मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आदिप्रश्न

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
धगधगे कोटी सूर्यांचे स्थंडिल अहर्निश जेथे का अनादि ब्रह्माण्डाचे लघुरूप जन्मते तेथे ? अणुगर्भ कोरुनी बघता जी अवघड कोडी सुटती त्या पल्याड पाहू जाता का शून्य येतसे हाती ? का अंत असे ज्ञेयाला की ज्ञान तोकडे ठरते की सीमा अज्ञेयाची अज्ञात प्रदेशी वसते ?

वाचने 2322 वाचनखूण प्रतिक्रिया 15

चांदणे संदीप गुरुवार, 03/09/2017 - 14:51
पण तुमची एक कविता वाचली की "सखाराम गटणेच्या" चालीवर असे म्हणावेसे वाटते की पुढचा आठवडाभर एखादी चारोळीही वाचू नये! ;) कृहघ्या! Sandy

अनन्त्_यात्री गुरुवार, 03/16/2017 - 10:17
धन्यवाद प्राची अश्विनी ! निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांची धग एखाद्या अस्पष्टपणे ऐकू येणाऱ्या मोहक गीतासारखी पिच्छा सोडत नाही !