काम करतो, बाकी छंद जोपासतो, पैश्यांची चिंता करत नाही. पण म्हणजे तुम्ही काम करताच ना? ते तरी कशाला करता? बरं ते ही छंद म्हणून करता असं मानलं तर त्याचे पैसे कशाला घेता? वर उदय यांनी म्हणल्याप्रमाणे आहे ते सगळं सोडून, जवळ एकही पैसा न ठेवता हिमालयात एक महिना राहून दाखवा.मी हे गेली काही दशकं जगतोयं! मला हिमालयात जायची गरज नाही. अज्ञानी लोकांना तो सायास करायला लागतो आणि महाअज्ञानी इतरांना तो करायला सांगतात. हिमालयाची शांतता मी माझ्या घरीच आणलेली आहे. कारण शांतता इथे तिथे सर्वत्र एकसारखीच आहे. तुम्ही ही हिंमतवर्कींग डेलाघरच्याघरी करुन बघा. १) सकाळी डोळे उघडल्याशिवाय उठणार नाही. २) भूक लागल्याशिवाय जेवणार नाही. ३) घड्याळ किंवा वेळेची दखल घेणार नाही. ४) मनात आलं तरच काम करीन. ५) छंद किंवा आनंद वर्सेस काम असा विकल्प आला तर काम फाट्यावर मारीन. ६) असं जगून सुद्धा काम वेळेपूर्वीच आणि उत्तम प्रकारे कंप्लीट करीन. ७) मग जे पैसे मिळतील ते मिळतील. येत्या सोमवारी सुरु केलं आणि शुक्रवारपर्यंत फेफरं येऊन, सोमवारी पुन्हा रुटीन सुरु केलं नाहीत तर इथे प्रामाणिकपणे अनुभव लिहा . आणि फेफरं न येता मजा आली तर किमान तीन महिने हा कार्यक्रम राबवा, तुम्हाला मी काय जगतो याची झलक मिळेल. आणि तुम्ही पुन्हा व्यर्थ प्रश्न विचारणार नाही.तुम्हाला भ्रम होतायेत असं मला वाटतंय
In reply to यू आर ज्योकींग ! by संजय क्षीरसागर
मी हे गेली काही दशकं जगतोयं!म्हणजे ज्यांचं काम करता त्यांच्याकडून तुम्ही पैसे घेत नाही? अगदी पहिल्या कामापासून तुम्ही पैसे घेत नाही का? जर घेताय तर मग कशाला घेता? मी तुम्हाला जे विचारतोय आणि करायला सांगतोय ते वाचून तुम्हाला फेफरं आलंय असं वाटतंय.तुम्ही ही हिंमत वर्कींग डेला घरच्याघरी करुन बघा.हे सगळं बहुतेकांना अगदी रोज करणं जमणार नाही. याचे कारण पैसे हे नसून असलेली जबाबदारी आहे. माझ्या वेगळ्या टाइम झोन मध्ये असलेल्या टीम माझ्यासाठी थांबलेल्या असतात, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणे ही माझी जबाबदारी आहे. नोकरी करणे आणि व्यवसाय करणे यात हा फरक असतोच. आम्हाला ठरलेली वेळ पाळायला लागते आणि स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या निभावायला लागतात. पण म्हणजे आम्ही १२ महिने २४ तास पैश्यांच्या मागे लागलोय हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही मी सांगतोय ते करून बघाच. नाहीतर तुम्ही जगताय तेच फक्त जीवन आणि बाकीचे जगतात ते मरण या भ्रमात तुम्ही आनंदात जगा. आमच्या जगात आम्हाला आनंदाने जगू दे, काय? उगाच सगळ्या अर्थविषयक धाग्यावर तीच तीच टेप वाजवून आमचा वेळ कशाला वाया घालवता? तुम्हाला नसलं तरी तुमच्या मते आम्हाला पैश्यांच्या मागे लागायला लागतं.अब आ गये लाईनपे !
In reply to तुम्हाला भ्रम होतायेत असं मला वाटतंय by ट्रेड मार्क
हे सगळं बहुतेकांना अगदी रोज करणं जमणार नाही.नुसत्या कल्पनेनीच धरणी दुभंगली ! पण निदान कबूल तरी केलंत हे काय कमीये. तुम्ही जवाबदारी घेता आणि मी काय गोट्या खेळत नाही. माझी काम वेळेपूर्वीच कंप्लीट असतात. नोकरी आणि व्यावसाय ही फनी कंपॅरिजन आहे. तुम्ही आठवडाभर रजा काढून मी सांगितलेला उपक्रम राबवून बघितला असता, पण त्याला हिंमत लागते. आणि मी तर फक्त आठवडाभर म्हणत होतो पण नुसत्या कल्पनेनंच तुम्ही खचलात. घटना घडण्यासाठी जे (नॉन फिनान्शियल) फॅक्टर्स कारणीभूत आहेत ते मी तुम्हाला सांगितल्यावर, मान्य करण्याखेरीज गत्यंतर राहीलं नाही. पण त्याची तुम्हाला शून्य कल्पना होती, तुम्ही त्यावर फक्त स्वतःचा बचाव केला. कारण ज्या क्षणी मला तो बोध झाला त्या क्षणी मी त्याची प्रचिती घेण्यासाठी सगळं आयुष्य पणाला लावलं ! मी तसं जगलो आणि आय मेड मनी सेकंडरी फॉर ऑल माय लाइफ. त्याला गटस लागतात.आम्ही १२ महिने २४ तास पैश्यांच्या मागे लागलोय हा तुमचा भ्रम आहे.हे कुठून काढलं ? तुम्हाला स्वातंत्र्य नाहीये किंवा जे काय तुम्हाला `स्वातंत्र्य वाटतंय' ते फार लिमीटेड आहे इतकाच मुद्दा आहे. आणि पैसे कमवू नका हे मी कधीही आणि कुठेही म्हटलेलं नाही. पैसा दुय्यम आहे आणि आपण प्रथम आहोत हा माझा एकमेव मुद्दा कायम आहे. तस्मात, मी क्लायंटला चार्ज करतो की नाही ही विचारणा अत्यंत बालीश आहे.आमच्या जगात आम्हाला आनंदाने जगू दे, काय? उगाच सगळ्या अर्थविषयक धाग्यावर तीच तीच टेप वाजवून आमचा वेळ कशाला वाया घालवता?हा पुन्हा ज्योक ! प्रश्न तुम्ही विचारलायं आणि मी उत्तर दिलंय. तुमची हौस तुम्हाला नडली, नाहीतर मला उत्तर द्यायची घंटा गरज नव्हती. एनी वे, इथून पुढे जवाबदारीनं लिहा.अजून एक सांगावंस वाटतं
In reply to अब आ गये लाईनपे ! by संजय क्षीरसागर
इथेही वर उत्तर देताना तुम्ही मी विचारलेले प्रश्न खुबीने टाळलेले आहेत हे तुमच्या लक्षात आणून देतो. थोडक्यात, तुम्हाला वाटलं की आय कॅन बी कॉर्नर्ड आणि मी तुम्हाला जगातली कोणतीही घटना घडण्यासाठी लागणारे नॉन-फिनान्शियल फॅक्टर्स दाखवून दिल्यावर सुद्धा तुम्ही पार व्यक्तिगत लेवलला प्रतिसाद रेटणं चालूच ठेवलं :हे जे सांगताय ते तुम्ही व्यवहारात किती आणलंय? तुम्ही म्हणता की मला वाटेल तेव्हा काम करतो, बाकी छंद जोपासतो, पैश्यांची चिंता करत नाही. पण म्हणजे तुम्ही काम करताच ना? ते तरी कशाला करता?. सो नाऊ इट वॉज माय टर्न ! मी जगतो तेच लिहीतो त्यामुळे मला पेचात पकडणं असंभव आहे. जी काही प्रश्नोत्तरं झाली आहेत त्यात कुणालाही कमी लेखण्याचा हेतू नाही. आणि स्वतःची शेखी मिरवण्याचा तर नाहीच नाही कारण बाकीचे कितपत स्वतंत्र आहेत हे मी जाणतो. मला फक्त एकच सांगायचं होतं की १.५० कोटी खात्यात जमा असणं की $ ७५, ००० बिनकामाचं वार्षिक उत्पन्न असणं असल्या फँटास्टिक निरुपयोगी आयडीया इथे लिहून ज्यांच्याकडे तशी क्षमता नाही त्यांना नाराज करु नका किंवा गाजर दाखवू नका. ज्यांच्याकडे त्याहूनही जास्त पैसे आहेत ते सुद्धा सर्वांगिण मुक्ततेनं जगू शकत नाहीत.हा हा हा
In reply to अजून एक सांगावंस वाटतं by संजय क्षीरसागर
तुम्ही ही हिंमत वर्कींग डेला घरच्याघरी करुन बघा. हे तुम्हीच म्हणालात आणि मग पुढच्या प्रतिसादात"तुम्ही आठवडाभर रजा काढून मी सांगितलेला उपक्रम राबवून बघितला असता"असं म्हणताय. सुट्टी घेऊन सगळे बहुतेक त्यांना पाहिजे तसंच वागतात. मूड असेल तर गोट्याही खेळत असतील. पण त्यावेळातही कर्जाची चिंता करत बसत नाहीत.घटना घडण्यासाठी जे (नॉन फिनान्शियल) फॅक्टर्स कारणीभूत आहेत ते मी तुम्हाला सांगितल्यावर, मान्य करण्याखेरीज गत्यंतर राहीलं नाही. पण त्याची तुम्हाला शून्य कल्पना होती, तुम्ही त्यावर फक्त स्वतःचा बचाव केला.हेच स्वतःला सर्वज्ञानी आणि इतरांना मूर्ख समजणं आहे.मी क्लायंटला चार्ज करतो की नाही ही विचारणा अत्यंत बालीश आहे.माझा क्रेडिट कार्डचा धागा काय किंवा सदरचा धागा काय, विषय पैसे कसे वाचवायचे हा आहे. पूर्णपणे वेगळा विषय असताना तुम्ही मधेच मी कसा शहाणा अशी जाहिरात करत बसता हे जास्त बालिश आहे. माझ्या या क्रेडिट कार्ड विषयीच्या धाग्यात तुम्ही म्हणता की तुम्ही आयुष्यात कधी कर्ज काढलं नाही. पुढे, या प्रतिसादात तुम्ही म्हणता "क्रेडीट कार्ड वापरतो ही एकमेव गोष्ट सोडता मी आयुष्यात कधी एक पैसाही कर्ज घेतलं नाही.". क्रेडिट कार्ड वापरणं म्हणजे एक प्रकारचं कर्जच आहे ना? त्यापुढे तुम्ही गृहकर्जावर गेलात. आता त्यापुढील तुमचेच सगळे प्रतिसाद वाचा. मग इथे कशी फिरवाफिरवी केलीत बघा. वर नंतर हे ही म्हणतायजी काही प्रश्नोत्तरं झाली आहेत त्यात कुणालाही कमी लेखण्याचा हेतू नाही. आणि स्वतःची शेखी मिरवण्याचा तर नाहीच नाही कारण बाकीचे कितपत स्वतंत्र आहेत हे मी जाणतो.तुमच्या प्रत्येक प्रतिसादात "तुम्हारा जीना भी कोई जीना है लल्लू" हा सूर कायम आहे. एकही धाग्यात फ्लॅट घेण्याइतके पूर्ण पैसे नसतील तर काय करायचं हे तुम्ही सांगू शकला नाहीत. तुम्ही ३.५ लाखाला पहिला फ्लॅट घेतला तेव्हा दागिने व इतर इन्व्हेस्टमेंट विकून पैसे उभे केलेत हे तुम्हीच सांगितलंय. त्या इन्वेस्ट्मेन्ट्स तुमच्या होत्या का याचं उत्तर टाळलंत. कारण २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९२ साली तुमच्याकडे स्वतःचे ३.५ असतील तर तुम्ही त्याआधी बरीच वर्ष काम करत असावेत. म्हणजे आत्ता तुम्ही ६५+ असू शकता. त्यामुळे तुम्ही जो दिनक्रम सांगताय त्यात नवल काहीच नाही. एवढंच काय कुठल्या डेबिट कार्ड्स वर चार्जेस लागत नाहीत हे सांगितल्यावर, बघतो आणि सांगतो म्हणालात आणि पुढे गायब झालात. स्वतःला तुम्ही अर्थविषयक सल्लागार म्हणवता आणि इतक्या सध्या गोष्टी पण माहित नसाव्यात तुम्हाला? आता म्हणाल की मी पैश्यांची चिंता करत नाही, होउदे खर्च. अजून उत्खनन केलं तर तुमच्याच सांगण्यात किती विसंगती आहे आणि तुम्ही सोयीस्कर प्रतिसाद कसे देता याचे अजून पुरावे देता येतील. पैसे कसे मिळवावे आणि वाचवावे याचे नवनवीन फंडे समाजाने आम्हा पामरांसाठी उपयुक्त आहे. तेव्हा उगीच या विषयांवर असलेल्या धाग्यांवर अध्यात्म सांगून धाग्याचे काश्मीर करू नये. आणि हो, जे तुम्ही क्लेम करताय त्याची सत्यासत्यता बघायला आमच्याकडे काहीच मार्ग नाही. मिपावर सुद्धा तुमचे क्लायंट आहेत म्हणताय पण कोणी तुमच्या बाजूने काही बोललेलं नाही. तेव्हा तुम्ही जिथे तिथे मी कसा छान जगतो हे सांगत बसता त्याला स्वतःची टिमकी वाजवणे म्हणतात.दंडवत स्वीकारा
In reply to हा हा हा by ट्रेड मार्क
@ ट्रेमा,
In reply to दंडवत स्वीकारा by लंबूटांग
पहिले चार भाग वाचले
In reply to गंभीरपणे दिलेला प्रतिसाद by उदय
अतिशय सुरेख लेख इडो.
कॅनडा?
@ ट्रेमा,
तुम्ही पैसे घेता का नाही प्रश्न फारच अडचणींचा वाटतोय बहुतेक.मी काय लिहीलंय ते नीट वाचा :पैसे कमवू नका हे मी कधीही आणि कुठेही म्हटलेलं नाही. पैसा दुय्यम आहे आणि आपण प्रथम आहोत हा माझा एकमेव मुद्दा कायम आहे. तस्मात, मी क्लायंटला चार्ज करतो की नाही ही विचारणा अत्यंत बालीश आहे.या जगात पैसे न घेता कुणी काम करेलहा विचारमुळातच व्यर्थ आहे. २)तुम्ही ३.५ लाखाला पहिला फ्लॅट घेतला तेव्हा दागिने व इतर इन्व्हेस्टमेंट विकून पैसे उभे केलेत हे तुम्हीच सांगितलंय. त्या इन्वेस्ट्मेन्ट्स तुमच्या होत्या का याचं उत्तर टाळलंत.आम्ही एकत्र कुटुंबात राहातो. माझे वडील, भाऊ, मी आणि आई या सर्वांनी मिळून घर घेतलं. आम्ही कर्ज घेतलं नाही. त्यावरनंमाझ्याकडे सगळे पैसे होतेहा निष्कर्श तुम्ही तुमच्या बुद्धिनी काढलायं. ३) आता तुमच्या अनाकलाची हद्द बघा :आत्ता तुम्ही ६५+ असू शकता. त्यामुळे तुम्ही जो दिनक्रम सांगताय त्यात नवल काहीच नाही.माझा हा दिनक्रम गेली वीस वर्ष आहे ! हे पुन्हा एकदा नीट वाचाहा दिनक्रम गेली वीस वर्ष आहे !आणि ते नवल आहे ! आता माझा मुद्दा नीट लक्षात घ्या : लेखातल्या प्लानिंगप्रमाणे तो प्लानिंग करणार्याकडे आजही नाही आणि भांडवल जमा झाल्यावरही शक्य नाही, कारणस्वातंत्र्य साहसावर अवलंबून आहे, पैश्यावर नाही.४) तुम्ही प्रतिसाद वाचतच नाही याचा पुन्हा हा नमुना पाहा :सुट्टी घेऊन सगळे बहुतेक त्यांना पाहिजे तसंच वागतात. मूड असेल तर गोट्याही खेळत असतील. पण त्यावेळातही कर्जाची चिंता करत बसत नाहीत.पुन्हा तसाच फनी अर्थ ! सुट्टी घेऊन तो उपक्रम राबवून बघा म्हणजेसर्वांगिण स्वातंत्र्याचीकल्पना येईल,कारण नोकरी करतांना तो शक्य नाही.सुट्टीत तुम्ही गोट्या खेळता का आणखी काही याच्याशी त्याचा दूरान्वये ही संबंध नाही. ४) तुम्हाला अलिकडलं वाक्य पलिकडल्या वाक्याशी सुद्धा जोडता येत नाही !क्रेडिट कार्ड वापरणं म्हणजे एक प्रकारचं कर्जच आहे ना?कारण मी ऑलरेडी म्हटलंय "क्रेडीट कार्ड वापरतो ही एकमेव गोष्ट सोडता मी आयुष्यात कधी एक पैसाही कर्ज घेतलं नाही." आणि मजा म्हणजे ते तुमच्या वाक्याच्या अलिकडे, तुम्हीच नमूद केलंय. ५)एवढंच काय कुठल्या डेबिट कार्ड्स वर चार्जेस लागत नाहीत हे सांगितल्यावर, बघतो आणि सांगतो म्हणालात आणि पुढे गायब झालात.हे कुठून काढलं ? माझ्या कार्डवर चार्जेस लागतात आणि मी फक्त नॅशनलाइज्ड बँकेत पैसे ठेवतो आणि त्यांचंच कार्ड वापरतो हे तिथेच सांगितलं आहे. पण तुम्हाला मूळ मुद्दाच कळत नाही, तो असा होता : कार्ड वापरुन आणि लोन्स घेत व त्यांची परतफेड करत, स्वतःचं सिबील रेटींग वाढवणं, यापेक्षालोन न घेणं श्रेयस्कर आहे.६) तुमचा घोर गैरसमज बघा : घटना घडण्यासाठी जे (नॉन फिनान्शियल) फॅक्टर्स कारणीभूत आहेत ते मी तुम्हाला सांगितल्यावर, मान्य करण्याखेरीज गत्यंतर राहीलं नाही. पण त्याची तुम्हाला शून्य कल्पना होती, तुम्ही त्यावर फक्त स्वतःचा बचाव केला.हेच स्वतःला सर्वज्ञानी आणि इतरांना मूर्ख समजणं आहे.अजूनही तुम्हाला श्वास प्रायमरी आहे हे मान्य नाही ! यावरनं आता काय समजायचंय ते समजा. ७) आता तुमचा हा विनोद पाहा :जे तुम्ही क्लेम करताय त्याची सत्यासत्यता बघायला आमच्याकडे काहीच मार्ग नाही.मी तरी तुम्हाला कुठे वेरिफाय करु शकतोयं ? पण एखाद्या व्यक्तीविषयी जाणून घ्यायला आणि व्यासंगाचा अंदाज यायला, त्याच्या लेखनाची रेंज पुरेशी आहे. तुम्ही इथे किती आणि कायकाय विषयावर लिहीलंय ते बघितलं की जगण्याचा आवाका लक्षात येतोच. ८) हे फारच बालीश वाटतंय का पाहा :मिपावर सुद्धा तुमचे क्लायंट आहेत म्हणताय पण कोणी तुमच्या बाजूने काही बोललेलं नाही.इथला एकही क्लायंट मला अजून प्रत्यक्ष भेटलेला नाही . आमचा सगळा संवाद फोन्स आणि मेल्सवर आहे. आणि तरीही माझ्या क्लायंटसना, मी एकटा कुणालाही पुरुन उरेन याची खात्री आहे !तुम्ही तुमची लाल आहे हे
In reply to @ ट्रेमा, by संजय क्षीरसागर
असे प्रतिसाद देण्यापलिकडे तुमच्याकडे काही वकूब आहे का ?
In reply to तुम्ही तुमची लाल आहे हे by वेशीवरचा म्हसोबा
ज्ञानी व्यक्ती आपल्या
In reply to असे प्रतिसाद देण्यापलिकडे तुमच्याकडे काही वकूब आहे का ? by संजय क्षीरसागर
शब्बास !
In reply to ज्ञानी व्यक्ती आपल्या by वेशीवरचा म्हसोबा
पैसा दुय्यम आहे आणि आपण प्रथम आहोत हा माझा एकमेव मुद्दा कायम आहेमला फक्त एकच सांगायचं होतं की १.५० कोटी खात्यात जमा असणं की $ ७५, ००० बिनकामाचं वार्षिक उत्पन्न असणं असल्या फँटास्टिक निरुपयोगी आयडीया इथे लिहून ज्यांच्याकडे तशी क्षमता नाही त्यांना नाराज करु नका किंवा गाजर दाखवू नकाकदाचित इतक्या सौम्य रंगांची तुम्हाला सवय नाही पण ती सोय होईपर्यंत चालवून घ्या.संक्षी
In reply to @ ट्रेमा, by संजय क्षीरसागर
पैसे कमवू नका हे मी कधीही आणि कुठेही म्हटलेलं नाही.बरोब्बर. "पैसे" मिळवण्यासाठी तुम्ही व्यवसाय करता. आम्हाला पैसे मिळवण्यासाठी नोकरी करावी लागते. त्यामुळे त्या अनुषंगाने जी बंधने असतात ती पाळायलाच लागतात. तुम्हीच म्हणलंय "नोकरी आणि व्यावसाय ही फनी कंपॅरिजन आहे.". एकीकडे तुम्ही जे सतत म्हणता की तुम्हाला कधीही काम केलं; नाही केलं तरी चालतं आणि दुसरीकडे जे तुम्ही सतत म्हणता की तुम्ही सोडून सगळ्यांना आठ तास काम करायला लागतं ही जास्त फनी कंपॅरिजन आहे. व्यवसायात असल्याने तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा काम करू शकता. त्यात तुम्ही सांगितलंय की तुमच्याकडे कोणी कामाला नाहीये त्यामुळे तर तुम्हाला हे अजूनच शक्य आहे. नोकरी करत असणाऱ्या बहुतेकांना कामाची एक ठराविक वेळ असते जी पाळणे बंधनकारक असते, त्यात हिमतीचा संबंध कुठे येतो? नोकरी करणारे २४ तास पैश्याच्या मागे लागलेले असतात ही समजूत तुम्ही का करून घेतलीये? जसे तुम्ही आम्हाला म्हणताय की आम्ही स्वतंत्र नाही किंवा जे स्वातंत्र्य आहे ते लिमिटेड आहे तेच तुम्हालाही लिमिटेड आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला म्हणलं की टॅक्सेस कॅल्क्युलेट आणि फाईल करायच्या वेळेस तुम्ही पूर्ण ३-४ महिने रजा घ्या. त्यावर तुम्ही उत्तर दिलं नाही."मी क्लायंटला चार्ज करतो की नाही ही विचारणा अत्यंत बालीश आहे"बालिश नाहीये कारण पैसे तुम्हालाही मिळवावेच लागतात. तुम्ही कसे मिळवता आणि आम्ही कसे मिळवतो हा भाग वेगळा कारण तुमचा व्यवसाय तुम्ही एकट्याने करू शकाल असा आहे आणि आम्ही नोकरी करतो. व्यवसाय असल्याने तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही काम करू शकता. जे स्वातंत्र्य सगळ्या व्यासायिकांना असेलच असेही नाही. उद्या वकिलाला तुम्ही म्हणाल कोर्टाच्या वेळेत तुम्हाला जायला लागतं म्हणजे लिमिटेड स्वातंत्र्य आहे. आम्ही एकत्र कुटुंबात राहातो. माझे वडील, भाऊ, मी आणि आई या सर्वांनी मिळून घर घेतलं. आम्ही कर्ज घेतलं नाही. त्यावरनं माझ्याकडे सगळे पैसे होते हा निष्कर्श तुम्ही तुमच्या बुद्धिनी काढलायं बरोब्बर. म्हणजे तुमच्याकडे पैसे नव्हते तर आणि त्यावर उपाय म्हणून तुमच्या घरातील स्त्रीधन तुम्ही विकून टाकलं, वडिलांनी साठवलेले ठेवींच्या स्वरूपातील पैसे वापरून टाकले. हेच आम्ही स्त्रीधनाला शक्यतो हात न लावता, आईवडिलांनी कष्ट करून साठवलेले पैसे न खर्च करता बाहेरून पैसे उभे करून घर घेतो, ज्यात बँकेकडून कर्ज घेणं हे पण अंतर्भूत आहे. यात फक्त उद्याचा विचार नसून घरातील स्त्रियांचा, त्यांच्या दागिन्यांचा आणि वडिलांचे पैसे न खर्च करण्याचा विचार आहे.हे पुन्हा एकदा नीट वाचा हा दिनक्रम गेली वीस वर्ष आहे ! आणि ते नवल आहे !यात नवल तुम्हाला वाटतंय. स्वातंत्र्य आम्हालाही आहेच पण आम्ही उगाच डंका पिटत नाही.लेखातल्या प्लानिंगप्रमाणे तो प्लानिंग करणार्याकडे आजही नाही आणि भांडवल जमा झाल्यावरही शक्य नाही, कारण स्वातंत्र्य साहसावर अवलंबून आहे, पैश्यावर नाही.तीन वेगवेगळ्या पण रिलेटेड गोष्टीमध्ये तुम्ही गोंधळ घालताय. १. पैश्याचे स्वातंत्र्य: हे प्रत्येकाच्या मानण्याप्रमाणे आहे. एखाद्याकडे पैसे नसतील म्हणजे रोज किंवा महिन्याला मिळेल त्यावर पोट असेल तर त्याला हे स्वातंत्र्य कमी असेल. पण मग एखादे साहस करून तो जास्त पैसा मिळवू शकतो. घर घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर कर्ज काढण्याशिवाय दुसरा मार्ग आहे का? प्रस्तुत लेखाचा उद्देश तुम्ही वायफळ खर्च कमी करून कशी गुंतवणूक करावी हा आहे. माझ्या क्रेडिट कार्डच्या लेखाचा मी क्रेडिट कार्ड्सचा माझ्या फायद्यासाठी कसा वापर करून घेतला हा आहे. म्हणून आम्ही कोणीच पैश्याच्या दृष्टीने स्वतंत्र नाही का निष्कर्ष काढून तुम्ही मोकळे झालात? २. वेळेचे स्वातंत्र्य: हे पैसे मिळवण्याचा जो मार्ग स्वीकारला आहे त्यावर अवलंबून आहे. नोकरी करणाऱ्याला ठरवलेल्या वेळात आणि ठराविक वेळ काम करायला लागतं. व्यवसाय करणाऱ्याला व्यवसायाच्या स्वरूपावर हे स्वातंत्र्य अवलंबून आहे. तुमच्या अशिलाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्याच्या रिटर्न्स वर प्रश्न विचारले आहेत आणि त्याची उत्तरं ठराविक वेळेत द्यायची आहेत तर तुम्ही माझा मूड नाही हे उत्तर देऊ शकणार नाही. ३. आयुष्याचा आनंद घेण्याचे स्वातंत्र्य: प्रत्येक जण आपापल्या परीने आयुष्याचा आनंद घेतच असतो. हा तुमचा गैरसमज आहे की तुम्ही सोडून सगळे अगदी दुःखात जगत आहेत. या आधीपण मी सांगितलंय की नोकरी करत असूनही मी मला वाटेल तेव्हा काम करू शकतो. अगदी ८ ला ऑफिसला जायलाच पाहिजे असं नाही आणि रोज जायला पाहिजे असंही नाही. आजही मी ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो आणि मग जाऊ नये असं वाटलं म्हणून गेलो नाही. मस्त ३ तास ताणून दिली नंतर बायकोबरोबर गप्पा हाणल्या. तुम्हाला प्रतिसाद वाचूनही समजत नाहीत याचा उत्तम नमुना -सुट्टी घेऊन तो उपक्रम राबवून बघा म्हणजे सर्वांगिण स्वातंत्र्याची कल्पना येईल, कारण नोकरी करतांना तो शक्य नाही.नोकरी करत असूनही मला वाटलं म्हणून आज सुट्टी घेतली आणि मला पाहिजे तसं वागलो. या आधीही असं बरेचदा केलंय आणि यापुढेही करीन. आणि हो, आजच्या दिवसाचा पगार मला मिळणारच आहे. नसता मिळाला तरी फारसा फरक पडला नसता. पैश्याची चिंता करायची अजिबात गरज भासली नाही, किंबहुना तो विचारच मनात आला नाही.क्रेडीट कार्ड वापरतो ही एकमेव गोष्ट सोडता मी आयुष्यात कधी एक पैसाही कर्ज घेतलं नाही.अहो म्हणजे कर्ज घेतलंच ना? त्याची परतफेड करायला लागणारच ना? मग मी कर्जमुक्त जीवन जगतो हा तुमचा दावा पोकळ आहे. कारण शॉर्ट टर्म का होईना तुम्ही कर्ज घेताच.माझ्या कार्डवर चार्जेस लागतात आणि मी फक्त नॅशनलाइज्ड बँकेत पैसे ठेवतो आणि त्यांचंच कार्ड वापरतो हे तिथेच सांगितलं आहे.इतरांनी पुराव्यासहित सिद्ध केलंय की नॅशनलाइज्ड बँकांचे डेबिट कार्ड्स वापरून चार्जेस लागत नाहीत. एसबीआय च्या डेबिट कार्डावर चार्जेस लागत नाहीत हे गणामास्तर यांनी सांगितलं. त्यावर तुम्ही बघून सांगतो म्हणालात आणि नंतर सांगितलंच नाहीत. तुम्ही म्हणताय"कार्ड वापरुन आणि लोन्स घेत व त्यांची परतफेड करत, स्वतःचं सिबील रेटींग वाढवणं, यापेक्षा लोन न घेणं श्रेयस्कर आहे.".पण तुम्ही तर क्रेडिट कार्ड्स वापरता ना? एकाच वेळी इतकी विरोधाभासी वाक्य तुम्ही कशी काय लिहू शकता? सिबिल रेटिंग आत्ता सुरु झालंय, क्रेडिट कार्ड्स वापरणं बऱ्याच आधीपासून चालू आहे.अजूनही तुम्हाला श्वास प्रायमरी आहे हे मान्य नाही ! यावरनं आता काय समजायचंय ते समजा.असं तुम्हाला का वाटतं? काहीही हं संक्षी.पण एखाद्या व्यक्तीविषयी जाणून घ्यायला आणि व्यासंगाचा अंदाज यायला, त्याच्या लेखनाची रेंज पुरेशी आहे. तुम्ही इथे किती आणि कायकाय विषयावर लिहीलंय ते बघितलं की जगण्याचा आवाका लक्षात येतोच.आयला मिपावरचे ३-४ लेख वाचून मी काय आहे हे तुम्हाला सगळं कळलं? भारीये की. तुमचे लेख आणि प्रतिसाद वाचून बऱ्याच लोकांनी तुमच्याविषयी अंदाज बांधलेत, त्यामुळेच तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत. इथला एकही क्लायंट मला अजून प्रत्यक्ष भेटलेला नाही . आमचा सगळा संवाद फोन्स आणि मेल्सवर आहे. आणि तरीही माझ्या क्लायंटसना, मी एकटा कुणालाही पुरुन उरेन याची खात्री आहे ! स्वतःविषयी किती ते गैरसमज. एका प्रश्नांची तुम्ही धड उत्तरं देऊ शकत नाही. विषयाला धरून प्रतिवाद करता येत नाही. त्यामुळे असोच.खरं तर पाडवा आहे म्हणून सोडून देणार होतो...
