✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

होऊन आज सूर्य (गझल)

श — शार्दुल_हातोळकर, गुरुवार, 03/16/2017 - 13:45
होऊन आज सूर्य अंधार प्यायलो मी आभुषणे आगीची देहास ल्यायलो मी माझ्या पराभवाची चिंता तुला कशाला झेलुन वार सारे मस्तीत गायलो मी केला किती तयांनी जन्मांतरी दगा तो त्यांनाच गोडव्याचे हे दान द्यायलो मी युद्धात दुःखितांच्या योद्धा कठोर होतो भेटुन सज्जनांना अश्रुंत न्हायलो मी बांधुन ठोकताळे जोखु नको मला तू ते घास विस्तवाचे आजन्म घ्यायलो मी पर्वा जरी नसे ती उन्मत्त भामट्यांची बोलास लाघवाच्या किंचित भ्यायलो मी जातो आहे किनारा तो गूढ लांब आता नौकेत या कळेणा नि काय न्यायलो मी? - शार्दुल हातोळकर

प्रतिक्रिया द्या
3011 वाचन

💬 प्रतिसाद (14)

उत्तम!

चांदणे संदीप
गुरुवार, 03/16/2017 - 23:15 नवीन
मस्त गजल! आवडली!! Sandy
  • Log in or register to post comments

धन्यवाद संदीपजी !!

शार्दुल_हातोळकर
Sun, 03/19/2017 - 23:16 नवीन
या गझलेवर तुमचा एकमेव असा प्रतिसाद !! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

छान अवीटच, एखाद्या मिपा

माहितगार
Mon, 03/20/2017 - 09:36 नवीन
छान अवीटच, एखाद्या मिपा कट्ट्यावर तुमचे काव्य वाचने होणार असेल तर नक्कीच येऊ, आणि अर्थातच उपरोक्त गझल एखाद्या चांगल्या गायकाच्या आवाजात रेकॉर्ड होऊन मिळत असेल तर पैसे खर्च करुनही जवळ बाळगू.
  • Log in or register to post comments

आवडली.

प्राची अश्विनी
Mon, 03/20/2017 - 10:02 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट गझल !!

देशप्रेमी
Mon, 03/20/2017 - 11:39 नवीन
प्रत्येक शेरात खोल अर्थ सामावलेला आहे. मात्र मनमोकळेपणाने एक सांगावेसे वाटते की केवळ प्रतिसाद कमी असले तरी त्याने गझलचे महत्त्व कमी होत नाही.
  • Log in or register to post comments

अर्थपूर्ण , भावगर्भी गझल !

गौरी कुलकर्णी २३
Mon, 03/20/2017 - 12:28 नवीन
खुप छान गझल... थेट ह्रदयाला भिडते ! युद्धात दुःखितांच्या .....ओळी मनाला मोहवून टाकतात !! तूमच्या काव्यप्रतिभेला मनापासून सलाम !!!
  • Log in or register to post comments

उत्तम ग़ज़ल... सुरेख भाव. वाह.

वेल्लाभट
Mon, 03/20/2017 - 14:27 नवीन
उत्तम ग़ज़ल... सुरेख भाव. वाह. काही ठिकाणी अक्षरगणवृत्ताच्या नियमांत बसत नाहीये, तेही सुधारता येत असेल तर प्रयत्न करू शकतोस. पण अन्यथाही, उत्तम ! आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

शार्दुल_हातोळकर
Mon, 03/20/2017 - 16:00 नवीन
धन्यवाद वेल्लाजी, हो नक्कीच प्रयत्न करीन अधिक सुधारणा करण्याचा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

सुंदर! आवडली गझल खूप! खासकरून

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 03/20/2017 - 14:49 नवीन
सुंदर! आवडली गझल खूप! खासकरून ह्या ओळी खूपच आवडल्या - होऊन आज सूर्य अंधार प्यायलो मी आभुषणे आगीची देहास ल्यायलो मी
  • Log in or register to post comments

सहीये भावा.

किसन शिंदे
Mon, 03/20/2017 - 15:00 नवीन
फार आवडली ब्वॉ गझल. अगदी पहिल्या दोन ओळीपासूनच पुरता गुंतत गेलो पुढील संपूर्ण गझलेत.
  • Log in or register to post comments

गजल जमलीय, पण ...

अनन्त्_यात्री
Mon, 03/20/2017 - 15:21 नवीन
....."द्यायलो , घ्यायलो, न्यायलो" या शब्दा॑पाशी मात्र अडखळलो.
  • Log in or register to post comments

सर्व रसिक वाचकांचे मनापासुन आभार !! __/\__

शार्दुल_हातोळकर
Mon, 03/20/2017 - 15:54 नवीन
माहितगार, प्राची अश्विनी, देशप्रेमी, गौरी, वेल्लाभट, प्रसाद, किसनदा, अनन्त यात्री आपणा सर्वांना प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद !! __/\__ खरे तर रसिक वाचकांना सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे प्रतिसाद देण्याचा अधिकार असतो. पण जेव्हा वाचक प्रतिसाद लिहितच नाहीत तेव्हा साहित्यकृतीचे गुण/दोष जाणण्यापासुन कवी वंचित राहतो आणि त्याचा सल फार मोठा असतो. या गझलला आणि माझ्या इतरही गझलांना मी चाल लावली असुन त्यांच्या काही ओळी ऐकण्यासंदर्भात व्यनितुन संपर्क साधण्यास संकोच नसावा.
  • Log in or register to post comments

मिपाचा यूट्यूब चॅनल आहे...

वेल्लाभट
Mon, 03/20/2017 - 17:03 नवीन
मिपाचा यूट्यूब चॅनल आहे... तिथे टाकण्याचा विचार करावा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर

नक्कीच विचार करता येईल!

शार्दुल_हातोळकर
Mon, 03/20/2017 - 21:21 नवीन
गझला चाल लावुन तयार आहेत, पण सध्या संगीत देण्यासाठी संगीतकाराच्या शोधात आहे, त्यामुळे अद्याप रेकॉर्डिंग झालेले नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा