होऊन आज सूर्य (गझल)
होऊन आज सूर्य अंधार प्यायलो मी
आभुषणे आगीची देहास ल्यायलो मी
माझ्या पराभवाची चिंता तुला कशाला
झेलुन वार सारे मस्तीत गायलो मी
केला किती तयांनी जन्मांतरी दगा तो
त्यांनाच गोडव्याचे हे दान द्यायलो मी
युद्धात दुःखितांच्या योद्धा कठोर होतो
भेटुन सज्जनांना अश्रुंत न्हायलो मी
बांधुन ठोकताळे जोखु नको मला तू
ते घास विस्तवाचे आजन्म घ्यायलो मी
पर्वा जरी नसे ती उन्मत्त भामट्यांची
बोलास लाघवाच्या किंचित भ्यायलो मी
जातो आहे किनारा तो गूढ लांब आता
नौकेत या कळेणा नि काय न्यायलो मी?
- शार्दुल हातोळकर
उत्तम!
धन्यवाद संदीपजी !!
छान अवीटच, एखाद्या मिपा
आवडली.
उत्कृष्ट गझल !!
अर्थपूर्ण , भावगर्भी गझल !
उत्तम ग़ज़ल... सुरेख भाव. वाह.
धन्यवाद !!
सुंदर! आवडली गझल खूप! खासकरून
सहीये भावा.
गजल जमलीय, पण ...
सर्व रसिक वाचकांचे मनापासुन आभार !! __/\__
मिपाचा यूट्यूब चॅनल आहे...
नक्कीच विचार करता येईल!