✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा शिमगा २०१७ : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Mon, 03/13/2017 - 10:15  ·  लेख
लेख
राम राम मंडळी, सर्व मिपाकरांना, वाचकांना, मालकांना, तंत्रज्ञ आणि मिपा व्यवस्थेतील सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....! *आम्हाला कामधामं सोडून मिपाचा नाद लावणा-या मिपा मालक नीलकांतसेठच्या नावाने रे .....भो.....बो बो बो बो. *मिपावर काटछाट करणार्‍या पण सध्या मोकळेपणाने वावरु देणार्‍या संपादकांच्या नावाने रे भो...! *खरडफळा लेखकांच्या नावाने रे भो.... बो बो बो बो बो. *मिपाच्या बॅनर बनविणार्‍याच्या नावाने रे हो.... बो बो बो बो. * काथ्याकूटून वात आणना-या फिलॉसॉफर चे रे...भो.... बोबोबोबो. * साहित्य संपादकांच्या वात आणनार्‍या उपक्रमांचा रे भो... बोबोबोबो. * कोनाडा सुरु न करणार्‍या पुरुषांच्या नावाने रे भो... बो बो बो. * बंडखोर, विद्रोही, पिरा, सृजा, यशो.... च्या रे भो....बोबोबोबो. *अलंगडीवर पलंगडी, पलंगडी पडली खळ्यात आणि ..... टींबटींब रे भो...बोबोबोबो. *मी चाललो नदीकाठाने मला सापडली लकडी आणि ... ...भो... बोबोबोबो. db * डिस्क्लेमर : १. सर्व लिखाण केवळ मौजमज्जा व टाईमपास म्हणुन घ्यावे, ह्या निमीताने कुणाशी भांडण काढुन खाज मिटवु नये. २. व्यक्तीगत आरोप करु नये. मा.मोदी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा. यांना दूर ठेवावे. मारा बोंबा च्यायला जे होईन ते होईन....!!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
सुभाषिते
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
50912 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

एक्का काकांच्या

वरुण मोहिते
Mon, 03/13/2017 - 17:30 नवीन
माहितीपूर्ण प्रतिसादाला बॉ बॉ !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

.

संजय क्षीरसागर
Mon, 03/13/2017 - 20:38 नवीन
तिसरी /चवथीतच आम्हाला गेलेले, आणि नंतरच्या हयातीत फिजिकली वापरलेले, सर्रास शब्द एखाद्याला समजू शकत नाहीत, अशा सात्विक भ्रमात असणार्‍या म्हात्रेंच्या बैलाला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

http://www.misalpav.com

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/13/2017 - 21:05 नवीन
http://www.misalpav.com/comment/925642#comment-925642 आपणच 3:32 pm ला दिलेला हा प्रतिसाद 8:38 pm ला विसरणार्‍या संक्षींच्या बैलाला... जाउंदे आता... हा प्रतिसादच नाहीय. वरचा संक्षींचाच प्रतिसाद शेवटचा आहे. =)) ================= अभ्या.. च्या शब्दांचे सर्व हक्क अभ्या.. च्या स्वाधीन ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ग्रँडमस्ती हा शब्दच न कळलेल्या ....

संजय क्षीरसागर
Mon, 03/13/2017 - 21:11 नवीन
जाऊं दे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तो तुमच्या मनातला शब्द, अभ्या

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/13/2017 - 21:13 नवीन
तो तुमच्या मनातला शब्द, अभ्या..च्या मनातला शब्द अभ्या..ला विचारा, व्यनितून =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ग्रँडमस्ती हा शब्दच न कळलेल्या ....

संजय क्षीरसागर
Mon, 03/13/2017 - 21:14 नवीन
आणि त्याचा पूर्वभाग इंग्रजी आहे असे वाटणार्‍या.... जाऊं दे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

माझं चित्र.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 15:36 नवीन
माझं कार्टून काढण्याचा प्रयत्न करुन ते चित्र धाग्यात टाकणार्‍या अभ्याच्या वळूला बॉबॉबॉबॉबॉ....!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

डिबींच्या धाग्यावर डिबींचंच

संजय क्षीरसागर
Mon, 03/13/2017 - 16:01 नवीन
लै भारी पोस्टर टाकून, नेमका नेम साधणार्‍या, अभ्याच्या बैलाला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडासा नेम चुकलायं!

संजय क्षीरसागर
Mon, 03/13/2017 - 16:04 नवीन
मारा बोंबा च्यायला जे होईन ते होईन....!!! असं डोक्यावर लिहायला हवं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मिपा मुळे चक्क

वरुण मोहिते
Mon, 03/13/2017 - 15:41 नवीन
बिरुटे सरांचं काम वैग्रे सुटलंय आणि मिपा मुळे संक्षी ह्यांना जिगर आलीये !!!आनंदी जाहलो अवांतर _मला आज कोणी फुकट प्यायला नाही दिली ...बॉ बॉ बॉ
  • Log in or register to post comments

वरुणच्या नावानं चांगभलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 15:52 नवीन
सतत मा.मोदीविरोधी मिपावर प्रतिसाद लिहुन लिहुन प्रतिस्पर्ध्यांना दमवणार्‍या वरुन मोहित्यांच्या वळूच्या रे भो... बॉबॉबॉ. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

धुळवडीला पण आदब पाळून,

संजय क्षीरसागर
Mon, 03/13/2017 - 15:57 नवीन
मोदींच्या नांवामागे मा. लावणार्‍या, अती सभ्य डिबींच्या बैलाला हो ऽ ओ ऽ ओ ऽ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ये ...बसू ;)

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 15:54 नवीन
ये ...बसू ;) . नुसती आश्वासने देणार्‍यांच्या हत्तीला बॉबॉबॉबॉबॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

सौजन्य.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 16:00 नवीन
स्वतंत्र संकेतस्थळ असूनही प्रतिसादाच्या अपेक्षेने इकडे धागे बदाबदा ओतणार्‍यांच्या ( काय नाव त्यांचं ते विसरलो)नावाने बॉ बॉ बॉ बॉ.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

उडवा रे, पैलेछूट उडवा.

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 16:04 नवीन
उडवा रे, पैलेछूट उडवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

( काय नाव त्यांचं ते विसरलो) नांवाने

संजय क्षीरसागर
Mon, 03/13/2017 - 16:08 नवीन
ओततो मी विदा बदाबदा, म्हणा मला `सदाविदा' असं नांवे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर, नेम चुकला तुमचा.

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 16:12 नवीन
मास्तर, नेम चुकला तुमचा. मिसाईलचं प्रोग्रामिंग कोड चुकला दिसतय कैतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बरोबर हैत त्ये.

मोदक
Mon, 03/13/2017 - 18:18 नवीन
बरोबर हैत त्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छान छान वाचनीय असताना उगा

पियुशा
Mon, 03/13/2017 - 20:00 नवीन
छान छान वाचनीय असताना उगा हिकडे तिकडे भेदभाव करणाऱ्या, खाजावून आवधान अण्णाऱ्या "आय डी" च्या नावाने लाउड स्पीकर लावून मोठा बो बॉ बॉ बॉ बॉ..................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या घरालालाच मागे आग

कंजूस
Mon, 03/13/2017 - 16:30 नवीन
आपल्या घरालालाच मागे आग लागलिये न बघता शिरेलींत कुणाचे पापड जळताहेत लक्ष ठेवणाय्रांच्या बैलाला बोबोबो.
  • Log in or register to post comments

कंजूसकाकाच्या बैलाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 16:33 नवीन
संदर्भासहित स्पष्टीकरण न लिहिण्यार्‍या कंजूस काकांच्या वळुला रे भो. बॉ बॉ बॉ बॉ.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मिपावर आणी धाग्यावर(वेळ असुण

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/13/2017 - 17:51 नवीन
मिपावर आणी धाग्यावर(वेळ असुण ही) न येणाय्रा समस्त आयडींच्या बैलाला .. बॉ बॉ बॉ बॉ.....! =))
  • Log in or register to post comments

त्याच बरोबर भावविश्वाचे पुढचे

टवाळ कार्टा
Mon, 03/13/2017 - 19:40 नवीन
त्याच बरोबर भावविश्वाचे पुढचे भाग ना लिहिता आम्हाला वाट बघत ठेवणार्या अत्मुगुर्जींच्या वेदोक्त बैलाला बॉ बॉ बॉ बॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+बॉबॉबॉ...

संजय पाटिल
Mon, 03/13/2017 - 20:14 नवीन
+बॉबॉबॉ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माझ्या या प्रतिक्रीये आधि ......

दीपक११७७
Mon, 03/13/2017 - 18:15 नवीन
माझ्या या प्रतिक्रीये आधि आणि माझ्या या प्रतिक्रीये नंतर प्रतिक्रीया देणा-या, या सर्वांच्या बैलाला .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ
  • Log in or register to post comments

असं म्हणनार्याच्या बैलाला ..

समाधान राऊत
Mon, 03/13/2017 - 18:27 नवीन
असं म्हणनार्याच्या बैलाला ...बॉबॉबॉबॉबॉबॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७

वल्लीच्या बैलाला....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 19:30 नवीन
महिलांची सहानुभूती मिळावी, गोगोड प्रतिसाद यावेत, त्यांनी चहा पोह्यांची स्थळे सुचवावीत, आपली इमेज खराब होऊ नये म्हणून माझ्या धाग्यावर प्रतिसाद न देणा-या वल्लीच्या बैलाला रे भो...बॉ बॉ बॉ बॉ.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

महिलांची सहानुभूती मिळावी,

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 19:33 नवीन
महिलांची सहानुभूती मिळावी, गोगोड प्रतिसाद यावेत, त्यांनी चहा पोह्यांची स्थळे सुचवावीत, आपली इमेज खराब होऊ नये म्हणून माझ्या धाग्यावर प्रतिसाद न देणा-या वल्लीच्या
अरारारारारारारा क्यासे क्या हो गया..... बेवफा उसके प्यार में........ .
महिलांची सहानुभूती मिळावी, गोगोड प्रतिसाद यावेत, त्यांनी चहा पोह्यांची स्थळे सुचवावीत, आपली इमेज खराब होऊ नये म्हणून माझ्या धाग्यावर प्रतिसाद न देणा-या वल्लीच्या
मास्तर, खरंच असं असतं का हो? . निरागस, सालस अन थोडा भीडस्त अभ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निरागस, सालस अन थोडा भीडस्त

अद्द्या
Tue, 03/14/2017 - 11:15 नवीन
निरागस, सालस अन थोडा भीडस्त अभ्या...
बाकी सगलं वाचून हसू कंट्रोल केलं होतं . पण हे वाचून .. नाही नाही.. अशक्य =]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पितळखोऱ्यात जाऊनही त्यावर लेख

प्रचेतस
Mon, 03/13/2017 - 19:47 नवीन
पितळखोऱ्यात जाऊनही त्यावर लेख न लिहिणाऱ्या प्राडॉ सरांच्या बैलाला रे भो...बॉ बॉ बॉ बॉ.....! सोलापुरातून शेंगाचटणीचं पार्सल आणून माझ्याऐवजी भलत्यालाच देणाऱ्या अभ्याच्या बैलाला रे भो...बॉ बॉ बॉ बॉ.....! मालवणी पदार्थ रोज रोज खाणाऱ्या धन्याच्या रे भो...बॉ बॉ बॉ बॉ.....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेगाबायटी डांग्याच्या

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 19:56 नवीन
मेगाबायटी डांग्याच्या कीबोर्डाच्या हाल्याला. बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ सोन्याबाप्याच्या बेशिक आर्मीमन मस्तीला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ सर्वगुणसंपन्न नीच स्वाम्याच्या कफनीला बॉबॉबॉबॉबॉबॉ होबाश्या सच्च्याच्या कठाळ्याला बॉबॉबॉबॉबॉबॉ चिऊकाऊ चिनार्‍याच्या झाडाला बॉबॉबॉबॉ . एकूनच सगळ्या वर्‍हाडी मेंबरांच्या नावानं आता होलसेल बॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ
  • Log in or register to post comments

चिऊकाऊ नाय रे..अतिरेकी

चिनार
Tue, 03/14/2017 - 10:57 नवीन
चिऊकाऊ नाय रे..अतिरेकी बस्त्यात लेका लपून चिनार झाडाच्या ढोलीत..बापूले घेजो विचारून.. बापू...हाना त्येच्याआयला... प्रत्येक धाग्यावर येक तरी पिंक टाकणाऱ्या अभ्याच्या बैलाले बॉ बॉ बॉ बॉ.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हे बरंय!

कवितानागेश
Mon, 03/13/2017 - 21:18 नवीन
हा धागा वर्षभर चालू ठेवा सर. इतर ठिकाणी शांतता राहील! ;)
  • Log in or register to post comments

क्यालिंडरावर सुई लावून स्कोर

कंजूस
Mon, 03/13/2017 - 21:39 नवीन
क्यालिंडरावर सुई लावून स्कोर लिहून ठेवणाय्रा मेंम्ब्रांच्या बैलाला ढोल.
  • Log in or register to post comments

होळी का शिमगा?

नीलकांत
Mon, 03/13/2017 - 21:39 नवीन
नवीन थीम च्या नावे बोटं मोडणार्‍या डीबी सरांच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... नवीन नवीन सुविधा मागणारे व नंतर गायबणार्‍या सदस्यांच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... नेमकं जसं मस्तीत मला वागायचं अन जमत नाही तश्या मस्तीत वावरणार्‍या अनेक सदस्याच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... अर्धवट लेखमाला सोडणार्‍या सदस्यांच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... पॅरीसला जाऊन अचानक गायब होणार्‍या प्रशांतच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... दर वेळेस करतो म्हणून सुध्दा मिपाच्या कामातून गायब होणार्‍या व मी मागेच बरा असं वागणार्‍या आंनंदयात्रीच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... कायम डोक्यात जिलेटीनच्या कांड्या भरून फिरणार्‍या अभ्याच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ..... मध्येच अचानक गायब झालेल्या किसन शिंदेंच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... दिल्लीला दिल देऊन बसलेल्या संकेतानंदस्वामीच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... ...आणि शेवटी नेहमी माझंच खरं आणि तू विचारतर कर मात्र माझ्याच मनासारखा वाग म्हणणार्‍या सर्व सदस्यांच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ... ( बुरा ना मानो होली है) - हे न समजणार्‍याच्या सुध्दा बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... - नीलकांत
  • Log in or register to post comments

या

आनंदयात्री
Mon, 03/13/2017 - 21:50 नवीन
या मिसळ्पावपेक्षा महाराष्ट्र शासन मोठं मानणाऱ्या नीलकांतच्या बैलाला रे ... बो बो बो बो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

मालकाच्या बैलाला रे हो...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 22:01 नवीन
शिमग्याला धाग्यावर हजेरी लावून आम्हीबी तुमच्यातलेच हाय असं सिद्ध करणा-या मालकाच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ..! >>>>>> कायम डोक्यात जिलेटीनच्या कांड्या भरून फिरणार्‍या अभ्याच्या बैलाला... =))) क्या सॉलिड कलर दाला, मार दाला..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

हनतिच्यामारी,

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 23:03 नवीन
हनतिच्यामारी, अशा परकारे, याटिकानी मालकांनी लेट एन्ट्री मारुनपन फुल्ल शिट्ट्या मिळवलेल्या हायेत. आमचे लाडके नेते किसन्याच्या अन पशाच्या बैलाचा यथस्थित उध्दार झालेला असल्याने याटिकानी मालकांना हार, होळीतला नारळ आनि पुस्प्गुच देऊन प्राडॉ बिरुटे सरांकडून सत्कार करणेत येत आहे. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

चक्क!! भारीये! =))

यशोधरा
Tue, 03/14/2017 - 07:38 नवीन
चक्क!! भारीये! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

करतो करतो म्हणुन काहीच न करता

पिलीयन रायडर
Mon, 03/13/2017 - 22:15 नवीन
करतो करतो म्हणुन काहीच न करता उगाच वातीसारखं तेवत ठेवणार्‍या काही क्ष माणसांच्या बैलाला.... "काय" लिहीलंय पेक्षा "कुणी" लिहीलयं ते पाहुन बोलणार्‍या लोकांच्या बैलाला.. गोड गोड बोलुन सगळ्याच डगरींवर पाय ठेवणार्‍या डबल ढोलक्यांच्या बैलाला.. आपले ते नेमके मुद्दे, दुसर्‍याचं ते भांडण म्हणणार्‍यांच्या बैलाला.. डु आयडीच्या मागे लपुन स्कोअर सेटल करणार्‍या भित्र्या भागुबाईंच्या बैलाला.. आणि काही बोम्बा सवयीप्रमाणे... काड्या सारणार्‍या डीबी अंकलच्या बैलाला.... सकल सर्वज्ञ संक्षी ठाकुरांच्या बैलाला.. अत्यंत फाटक्या तोंडाच्या अभ्याच्या बैलाला.. बुरा न मानो होली है करत बेहती गंगामे हात धोणार्‍यांच्या बैलाला!! बो बो बो बो बो....
  • Log in or register to post comments

आणि काही बोम्बा सवयीप्रमाणे..

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 23:06 नवीन
आणि काही बोम्बा सवयीप्रमाणे... काड्या सारणार्‍या डीबी अंकलच्या बैलाला.... सकल सर्वज्ञ संक्षी ठाकुरांच्या बैलाला.. अत्यंत फाटक्या तोंडाच्या अभ्याच्या बैलाला..
. आयोव... म्या कुटं फाटक्या तोंडाचा माय. खरं हाय ते बोलितो. सवयीच्या लिस्टात घातलं जणू नाव आमचं. लै कष्टानं कमवलं हाय बरं ते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आपण मराठवाड्याचे ना अभ्या..

पिलीयन रायडर
Tue, 03/14/2017 - 04:33 नवीन
आपण मराठवाड्याचे ना अभ्या.. आपली तोंडं फाटकीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पै राहिल्या... त्या शिवाय समारोप नै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 22:21 नवीन
या हं गोव्याला, या हं गोव्याला असे म्हणून गोव्यात आल्यावर लांज्याला पळणाऱ्या पैच्या बैलाला रे भो. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ह्या!

पैसा
Mon, 03/13/2017 - 22:29 नवीन
ह्या! राहिल्या कुठे? मग इतक्या वेळ कोणाच्या नावाने बरेच लोक बोंबलत आहेत तर!! मिपावरच्या सगळ्या बैलांच्या बैलाला होऽऽऽ सुटीत गोव्याला नक्की या हं. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झोपायच्या पहिले थोडे बोंबलुन

समाधान राऊत
Mon, 03/13/2017 - 23:22 नवीन
झोपायच्या पहिले थोडे बोंबलुन घ्यवा म्हणतोय बॅा बॅा बॅा बॅा बॅा बॅा बॅाबॅा बॅा बॅा बॅा बॅा बॅा बॅा चुना लावुन बोंबलायची रेसिपी मिळाली तर बर व्हयील
  • Log in or register to post comments

कुठं?

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 23:34 नवीन
कुठं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत

ख्याक

समाधान राऊत
Tue, 03/14/2017 - 17:58 नवीन
बस का भावा..आपुन रंग अन चुना फक्त हाताला अन दुसर्याल्या लावतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ए...जिगर.

अभ्या..
Tue, 03/14/2017 - 18:18 नवीन
ए...जिगर. घे भावा डब्बल. आपल्यातलाच तू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत

थोडा वेळ आहे राव धुळवड

अभ्या..
Tue, 03/14/2017 - 00:05 नवीन
थोडा वेळ आहे राव धुळवड संपायला. बरेच आयडी राह्यलेत बोंबलिस्टीत. घेऊ त्यांना पण .... . आदी नमन आदूबाळाला, चोवीस तास प्रतिभा नळाला. अविरत मग येऊ बॅटूखाटीकाकडं गणितसंस्कृताचं घेऊनी धडं गाजवत प्रगो बैसी बकध्यानाला मारीयुआनाच्या प्रभावाला मिरवत गणपा आणे आव्हनाला ड्रंकन बम चिकनाला बसवत आता पायघड्या टाकू हसत येतील नाखू खाजवत वप्याच्या मागं लै किडं संगतीनं देव बी बिघडं लाजवत सूडक्याची येगळीच जात पाण्यात मारी उगा हात भिजवत. . तमाम माझ्या मिपाकर मित्रांनो. तुम्ही हायेत तर मिपा हाये. म्हणोन तुमच्या सगळ्या खिल्ल्ल्लाराच्या नावानं बॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ
  • Log in or register to post comments

वर्षभर माझ्या नावानं (आणि नाव

संदीप डांगे
Tue, 03/14/2017 - 00:14 नवीन
वर्षभर माझ्या नावानं (आणि नाव न घेताही) बो बो करणार्‍यांच्या बैलान्ला ....... बो बो बो बो बो!!!!!!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा