Skip to main content

मिपा पुस्तके लोकार्पण

लेखक सरपंच यांनी मंगळवार, 28/03/2017 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर आज पाडव्याच्या सुमुहुर्तावर "मिपा पुस्तकं" हे दालन खुले करतांना अतिशय आनंद होत आहे. मिपावर जमणारे तुम्ही आम्ही वाचनाची आवड या सामान धाग्याने बांधले गेले आहोत. कथा कादंबऱ्यांच्या स्वरूपात असलेले दीर्घलेखन वाचणे हि आपल्या सगळ्यांचीच आवडीची बाब. मिसळपावच्या मागच्या दहा वर्षाच्या प्रवासात अनेक लेखकांनी इथे योगदान दिले, दीर्घलेखन केले, भाषान्तर केले. ते सगळे मिपाकरांना सुसूत्रित एकत्र वाचता यावे यासाठी "मिपा पुस्तकं" या प्रकल्पाची सुरुवात करत आहोत. हे दालन हा याचा पहिला टप्पा. यात आजवर केलेले बहुतांश दीर्घलेखन वर्गीकृत केले आहे. इथे वर्गीकृत केलेल्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पुस्तक स्वरूपात जोडलेले आहे, अर्थात त्याला अनुक्रमणिका आहे आणि ती वापरून दीर्घलेखनाचे भाग एकानंतर एक वाचत जाणे सोयीचे आहे. या प्रकल्पातले आजवरचे सगळ्यात मोठे काम म्हणजे, मिपावरचे मागच्या १० वर्षातले सगळे लेख स्वयंसेवकांनी वर्षभरापेक्षा जास्त काळ काम करून चाळले आणि त्यातून लेखमालांचे नोड क्रमांक शोधून नोंदवले. श्रीरंग जोशी, अजया, आदूबाळ, स्पंदना, पैसा, मधुरा देशपांडे, एस, कॅप्टन जॅक स्पॅरो, कवितानागेश, आनंदयात्री, खेडूत, पद्मावति, पिलीयन रायडर यांनी हे संकलनाचे काम बहुतांशाने पूर्ण केले. या सर्वांना आणि अन्य कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तर त्यांनाही मिपाकरांतर्फे मनःपूर्वक धन्यवाद! ते लेख आपण पुढे स्वयंचलित पद्धतीने जोडले. अजूनही माहिती जमा करण्याचे काम स्वयंसेवक करत आहेत आणि नजरचुकीने किंवा तांत्रिक कारणाने राहून गेलेले लेखन लवकरच जोडून पूर्ण होईल असा विश्वास आहे. दीर्घलेखन केलेल्या मिपाकरांनी त्यांचे लेखन तपासून त्यांच्या लेखमाला जोडल्या गेल्या नसतील तर साहित्य संपादकांना प्रत्येक भागाच्या नोड क्रमांकासह कळवावे.भविष्यात येणाऱ्या लेखमाला जोडण्यासाठी मिपाकरांनी साहित्य संपादकांची मदत घेणे अपेक्षित आहे. मिपा पुस्तकं या मेन्यूखाली सध्या बोका-ए-आझम (२) आणि जयंत कुलकर्णी (१) यांनी भाषांतरित केलेली पुस्तकं आणि "मिपाकरांनी केलेले दीर्घलेखन" असे सबमेन्यू आहेत. भाषांतरित पुस्तक त्या त्या पुस्तकांच्या पहिल्या पानावर घेऊन जातील. या भाषांतरित पुस्तकांचा मिपाला अभिमान आहे आणि यातून स्फूर्ती घेऊन मिपाकरांनी असे अनेक प्रकल्प मिपावर करावेत अशी इच्छा आहे. याआधी मिपावर असे अजून काही भाषांतराचे प्रकल्प झाले असतील, तर ते इथे जोडायला हवेत. कृपया त्याची माहिती नीलकांत या आयडीला व्यनिने पाठवावी. "मिपाकरांनी केलेले दीर्घलेखन" हा सबमेन्यू books या ट्रॅकरवर घेऊन जाईल. इथली यादी नवनवी पुस्तकं जोडली गेली कि अद्ययावत होत राहील. सर्व मिपाकरांना आणि रसिक वाचकांना पाडव्याच्या तसेच दीर्घ लेखन मालिकांच्या सलग वाचनानंदासाठी शुभेच्छा!

वाचने 25189
प्रतिक्रिया 55

प्रतिक्रिया

हे श्रीरंग पंतांनीच केलेले काम आहे का? त्या कामात काही दिवस मदत केली होती. पुढे गोष्ट तशी.. च्या कामात ते मागे पडले. अत्यंत पेशन्सचे हे काम पंत करत होते. उत्तम संकल्पना!

अतिशय उत्तम संकल्पना. अत्यंत जिकिरीचे आणि वेळखाऊ काम चिकाटीने पूर्णत्वाकडे नेल्याबद्दल सहभागी मिपाकरांचे अभिनंदन आणि आमच्यासारख्यांची एकाचजागी दीर्घलेखन वाचण्याची सोया केल्याबद्दल आभार.

उत्तम उपक्रम, सर्व स्वयंसेवकांचे मन:पूर्वक आभार! या दालनात समृद्ध साहित्याची भर सतत पडत राहो.

खूप चांगला उपक्रम आहे. स्वयंसेवकांचे धन्यवाद. इथल्या कथा/पुस्तकांना रेटिंग देता येत असते तर अजून बरे झाले असते. म्हणजे आधी कोणत्या वाचायच्या ते कळाले असते.

अतिशय स्तुत्य उपक्रम. अशी पुस्तके बनावीत ही इच्छा मनात होतीच. दोनतीन वेळा बोलूनही दाखवली होती. आनंद जाहला.

स्वयंसेवकांचे मनापासून आभार. त्यांच्यामुळेच मिपाचं हे पुस्तकदालन बनले आहे. सरपंच तुमचेसुद्धा आभार्स बरं का.

In reply to by आदूबाळ

+१००! मिपावर प्रत्येक उपक्रमात हातभार लावायला आवडतो, त्यामुळे खारीचा वाटा उचलला इतकेच.

मस्तच. या लेखांमध्ये काळेकाकांच्या फसवणुक या सिरीजचा उल्लेख असेलच. http://www.misalpav.com/node/10935 या लेखापासून सुरू झालेली ती सिरीज खूप छान होती.

In reply to by गॅरी ट्रुमन

मात्र चुकून एखादी मालिका पुस्तक म्हणून जोडायची रहिली असेल किंवा एखादा लेख मधेच नजरचुकीने राहिला असेल तर साहित्य संपादकांच्या नजरेला आणून द्या. ते यापुढे जोडून घेतील.

अरे मस्तच, श्रीरंगा ह्यासाठी सुरुवातीपासूनच प्रचंड चिकाटीने राबला. त्याला असे राबू दिले म्हणून सौ. जुईवैनींना अन छोटुकल्या उमाला स्पेशल थ्यांक्स. आनंदयात्री आण्णा टेक्निकली बॉस माणूस आहे. मिपामालक, तंत्रज्ञ सहित ह्या प्रकल्पावर काम करणार्‍यांना खूप धन्यवाद. लवकरच दिर्घलेखनासोबत निवडक लघुकथा, काव्ये ह्यांचे संग्रह यावेत ही मनापासून इच्छा.

In reply to by अभ्या..

100% सहमत श्रीरंगाच्या (श्रीरंग जोशी) मेहनत आणि चिकाटीमुळेच हा प्रकल्प एवढा उत्तम झाला आणि त्याने लावून धरल्यामुळे प्रकल्प पूर्णत्वास गेला. श्रीरंगाचे विशेष आभार... आनंदयात्रीच्या तांत्रिक कौशल्यामुळे संकलनानंतरचे मोठे काम सहज सोपे झाले, त्याचेही आभार... - नीलकांत

In reply to by नीलकांत

मिपावरचे मागच्या १० वर्षातले सगळे लेख स्वयंसेवकांनी वर्षभरापेक्षा जास्त काळ काम करून चाळले आणि त्यातून लेखमालांचे नोड क्रमांक शोधून नोंदवले.
बापरे, जेव्हा नवीन गोष्टींसाठी अनुक्रमणिका उपलब्ध झाली तेव्हा तर खूपच आनंद वाटला. परंतु त्यामागे हे सर्व काम स्वयंसेवकांनी स्वतः केले याबद्दल तर खूपच आश्चर्य, कौतुक आणि सर्वांचे अभिनंदन! मला वाटले एखादी संगणक प्रणाली वापरली असेल त्यासाठी परंतु एक एक लेखाची नोंद घेऊन ते जोडले म्हणजे अशक्य काम केलेले आहे. सर्व स्वयंसेवकांचे हार्दिक अभिनंदन!

सगळ्या स्वयंसेवकांचे आणि मिपा व्यवस्थापनाचे मनापासून आभार.

उत्तम सोय झाली. नाहीतर सगळ्याच मालिकांच्या सर्व भागांच्या लिंक्स एकाजागी मिळत नव्हत्या कधी कधी. श्रीरंगने मालिकांच्या नोंदी घेण्यात सुसूत्रता ठेवली आणि आनंदयात्रीने मालिका पुस्तक पान म्हणून जोडण्याचे काम एकहाती पूर्ण केले आहे. इतर स्वयंसेवकांसोबत या दोघांचे विशेष कौतुक आणि सर्वांना धन्यवाद!

टॅबवर सगळ्यांचे लेख दिसतायंत, पण याबद्दल कुणी सांगेल काय? १) अनुक्रमणिका कुठे आहे ? २) एखाद्या सदस्याचे सगळे लेख वाचायचे असतील तर नक्की काय करायचं ? ३) लोकार्पण म्हणजे कुणाला अर्पण ? अर्थात, नीलकांत, रंगा, यात्री आणि इतर सर्व कार्य संपन्नतेला नेणार्‍यांचे आभार्स .

In reply to by संजय क्षीरसागर

१) अनुक्रमणिका त्या त्या पुस्तकाची त्या त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर वरच्या उजव्या कोपर्‍यात आहे. मेनु बारमधे जो टॅब आहे तिथे सर्व दीर्घलेखनाच्या मालिकांच्या प्रत्येकी पहिल्या भागावर जाणार्‍या लिंक्स एकत्र मिळतील. २) काही काळापूर्वी प्रत्येक सदस्याच्या लेखनाच्या तळाला "यांचे सर्व लेखन" अशी लिंक होती. ती द्रुपल अपग्रेडमधे नाहीशी झाली. आता http://www.misalpav.com/user/18002/authored या लिंकमधे त्या त्या सदस्याचा बिल्ला नंबर टाकला की त्याचे लिखाण एकत्र पाहता येईल. ३) लोकार्पण म्हणजे तुम्हा आम्हालाच की! इतक्या लोकांनी मेहनतीने एवढे मोठे काम पूर्ण केले, ते आता सर्वांसमोर ठेवले आहे बस.

In reply to by पैसा

१) ग्रेट ! २) हे काम सदस्याच्या नांवावर क्लिक करुन ट्रॅक टॅबमधे गेलं की सध्याही होतंय . सदस्य क्रमांकाची किंवा युआरेलची गरज नाही. ३) मला वाटलं मिपावरचा डेटा हालवला की काय !

"मिपा हॉल ऑफ फेम माहिती संकलन" हा प्रकल्प आणि त्यातून निर्माण झालेल्या "मिपा पुस्तकं" आणि "अनुक्रमणिका" या सोयींमुळे मिपाच्या खात्यात दोन फार उपयोगी आणि आकर्षक साधनांची (एलिगंट टूल्स) भर पडली आहे !! मिपावर चालू असलेल्या या नवीन अभिनंदनिय सुधारणांत सहभाग घेऊन चिकाटीने आपला वेळ आणि श्रम देणार्‍या सर्व मंडळींसाठी अनेकानेक धन्यवाद !

ह्या अवघड कामास पुर्ण करनारे लोक खरं तर मोत्याचा कंठा किंवा सोन्याचं कडं यांचेच मानकरी असायला हवे होते, परंतु आमच्याकडे मनापासुन दिलेले धन्यवाद व दुवा हेच आहेत, या कामात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लावलेल्या सर्व लोकांचे मनापासुन आभार, काही दिवसांपुर्वी मिपापुस्तके दिसली होती त्यातली काही वाचली सुद्धा, पन नंतर ती गायब झालेली, बहुदा मॉडीफिकेशन व पाडव्याच्या मुहुर्तासाठी राखुन ठेवली असावीत

हे मस्त काम झालं.. ह्या करता कष्ट घेतलेल्या सर्वांचे कौतुक, स्वाती

आता बरेच वाचायचे राहुन गेलेले लिखाण एका ठीकाणी सापडेल. सर्व सहभागी स्वयंसेवकांना धन्यवाद.

आता बरेच वाचायचे राहुन गेलेले लिखाण एका ठीकाणी सापडेल. सर्व सहभागी स्वयंसेवकांना धन्यवाद.

खुप खुप भारी काम झालंय हे, नाहीतर लेखमालिकांच्या मागच्या पुढच्या लिंका शोधायला फार वेळ लागायचा, ह्या उपक्रमात सहभागी असणा-या सर्वांचे अतिशय आभार..

पाडव्याची सुरेख भेट मिपाकरांसाठी ! श्रीरंगपंत , यात्री आणि समस्त कार्यकर्त्यांना सलाम !! सासं म्हणून सर्वांची मेहनत समक्ष पाहिली असल्याने या कार्याला खरोखर हॅट्स ऑफ !!!

अतिशय चांगली व्यवस्था,, पण यांचा क्रम अल्फाबेटिकली किवा असाच काहितरी असता तर पटकन शोधने सोपे झाले असते..

खुपच सुंदर काम! असे पुस्तके बनवण्याचा क्रायटेरिया काय ठेवला होता? म्हणजे एका भागापेक्षा अधिक आलेलं लिखाण की अजून काही? तसेच वर पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे अल्फाबेटिकली असावे तसेच विभागवार होत असतील तर अजूनच छान. बाकी, आता चांगले लेखण चटकन वाचायला घेता येणे हे फारच मोठी सोय झाली. रंगाप्पा, आपका यह अहसान मिपाकर जिंदगीभर नही भुलेंगे!

झालेलं आहे आणि श्रीरंगपंत आणि इतरांना त्याबद्दल जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच! यामध्ये मी कशीबशी गिरगिटवलेली अक्षरं यावीत आणि तीही जयंत कुलकर्णी काकांसारख्या सिद्धहस्त लेखकाच्या जोडीला - हा फार मोठा सन्मान आहे. त्याबद्दल मनःपूर्वक आभार!_/\_

In reply to by पुंबा

२५ हून जास्त भाग असलेल्या मालिका जोडताना जरा प्रॉब्लेम आला होता. एकेक करत आहोत.

कोणी मिपाच्या दिवाळी अंकांच्या पीडीएफ देता का पीडीएफ ?

In reply to by धर्मराजमुटके

२ दिवसात बाकी लिंक पाठवते. तोपर्यंत विशेषांक मेनुमध्ये ज्या मिळतील त्या घ्या.

In reply to by पैसा

कुठल्याही मराठी संस्थळावर पीडीएफ दिसली की ती लगेच उतरवून घेतोच. त्यामुळे इथल्या पीडीएफ अगोदरच घेतलेल्या आहेत. वाट बघतो.