उंच माझा झोका - अभिवाचन

अनाहिता's picture
अनाहिता in लेखमाला
8 Mar 2017 - 6:52 am

.
.
****************************
****************************
.
या वर्षीच्या महिला दिन विशेषांकात काही निवडक लेखांचे, उतार्‍यांचे किंवा कवितांचे अभिवाचन करावे, अशी कल्पना मितानने मांडली आणि त्याप्रमाणे लगेच तसे आवाहन करण्यात आले. काय वाचता येईल, किती वेळाचे असावे, कॉपीराईटचे काय, आपला आवाज बरा वाटेल का, कशावर रेकॉर्ड करायचे, कुठे स्टोअर करायचे अशा अनेक प्रश्नांवर चर्चा घडल्या. त्यानिमित्ताने बरेच काही वाचून मग उत्साही अनाहितांनी काय वाचायचे ते ठरवले, आवश्यक तिथे मूळ लेखक/कवी यांच्याशी संपर्क साधून त्यांची परवानगी मिळवली, इतरही प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आली आणि सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही कल्पना प्रत्यक्षात उतरली. तुम्हाला हे अभिवाचन आवडेल आणि आनंद देणारे ठरेल, अशी आशा आहे.
.
****************************
****************************
.
कविता - उंच माझा झोका
लेखक - अरुण म्हात्रे
अभिवाचन - अजया
.

.
****************************
****************************
.
कविता - मज कृष्ण भेटला नाही
लेखक - प्राची अश्विनी
अभिवाचन - प्राची अश्विनी
.

.
****************************
****************************
.
कविता - का मनाचा चंद्र...
कवयित्री - सुनिती लिमये
अभिवाचन - सुनिती लिमये
.

.
****************************
****************************
.
कविता - अटी शर्ती लागू
कवयित्री - सुचेता
अभिवाचन - सुचेता सुळे
.

.

****************************
****************************
.
कथा - कळते रे
लेखिका - रातराणी
अभिवाचन - पद्मावती
.

.
****************************
****************************
.
लेख - मातृकुलवंश
लेखक - सिद्धार्थ अकोलकर
अभिवाचन - उल्का
.

.
****************************
****************************
डाऊनलोड करा.
.
उंच माझा झोका

का मनाचा चंद्र...

अटी शर्ती लागू

कळते रे..

मातृकुलवंश

मज कृष्ण भेटला नाही
.
.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

कंजूस's picture

8 Mar 2017 - 4:15 pm | कंजूस

छान अभिवाचन!

छान कविता ,कथा!अभिवाचनाची कल्पना आवडली.

सुचेता's picture

9 Mar 2017 - 6:08 pm | सुचेता

मस्त वाटतय अभिवाचन

पद्मावति's picture

8 Mar 2017 - 4:24 pm | पद्मावति

अजया, खूप गोड वाटतंय ऐकायला. सुरेख.
प्राची, कविता आणि अभिवाचन दोन्हीही सुंदर.
बाकीचेही ऐकणार एकेक करून.

प्राची अश्विनी's picture

8 Mar 2017 - 5:24 pm | प्राची अश्विनी

सुनिती, सुचेता, कविता, अभिवाचन आवडली.
अजया, छान सुरेल वाचन!!
लेख अजून ऐकायचेत.
रातराणीचा आवाज ऐकयची खूप इच्छा आहे.:)

रातराणी's picture

9 Mar 2017 - 10:45 am | रातराणी

प्राचीताई अगं पद्माक्काने केले आहे वाचन :) तिच्या आवाजात ऐकल्यावर पुन्हा माझ्या आवाजात ऐकणं म्हणजे अमिताभ बच्चनची सुदेश भोसलेंनी मिमिक्री करण्यासारखं आहे. तरीही तुझी इच्छा पूर्ण करण्याचा बंदोबस्त केला जाईल लवकरच ;)

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2017 - 6:19 pm | प्राची अश्विनी

वाट बघते हो!!!:)

सानिकास्वप्निल's picture

9 Mar 2017 - 3:40 am | सानिकास्वप्निल

अभिवाचनाची कल्पना उत्तम.
@ अजयाताई - उंच माझा झोक्याचे अभिवाच्न छान, सुरेल केलेयस. आपल्या अंकासाथी एकदम पर्फेक्ट!! अरुण म्हात्रे यांचे अनेक आभार __/\__
@ प्राची अश्विनी - सुंदर झालेय अभिवाचन. तुमची कविता तर सुरेखचं.
@ सुनितीताई - अप्रतिम कविता __/\__ काय सुंदर आवाज आहे.
@ पद्मावती - तुझ्यासारखचं सुंदर अभिवाचन केले आहेस :) गोड आवाज, क्या नजाकत!! वाह! वाह! मजा आ गया.
@ उल्काताई - अप्रतिम झालेय अभिवाचन. लेख आवडला.

इतक्या सुरेख प्रतिक्रियेबद्दल थँक्स गं सानिका.

अभिवाचन करायचे ठरल्यावर माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त ' कळते रे ' च आली. मिपावरची माझी अत्यंत आवडीची कथा.
या अप्रतिम कथेचा अंश वाचायची मला परवानगी दिल्याबद्दल मिपाकर रातराणी यांचे मन:पूर्वक आभार. थँक्स सो मच रारा.

सुनिती-- कविता आणि आवाज अगदी सुंदर
सुचेता-- कविता आणि अभिवाचन खूप आवडले.
उल्का-- लेख आणि तुझा आवाज, वाचन मस्तच.