In reply to संक्षी by ट्रेड मार्क
तुम्ही सांगताय ते आचरणात कसं आणायचं हे स्टेप बाय स्टेप सांगू शकला नाहीत.मी सांगतोयं ते स्टेप-बाय-स्टेप नाही. आज आणि आत्ता आचरणात आणायचंय. तुम्ही फक्त आठवडाभर रजा घेऊन नक्की काय करुन पाहा, ते पण वर सांगितलंय पण तुमची हिम्मत नाही (हे तुम्हीच कबूल केलंय !) तस्मात, तुमच्याकडून वायफळ प्रतिसादांशिवाय काहीही होणे नाही. २)यात नवल तुम्हाला वाटतंय. स्वातंत्र्य आम्हालाही आहेच पण आम्ही उगाच डंका पिटत नाही.स्वतःचा युक्तीवाद बोगस ठरला की दुसरा निरर्थक मुद्दा सुरु ! पहिल्यांदा तुम्ही म्हणालात की सिक्स्टी प्लसला अशा दिनक्रमाचं नवल नाही, पण तोंडावर आपटल्यावर आता म्हणतायं `आम्ही डंका पिटत नाही'. तुमच्याकडे घंटा स्वातंत्र्य नाही आणि हिम्मतही नाही. तुम्ही सारखे मागे लागलात म्हणून मी दिनक्रम लिहीला. तुम्हाला ते वाचूनच खचून गेल्यासारखं झालंय, पण उगीच बाजू सावरायची म्हणून आता डंका वगैरे चालू केलंय आता फक्त नशीब समजा की त्यात रोजच्या दिनक्रमातले भोजनोत्सव, स्नानोत्सव, संगीत, लेखन, इतर वेगवेगवेगळ्या आयामांचं एक्स्प्लोरेशन (उदा, मी सध्या शास्त्रीय संगीत शिकतोयं !), आठवड्याला होणारे बहुरंगी कार्यक्रम (उदा. परवा सचीन जांभेकर आणि मोहन भंडारी (काराओके सॉफ्टवेअरचे निर्माते) यांच्या समोर स्टेज परफॉर्मन्सची संधी मिळाली आणि कहर म्हणजे गाण्याला वन्समोअर मिळाला!), नव्या रेस्टॉरंटसच एक्सप्लोरेशन (उदा. माझ्या मुलानं नुकतंच डेक्कन एटचं इंटिरिअर केलंय, त्याला दिलेली भेट), मागच्याच आठवड्यात अँबी वॅली सिटीला केलेली बहारदार ट्रीप... बरीच मोठी यादी आहे. पण वाचून कदाचित फीट येईल म्हणून थांबतो. ३)एका प्रश्नांची तुम्ही धड उत्तरं देऊ शकत नाही. विषयाला धरून प्रतिवाद करता येत नाही.तुमच्या सगळ्या प्रतिसादावर वेळ खर्च करणं व्यर्थ आहे. ४) सो, लेटस कम टू अ सिंपल टेस्ट . तुमचं स्वातंत्र्य, तुमचे विविध व्यासंग, स्वतःच्या कामचा छंद करण्याची तुमची हुशारी (असेल तर) , नातेसंबधात तुम्ही भरलेले रंग (हे समजलं तरी खूप आहे), तुम्ही आयुष्य खुलवण्यासाठी एक्सप्लोअर करत असलेले नवे आयाम (आला का फेस?) हे सगळं एका झटक्यात क्लिअर होईल.... बाकी सगळं सोडा :हिंमत असेल तर तुम्ही फक्त तुमचा दिनक्रम लिहा. फुल्ल पितळ उघडं पडेल !साहेब,
In reply to खरं तर पाडवा आहे म्हणून सोडून देणार होतो... by संजय क्षीरसागर
तुम्हाला नक्की काय त्रास आहे ?
In reply to साहेब, by अप्पा जोगळेकर
जगण्यातल्या सर्वांगिण स्वातंत्र्याची आहेहे तुमच्या पहिल्यांदा लक्षात येतंय का ते पाहा. २) आणखी थोडी कपॅसिटी असेल तर,जगण्यातलं स्वातंत्र्य दिनक्रमात रिफ्लेक्ट होतंहे लक्षात येईल. ३) प्रतिसाद देण्यापूर्वी वाचनाची सवय लावून घेतली तर मी, उदय आणि ट्रेमा यांना दिनक्रमाविषयी विचारलं होतं.ते दोघंही, दिनक्रम सोडून बाकीचंच ठोकतायेत(कारण त्याविषयावर लिहीण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नाही). ४) नंतर ट्रेमानी मलास्टेप-बाय-स्टेप स्वातंत्र्याबद्दल लिहायची विनंतीकेली. ५) मी प्रामाणिकपणे सांगितल्यावर फुल पलटी मारुन`सिक्स्टी प्लस'ला कुणीही असं जगेलवगैरे भंपकपणा सुरु केला. ६) त्यामुळेमी गेली काही दशकं तसा जगतोयं हे(ऑलरेडी सांगितलेलं) पुन्हा सांगणं क्रमप्राप्त झालं ७) एखादा आयडी जर मी सुद्धा स्वतंत्र आहे, मला हवं तसं जगू शकतो, तुम्ही जगता त्या पॅटर्नमधे काही विषेश नाही वगैरे म्हणत असेल आणि वास्तविकात परिस्थिती नेमकी उलट असेल तर समजावून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. ८) आता तुम्हाला खरंच उद्देश वगैरे समजू शकत असेल तर पूर्वग्रहाचा चष्मा काढा आणि हे पुन्हा वाचा, (कारण ते आधी लिहून सुद्धा न वाचल्यामुळे, तुम्हाला क्रेडीट कार्डच्या धाग्यापासून आजपावेतो, सॉलीडच त्रास होतोयं )आपण प्राथमिक आणि पैसा दुय्यम आहे. श्वास चालू असणं हे पैश्यापेक्षा जास्त अनमोल आहे. जे काय प्लानींग (नोबेल विजेते डॅनियल वगैरें ची उदाहरणं देऊन) इथे लिहीलं जातंय ते भविष्यकालीन स्वातंत्र्य आहे आणि पुढचा श्वास आत येईलच याची काहीही ग्वाही नाही. त्यामुळे अशा स्वातंत्र्याला छदाम अर्थ नाही. ती केवळ स्वप्नांची वाट आहे.ज्याला सर्वांगिण स्वातंत्र्य हवंय त्याला आताच तसं जगायला सुरुवात करायला हवी, भले त्याची सांपत्तिक स्थिती काहीही असो. आणि हे पैशाचं नाही तर साहसाचं काम आहे.तुमचा चष्मा काढा म्हणजे दिसेल की मी श्रीमंत नाही फक्त साहसी आहे आणि साहस फक्त एकदाच करायला लागतं हे सांगतोयं.तुम्हाला फक्त माझ्या भाषेतली वावगी वाक्यं दिसतायंत. पण मी सामन्यांच्या बाजूनं आहे हे समजल्यावर, स्वतःच्या गैरसमाजाची हद्द बघून नक्की चक्कर येईल !संक्षी
In reply to तुम्हाला नक्की काय त्रास आहे ? by संजय क्षीरसागर
चर्चा जगण्यातल्या सर्वांगिण स्वातंत्र्याची आहे हे तुमच्या पहिल्यांदा लक्षात येतंय का ते पाहा.या धाग्याचा विषय पैसे कसे वाचवावे, इन्व्हेस्टमेंट कश्या कराव्या हा आहे, हे तुमच्या लक्षात येतंय का? सर्वांगिण स्वातंत्र्याची चर्चा करण्यासाठी तुम्ही धागा काढा, तिथे करू.मी सांगतोयं ते स्टेप-बाय-स्टेप नाही. आज आणि आत्ता आचरणात आणायचंय.आत्तापर्यंत सगळ्यांनी किमान १०० वेळा तरी सांगितलं असेल की आम्ही सगळे आनंदाने जगतोय. आपलं जीवन हे पैश्यापेक्षा मोठं नक्कीच आहे, यात तुम्ही काय वेगळं सांगताय? पण पैसाही अगदीच गौण आहे असे नाही. आमच्याकडे घर घेण्यासाठी एकरकमी पैसे (आहे नाही ते सगळं liquidate करूनही) नाहीत मग घर कसं घ्यायचं? यावर तुमचं उत्तर आहे की घर घेऊच नका. आमच्यावर कर्ज असूनही आम्ही १२ महिने २४ तास कर्जफेडीची चिंता करत नाही हे सांगूनही तुम्हाला पटत नाही. नोकरी असल्याने ठराविक वेळेत काम करणे बंधनकारक आहे हे तुम्ही मान्य करत नाही.तुम्ही फक्त आठवडाभर रजा घेऊन नक्की काय करुन पाहा, ते पण वर सांगितलंय पण तुमची हिम्मत नाही (हे तुम्हीच कबूल केलंय !)मी आधीच सांगितलंय रजा घेऊन मी मला पाहिजे तसाच वागतो. आठवडाभरच काय मागच्याच वर्षी महिनाभर रजा घेऊन मनाला येईल/ जो मूड असेल तसाच वागत होतो. तुम्ही वर्किंग डेला करून दाखवा म्हणालात, त्यावर मी म्हणलं की ते शक्य नाही याचं कारण म्हणजे माझ्यावर अवलंबून असलेल्या टीम्स आणि स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या आहे. पण वर्किंग डेला सुध्दा आज काम करणार नाही असं सांगण्याचं स्वातंत्र्य मला आहे.मी, उदय आणि ट्रेमा यांना दिनक्रमाविषयी विचारलं होतं. ते दोघंही, दिनक्रम सोडून बाकीचंच ठोकतायेतकाहीही बरळताय. तुमच्या प्रतिसादांमधला आणि दाव्यांमधला फोलपणा दाखवून दिल्यावर डोक्यात वात शिरलेला दिसतोय. माझा कालचाच प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही. तुमच्या सोयीसाठी परत लिहितो. सकाळी उठलो आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो. पण काम करू नये अशी इच्छा झाली, म्हणून मी आज काम करणार नाही असं सांगून टाकलं. मग मी आणि बायकोने ३/४ तास झोप काढली. बाहेरून जेवायला आणूया यावर आम्हा दोघांचे एकमत झाले, म्हणून बाहेरून जेवण आणलं आणि गप्पा मारत जेवलो. थोडा वेळ टीव्ही बघितला, मिपावर टीपी केला. नंतर मुलीला आणायला गेलो, थोडा वेळ तिच्याशी खेळलो. मग एका मित्राबरोबर लॉन्ग वॉकला गेलो. येऊन जेवलो आणि गप्पा मारून थोड्यावेळाने झोपलो. यात कुठेही मला आपल्याकडे किती पैसे आहेत, किती कर्ज आहे, पुढे आपलं कसं होणार हा विचार मनाला शिवला नाही. आता हे मला पाहिजे तसं मी जगलो. याचा उगाच मी डंका पिटला नाही आणि पिटायची गरजही नाही. तुम्ही मागेच लागलात म्हणून सांगितलं.एखादा आयडी जर मी सुद्धा स्वतंत्र आहे, मला हवं तसं जगू शकतो, तुम्ही जगता त्या पॅटर्नमधे काही विषेश नाही वगैरे म्हणत असेल आणि वास्तविकात परिस्थिती नेमकी उलट असेल तर समजावून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.परिस्थिती नेमकी उलट असेल अशी समजूत तुम्ही करून घेतली आहे. कारण तुम्ही सोडून इतर कोणी स्वच्छंदी जगूच शकत नाही असा दुराग्रह तुम्ही करून घेतला आहे.तुमचा चष्मा काढा म्हणजे दिसेल की मी श्रीमंत नाही फक्त साहसी आहेतुम्ही फारच विनोदी आहात अशी मला दाट शंका आहे. १९९२ साली ३.५ लाख एकरकमी असणारा माणूस मी श्रीमंत नाही म्हणतोय! वर दुसऱ्याच्या जिवावर, भले आईवडील का असेना, त्यांची सगळी पुंजी वापरून घर घेतलं आणि स्वतःला साहसी म्हणवत आहेत!! हा अजूनच मोठा विनोद.आता फक्त नशीब समजा की त्यात रोजच्या दिनक्रमातले भोजनोत्सव, स्नानोत्सव, संगीत, लेखन, इतर वेगवेगवेगळ्या आयामांचं एक्स्प्लोरेशन (उदा, मी सध्या शास्त्रीय संगीत शिकतोयं !), आठवड्याला होणारे बहुरंगी कार्यक्रम (उदा. परवा सचीन जांभेकर आणि मोहन भंडारी (काराओके सॉफ्टवेअरचे निर्माते) यांच्या समोर स्टेज परफॉर्मन्सची संधी मिळाली आणि कहर म्हणजे गाण्याला वन्समोअर मिळाला!), नव्या रेस्टॉरंटसच एक्सप्लोरेशन (उदा. माझ्या मुलानं नुकतंच डेक्कन एटचं इंटिरिअर केलंय, त्याला दिलेली भेट), मागच्याच आठवड्यात अँबी वॅली सिटीला केलेली बहारदार ट्रीप... बरीच मोठी यादी आहे. पण वाचून कदाचित फीट येईल म्हणून थांबतो.यात एवढं विशेष काय आहे? मी दोन वर्षांपूर्वी पोहायला शिकलो. लहानपणी संधी मिळाली नाही त्यामुळे राहून गेलं होतं. माझी ६ वर्षांची मुलगी आणि मी एकदमच माझ्या पत्नीकडून शिकलो. लहानपणापासून स्टार गेझिंगचं आकर्षण आहे, आता स्वतःचा टेलिस्कोप आहे. इथल्या ऍस्ट्रॉनॉमी क्लब बरोबर ग्रहतारे बघायला जातो.सो, लेटस कम टू अ सिंपल टेस्ट .मला माझ्या कुटुंबाबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर फिरायला जायचा छंद आहे. फार आधीचं सांगत नाही पण मागच्या वर्षी नायगारा ट्रिपमध्ये $२०० प्रतिदिन देऊन हॉर्सशू फॉलच्या अगदी समोर २६व्या मजल्यावर executive suite घेऊन राहिलो होतो. वर्षातून २-३ वेळा आम्ही मित्रमंडळी कुटुंबासहित एखाद्या तळ्याकाठी, डोंगरावर वा बीचवर एक मोठं घर २-३ दिवसांसाठी भाड्याने घेतो. तिथे विविध खेळ, खाणे पिणे, बार्बेक्यू व जवळच्या ठिकाणी फिरतो. याशिवाय दर आठवड्याला आम्ही भेटतोच. मी माझ्या कुटुंबाला घेऊन वेगळं फिरायला जातो. मला आणि माझ्या कुटुंबातील सगळ्यांनाच वेगवेगळी Cuisines try करायला आवडतात. जे आम्ही नेहमीच, म्हणजे आठवड्यातून २-४ वेळा तरी करतोच. ती cuisines घरी पण बनवून बघतो. तसेच गाण्यांच्या कार्यक्रमाला जातो, मूव्हीज, मराठी नाटके यांना जातो. मला गाड्यांचा शौक आहे, त्यामुळे विविध गाड्या मी चालवलेल्या आहेत. वर म्हणल्याप्रमाणे आम्ही रोड ट्रिपला जातो तेव्हा आरामदायीप्रवास व्हावा म्हणून फुल्ली लोडेड होंडा ओडिसी माझ्याकडे आहे. त्यात मुलींना मूव्हीज बघण्यासाठी स्प्लिट स्क्रीन आहे, म्हणजे दोघी एकाच वेळेला वेगवेगळा चित्रपट बघू शकतात आणि त्याच वेळी मी व पत्नी पुढे आमची आवडीची गाणी ऐकू शकतो. एकूण ८ लोक आरामात बसू शकतील एवढी जागा आहे ज्यात आम्ही ४ जणं जातो. येत्या ३-४ महिन्यात बरंच फिरणार आहे, जाऊन आलो की सांगतो. So, we also live a good life, but we just don’t brag about it. माझं काम म्हणजे इतरांच्या चुका काढणं आहे जे मी अगदी लहान असल्यापासून आवडीने करत आलो आहे. त्यात भर म्हणजे मला इतरांना फुकाचे सल्ले द्यायला पण आवडतं आणि सल्ले देणं हा सुध्दा माझ्या कामाचा भाग आहे. स्वतःची लाल करणाऱ्यांवर चढायला पण मला खूप आवडतं, जे मी तुम्हाला दिलेले प्रतिसाद वाचून कळलंच असेल. असो. तुम्हाला आधीच "ग"ची बाधा झालीये आणि त्यात प्रतिप्रश्न आल्याने तुम्ही भंजाळलेले दिसताय. त्यामुळे मग फेफरं येईल, फेस येईल वगैरे चालू आहे. तेव्हा तुम्ही तुमचे दळण वगैरे आनंदोत्सव करा मी माझे आनंदोत्सव करतो, काय म्हणता? आणि हो, मी माझा पहिला फ्लॅट कर्ज काढूनच घेतला होता. वरील सर्व करत असतानाच ते कर्ज पूर्णपणे फेडून टाकले. दुसरा फ्लॅट तयार होतोय, झाला की त्याचे पण कर्ज फेडून टाकणार आहे. आपल्यात फरक म्हणजे मी कृतज्ञ आहे कारण मी शून्यापासून (खरंतर मायनसमधून) सुरुवात केलीये. असं म्हणतात की वैश्विक शक्ती तुम्हाला मदत करत असते. तेव्हा जे मी करू शकलो, जे मला मिळालं यासाठी त्या शक्तीप्रती मी कृतज्ञ आहे. तुम्ही मात्र सगळं मी केलं, मी करतोय हे करत बसला आहात आणि इतरांना क्षुद्र ठरवत आहात.पितळ उघडं पडलं!
In reply to संक्षी by ट्रेड मार्क
हा तुमचा दिनक्रम नाही.२)स्वतःची लाल करणाऱ्यांवर चढायला पण मला खूप आवडतं, जे मी तुम्हाला दिलेले प्रतिसाद वाचून कळलंच असेल.या वाक्यामुळे तुमचा आयडी जाऊ शकेल ! अशी भाषा दोनच गोष्टी दर्शवते ; एक उद्विग्नता आणि दोन अपब्रींगींग ! इतक्या खालच्या लेवलला मला उतरता येत नाही. सो लेट मी कन्क्लूड, १) विकेंडस आणि रजा यामधे जमेल तेवढी मजा करणं यात काहीही विषेश नाही. गोरगरीब सुद्धा स्वतःच्या एपतीप्रमाणे ते करतातच. २) आर्थिक स्वातंत्र्य जर सर्वांगिण स्वातंत्र्य देऊ शकले नाही तर व्यर्थ आहे. सर्वांगिण स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक दिवस आणि संपूर्ण आयुष्य मनसोक्त जगण्याचं स्वातंत्र्य. ते लेखात अपेक्षित असलेलं आणि तुम्ही मिळवलेलं लिमीटेड स्वातंत्र्य नाही. ३) खरं तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक विवंचनेपासून स्वातंत्र्य. ज्याची नजर अजूनही पैश्यावरच आहे आणि ज्याच्या दिवसाचा प्राइम टाईम अर्थार्जनासाठीच जातो, तो अजूनही आर्थिक गुलामीतच आहे. ४) ज्याच्या दृष्टीनं स्वेच्छा प्रथमआणि पैसा दुय्यम (नीट वाचा, दुय्यम. निरुपयोगी नाही), तो खरा आर्थिक दृष्टीनं स्वतंत्र. थोडक्यात, सर्वांगिण स्वातंत्र्य म्हणजे खुला आणि मुक्त दिनक्रम. मी मागे म्हटल्याप्रमाणेअशा व्यक्तीची प्रत्येक रात्र सॅटरडे नाइट आणि प्रत्येक दिवस संडे असतो.अशी व्यक्ती प्रत्येक दिवस इहलोकी सहलीला आल्यासारखा जगते ! ५) असं सर्वांगिण स्वातंत्र्य मिळवायला कमालीची आकलन क्षमता हवी. ज्या आयुष्यात पुढच्या श्वासाचा भरवसा नाही तिथे भविष्यकालीन स्वातंत्र्याची अपेक्षा मूढता आहे. आणि जिथे साहस नाही तिथे पैसा केवळ मानसिक दिलासा आहे. जे स्वातंत्र्य पैश्याच्या आधारावर मिळवलेलं आहे ते कुचकामी आहे कारण ज्याचा आधार घेतला आहे तो पैसा वापरतांना, आधार सुटण्याची भीती कायम आहे. थोडक्यात, जी गोष्ट वापरायची तीच जीवनाचा आधार म्हणून घेण्याचा तो वेडेपणा आहे. आणि जी गोष्ट जीवनाचा खरा आधार आहे, तो श्वास, ज्या वर्तमानाचा उत्सव करायला सांगतो आहे, त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मूर्खपणा आहे. जी गोष्ट क्षणोक्षणी संपते आहे आणि जिच्यावर सर्वस्व अवलंबून आहे तीचा अव्हेर करुन, निर्जीव वस्तूला जीवनाचा आधार मानण्याची ती मूढता आहे. अशा स्वप्नांच्या वाटेवर चालणारे कधीही मुक्त आणि स्वच्छंद होऊ शकणार नाहीत.साहेब,
In reply to तुम्हाला नक्की काय त्रास आहे ? by संजय क्षीरसागर
स्वतःची परिस्थिती बघा !
In reply to साहेब, by अप्पा जोगळेकर
माझ्यासारखे जगून दाखवा असे आव्हान तुम्हीच दिले होते ना मी त्या संदर्भात विचारले होते.तुम्ही पुन्हा न वाचताच ठोकाठोकी चालू केली. परत नीट वाचा :७) एखादा आयडी जर मी सुद्धा स्वतंत्र आहे, मला हवं तसं जगू शकतो, तुम्ही जगता त्या पॅटर्नमधे काही विषेश नाही वगैरे म्हणत असेल आणि वास्तविकात परिस्थिती नेमकी उलट असेल तर समजावून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.आता तुम्ही म्हणतायं :मिळमिळीत, महत्वाकांक्षा विरहीत जीवनासाठी शुभेच्छा. एखादा माणूस भरभरुन जगतो एखादा मरत नाही म्हणून जगतो.आता खरंच हिंमत असेल तर तुमच्या रसभरीत आणि दुर्दम्य महत्वाकांक्षी जीवनाचा सारीपाट इथे उलगडा ! तुमच्याकडे तसं काहीही नाही हे प्रतिसादातली उद्विग्नताच दर्शवते तरीही एक ट्राय मारुन पाहा. ट्रेमा, उदय, म्हसोबा आणि तुमच्या परिस्थितीत, अत्याधिक जळजळ, या एकाच लक्षणाचा फरक आहे, हे तुम्ही स्वतःच दाखवून द्याल !तरी आर्थिक स्वावलंबन म्हणजे
याच्याशी मात्र संपूर्ण सहमत आहे !
In reply to तरी आर्थिक स्वावलंबन म्हणजे by अप्पा जोगळेकर
तरी आर्थिक स्वावलंबन म्हणजे आपली व्यावसायिक कौशल्ये सतत विकसित करत राहणे, तंदुरुस्त राहणे आणि मरेपर्यंत काम करत राहणे असावे असे व्यक्तिशः वाटते.याच्याशी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असण्याचा काहीएक संबंध नाही. सकाळी लवकर उठणं, योगा, प्राणायाम, फिरायला जाणं मोफत आहे. व्यावसायिक कौशल्ये सतत विकसित करत जाणं हे आर्थिक स्थितीशी फारसं संबधित नाही, ते वृत्तीशी संबधित आहे.त्या हिशोबाने रिटायरमेंट हा कन्सेप्ट पटत नाही.काम हा छंद केल्यावर तो रोजचा आनंद आहे, त्यामुळे त्याचाही आर्थिक स्वावलंबनाला मोठा हातभारच आहे.वायफळ असेल तर एरवीसुद्धा तो केला जात नाहीचयेस, वेरी अॅप्ट. बट अ कॉमनसेंस ऑबजर्वेशन.100 :D
+1
In reply to 100 :D by सानझरी
हे तुमच्या आकलनानुसार वर्शन झालं !
In reply to +1 by पिशी अबोली
http://www.maayboli.com/node
संक्षींशी सहमत
मायला !
In reply to संक्षींशी सहमत by आजानुकर्ण
+१००००
In reply to मायला ! by संजय क्षीरसागर
हे अगदी टोकाचं उदाहरण झालं
In reply to संक्षींशी सहमत by आजानुकर्ण
'अमुकतमुक पैसा' हे कायमच मूविंग टारगेट राहते.हे बरोबर आहे. म्हणून ऊर फुटेस्तोवर पैश्याच्या मागे लागू नये. पण म्हणून पैसे वाचवूच नयेत, साठवूच नयेत हा दृष्टिकोन बरोबर आहे का? पैसे मिळवण्याचा वेळ आणि आयुष्यातले आनंद घेण्याचा वेळ यांच्यात समतोल असावा. प्रस्तुत लेखात लेखिका हेच सांगायचा प्रयत्न करत असावी. आपल्या आनंदात कमतरता न आणता अनावश्यक खर्च कमी करून ते पैसे गुंतवले तर काय चूक आहे? थोडक्यात फिक्स टारगेट न ठेवता आपल्या आवडीनिवडी व छंद जोपासून पण अनावश्यक खर्चात काटछाट करून जे साठेल ते साठेल. त्याची गुंतवणूक करायची का नाही, कशी व कुठे करायची ज्याचं त्याचं ती व्यक्ती ठरवेल. इथे फक्त लेखिकेने तो विषय आणि ते काय करतात याची माहिती सादर केली. माझे लेख, ज्यावर संक्षींनी टिपण्णी केली आहे, वाचलेत तर नेहमीच्या वापरातल्या गोष्टींमधून मी कसा फायदा मिळवला अथवा थोडे प्रश्न विचारून समोर आलेल्या अडचणीतून कसा मार्ग सापडला हे सांगितलं आहे. यात कुठलेही जीवनाविषयक तत्वज्ञान आम्ही सांगत नाहीये. बरं हेच आणि असंच सगळ्यांनी करावं असाही आग्रह नाहीये. पण प्रॉब्लेम कुठे येतो की या धाग्यांवर एक मिपाकर येऊन मी बघा कसं जगतो नाहीतर तुम्ही, तुमचं जिणं म्हणजे गळ्यातलं लोढणं असं सांगतो. विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं न देता दूषणं देत बसतो. एक साधा सरळ उपाय आहे, आपण ज्या विषयाला महत्वाचं मानत नाही त्या विषयांशी संबंधित धाग्यांवर न येणे. ही अर्थात सूचना आहे. किंवा तुम्ही जसे सांगितलेत की हे "मूविंग टारगेट" आहे हे ठीक. मग यावर चर्चा होऊ शकते. पण उद्या समजा तुम्ही कामाच्या ठिकाणी चालणाऱ्या राजकारणावर धागा लिहिलात आणि यावर येऊन मी तुम्हाला सांगत बसलो की कसली नोकरी आणि कसलं राजकारण, मारायची लाथ सगळ्यावर. नाहीतर तुमच्या जीवनाला अर्थ नाही. तुम्ही म्हणजे काय करायचं हे परत परत विचारूनसुद्धा मी जास्त स्पष्टीकरण न देता एकच पालुपद चालू ठेवलं तर तुम्ही काय कराल? हे एकापेक्षा अधिक धाग्यांवर झालं तर तुम्ही काय कराल? डांगेंजी:आपआपली टार्गेट्स अचिव्ह करायला समद्यांस्नी शुभेच्छा!हेच तर मान्य नाहीये ना. सगळ्यांचं टारगेट एकच पाहिजे वेळकाळाचं बंधन नसलेलं आणि टार्गेट नसलेलं स्वच्छंदी जीवन. असो. आधीच वेळ फुकट घालवून दोष आणि अपमान पदरी पडलेला आहेच. त्यामुळे रजा घेतलेली बरी.अधून मधून चर्चेवर नजर टाकत होतो.
कुठे उगवला सूर्य आज ?
In reply to अधून मधून चर्चेवर नजर टाकत होतो. by चतुरंग
सूर्य उगवायचा तिथेच उगवला!
In reply to कुठे उगवला सूर्य आज ? by संजय क्षीरसागर
यू हॅव मेड माय डे गाइज !
