✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राधा

श — शैलेन्द्र, गुरुवार, 03/23/2017 - 16:08
कृष्ण जाणून घेण्यासाठी, तुला राधा व्हावं लागेल, रुक्मिणीच्या महाली त्याच, येणं जाणं पाहावं लागेल.. पण एकदा तू हे जाणलस कि, सदैव सचैल भिजत राहशील या महालांच्या कोलाहलात पावा होऊन वाजत राहशील.. -शैलेंद्र

प्रतिक्रिया द्या
4306 वाचन

💬 प्रतिसाद (16)

सुरेख! खुप आवडली कविता.

पद्मावति
गुरुवार, 03/23/2017 - 16:55 नवीन
सुरेख! खुप आवडली कविता.
  • Log in or register to post comments

रोचक

माहितगार
गुरुवार, 03/23/2017 - 17:07 नवीन
पहिल कडव वाचताना सोप वाटते हे खरे, पण अद्याप नीट समजले असेही वाटत नाही, कुणी अर्थ सांगू शकेल ?
कृष्ण जाणून घेण्यासाठी, तुला राधा व्हावं लागेल, रुक्मिणीच्या महाली त्याच, येणं जाणं पाहावं लागेल..
  • Log in or register to post comments

म्हणजे नेमके काय ?

माहितगार
गुरुवार, 03/23/2017 - 17:09 नवीन
रुक्मिणीच्या महाली त्याच, येणं जाणं पाहावं लागेल..
म्हणजे नेमके काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

इथे कृष्ण हे तुमच्या इच्छा

शैलेन्द्र
Fri, 03/24/2017 - 10:16 नवीन
इथे कृष्ण हे तुमच्या इच्छा आकांक्षाचे, आयुष्यातील आनंदाचे प्रतीक आहे, बऱ्याचदा आपल्याला होणारी दुःख, मला एखादी गोष्ट मिळाली नाही या कारणापेक्षा, इतरांना ती मिळतेय पण मला नाही या कारणाने अधिक असतात, सुखाची आसक्ती असणं हा एक भाग पण इतरांच्या सुखाबद्दल असूया असणं हा दुसरा, मला वाटतं, हे लक्षात घेतल्यास आता तुम्हांला हि कविता सहज समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

कल्पना सुरेखचं आहे, कृष्ण या

माहितगार
Fri, 03/24/2017 - 12:06 नवीन
कल्पना सुरेखचं आहे, कृष्ण या कल्पनेस वेगळ्या प्रतिकात पहाण्याचा दृष्टीकोण वेगळा आणि मस्तच. :रुक्मिणीच्या महाली कृष्णाची उपस्थिती हि असुयेचे कारण असेल तर कृष्णाच्या रुक्मिणीच्या महाली येण्या जाण्याची तुलना मनास शिवू नये हे पहावे लागेल असे नको का ? पण मग तुमच्या कडव्याची शेवटची ओळतर म्हणते, 'येणं जाणं पाहावं लागेल..' मी अर्थ लावण्यात कुठे चुकतो आहे का ?
रुक्मिणीच्या महाली त्याच, येणं जाणं पाहावं लागेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

येणं जाणं पाहावं लागेल.

माहितगार
Fri, 03/24/2017 - 12:08 नवीन
येणं जाणं पाहावं लागेल.
मध्ये सहन कराव लागेल असे म्हणावयाचे आहे ? म्हणजे असुया असेल तर असू देत पण राधा हो म्हणजे झाले असे काहीसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

Sorry, have to write in

शैलेन्द्र
Fri, 03/24/2017 - 13:50 नवीन
Sorry, have to write in english due to technical problem " येणं जाणं पाहावं लागेल." means you will have to see others enjoying, and you still aspiring for it.. You have to remain wanting for that pleasure, and mould yourself so that you are still happy.. read next para for further understanding.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हम्म,

माहितगार
Fri, 03/24/2017 - 15:29 नवीन
हम्म,
still aspiring for it.. You have to remain wanting for that pleasure, and mould yourself so that you are still happy.. read next para for further understanding.
ह्यात वेगळीच अर्थछटा प्रतीत होते. राधेला स्पर्धक बनवून यशाच्या अजूनही संधी असल्याचे सुचवू इच्छिते असे दिसते. ..उत्तरांची घाई नाही. भाषाबदलाने कदाचित अभिप्रेत अर्थछटेत फरक पडू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

आवडली.

प्राची अश्विनी
Fri, 03/24/2017 - 07:31 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

वाह!

पैसा
Fri, 03/24/2017 - 11:25 नवीन
सुरेख कविता!
  • Log in or register to post comments

नाइस वन!!!

जव्हेरगंज
Fri, 03/24/2017 - 12:30 नवीन
नाइस वन!!!
  • Log in or register to post comments

प्लस वन!!!

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/25/2017 - 06:09 नवीन
प्लस वन!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

'त्याचं' म्हणायचे आहे का?

एस
Sat, 03/25/2017 - 11:03 नवीन
'त्याचं' म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments

रुक्मिणीच्या महाली नंतरचा ना

माहितगार
Sat, 03/25/2017 - 13:01 नवीन
रुक्मिणीच्या महाली नंतरचा ना ? तुम्ही म्हणता तसे, बहुधा 'त्याचं' हे उच्चारण अभिप्रेत असावे असा माझा अंदाज, म्हणजे मी तरी तसे वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

yes "HIS"

शैलेन्द्र
Sat, 03/25/2017 - 20:15 नवीन
yes "HIS"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

छान

Dr prajakta joshi
Sat, 03/25/2017 - 21:02 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा