[खो कथा] पोस्ट क्र. १
[खो कथा] पोस्ट क्र. २
[खो कथा] पोस्ट क्र. ३
[खो कथा] पोस्ट क्र. ४
[खो कथा भाग १ ते ४ - आतापर्यंत... आणि भाग ५]
शालू आणि शशिकांत हे नवरा बायको आहेत. नाशिकमध्ये राहतात. अशोक हा शशिकांतचा लहानपणीचा मित्र आणि अगदी घरातला मेँबर असल्यासारखा आहे. तो मुंबईला राहतो.
खुदीराम नावाचा गुढ इसम पांडव लेण्यांच्या परिसरात राहत असतो. एकदा खुदीरामची आणि शशिकांतची भेट होते. या भेटीत तो शशिकांतला त्याच्याजवळ असलेल्या गुढ आरशाबद्दल सांगतो. आरसा पाहिल्यावर शशिकांतला तो खुपच आवडतो त्याला त्याच्या पुढिल संशोधनासाठी फायद्याच असतो. तो खुदीरामकडे आरशाची मागणी करतो. खुदीराम त्याच्यासमोर दोन अटी ठेवतो -
१. आरशाबद्दल तू कुणालाच सांगायचं नाहीस. सांगितलं तर तुझा मृत्यू अटळ आहे.
२. तुला माझी मदत करावी लागेल.
बोल कबूल आहे? यावर शशिकांत म्हणतो कबूल आहे पण माझा एक मित्र आहे, अशोक. त्याला अशा गोष्टींत इंटरेस्ट आहे. फक्त त्याला सांगतो, चालेल का? खुदीराम म्हणतो ठीक आहे पण याद राख... याव्यतिरिक्त जर अजून कुणाला कळाले तर तुझा मृत्यू अटळ आहे.
ह्या आरस्याबद्दल शशिकांत अशोकजवळ बोलतो व त्याला नाशिकला येण्याची गळ घालतो.अशोकही उत्सुकतेपोटी नाशिकला जातो. नंतर शशिकांत आणि अशोक पांडवलेणीकडे जातात सोबत शालूही असते. शशिकांत जेव्हा पांडवलेणीच्या आसपास खुदिरामला शोधत असतो तेव्हा चुकून अशोक आरशाविषयी शालूजवळ बोलतो व तिला आरसा दाखवतो.नंतर ही गोष्ट शालू शशिकांतला सांगते. हे ऐकून धक्क्याने/ भितीने शशिकांत मरतो. शशिकांतच्या मरणाला आपणच जबाबदार आहोत असे वाटुन काही दिवसांनी शालूही आत्महत्या करते.
मधल्या काळात अशोक खुदिरामला गाठतो. खुदिरामकडून तो आरसा मिळवतो. तो आरसा मिळाल्यानंतर अशोकच्या आयुष्यात बराच गोंधळ उडतो. या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी अशोक पुन्हा खुदिरामकडे जातो. त्या दोघांमध्ये खूप बाचाबाची होते. शेवटी खुदिराम नरमतो व त्याला सत्य परिस्थिती सांगतो.
बोल काय म्हणतोस?
शास्त्रज्ञ म्हणतोस आणि प्रयोगात तुझे मुले कुठल्या तरी मितीत अडकले आहेत अस सांगतोस आणि माझी मदत मगतोस. तुझ्यावर विश्वास कसा ठेऊ. मला तर वाटत तु माझ्या मित्राला मारुन त्याच संशोधन चोरल आहेस. आणि आता माझा पण जिव घेशिल तुझं इसपित साध्या करण्यासाठी. बोल खर काय आहे. सोडव मला यातुन नाही तर मी मरेलच पण सोबत तुलाही नेईल.
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे काही तरी वेगळंच झालंय ह्या
हे काही तरी वेगळंच झालंय ह्या भागात...
आता पुढे नक्की काय लिहतील लेखक?
आता पुढे नक्की काय लिहतील
In reply to हे काही तरी वेगळंच झालंय ह्या by पिलीयन रायडर
बघा तुम्हाला पण उत्सुकता लगली ना. मग.
झक्कास. मजा आली. पण खो कोणाला
झक्कास. मजा आली. पण खो कोणाला?
पुढचा खो चॅटसवूड यांना देत आहे.
पुढचा खो चॅटसवूड यांना देत आहे
Best of Luck चॅटसवुड जी
धन्यवाद दीपकजी : )
धन्यवाद दीपकजी : )
हा भाग छान झालाय, लगेच लिहायला घेतो.
