Skip to main content

मिपा शिमगा २०१७ : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 13/03/2017 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, सर्व मिपाकरांना, वाचकांना, मालकांना, तंत्रज्ञ आणि मिपा व्यवस्थेतील सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....! *आम्हाला कामधामं सोडून मिपाचा नाद लावणा-या मिपा मालक नीलकांतसेठच्या नावाने रे .....भो.....बो बो बो बो. *मिपावर काटछाट करणार्‍या पण सध्या मोकळेपणाने वावरु देणार्‍या संपादकांच्या नावाने रे भो...! *खरडफळा लेखकांच्या नावाने रे भो.... बो बो बो बो बो. *मिपाच्या बॅनर बनविणार्‍याच्या नावाने रे हो.... बो बो बो बो. * काथ्याकूटून वात आणना-या फिलॉसॉफर चे रे...भो.... बोबोबोबो. * साहित्य संपादकांच्या वात आणनार्‍या उपक्रमांचा रे भो... बोबोबोबो. * कोनाडा सुरु न करणार्‍या पुरुषांच्या नावाने रे भो... बो बो बो. * बंडखोर, विद्रोही, पिरा, सृजा, यशो.... च्या रे भो....बोबोबोबो. *अलंगडीवर पलंगडी, पलंगडी पडली खळ्यात आणि ..... टींबटींब रे भो...बोबोबोबो. *मी चाललो नदीकाठाने मला सापडली लकडी आणि ... ...भो... बोबोबोबो. db * डिस्क्लेमर : १. सर्व लिखाण केवळ मौजमज्जा व टाईमपास म्हणुन घ्यावे, ह्या निमीताने कुणाशी भांडण काढुन खाज मिटवु नये. २. व्यक्तीगत आरोप करु नये. मा.मोदी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा. यांना दूर ठेवावे. मारा बोंबा च्यायला जे होईन ते होईन....!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 51287
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

In reply to by कंजूस

संदर्भासहित स्पष्टीकरण न लिहिण्यार्‍या कंजूस काकांच्या वळुला रे भो. बॉ बॉ बॉ बॉ.....! -दिलीप बिरुटे

In reply to by अत्रुप्त आत्मा

त्याच बरोबर भावविश्वाचे पुढचे भाग ना लिहिता आम्हाला वाट बघत ठेवणार्या अत्मुगुर्जींच्या वेदोक्त बैलाला बॉ बॉ बॉ बॉ

माझ्या या प्रतिक्रीये आधि आणि माझ्या या प्रतिक्रीये नंतर प्रतिक्रीया देणा-या, या सर्वांच्या बैलाला .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ

महिलांची सहानुभूती मिळावी, गोगोड प्रतिसाद यावेत, त्यांनी चहा पोह्यांची स्थळे सुचवावीत, आपली इमेज खराब होऊ नये म्हणून माझ्या धाग्यावर प्रतिसाद न देणा-या वल्लीच्या बैलाला रे भो...बॉ बॉ बॉ बॉ.....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महिलांची सहानुभूती मिळावी, गोगोड प्रतिसाद यावेत, त्यांनी चहा पोह्यांची स्थळे सुचवावीत, आपली इमेज खराब होऊ नये म्हणून माझ्या धाग्यावर प्रतिसाद न देणा-या वल्लीच्या
अरारारारारारारा क्यासे क्या हो गया..... बेवफा उसके प्यार में........ .
महिलांची सहानुभूती मिळावी, गोगोड प्रतिसाद यावेत, त्यांनी चहा पोह्यांची स्थळे सुचवावीत, आपली इमेज खराब होऊ नये म्हणून माझ्या धाग्यावर प्रतिसाद न देणा-या वल्लीच्या
मास्तर, खरंच असं असतं का हो? . निरागस, सालस अन थोडा भीडस्त अभ्या...

In reply to by अभ्या..

निरागस, सालस अन थोडा भीडस्त अभ्या...
बाकी सगलं वाचून हसू कंट्रोल केलं होतं . पण हे वाचून .. नाही नाही.. अशक्य =]]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पितळखोऱ्यात जाऊनही त्यावर लेख न लिहिणाऱ्या प्राडॉ सरांच्या बैलाला रे भो...बॉ बॉ बॉ बॉ.....! सोलापुरातून शेंगाचटणीचं पार्सल आणून माझ्याऐवजी भलत्यालाच देणाऱ्या अभ्याच्या बैलाला रे भो...बॉ बॉ बॉ बॉ.....! मालवणी पदार्थ रोज रोज खाणाऱ्या धन्याच्या रे भो...बॉ बॉ बॉ बॉ.....!

मेगाबायटी डांग्याच्या कीबोर्डाच्या हाल्याला. बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ सोन्याबाप्याच्या बेशिक आर्मीमन मस्तीला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ सर्वगुणसंपन्न नीच स्वाम्याच्या कफनीला बॉबॉबॉबॉबॉबॉ होबाश्या सच्च्याच्या कठाळ्याला बॉबॉबॉबॉबॉबॉ चिऊकाऊ चिनार्‍याच्या झाडाला बॉबॉबॉबॉ . एकूनच सगळ्या वर्‍हाडी मेंबरांच्या नावानं आता होलसेल बॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ

In reply to by अभ्या..

चिऊकाऊ नाय रे..अतिरेकी बस्त्यात लेका लपून चिनार झाडाच्या ढोलीत..बापूले घेजो विचारून.. बापू...हाना त्येच्याआयला... प्रत्येक धाग्यावर येक तरी पिंक टाकणाऱ्या अभ्याच्या बैलाले बॉ बॉ बॉ बॉ.......

हा धागा वर्षभर चालू ठेवा सर. इतर ठिकाणी शांतता राहील! ;)

नवीन थीम च्या नावे बोटं मोडणार्‍या डीबी सरांच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... नवीन नवीन सुविधा मागणारे व नंतर गायबणार्‍या सदस्यांच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... नेमकं जसं मस्तीत मला वागायचं अन जमत नाही तश्या मस्तीत वावरणार्‍या अनेक सदस्याच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... अर्धवट लेखमाला सोडणार्‍या सदस्यांच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... पॅरीसला जाऊन अचानक गायब होणार्‍या प्रशांतच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... दर वेळेस करतो म्हणून सुध्दा मिपाच्या कामातून गायब होणार्‍या व मी मागेच बरा असं वागणार्‍या आंनंदयात्रीच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... कायम डोक्यात जिलेटीनच्या कांड्या भरून फिरणार्‍या अभ्याच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ..... मध्येच अचानक गायब झालेल्या किसन शिंदेंच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... दिल्लीला दिल देऊन बसलेल्या संकेतानंदस्वामीच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... ...आणि शेवटी नेहमी माझंच खरं आणि तू विचारतर कर मात्र माझ्याच मनासारखा वाग म्हणणार्‍या सर्व सदस्यांच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ... ( बुरा ना मानो होली है) - हे न समजणार्‍याच्या सुध्दा बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.... - नीलकांत

In reply to by नीलकांत

या मिसळ्पावपेक्षा महाराष्ट्र शासन मोठं मानणाऱ्या नीलकांतच्या बैलाला रे ... बो बो बो बो

In reply to by नीलकांत

शिमग्याला धाग्यावर हजेरी लावून आम्हीबी तुमच्यातलेच हाय असं सिद्ध करणा-या मालकाच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ..! >>>>>> कायम डोक्यात जिलेटीनच्या कांड्या भरून फिरणार्‍या अभ्याच्या बैलाला... =))) क्या सॉलिड कलर दाला, मार दाला..! -दिलीप बिरुटे

In reply to by नीलकांत

हनतिच्यामारी, अशा परकारे, याटिकानी मालकांनी लेट एन्ट्री मारुनपन फुल्ल शिट्ट्या मिळवलेल्या हायेत. आमचे लाडके नेते किसन्याच्या अन पशाच्या बैलाचा यथस्थित उध्दार झालेला असल्याने याटिकानी मालकांना हार, होळीतला नारळ आनि पुस्प्गुच देऊन प्राडॉ बिरुटे सरांकडून सत्कार करणेत येत आहे. धन्यवाद

करतो करतो म्हणुन काहीच न करता उगाच वातीसारखं तेवत ठेवणार्‍या काही क्ष माणसांच्या बैलाला.... "काय" लिहीलंय पेक्षा "कुणी" लिहीलयं ते पाहुन बोलणार्‍या लोकांच्या बैलाला.. गोड गोड बोलुन सगळ्याच डगरींवर पाय ठेवणार्‍या डबल ढोलक्यांच्या बैलाला.. आपले ते नेमके मुद्दे, दुसर्‍याचं ते भांडण म्हणणार्‍यांच्या बैलाला.. डु आयडीच्या मागे लपुन स्कोअर सेटल करणार्‍या भित्र्या भागुबाईंच्या बैलाला.. आणि काही बोम्बा सवयीप्रमाणे... काड्या सारणार्‍या डीबी अंकलच्या बैलाला.... सकल सर्वज्ञ संक्षी ठाकुरांच्या बैलाला.. अत्यंत फाटक्या तोंडाच्या अभ्याच्या बैलाला.. बुरा न मानो होली है करत बेहती गंगामे हात धोणार्‍यांच्या बैलाला!! बो बो बो बो बो....

In reply to by पिलीयन रायडर

आणि काही बोम्बा सवयीप्रमाणे... काड्या सारणार्‍या डीबी अंकलच्या बैलाला.... सकल सर्वज्ञ संक्षी ठाकुरांच्या बैलाला.. अत्यंत फाटक्या तोंडाच्या अभ्याच्या बैलाला..
. आयोव... म्या कुटं फाटक्या तोंडाचा माय. खरं हाय ते बोलितो. सवयीच्या लिस्टात घातलं जणू नाव आमचं. लै कष्टानं कमवलं हाय बरं ते. ;)

या हं गोव्याला, या हं गोव्याला असे म्हणून गोव्यात आल्यावर लांज्याला पळणाऱ्या पैच्या बैलाला रे भो. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्या! राहिल्या कुठे? मग इतक्या वेळ कोणाच्या नावाने बरेच लोक बोंबलत आहेत तर!! मिपावरच्या सगळ्या बैलांच्या बैलाला होऽऽऽ सुटीत गोव्याला नक्की या हं. =)) =))

झोपायच्या पहिले थोडे बोंबलुन घ्यवा म्हणतोय बॅा बॅा बॅा बॅा बॅा बॅा बॅाबॅा बॅा बॅा बॅा बॅा बॅा बॅा चुना लावुन बोंबलायची रेसिपी मिळाली तर बर व्हयील

In reply to by अभ्या..

बस का भावा..आपुन रंग अन चुना फक्त हाताला अन दुसर्याल्या लावतो

In reply to by समाधान राऊत

ए...जिगर. घे भावा डब्बल. आपल्यातलाच तू...

थोडा वेळ आहे राव धुळवड संपायला. बरेच आयडी राह्यलेत बोंबलिस्टीत. घेऊ त्यांना पण .... . आदी नमन आदूबाळाला, चोवीस तास प्रतिभा नळाला. अविरत मग येऊ बॅटूखाटीकाकडं गणितसंस्कृताचं घेऊनी धडं गाजवत प्रगो बैसी बकध्यानाला मारीयुआनाच्या प्रभावाला मिरवत गणपा आणे आव्हनाला ड्रंकन बम चिकनाला बसवत आता पायघड्या टाकू हसत येतील नाखू खाजवत वप्याच्या मागं लै किडं संगतीनं देव बी बिघडं लाजवत सूडक्याची येगळीच जात पाण्यात मारी उगा हात भिजवत. . तमाम माझ्या मिपाकर मित्रांनो. तुम्ही हायेत तर मिपा हाये. म्हणोन तुमच्या सगळ्या खिल्ल्ल्लाराच्या नावानं बॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ

चरस गांजा अफीम पेक्षा भयानक व्यसन असलेल्या मिपाच्या मालकांच्या तेल्हारकर बैलाला बॉ बॉ बॉ बॉ बॅनरकर्ते संदीपा अन अभ्याच्या बैलाला फ्लेक्सचा बॉ बॉ बॉ बॉ अभ्याच्या बैलाला पेशल बॉ बॉ बॉ (काय नाय सहजच राग नाही येत त्यानीला) सगळ्या आजी माजी अन भावी अन मनात मांडे संपादकांच्या नावे बॉ बॉ बॉ बॉ संक्षीच्यापण बैलाला बॉ बॉ बॉ बॉ मीना प्रभूंच्या लेव्हलची प्रवासवर्णने लिहायची हातोटी असूनही काथ्या कुटत बसणाऱ्या म्हात्रे काकांच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ एखादी मोठ्ठी घटना घडून गेल्यावर नेमकी ती घटना ज्या क्षेत्राशी निगडित असते त्याच क्षेत्रातला उच्चपदस्थ 'मित्र' बरोबर दाखले द्यायला का तयार करायला अनायासे सापडणाऱ्या सन्माननीयांच्या बैलाला पण बॉ बॉ बॉ बॉ बॉ बाकी, कशात काय नाय तरी आमच्या जवळच्या गोटातला म्हणून सच्च्या होबासक्याच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ बॉ मंटो सारखे लेखक हाताळत मधेच काशिनाथ होणाऱ्या मंदाऱ्या भालेरावच्या बैलाला 'खोल दो' बॉ बॉ बॉ अमरावतीच्या चिनार भाऊंना 'विचारवंत पदवी' मिळवल्याबद्दल बॉ बॉ बॉ (तुम्ही ज्यूनीवर भारत गणेशपुरेच बरे हाय हो) एका हाताने गोंजारत दुसऱ्या हाताने (पक्षी आयडी ने) थापड मारणाऱ्या थोरामोठ्यांच्या बैलाला बॉ बॉ बॉ संदिप भाऊ डांगे ह्यांच्या कीबोर्डच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ ये**व्या बॅट्याच्या डच बैलाला बॉ बॉ बॉ बॉ बॉ सरते शेवटी, आम्हाला चपला पिशवीतही न घालता थेट *डीवर लाथ पडून आम्ही बॅन होऊ असले प्रतिसाद द्यायला लावणाऱ्या अन असले धागे काढणाऱ्या मास्तरांच्या मराठवाडी बैलाला बॉ बॉ बॉ बॉ आता झोपतो, तुम्ही बसा काशी करीत. अन, हो स्वतः कवडीची साहित्यसेवा न करता नुसते मोरल पोलिसींग करत हिंडणाऱ्या अन चोम्बडेपणा करत लोकांना अक्कल शिकवणाऱ्या फक्त शीनेरिटीच्या बेसिस वर टिकून असलेल्या हुच्च शिरोमणी मेंबर्सच्या बैलाला पण इग्नोरी बॉ बॉ बॉ बॉ बॉ

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

एकाच प्रतिसादात धा बारा जणांना बडवणाऱ्या बापूंच्या लष्करी बैलाला बॉ बॉ बॉ बॉ

In reply to by टवाळ कार्टा

इथूनही गायब झालेल्या टक्याच्या बैलाला फोर स्ट्रोक बॉ बॉ बॉ बॉ बॉ जामोप्याच्या बैलाला बांग स्पेशल बॉ बॉ बॉ बॉ बॉ गामा पैलवानाच्या भगवी छाटी बैलाला बॉ बॉ बॉ बॉ बॉ आदुबाळ साहेबांच्या व्यंसगी बैलाला बॉ बॉ बॉ बॉ बॉ गविंच्या रडवणाऱ्या कथांच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ बॉ, अन पेशल बॉ बॉ ब्राऊ सारखी कथा परत न लिवल्यामुळे. अतिआदर्शवादी तरी भोळे अन सच्चे असलेल्या मुवि काकांच्या तीन एकर कुरणातल्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ बॉ स्पान्डूच्या भयकथेतील बैलाच्या कवटीला बॉ बॉ बॉ बॉ आटमुसगुरुजींच्या रांगोळी बैलाला बॉ बॉ बॉ कुठं ते औताला उलटलेल्या नाखुन चाचाच्या बैलाला बॉ बॉ बॉ थत्तेचाचाच्या पंजाप्रेमाला बॉ बॉ बॉ बॉ श्रीगुर्जींच्या कमळ प्रेमी गिरे तो भी टांग उप्पर बैलाला पण बॉ बॉ बॉ बॉ बॉ वाचन मात्र मोडातुन बाहेर न येता बुडास मोड आले तरी नवे काही पक्षी रेशीप्या न लिवणाऱ्या गणपाभाऊच्या बैलाला पण बॉ बॉ बॉ बॉ बॉ

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चिमायबीन मले ज्यानं कोनं इचारवंताची पदवी देल्ली असंनं त्येच्या बैलाले बॉ बॉ बॉ बॉ

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मीना प्रभूंच्या लेव्हलची प्रवासवर्णने लिहायची हातोटी असूनही काथ्या कुटत बसणाऱ्या म्हात्रे काकांच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ प्रवासवर्णने लिहिणे हे केवळ माझ्या छंदाचे उप-उत्पादन आहे. पण, "राजकारण्यांच्या (किंवा स्वतःच्याही) डोक्यातून निघणार्‍या तात्कालीक स्वार्थी हितसंबंधी विचारांना बाजूला ठेऊन, स्वतःचे डोके 'वापरून' देशाच्या (व पर्यायाने स्वतःच्या आणि स्वतःच्या पिढीच्या) दीर्घकालीन भवितव्याचा विचार करा", या माझ्या सांगण्याला काथ्या कुटणे समजणार्‍या सोन्याबापूंच्या बैलाला घोsss बॉबॉबॉबॉबॉबॉबॉssssss (नो डाऊट थँकलेस जॉब. बट, समबडी गॉट टू दू इट ! अँड, इफ अँड व्हेन टाईम कम्स, आय अ‍ॅम नॉट द वन हू विल् रन अवे. :) )

प्रसिद्ध अशा होळी उर्फ़ मिपावरील जाल शिमग्याला हजर राहून प्रतिसाद लिहिणारे सर्व मिपाकर, वाचक, मालक, तंत्रज्ञ, सर्वांचेच सर्व प्रतिसाद हलकेच घेतल्याबद्दल, चिमटे घेतल्याबद्दल , धमाल मज़्ज़ा केल्याबद्दल अभ्यासहीत सर्वांचे मन:पूर्वक आभार...!!! _/\_ -दिलीप बिरुटे (आभारी मिपाकर )

१००

होळीच्या गवऱ्या पाच शिमगा घेऊन नाच

In reply to by अभ्या..

बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा...!!! ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

मागच्या दोन वर्षात केवळ दोन लेख लिहिणार्‍या वल्लीदांच्या बैलाला हो बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ..! पैजारबुवा,

गेले ते दिवस..... राहिली ती बोंबाबोंब..... .