चंद्र नको , तारे नको , नको खोटी भेट
शब्द हवे , शब्दांसारखे , ओठांमधले थेट
भारी नको , साधी नको , नको पुरी गोड
भाषा हवी , प्रेमाची , त्याला प्रेमाचीच जोड
आज नको , उद्या नको , नको काही क्षणांची
साथ हवी , जन्मासाठी , उरल्या साऱ्या जन्मांची
हसू नको , रुसू नको , नको आशा सुखाच्या
बस हात हवा , हातामध्ये , तुफानी त्या दुःखाच्या
अश्रू नको , दुःख नको , नको भाव ते रोशाचे
एक हवे बस , रोज मला , दर्शन तुझ्या हास्याचे
सुख नको , ऐवज नको , नको आस कुणा गंधाची
छंद हवा बस , तुझाच जीवा , ओढ असो या छंदाची
- अभिषेक पांचाळ
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1931
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली कविता!
चांगली कविता!
Sandy
धन्यवाद
In reply to चांगली कविता! by चांदणे संदीप
धन्यवाद
ठीक .
ठीक .
धन्यवाद
In reply to ठीक . by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद
उत्तम!! आवडली!
उत्तम!!
आवडली!
धन्यवाद
In reply to उत्तम!! आवडली! by जव्हेरगंज
धन्यवाद
अरे वाह मस्त...!
क्लास. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद दिलीप सर
In reply to अरे वाह मस्त...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद दिलीप सर
कविता आवडली
कविता आवडली
धन्यवाद
In reply to कविता आवडली by पैसा
धन्यवाद