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 9:03 am | प्रीत-मोहर

@अजया अग तु इतक्या गोड आवाजाची आहे हे आजच कळल मला ;)
@प्राचीअश्विनी तु माझ्या मिपावरच्या आवडत्या कवींपैकी एक आहेस. तुझी ही कविता वाचली होती तेव्हा आवडली होतीच, पण तुझ्याच आवाजात ऎकताना अजून जास्त आवडली. शहारा आला होता अंगावर ऎकताना.

@सुनीती ताई काय गोड गाताहो तुम्ही. कविता आणि त्याच गायन दोन्ही आवडल

@सुचेता कविता आवडली

@पद्मावति तुझ्याइतकं सुंदर वाचन. परत एकदा सांगते तुझ्या आवाजाची फ्यान झालीय मी.

@उल्का खूप सुंदर माहितीपूर्ण लेखाचं अप्रतिम वाचन.

प्राची अश्विनी's picture

10 Mar 2017 - 12:21 pm | प्राची अश्विनी

थँक्स ग. पण मी मोजून चारच लिहिल्यात कविता.:)

प्रीत-मोहर's picture

10 Mar 2017 - 12:37 pm | प्रीत-मोहर

हो त्याच आवडल्यात म्हणतेय मी. कविता ४ असोत की ४०० कवी हा कवी असतो ;)

खूप सुंदर झालेत सगळेच अभिवाचन! पूर्ण अंकच अफलातून आहे अनुक्रमनिकेसहीत!

सस्नेह's picture

9 Mar 2017 - 3:53 pm | सस्नेह

वाचणे आणि ऐकणे यात किती फरक असतो, ते ही अभिवचने ऐकताना समजले. शब्द अगदी भाव आणि सुरांची लेणी घेऊन भेटायला आल्यासारखे वाटले !

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2017 - 6:18 pm | प्राची अश्विनी

सर्वांना धन्यवाद, उल्का अन् पद्मावती,
फारच सुरेख. गद्य वाचनात शेवटपर्यंत श्रोत्याला खिळवून ठेवणे कठीण असते. फक्कड जमलय. राराची कथा तर एक नंबरच!

उल्का's picture

10 Mar 2017 - 10:31 am | उल्का

अभिवाचन आवडल्याबद्दल आभार!
सगळ्या कवितांचे वाचन सुरेख झाले आहे.
कवितां इतकेच सुंदर!
पद्मा तुझं कथा वाचन खूप आवडलं.

कसलं क्लासी झालेय अभिवाचन! hatts off to all lovely voices!! अजया तै मस्त, पद्मावति तै तूझी पंखी झालेय मी तर !!
उल्का तै,प्राची,सुचेता ते,सूनिति सगळ्यांचे अभिवाचन खुप आवडले.

पैसा's picture

11 Mar 2017 - 10:59 pm | पैसा

अजया, प्राची, सुनीति, सुचेता, पद्मावति, कवितांचे मस्त अभिवाचन! प्राचीच्या म्हणण्याला +१. पद्मावती आता प्रोफेशनल सारखे अभिवाचन करते आहे. आता रातराणीच्या आवाजात अखखी कथा ऐकायला आवडेल.

उल्काने वाचलेला लेखही आवडला. हा लेख टाईप करून त्यावर चर्चा व्हायला हवी.

जव्हेरगंज's picture

12 Mar 2017 - 12:17 am | जव्हेरगंज

Downloadable लिंका असत्या तर बरं झालं असतं!

मोबाईलवरुन stream व्हायला अवघड जातंय!!

इडली डोसा's picture

12 Mar 2017 - 12:57 am | इडली डोसा

देता येतील का ते बघते

पूर्वाविवेक's picture

15 Mar 2017 - 12:15 pm | पूर्वाविवेक

अतिशय छान उपक्रम. त्याबद्दल मितानला खूप कौतुक आणि धन्यवाद.
अजया, प्राची अश्विनी, सुनिती, पद्मावती, उल्काताई तुम्हा सर्वांचे आवाज सुरेल आणि साजेसे लागले आहेत.

अतिशय छान उपक्रम. त्याबद्दल मितानला खूप कौतुक आणि धन्यवाद

असंच म्हणते..

सगळ्यांचंच अभिवाचन छान झालंय..

शामसुता's picture

18 Mar 2017 - 2:54 pm | शामसुता

अतिशय छान कल्पना. सगळ्यांंचे अभिवाचन खुप आवडले.

उल्का ,पद्मा,सुनितीताई,प्राची खूपच छान झालंय तुमचं अभिवाचन.

स्वाती दिनेश's picture

19 Mar 2017 - 10:20 pm | स्वाती दिनेश

अभिवाचनाची कल्पना आवडली आणि सुरेख झाले आहे.
स्वाती

रुपी's picture

14 Jun 2017 - 4:38 am | रुपी

अभिवाचनाची कल्पना फार आवडली.. निवांत ऐकू म्हणून राहूनच गेले होते, ते आज सगळे लक्ष देऊन ऐकले.
सर्वांचे आवाज खूप सुंदर आहेत.

पद्मावति, तू किती किती सुरेख अभिवाचन केलं आहेस! आवाजातले चढ-उतार अतिशय छान जमलेत. रातराणीची ही कथा माझी वाचायची राहून गेलीये. आता नक्की वाचते, लिंकसाठी धन्यवाद!