Skip to main content

आर्थिक स्वावलंबन - स्वप्नांच्या वाटेवर

लेखक इडली डोसा यांनी बुधवार, 08/03/2017 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
. "ए राजा, ऊठ" "झोपू दे गं आई अजून थोडं..." "अरे, शाळेत जायला उशीर होईल." "होऊ दे. दररोज मी का जायचं शाळेत याची दोन चांगली कारणं दे, तरच उठतो." "एक म्हणजे तू आता पन्नास वर्षांचा घोडा आहेस आणि दुसरं म्हणजे तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस." हा विनोद आपण पूर्वी ऐकला असेल आणि हसून सोडून दिला असेल किंवा मनात असंही आलं असेल कदाचित की हो ना राव, मलाही नाही जायचं रोज उठून काम करायला. मला माझा आवडता छंद जोपासायचा आहे, माझ्या जोडीदाराबरोबर, छकुल्यांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे, हे करायचं आहे आणि ते करायचं आहे..... पण जगण्यासाठी आणि कुटुंबाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी नोकरी तर केलीच पाहिजे. मग काय, लागतो आपण त्याच मार्गाला आणि करतो नोकरी इमानेइतबारे आयुष्यभर. कारण आयुष्यभर काम केलं, तरच आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होऊ शकतील असा एक पगडा आपल्या मनावर असतो. माझ्या कुटुंबासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निवृत्तीनंतरच्या आरामदायक जीवनासाठी मला आत्ता झटून काम केलंच पाहिजे ह्या विचाराचं मनावर इतकं पक्कं गारूड असतं की नोकरी कायमस्वरूपी टिकवण्याच्या ध्यासाने आपण पछाडले जातो. मग ऑफिसमधला वेळ वाढतो, प्राणप्रिय छंदांनाही आठवड्यातून एकदा / महिन्यातून एकदा अशी टाइमलाईन येते. माझ्या आवडत्या गोष्टींना मला वेळ द्यायचा आहे, कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायचा आहे, मनसोक्त भटकायचं आहे आणि हवं तेव्हा हवं ते करायचं आहे हे विचार 'निवृत्तीनंतर करू, तेव्हा वेळच वेळ असेल' असं म्हणत हळूहळू बाजूला पडतात. खरं तर आपण निवृत्तीपर्यंत काम का करतो? कारण बऱ्याचदा आपण गृहीतच धरलेलं असतं की आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्यभरात ज्या काही सगळ्या गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला नियमानुसार ठरवून दिलेल्या निवृत्तीचा दिवस येईपर्यंत काम केलंच पाहिजे. अशा वेळी जर तुम्हाला कोणी म्हणालं की "तुम्ही तुमच्या तिशीत, चाळीशीत किंवा आपण काम करण्याचं जे सर्वमान्य वय ठरवलं आहे, त्यापेक्षा लवकरच नोकरी सोडून देऊ शकता आणि आणि जे काही इमले मनात रचले आहेत, ते पूर्ण करू शकता", तर तुम्ही अशा वक्तव्यावर काय म्हणाल? "कसं शक्य आहे हे?" "सडाफटिंग लोकांना शक्य असेल, संसारी लोकांना कसं जमेल?" , "हम्म्म... असेल, पण मला शक्य होईल असं मला वाटत नाही" असं काहीतरी, की "खरंच, काय बरं करावं लागेल यासाठी? बघू या तरी आपल्याला जमतंय का?" असं काही? चला तर मग बघूच या हा प्रकार काय आहे. आपण नोकरी करतो ते दर महिना ठरावीक उत्पन्न मिळवण्यासाठी आणि भविष्यातल्या आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी. मग नोकरी न करता असं ठरावीक उत्पन्न आपल्याला मिळालं, तर त्याचा अर्थ आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीवर विसंबून राहायची गरज नाही. आर्थिक बाबतीत आता आपण स्वावलंबी झालो. म्हणजेच आपण जर नोकरी ही केवळ अर्थार्जनासाठी करत असू, तर ती करण्याची काही गरज अशा वेळी राहत नाही. 'आर्थिक स्वावलंबन' हे आपलं अंतिम ध्येय नसून आपल्याला गोष्टी हव्या तेव्हा करता येणं हे आहे. अर्थातच आर्थिक स्वावलंबन हा अंतिम ध्येय गाठण्यासाठीचा रस्ता आहे. मात्र आर्थिक स्वावलंबनापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक टप्पे आहेत. सगळ्यात आधी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही आघाड्यांवर कोणकोणत्या गोष्टींना प्राध्यान्य आहे हे ठरवणं. प्राधान्य असणाऱ्या या गोष्टींपैकी पैसा किती गोष्टींसाठी लागणार आहे, किती लागणार आहे आणि कधी लागणार आहे? याप्रमाणे नजीकच्या आणि लांबच्या काळातल्या गरजा यांसाठी किती रक्कम लागेल? अशा प्रकारे साधारण रूपरेषा ठरली की त्यानुसार पैशाची तरतूद कशी करायची ते बघता येतं. आमच्या बाबतीत सांगायचं झालं, तर आम्ही तसं उशिराच - म्हणजे तिशी ओलांडताना आर्थिक स्वावलंबन मिळवण्याचा विचार करू लागलो. मी मुलीच्या जन्माच्या वेळी भारतात गेले असताना आम्ही - म्हणजे मुख्यत्वे माझा नवरा गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधण्यासाठी बरीच पुस्तकं वाचत होता आणि आंतरजालावरही शोध घेत होता. लग्नापूर्वी त्याने शेअर मार्केटमध्ये आणि मी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली होती, पण ती फारशी काही फलदायी ठरली नव्हती. गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय शोधायला हवा, ही जाणीव झाल्यामुळे जास्त परतावा देणाऱ्या आणि तुलनेने भरवशाच्या अशा गुंतवणूक पर्यायांचा शोध सुरू झाला होता. आमच्या गुंतवणुकीची गाडी योग्य मार्गाला लावण्याचं सगळं श्रेय मी माझ्या नवऱ्याला देते. वेळोवेळी वेगवेगळी पुस्तकं आणि जालावरच्या या विषयावरचे ब्लॉग्स वाचून त्यानेच आमच्या बचतीची आणि गुंतवणुकीची रूपरेषा ठरवली. इतकंच नाही, तर या सगळ्या किचकट गोष्टी मला सोप्या भाषेत समजावून सांगून पैशाच्या बाबतीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयप्रक्रियेत नेहमी माझं मतही घेतलं. यातूनच आम्हाला ओळख झाली ती आर्थिक स्वावलंबनाची आणि मग सुरू झाला प्रवास एका ध्येयाकडे. आपण नोकरी का करतोय असा प्रश्न स्वतःला विचारला, तेव्हा खरं तर 'एवढं शिकलो ते यासाठीच ना? नाहीतर मग कशाला केली असती एवढी धडपड?' हा पहिला विचार होता. पण योगायोग असा की दोघंही ज्या विषयाचे पदवीधर आहोत, त्या विषयाशी संबंधित अगदी कमी काम करतो. निदान माझा नवरा त्याच्या पदव्युत्तर क्षेत्रात काम करतो. माझ्या कामाचा आणि माझ्या पदवीच्या विषयाचा आता काही संबंध उरलेला नाही. अनेकांचं होत असेल असं आणि ते ठरवून असेल तर उत्तमच आहे. पण माझ्या बाबतीत तरी अर्थार्जन या एकाच हेतूने मी नोकरीची कास धरलेली आहे आणि मला नोकरी न करण्याचा पर्याय मिळाला तर काय करता येईल, अशा चार-पाच गोष्टी तरी मनात नक्कीच आहेत. नवऱ्याला त्याचं काम आवडतं, पण अमेरिकेत आल्यापासून त्याने काही छंद जोपासले आहेत, ज्यासाठी जास्त वेळ द्यायला त्याला नक्कीच आवडेल. शिवाय आमची मुलगी हे मुख्य कारण आहेच. आम्हाला तिला भरपूर वेळ द्यायचा आहे, तिच्यासोबत भरपूर भटकायचं आहे आणि तिला अनुभवसमृद्ध करून त्यातून तिचं जीवन फुलवायचं आहे.... असा सगळा विचार करता करता लक्षात आलं की हे सगळं करायचं, तर आधी आर्थिक स्वावलंबन हवं. सुरुवात केली ती आमचा महिन्याचा खर्च लिहून काढण्यापासून. किती खर्च होतो आणि किती बचत होते, याचा साधारण अंदाज घेतला. बचत वाढवण्यासाठी खर्चात कुठे कुठे कपात करता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिलं. शिवाय कंपनीकडून उपलब्ध असलेल्या सगळ्या सोयींचा पुरेपूर फायदा घेतला. सगळ्या टॅक्सपूर्व खात्यांची मर्यादा कमाल केली. आमच्या सुदैवाने अमेरिकेत आम्ही ज्या गावात राहत होतो, ते साधारण पन्नास हजार लोकवस्तीचं गाव होतं, त्यामुळे भाड्याने घर घेऊन राहण्याचा खर्च आणि रोजचा कामासाठी प्रवास वगैरे गोष्टींसाठी लागणारा खर्च मोठ्या शहरात राहण्याच्या मानाने कमी होता. इथे आमच्या मित्रपरिवारातली बरीच कुटुंबं आमच्या दोघांसारखीच एकाच कंपनीत काम करणारी होती. एकाच कंपनीत असलो, तरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑफिस लोकेशन्समध्ये कामाला होतो. गाव छोटं असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक अगदी नगण्य म्हणण्याइतपत होती. तासाला एक बस अशी बसची वारंवारता होती. आमच्यासारख्याच परिस्थितीत असणाऱ्या इतर बऱ्याच कुटुंबांमध्ये नवरा-बायको दोघांकडे वेगवेगळ्या गाड्या होत्या. आम्ही मात्र दोघांत एकच गाडी वापरायचा निर्णय घेतला. गाव छोटं असल्यामुळे एक जण दुसऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये सोडून सहज आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत जाऊ शकत होता. क्वचित प्रसंगी थोडी कसरत करावी लागली, तरी जोपर्यंत आम्ही तिथे राहत होतो, तोपर्यंत ही व्यवस्था आमच्यासाठी कामी आली. शिवाय तिथे नोकरी सुरू झाली की लगेच घर घेण्याचा सर्वसाधारण कल होता. दोघांना नोकरी आहे, घराची किंमत आवाक्यात, गृहकर्ज कमी व्याजदरात उपलब्ध आहेत, शिवाय घरभाडं देत छोट्या अपार्टमेंटमध्ये राहण्यापेक्षा महिन्याला तेवढाच हप्ता भरून स्वतःच्या मोठ्या घरात राहता येत असेल तर घर का घेऊ नये? असा सर्वसाधारण समज होता. यामुळे आम्हाला घर न घेण्यावरून बरीच विचारणा होता असे. पण घर घेणं म्हणजे एक मोठी आर्थिक जबाबदारी घेण्यासारखे होतं. थोडी शोधाशोध केल्यावर न्यूयॉर्क टाइम्सचा एक धागा सापडला, ज्यात त्यांनी घर भाड्याने घ्यावं की विकत याचा निर्णय घेण्यासाठी एक छोटा आराखडा तयार केला होता. एका तक्त्यात घर विकत घेणं आणि भाड्याने घेणं या संदर्भातले वेगवेगळे आकडे (उदा., वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स, विकत घेऊ पाहणाऱ्या घराचा प्रकार, घरभाडे, राहण्याचं ठिकाण इ.) टाकले, की त्या गावात घर विकत घ्यायचं असेल तर ती गुंतवणूक फलदायी ठरण्यासाठी साधारण किती वर्षं त्या घरात राहणं आवश्यक आहे, याचे आकडे मिळत होते. त्यानुसार आम्ही घर घेतलं, तर आम्हाला त्या ठिकाणी साधारण पाच-सहा वर्षं तरी राहणं गरजेचं होतं. अमेरिकेत मिडवेस्ट भागातल्या या ठिकाणी आम्ही तेवढा काळ राहू याची आम्हाला खातरी नव्हती, शिवाय कामाच्या ठिकाणी दर दोन-तीन वर्षांतून होणारी मनुष्यबळ कपात यासारख्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही घर विकत न घेण्याचाच निर्णय घेतला. या झाल्या मोठ्या गोष्टी. आम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही बचत कशी होईल ते पाहतो. मोबाइल फोनचं बिल आम्हा दोघांचं मिळून साधारण महिन्याला शंभर डॉलर येत असे. थोडी शोधाशोध करून प्लॅन आणि सुविधा देणारी कंपनी बदलून ते चाळीसवर आणलं. यात एक विशिष्ट प्रकारचा फोनच वापरायचा आणि किती डेटा वापरायचा यावर मर्यादा होत्या, पण आमच्या आवश्यक गरजा यातून पूर्ण होत होत्या, त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीला मुकतोय असं कधीच वाटलं नाही. शिवाय शक्य होईल तेवढं घरून डबा घेऊन जाणं आणि कँटीनमध्ये विकत घेऊन खाणं टाळलं. याचा दुहेरी फायदा होतो - पैसे तर वाचतातच, त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जास्त आरोग्यदायक गोष्टीही खाल्ल्या जातात. अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी करून खर्चावर मर्यादा आणता येते. प्रत्येक गोष्ट करताना 'हे आपल्या ध्येयाला धरून आहे ना?' असा प्रश्न करत असतो. त्यामुळे वायफळ खर्चाला आपोआप चाप बसतो. याचा अर्थ असा नाही की आम्ही काही सगळी मजा बंद करून फक्त पै न पै साठवत बसलो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, कोणत्या गोष्टीला प्रधान्य द्यायचं त्याची एक साधारण यादी सुरुवातीलाच तयार केली होती. त्यात सहकुटुंब वर्षातून एकदा एक मोठी सहल आणि वीकान्ताला जवळपास भटकंती, कँम्पिंग आणि नवऱ्याच्या रॉक क्लायंबिंग आणि माउंटेनिअरिंग या छंदासाठी वाजवी खर्च करण्याची आमची तयारी होती. या सगळ्या गोष्टींसाठी साहित्य घेताना आम्ही नेहमी उत्तम दर्जाचंच घेतो. पण जिथे पैसे वाचवणं शक्य आहे, तिथे या गोष्टी करतानाही वाचवतो. उदा., चांगलं साहित्य घेतानाही कुठे आणि कधी डिस्काउंट मिळतं ते बघून तेव्हा ते घेतो. सहली ठरवताना बऱ्याच आधी ठरवतो, त्यामुळे विमान तिकिटावर जास्तीचा खर्च वाचतो. शिवाय हॉटेल्स बुक करताना 'एअर बी अँड बी'सारख्या साइटवरून शोध घेऊन जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल ते बघतो. बाहेरच्या देशात गेलो, तरी लोकल ट्रान्स्पोर्टने फिरणं, स्वयंपाक करण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी राहणं अशा गोष्टी केल्याने कमी खर्चात नवनवीन देश आणि जागा पाहण्याची संधीदेखील मिळत आहे. वर्षातून एकदा आम्ही सगळ्या गुंतवणुकीचा आणि खर्चाचा आढावा घेतो. प्रत्येक गोष्ट करतानाच आपल्या अंतिम ध्येयाला अनुसरूनच ही गोष्ट आहे ना, याचा काटेकोरपणे विचार करतो. वेगवेगळ्या ठिकाणी राहून तिथले अनुभव घेण्यावर कुटुंब म्हणून आमचा कल आहे. शिवाय आउटडोअर गोष्टी करण्याकडे जास्त ओढा असल्यामुळे अशा संधी त्या मानाने कमी उपलब्ध असणाऱ्या मिडवेस्टमधून बाहेर पडण्याचा आमचा विचार चालू होता. आमचं आर्थिक गणित कोलमडू न देता वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून अखेर आम्ही सहा महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये स्थलांतरित झालो. त्या वेळी आढावा घेताना लक्षात आलं की आपण आर्थिक स्वावलंबनाच्या जवळ येऊन पोहोचलो आहे. इथेसुद्धा एक गाडी, ऑफिसच्या जवळच भाड्याने घर या गोष्टी तशाच चालू ठेवल्या आहेत. कॅनडामध्ये गुंतवणुकीचे काय चांगले पर्याय आहेत याचा शोध चालू आहे. इथे काही वर्षं राहिल्यानंतर कदाचित आणखी काही गोष्टी कळतील किंवा नव्या संधी समोर येतील आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल कदाचित बदलतही जाईल. आमच्या सध्याच्या वार्षिक खर्चाच्या २५ पट रक्कम आमच्या पोर्टफोलिओमध्ये जमा झाली की आम्हाला नोकरी संदर्भात वेगवेगळे प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य मिळेल हे नक्की. आम्ही चाळीशी गाठेपर्यंत, म्हणजे आणखी पाच-सहा वर्षांत हे होईल अशी अपेक्षा आहे. एक मजेचा भाग म्हणून आपल्याला आर्थिक स्वावलंबन मिळवायला किती वेळ लागेल हे इथे चटकन बघता येईल. हे गणित कदाचित फक्त अमेरिकेत लागू असेल, भारतात यातल्या गणितात थोडा फार बदल होईल, पण मूळ संकल्पना तशीच राहील. शेवटी हा लेख म्हणजे हिमनगाचं एक टोक आहे. एखाद्याला यातली संकल्पना आवडलीच, तर त्यांनी स्वत: अभ्यास करून यातल्या खाचाखोचा जाणून घ्यायला हव्यात. अमुक अमुक एक गोष्ट करा आणि तुम्ही खातरीशीररित्या आर्थिक दृष्टीने लवकरात लवकर स्वावलंबी व्हाल असं मी सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या गरजा, इच्छा, आकांक्षा वेगवेगळ्या. पैसा साठवणं हे अंतिम ध्येय नसून आपल्याला हवी ती गोष्ट करण्याचं स्वतंत्र्य मिळवणं हे आहे. आम्ही निवडलेला मार्ग हा आम्हाला योग्य वाटलेला मार्ग आहे. प्रत्येकाला तोच पटेल असं नाही. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे ज्याचं त्यानं स्वत:च ठरवायचं आहे. मला जरी या विषयातलं खूप जास्त ज्ञान नसलं, तरी आम्ही (म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे मुख्यत्वे माझ्या नवऱ्याने) खालील पुस्तकं आणि ब्लॉग्ज फोरम्स वाचले / अजूनही वाचत आहोत : आर्थिक स्वावलंबन, मुदतपूर्व निवृत्ती आणि गुंतवणूक यासाठी वाचलेल्या पुस्तकांची यादी. - इंटेलिजंट इन्व्हेस्टर - बेंजामिन ग्रॅहम - बॉगलहेड्स,गाईड टु इन्व्हेस्टींग - कॉमन स्टॉक्स फॉर अनकॉमन प्रॉफिट्स - अर्ली रिटायरमेंट एक्स्ट्रीम - सिंपल पाथ टू वेल्थ - द वेल्दी बार्बर - द वेल्दी रेंटर - हाऊ टू रिटायर हॅपी, वाईल्ड अँड फ्री यू एस ब्लॉग्स / फोरम्स १.एमएमएम २. बॉगलहेड्स फोरम ३. मॅडफिएन्टिस्ट भारतातल्या गुंतवणुकीसाठी आम्ही खालील संस्थळांचा वापर केला : १. जागो इन्व्हेस्टर २. सुब्रमनी ३. फ्री फिन कॅल कॅनडा ब्लॉग्स / फोरम्स १. फायनान्शिअल विस्डम २. केनेडिअन काउच पोटेटो तुम्हीसुद्धा असं काही करत असाल किंवा करायची इच्छा असेल, तर तुमचे अनुभव इथे शेअर करा. या वाटचालीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचंही स्वागत आहे. धन्यवाद! .

वाचने 74645
प्रतिक्रिया 140

प्रतिक्रिया

खरतरं तू भरपूर परिश्रम घेवून हा लेख लिहिला आहेस याची कल्पना येतेय. तू लिहित राहा...आर्थिक स्वावलंबनाच्या तुझ्या कल्पना वास्तवदर्शी आहेत.लेख आवडला. तू दिलेली माहिती,लिंक्स अतिशय उपयुक्त आहेत.

या धाग्यावर उल्लेख केलेला मिनिमलीजमबद्दल डॉक्यूमेंट्री नेटफ्लिक्सवर काल पाहिली. आवडली. आपल्यापैकी बरेचजण त्याची अंमलबजावणी करत असल्याने बरे वाटले. सुचवणीबद्दल आभार.

लेखांमधल्या विचारांशी सहमत. गेल्या १२-१३ वर्षांत आम्ही दोघांनी असंच काहीसं करायचा प्रयत्न केलाय, तो थोडक्यात मांडतो. 'निवृत्तीनंतर मिळालेले पैसे बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर (आणि पेन्शनवर) उरलेलं आयुष्य सुखात काढायचं' अशा टिपिकल मानसिकतेतून साधारणतः १५ वर्षांपूर्वी बाहेर पडून आम्ही दोघं गुंतवणुकीचा गांभीर्याने विचार करायला लागलो. योग्य मार्गदर्शक - गुंतवणूक सल्लागार भेटले आणि सुरुवात झाली. त्या वेळेस आम्ही दोघेही वयाच्या चाळिशीत होतो. मुख्यतः म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक सुरू झाली. सुरुवातीला दर महिन्याला थोडी रक्कम, 'थोडी जोखीम, कमी परतावा' अशा प्रकारच्या योजनेत गुंतवायला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू दरमहा रक्कम वाढवत नेली आहे आणि जास्त जोखीम-जास्त परतावा अशा योजनांमध्ये (म्हणजे योजनांची संख्याही वाढवली) गुंतवणूक आहे. सुरुवातीला मिडकॅप आणि आता लार्ज कॅप आणि मल्टिकॅप प्रकारचे फंड निवडले. तसंच दीर्घकालीन, मध्यमकालीन उद्दिष्टं निश्चित केली, आता अल्पकालीन (पुढील एक ते दोन वर्षांसाठी) उद्दिष्टंही ठरवून साध्य करता यायला लागली आहेत. यात शेअर बाजारातली गुंतवणूक अंतर्भूत नाही. साध्य : साधारणतः १७-१८% वार्षिक परतावा मिळू शकतो. याहूनही थोडा जास्त - २०-२२%पर्यंत शक्य आहे. या बाबतीत आणखी काही मुद्दे : १. गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला खूप मोलाचा ठरला. २. अवाजवी परताव्याची हाव नको - सागाची लागवड, शेळी/एमूपालन, ** वर्षांत दामदुप्पट वगैरे योजनांकडे दुर्लक्ष केलं. ३. महिलांनी यात लक्ष घालून सगळं समजून घ्यावं, अशी महिलांना कळकळीची विनंती; तर आपल्या घरातल्या महिलांना - बायकोला / बहिणीला / मुलीला आपल्या गुंतवणुकीची माहिती देऊन त्यांनाही सामील करून घ्यावं ही पुरुषांना विनंती. ४. जे जे आपणांसी ठावे ते ते सकळांसी सांगावे - आपले मित्र, नातेवाईक, सहकर्मचारी इ.ना गुंतवणुकीसाठी उद्युक्त करत आलो. @इडली डोसा - छान उपयुक्त लेखासाठी आभार आणि प्रतिसाद द्यायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.

Give a Man a Fish, and You Feed Him for a Day. Teach a Man To Fish, and You Feed Him for a Lifetime हा गंभीरपणे दिलेला प्रतिसाद आहे, संजय क्षीरसागर यांनी इथे दुर्लक्ष केल्यास बरे पडेल, विशेषतः इतरांना. आपल्या शाळा-कॉलेजात पर्सनल फायनान्सचे प्राथमिक ज्ञानसुद्धा दुर्दैवाने शिकवले जात नाही, किमान मला तरी कधी कोणी शिकवले नाही. जे काही शिकलो ते चुका करत आणि त्या सुधारत, पुढे वाचन करून शिकलो. या विषयावर आंतरजालावर मराठीत खूप कमी माहिती मिळते आणि ती पण विखुरलेली. म्हणून इतरांना काही फायदा झाला तर बरे या हेतूने ऐसीअक्षरेवर मी १ लेखमाला लिहायला सुरू केले होते, त्याचे भागः पर्सनल फायनान्स - भाग १ - अनुक्रमणिका पर्सनल फायनान्स - भाग ३ - नवी नोकरी पर्सनल फायनान्स - भाग ४ - सुरुवात कुठून करायची पर्सनल फायनान्स - भाग ५ - कर्ज पर्सनल फायनान्स - भाग ६ - माहिती मिळवणे पर्सनल फायनान्स - भाग ७ - युटीलिटी थियरी पर्सनल फायनान्स - भाग ८ - बिहेवियरल इकॉनॉमिक्स पर्सनल फायनान्स - भाग ९ - इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी सर्वप्रथम तुमची रिस्क प्रोफाइल बघा, तुम्हाला कितपत रिस्क घ्यायला जमेल, ते ठरवणे महत्वाचे आहे. मग तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवा. माझी फार जुनी स्ट्रॅटेजी इथे आहे, आता त्यात बराच बदल झाला आहे, पण तुम्हाला स्ट्रॅटेजीबद्दल साधारण अंदाज येईल. नोकरीतून मिळणारे उत्पन्न तुम्हाला इतर मार्गाने मिळू लागले, तर तुम्ही रिटायर होऊ शकता. माझा एक्स-बॉस/मित्र ४२ व्या वर्षी रिटायर होउन आता पुण्याला स्थायिक झाला आहे. अमेरिकेत पण मला भरपूर जण माहीत आहेत, ज्यांना नोकरी करत राहाण्याची गरज नाही किंवा ज्यांनी आता दुसरे करियर निवडले आहे. माझ्या दॄष्टीने यात विशेष काही नाही. जर तुमचे टंपरामेंट (मराठी?) व्यवस्थित असेल आणि तुम्ही नियमित बचत केली आणि नशीबाने साथ दिली तर आर्थिक स्वावलंबन सहज शक्य आहे.

In reply to by उदय

तुम्ही दिलेल्या प्रतिसादात, मी त्यांचा सहज प्रतिवाद करीन अशी भीती दिसत असली तरी मला तसं करायची काही गरज नाही कारण तुमचा निष्कर्श तुम्ही लिहीला आहेच : जर तुमचे टंपरामेंट (मराठी?) व्यवस्थित असेल आणि तुम्ही नियमित बचत केली आणि नशीबाने साथ दिली तर आर्थिक स्वावलंबन सहज शक्य आहे. थोडक्यात तुमचा भर बचत, नशीब, टेंपरामेंट असल्या गोष्टींवर आहे आणि सर्वांच इप्सित `सो कॉल्ड आर्थिक स्वातंत्र्य' मिळवणं आहे. इतक्या कुचकामी लॉजिकवर जगणारे काहीही साहस करु शकणार नाहीत. कारण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे इतके पैसे अशी गोष्टच या जगात नाही. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आता, या क्षणी आणि कधीही, पैसा मला नमवू शकत नाही. पैसा माझ्या जीवनाची दिशा ठरवू शकत नाही. मी प्राथमिक आहे आणि पैसा दुय्यम आहे हे आकलन. अर्थात इतकी वैचारिक उंची गाठायला कितपत जमेल हे ज्याचं त्यानं ठरवावं.

In reply to by संजय क्षीरसागर

आर्थिक विषयांशी संबंधित लेख आले की तुम्ही हेच सांगत असता. पण म्हणजे नक्की काय करायचं आणि कसं करायचं हे मात्र तुम्ही सांगत नाही. माझ्या कार्डच्या लेखावर आणि आता या लेखावरसुद्धा तुम्ही नुसतं गोल गोल फिरताय. पैसे दुय्यम आहेत हे ठीक आहे पण म्हणून ते नकोतच किंवा त्याची गरजच नाही असं नाही ना? गेल्या १७ वर्षांत तुम्ही किती लोकांचे काम पैसे न घेता केलेत? जर पैसे एवढेच दुय्यम आहेत तर तुम्ही तुमच्या Clients ना त्यांना पाहिजे तेवढी फी जेव्हा त्यांच्या मनाला येईल तेव्हा द्या अशी सूट अगदी तुम्ही काम करायला लागल्यापासून सगळ्यांना देता का? आवडली म्हणून आणि आहे नाही ते सगळे पैसे गोळा करून आवश्यक ती रक्कम जमा होत असेल म्हणून पुढचा मागचा विचार न करता रोल्स रॉईस घ्याल का? (कृपया रोल्स रॉईस म्हणजे काय किंवा मला गाडी चालवता येत नाही वगैरे सांगू नका.) अगदीच तुम्हाला गाडी म्हणजे काय हे माहित नसेल तर तुमच्याकडचे सगळे पैसे/ इन्वेस्ट्मेन्ट्स (?) खर्च करून मिळेल अशी कुठलीही वस्तू/ सेवा घ्या. तुम्ही व्यवसाय करत असल्याने वेळेची थोडीफार अडजस्टमेन्ट करणे तुम्हाला जमते. पण मग एप्रिल ते जून या महिन्यांमध्ये एक महिना किंवा तिन्ही महिने तुम्ही पूर्ण सुट्टी घेऊ शकाल का? आणि अशी सुट्टी दर वर्षी घ्यायला जमेल का? तुम्ही जे म्हणताय ते कसं करावं हे स्टेप बाय स्टेप सांगावं अशी एका CA कडून आम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे. पूर्णपणे नाही जमलं तरी थोडंफार तरी अमलात आणू शकतो. पण नुसतंच तुम्ही जगताय तेच फक्त जगणं आणि आम्ही जगतोय ते आमच्याच गळ्यातलं लोढणं हा गैरसमज का ठेवता?

In reply to by ट्रेड मार्क

पैसा हा लेख वाचा ! आणि साहस करा. त्यात सगळं आलंय.

In reply to by संजय क्षीरसागर

त्यावरील प्रतिक्रिया आणि चर्चा सुद्धा वाचल्या. तुम्ही सोडून बाकी सगळे कुढत जगतात, फक्त पैश्यांचा विचार करतात, छंद जोपासत नाहीत असं जे तुम्हाला वाटतंय त्यावर आक्षेप आहे. माझं असं मत आहे की तुमचा बाकी सगळ्यांबद्दल गैरसमज झाला आहे. तुम्ही आयुष्यात किती वाईट परिस्थिती बघितली आहे हे मला माहित नाही. पण स्वानुभवावरून सांगतो जेव्हा घरात खायची पण भ्रांत असते तेव्हा भूक भागवण्यासाठी अन्न आणि ते घेण्यासाठी फक्त पैसेच लागतात. त्याच वेळेला तुम्ही अगदी एकटे असता कारण जग हे फक्त पैसा मानतं. जे या परिस्थितीतून जातात त्यांना पैश्याची किंमत असते आणि त्याचे नियोजन कसे करायचे हे पण कळतं. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही फक्त पैश्याच्या मागे लागतो आणि जीवनाचा आनंद घेत नाही. पैसा हे सर्वस्व नक्कीच नाही पण पैश्यांशिवाय काम होतही नाही. या आधी सांगितल्याप्रमाणे मला रोज पैश्यांची चिंता वाटत नाही. रोज किती तास काम करायचं, ते कुठल्या वेळी करायचं हे मी ठरवू शकतो. मनाला येईल तेव्हा मी आज काम करणार नाही हे सुद्धा सांगू शकतो आणि मीच नव्हे तर आपल्यापैकी बरेच जणांना हे स्वातंत्र्य असेल/ आहे. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या, काम, आजूबाजूची परिस्थिती, सांपत्तिक स्थिती, पाठबळ हे सर्व वेगवेगळं आहे. जो तो आपल्या परीने आनंदात आणि मनाला येईल तसं जगतच असतो. इथेही वर उत्तर देताना तुम्ही मी विचारलेले प्रश्न खुबीने टाळलेले आहेत हे तुमच्या लक्षात आणून देतो.

In reply to by ट्रेड मार्क

पैसा हे सर्वस्व नक्कीच नाही पण पैश्यांशिवाय काम होतही नाही. हा एकमेव गैरसमज जेव्हा दूर होईल तेव्हा तो लेख तुम्हाला समजेल. १) श्वास पैश्यानं चालत नाही. श्वास चालू आहे म्हणून पैश्याला अर्थ आहे. २) मुळात श्वास चालू असणं हे कोट्यावधी फॅक्टर्सवर अवलंबून आहे पण आपल्याला ते कळत नाही. ३) श्वास चालू असणं हे अठरा कोटी किलोमिटर्स दूर असणारा सूर्य तळपत राहाण्यावर अवलंबून आहे. तिकडे सूर्य विझला तर इकडे आपण संपलो. ४) या अठरा कोटी किलोमिटर्सच्या त्रिज्येभोवती पृथ्वी कायम एकसमान अंतर ठेवून फिरायला हवी. ५) पृथ्वीच्या या परिक्रमेत कोणत्याही ग्रहानं चुकून जरी प्रवेश केला तर एका क्षणात सगळा खेळ खलास होईल. ६) पृथ्वी चुकून स्वतःभोवती फिरायची थांबली तर सूर्यासमोरचा भाग खाक होईल आणि पलिकडचा थंडीनं निर्जीव होईल. ७) पृथ्वी असाशी कलली आहे म्हणून ऋतू आहेत, हा अँगल बिघडला तर वातावरणात उलथापालथ होईल. ८) या अँगलमुळे समुद्र चंद्राशी संधान राखून आहेत आणि समुद्र आहेत म्हणून पर्जन्य आहे आणि पर्जन्य आहे म्हणून वृक्ष आहेत आणि त्यांचा उत्छ्वास आपला श्वास आणि आपला उत्छ्वास हा त्यांचा श्वास आहे. १०) शरीर जीवंत राहायला श्वास प्रमुख असला तरी इतर सर्व सिस्टीम्स जसे की हृदय, न्यूरो सिस्टम, ब्लड सर्क्युलेशन, आणि तदनुषंगिक अनेक अज्ञात प्रक्रिया चालू राहाण्यावर जीवंत असणं अवलंबून आहे. हे तुम्हाला समजतील इतके ज्ञात फॅक्टर्स झाले. ते सर्व या क्षणी हजर असतील तरच जीवनात एखादी घटना घडू शकेल.... आणि यातला एक जरी फॅक्टर कोसळला तरी घटना घडणार नाही. ते सर्वच्या सर्व फॅक्टर्स आपल्या नियंत्रणा बाहेर आहेत. आणि यातल्या एकाही फॅक्टरचा पैश्याशी शाट संबंध नाही ! खुद्द बिल गेटस सुद्धा यातला एकही फॅक्टर नियंत्रित करु शकत नाही. थोडक्यात, आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपल्याला खायला मिळतंय आणि खायला मिळतंय म्हणून आपला श्वास चालू आहे असं समजणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. ते नोबेल देणारे आणि घेणारे हे सर्व पॅरामिटर्स न जाणताच, आणि त्यामुळेच गृहित धरुन, `पैश्यामुळे घटना घडली' असा कमालीचा अज्ञान मूलक अर्थ काढतायंत. पण वस्तुस्थिती अशीये की इतक्या अब्जावधी नियंत्रणबाह्य फॅक्टर्सवर आधारित असलेली घटना, ते फॅक्टर्स कायम राहातील असं गृहित धरुन केवळ पैश्यामुळे घडली असं मानणं हे निर्बुद्धपणाचं लक्षण आहे. इट इज द अदर वे राऊंड, घटना घडायची नसेल तर पैसा हे केवळ निमित्त होतं आणि घटना घडायचीच असेल तर पैसा शाट काही करु शकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

१ ते १० मुद्दे मलाही माहित आहेत. पैसे अनावश्यक आहेत हे तत्वज्ञान म्हणून ठीकच आहे. ते सर्व या क्षणी हजर असतील तरच जीवनात एखादी घटना घडू शकेल.... आणि यातला एक जरी फॅक्टर कोसळला तरी घटना घडणार नाही. ते सर्वच्या सर्व फॅक्टर्स आपल्या नियंत्रणा बाहेर आहेत. आणि यातल्या एकाही फॅक्टरचा पैश्याशी शाट संबंध नाही ज्योतिष सांगणारे आणि नियती, नशीब मानणारे लोक हेच तर म्हणतात. हे जे सांगताय ते तुम्ही व्यवहारात किती आणलंय? तुम्ही म्हणता की मला वाटेल तेव्हा काम करतो, बाकी छंद जोपासतो, पैश्यांची चिंता करत नाही. पण म्हणजे तुम्ही काम करताच ना? ते तरी कशाला करता? बरं ते ही छंद म्हणून करता असं मानलं तर त्याचे पैसे कशाला घेता? वर उदय यांनी म्हणल्याप्रमाणे आहे ते सगळं सोडून, जवळ एकही पैसा न ठेवता हिमालयात एक महिना राहून दाखवा. म्हणूनच मी वरच्या प्रतिसादात विचारलेले प्रश्न परत एकदा वाचा आणि त्याची खरी खरी उत्तरं द्या. कृपया तुम्हाला सोयीस्कर असलेले मुद्दे घेऊन चर्चा करू नका. सर्व प्रश्नांची, जरी तुम्हाला अडचणीचे वाटले तरी, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कदाचित जी चर्चा होईल ती तुमच्या आणि आमच्याही फायद्याची असेल.

In reply to by ट्रेड मार्क

कदाचित जी चर्चा होईल ती तुमच्या आणि आमच्याही फायद्याची असेल. तुम्हाला अजूनही पैश्यामुळेच घटना घडते हा भ्रम आहे, त्यामुळे चर्चा (मी लिहीलं तर) तुम्हाला उपयोगी होईल. हे जे सांगताय ते तुम्ही व्यवहारात किती आणलंय? तुम्ही म्हणता की मला वाटेल तेव्हा काम करतो, बाकी छंद जोपासतो, पैश्यांची चिंता करत नाही. पण म्हणजे तुम्ही काम करताच ना? ते तरी कशाला करता? बरं ते ही छंद म्हणून करता असं मानलं तर त्याचे पैसे कशाला घेता? वर उदय यांनी म्हणल्याप्रमाणे आहे ते सगळं सोडून, जवळ एकही पैसा न ठेवता हिमालयात एक महिना राहून दाखवा. मी हे गेली काही दशकं जगतोयं! मला हिमालयात जायची गरज नाही. अज्ञानी लोकांना तो सायास करायला लागतो आणि महाअज्ञानी इतरांना तो करायला सांगतात. हिमालयाची शांतता मी माझ्या घरीच आणलेली आहे. कारण शांतता इथे तिथे सर्वत्र एकसारखीच आहे. तुम्ही ही हिंमत वर्कींग डेला घरच्याघरी करुन बघा. १) सकाळी डोळे उघडल्याशिवाय उठणार नाही. २) भूक लागल्याशिवाय जेवणार नाही. ३) घड्याळ किंवा वेळेची दखल घेणार नाही. ४) मनात आलं तरच काम करीन. ५) छंद किंवा आनंद वर्सेस काम असा विकल्प आला तर काम फाट्यावर मारीन. ६) असं जगून सुद्धा काम वेळेपूर्वीच आणि उत्तम प्रकारे कंप्लीट करीन. ७) मग जे पैसे मिळतील ते मिळतील. येत्या सोमवारी सुरु केलं आणि शुक्रवारपर्यंत फेफरं येऊन, सोमवारी पुन्हा रुटीन सुरु केलं नाहीत तर इथे प्रामाणिकपणे अनुभव लिहा . आणि फेफरं न येता मजा आली तर किमान तीन महिने हा कार्यक्रम राबवा, तुम्हाला मी काय जगतो याची झलक मिळेल. आणि तुम्ही पुन्हा व्यर्थ प्रश्न विचारणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मी पैश्यामुळे घटना घडते असं कुठे म्हणलंय? तुम्ही लिहा तर खरं, मग फायदा ज्याला होईल त्याला होईल. तुम्ही कशाला चिंता करताय? मी हे गेली काही दशकं जगतोयं! म्हणजे ज्यांचं काम करता त्यांच्याकडून तुम्ही पैसे घेत नाही? अगदी पहिल्या कामापासून तुम्ही पैसे घेत नाही का? जर घेताय तर मग कशाला घेता? मी तुम्हाला जे विचारतोय आणि करायला सांगतोय ते वाचून तुम्हाला फेफरं आलंय असं वाटतंय. तुम्ही ही हिंमत वर्कींग डेला घरच्याघरी करुन बघा. हे सगळं बहुतेकांना अगदी रोज करणं जमणार नाही. याचे कारण पैसे हे नसून असलेली जबाबदारी आहे. माझ्या वेगळ्या टाइम झोन मध्ये असलेल्या टीम माझ्यासाठी थांबलेल्या असतात, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणे ही माझी जबाबदारी आहे. नोकरी करणे आणि व्यवसाय करणे यात हा फरक असतोच. आम्हाला ठरलेली वेळ पाळायला लागते आणि स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या निभावायला लागतात. पण म्हणजे आम्ही १२ महिने २४ तास पैश्यांच्या मागे लागलोय हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही मी सांगतोय ते करून बघाच. नाहीतर तुम्ही जगताय तेच फक्त जीवन आणि बाकीचे जगतात ते मरण या भ्रमात तुम्ही आनंदात जगा. आमच्या जगात आम्हाला आनंदाने जगू दे, काय? उगाच सगळ्या अर्थविषयक धाग्यावर तीच तीच टेप वाजवून आमचा वेळ कशाला वाया घालवता? तुम्हाला नसलं तरी तुमच्या मते आम्हाला पैश्यांच्या मागे लागायला लागतं.