In reply to सूर्य उगवायचा तिथेच उगवला! by चतुरंग
आजानुकर्ण आणि चतुरंग
In reply to अधून मधून चर्चेवर नजर टाकत होतो. by चतुरंग
"पैसा तुमच्यासाठी आहे, तुम्ही पैशासाठी नाही"हे तत्वज्ञान कधीच मान्य केलंय. एवढं सगळ्यांनी सांगून झालं की अगदी १२ महिने २४ तास पैश्यांचा विचार कोणीच करत नाही. प्रत्येकाचे आयुष्य, ते जगायचा दृष्टिकोन, छंद, अडचणी हे वेगळंच असणार आहे. त्यात प्रत्येकाने संक्षींसारखंच जगावं हा अट्टाहास का? आणि जे वेगळं जगत असतील ते यःकश्चित हा दृष्टिकोन का? माझ्या क्रेडिट कार्डच्या धाग्यावर मी फक्त क्रेडिट कार्ड्स वापरून मी कसा फायदा करून घेतला हे सांगितलं. त्यात इतरांनी त्यांचे अनुभव सांगावे, अडचणी सांगाव्या आणि त्यातून सगळ्यांना फायदा होऊ शकेल हा उद्देश होता. त्यात सुद्धा संक्षी कर्ज घेणाऱ्या सगळ्यांचं आयुष्य निरर्थक आहे हे सांगत बसले. वर स्वतः क्रेडिट कार्ड्स वापरतात हे पण सांगितलं. पण कर्ज काढून घर घेऊ नये यावर क्रेडिट कार्डच्या धाग्यात वाद घालत होते. डाऊन पेमेंटचे पैसे नसताना पूर्ण किंमत देऊन घर कसं घ्यायचं याचं मार्गदर्शन मात्र करू शकले नाहीत. पूर्ण स्वच्छंदी जीवन जगायला कोणाला आवडणार नाही? पण ते कसं साध्य करायचं हे ते समजावून सांगत नाहीत. नुसतंच फक्त आताच्या क्षणात जगा, पुढचा विचार करू नका आणि कर्ज काढू नका हे सांगतात आणि हे जर तुम्ही करत नसाल तर तुमचं आयुष्य व्यर्थ आहे हे ठासून सांगतात. तुम्ही आधीच्या आणि या धाग्यांवरचे प्रतिसाद नीट वाचले असतील तर संक्षींनी सगळ्यांचे आयुष्य निरर्थक ठरवूनही माझ्यासकट सगळे सभ्य भाषेत विचारत होते. पण मग पुढे त्यांनीच फेफरं येईल, तोंडाला फेस येईल, पितळ उघडं पडेल अशी भाषा सुरु केली. एकतर पहिल्यापासून सगळ्यांना यःकश्चित प्राणी समजत आहेत आणि वर ही भाषा ३ वेळा तरी वापरली आहे. यावर एकदोघे सोडून कोणाला आक्षेप घ्यावा वाटला नाही. मी एकदा बोललो तर ते एवढं लागलं? मग त्यावर माझ्या अपब्रींगींग वर म्हणजेच माझ्या आईवडिलांवर गेले आणि वर म्हणतात की इतक्या खालच्या लेवलला ते जाऊ शकत नाहीत. मी यापूर्वीही त्यांचेच प्रतिसाद दाखवून ते कसे गोंधळलेले आहेत हे दाखवून दिलं आहे. तरीही आता त्यांनी दिलेल्या मुद्द्यांवर प्रतिवाद करायचा तर -विकेंडस आणि रजा यामधे जमेल तेवढी मजा करणं यात काहीही विषेश नाही. गोरगरीब सुद्धा स्वतःच्या एपतीप्रमाणे ते करतातच.बरोब्बर. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे मजा करतातच हे त्यांनी मान्य केलंय. त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपामुळे ते त्यांना जमेल तेव्हा काम करू शकतात. सगळ्यांना ती सवलत असेलच असं नाही. विशेषतः नोकरी करणारा सोमवार ते शुक्रवार या मध्ये सुट्टी/ रजा न घेता मन मानेल तसं वागू शकणार नाही हे सर्वमान्य सत्य आहे. त्यावर मला चॅलेंज देण्यात काय अर्थ आहे? तरीही, नोकरी करत असूनही, मी बऱ्यापैकी माझ्या टर्म्सवर काम करतोय हे मी दाखवून दिलं आहे. पण ते त्यांना मान्यच करायचं नाहीये.आर्थिक स्वातंत्र्य जर सर्वांगिण स्वातंत्र्य देऊ शकले नाही तर व्यर्थ आहे.हेच आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं ते स्टेप बाय स्टेप सांगा अशी सगळ्यांची विनंती होती आणि अजूनही आहे. यावर नुसतंच पैसे दुय्यम आहे, मनाला येईल तसं जगा, भविष्याचा विचार करू नका, पूर्ण पैसे असल्याशिवाय घर घेऊ नका या सांगण्याला काय अर्थ आहे? तुम्हाला हे स्वातंत्र्य कसं मिळवायचं हे कळलं तर कृपया मलाही सांगा. संक्षींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं कळण्याएवढी माझी आकलनशक्ती नाही. तुम्ही प्रयत्न करून बघा. समजलं तर माझ्या निरर्थक आयुष्याला जरा अर्थ येऊ शकेल.खरं तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक विवंचनेपासून स्वातंत्र्य. ज्याची नजर अजूनही पैश्यावरच आहे आणि ज्याच्या दिवसाचा प्राइम टाईम अर्थार्जनासाठीच जातो, तो अजूनही आर्थिक गुलामीतच आहे.दिवसाचा प्रत्येक क्षण आर्थिक विवंचना करावी एवढी वाईट परिस्थिती नाहीये. पण म्हणून मी कामधंदा सोडून बसावं का? नोकरीची जी वेळ ठरलेली आहे तीचं काय करणार? म्हणून तर त्यांना विचारत होतो की असा कुठला व्यवसाय आहे की जो प्रत्येकाला त्याच्या मर्जीने करता येईल पण पैश्याची चिंता मात्र नसेल.सर्वांगिण स्वातंत्र्य म्हणजे खुला आणि मुक्त दिनक्रम. मी मागे म्हटल्याप्रमाणे अशा व्यक्तीची प्रत्येक रात्र सॅटरडे नाइट आणि प्रत्येक दिवस संडे असतोनोकरी करत असताना किंवा नोकरी न करता माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आजच्या सगळ्या गरजा भागवल्या जातील आणि आम्ही सगळे रोज मनाला येईल तसे उत्सव साजरे करत कसे जगू शकतो याचे मार्गदर्शन करावे हीच तर पहिल्यापासूनची मागणी आहे.जी गोष्ट क्षणोक्षणी संपते आहे आणि जिच्यावर सर्वस्व अवलंबून आहे तीचा अव्हेर करुन, निर्जीव वस्तूला जीवनाचा आधार मानण्याची ती मूढता आहे.कुठे काय अव्हेरलं? जे मला आवडतं ते मी करतोय हेच मी कधीपासून सांगतोय. तुम्हाला आवडतं ते आणि तुम्ही करता तेच मी करावं हा आग्रह का? तुम्हाला कराओकेवर गायला आवडतं, मला नाही आवडत. मला ऐकायला आवडतं. मला पुस्तकं वाचायला, निसर्गसौन्दर्य; ग्रहतारे; पक्षी; नवनवीन ठिकाणं बघायला, विविध खाद्यपदार्थ खायला आवडतं. मला जमेल तसं, जमेल तेव्हा मी हे करत असतो. म्हणून माझी आवड हीन दर्जाची आहे? मी चांगलं आयुष्य जगतच नाहीये? एक उदाहरण घेऊन बघू, कदाचित समजायला सोपं पडेल. समजा एखाद्याकडे एक महिना पुरेल एवढे पैसे आहेत. संक्षींचा सल्ला मानून त्याने मन मानेल तसं वागायला सुरुवात केली. परिणामी त्याची नोकरी गेली. तरीही त्याने आपलं व्रत सोडलं नाही. महिन्याने त्याची बायको म्हणाली आज संध्याकाळी खायला काही नाही, तर मग याने काय सांगायचं की आत्ताचं बघ संध्याकाळची चिंता कशाला करतेस? भाड्याचं घर आहे पण भाडं भरलं नाही म्हणून घरमालकाने घर सोडायला सांगितलं आहे. या उदाहरणात त्याने आणि त्याच्या कुटुंबाने कसं वागावं याचं मार्गदर्शन संक्षी किंवा ते जे सांगतात ते पटलेल्या/ समजलेल्या कोणीही करावे. का मला एक माणूस, ओळख पाळख नसताना, तुझं आयुष्य व्यर्थ आहे हे परत परत सांगतोय? बरं मग कसं करायचं काय करायचं हे विचारल्यावर समाधानकारक उत्तर मात्र देत नाही. पैसे व्यर्थ आहे असा उपदेश करणारे बरेच बाबा/ बुवा हे सांगण्याचे मोजून पैसे घेताना बघितलेलं आहे. इथे जरा वेगळं काही ऐकायला मिळेल असं वाटलं पण पैसे गेलेले परवडले असं वाटेल, असा दोष आणि अपमान मात्र पदरी पडला.अश्लाघ्य भाषा
In reply to अधून मधून चर्चेवर नजर टाकत होतो. by चतुरंग
संक्षिंची भाषाही
In reply to अश्लाघ्य भाषा by उदय
एक उदाहरण घेऊन बघू, कदाचित
हे ठीक आहे
In reply to एक उदाहरण घेऊन बघू, कदाचित by संदीप डांगे
मन मानेल तसे म्हणजे मला हवे तितके पैसे मिळवायला मला किती काम कुणाचे करुन द्यायला लागेल तेवढे प्रयत्न करणे, आणि ते करत असतांना मनावर जबाबदारीचे कोणतेही दडपण नसणे. करत असलेले काम आवडीने करणे, रस घेऊन करणे, क्षण आणि क्षण आनंदात जगणे.बरोबर. मी तेच तर करतोय हे मी उदाहरणाने सांगितलं आहे. मला वाटेल तेव्हा मी सुट्टी घेतो, ऑफिसच्या वेळेत बायकोबरोबर लंचला सुद्धा जातो. पण मला ती सोय आहे म्हणून सगळ्यांनाच असेल असं नाही. किंबहुना माझ्याच बरोबर काम करणाऱ्यांनासुद्धा असेल असं नाही. मलाही कायम उपलब्ध असेल असंही नाही. फरक व्यवसायाच्या फॉरमॅटमध्ये आहे. मी एखाद्या डॉक्टरला डिवचलं की काय तुझं आयुष्य कॉल आला की जायला लागतं, तर तो माझी कीव करेल. इथले CPA फेब्रुवारी ते जून मरेस्तोवर काम करतात मग उर्वरित महिने निवांत असतात. त्यातल्या एखाद्याला मी म्हणलं दर महिन्याला एक बाहेरची ट्रिप आणि आठवड्याला एक पार्टी करू (उदाहरण चुकलं का?) तर या ५ महिन्यांच्या काळात येईल का? हां, व्यवसाय सेम असल्याने संक्षी याच्याशी तुलना करू शकतात. पण तरीही असलेल्या जबाबदाऱ्या, वय, आवड यामुळे फरक राहणारच.एकूणच पैसा गाठीला असणे, नसण्याने मनुष्य म्हणून आपल्या जगण्याच्या स्वच्छंदतेवर परिणाम होऊ नये असा संक्षि अर्थ सांगत आहेत.अध्यात्मिक उपदेश म्हणून बरोबर आहे. आता माझे प्रतिसाद वाचून तुम्हाला कळलं असावं मी काय काय करतो. आता यात तुम्हाला मी माझ्या मनाप्रमाणे जगत नाही असं वाटतं का? मी एकटा काम करत नसल्याने दिवसात ज्या मिटींग्स ठरवलेल्या असतात त्या अटेंड करणे मी स्वीकारलेल्या जबाबदारीचा भाग आहे. यातही मी आज येणार नाही हे मी सांगू शकतो. मला एकट्याने जे काम करायचं आहे ते दिवसाच्या याच वेळेत करायचंय असं बंधन नाहीये. पैश्याचा विचार न करता मला पाहिजे ते मी करू शकतो. फक्त मी मनाला आलं म्हणून रिबॉक असं लिहिल्यामुळे १००० रुपयाला मिळणारे मोजे घेणार नाही. थोडक्यात आवडीचं आहे आणि जबाबदारी म्हणून जे काम माझ्याकडे आहे ते मी करतो, त्याबदल्यात मला पैसे मिळतात. त्यावर अजून जास्त पैसे मिळावे म्हणून मी बाकी सगळं सोडून पैश्याच्या मागे धावत नाही. फक्त जे खर्च मी करणार आहे ते तारतम्याने करतो. पैसे जे हातात आहेत ते योग्य ठिकाणी गुंतवतो. एक फ्लॅट कर्ज काढून घेतला, ते ४ वर्षात फेडून टाकलं. त्या ४ वर्षांत बाकी लाईफस्टाईलमध्ये फरक नव्हता. आता अजून एक तयार होतंय (दुसरं घेऊन किमती वाढवल्याबद्दल आधीच दोष स्वीकारतो). तेही कर्ज फार नाही. पण मग यात माझं आयुष्य निरर्थक वाया चाललंय का?संक्षि जे म्हणत आहेत तो नदीचा किनारा आणि तुम्ही तिघे-चौघे जे म्हणत आहात तो नदीचा दुसरा किनारामाझा किनारा कसा छान आहे आणि तुमचा किती घाण आहे असं ते नुसतंच खिजवत आहेत. आम्ही त्या किनारी कसं यायचं याचं मार्गदर्शन करायला सांगितलं की आत्ताचा क्षण महत्वाचा, आहे नाही ते सगळं सोडून या किनारी यायचं म्हणतात. ते तिथे कसे गेले यावर मला साक्षात्कार झाला म्हणतात. पण नदीत मगरी आहेत त्यांना कसं टाळायचं, होडी कशी बांधायची, कुठे पूल आहे का हे सांगत नाहीत. वर खिजवणं आहेच. आम्ही कुठलाही किनारा तर सोडाच पण नदीत गटांगळ्या खाणारे यःकश्चित मानव आहोत. किनाऱ्याला कसं लागायचं तेच तर कळत नाहीये. तुम्ही अर्धवट का होईना किनाऱ्याला लागलेले दिसताय, जरा हात द्या की आम्हाला.तुमच्याशी असहमतीचा प्रश्न येत
In reply to हे ठीक आहे by ट्रेड मार्क
पैसा मिळवणे हे काही फार कठीण
In reply to एक उदाहरण घेऊन बघू, कदाचित by संदीप डांगे
पैसा मिळवणे हे काही फार कठीण काम नाही."If wishes were horses, beggars would ride."मन मानेल तसे म्हणजे मला हवे तितके पैसे मिळवायला मला किती काम कुणाचे करुन द्यायला लागेल तेवढे प्रयत्न करणे, आणि ते करत असतांना मनावर जबाबदारीचे कोणतेही दडपण नसणे. करत असलेले काम आवडीने करणे, रस घेऊन करणे, क्षण आणि क्षण आनंदात जगणे.बरं, मी जर म्हणालो की हे मी करतो तर तुम्ही मला किंवा इतर कुणाला "आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र" म्हणाल का? (हा धागा आर्थिक स्वावलंबनाबद्दल आहे, हे लक्षात घ्या.)नक्कीच! शेवटी ती एक मनाची
In reply to पैसा मिळवणे हे काही फार कठीण by उदय
+१००
In reply to नक्कीच! शेवटी ती एक मनाची by संदीप डांगे
वा वा!
हाहाहा
In reply to वा वा! by पैसा
हेहेहे!
In reply to हाहाहा by इडली डोसा
अजानुकर्ण, चतुरंग, संदीप
उत्तर
कर्णश्री,
In reply to उत्तर by आजानुकर्ण
त्यामुळं आहे त्या परिस्थितीत जर तुम्ही मनसोक्त, सुखी, स्वावलंबी जगत आहात असे वाटत नसेल तर अमुकतमुक आकडा गाठल्यावर तसे जगाल ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे.याचं कारण फार साधं आहे. भविष्यकाल हे मनाचं मृगजळ आहे. ते गाढवासमोर त्याच्या दोन कानांच्या मधोमध, वर बसलेल्या मालकानं धरलेल्या गाजरासारखं आहे.गाढव कितीही चाललं तरी गाढव आणि गाजर यातलं अंतर कायम राहील.आणि सर्वात मोठा पॅराडॉक्स म्हणजेते गाजर (भविष्यकालीन आनंदाची आशा), आपणच स्वतःसमोर धरलंय! पण इतकी साधी गोष्ट सुद्धा ज्याला कळत नाही त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही.गंमत म्हणजे घर, कुटुंब, लग्न, नोकरी, शिक्षण, परदेशप्रवास, प्रमोशन, डॉलर्समध्ये पगार, वगैरे सर्व गोष्टी मनासारख्या मिळाल्यावरही गावात राहत असताना मित्रांबरोबर गोट्या खेळायचो ते दिवस सर्वात आनंदी होते असं वाटतंय.यात थोडीशी सुधारणा हवी. जसा भविष्यकाल कधीही येत नाही तसाचभूतकाल मृत व्यक्तीसमान आहे, त्याच्या आठवणी खेरीज त्याचा कुठेही लवलेश नाही.नाऊ इट इज अप टू अस, गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत वर्तमान व्यर्थ करायचा की `इट इज ओके' म्हणूनसांप्रत क्षणाचा उत्सव करायचा.उत्तम विषय, मस्त चर्चा.
परफेक्ट ऑब्सर्व्हेशन्स बाय अर्धवटराव
ट्रे मा दादा, मला बरेचदा
उत्तम निरीक्षण
In reply to ट्रे मा दादा, मला बरेचदा by वीणा३
वीणाजी,
In reply to ट्रे मा दादा, मला बरेचदा by वीणा३
हा दृष्टीकोन मला फारसा व्यवहारी वाटत नाही. कदाचित याची पुढील कारण असू शकतील. १. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मला उद्या यायची सवय झालीये.........आणि आजही त्यात फरक नाही. यापेक्षा मानसिकता न बदलण्याचा दुसरा उघड उदाहरण काय हवं ? हीच मानसिकताआजबदलावी लागते ! अदरवाइज व्यक्ती फक्त उद्याकडे डोळे लावून जगते आणि ही `उद्याची सवय' म्हणजे`स्वप्नांची वाट आहे'. २)बरेचदा मला असाही वाटतं कि त्यांना प्रॉब्लेम समजत नाही कारण ते तो प्रॉब्लेम "जगले" नाहीयेत.उलट आहे. मी प्रश्न मुक्त आहे ! कारण आय डोंट हॅव अ टुमारो . आणि मजा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न फक्त डोक्यातच आहेत ! ज्या अर्थी सदस्य इथे टाईमपास करु शकतो म्हणजे त्याचं पोट भरलेलं आहे ! इतकी उघड गोष्ट तरी निदान निर्विवाद आहे. ३)मला वाटत कि जर तुम्ही खालीलपैकी कुठल्याही गटात बसत असाल तर संक्षी ना तुमचे प्रॉब्लेम्स कधीच समजणार नाहीत, त्यांची उत्तर चंद्र ताऱ्यांवर जातील.....नीट वाचलात तर तुमचंच गृहित तुम्हाला बालीश वाटेल. हे सर्व जग परास्परावलंबी आहे. माझे क्लायंटस माझ्यावर अवलंबून आहेत, मी त्यांच्यावर आहे. माझ्या संसाराचंही तेच आहे, अँड सो ऑन. फक्त आगीचे बंबवाल्यांना वगैरे इमर्जन्सी असते असं वाटणं ही वैचारिक मर्यादा आहे. ४)कारण पैशाचा तुटवडा हा प्रॉब्लेम ते (बहुधा ) "जगले" नाहीयेत.हा ज्योक वाटतोयं का पाहा. मी राजघराण्यात जन्मलोय असं वाटतंय का ? एक गोष्ट नक्की, मला पैश्याचामानसिक तुटवडा नाहीजो इतरे जनांना कायम भासतो. कारण उद्याची किंवा कोणतीही कल्पना मला दहशत घालू शकत नाही. ५)इथेच मिपा वर खूप वर्षांपूर्वी वाचलेल "दुर्लक्ष हि सर्वात मोठी शिवी आहेम्हणून तर मी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं नाही ! आणि ज्यांनी प्रतिसादातून आपले सभ्यतेचे संस्कार , प्रच्छन्नपणे दाखवले (आणि पुन्हा उलटी बोंबे मारतायंत) त्यांना पूर्णपणे बेदखल केलंय. ६)व्यासंग आणि छंद ह्यात खूप फरक असतो.तुम्हाला उपयोगी होईल म्हणून सांगतो, छंदाचाच पुढे व्यासंग होतो. जे स्वतः कडून, डायरेक्ट झाकीरसारखा तबला, सुरुवातीलाच वाजावा अशी अपेक्षा ठेवतात, ते जन्मात तबलाच वाजवू शकत नाहीत. ७)त्याचे अध्यात्मावरचे प्रतिसाद / विचार संपूर्ण चुकीचे नाहीयेत असा अनेक लोकांनी इथे बरेचदा सांगितलंय. फक्त ते ज्या पद्धतीने सांगतात ती बऱ्याच लोकांना त्रासदायक वाटते आणि त्यातून वाद वाढतात. त्यात ते भलत्या धाग्यावर भलत्या गोष्टी बोलतात, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया (ज्यात काही गोष्टी कदाचित सगळ्यांना पटू शकतात), वादग्रस्त होतात.आता हे खरं तर तुम्ही आऊट ऑफ काँटेक्स्ट लिहीलंय . त्यामुळेभलत्या धाग्यावर भलत्या गोष्टी बोलतातहे याला अॅप्लिकेबल होतंय का पाहा. तरी तुम्ही विषय काढलायं म्हणून लिहीतो. माझे प्रतिसाद कळायला काही सदस्यांना पाच वर्ष लागली, काहींना आणखी पाच लागतील आणि काहींना समजणारच नाहीत. ओशो म्हणायचे `आय कांट डायल्यूट मायसेल्फ फरदर, यू विल हॅव टू रेज योरसेल्फ टू अंडरस्टँड मी'. मीही तेच सांगतो. ज्या अर्थी आयुष्य जगलेले आणि प्रत्यक्ष उदाहरणं पाहिलेले सदस्य विचारसरणी मान्य करतात (अर्थात त्यांची मान्यता मला उपयोगी नाही कारण मी तर ऑलरेडी तसं जगतोच आहे)...... त्या अर्थी, अजून स्वप्नपूर्ती न झालेले किंवा त्या वाटेवर चालू इच्छिणारे काय म्हणतायंत याला शून्य अर्थ आहे.+१०० खरंच उत्तम निरीक्षण
In reply to ट्रे मा दादा, मला बरेचदा by वीणा३
टोटल करमणूक धागा ट्याक्स फ्री
छान लेख. गुंतवणूकीबद्दल