कथासूत्र रिकॅप केल्याने आता
कथासूत्र रिकॅप केल्याने आता मजा येतेय. पुढील भाग लवकर येऊदे.
छान दीपकजी. मजा आली.
छान दीपकजी. मजा आली.
आता सगळ्याचा संदर्भ लागतोय.
आता सगळ्याचा संदर्भ लागतोय. पुढच्या भागाची उत्सुकता!
उत्कंठावर्धक!!!!
चालू असलेल्या 'खो'शैलीतला (आणि तितक्या 'खो'लितला?) नाही वाटला पण आत्तापर्यंतचा सर्वात आवडलेला भाग!
म्हणजे आधिच्या लेखकांनी कृपया वाईट वगैरे वाटून घेऊ नये. पिकासोसारख्या थोर चित्रकाराला सुद्धा कोणीतरी समजावून सांगितलं कि मगच माझ्यासारख्या पामरास नीट काय ते कळतं.
अर्धे जिगसॉ जुळवून दिल्याबद्दल दीपक११७७ ह्यांना धन्यवाद!
हाच प्याटर्न फुडच्या पाच भागांना वापरलात तरी चालेल.
एक सूचना - कथेला नाव नको ठेवायला एवढ्यात. पाहिजे तर संपली लिहून की मग नावासाठी मतदान घेऊ, कसे?
'खो-खोची गोष्ट' हे आत्ताच बाद करून टाकू.
अर्धे जिगसॉ जुळवून
In reply to उत्कंठावर्धक!!!! by आषाढ_दर्द_गाणे
+1
दिपकभौ, लगे रहो!!!!
रिक्याप साठी धन्यवाद !
दीपकजी जरा इस्कटून सांगीतल्याने माझी सोय झाली बघा. पण भाग फारच आवरता घेतलाय.
छान
कथा जरा अजून पुढे सरकायला हवी होती.
++१११.. जरा जास्तच लवकर शेवट
In reply to छान by पैसा
++१११.. जरा जास्तच लवकर शेवट केल्यासारखे वाटले.
भन्नाट ट्वीस्ट
भन्नाट ट्वीस्ट
कथा अजुन मोठी हवी होती
कथा वाचताना लवकर संपल्यासारखी वाटली. पुढचे भाग जरा मोठे येउद्या. बाकी उत्सुकता अजुनच वाढतिये. ती अशीच टिकवुन ठेवा......
धन्यवाद @
धन्यवाद @
पिलीयन रायडर, ज्योति अलवनि, चॅट्सवूड, गवि, अॅस्ट्रोनाट विनय, प्राची अश्विनी, आषाढ_दर्द_गाणे, जव्हेरगंज, मोहन, पैसा, सौरा, टवाळ कार्टा, बरखा
@
मोहन, पैसा, सौरा, बरखा--
बरोबर आहे, भाग जरा छोटा झाला आहे, वाढवता आला असता पण पहिला प्रयत्न होता आणि पोस्ट करायची घाई पण
मस्त
दिपकभाऊ छान लिहिता, सगळे संदर्भ पुन्हा जुळले
मस्त ! धन्यवाद सगळं विस्कटून
मस्त ! धन्यवाद सगळं विस्कटून सांगितल्या बद्दल . आता पुढच्या भागाची उत्सुकता आहे.
जमलाय
वळण आलंय कथेला ...
खो कथेच्या वर आता जी
खो कथेच्या वर आता जी अनुक्रमणिका आली आहे आणि इथुनच मागचा भागही पहाता येतोय, त्याने फार मोठी सोय झाली आहे! उत्तम फिचर!
अनुक्रमणिका
In reply to खो कथेच्या वर आता जी by पिलीयन रायडर
अनुक्रमणिका आली आहे , त्याने फार मोठी सोय झाली आहे! उत्तम फिचर! छान
नाही छोटेखानी असला जरी हा भाग
नाही छोटेखानी असला जरी हा भाग तरी प्रत्येक 'खो'ला शब्दमर्यादा होती ना?
हो
In reply to नाही छोटेखानी असला जरी हा भाग by आषाढ_दर्द_गाणे
हो शब्दमर्यादा आहे, किमान ५०० शब्द, माझे झाले आहेत ४७८ शब्द.
चांगल्या खेळाडूला परत खो देता
चांगल्या खेळाडूला परत खो देता येतो का ?