In reply to by ट्रेड मार्क

हे सगळं बहुतेकांना अगदी रोज करणं जमणार नाही. नुसत्या कल्पनेनीच धरणी दुभंगली ! पण निदान कबूल तरी केलंत हे काय कमीये. तुम्ही जवाबदारी घेता आणि मी काय गोट्या खेळत नाही. माझी काम वेळेपूर्वीच कंप्लीट असतात. नोकरी आणि व्यावसाय ही फनी कंपॅरिजन आहे. तुम्ही आठवडाभर रजा काढून मी सांगितलेला उपक्रम राबवून बघितला असता, पण त्याला हिंमत लागते. आणि मी तर फक्त आठवडाभर म्हणत होतो पण नुसत्या कल्पनेनंच तुम्ही खचलात. घटना घडण्यासाठी जे (नॉन फिनान्शियल) फॅक्टर्स कारणीभूत आहेत ते मी तुम्हाला सांगितल्यावर, मान्य करण्याखेरीज गत्यंतर राहीलं नाही. पण त्याची तुम्हाला शून्य कल्पना होती, तुम्ही त्यावर फक्त स्वतःचा बचाव केला. कारण ज्या क्षणी मला तो बोध झाला त्या क्षणी मी त्याची प्रचिती घेण्यासाठी सगळं आयुष्य पणाला लावलं ! मी तसं जगलो आणि आय मेड मनी सेकंडरी फॉर ऑल माय लाइफ. त्याला गटस लागतात. आम्ही १२ महिने २४ तास पैश्यांच्या मागे लागलोय हा तुमचा भ्रम आहे. हे कुठून काढलं ? तुम्हाला स्वातंत्र्य नाहीये किंवा जे काय तुम्हाला `स्वातंत्र्य वाटतंय' ते फार लिमीटेड आहे इतकाच मुद्दा आहे. आणि पैसे कमवू नका हे मी कधीही आणि कुठेही म्हटलेलं नाही. पैसा दुय्यम आहे आणि आपण प्रथम आहोत हा माझा एकमेव मुद्दा कायम आहे. तस्मात, मी क्लायंटला चार्ज करतो की नाही ही विचारणा अत्यंत बालीश आहे. आमच्या जगात आम्हाला आनंदाने जगू दे, काय? उगाच सगळ्या अर्थविषयक धाग्यावर तीच तीच टेप वाजवून आमचा वेळ कशाला वाया घालवता? हा पुन्हा ज्योक ! प्रश्न तुम्ही विचारलायं आणि मी उत्तर दिलंय. तुमची हौस तुम्हाला नडली, नाहीतर मला उत्तर द्यायची घंटा गरज नव्हती. एनी वे, इथून पुढे जवाबदारीनं लिहा.

In reply to by संजय क्षीरसागर

मी काही कुणाला कमी वगैरे लेखत नाही. माझं लॉजिक गंडलंय असा मुद्दा निघाला म्हणून पहिल्यांदा प्रतिसाद दिले. नंतर तुम्ही पॉइंट-बाय-पॉइंट सांगा म्हटल्यावर सुद्धा मी सरळपणे लेखाची लिंक दिली. पण त्यावर तुम्ही अशी शेरेबाजी केली : इथेही वर उत्तर देताना तुम्ही मी विचारलेले प्रश्न खुबीने टाळलेले आहेत हे तुमच्या लक्षात आणून देतो. थोडक्यात, तुम्हाला वाटलं की आय कॅन बी कॉर्नर्ड आणि मी तुम्हाला जगातली कोणतीही घटना घडण्यासाठी लागणारे नॉन-फिनान्शियल फॅक्टर्स दाखवून दिल्यावर सुद्धा तुम्ही पार व्यक्तिगत लेवलला प्रतिसाद रेटणं चालूच ठेवलं : हे जे सांगताय ते तुम्ही व्यवहारात किती आणलंय? तुम्ही म्हणता की मला वाटेल तेव्हा काम करतो, बाकी छंद जोपासतो, पैश्यांची चिंता करत नाही. पण म्हणजे तुम्ही काम करताच ना? ते तरी कशाला करता?. सो नाऊ इट वॉज माय टर्न ! मी जगतो तेच लिहीतो त्यामुळे मला पेचात पकडणं असंभव आहे. जी काही प्रश्नोत्तरं झाली आहेत त्यात कुणालाही कमी लेखण्याचा हेतू नाही. आणि स्वतःची शेखी मिरवण्याचा तर नाहीच नाही कारण बाकीचे कितपत स्वतंत्र आहेत हे मी जाणतो. मला फक्त एकच सांगायचं होतं की १.५० कोटी खात्यात जमा असणं की $ ७५, ००० बिनकामाचं वार्षिक उत्पन्न असणं असल्या फँटास्टिक निरुपयोगी आयडीया इथे लिहून ज्यांच्याकडे तशी क्षमता नाही त्यांना नाराज करु नका किंवा गाजर दाखवू नका. ज्यांच्याकडे त्याहूनही जास्त पैसे आहेत ते सुद्धा सर्वांगिण मुक्ततेनं जगू शकत नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही पैसे घेता का नाही प्रश्न फारच अडचणींचा वाटतोय बहुतेक. त्यामुळे मग फेफरं येईल, धरणी दुभंगली, वैयक्तिक हल्ले म्हणून आरडाओरडा हे सगळं चालू झालं. मुळात तुमचं लॉजिक खरंच गंडलेलं आहे. समोरचा काय म्हणतो हे तुम्हाला पटकन कळत नसावं आणि आपण स्वतः काय म्हणालो याचाही विसर पडत असावा. तुम्ही ही हिंमत वर्कींग डेला घरच्याघरी करुन बघा. हे तुम्हीच म्हणालात आणि मग पुढच्या प्रतिसादात "तुम्ही आठवडाभर रजा काढून मी सांगितलेला उपक्रम राबवून बघितला असता" असं म्हणताय. सुट्टी घेऊन सगळे बहुतेक त्यांना पाहिजे तसंच वागतात. मूड असेल तर गोट्याही खेळत असतील. पण त्यावेळातही कर्जाची चिंता करत बसत नाहीत. घटना घडण्यासाठी जे (नॉन फिनान्शियल) फॅक्टर्स कारणीभूत आहेत ते मी तुम्हाला सांगितल्यावर, मान्य करण्याखेरीज गत्यंतर राहीलं नाही. पण त्याची तुम्हाला शून्य कल्पना होती, तुम्ही त्यावर फक्त स्वतःचा बचाव केला. हेच स्वतःला सर्वज्ञानी आणि इतरांना मूर्ख समजणं आहे. मी क्लायंटला चार्ज करतो की नाही ही विचारणा अत्यंत बालीश आहे. माझा क्रेडिट कार्डचा धागा काय किंवा सदरचा धागा काय, विषय पैसे कसे वाचवायचे हा आहे. पूर्णपणे वेगळा विषय असताना तुम्ही मधेच मी कसा शहाणा अशी जाहिरात करत बसता हे जास्त बालिश आहे. माझ्या या क्रेडिट कार्ड विषयीच्या धाग्यात तुम्ही म्हणता की तुम्ही आयुष्यात कधी कर्ज काढलं नाही. पुढे, या प्रतिसादात तुम्ही म्हणता "क्रेडीट कार्ड वापरतो ही एकमेव गोष्ट सोडता मी आयुष्यात कधी एक पैसाही कर्ज घेतलं नाही.". क्रेडिट कार्ड वापरणं म्हणजे एक प्रकारचं कर्जच आहे ना? त्यापुढे तुम्ही गृहकर्जावर गेलात. आता त्यापुढील तुमचेच सगळे प्रतिसाद वाचा. मग इथे कशी फिरवाफिरवी केलीत बघा. वर नंतर हे ही म्हणताय जी काही प्रश्नोत्तरं झाली आहेत त्यात कुणालाही कमी लेखण्याचा हेतू नाही. आणि स्वतःची शेखी मिरवण्याचा तर नाहीच नाही कारण बाकीचे कितपत स्वतंत्र आहेत हे मी जाणतो. तुमच्या प्रत्येक प्रतिसादात "तुम्हारा जीना भी कोई जीना है लल्लू" हा सूर कायम आहे. एकही धाग्यात फ्लॅट घेण्याइतके पूर्ण पैसे नसतील तर काय करायचं हे तुम्ही सांगू शकला नाहीत. तुम्ही ३.५ लाखाला पहिला फ्लॅट घेतला तेव्हा दागिने व इतर इन्व्हेस्टमेंट विकून पैसे उभे केलेत हे तुम्हीच सांगितलंय. त्या इन्वेस्ट्मेन्ट्स तुमच्या होत्या का याचं उत्तर टाळलंत. कारण २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९२ साली तुमच्याकडे स्वतःचे ३.५ असतील तर तुम्ही त्याआधी बरीच वर्ष काम करत असावेत. म्हणजे आत्ता तुम्ही ६५+ असू शकता. त्यामुळे तुम्ही जो दिनक्रम सांगताय त्यात नवल काहीच नाही. एवढंच काय कुठल्या डेबिट कार्ड्स वर चार्जेस लागत नाहीत हे सांगितल्यावर, बघतो आणि सांगतो म्हणालात आणि पुढे गायब झालात. स्वतःला तुम्ही अर्थविषयक सल्लागार म्हणवता आणि इतक्या सध्या गोष्टी पण माहित नसाव्यात तुम्हाला? आता म्हणाल की मी पैश्यांची चिंता करत नाही, होउदे खर्च. अजून उत्खनन केलं तर तुमच्याच सांगण्यात किती विसंगती आहे आणि तुम्ही सोयीस्कर प्रतिसाद कसे देता याचे अजून पुरावे देता येतील. पैसे कसे मिळवावे आणि वाचवावे याचे नवनवीन फंडे समाजाने आम्हा पामरांसाठी उपयुक्त आहे. तेव्हा उगीच या विषयांवर असलेल्या धाग्यांवर अध्यात्म सांगून धाग्याचे काश्मीर करू नये. आणि हो, जे तुम्ही क्लेम करताय त्याची सत्यासत्यता बघायला आमच्याकडे काहीच मार्ग नाही. मिपावर सुद्धा तुमचे क्लायंट आहेत म्हणताय पण कोणी तुमच्या बाजूने काही बोललेलं नाही. तेव्हा तुम्ही जिथे तिथे मी कसा छान जगतो हे सांगत बसता त्याला स्वतःची टिमकी वाजवणे म्हणतात.

In reply to by उदय

सोप्या शब्दात आणि लेमॅनला समजेल अश्या भाषेत लिहिल्यामुळे जड वाटत नाहिये. ज्यांना पर्सनल फयनान्स संकल्पनांबाबत काहिच माहित नाही पण सुरुवात करायची आहे अशा सर्वांसाठी उपयुक्त.

निश्चितच सुयोग्य आर्थिक नियोजन ही सुखी भविष्याची किल्ली आहे. आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर शिक्षण लांबल्यामुळे आमचं अर्थार्जन त्यामानाने उशिरा सुरु झालं. त्यावेळी स्टायपेंडमधून पैसे वाचवून शेअर्स मध्ये गुंतवले. सुदैवाने त्यात चांगला फायदा झाला. नंतर हळूहळू म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवायला सुरुवात केली. यांत वेळोवेळी घेतलेलं गुंतवणूक सल्लागाराचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलं. सध्याची शेअर्स, म्यु.फंडाची व इतर गुंतवणूक ही लॉन्गटर्म साठी करतो आहोत.

अर्रे, तुमचा आणि माझा प्रवास अगदी सारखाच चाललेला दिसतोय. कॅनडात कुठे स्थायिक झाला आहेत? मी सुद्धा आत्ताच म्हणजे २०१५ मध्ये कॅनडात आलो. ट्रम्पची चाहूल अगोदरच लागली होती का असे बऱ्याच जणांनी विचारले. सध्या मिसिसागा, टोरांटो येथे राहतो. जमल्यास व्यनि करा. इथेच आपला एक कट्टा होऊन जाईल.

तुम्ही एकतर न वाचता प्रतिसाद देता त्यामुळे निष्कारण वेळ जातो किंवा मग तुम्हाला अर्थच कळत नाही. त्यामुळे इथून पुढे तुमच्या विचारणा फाट्यावर मारण्यात येतील. तद्वत माझ्या प्रतिसादांची दखल तुम्ही न घेतलेली बरी कारण पूर्वग्रहामुळे ते तुम्हाला समजतील असं वाटत नाही. १) तुम्ही पैसे घेता का नाही प्रश्न फारच अडचणींचा वाटतोय बहुतेक. मी काय लिहीलंय ते नीट वाचा : पैसे कमवू नका हे मी कधीही आणि कुठेही म्हटलेलं नाही. पैसा दुय्यम आहे आणि आपण प्रथम आहोत हा माझा एकमेव मुद्दा कायम आहे. तस्मात, मी क्लायंटला चार्ज करतो की नाही ही विचारणा अत्यंत बालीश आहे. या जगात पैसे न घेता कुणी काम करेल हा विचार मुळातच व्यर्थ आहे. २) तुम्ही ३.५ लाखाला पहिला फ्लॅट घेतला तेव्हा दागिने व इतर इन्व्हेस्टमेंट विकून पैसे उभे केलेत हे तुम्हीच सांगितलंय. त्या इन्वेस्ट्मेन्ट्स तुमच्या होत्या का याचं उत्तर टाळलंत. आम्ही एकत्र कुटुंबात राहातो. माझे वडील, भाऊ, मी आणि आई या सर्वांनी मिळून घर घेतलं. आम्ही कर्ज घेतलं नाही. त्यावरनं माझ्याकडे सगळे पैसे होते हा निष्कर्श तुम्ही तुमच्या बुद्धिनी काढलायं. ३) आता तुमच्या अनाकलाची हद्द बघा : आत्ता तुम्ही ६५+ असू शकता. त्यामुळे तुम्ही जो दिनक्रम सांगताय त्यात नवल काहीच नाही. माझा हा दिनक्रम गेली वीस वर्ष आहे ! हे पुन्हा एकदा नीट वाचा हा दिनक्रम गेली वीस वर्ष आहे ! आणि ते नवल आहे ! आता माझा मुद्दा नीट लक्षात घ्या : लेखातल्या प्लानिंगप्रमाणे तो प्लानिंग करणार्‍याकडे आजही नाही आणि भांडवल जमा झाल्यावरही शक्य नाही, कारण स्वातंत्र्य साहसावर अवलंबून आहे, पैश्यावर नाही. ४) तुम्ही प्रतिसाद वाचतच नाही याचा पुन्हा हा नमुना पाहा : सुट्टी घेऊन सगळे बहुतेक त्यांना पाहिजे तसंच वागतात. मूड असेल तर गोट्याही खेळत असतील. पण त्यावेळातही कर्जाची चिंता करत बसत नाहीत. पुन्हा तसाच फनी अर्थ ! सुट्टी घेऊन तो उपक्रम राबवून बघा म्हणजे सर्वांगिण स्वातंत्र्याची कल्पना येईल, कारण नोकरी करतांना तो शक्य नाही. सुट्टीत तुम्ही गोट्या खेळता का आणखी काही याच्याशी त्याचा दूरान्वये ही संबंध नाही. ४) तुम्हाला अलिकडलं वाक्य पलिकडल्या वाक्याशी सुद्धा जोडता येत नाही ! क्रेडिट कार्ड वापरणं म्हणजे एक प्रकारचं कर्जच आहे ना? कारण मी ऑलरेडी म्हटलंय "क्रेडीट कार्ड वापरतो ही एकमेव गोष्ट सोडता मी आयुष्यात कधी एक पैसाही कर्ज घेतलं नाही." आणि मजा म्हणजे ते तुमच्या वाक्याच्या अलिकडे, तुम्हीच नमूद केलंय. ५) एवढंच काय कुठल्या डेबिट कार्ड्स वर चार्जेस लागत नाहीत हे सांगितल्यावर, बघतो आणि सांगतो म्हणालात आणि पुढे गायब झालात. हे कुठून काढलं ? माझ्या कार्डवर चार्जेस लागतात आणि मी फक्त नॅशनलाइज्ड बँकेत पैसे ठेवतो आणि त्यांचंच कार्ड वापरतो हे तिथेच सांगितलं आहे. पण तुम्हाला मूळ मुद्दाच कळत नाही, तो असा होता : कार्ड वापरुन आणि लोन्स घेत व त्यांची परतफेड करत, स्वतःचं सिबील रेटींग वाढवणं, यापेक्षा लोन न घेणं श्रेयस्कर आहे. ६) तुमचा घोर गैरसमज बघा : घटना घडण्यासाठी जे (नॉन फिनान्शियल) फॅक्टर्स कारणीभूत आहेत ते मी तुम्हाला सांगितल्यावर, मान्य करण्याखेरीज गत्यंतर राहीलं नाही. पण त्याची तुम्हाला शून्य कल्पना होती, तुम्ही त्यावर फक्त स्वतःचा बचाव केला. हेच स्वतःला सर्वज्ञानी आणि इतरांना मूर्ख समजणं आहे. अजूनही तुम्हाला श्वास प्रायमरी आहे हे मान्य नाही ! यावरनं आता काय समजायचंय ते समजा. ७) आता तुमचा हा विनोद पाहा : जे तुम्ही क्लेम करताय त्याची सत्यासत्यता बघायला आमच्याकडे काहीच मार्ग नाही. मी तरी तुम्हाला कुठे वेरिफाय करु शकतोयं ? पण एखाद्या व्यक्तीविषयी जाणून घ्यायला आणि व्यासंगाचा अंदाज यायला, त्याच्या लेखनाची रेंज पुरेशी आहे. तुम्ही इथे किती आणि कायकाय विषयावर लिहीलंय ते बघितलं की जगण्याचा आवाका लक्षात येतोच. ८) हे फारच बालीश वाटतंय का पाहा : मिपावर सुद्धा तुमचे क्लायंट आहेत म्हणताय पण कोणी तुमच्या बाजूने काही बोललेलं नाही. इथला एकही क्लायंट मला अजून प्रत्यक्ष भेटलेला नाही . आमचा सगळा संवाद फोन्स आणि मेल्सवर आहे. आणि तरीही माझ्या क्लायंटसना, मी एकटा कुणालाही पुरुन उरेन याची खात्री आहे !

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही तुमची लाल आहे हे सांगण्यासाठी गुलाबी रंग का वापरता? लाल रंगालाही लाज वाटेल इतकी तुम्ही स्वतःची लाल करत असल्यामुळे हायलाईट करण्यासाठी तुम्ही लाल रंग वापरायला हवा.

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

म्हणजे या प्रतिसादावरुन तुमच्या आकलनाच्या मर्यादा पुरेश्या स्पष्ट होतात पण हिंमत असेल तर तुमचं एकूण काय ज्ञान आहे यासंबधी एखादी पोस्ट टाका आणि मग स्वतःचा रंग काय होतो पाहा.

In reply to by संजय क्षीरसागर

ज्ञानी व्यक्ती आपल्या ज्ञानाची येता-जाता, उठता-बसता आपल्या ज्ञानाची टिमकी वाजवत फिरत नाही. तुम्हाला "उथळ पाण्याला खळखळाट फार" ही म्हण ऐकली असेलच . त्या म्हणीतले उथळ पाणी आहात तुम्ही. ओशोंची चार पुस्तकं वाचून तुम्हाला "आपल्याला आत्मज्ञान झाले आहे" असे वाटत असले तरी प्रत्यक्षात तुम्ही सारासार विचार करण्याची अजिबात क्षमता नसलेली व्यक्ती आहात. तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर You have no conscience about what you are speaking about yourself and people and what people are speaking about you. अहंकाराने काठोकाठ भरुन अहंकार ओसंडून वाहणाऱ्या व्यक्तीने आत्मज्ञानाच्या गप्पा करणे हा मोठा विनोद आहे.

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

आता नीट वाचा कदाचित जन्मभरासाठी उपयोगी होईल. कारण प्रतिसादातून तुमची वाचनशून्यता झळकते आहे : ओशोंच्याबाबतीत बोलायचं झालं तर ते असं आहे : ज्याच्याकडे काहीही वकूब नाही अशा व्यक्तीचा न्यूनगंड, एखादी व्यासंगी व्यक्ती समोर आली की ज्याम उफाळून येतो, असा ह्युमन सायकॉलॉजिचा निष्कर्श आहे. त्यामुळे बेवकूब व्यक्ती, एकतर अशा व्यक्तीला शरण जाते (कारण आपल्याकडून हे होणे नाही याची तिला खात्री असते) किंवा मग त्या व्यक्तीच्या हननाची संधी शोधत राहाते (त्यामुळे ती व्यक्ती, आपल्याच लेवलला किंवा त्याही खाली आहे असं मानसिक समाधान लाभतं). यासाठी बेवकूब व्यक्तींचा पूर्वापार चालत आलेला हुकमी डाव म्हणजे त्या व्यक्तीला अहंकारी ठरवणे ! या उलट, न्यूनगंड नसलेली ओपन माइंडेड व्यक्ती, अशा व्यासंगी व्यक्तीच्या ट्रेटसचा आभ्यास करते आणि तसा व्यासंग आपल्या जीवनात आणण्यासाठी प्रयत्नशील होते. याचा दुहेरी फायदा होतो, एकतर तिच्या व्यक्तीमत्वाला नवे आयाम मिळतात आणि दुसरं म्हणजे (मनात किल्मिष आणि तुलना नसल्यानं) अशी व्यक्ती व्यासंगी व्यक्तीपेक्षाही वेगळी परिमाणं शोधू शकते . ओशोंचे कोट्यावधी निंदक आणि लक्षावधी फॉलोअर्स पहिल्या कॅटेगरीत आहेत. माझं भाग्य एवढंच की मी स्वतःला दुसर्‍या कॅटेगरीत आणू शकलो. वरची स्टोरी एवढ्यासाठी सांगितली की तुमचा ओशोंच्या साहित्याचा काही व्यासंग असेल तर फक्त एकच पोस्ट इथे टाका. तुम्हाला तुमच्याच भाषेत सांगतो, कुठेकुठे आणि कायकाय रंग झालेत हे बघायला, मागे- पुढे, खाली-वर, आणि वेगवेगळ्या कोनात आरसे लावायला लागतील. आता तुम्ही प्रतिसाद कितपत वाचता हे बघा. माझ्या प्रतिसादांचा उद्देश आजच नाहीतर पाचवर्षापूर्वी माझा पैसा हा लेख इथे प्रकाशित झाला तेव्हापासून एकच आहे : पैसा दुय्यम आहे आणि आपण प्रथम आहोत हा माझा एकमेव मुद्दा कायम आहे मला फक्त एकच सांगायचं होतं की १.५० कोटी खात्यात जमा असणं की $ ७५, ००० बिनकामाचं वार्षिक उत्पन्न असणं असल्या फँटास्टिक निरुपयोगी आयडीया इथे लिहून ज्यांच्याकडे तशी क्षमता नाही त्यांना नाराज करु नका किंवा गाजर दाखवू नका कदाचित इतक्या सौम्य रंगांची तुम्हाला सवय नाही पण ती सोय होईपर्यंत चालवून घ्या.

In reply to by संजय क्षीरसागर

तुमचे प्रतिसाद खरं तर फाट्यावर मारण्यासारखे असतात. धाग्याचा विषय कुठला आहे याचे तुम्हाला आकलन होत नसावे म्हणून पैश्यांशी संबंधित लेखांमध्ये तुम्ही सतत तुम्ही कसे आयुष्य जगता आणि बाकी लोक कसे किडामुंग्यांचे आयुष्य जगतात हे सांगत बसता. एवढ्या वेळा इतक्या मिपाकरांनी विचारूनसुद्धा तुम्ही कोणालाही समजेल, पटेल असं उत्तर देऊ शकला नाहीत. तुम्ही सांगताय ते आचरणात कसं आणायचं हे स्टेप बाय स्टेप सांगू शकला नाहीत. तुम्हाला एकदम साक्षात्कार झाला म्हणताय म्हणजे काय झालं? आणि तुम्ही म्हणता हेच अंतिम सत्य का याचं स्पष्टीकरण तुम्हाला देता आलं नाही. पैसे कमवू नका हे मी कधीही आणि कुठेही म्हटलेलं नाही. बरोब्बर. "पैसे" मिळवण्यासाठी तुम्ही व्यवसाय करता. आम्हाला पैसे मिळवण्यासाठी नोकरी करावी लागते. त्यामुळे त्या अनुषंगाने जी बंधने असतात ती पाळायलाच लागतात. तुम्हीच म्हणलंय "नोकरी आणि व्यावसाय ही फनी कंपॅरिजन आहे.". एकीकडे तुम्ही जे सतत म्हणता की तुम्हाला कधीही काम केलं; नाही केलं तरी चालतं आणि दुसरीकडे जे तुम्ही सतत म्हणता की तुम्ही सोडून सगळ्यांना आठ तास काम करायला लागतं ही जास्त फनी कंपॅरिजन आहे. व्यवसायात असल्याने तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा काम करू शकता. त्यात तुम्ही सांगितलंय की तुमच्याकडे कोणी कामाला नाहीये त्यामुळे तर तुम्हाला हे अजूनच शक्य आहे. नोकरी करत असणाऱ्या बहुतेकांना कामाची एक ठराविक वेळ असते जी पाळणे बंधनकारक असते, त्यात हिमतीचा संबंध कुठे येतो? नोकरी करणारे २४ तास पैश्याच्या मागे लागलेले असतात ही समजूत तुम्ही का करून घेतलीये? जसे तुम्ही आम्हाला म्हणताय की आम्ही स्वतंत्र नाही किंवा जे स्वातंत्र्य आहे ते लिमिटेड आहे तेच तुम्हालाही लिमिटेड आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला म्हणलं की टॅक्सेस कॅल्क्युलेट आणि फाईल करायच्या वेळेस तुम्ही पूर्ण ३-४ महिने रजा घ्या. त्यावर तुम्ही उत्तर दिलं नाही. "मी क्लायंटला चार्ज करतो की नाही ही विचारणा अत्यंत बालीश आहे" बालिश नाहीये कारण पैसे तुम्हालाही मिळवावेच लागतात. तुम्ही कसे मिळवता आणि आम्ही कसे मिळवतो हा भाग वेगळा कारण तुमचा व्यवसाय तुम्ही एकट्याने करू शकाल असा आहे आणि आम्ही नोकरी करतो. व्यवसाय असल्याने तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही काम करू शकता. जे स्वातंत्र्य सगळ्या व्यासायिकांना असेलच असेही नाही. उद्या वकिलाला तुम्ही म्हणाल कोर्टाच्या वेळेत तुम्हाला जायला लागतं म्हणजे लिमिटेड स्वातंत्र्य आहे. आम्ही एकत्र कुटुंबात राहातो. माझे वडील, भाऊ, मी आणि आई या सर्वांनी मिळून घर घेतलं. आम्ही कर्ज घेतलं नाही. त्यावरनं माझ्याकडे सगळे पैसे होते हा निष्कर्श तुम्ही तुमच्या बुद्धिनी काढलायं बरोब्बर. म्हणजे तुमच्याकडे पैसे नव्हते तर आणि त्यावर उपाय म्हणून तुमच्या घरातील स्त्रीधन तुम्ही विकून टाकलं, वडिलांनी साठवलेले ठेवींच्या स्वरूपातील पैसे वापरून टाकले. हेच आम्ही स्त्रीधनाला शक्यतो हात न लावता, आईवडिलांनी कष्ट करून साठवलेले पैसे न खर्च करता बाहेरून पैसे उभे करून घर घेतो, ज्यात बँकेकडून कर्ज घेणं हे पण अंतर्भूत आहे. यात फक्त उद्याचा विचार नसून घरातील स्त्रियांचा, त्यांच्या दागिन्यांचा आणि वडिलांचे पैसे न खर्च करण्याचा विचार आहे. हे पुन्हा एकदा नीट वाचा हा दिनक्रम गेली वीस वर्ष आहे ! आणि ते नवल आहे ! यात नवल तुम्हाला वाटतंय. स्वातंत्र्य आम्हालाही आहेच पण आम्ही उगाच डंका पिटत नाही. लेखातल्या प्लानिंगप्रमाणे तो प्लानिंग करणार्‍याकडे आजही नाही आणि भांडवल जमा झाल्यावरही शक्य नाही, कारण स्वातंत्र्य साहसावर अवलंबून आहे, पैश्यावर नाही. तीन वेगवेगळ्या पण रिलेटेड गोष्टीमध्ये तुम्ही गोंधळ घालताय. १. पैश्याचे स्वातंत्र्य: हे प्रत्येकाच्या मानण्याप्रमाणे आहे. एखाद्याकडे पैसे नसतील म्हणजे रोज किंवा महिन्याला मिळेल त्यावर पोट असेल तर त्याला हे स्वातंत्र्य कमी असेल. पण मग एखादे साहस करून तो जास्त पैसा मिळवू शकतो. घर घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर कर्ज काढण्याशिवाय दुसरा मार्ग आहे का? प्रस्तुत लेखाचा उद्देश तुम्ही वायफळ खर्च कमी करून कशी गुंतवणूक करावी हा आहे. माझ्या क्रेडिट कार्डच्या लेखाचा मी क्रेडिट कार्ड्सचा माझ्या फायद्यासाठी कसा वापर करून घेतला हा आहे. म्हणून आम्ही कोणीच पैश्याच्या दृष्टीने स्वतंत्र नाही का निष्कर्ष काढून तुम्ही मोकळे झालात? २. वेळेचे स्वातंत्र्य: हे पैसे मिळवण्याचा जो मार्ग स्वीकारला आहे त्यावर अवलंबून आहे. नोकरी करणाऱ्याला ठरवलेल्या वेळात आणि ठराविक वेळ काम करायला लागतं. व्यवसाय करणाऱ्याला व्यवसायाच्या स्वरूपावर हे स्वातंत्र्य अवलंबून आहे. तुमच्या अशिलाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्याच्या रिटर्न्स वर प्रश्न विचारले आहेत आणि त्याची उत्तरं ठराविक वेळेत द्यायची आहेत तर तुम्ही माझा मूड नाही हे उत्तर देऊ शकणार नाही. ३. आयुष्याचा आनंद घेण्याचे स्वातंत्र्य: प्रत्येक जण आपापल्या परीने आयुष्याचा आनंद घेतच असतो. हा तुमचा गैरसमज आहे की तुम्ही सोडून सगळे अगदी दुःखात जगत आहेत. या आधीपण मी सांगितलंय की नोकरी करत असूनही मी मला वाटेल तेव्हा काम करू शकतो. अगदी ८ ला ऑफिसला जायलाच पाहिजे असं नाही आणि रोज जायला पाहिजे असंही नाही. आजही मी ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो आणि मग जाऊ नये असं वाटलं म्हणून गेलो नाही. मस्त ३ तास ताणून दिली नंतर बायकोबरोबर गप्पा हाणल्या. तुम्हाला प्रतिसाद वाचूनही समजत नाहीत याचा उत्तम नमुना - सुट्टी घेऊन तो उपक्रम राबवून बघा म्हणजे सर्वांगिण स्वातंत्र्याची कल्पना येईल, कारण नोकरी करतांना तो शक्य नाही. नोकरी करत असूनही मला वाटलं म्हणून आज सुट्टी घेतली आणि मला पाहिजे तसं वागलो. या आधीही असं बरेचदा केलंय आणि यापुढेही करीन. आणि हो, आजच्या दिवसाचा पगार मला मिळणारच आहे. नसता मिळाला तरी फारसा फरक पडला नसता. पैश्याची चिंता करायची अजिबात गरज भासली नाही, किंबहुना तो विचारच मनात आला नाही. क्रेडीट कार्ड वापरतो ही एकमेव गोष्ट सोडता मी आयुष्यात कधी एक पैसाही कर्ज घेतलं नाही. अहो म्हणजे कर्ज घेतलंच ना? त्याची परतफेड करायला लागणारच ना? मग मी कर्जमुक्त जीवन जगतो हा तुमचा दावा पोकळ आहे. कारण शॉर्ट टर्म का होईना तुम्ही कर्ज घेताच. माझ्या कार्डवर चार्जेस लागतात आणि मी फक्त नॅशनलाइज्ड बँकेत पैसे ठेवतो आणि त्यांचंच कार्ड वापरतो हे तिथेच सांगितलं आहे. इतरांनी पुराव्यासहित सिद्ध केलंय की नॅशनलाइज्ड बँकांचे डेबिट कार्ड्स वापरून चार्जेस लागत नाहीत. एसबीआय च्या डेबिट कार्डावर चार्जेस लागत नाहीत हे गणामास्तर यांनी सांगितलं. त्यावर तुम्ही बघून सांगतो म्हणालात आणि नंतर सांगितलंच नाहीत. तुम्ही म्हणताय "कार्ड वापरुन आणि लोन्स घेत व त्यांची परतफेड करत, स्वतःचं सिबील रेटींग वाढवणं, यापेक्षा लोन न घेणं श्रेयस्कर आहे.". पण तुम्ही तर क्रेडिट कार्ड्स वापरता ना? एकाच वेळी इतकी विरोधाभासी वाक्य तुम्ही कशी काय लिहू शकता? सिबिल रेटिंग आत्ता सुरु झालंय, क्रेडिट कार्ड्स वापरणं बऱ्याच आधीपासून चालू आहे. अजूनही तुम्हाला श्वास प्रायमरी आहे हे मान्य नाही ! यावरनं आता काय समजायचंय ते समजा. असं तुम्हाला का वाटतं? काहीही हं संक्षी. पण एखाद्या व्यक्तीविषयी जाणून घ्यायला आणि व्यासंगाचा अंदाज यायला, त्याच्या लेखनाची रेंज पुरेशी आहे. तुम्ही इथे किती आणि कायकाय विषयावर लिहीलंय ते बघितलं की जगण्याचा आवाका लक्षात येतोच. आयला मिपावरचे ३-४ लेख वाचून मी काय आहे हे तुम्हाला सगळं कळलं? भारीये की. तुमचे लेख आणि प्रतिसाद वाचून बऱ्याच लोकांनी तुमच्याविषयी अंदाज बांधलेत, त्यामुळेच तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत. इथला एकही क्लायंट मला अजून प्रत्यक्ष भेटलेला नाही . आमचा सगळा संवाद फोन्स आणि मेल्सवर आहे. आणि तरीही माझ्या क्लायंटसना, मी एकटा कुणालाही पुरुन उरेन याची खात्री आहे ! स्वतःविषयी किती ते गैरसमज. एका प्रश्नांची तुम्ही धड उत्तरं देऊ शकत नाही. विषयाला धरून प्रतिवाद करता येत नाही. त्यामुळे असोच.

In reply to by ट्रेड मार्क

पण तुमची हौस फिटत नाही ! १) तुम्ही सांगताय ते आचरणात कसं आणायचं हे स्टेप बाय स्टेप सांगू शकला नाहीत. मी सांगतोयं ते स्टेप-बाय-स्टेप नाही. आज आणि आत्ता आचरणात आणायचंय. तुम्ही फक्त आठवडाभर रजा घेऊन नक्की काय करुन पाहा, ते पण वर सांगितलंय पण तुमची हिम्मत नाही (हे तुम्हीच कबूल केलंय !) तस्मात, तुमच्याकडून वायफळ प्रतिसादांशिवाय काहीही होणे नाही. २)यात नवल तुम्हाला वाटतंय. स्वातंत्र्य आम्हालाही आहेच पण आम्ही उगाच डंका पिटत नाही. स्वतःचा युक्तीवाद बोगस ठरला की दुसरा निरर्थक मुद्दा सुरु ! पहिल्यांदा तुम्ही म्हणालात की सिक्स्टी प्लसला अशा दिनक्रमाचं नवल नाही, पण तोंडावर आपटल्यावर आता म्हणतायं `आम्ही डंका पिटत नाही'. तुमच्याकडे घंटा स्वातंत्र्य नाही आणि हिम्मतही नाही. तुम्ही सारखे मागे लागलात म्हणून मी दिनक्रम लिहीला. तुम्हाला ते वाचूनच खचून गेल्यासारखं झालंय, पण उगीच बाजू सावरायची म्हणून आता डंका वगैरे चालू केलंय आता फक्त नशीब समजा की त्यात रोजच्या दिनक्रमातले भोजनोत्सव, स्नानोत्सव, संगीत, लेखन, इतर वेगवेगवेगळ्या आयामांचं एक्स्प्लोरेशन (उदा, मी सध्या शास्त्रीय संगीत शिकतोयं !), आठवड्याला होणारे बहुरंगी कार्यक्रम (उदा. परवा सचीन जांभेकर आणि मोहन भंडारी (काराओके सॉफ्टवेअरचे निर्माते) यांच्या समोर स्टेज परफॉर्मन्सची संधी मिळाली आणि कहर म्हणजे गाण्याला वन्समोअर मिळाला!), नव्या रेस्टॉरंटसच एक्सप्लोरेशन (उदा. माझ्या मुलानं नुकतंच डेक्कन एटचं इंटिरिअर केलंय, त्याला दिलेली भेट), मागच्याच आठवड्यात अँबी वॅली सिटीला केलेली बहारदार ट्रीप... बरीच मोठी यादी आहे. पण वाचून कदाचित फीट येईल म्हणून थांबतो. ३) एका प्रश्नांची तुम्ही धड उत्तरं देऊ शकत नाही. विषयाला धरून प्रतिवाद करता येत नाही. तुमच्या सगळ्या प्रतिसादावर वेळ खर्च करणं व्यर्थ आहे. ४) सो, लेटस कम टू अ सिंपल टेस्ट . तुमचं स्वातंत्र्य, तुमचे विविध व्यासंग, स्वतःच्या कामचा छंद करण्याची तुमची हुशारी (असेल तर) , नातेसंबधात तुम्ही भरलेले रंग (हे समजलं तरी खूप आहे), तुम्ही आयुष्य खुलवण्यासाठी एक्सप्लोअर करत असलेले नवे आयाम (आला का फेस?) हे सगळं एका झटक्यात क्लिअर होईल.... बाकी सगळं सोडा : हिंमत असेल तर तुम्ही फक्त तुमचा दिनक्रम लिहा. फुल्ल पितळ उघडं पडेल !

In reply to by संजय क्षीरसागर

साहेब, हे सगळ्या प्रतिसादांमधे वारंवार तुम्ही वाचून फीट येईल, वाचून चक्कर येईल असे लिहिण्यामागे काही विशिष्ट उद्देश आहे का ? नाही म्हणजे तुम्ही लैच पैसेवाले आहात म्हणून हे रेस्टॉरंट नि आम्बी व्हॅली सगळ करताय. चांगल आहे. एन्जॉय. मी लै शाना बाकीचे वेडझवे. बाकीच्यांनी माझ्यासारखे जगून दाखवावे हा सोस कशाकरता ? ही आदर्श जीवनशैली असला काही भ्रम काढून टाका.

In reply to by अप्पा जोगळेकर

१) चर्चा जगण्यातल्या सर्वांगिण स्वातंत्र्याची आहे हे तुमच्या पहिल्यांदा लक्षात येतंय का ते पाहा. २) आणखी थोडी कपॅसिटी असेल तर, जगण्यातलं स्वातंत्र्य दिनक्रमात रिफ्लेक्ट होतं हे लक्षात येईल. ३) प्रतिसाद देण्यापूर्वी वाचनाची सवय लावून घेतली तर मी, उदय आणि ट्रेमा यांना दिनक्रमाविषयी विचारलं होतं. ते दोघंही, दिनक्रम सोडून बाकीचंच ठोकतायेत (कारण त्याविषयावर लिहीण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नाही). ४) नंतर ट्रेमानी मला स्टेप-बाय-स्टेप स्वातंत्र्याबद्दल लिहायची विनंती केली. ५) मी प्रामाणिकपणे सांगितल्यावर फुल पलटी मारुन `सिक्स्टी प्लस'ला कुणीही असं जगेल वगैरे भंपकपणा सुरु केला. ६) त्यामुळे मी गेली काही दशकं तसा जगतोयं हे (ऑलरेडी सांगितलेलं) पुन्हा सांगणं क्रमप्राप्त झालं ७) एखादा आयडी जर मी सुद्धा स्वतंत्र आहे, मला हवं तसं जगू शकतो, तुम्ही जगता त्या पॅटर्नमधे काही विषेश नाही वगैरे म्हणत असेल आणि वास्तविकात परिस्थिती नेमकी उलट असेल तर समजावून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. ८) आता तुम्हाला खरंच उद्देश वगैरे समजू शकत असेल तर पूर्वग्रहाचा चष्मा काढा आणि हे पुन्हा वाचा, (कारण ते आधी लिहून सुद्धा न वाचल्यामुळे, तुम्हाला क्रेडीट कार्डच्या धाग्यापासून आजपावेतो, सॉलीडच त्रास होतोयं ) आपण प्राथमिक आणि पैसा दुय्यम आहे. श्वास चालू असणं हे पैश्यापेक्षा जास्त अनमोल आहे. जे काय प्लानींग (नोबेल विजेते डॅनियल वगैरें ची उदाहरणं देऊन) इथे लिहीलं जातंय ते भविष्यकालीन स्वातंत्र्य आहे आणि पुढचा श्वास आत येईलच याची काहीही ग्वाही नाही. त्यामुळे अशा स्वातंत्र्याला छदाम अर्थ नाही. ती केवळ स्वप्नांची वाट आहे. ज्याला सर्वांगिण स्वातंत्र्य हवंय त्याला आताच तसं जगायला सुरुवात करायला हवी, भले त्याची सांपत्तिक स्थिती काहीही असो. आणि हे पैशाचं नाही तर साहसाचं काम आहे. तुमचा चष्मा काढा म्हणजे दिसेल की मी श्रीमंत नाही फक्त साहसी आहे आणि साहस फक्त एकदाच करायला लागतं हे सांगतोयं. तुम्हाला फक्त माझ्या भाषेतली वावगी वाक्यं दिसतायंत. पण मी सामन्यांच्या बाजूनं आहे हे समजल्यावर, स्वतःच्या गैरसमाजाची हद्द बघून नक्की चक्कर येईल !

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही उगाच त्रास देताय तो सोडून बाकी काहीच नाही उगाच प्रत्येक धाग्यावर येऊन स्वतःची टिमकी वाजवत बसता. चर्चा जगण्यातल्या सर्वांगिण स्वातंत्र्याची आहे हे तुमच्या पहिल्यांदा लक्षात येतंय का ते पाहा. या धाग्याचा विषय पैसे कसे वाचवावे, इन्व्हेस्टमेंट कश्या कराव्या हा आहे, हे तुमच्या लक्षात येतंय का? सर्वांगिण स्वातंत्र्याची चर्चा करण्यासाठी तुम्ही धागा काढा, तिथे करू. मी सांगतोयं ते स्टेप-बाय-स्टेप नाही. आज आणि आत्ता आचरणात आणायचंय. आत्तापर्यंत सगळ्यांनी किमान १०० वेळा तरी सांगितलं असेल की आम्ही सगळे आनंदाने जगतोय. आपलं जीवन हे पैश्यापेक्षा मोठं नक्कीच आहे, यात तुम्ही काय वेगळं सांगताय? पण पैसाही अगदीच गौण आहे असे नाही. आमच्याकडे घर घेण्यासाठी एकरकमी पैसे (आहे नाही ते सगळं liquidate करूनही) नाहीत मग घर कसं घ्यायचं? यावर तुमचं उत्तर आहे की घर घेऊच नका. आमच्यावर कर्ज असूनही आम्ही १२ महिने २४ तास कर्जफेडीची चिंता करत नाही हे सांगूनही तुम्हाला पटत नाही. नोकरी असल्याने ठराविक वेळेत काम करणे बंधनकारक आहे हे तुम्ही मान्य करत नाही. तुम्ही फक्त आठवडाभर रजा घेऊन नक्की काय करुन पाहा, ते पण वर सांगितलंय पण तुमची हिम्मत नाही (हे तुम्हीच कबूल केलंय !) मी आधीच सांगितलंय रजा घेऊन मी मला पाहिजे तसाच वागतो. आठवडाभरच काय मागच्याच वर्षी महिनाभर रजा घेऊन मनाला येईल/ जो मूड असेल तसाच वागत होतो. तुम्ही वर्किंग डेला करून दाखवा म्हणालात, त्यावर मी म्हणलं की ते शक्य नाही याचं कारण म्हणजे माझ्यावर अवलंबून असलेल्या टीम्स आणि स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या आहे. पण वर्किंग डेला सुध्दा आज काम करणार नाही असं सांगण्याचं स्वातंत्र्य मला आहे. मी, उदय आणि ट्रेमा यांना दिनक्रमाविषयी विचारलं होतं. ते दोघंही, दिनक्रम सोडून बाकीचंच ठोकतायेत काहीही बरळताय. तुमच्या प्रतिसादांमधला आणि दाव्यांमधला फोलपणा दाखवून दिल्यावर डोक्यात वात शिरलेला दिसतोय. माझा कालचाच प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही. तुमच्या सोयीसाठी परत लिहितो. सकाळी उठलो आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो. पण काम करू नये अशी इच्छा झाली, म्हणून मी आज काम करणार नाही असं सांगून टाकलं. मग मी आणि बायकोने ३/४ तास झोप काढली. बाहेरून जेवायला आणूया यावर आम्हा दोघांचे एकमत झाले, म्हणून बाहेरून जेवण आणलं आणि गप्पा मारत जेवलो. थोडा वेळ टीव्ही बघितला, मिपावर टीपी केला. नंतर मुलीला आणायला गेलो, थोडा वेळ तिच्याशी खेळलो. मग एका मित्राबरोबर लॉन्ग वॉकला गेलो. येऊन जेवलो आणि गप्पा मारून थोड्यावेळाने झोपलो. यात कुठेही मला आपल्याकडे किती पैसे आहेत, किती कर्ज आहे, पुढे आपलं कसं होणार हा विचार मनाला शिवला नाही. आता हे मला पाहिजे तसं मी जगलो. याचा उगाच मी डंका पिटला नाही आणि पिटायची गरजही नाही. तुम्ही मागेच लागलात म्हणून सांगितलं. एखादा आयडी जर मी सुद्धा स्वतंत्र आहे, मला हवं तसं जगू शकतो, तुम्ही जगता त्या पॅटर्नमधे काही विषेश नाही वगैरे म्हणत असेल आणि वास्तविकात परिस्थिती नेमकी उलट असेल तर समजावून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. परिस्थिती नेमकी उलट असेल अशी समजूत तुम्ही करून घेतली आहे. कारण तुम्ही सोडून इतर कोणी स्वच्छंदी जगूच शकत नाही असा दुराग्रह तुम्ही करून घेतला आहे. तुमचा चष्मा काढा म्हणजे दिसेल की मी श्रीमंत नाही फक्त साहसी आहे तुम्ही फारच विनोदी आहात अशी मला दाट शंका आहे. १९९२ साली ३.५ लाख एकरकमी असणारा माणूस मी श्रीमंत नाही म्हणतोय! वर दुसऱ्याच्या जिवावर, भले आईवडील का असेना, त्यांची सगळी पुंजी वापरून घर घेतलं आणि स्वतःला साहसी म्हणवत आहेत!! हा अजूनच मोठा विनोद. आता फक्त नशीब समजा की त्यात रोजच्या दिनक्रमातले भोजनोत्सव, स्नानोत्सव, संगीत, लेखन, इतर वेगवेगवेगळ्या आयामांचं एक्स्प्लोरेशन (उदा, मी सध्या शास्त्रीय संगीत शिकतोयं !), आठवड्याला होणारे बहुरंगी कार्यक्रम (उदा. परवा सचीन जांभेकर आणि मोहन भंडारी (काराओके सॉफ्टवेअरचे निर्माते) यांच्या समोर स्टेज परफॉर्मन्सची संधी मिळाली आणि कहर म्हणजे गाण्याला वन्समोअर मिळाला!), नव्या रेस्टॉरंटसच एक्सप्लोरेशन (उदा. माझ्या मुलानं नुकतंच डेक्कन एटचं इंटिरिअर केलंय, त्याला दिलेली भेट), मागच्याच आठवड्यात अँबी वॅली सिटीला केलेली बहारदार ट्रीप... बरीच मोठी यादी आहे. पण वाचून कदाचित फीट येईल म्हणून थांबतो. यात एवढं विशेष काय आहे? मी दोन वर्षांपूर्वी पोहायला शिकलो. लहानपणी संधी मिळाली नाही त्यामुळे राहून गेलं होतं. माझी ६ वर्षांची मुलगी आणि मी एकदमच माझ्या पत्नीकडून शिकलो. लहानपणापासून स्टार गेझिंगचं आकर्षण आहे, आता स्वतःचा टेलिस्कोप आहे. इथल्या ऍस्ट्रॉनॉमी क्लब बरोबर ग्रहतारे बघायला जातो. सो, लेटस कम टू अ सिंपल टेस्ट . मला माझ्या कुटुंबाबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर फिरायला जायचा छंद आहे. फार आधीचं सांगत नाही पण मागच्या वर्षी नायगारा ट्रिपमध्ये $२०० प्रतिदिन देऊन हॉर्सशू फॉलच्या अगदी समोर २६व्या मजल्यावर executive suite घेऊन राहिलो होतो. वर्षातून २-३ वेळा आम्ही मित्रमंडळी कुटुंबासहित एखाद्या तळ्याकाठी, डोंगरावर वा बीचवर एक मोठं घर २-३ दिवसांसाठी भाड्याने घेतो. तिथे विविध खेळ, खाणे पिणे, बार्बेक्यू व जवळच्या ठिकाणी फिरतो. याशिवाय दर आठवड्याला आम्ही भेटतोच. मी माझ्या कुटुंबाला घेऊन वेगळं फिरायला जातो. मला आणि माझ्या कुटुंबातील सगळ्यांनाच वेगवेगळी Cuisines try करायला आवडतात. जे आम्ही नेहमीच, म्हणजे आठवड्यातून २-४ वेळा तरी करतोच. ती cuisines घरी पण बनवून बघतो. तसेच गाण्यांच्या कार्यक्रमाला जातो, मूव्हीज, मराठी नाटके यांना जातो. मला गाड्यांचा शौक आहे, त्यामुळे विविध गाड्या मी चालवलेल्या आहेत. वर म्हणल्याप्रमाणे आम्ही रोड ट्रिपला जातो तेव्हा आरामदायीप्रवास व्हावा म्हणून फुल्ली लोडेड होंडा ओडिसी माझ्याकडे आहे. त्यात मुलींना मूव्हीज बघण्यासाठी स्प्लिट स्क्रीन आहे, म्हणजे दोघी एकाच वेळेला वेगवेगळा चित्रपट बघू शकतात आणि त्याच वेळी मी व पत्नी पुढे आमची आवडीची गाणी ऐकू शकतो. एकूण ८ लोक आरामात बसू शकतील एवढी जागा आहे ज्यात आम्ही ४ जणं जातो. येत्या ३-४ महिन्यात बरंच फिरणार आहे, जाऊन आलो की सांगतो. So, we also live a good life, but we just don’t brag about it. माझं काम म्हणजे इतरांच्या चुका काढणं आहे जे मी अगदी लहान असल्यापासून आवडीने करत आलो आहे. त्यात भर म्हणजे मला इतरांना फुकाचे सल्ले द्यायला पण आवडतं आणि सल्ले देणं हा सुध्दा माझ्या कामाचा भाग आहे. स्वतःची लाल करणाऱ्यांवर चढायला पण मला खूप आवडतं, जे मी तुम्हाला दिलेले प्रतिसाद वाचून कळलंच असेल. असो. तुम्हाला आधीच "ग"ची बाधा झालीये आणि त्यात प्रतिप्रश्न आल्याने तुम्ही भंजाळलेले दिसताय. त्यामुळे मग फेफरं येईल, फेस येईल वगैरे चालू आहे. तेव्हा तुम्ही तुमचे दळण वगैरे आनंदोत्सव करा मी माझे आनंदोत्सव करतो, काय म्हणता? आणि हो, मी माझा पहिला फ्लॅट कर्ज काढूनच घेतला होता. वरील सर्व करत असतानाच ते कर्ज पूर्णपणे फेडून टाकले. दुसरा फ्लॅट तयार होतोय, झाला की त्याचे पण कर्ज फेडून टाकणार आहे. आपल्यात फरक म्हणजे मी कृतज्ञ आहे कारण मी शून्यापासून (खरंतर मायनसमधून) सुरुवात केलीये. असं म्हणतात की वैश्विक शक्ती तुम्हाला मदत करत असते. तेव्हा जे मी करू शकलो, जे मला मिळालं यासाठी त्या शक्तीप्रती मी कृतज्ञ आहे. तुम्ही मात्र सगळं मी केलं, मी करतोय हे करत बसला आहात आणि इतरांना क्षुद्र ठरवत आहात.

In reply to by ट्रेड मार्क

१ ) मागच्या वर्षी नायगारा ट्रिपमध्ये..... २) वर्षातून २-३ वेळा आम्ही मित्रमंडळी कुटुंबासहित ..... ३)मला आणि माझ्या कुटुंबातील सगळ्यांनाच... आठवड्यातून २-४ वेळा तरी करतोच ४)मला गाड्यांचा शौक आहे, त्यामुळे विविध गाड्या मी चालवलेल्या आहेत. ... ५) येत्या ३-४ महिन्यात बरंच फिरणार आहे, जाऊन आलो की सांगतो. असोच, आता पितळ उघडं पडलं! हे असले कार्यक्रम सगळेच करतात त्यात काही विषेश नाही. गोरगरीब सुद्धा सुट्टीच्या दिवशी, स्वतःच्या एपतीप्रमाणे, असं काही तरी करतातच. तुमची ट्यूबलाईट अजूनही पेटत नाही. हा तुमचा दिनक्रम नाही. २) स्वतःची लाल करणाऱ्यांवर चढायला पण मला खूप आवडतं, जे मी तुम्हाला दिलेले प्रतिसाद वाचून कळलंच असेल. या वाक्यामुळे तुमचा आयडी जाऊ शकेल ! अशी भाषा दोनच गोष्टी दर्शवते ; एक उद्विग्नता आणि दोन अपब्रींगींग ! इतक्या खालच्या लेवलला मला उतरता येत नाही. सो लेट मी कन्क्लूड, १) विकेंडस आणि रजा यामधे जमेल तेवढी मजा करणं यात काहीही विषेश नाही. गोरगरीब सुद्धा स्वतःच्या एपतीप्रमाणे ते करतातच. २) आर्थिक स्वातंत्र्य जर सर्वांगिण स्वातंत्र्य देऊ शकले नाही तर व्यर्थ आहे. सर्वांगिण स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक दिवस आणि संपूर्ण आयुष्य मनसोक्त जगण्याचं स्वातंत्र्य. ते लेखात अपेक्षित असलेलं आणि तुम्ही मिळवलेलं लिमीटेड स्वातंत्र्य नाही. ३) खरं तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक विवंचनेपासून स्वातंत्र्य. ज्याची नजर अजूनही पैश्यावरच आहे आणि ज्याच्या दिवसाचा प्राइम टाईम अर्थार्जनासाठीच जातो, तो अजूनही आर्थिक गुलामीतच आहे. ४) ज्याच्या दृष्टीनं स्वेच्छा प्रथमआणि पैसा दुय्यम (नीट वाचा, दुय्यम. निरुपयोगी नाही), तो खरा आर्थिक दृष्टीनं स्वतंत्र. थोडक्यात, सर्वांगिण स्वातंत्र्य म्हणजे खुला आणि मुक्त दिनक्रम. मी मागे म्हटल्याप्रमाणे अशा व्यक्तीची प्रत्येक रात्र सॅटरडे नाइट आणि प्रत्येक दिवस संडे असतो. अशी व्यक्ती प्रत्येक दिवस इहलोकी सहलीला आल्यासारखा जगते ! ५) असं सर्वांगिण स्वातंत्र्य मिळवायला कमालीची आकलन क्षमता हवी. ज्या आयुष्यात पुढच्या श्वासाचा भरवसा नाही तिथे भविष्यकालीन स्वातंत्र्याची अपेक्षा मूढता आहे. आणि जिथे साहस नाही तिथे पैसा केवळ मानसिक दिलासा आहे. जे स्वातंत्र्य पैश्याच्या आधारावर मिळवलेलं आहे ते कुचकामी आहे कारण ज्याचा आधार घेतला आहे तो पैसा वापरतांना, आधार सुटण्याची भीती कायम आहे. थोडक्यात, जी गोष्ट वापरायची तीच जीवनाचा आधार म्हणून घेण्याचा तो वेडेपणा आहे. आणि जी गोष्ट जीवनाचा खरा आधार आहे, तो श्वास, ज्या वर्तमानाचा उत्सव करायला सांगतो आहे, त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मूर्खपणा आहे. जी गोष्ट क्षणोक्षणी संपते आहे आणि जिच्यावर सर्वस्व अवलंबून आहे तीचा अव्हेर करुन, निर्जीव वस्तूला जीवनाचा आधार मानण्याची ती मूढता आहे. अशा स्वप्नांच्या वाटेवर चालणारे कधीही मुक्त आणि स्वच्छंद होऊ शकणार नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

साहेब, तुमची केस हाताबाहेर गेली आहे. माझ्यासारखे जगून दाखवा असे आव्हान तुम्हीच दिले होते ना मी त्या संदर्भात विचारले होते. मला काही त्रास नाही तुमच चालू राहू दे. मिळमिळीत, महत्वाकांक्षा विरहीत जीवनासाठी शुभेच्छा. एखादा माणूस भरभरुन जगतो एखादा मरत नाही म्हणून जगतो. इत्यलम.

In reply to by अप्पा जोगळेकर

माझ्यासारखे जगून दाखवा असे आव्हान तुम्हीच दिले होते ना मी त्या संदर्भात विचारले होते. तुम्ही पुन्हा न वाचताच ठोकाठोकी चालू केली. परत नीट वाचा : ७) एखादा आयडी जर मी सुद्धा स्वतंत्र आहे, मला हवं तसं जगू शकतो, तुम्ही जगता त्या पॅटर्नमधे काही विषेश नाही वगैरे म्हणत असेल आणि वास्तविकात परिस्थिती नेमकी उलट असेल तर समजावून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आता तुम्ही म्हणतायं : मिळमिळीत, महत्वाकांक्षा विरहीत जीवनासाठी शुभेच्छा. एखादा माणूस भरभरुन जगतो एखादा मरत नाही म्हणून जगतो. आता खरंच हिंमत असेल तर तुमच्या रसभरीत आणि दुर्दम्य महत्वाकांक्षी जीवनाचा सारीपाट इथे उलगडा ! तुमच्याकडे तसं काहीही नाही हे प्रतिसादातली उद्विग्नताच दर्शवते तरीही एक ट्राय मारुन पाहा. ट्रेमा, उदय, म्हसोबा आणि तुमच्या परिस्थितीत, अत्याधिक जळजळ, या एकाच लक्षणाचा फरक आहे, हे तुम्ही स्वतःच दाखवून द्याल !

तरी आर्थिक स्वावलंबन म्हणजे आपली व्यावसायिक कौशल्ये सतत विकसित करत राहणे, तंदुरुस्त राहणे आणि मरेपर्यंत काम करत राहणे असावे असे व्यक्तिशः वाटते. त्या हिशोबाने रिटायरमेंट हा कन्सेप्ट पटत नाही. आणि ते वायफळ खर्च कमी करणे वगैरे पटले नाही. भविष्यात उपयोग व्हावा म्हणून थोडीफार बचत प्रत्येक जण करतोच. म्हणजे जर वायफळ असेल तर एरवीसुद्धा तो केला जात नाहीच.

In reply to by अप्पा जोगळेकर

अर्थात, तरी आर्थिक स्वावलंबन म्हणजे आपली व्यावसायिक कौशल्ये सतत विकसित करत राहणे, तंदुरुस्त राहणे आणि मरेपर्यंत काम करत राहणे असावे असे व्यक्तिशः वाटते. याच्याशी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असण्याचा काहीएक संबंध नाही. सकाळी लवकर उठणं, योगा, प्राणायाम, फिरायला जाणं मोफत आहे. व्यावसायिक कौशल्ये सतत विकसित करत जाणं हे आर्थिक स्थितीशी फारसं संबधित नाही, ते वृत्तीशी संबधित आहे. त्या हिशोबाने रिटायरमेंट हा कन्सेप्ट पटत नाही. काम हा छंद केल्यावर तो रोजचा आनंद आहे, त्यामुळे त्याचाही आर्थिक स्वावलंबनाला मोठा हातभारच आहे. वायफळ असेल तर एरवीसुद्धा तो केला जात नाहीच येस, वेरी अ‍ॅप्ट. बट अ कॉमनसेंस ऑबजर्वेशन.

100 :D

In reply to by सानझरी

लोक असंबद्ध, अहंकारी प्रतिसाद वाचून त्यावरचा विशेष उतारा म्हणून पुन्हा एकदा हा मुद्देसूद लेख वाचतील हे अजून एक यश..

In reply to by पिशी अबोली

ज्यांना खरा हेतू कळेल ते पैश्याचं मनावर सतत असलेलं ओझं झुगारुन स्वप्नांच्या वाटेवर वगैरे न चालता वास्तविकात मुक्तपणे जगायला लागतील.

संक्षींच्या प्रतिसादांचा अर्थ लक्षात न घेता अनेकजण त्यांच्यावर तोंडसुख घेत आहेत असे दिसते. अमुकतमुक पैसा मिळाला म्हणजे आपण स्वतंत्र ही विचारसरणी चुकीची वाटते. 'अमुकतमुक पैसा' हे कायमच मूविंग टारगेट राहते. माझ्या बऱ्यापैकी ओळखीतल्या एकाने त्याची कंपनी $३५ मिलियनला विकली. आता पुढे थोडंफार काम करुन पुरेसे पैसे (!) मिळाल्यावर रिटायर होता येईल असा त्याचा प्लॅन असल्याचे कळले. पुढे तो नव्या मालक कंपनीत सीओओ वगैरे पदावर जॉईन झाला. आणि मार्केट कसे डल आहे. जितका ठरला होता तितका बोनस मिळत नाही. रेवेन्यू टारगेट मिस होतात, त्यामुळे एकंदर रिटायरमेंटचा प्लॅन गंडलाय वगैरे रडकथा सांगत बसतो. अशी आणखी एकदोन उदाहरणे माहीत आहेत. त्यामुळे बँकबॅलन्सचा विशिष्ट आकडा पार केल्यावर स्वावलंबनाची आणि सुखाची गुरुकिल्ली सापडेल हे आता मला पटत नाही.

In reply to by आजानुकर्ण

धन्यवाद हो, कर्णजी ! पहिला सेंसिबल प्रतिसाद यायला तब्बल पाच वर्ष लागली ! किमान एका सदस्याला लेखनाचा हेतू कळला हे काय कमीये ? बाकीच्यांनाही यथावकाश तो पोहोचावा ही कामना !

In reply to by संजय क्षीरसागर

+१०००० अजानुकर्ण! सॉल्लिड उदाहरण दिले आहे. बाकी, वक्त एक बहती गंगा है, मौजमें बस बहते चलो... आपआपली टार्गेट्स अचिव्ह करायला समद्यांस्नी शुभेच्छा!

In reply to by आजानुकर्ण

एवढे असूनही जर तो पैश्यांच्या मागे असेल तर तो मूर्खपणा आहे. पण कदाचित असंही असू शकेल की अधिक पैसे मिळवणे हे उद्दिष्ट नसून काही कामधंदा न करता तो वैतागला असेल आणि काहीतरी करायचं म्हणून त्याने नोकरी स्वीकारली. एकदा त्यात पडल्यावर अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी अपरिहार्य आहेत. नोकरी करण्यापेक्षा परत एक स्टार्ट-अपचा पर्याय त्याने स्वीकारायला पाहिजे होता/ आहे. यात तो स्वतःच्या स्पीडने पाहिजे तेव्हा काम करू शकला असता. 'अमुकतमुक पैसा' हे कायमच मूविंग टारगेट राहते. हे बरोबर आहे. म्हणून ऊर फुटेस्तोवर पैश्याच्या मागे लागू नये. पण म्हणून पैसे वाचवूच नयेत, साठवूच नयेत हा दृष्टिकोन बरोबर आहे का? पैसे मिळवण्याचा वेळ आणि आयुष्यातले आनंद घेण्याचा वेळ यांच्यात समतोल असावा. प्रस्तुत लेखात लेखिका हेच सांगायचा प्रयत्न करत असावी. आपल्या आनंदात कमतरता न आणता अनावश्यक खर्च कमी करून ते पैसे गुंतवले तर काय चूक आहे? थोडक्यात फिक्स टारगेट न ठेवता आपल्या आवडीनिवडी व छंद जोपासून पण अनावश्यक खर्चात काटछाट करून जे साठेल ते साठेल. त्याची गुंतवणूक करायची का नाही, कशी व कुठे करायची ज्याचं त्याचं ती व्यक्ती ठरवेल. इथे फक्त लेखिकेने तो विषय आणि ते काय करतात याची माहिती सादर केली. माझे लेख, ज्यावर संक्षींनी टिपण्णी केली आहे, वाचलेत तर नेहमीच्या वापरातल्या गोष्टींमधून मी कसा फायदा मिळवला अथवा थोडे प्रश्न विचारून समोर आलेल्या अडचणीतून कसा मार्ग सापडला हे सांगितलं आहे. यात कुठलेही जीवनाविषयक तत्वज्ञान आम्ही सांगत नाहीये. बरं हेच आणि असंच सगळ्यांनी करावं असाही आग्रह नाहीये. पण प्रॉब्लेम कुठे येतो की या धाग्यांवर एक मिपाकर येऊन मी बघा कसं जगतो नाहीतर तुम्ही, तुमचं जिणं म्हणजे गळ्यातलं लोढणं असं सांगतो. विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं न देता दूषणं देत बसतो. एक साधा सरळ उपाय आहे, आपण ज्या विषयाला महत्वाचं मानत नाही त्या विषयांशी संबंधित धाग्यांवर न येणे. ही अर्थात सूचना आहे. किंवा तुम्ही जसे सांगितलेत की हे "मूविंग टारगेट" आहे हे ठीक. मग यावर चर्चा होऊ शकते. पण उद्या समजा तुम्ही कामाच्या ठिकाणी चालणाऱ्या राजकारणावर धागा लिहिलात आणि यावर येऊन मी तुम्हाला सांगत बसलो की कसली नोकरी आणि कसलं राजकारण, मारायची लाथ सगळ्यावर. नाहीतर तुमच्या जीवनाला अर्थ नाही. तुम्ही म्हणजे काय करायचं हे परत परत विचारूनसुद्धा मी जास्त स्पष्टीकरण न देता एकच पालुपद चालू ठेवलं तर तुम्ही काय कराल? हे एकापेक्षा अधिक धाग्यांवर झालं तर तुम्ही काय कराल? डांगेंजी: आपआपली टार्गेट्स अचिव्ह करायला समद्यांस्नी शुभेच्छा! हेच तर मान्य नाहीये ना. सगळ्यांचं टारगेट एकच पाहिजे वेळकाळाचं बंधन नसलेलं आणि टार्गेट नसलेलं स्वच्छंदी जीवन. असो. आधीच वेळ फुकट घालवून दोष आणि अपमान पदरी पडलेला आहेच. त्यामुळे रजा घेतलेली बरी.

संक्षींच्या सांगण्यातला अर्थ लक्षात घेतला जात नाहीये. "पैसा तुमच्यासाठी आहे, तुम्ही पैशासाठी नाही". इतका त्यांच्या सांगण्याचा एका वाक्यात अर्थ आहे. मूविंग टार्गेट्स ठेवून आपण त्यातून मुक्त होऊ असे भासत राहणे हे बदलू शकले तरच खर्‍या अर्थाने स्वतंत्र होता आले. तसे नसेल तर तुम्ही आनंदी नाही, मजा करत नाही, सतत पैशाचा विचार करता असा अर्थ नाहीये - फक्त तुम्हाला वाटते तितके तुम्ही स्वतंत्र नाही आहात इतकाच आहे. (त्यांच्या विरुद्ध वरती वापरली गेलेली अश्लाघ्य भाषा बरोबर नाही - निषेध नोंदवतो!) -चतुरंग

In reply to by चतुरंग

"पैसा तुमच्यासाठी आहे, तुम्ही पैशासाठी नाही" हे तत्वज्ञान कधीच मान्य केलंय. एवढं सगळ्यांनी सांगून झालं की अगदी १२ महिने २४ तास पैश्यांचा विचार कोणीच करत नाही. प्रत्येकाचे आयुष्य, ते जगायचा दृष्टिकोन, छंद, अडचणी हे वेगळंच असणार आहे. त्यात प्रत्येकाने संक्षींसारखंच जगावं हा अट्टाहास का? आणि जे वेगळं जगत असतील ते यःकश्चित हा दृष्टिकोन का? माझ्या क्रेडिट कार्डच्या धाग्यावर मी फक्त क्रेडिट कार्ड्स वापरून मी कसा फायदा करून घेतला हे सांगितलं. त्यात इतरांनी त्यांचे अनुभव सांगावे, अडचणी सांगाव्या आणि त्यातून सगळ्यांना फायदा होऊ शकेल हा उद्देश होता. त्यात सुद्धा संक्षी कर्ज घेणाऱ्या सगळ्यांचं आयुष्य निरर्थक आहे हे सांगत बसले. वर स्वतः क्रेडिट कार्ड्स वापरतात हे पण सांगितलं. पण कर्ज काढून घर घेऊ नये यावर क्रेडिट कार्डच्या धाग्यात वाद घालत होते. डाऊन पेमेंटचे पैसे नसताना पूर्ण किंमत देऊन घर कसं घ्यायचं याचं मार्गदर्शन मात्र करू शकले नाहीत. पूर्ण स्वच्छंदी जीवन जगायला कोणाला आवडणार नाही? पण ते कसं साध्य करायचं हे ते समजावून सांगत नाहीत. नुसतंच फक्त आताच्या क्षणात जगा, पुढचा विचार करू नका आणि कर्ज काढू नका हे सांगतात आणि हे जर तुम्ही करत नसाल तर तुमचं आयुष्य व्यर्थ आहे हे ठासून सांगतात. तुम्ही आधीच्या आणि या धाग्यांवरचे प्रतिसाद नीट वाचले असतील तर संक्षींनी सगळ्यांचे आयुष्य निरर्थक ठरवूनही माझ्यासकट सगळे सभ्य भाषेत विचारत होते. पण मग पुढे त्यांनीच फेफरं येईल, तोंडाला फेस येईल, पितळ उघडं पडेल अशी भाषा सुरु केली. एकतर पहिल्यापासून सगळ्यांना यःकश्चित प्राणी समजत आहेत आणि वर ही भाषा ३ वेळा तरी वापरली आहे. यावर एकदोघे सोडून कोणाला आक्षेप घ्यावा वाटला नाही. मी एकदा बोललो तर ते एवढं लागलं? मग त्यावर माझ्या अपब्रींगींग वर म्हणजेच माझ्या आईवडिलांवर गेले आणि वर म्हणतात की इतक्या खालच्या लेवलला ते जाऊ शकत नाहीत. मी यापूर्वीही त्यांचेच प्रतिसाद दाखवून ते कसे गोंधळलेले आहेत हे दाखवून दिलं आहे. तरीही आता त्यांनी दिलेल्या मुद्द्यांवर प्रतिवाद करायचा तर - विकेंडस आणि रजा यामधे जमेल तेवढी मजा करणं यात काहीही विषेश नाही. गोरगरीब सुद्धा स्वतःच्या एपतीप्रमाणे ते करतातच. बरोब्बर. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे मजा करतातच हे त्यांनी मान्य केलंय. त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपामुळे ते त्यांना जमेल तेव्हा काम करू शकतात. सगळ्यांना ती सवलत असेलच असं नाही. विशेषतः नोकरी करणारा सोमवार ते शुक्रवार या मध्ये सुट्टी/ रजा न घेता मन मानेल तसं वागू शकणार नाही हे सर्वमान्य सत्य आहे. त्यावर मला चॅलेंज देण्यात काय अर्थ आहे? तरीही, नोकरी करत असूनही, मी बऱ्यापैकी माझ्या टर्म्सवर काम करतोय हे मी दाखवून दिलं आहे. पण ते त्यांना मान्यच करायचं नाहीये. आर्थिक स्वातंत्र्य जर सर्वांगिण स्वातंत्र्य देऊ शकले नाही तर व्यर्थ आहे. हेच आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं ते स्टेप बाय स्टेप सांगा अशी सगळ्यांची विनंती होती आणि अजूनही आहे. यावर नुसतंच पैसे दुय्यम आहे, मनाला येईल तसं जगा, भविष्याचा विचार करू नका, पूर्ण पैसे असल्याशिवाय घर घेऊ नका या सांगण्याला काय अर्थ आहे? तुम्हाला हे स्वातंत्र्य कसं मिळवायचं हे कळलं तर कृपया मलाही सांगा. संक्षींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं कळण्याएवढी माझी आकलनशक्ती नाही. तुम्ही प्रयत्न करून बघा. समजलं तर माझ्या निरर्थक आयुष्याला जरा अर्थ येऊ शकेल. खरं तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक विवंचनेपासून स्वातंत्र्य. ज्याची नजर अजूनही पैश्यावरच आहे आणि ज्याच्या दिवसाचा प्राइम टाईम अर्थार्जनासाठीच जातो, तो अजूनही आर्थिक गुलामीतच आहे. दिवसाचा प्रत्येक क्षण आर्थिक विवंचना करावी एवढी वाईट परिस्थिती नाहीये. पण म्हणून मी कामधंदा सोडून बसावं का? नोकरीची जी वेळ ठरलेली आहे तीचं काय करणार? म्हणून तर त्यांना विचारत होतो की असा कुठला व्यवसाय आहे की जो प्रत्येकाला त्याच्या मर्जीने करता येईल पण पैश्याची चिंता मात्र नसेल. सर्वांगिण स्वातंत्र्य म्हणजे खुला आणि मुक्त दिनक्रम. मी मागे म्हटल्याप्रमाणे अशा व्यक्तीची प्रत्येक रात्र सॅटरडे नाइट आणि प्रत्येक दिवस संडे असतो नोकरी करत असताना किंवा नोकरी न करता माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आजच्या सगळ्या गरजा भागवल्या जातील आणि आम्ही सगळे रोज मनाला येईल तसे उत्सव साजरे करत कसे जगू शकतो याचे मार्गदर्शन करावे हीच तर पहिल्यापासूनची मागणी आहे. जी गोष्ट क्षणोक्षणी संपते आहे आणि जिच्यावर सर्वस्व अवलंबून आहे तीचा अव्हेर करुन, निर्जीव वस्तूला जीवनाचा आधार मानण्याची ती मूढता आहे. कुठे काय अव्हेरलं? जे मला आवडतं ते मी करतोय हेच मी कधीपासून सांगतोय. तुम्हाला आवडतं ते आणि तुम्ही करता तेच मी करावं हा आग्रह का? तुम्हाला कराओकेवर गायला आवडतं, मला नाही आवडत. मला ऐकायला आवडतं. मला पुस्तकं वाचायला, निसर्गसौन्दर्य; ग्रहतारे; पक्षी; नवनवीन ठिकाणं बघायला, विविध खाद्यपदार्थ खायला आवडतं. मला जमेल तसं, जमेल तेव्हा मी हे करत असतो. म्हणून माझी आवड हीन दर्जाची आहे? मी चांगलं आयुष्य जगतच नाहीये? एक उदाहरण घेऊन बघू, कदाचित समजायला सोपं पडेल. समजा एखाद्याकडे एक महिना पुरेल एवढे पैसे आहेत. संक्षींचा सल्ला मानून त्याने मन मानेल तसं वागायला सुरुवात केली. परिणामी त्याची नोकरी गेली. तरीही त्याने आपलं व्रत सोडलं नाही. महिन्याने त्याची बायको म्हणाली आज संध्याकाळी खायला काही नाही, तर मग याने काय सांगायचं की आत्ताचं बघ संध्याकाळची चिंता कशाला करतेस? भाड्याचं घर आहे पण भाडं भरलं नाही म्हणून घरमालकाने घर सोडायला सांगितलं आहे. या उदाहरणात त्याने आणि त्याच्या कुटुंबाने कसं वागावं याचं मार्गदर्शन संक्षी किंवा ते जे सांगतात ते पटलेल्या/ समजलेल्या कोणीही करावे. का मला एक माणूस, ओळख पाळख नसताना, तुझं आयुष्य व्यर्थ आहे हे परत परत सांगतोय? बरं मग कसं करायचं काय करायचं हे विचारल्यावर समाधानकारक उत्तर मात्र देत नाही. पैसे व्यर्थ आहे असा उपदेश करणारे बरेच बाबा/ बुवा हे सांगण्याचे मोजून पैसे घेताना बघितलेलं आहे. इथे जरा वेगळं काही ऐकायला मिळेल असं वाटलं पण पैसे गेलेले परवडले असं वाटेल, असा दोष आणि अपमान मात्र पदरी पडला.

In reply to by चतुरंग

त्यांच्या विरुद्ध वरती वापरली गेलेली अश्लाघ्य भाषा बरोबर नाही - निषेध नोंदवतो!
संक्षी यांनी केलेला पर्सनल अ‍ॅटॅक तुम्ही लक्षात घेतलेला दिसत नाही. त्यांची भाषा कशी आहे, ते पण बघा. तुम्ही १ वार केला की कधीतरी उलट वार येतोच. पेराल तसे उगवते.

In reply to by उदय

बरोबर नाहीये - फेफरं येणे, फेस येणे आणि इतर पर्सनल अ‍ॅटॅक करायला नको होता याबाबत सहमत आहेच. असो. मला इथे कोणाचीही बाजू घ्यायची नाहीये. - (लेखनसीमा) रंगा

एक उदाहरण घेऊन बघू, कदाचित समजायला सोपं पडेल. समजा एखाद्याकडे एक महिना पुरेल एवढे पैसे आहेत. संक्षींचा सल्ला मानून त्याने मन मानेल तसं वागायला सुरुवात केली. परिणामी त्याची नोकरी गेली. तरीही त्याने आपलं व्रत सोडलं नाही. महिन्याने त्याची बायको म्हणाली आज संध्याकाळी खायला काही नाही, तर मग याने काय सांगायचं की आत्ताचं बघ संध्याकाळची चिंता कशाला करतेस? भाड्याचं घर आहे पण भाडं भरलं नाही म्हणून घरमालकाने घर सोडायला सांगितलं आहे. या उदाहरणात त्याने आणि त्याच्या कुटुंबाने कसं वागावं याचं मार्गदर्शन संक्षी किंवा ते जे सांगतात ते पटलेल्या/ समजलेल्या कोणीही करावे. >> संक्षी असं काही म्हणत आहेत हा चुकीचा अर्थ काढला जातोय. एकंदर कुणाही एखाद्या मनुष्याकडे पैसे कसे येतात? तर दुसर्‍याला तो काहीतरी मूल्य असलेलं देतो. पैशाची संकल्पना आहे की दुसर्‍याला उपयोगी पडेल असं स्वतःकडे काही मौल्यवान असणे. ती म्हणजे वेळ, कौशल्य, शारिरिक क्षमता, वस्तु, सेवा. ह्याच्या बदल्यात विनिमयाचं साधन म्हणून ह्या सेवा-वस्तु घेणारा चलन (पैसा) देतो. तर हा पैसा म्हणजे विनिमयाचं साधन आहे. म्हणजेच पैसा हे केवळ साधन आहे, (साध्य आपण स्वतः आहोत. आपण आहोत तर पैसा आहेच). इट्स जस्ट अ टूल. एखाद्याकडे पैसा मिळवण्याचे काहीही पर्याय असू शकतात. तुमच्या-माझ्याकडे बुद्धि-कौशल्य-कला वगैरे आहे, चोरदरवडेखोराकडे चाकू-बंदूक आणि बेडरपणा असतो. त्यामुळे पैसा मिळवणे हे काही फार कठीण काम नाही. ते कठिण होते जेव्हा त्याच्याकडे एक जबाबदारी म्हणून बघितले जायला लागले तर.. पैसे कमावणे कठीण आहे हे सतत आपल्या मध्यमवर्गीय कुटूंबांमध्ये बिंबवले जाते, आपले आई-वडील पैसे कमवायला कीती कष्ट पडतात हे पिढ्यांपिढ्या आपल्याला सुनवत असतात. हां, ते एक वेगळं की कठीण-सोप्या परिस्थिती येतात आयुष्यात, पण त्याचा आणि पैसा कमावण्याच्या क्षमतेचा किंवा पैसे भरपूर गाठीला असण्याचा संबंध नसतो. एकूणच पैसा गाठीला असणे, नसण्याने मनुष्य म्हणून आपल्या जगण्याच्या स्वच्छंदतेवर परिणाम होऊ नये असा संक्षि अर्थ सांगत आहेत. आता तुमचे उदाहरण घेऊया. तुमचे उदाहरण हे पैसे नसतील तर सर्व संपले अशा अर्थाचे आहे. हे पैशाला शरण जाणे आहे. मुद्दा काय आहे? घरी खायला प्यायला नाही हा. घरी धान्य आणायचे तर काही हालचाल केली गेली पाहिजे. धान्य आणायचे तर पैसा लागेल, पैशासाठी काम करायला पाहिजे, काम म्हणजे जे दुसर्‍याला उपयोगी पडेल असे. त्यातून पैसा उपलब्ध होईल आणि त्यातून धनधान्य घरी येईल. ओक्के? हा रस्ता सर्वसामान्यपणे मान्य असतो. आता यात मनमानेल तसे वागणे म्हणजे चोवीस तास झोपून राहणे, चोवीस तास टीवी बघणे, असे नसते. ह्याला आळशीपणा म्हणतात. स्वच्छंदीपणा नव्हे. मनमानेल तसे ह्याचा अर्थ काम न करता टाइमपास करत फिरणे असा नाहीये. मन मानेल तसे म्हणजे मला हवे तितके पैसे मिळवायला मला किती काम कुणाचे करुन द्यायला लागेल तेवढे प्रयत्न करणे, आणि ते करत असतांना मनावर जबाबदारीचे कोणतेही दडपण नसणे. करत असलेले काम आवडीने करणे, रस घेऊन करणे, क्षण आणि क्षण आनंदात जगणे. हा संक्षि सांगत असलेला अर्थ तुमच्या उदाहरणाशी म्याच करत नाही. तुमचे उदाहरण आळशीपणाचे आहे, स्वच्छंदीपणाचे नाही, त्यामुळे संक्षिंच्या जगात याचे उत्तर मिळणार नाही. एक मला समजलेलं ते सांगतो. संक्षि जे म्हणत आहेत तो नदीचा किनारा आणि तुम्ही तिघे-चौघे जे म्हणत आहात तो नदीचा दुसरा किनारा. कर्मधर्मसंयोगाने मला दोन्ही किनार्‍यांची थोडाफार अनुभव आहे म्हणून आधीही तुमच्या धाग्यात म्हटले आहे की संक्षींचे म्हणणे तुम्हाला समजणार नाही, त्यांची भाषाच वेगळी आहे. संक्षिही अट्टाहासाने पटवल्याशिवाय सोडणारच नाही हा बाणा घेऊन बसलेत. त्यामुळे मूळ संकल्पनेवर चर्चा होण्यापेक्षा भाषाशैली आणि आयडींची व्यक्तिगत घमासान ह्यातच चर्चा भरकटत आहे असे वाटते.

In reply to by संदीप डांगे

मी तेच सांगतोय ना की मी एक काम स्वीकारलं आहे. ज्यात मला ज्याच्याबरोबर काम करायचं आहे ती माणसं सोमवार ते शुक्रवार रोज ८ ते ५ या वेळात उपलब्ध असणार आहेत. मी सुद्धा या वेळेत उपलब्ध असावं अशी अपेक्षा आहे. मग ओझं म्हणून नव्हे तर त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी ही वेळ पाळणे बंधनकारक ठरते. पैसे मिळवणं या पेक्षा मी दिलेली कमिटमेंट पाळणं महत्वाचं आहे ना? प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या भाषेत टाइम अँड मटेरियल आणि फिक्स बिड असे प्रकार असतात. टाइम अँड मटेरियल मध्ये वरील उदाहरण बसू शकतं. आता फिक्स बिड प्रकारात समोरची व्यक्ती म्हणते एक काम आहे जे X दिवसात पूर्ण करायचं. मी ते स्वीकारतो, यात जर मी कोणावर अवलंबून नसेन तर मग मला दिवसातल्या ठराविक वेळीच काम केलं पाहिजे हे बंधन नसणार, मी X दिवसात काम पूर्ण करण्याशी मतलब असेल. संक्षी स्वतःचा व्यवसाय एकट्याने करतात, त्यामुळे मनाला येईल तेव्हा काम करणे त्यांना शक्य आहे. पण नोकरी करणाऱ्याला तू माझ्यासारखं करून दाखव नाहीतर तुझ्या जीवनाला अर्थ नाही हे सांगण्यात काय हशील आहे? मन मानेल तसे म्हणजे मला हवे तितके पैसे मिळवायला मला किती काम कुणाचे करुन द्यायला लागेल तेवढे प्रयत्न करणे, आणि ते करत असतांना मनावर जबाबदारीचे कोणतेही दडपण नसणे. करत असलेले काम आवडीने करणे, रस घेऊन करणे, क्षण आणि क्षण आनंदात जगणे. बरोबर. मी तेच तर करतोय हे मी उदाहरणाने सांगितलं आहे. मला वाटेल तेव्हा मी सुट्टी घेतो, ऑफिसच्या वेळेत बायकोबरोबर लंचला सुद्धा जातो. पण मला ती सोय आहे म्हणून सगळ्यांनाच असेल असं नाही. किंबहुना माझ्याच बरोबर काम करणाऱ्यांनासुद्धा असेल असं नाही. मलाही कायम उपलब्ध असेल असंही नाही. फरक व्यवसायाच्या फॉरमॅटमध्ये आहे. मी एखाद्या डॉक्टरला डिवचलं की काय तुझं आयुष्य कॉल आला की जायला लागतं, तर तो माझी कीव करेल. इथले CPA फेब्रुवारी ते जून मरेस्तोवर काम करतात मग उर्वरित महिने निवांत असतात. त्यातल्या एखाद्याला मी म्हणलं दर महिन्याला एक बाहेरची ट्रिप आणि आठवड्याला एक पार्टी करू (उदाहरण चुकलं का?) तर या ५ महिन्यांच्या काळात येईल का? हां, व्यवसाय सेम असल्याने संक्षी याच्याशी तुलना करू शकतात. पण तरीही असलेल्या जबाबदाऱ्या, वय, आवड यामुळे फरक राहणारच. एकूणच पैसा गाठीला असणे, नसण्याने मनुष्य म्हणून आपल्या जगण्याच्या स्वच्छंदतेवर परिणाम होऊ नये असा संक्षि अर्थ सांगत आहेत. अध्यात्मिक उपदेश म्हणून बरोबर आहे. आता माझे प्रतिसाद वाचून तुम्हाला कळलं असावं मी काय काय करतो. आता यात तुम्हाला मी माझ्या मनाप्रमाणे जगत नाही असं वाटतं का? मी एकटा काम करत नसल्याने दिवसात ज्या मिटींग्स ठरवलेल्या असतात त्या अटेंड करणे मी स्वीकारलेल्या जबाबदारीचा भाग आहे. यातही मी आज येणार नाही हे मी सांगू शकतो. मला एकट्याने जे काम करायचं आहे ते दिवसाच्या याच वेळेत करायचंय असं बंधन नाहीये. पैश्याचा विचार न करता मला पाहिजे ते मी करू शकतो. फक्त मी मनाला आलं म्हणून रिबॉक असं लिहिल्यामुळे १००० रुपयाला मिळणारे मोजे घेणार नाही. थोडक्यात आवडीचं आहे आणि जबाबदारी म्हणून जे काम माझ्याकडे आहे ते मी करतो, त्याबदल्यात मला पैसे मिळतात. त्यावर अजून जास्त पैसे मिळावे म्हणून मी बाकी सगळं सोडून पैश्याच्या मागे धावत नाही. फक्त जे खर्च मी करणार आहे ते तारतम्याने करतो. पैसे जे हातात आहेत ते योग्य ठिकाणी गुंतवतो. एक फ्लॅट कर्ज काढून घेतला, ते ४ वर्षात फेडून टाकलं. त्या ४ वर्षांत बाकी लाईफस्टाईलमध्ये फरक नव्हता. आता अजून एक तयार होतंय (दुसरं घेऊन किमती वाढवल्याबद्दल आधीच दोष स्वीकारतो). तेही कर्ज फार नाही. पण मग यात माझं आयुष्य निरर्थक वाया चाललंय का? संक्षि जे म्हणत आहेत तो नदीचा किनारा आणि तुम्ही तिघे-चौघे जे म्हणत आहात तो नदीचा दुसरा किनारा माझा किनारा कसा छान आहे आणि तुमचा किती घाण आहे असं ते नुसतंच खिजवत आहेत. आम्ही त्या किनारी कसं यायचं याचं मार्गदर्शन करायला सांगितलं की आत्ताचा क्षण महत्वाचा, आहे नाही ते सगळं सोडून या किनारी यायचं म्हणतात. ते तिथे कसे गेले यावर मला साक्षात्कार झाला म्हणतात. पण नदीत मगरी आहेत त्यांना कसं टाळायचं, होडी कशी बांधायची, कुठे पूल आहे का हे सांगत नाहीत. वर खिजवणं आहेच. आम्ही कुठलाही किनारा तर सोडाच पण नदीत गटांगळ्या खाणारे यःकश्चित मानव आहोत. किनाऱ्याला कसं लागायचं तेच तर कळत नाहीये. तुम्ही अर्धवट का होईना किनाऱ्याला लागलेले दिसताय, जरा हात द्या की आम्हाला.

In reply to by ट्रेड मार्क

तुमच्याशी असहमतीचा प्रश्न येत नाहीये. माझी विचारधारा अशी आहे की प्रत्येक मनुष्य हा स्वतंत्रपणे वेगळा आहे, ज्याच्या त्याच्या इच्छा आकांक्षा ह्या इतरांपेक्षा वेगळ्या असू शकतात, इंडिव्हिज्युअलीजम मी मानतो. त्यामुळे तुम्ही माझ्यासारखे आयुष्य जगूच शकत नाही हे मी तरी म्हणणार नाही कारण तसे म्हणणे शुद्ध बावळटपणा आहे. Every life is different. एवढे मला कळते व तेवढेच पुरेसे आहे असे वाटते. बाकी संक्षि काय म्हणत आहेत व त्याचा सविस्तर अर्थ नंतर कधीतरी... आज के लिये इतना बस! :-)

In reply to by संदीप डांगे

पैसा मिळवणे हे काही फार कठीण काम नाही. "If wishes were horses, beggars would ride." मन मानेल तसे म्हणजे मला हवे तितके पैसे मिळवायला मला किती काम कुणाचे करुन द्यायला लागेल तेवढे प्रयत्न करणे, आणि ते करत असतांना मनावर जबाबदारीचे कोणतेही दडपण नसणे. करत असलेले काम आवडीने करणे, रस घेऊन करणे, क्षण आणि क्षण आनंदात जगणे. बरं, मी जर म्हणालो की हे मी करतो तर तुम्ही मला किंवा इतर कुणाला "आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र" म्हणाल का? (हा धागा आर्थिक स्वावलंबनाबद्दल आहे, हे लक्षात घ्या.)

In reply to by उदय

नक्कीच! शेवटी ती एक मनाची अवस्था आहे, ज्याने ती ओळखली व अंगिकारली तो स्वतंत्रच आहे. बाकी, ते होर्सेस बेगर्स काही कळलं नाही, समजावू शकाल काय?

In reply to by संदीप डांगे

नक्कीच! शेवटी ती एक मनाची अवस्था आहे, ज्याने ती ओळखली व अंगिकारली तो स्वतंत्रच आहे.

वा वा! इडो, तुझा धागा मस्त धावतो आहे बै! अवांतरः ( मी जर संपादक असते तर एवढ्या प्रतिक्रिया आल्या म्हणून तुझा आनंद फार टिकू दिला नसता.) =)) =))

In reply to by पैसा

पैसाताई तुम्ही तुमचे अनुभव पण लिहा ना.

In reply to by इडली डोसा

नक्को ग बै! एवढे मोठमोठे लोक लिहीत असताना आमच्यासारख्या क्षुद्र लोकांनी तोंड उघडू नये. लै मज्जा येते आहे इथे. =))

मी दिलेलं उदाहरण अपवादात्मक आहे असं माझ्या निरीक्षणात कुठंही दिसलं नाही. मी शाळेत असताना चांगल्या कॉलेजला अॅडमिशन मिळालं की मी सुखी होईल असं वाटायचं. कॉलेजमध्ये ३-४थ्या वर्षी चांगल्या कंपनीत प्लेसमेंट झाली की सुखी होईल असं वाटायचं. कंपनीत जॉब सुरु झाल्यावर प्रमोशन मिळालं की सुखी होईल असं वाटायचं. प्रमोशन झाल्यावर किमान एकदोन वर्षंतरी ऑनसाईट पाठवल्यावर सुखी होईल असं वाटायचं. प्रोफेशनल बाबतीत जे टारगेट्स आहेत तसेच वैयक्तिक आयुष्यातही होते. लग्न झाल्यावर, वजन कमी केल्यावर, बीएमआय कंट्रोलमध्ये आणल्यावर, घर घेतल्यावर वगैरे वगैरे सगळं यथास्थित होऊनही जर कायम पुढच्या लक्ष्याकडे लक्ष ठेवून जगणं सुटलेलं नाही. गंमत म्हणजे घर, कुटुंब, लग्न, नोकरी, शिक्षण, परदेशप्रवास, प्रमोशन, डॉलर्समध्ये पगार, वगैरे सर्व गोष्टी मनासारख्या मिळाल्यावरही गावात राहत असताना मित्रांबरोबर गोट्या खेळायचो ते दिवस सर्वात आनंदी होते असं वाटतंय. त्यामुळं आहे त्या परिस्थितीत जर तुम्ही मनसोक्त, सुखी, स्वावलंबी जगत आहात असे वाटत नसेल तर अमुकतमुक आकडा गाठल्यावर तसे जगाल ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे. शिवाय किमान भारतासारख्या अर्थव्यवस्थेत 4% सेफ विथड्रॉवल रेट वगैरे रेकमेंडेशन अत्यंत बंडल आहे. वेड फाऊ (ज्यांनी या सेफ विथड्रॉवल रेटवर बराच अभ्यास करुन अमेरिकेसाठी 4%च्या निष्कर्ष काढलाय) यांचा इमर्जिंग मार्केटबद्दलचा रिपोर्ट इथे आहे. त्यात 3% पेक्षा कमी रेट सांगितलाय. http://international-pension-workshop.com/wp-content/uploads/papers-9/M… हे सगळं करुन उद्या भूकंप झाला, पाकिस्तानने अणुबाँब टाकला, आपण राहतोय त्या गल्लीत दहशतवादी हल्ला झाला तर या सगळ्या प्लॅनिंगची बोंब होण्याची शक्यता आहे ते वेगळेच. अधिक विस्ताराने वाचायचं असेल तर हे पुस्तक चांगलं आहे. https://www.amazon.com/Unveiling-Retirement-Myth-Jim-Otar/dp/0968963420

In reply to by आजानुकर्ण

त्यामुळं आहे त्या परिस्थितीत जर तुम्ही मनसोक्त, सुखी, स्वावलंबी जगत आहात असे वाटत नसेल तर अमुकतमुक आकडा गाठल्यावर तसे जगाल ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे. याचं कारण फार साधं आहे. भविष्यकाल हे मनाचं मृगजळ आहे. ते गाढवासमोर त्याच्या दोन कानांच्या मधोमध, वर बसलेल्या मालकानं धरलेल्या गाजरासारखं आहे. गाढव कितीही चाललं तरी गाढव आणि गाजर यातलं अंतर कायम राहील. आणि सर्वात मोठा पॅराडॉक्स म्हणजे ते गाजर (भविष्यकालीन आनंदाची आशा), आपणच स्वतःसमोर धरलंय ! पण इतकी साधी गोष्ट सुद्धा ज्याला कळत नाही त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. गंमत म्हणजे घर, कुटुंब, लग्न, नोकरी, शिक्षण, परदेशप्रवास, प्रमोशन, डॉलर्समध्ये पगार, वगैरे सर्व गोष्टी मनासारख्या मिळाल्यावरही गावात राहत असताना मित्रांबरोबर गोट्या खेळायचो ते दिवस सर्वात आनंदी होते असं वाटतंय. यात थोडीशी सुधारणा हवी. जसा भविष्यकाल कधीही येत नाही तसाच भूतकाल मृत व्यक्तीसमान आहे, त्याच्या आठवणी खेरीज त्याचा कुठेही लवलेश नाही. नाऊ इट इज अप टू अस, गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत वर्तमान व्यर्थ करायचा की `इट इज ओके' म्हणून सांप्रत क्षणाचा उत्सव करायचा.

काहि ऑब्सर्व्हेशन्स. ०) पैशाची साठवण करुन त्यात भविष्यकालीन सुरक्षा शोधण्याचं मूळ कदाचीत आपल्या जेनेटिक्समधे कोरलं गेलय. आपल्या शरीरात चरबी साठवली जाते, थोडंफार तसच. वर डांगेसाहेब म्हणातात तसं पैसा हे विनियोगाचं साधन आहे, वस्तु व सेवेची गॅरंटी आहे. अनाकलनीय भविष्याच्या सोयीसाठी हि गॅरंटी साठवुन ठेवावी असं वाटणं अगदी स्वाभावीक आहे, नैसर्गीक आहे. १) ज्याला खरच पैशाची किंमत कळते त्याला पैशाचं मानवी आयुष्यातलं स्थान देखील कळतं, 'पुरेसा' पैसा म्हणजे किती हे सुद्धा कळतं, थोडं कमि-जास्त झालं तर सावरायचं कसं हे देखील कळतं. २) बरेचदा, किंबहुना बहुतांशवेळी, आपल्या आयुष्यातलं पैशाचं महत्व इतरांनी ठरवुन दिलेलं असतं. कुटुंब, समाज, मित्रं परिवार... असं सगळं मोहोळ कारणीभूत असतं. पुर्वायुष्यात थंड डोक्याने 'ऐकावे जनाचे पण करावे मनाचे' हा फंडा वापरणे फार कमि लोकांना जमते. त्यामुळे आपला स्वभाव, महत्वाकांक्षा, जगण्याची रीत हे सगळं पैशात ट्रान्स्लेट करत बसण्यात वेळ जातो. हे ज्याचं त्याला कळणं सर्वात महत्वाचं असतं. ३) सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपल्यावर असलेल्या खर्‍या-खोट्या जबाबदारीच्या कल्पना. त्यातलं वास्तव किती, काल्पनीक किती याचा उलगडा व्हायला देखील शांत डोक्याने विचार करणं गरजेचं असतं. ४) प्रॅक्टीकली माणसाने शक्य तेव्हढं लवकर पैसा मिळवणं सुरु करावे व अगदी सुरुवाती पासुन १/३ कमाईची इन्व्हेस्टमेण्ट, १/३ कमाई दैनंदीन जगणं, १/३ कमाई आपले छंद, ऐय्याशी इ. करता खर्च अशी सवय लावावी. यामुळे मुद्दा क्र. १ चे आर्थीक शक्याशक्यतेचे वास्तवीक आकडे समोर यायला फार मदत होते. ५) आर्थीक नियोजनातला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे व्यावसायीक महत्वाकांक्षा होय. जिथुन मिळेल तिथुन हा महत्वाकांक्षेचा किडा विकत घ्यावा, त्याच्या कडुन स्वतःला चावुन घावं आणि त्या जखमेच्या दु:खाचं स्मरण ठेवत घोडदौड करावी. ६) हे सगळे मनाचे खेळ आहेत याचं नित्य स्मरण ठेवावं. जय जय श्री लक्ष्मीनारायण गोविंद :)

बहुतेक माणसं परिस्थितीनुरूप वागत असतात. भूतकाळ मृत व्यक्तीसमान आहे म्हणलं तरी त्यातल्या आठवणी उगाळत बसू नये, पण त्यातून मिळालेले अनुभव कधी विसरू नये या मताचा मी आहे. थोडक्यात त्या अनुभवांचा सद्य परिस्थितीत वापर करता येऊ शकतो आणि परिस्थिती हाताळायला मदत होऊ शकते. आपल्या आयुष्यापुढे पैसा दुय्यम आहे यात शंका असायचं काहीच कारण नाही. आजार बळावला असताना पैसे वाचवायचे म्हणून डॉक्टरकडे जाणार नाही असं म्हणणारे लोक विरळाच असतील. पण त्याचबरोबर सर्दीपडश्यासाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाणे हाही मूर्खपणाच आहे. पुढच्या क्षणी आपण असू की नाही याची कोणालाच खात्री नाहीये. भविष्यकाळ हे गाजर म्हणण्यापेक्षा (लांबच्या) भविष्यकाळात मला एवढे पैसे पाहिजेत याला गाजर म्हणणं योग्य ठरेल. तरीही तारतम्य राखणे आवश्यकच आहे. म्हणजेच रिटायरमेंटची तरतूद करायची म्हणून आत्ता मन आणि पोट मारून जगण्यात अर्थ नाही. आत्ता सुद्धा छान मनासारखं जगा, आवडीच्या गोष्टी करा, खरा आनंद छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा मिळतो. हाती उरतील ते नीट गुंतवून ठेवा. याउलट, उद्या कोणी बघितलाय असं म्हणून आज सगळं उधळून टाकणं हाही मूर्खपणा आहे. आजानुकर्ण म्हणतात ते वाटणं त्या त्या वयात बरोबरच आहे. कॉलेजमधल्या तरुणाला भविष्याची स्वप्न बघू नको हे सांगणं कितपत संयुक्तिक आहे? लग्नाळू मुलाला सांगून आलेली मुलगी चांगली आहे का नाही हे कुठे बघत बसतो, पुढचं कोणी बघितलंय? लग्न चालेल तेवढं चालेल, आत्ता तर मजा करून घे असं कोणी हितचिंतक सांगेल? चांगली नोकरी करणाऱ्या, नुकतंच लग्न झालेल्या पण आईवडिलांची जमापुंजी त्यांच्यासाठीच राहूदे अशी इच्छा असलेल्या मुलाला ५०-६० लाख रुपये एकरकमी नाहीत म्हणून फ्लॅट न घेता भाड्याच्या घरात रहा हे सांगणं किती योग्य आहे? एवढंच काय, थोडे पैसे जमले की घेऊ आपलं घर या विचाराने बायकापोरांसकट दर एक दोन वर्षाने घर बदलायला लागलेल्या माणसाला कशाला पाहिजे स्वतःच घर हे सांगून बघा. बहुतेक सगळ्यांचं लहानपण आनंदी असतं कारण तुमची चिंता करणारं दुसरं कोणीतरी असतं. त्या वयात आनंद व्हायला छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा पुरेश्या असायच्या. सुखी असणं आणि आनंदी असणं यात थोडातरी फरक आहे. पैश्याची तंगी असताना आणि ते मिळवण्यासाठी झगडतानाही एखाद्या संध्याकाळी बायकोसाठी थोडा वेळ काढून, एक छान गजरा घेऊन फिरायला जाणं यातला आनंद पैश्यात मोजता येणार नाही. तेवढा आनंद कदाचित भरपूर पैसे असताना ठरवून पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्यावरही मिळणार नाही. स्वच्छंद म्हणजे काय फक्त मनाला येईल तेव्हा झोपून उठणं, इच्छा होईल तेव्हा काम करणं, सुट्टी घेणं, फिरायला जाणं यातच आहे का? आपल्या आवडीचं काम करायला मिळणं, स्वतःसाठी वेळ देता येणं, आपला छंद जोपासता येणं, आपल्या प्रियजनांसोबत चांगला वेळ व्यतीत करता येणं, भविष्याच्या ओझ्याखाली दबून न जाणं हे स्वच्छंदी जगणं नाहीये? प्रत्येकाच्या कामाचे स्वरूप वेगळे, त्यानुसार आलेली बंधनं वेगळी, गरजा वेगळ्या असतात. मग एखाद्या नोकरी करणाऱ्याने व्यवसाय करणाऱ्याला बघ मला कसे महिन्याच्या महिन्याला पैसे मिळतात असं हिणवण्यात किंवा एकटं काम करणाऱ्या व्यावसायिकाने मला कसं पाहिजे तेव्हा काम करता येतं असं नोकरी करणाऱ्याला हिणवण्यात काय अर्थ आहे? भविष्याची चिंता किंवा सोय करण्यापेक्षा मी बघा कसा जगतो आणि तुम्ही सगळे कसे बेकार जगताय हा अहंगंड जास्त वाईट आहे असं माझं मत आहे. तसंही स्वतःकडे सगळे पैसे नसताना आईवडिलांची पुंजी वापरून मग त्यावर बढाया मारणाऱ्याकडून कर्ज न घेता घर कसं घ्यावं या सल्ल्याची अपेक्षा चुकीचीच होती म्हणा. असो. उम्मीद पे दुनिया कायम है म्हणतात ते काय उगाच का?

ट्रे मा दादा, मला बरेचदा लॉगिन करून प्रतिक्रिया द्यायला जमत नाही. पण संक्षी च्या उत्तरामुळे तुम्ही थोडेसे वैतागलेले दिसतंय (मीही मागे त्यांना १-२ वेळा प्रश्न विचारून वैतागले होते ) अस तुमच्या २-३ प्रतिक्रियांवरून वाटलं म्हणून हि प्रतिक्रिया. संक्षी सतत सांगत असतात कि "जे जगतो तेच लिहितो" आणि तो खूपच महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे बरेचदा त्यांच्या जगण्याच्या बाहेरचे प्रश्न विचारले कि उत्तर मिळत नाही (म्हणजे ते देतात पण ती इथे कोणालाही समजली आहेत अस वाटत नाही). बरेचदा मला असाही वाटतं कि त्यांना प्रॉब्लेम समजत नाही कारण ते तो प्रॉब्लेम "जगले" नाहीयेत. मला वाटत कि जर तुम्ही खालीलपैकी कुठल्याही गटात बसत असाल तर संक्षी ना तुमचे प्रॉब्लेम्स कधीच समजणार नाहीत, त्यांची उत्तर चंद्र ताऱ्यांवर जातील. १. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या गट-कार्यात (team activity ) काम करत असाल / तुम्ही केलेल्या कामावर दुसऱ्याचा काम अवलंबून असेल - यात वेग-वेगळी ऑफिस आली, अक्खी manufacturing इंडस्ट्री आली फिल्म इंडस्ट्री आली, अक्खी हॉटेल आणि सर्विस इंडस्ट्री आली (आणि असंख्य प्रकारच्या नोकऱ्या / व्यवसाय आले) २. तुम्ही एखाद्या हॉस्पिटल / अग्निशमन दल / सैन्य दल - कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन नोकर्यांमध्ये असाल ३. तुमच्यावर एखाद्या व्यक्तीची जबाबदारी असेल (नुसते पैसे पुरवणं नाही तर वेळ सतत द्यावा लागण ) - लहान बाळ असेल / शाळेत जाणार मूळ असेल / वृद्ध असतील ज्यांना वेळेवर औषध द्यायला लागतं सतत बघायला लागत या प्रकारामध्ये पैसे हा मुद्दा नसला तरी वेळ हा आहे, तुम्ही कधीच तुम्हाला हवं ते त्या क्षणी करू शकणार नाही, थोडाफार प्लँनिंग करावच लागेल. आणि ४. जर तुम्हाला तुमच काम खरंच मनापासून आवडत असेल, त्यात तुम्हाला पैसे मिळत असतील पण जरी नाही मिळाले / कमी मिळाले तरी तुम्ही ते जब्बरदस्त एन्जॉय करत असाल. - मागे कोणीतरी इथे हेच सांगितलं, आणि त्यांना बरेच शब्द उत्तर म्हणून मिळाले :P ) ज्या लोकांचा पैसे हा मुद्दा आहे (मागे कुणीतरी हॉस्पिटल मध्ये मुलीच्या इलाजासाठी पैसे नसल्याचं उदाहरण दिलं होत), त्यातही उत्तर मिळणार नाही. कारण पैशाचा तुटवडा हा प्रॉब्लेम ते (बहुधा ) "जगले" नाहीयेत. त्यांचे आत्तापर्यंतच्या कुठल्याही विषयावरचे प्रतिसाद तेव्हाच ठीक वाटतात, जेव्हा ते तो विषय जगलेले असतात (त्यांची कविता/ गजल इ वरची रसग्रहण वाचनीय (थोडी शब्दबंबाळ तरीही )असतात). त्याचे अध्यात्मावरचे प्रतिसाद / विचार संपूर्ण चुकीचे नाहीयेत असा अनेक लोकांनी इथे बरेचदा सांगितलंय. फक्त ते ज्या पद्धतीने सांगतात ती बऱ्याच लोकांना त्रासदायक वाटते आणि त्यातून वाद वाढतात. त्यात ते भलत्या धाग्यावर भलत्या गोष्टी बोलतात, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया (ज्यात काही गोष्टी कदाचित सगळ्यांना पटू शकतात), वादग्रस्त होतात. माझ्या आसपास असंख्य उदाहरण आहेत कि ज्यात सगळ्या प्रॅक्टिकल (पैसे, वेळ तब्ब्येत ) गोष्टी उत्तम असूनही लोक सतत चिंतेत असतात, त्यांनि संक्षीचे (खरंतर इतर अनेकानी आधीच सोप्या शब्दात सांगितलेले आहेत, पण ते हे मान्य करणार नाहीत ;) ) विचार नक्की वापरावेत असं वाटत. पण त्याच बरोबर अनेक लोक संक्षी प्रमाणेच विचार करून जगत असतात (फक्त त्याची जोरदार आणि शब्दबंबाळ जाहिरात करत नाहीत) हे सुद्धा दिसत. अजून सहज काही मनात आलेले मुद्दे पण लिहायचा कंटाळा १. इथेच मिपा वर खूप वर्षांपूर्वी वाचलेल "दुर्लक्ष हि सर्वात मोठी शिवी आहे". हे माझ्या अतिशय आवडत्या आणि life-changing वाक्यांपैकी एक आहे. २. व्यासंग आणि छंद ह्यात खूप फरक असतो. खूप म्हणजे खूप जास्त. माझ्या मते व्यासंग म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन तर छंद म्हणजे गणपतीत / घरातल्या छोट्याश्या मैफिलीत जमेल तसा पण आवडीने तबला वाजवणारा घरातलाच कोणीतरी. ३. स्वतःच्या आवडीनिवडी, आयुष्य जगायची पद्धत, सवयी, विचार ह्या बाबतीत स्वतःला पटेल तसंच वागावं, उद्या काही बदल केला तरी फक्त आणि फक्त स्वतःला पटला म्हणूनच करावा, आणि कुणालाही त्याचं स्पष्टीकरण द्यायला जाऊ नये, पाहिलं वाक्य वापरावं. बाकी या सगळ्या गोंधळात मूळ लेख (आणि त्यात दिलेल्या लिंक्स) हा चांगला आणि माहितीपूर्ण आहे. त्याबद्दल लेखिकेचे धन्यवाद.

In reply to by वीणा३

उत्तम निरीक्षण. ट्रेडमार्कबद्दल सहानुभूती आहे. हल्ली संपादक मंडळ आयडी बहुधा वापरात नसावा. तेव्हा जर आपला अपमान झाला असे कोणाला वाटले तर त्यानी संपादकांच्या वैयक्तिक आयडींना प्रतिक्रियांच्या लिंका पाठवून तक्रार नोंदवावी. तिथे दखल घेतली नाही तर नीलकांतला कळवावे. इथे एकाचा अपमान हा इतर अनेकजणांची करमणूक असू शकते हे लक्षात घेऊन हल्ली मी अशा धाग्यांपासून लांब रहाते. तसाही इथे काही बोलून उपयोग कधी नसतोच. चर्चेतून कोणी आपली मते बदलील ही शक्यता आंतरजालावर फार कमी. तेव्हा आपला वेळ आणि टंकन कष्ट अधिक विधायक कामासाठी वापरावेत.

In reply to by वीणा३

तुमचा प्रतिसाद आहे म्हणून उत्तर देतो. अत्यंत निष्पक्षपणे वाचलं तर उपयोग होईल : पाच वर्षापूर्वी तुम्ही म्हटलंय : १) हा दृष्टीकोन मला फारसा व्यवहारी वाटत नाही. कदाचित याची पुढील कारण असू शकतील. १. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मला उद्या यायची सवय झालीये.... .....आणि आजही त्यात फरक नाही. यापेक्षा मानसिकता न बदलण्याचा दुसरा उघड उदाहरण काय हवं ? हीच मानसिकता आज बदलावी लागते ! अदरवाइज व्यक्ती फक्त उद्याकडे डोळे लावून जगते आणि ही `उद्याची सवय' म्हणजे`स्वप्नांची वाट आहे'. २) बरेचदा मला असाही वाटतं कि त्यांना प्रॉब्लेम समजत नाही कारण ते तो प्रॉब्लेम "जगले" नाहीयेत. उलट आहे. मी प्रश्न मुक्त आहे ! कारण आय डोंट हॅव अ टुमारो . आणि मजा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न फक्त डोक्यातच आहेत ! ज्या अर्थी सदस्य इथे टाईमपास करु शकतो म्हणजे त्याचं पोट भरलेलं आहे ! इतकी उघड गोष्ट तरी निदान निर्विवाद आहे. ३) मला वाटत कि जर तुम्ही खालीलपैकी कुठल्याही गटात बसत असाल तर संक्षी ना तुमचे प्रॉब्लेम्स कधीच समजणार नाहीत, त्यांची उत्तर चंद्र ताऱ्यांवर जातील..... नीट वाचलात तर तुमचंच गृहित तुम्हाला बालीश वाटेल. हे सर्व जग परास्परावलंबी आहे. माझे क्लायंटस माझ्यावर अवलंबून आहेत, मी त्यांच्यावर आहे. माझ्या संसाराचंही तेच आहे, अँड सो ऑन. फक्त आगीचे बंबवाल्यांना वगैरे इमर्जन्सी असते असं वाटणं ही वैचारिक मर्यादा आहे. ४) कारण पैशाचा तुटवडा हा प्रॉब्लेम ते (बहुधा ) "जगले" नाहीयेत. हा ज्योक वाटतोयं का पाहा. मी राजघराण्यात जन्मलोय असं वाटतंय का ? एक गोष्ट नक्की, मला पैश्याचा मानसिक तुटवडा नाही जो इतरे जनांना कायम भासतो. कारण उद्याची किंवा कोणतीही कल्पना मला दहशत घालू शकत नाही. ५) इथेच मिपा वर खूप वर्षांपूर्वी वाचलेल "दुर्लक्ष हि सर्वात मोठी शिवी आहे म्हणून तर मी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं नाही ! आणि ज्यांनी प्रतिसादातून आपले सभ्यतेचे संस्कार , प्रच्छन्नपणे दाखवले (आणि पुन्हा उलटी बोंबे मारतायंत) त्यांना पूर्णपणे बेदखल केलंय. ६) व्यासंग आणि छंद ह्यात खूप फरक असतो. तुम्हाला उपयोगी होईल म्हणून सांगतो, छंदाचाच पुढे व्यासंग होतो. जे स्वतः कडून, डायरेक्ट झाकीरसारखा तबला, सुरुवातीलाच वाजावा अशी अपेक्षा ठेवतात, ते जन्मात तबलाच वाजवू शकत नाहीत. ७) त्याचे अध्यात्मावरचे प्रतिसाद / विचार संपूर्ण चुकीचे नाहीयेत असा अनेक लोकांनी इथे बरेचदा सांगितलंय. फक्त ते ज्या पद्धतीने सांगतात ती बऱ्याच लोकांना त्रासदायक वाटते आणि त्यातून वाद वाढतात. त्यात ते भलत्या धाग्यावर भलत्या गोष्टी बोलतात, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया (ज्यात काही गोष्टी कदाचित सगळ्यांना पटू शकतात), वादग्रस्त होतात. आता हे खरं तर तुम्ही आऊट ऑफ काँटेक्स्ट लिहीलंय . त्यामुळे भलत्या धाग्यावर भलत्या गोष्टी बोलतात हे याला अ‍ॅप्लिकेबल होतंय का पाहा. तरी तुम्ही विषय काढलायं म्हणून लिहीतो. माझे प्रतिसाद कळायला काही सदस्यांना पाच वर्ष लागली, काहींना आणखी पाच लागतील आणि काहींना समजणारच नाहीत. ओशो म्हणायचे `आय कांट डायल्यूट मायसेल्फ फरदर, यू विल हॅव टू रेज योरसेल्फ टू अंडरस्टँड मी'. मीही तेच सांगतो. ज्या अर्थी आयुष्य जगलेले आणि प्रत्यक्ष उदाहरणं पाहिलेले सदस्य विचारसरणी मान्य करतात (अर्थात त्यांची मान्यता मला उपयोगी नाही कारण मी तर ऑलरेडी तसं जगतोच आहे)...... त्या अर्थी, अजून स्वप्नपूर्ती न झालेले किंवा त्या वाटेवर चालू इच्छिणारे काय म्हणतायंत याला शून्य अर्थ आहे.

In reply to by वीणा३

माझा आक्षेप फक्त "मी जगतो तेच फक्त खरं जगणं आणि बाकीचे जगतात ते लोढणं" या वृत्तीला आहे. प्रत्येक मनुष्य आणि त्याची परिस्थिती पूर्णतः वेगळी असते. जर तुम्ही एखाद्याला मार्गदर्शन करू शकत नसाल तर खिजवू तरी नये. खरंच मार्गदर्शन करत असाल आणि साध्या सरळ भाषेत समजत नसेल तर अगदी शिव्या देऊन केलं तरी चालेल. बाकी तुम्ही म्हणालात ते १००% बरोबर आहे.

छान लेख. गुंतवणूकीबद्दल नक्कीच मला बरेच शिकायचे आहे. या लेखात दिलेल्या लिंक्स आणि पुस्तके यांसाठी धन्यवाद!