आदिप्रश्न
लेखनविषय:
काव्यरस
धगधगे कोटी सूर्यांचे
स्थंडिल अहर्निश जेथे
का अनादि ब्रह्माण्डाचे
लघुरूप जन्मते तेथे ?
अणुगर्भ कोरुनी बघता
जी अवघड कोडी सुटती
त्या पल्याड पाहू जाता
का शून्य येतसे हाती ?
का अंत असे ज्ञेयाला
की ज्ञान तोकडे ठरते
की सीमा अज्ञेयाची
अज्ञात प्रदेशी वसते ?
वाचने
2322
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
कविता अप्रतिम!
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by अनन्त्_यात्री
कृहघ्या...
अप्रतिम. थेट
धन्यवाद
वाह!
धन्यवाद !
उत्कृष्ट !!
धन्यवाद !
आवडली. इतकी धगधगीत की खरंतर
धन्यवाद प्राची अश्विनी ! निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांची धग ...
सुरेख!
धन्यवाद !
६ अधिक ६
@सूड, स्कोअर-कीपि॓गची अनाहूत सेवा पुरविल्याबद्दल आभार !