मिपा पुस्तके लोकार्पण

सरपंच's picture
सरपंच in घोषणा
28 Mar 2017 - 12:45 pm

मिपावर आज पाडव्याच्या सुमुहुर्तावर "मिपा पुस्तकं" हे दालन खुले करतांना अतिशय आनंद होत आहे. मिपावर जमणारे तुम्ही आम्ही वाचनाची आवड या सामान धाग्याने बांधले गेले आहोत. कथा कादंबऱ्यांच्या स्वरूपात असलेले दीर्घलेखन वाचणे हि आपल्या सगळ्यांचीच आवडीची बाब. मिसळपावच्या मागच्या दहा वर्षाच्या प्रवासात अनेक लेखकांनी इथे योगदान दिले, दीर्घलेखन केले, भाषान्तर केले. ते सगळे मिपाकरांना सुसूत्रित एकत्र वाचता यावे यासाठी "मिपा पुस्तकं" या प्रकल्पाची सुरुवात करत आहोत. हे दालन हा याचा पहिला टप्पा. यात आजवर केलेले बहुतांश दीर्घलेखन वर्गीकृत केले आहे. इथे वर्गीकृत केलेल्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पुस्तक स्वरूपात जोडलेले आहे, अर्थात त्याला अनुक्रमणिका आहे आणि ती वापरून दीर्घलेखनाचे भाग एकानंतर एक वाचत जाणे सोयीचे आहे.

या प्रकल्पातले आजवरचे सगळ्यात मोठे काम म्हणजे, मिपावरचे मागच्या १० वर्षातले सगळे लेख स्वयंसेवकांनी वर्षभरापेक्षा जास्त काळ काम करून चाळले आणि त्यातून लेखमालांचे नोड क्रमांक शोधून नोंदवले. श्रीरंग जोशी, अजया, आदूबाळ, स्पंदना, पैसा, मधुरा देशपांडे, एस, कॅप्टन जॅक स्पॅरो, कवितानागेश, आनंदयात्री, खेडूत, पद्मावति, पिलीयन रायडर यांनी हे संकलनाचे काम बहुतांशाने पूर्ण केले. या सर्वांना आणि अन्य कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तर त्यांनाही मिपाकरांतर्फे मनःपूर्वक धन्यवाद!

ते लेख आपण पुढे स्वयंचलित पद्धतीने जोडले. अजूनही माहिती जमा करण्याचे काम स्वयंसेवक करत आहेत आणि नजरचुकीने किंवा तांत्रिक कारणाने राहून गेलेले लेखन लवकरच जोडून पूर्ण होईल असा विश्वास आहे. दीर्घलेखन केलेल्या मिपाकरांनी त्यांचे लेखन तपासून त्यांच्या लेखमाला जोडल्या गेल्या नसतील तर साहित्य संपादकांना प्रत्येक भागाच्या नोड क्रमांकासह कळवावे.भविष्यात येणाऱ्या लेखमाला जोडण्यासाठी मिपाकरांनी साहित्य संपादकांची मदत घेणे अपेक्षित आहे.

मिपा पुस्तकं या मेन्यूखाली सध्या बोका-ए-आझम (२) आणि जयंत कुलकर्णी (१) यांनी भाषांतरित केलेली पुस्तकं आणि "मिपाकरांनी केलेले दीर्घलेखन" असे सबमेन्यू आहेत. भाषांतरित पुस्तक त्या त्या पुस्तकांच्या पहिल्या पानावर घेऊन जातील. या भाषांतरित पुस्तकांचा मिपाला अभिमान आहे आणि यातून स्फूर्ती घेऊन मिपाकरांनी असे अनेक प्रकल्प मिपावर करावेत अशी इच्छा आहे. याआधी मिपावर असे अजून काही भाषांतराचे प्रकल्प झाले असतील, तर ते इथे जोडायला हवेत. कृपया त्याची माहिती नीलकांत या आयडीला व्यनिने पाठवावी.

"मिपाकरांनी केलेले दीर्घलेखन" हा सबमेन्यू books या ट्रॅकरवर घेऊन जाईल. इथली यादी नवनवी पुस्तकं जोडली गेली कि अद्ययावत होत राहील. सर्व मिपाकरांना आणि रसिक वाचकांना पाडव्याच्या तसेच दीर्घ लेखन मालिकांच्या सलग वाचनानंदासाठी शुभेच्छा!

प्रतिक्रिया

निशाचर's picture

29 Mar 2017 - 2:20 am | निशाचर

उत्तम सोय! या कामात सहभागी सगळ्यांचे आभार.

एमी's picture

29 Mar 2017 - 5:05 am | एमी

+1

पिलीयन रायडर's picture

29 Mar 2017 - 2:37 am | पिलीयन रायडर

हे श्रीरंग पंतांनीच केलेले काम आहे का? त्या कामात काही दिवस मदत केली होती. पुढे गोष्ट तशी.. च्या कामात ते मागे पडले. अत्यंत पेशन्सचे हे काम पंत करत होते.

उत्तम संकल्पना!

अनन्त अवधुत's picture

29 Mar 2017 - 2:43 am | अनन्त अवधुत

अतिशय उत्तम संकल्पना. अत्यंत जिकिरीचे आणि वेळखाऊ काम चिकाटीने पूर्णत्वाकडे नेल्याबद्दल सहभागी मिपाकरांचे अभिनंदन आणि आमच्यासारख्यांची एकाचजागी दीर्घलेखन वाचण्याची सोया केल्याबद्दल आभार.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Mar 2017 - 12:29 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

आषाढ_दर्द_गाणे's picture

29 Mar 2017 - 3:14 am | आषाढ_दर्द_गाणे

मजसारख्या नवख्या मिपाकरांना हि पर्वणीच आहे!
सगळ्या मंडळींचे अनेक धन्यवाद!

नंदन's picture

29 Mar 2017 - 3:15 am | नंदन

उत्तम उपक्रम, सर्व स्वयंसेवकांचे मन:पूर्वक आभार! या दालनात समृद्ध साहित्याची भर सतत पडत राहो.

अत्रे's picture

29 Mar 2017 - 6:26 am | अत्रे

खूप चांगला उपक्रम आहे. स्वयंसेवकांचे धन्यवाद.

इथल्या कथा/पुस्तकांना रेटिंग देता येत असते तर अजून बरे झाले असते. म्हणजे आधी कोणत्या वाचायच्या ते कळाले असते.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

29 Mar 2017 - 6:54 am | अॅस्ट्रोनाट विनय

अतिशय स्तुत्य उपक्रम. अशी पुस्तके बनावीत ही इच्छा मनात होतीच. दोनतीन वेळा बोलूनही दाखवली होती. आनंद जाहला.

प्रचेतस's picture

29 Mar 2017 - 9:10 am | प्रचेतस

उत्कृष्ट उपक्रम.

मोहन's picture

29 Mar 2017 - 9:41 am | मोहन

मालकांचे, स्वयंसेवकांचे व लेखकांचे आभार.

स्वयंसेवकांचे मनापासून आभार. त्यांच्यामुळेच मिपाचं हे पुस्तकदालन बनले आहे. सरपंच तुमचेसुद्धा आभार्स बरं का.

मनिमौ's picture

29 Mar 2017 - 10:15 am | मनिमौ

चिकाटीने काम केलेल्या सर्व स्वयंसेवकाचे आणी मिपा मालकांचे आभार.

खूप प्रशंसनिय काम. मिपाकर असल्याचा अभिमान वाटण्याजोगे.

रंगापांनी मुख्य काम केलेलं आहे. आमचा सहभाग फक्त टेकू देणेइतपत!

खेडूत's picture

29 Mar 2017 - 2:18 pm | खेडूत

+१००!
मिपावर प्रत्येक उपक्रमात हातभार लावायला आवडतो, त्यामुळे खारीचा वाटा उचलला इतकेच.

गॅरी ट्रुमन's picture

29 Mar 2017 - 1:51 pm | गॅरी ट्रुमन

मस्तच.

या लेखांमध्ये काळेकाकांच्या फसवणुक या सिरीजचा उल्लेख असेलच. http://www.misalpav.com/node/10935 या लेखापासून सुरू झालेली ती सिरीज खूप छान होती.

पैसा's picture

29 Mar 2017 - 4:20 pm | पैसा

मात्र चुकून एखादी मालिका पुस्तक म्हणून जोडायची रहिली असेल किंवा एखादा लेख मधेच नजरचुकीने राहिला असेल तर साहित्य संपादकांच्या नजरेला आणून द्या. ते यापुढे जोडून घेतील.

अभ्या..'s picture

29 Mar 2017 - 2:22 pm | अभ्या..

अरे मस्तच,
श्रीरंगा ह्यासाठी सुरुवातीपासूनच प्रचंड चिकाटीने राबला. त्याला असे राबू दिले म्हणून सौ. जुईवैनींना अन छोटुकल्या उमाला स्पेशल थ्यांक्स.
आनंदयात्री आण्णा टेक्निकली बॉस माणूस आहे. मिपामालक, तंत्रज्ञ सहित ह्या प्रकल्पावर काम करणार्‍यांना खूप धन्यवाद.
लवकरच दिर्घलेखनासोबत निवडक लघुकथा, काव्ये ह्यांचे संग्रह यावेत ही मनापासून इच्छा.

नीलकांत's picture

29 Mar 2017 - 2:34 pm | नीलकांत

100% सहमत श्रीरंगाच्या (श्रीरंग जोशी) मेहनत आणि चिकाटीमुळेच हा प्रकल्प एवढा उत्तम झाला आणि त्याने लावून धरल्यामुळे प्रकल्प पूर्णत्वास गेला. श्रीरंगाचे विशेष आभार...
आनंदयात्रीच्या तांत्रिक कौशल्यामुळे संकलनानंतरचे मोठे काम सहज सोपे झाले, त्याचेही आभार...
- नीलकांत

अमित खोजे's picture

30 Mar 2017 - 11:47 pm | अमित खोजे

मिपावरचे मागच्या १० वर्षातले सगळे लेख स्वयंसेवकांनी वर्षभरापेक्षा जास्त काळ काम करून चाळले आणि त्यातून लेखमालांचे नोड क्रमांक शोधून नोंदवले.

बापरे, जेव्हा नवीन गोष्टींसाठी अनुक्रमणिका उपलब्ध झाली तेव्हा तर खूपच आनंद वाटला. परंतु त्यामागे हे सर्व काम स्वयंसेवकांनी स्वतः केले याबद्दल तर खूपच आश्चर्य, कौतुक आणि सर्वांचे अभिनंदन! मला वाटले एखादी संगणक प्रणाली वापरली असेल त्यासाठी परंतु एक एक लेखाची नोंद घेऊन ते जोडले म्हणजे अशक्य काम केलेले आहे.

सर्व स्वयंसेवकांचे हार्दिक अभिनंदन!

सुमीत भातखंडे's picture

29 Mar 2017 - 2:57 pm | सुमीत भातखंडे

सगळ्या स्वयंसेवकांचे आणि मिपा व्यवस्थापनाचे मनापासून आभार.

पैसा's picture

29 Mar 2017 - 4:28 pm | पैसा

उत्तम सोय झाली. नाहीतर सगळ्याच मालिकांच्या सर्व भागांच्या लिंक्स एकाजागी मिळत नव्हत्या कधी कधी. श्रीरंगने मालिकांच्या नोंदी घेण्यात सुसूत्रता ठेवली आणि आनंदयात्रीने मालिका पुस्तक पान म्हणून जोडण्याचे काम एकहाती पूर्ण केले आहे. इतर स्वयंसेवकांसोबत या दोघांचे विशेष कौतुक आणि सर्वांना धन्यवाद!

संजय क्षीरसागर's picture

29 Mar 2017 - 5:07 pm | संजय क्षीरसागर

टॅबवर सगळ्यांचे लेख दिसतायंत, पण याबद्दल कुणी सांगेल काय?

१) अनुक्रमणिका कुठे आहे ?
२) एखाद्या सदस्याचे सगळे लेख वाचायचे असतील तर नक्की काय करायचं ?
३) लोकार्पण म्हणजे कुणाला अर्पण ?

अर्थात, नीलकांत, रंगा, यात्री आणि इतर सर्व कार्य संपन्नतेला नेणार्‍यांचे आभार्स .

पैसा's picture

29 Mar 2017 - 5:16 pm | पैसा

१) अनुक्रमणिका त्या त्या पुस्तकाची त्या त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर वरच्या उजव्या कोपर्‍यात आहे. मेनु बारमधे जो टॅब आहे तिथे सर्व दीर्घलेखनाच्या मालिकांच्या प्रत्येकी पहिल्या भागावर जाणार्‍या लिंक्स एकत्र मिळतील.

२) काही काळापूर्वी प्रत्येक सदस्याच्या लेखनाच्या तळाला "यांचे सर्व लेखन" अशी लिंक होती. ती द्रुपल अपग्रेडमधे नाहीशी झाली. आता http://www.misalpav.com/user/18002/authored या लिंकमधे त्या त्या सदस्याचा बिल्ला नंबर टाकला की त्याचे लिखाण एकत्र पाहता येईल.

३) लोकार्पण म्हणजे तुम्हा आम्हालाच की! इतक्या लोकांनी मेहनतीने एवढे मोठे काम पूर्ण केले, ते आता सर्वांसमोर ठेवले आहे बस.

संजय क्षीरसागर's picture

29 Mar 2017 - 6:02 pm | संजय क्षीरसागर

१) ग्रेट !
२) हे काम सदस्याच्या नांवावर क्लिक करुन ट्रॅक टॅबमधे गेलं की सध्याही होतंय . सदस्य क्रमांकाची किंवा युआरेलची गरज नाही.
३) मला वाटलं मिपावरचा डेटा हालवला की काय !

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Mar 2017 - 5:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

"मिपा हॉल ऑफ फेम माहिती संकलन" हा प्रकल्प आणि त्यातून निर्माण झालेल्या "मिपा पुस्तकं" आणि "अनुक्रमणिका" या सोयींमुळे मिपाच्या खात्यात दोन फार उपयोगी आणि आकर्षक साधनांची (एलिगंट टूल्स) भर पडली आहे !!

मिपावर चालू असलेल्या या नवीन अभिनंदनिय सुधारणांत सहभाग घेऊन चिकाटीने आपला वेळ आणि श्रम देणार्‍या सर्व मंडळींसाठी अनेकानेक धन्यवाद !

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Mar 2017 - 7:01 pm | बिपिन कार्यकर्ते

दंडवत!

जव्हेरगंज's picture

29 Mar 2017 - 7:30 pm | जव्हेरगंज

येक नंबर काम झालं!!!

ह्या अवघड कामास पुर्ण करनारे लोक खरं तर मोत्याचा कंठा किंवा सोन्याचं कडं यांचेच मानकरी असायला हवे होते, परंतु आमच्याकडे मनापासुन दिलेले धन्यवाद व दुवा हेच आहेत, या कामात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लावलेल्या सर्व लोकांचे मनापासुन आभार,

काही दिवसांपुर्वी मिपापुस्तके दिसली होती त्यातली काही वाचली सुद्धा, पन नंतर ती गायब झालेली, बहुदा मॉडीफिकेशन व पाडव्याच्या मुहुर्तासाठी राखुन ठेवली असावीत

यशोधरा's picture

29 Mar 2017 - 7:48 pm | यशोधरा

सुरेख काम, धन्यवाद, आभार!

स्वाती दिनेश's picture

29 Mar 2017 - 9:45 pm | स्वाती दिनेश

हे मस्त काम झालं.. ह्या करता कष्ट घेतलेल्या सर्वांचे कौतुक,
स्वाती

इडली डोसा's picture

30 Mar 2017 - 4:28 am | इडली डोसा

आता बरेच वाचायचे राहुन गेलेले लिखाण एका ठीकाणी सापडेल. सर्व सहभागी स्वयंसेवकांना धन्यवाद.

सविता००१'s picture

30 Mar 2017 - 12:04 pm | सविता००१

मस्तच झालं की हे काम.
अनेकानेक धन्यवाद.

इरसाल कार्टं's picture

30 Mar 2017 - 12:13 pm | इरसाल कार्टं

आता बरेच वाचायचे राहुन गेलेले लिखाण एका ठीकाणी सापडेल. सर्व सहभागी स्वयंसेवकांना धन्यवाद.

५० फक्त's picture

30 Mar 2017 - 1:04 pm | ५० फक्त

खुप खुप भारी काम झालंय हे, नाहीतर लेखमालिकांच्या मागच्या पुढच्या लिंका शोधायला फार वेळ लागायचा, ह्या उपक्रमात सहभागी असणा-या सर्वांचे अतिशय आभार..

सस्नेह's picture

30 Mar 2017 - 1:23 pm | सस्नेह

पाडव्याची सुरेख भेट मिपाकरांसाठी !
श्रीरंगपंत , यात्री आणि समस्त कार्यकर्त्यांना सलाम !!
सासं म्हणून सर्वांची मेहनत समक्ष पाहिली असल्याने या कार्याला खरोखर हॅट्स ऑफ !!!

शलभ's picture

30 Mar 2017 - 2:10 pm | शलभ

खूप मस्त काम झाले.
धन्यवाद..__/\__

सुमीत's picture

30 Mar 2017 - 5:30 pm | सुमीत

सुंदर भेट

पीशिम्पी's picture

30 Mar 2017 - 5:49 pm | पीशिम्पी

सगळ्या स्वयंसेवकांचे आणि मिपा व्यवस्थापनाचे मनापासून आभार.

संजय पाटिल's picture

30 Mar 2017 - 5:54 pm | संजय पाटिल

अतिशय चांगली व्यवस्था,,
पण यांचा क्रम अल्फाबेटिकली किवा असाच काहितरी असता तर पटकन शोधने सोपे झाले असते..

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 7:46 pm | संदीप डांगे

खुपच सुंदर काम!

असे पुस्तके बनवण्याचा क्रायटेरिया काय ठेवला होता? म्हणजे एका भागापेक्षा अधिक आलेलं लिखाण की अजून काही?

तसेच वर पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे अल्फाबेटिकली असावे तसेच विभागवार होत असतील तर अजूनच छान.

बाकी, आता चांगले लेखण चटकन वाचायला घेता येणे हे फारच मोठी सोय झाली. रंगाप्पा, आपका यह अहसान मिपाकर जिंदगीभर नही भुलेंगे!

स्वामी संकेतानंद's picture

31 Mar 2017 - 9:39 am | स्वामी संकेतानंद

अतिशय कौतुकास्पद कामगिरी! सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

जबरी.. काय चिकाटीचे काम आहे! यात सहभाग दिलेल्या सर्वांना धन्यवाद!

कवितानागेश's picture

2 Apr 2017 - 1:50 am | कवितानागेश

सगळ्यात जास्त धन्यवाद श्रीरंग जोशींना.

बोका-ए-आझम's picture

6 Apr 2017 - 7:35 pm | बोका-ए-आझम

झालेलं आहे आणि श्रीरंगपंत आणि इतरांना त्याबद्दल जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच! यामध्ये मी कशीबशी गिरगिटवलेली अक्षरं यावीत आणि तीही जयंत कुलकर्णी काकांसारख्या सिद्धहस्त लेखकाच्या जोडीला - हा फार मोठा सन्मान आहे. त्याबद्दल मनःपूर्वक आभार!_/\_

स्मिता_१३'s picture

7 Apr 2017 - 10:40 am | स्मिता_१३

मस्त काम झालं.. ह्या करता कष्ट घेतलेल्या सर्वांचे कौतुक आणि मनापासून आभार!!!

एक शंका: स्केयरक्रो साठी अनुक्रमणिका नाहिये का?

पैसा's picture

9 Apr 2017 - 11:08 am | पैसा

२५ हून जास्त भाग असलेल्या मालिका जोडताना जरा प्रॉब्लेम आला होता. एकेक करत आहोत.

पुंबा's picture

9 Apr 2017 - 2:17 pm | पुंबा

धन्यवाद..