✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र

प
पुस्तकमित्र यांनी
Wed, 10/15/2014 - 13:12  ·  लेख
लेख
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 ________________________________________________________ नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्‍यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया! आधीच्या यशस्वी भागांप्रमाणेच तुमच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे! चला तर लिहूया आपल्या आवडत्या आत्मचरित्र किंवा चरित्रांबद्दल! आधीच्या भागाप्रमाणेच मला न आवडलेली चरित्रे/आत्मचरित्रे याबद्दल दुसर्‍या एका भागात लिहूया!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सद्भावना
शुभेच्छा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
36203 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

दादा कोंडकेंच्या "एकटा जीव"

काळा पहाड
गुरुवार, 10/16/2014 - 15:43 नवीन
दादा कोंडकेंच्या "एकटा जीव" चं नाव कुणीच कसं घेतलं नाही?
  • Log in or register to post comments

मला पण आवडलं

पैसा
गुरुवार, 10/16/2014 - 17:22 नवीन
काही ठिकाणी जरा अतिरंजित वाटलं, पण एकूण वाचायला छान. वर सानिकाने लिहिलेलं कारमेन बिन लादेनचंही खूप छान आहे पुस्तक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

'माझंही एक स्वप्न होते' -

सौंदाळा
गुरुवार, 10/16/2014 - 16:47 नवीन
'माझंही एक स्वप्न होते' - वर्गीस कुरियन (मोदकाचा लेख वाचुन हे आत्मचरित्र वाचनालयातुन मिळवुन वाचले होते आणि आवडले)
  • Log in or register to post comments

कारमेनचं पुस्तक घेतलं पाहिजे!

अजया
Fri, 10/17/2014 - 08:06 नवीन
कारमेनचं पुस्तक घेतलं पाहिजे! डाॅ.अानंदीबाई जोशींचं अंजली किर्तनेंनी लिहिलेलं चरित्रही छान आहे.कमल पाध्येंचं बंध अनुबंध ही अावडुन गेलेलं. बेस्टेस्ट आत्मचरित्र नानु सरंजामेंचंच!!
  • Log in or register to post comments

आत्मकथनं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/17/2014 - 08:52 नवीन
मी पहिलं आत्मकथन वाचलं ते बीएला शिकत असतांना ऐच्छिक मराठी घेतलं तेव्हा दलित स्त्री आत्मकथन 'जिणं आमुचं' बेबीताई कांबळे यांच. धर्मांतरापूर्वीच्या महार समाजाचं चित्रण. महारा समाज मी पाहिलेला पण इतके बारीक तपशील त्यात वाचण्यात आले की अरेच्चा आत्मकथनात असं चित्रण असतं तर..सामाजिक उतरंड, ते अंगाण येणे, जातीव्यवस्थेचा संघर्ष ती भूक ती वर्णनं. मग पुढे काही दिवस आणि पुढच्या शिक्षणानिमित्त अशी अनेक आत्मकथनं मला आवडली. माझ्या जल्माची चित्तर कथा- शांताबाई कांबळे, आठवणींचे पक्षी- प्र.ई.सोनकांबळे, (प्र.ई सर, आमचे औरंगाबादचे आणि यांना अनेकदा भेटण्याचा योगही अनेकदा आला होता. यांची एक सवय होती. कोणताही कार्यक्रम असला की प्रास्ताविकापासून ते आभारापर्यंत सर्व लिहुन काढायची.) मला बरीच वाचायला मिळाली ती दलित आत्मकथनं मला हे सर्व समजुन घ्यायला खुप आवडलं. बलुतं- दया पवार, मला उध्वस्त व्हायचंय- मलिका अमर शेख, आहे मनोहर तरी- सुनिता देशपांडे, उपरा-लक्ष्मन माने, उचल्या लक्ष्मन गायकवाड. मिटलेली कवाडे-मुक्ता सर्वगौड, मरणकळा-जनाबाई गिर्‍हे, उर्मिला पवारांचं आयदान, जगले जशी-लालन सारंग, सर्वात आवडलेलं आता हे का आवडलं माहिती नाही पण मला भिडणारं पुस्तक 'सर आणि मी' जोत्सना संभाजी कदम, चित्रकार असलेले ते प्राध्यापक आणि त्यांच्यावर प्रेम करणारी त्यांची विद्यार्थीनी. वयात दोघांच्या पंचवीस वर्षाचं अंतर. विद्यार्थी, प्रेयसी आणि पत्नी या तीनही अवस्थेचं चित्रण अतिशय सुंदर पद्धतीने आलं आहे, मिळालं तर नक्की वाचा. असो, हल्ली वाचन कमी झालंय. पुस्तक उघडलं की कंटाळा येतो. आयुष्यातल्या एका नव्या वळणावर जरा गुंतलोय. नै तर आत्मचरित्र, आत्मकथनं वाचने ही माझी स्पेशालिटी होती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ,

पुंबा
Mon, 03/06/2017 - 15:09 नवीन
हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ, निर्विश आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता लिहिलंय. मला आवडलेल्या आत्मचरित्रात हे वरच्या नंबरला असेल. चिपर बाय द डझन हे आणखी एक सर्वांगसुंदर पुस्तक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ,

मोदक
Mon, 03/06/2017 - 16:05 नवीन
हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ, निर्विश आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता लिहिलंय. मला आवडलेल्या आत्मचरित्रात हे वरच्या नंबरला असेल. नक्की कोणते पुस्तक..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

आठवणींचे पक्षी- प्र.ई

पुंबा
Mon, 03/06/2017 - 17:34 नवीन
आठवणींचे पक्षी- प्र.ई.सोनकांबळे
स्वारी.. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

धन्यवाद.

मोदक
Mon, 03/06/2017 - 19:08 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

खूप आहेत...

मनिष
Fri, 10/17/2014 - 12:33 नवीन
खूप आहेत अशी चरित्र. आणि बर्‍याच वेळा केवल स्वतःच्या दृष्टीकोनातून लिहिली असली तरी काहितरी वेगळे काम केलेल्यांचे, वेगळे जीवन जगलेल्यांचे आयुष्य कसे होते - त्यांच्या अडचणी, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी निवडेलेले काम - ह्यात मला खूप रस वाटतो. आणि ती लोकंही माणंसच होती हे मनात असले असले की मग फारसे मुर्तिभंजन होत नाही, कारण त्यांच्या मुळी मुर्ती बनवतच नाही. शिवाय, अशी चरित्र वाचतांना लेखकाला स्वतःविषयी किती इनसाईट आहे ते जाणवतेच की - जसे दादा कोंडक्यांच्या आत्मचरित्रात ते स्वतःच्या एकटेपणाविषयी देवाला/नशिबाला दोष देताता, तेंव्हा ह्या माणसाला स्वतःच्या स्वभावाविषयी काहीच इन्साईट नाही का ह्याचे आश्चर्य वाटते, तसेच लता मंगेशकरांच्या पुस्तकांतही होते (नाव आठवत नाही - कित्येक बाबतीत त्यांची मते त्यांच्या पिढीच्या अल्पशिक्षित सामान्य व्यक्तिंसारखीच वाटतात. अर्थात त्या त्य व्यक्तिंचे त्यांच्या क्षेत्रातले असामान्यत्व सोडले तर तीही आपल्यासारखी सामान्य माणसेच असतात की, आणि चरित्रांतून तर हे फारच प्रकर्षाने जाणवते. तसेच काही व्यक्ति सर्वच बाबतीत (किवा का विशिष्ट गोष्टींचा) किती खोलवर अणी समग्रपणे विचार करतात (जसे अभय बंग), हेही जाणवते आणि मलातरी ते अतिशय स्फुर्तीदायी आणी प्रेरणादायी वाटते. आता मी तशीही ऐतिहासिक किंवा बॉलिवूड्/क्रिकेटर ह्यांची अतमचरित्र वाचत नाही - पण समकालीन किंवा थोडे आधिचे लेखक/नाटककार्/कलाकार, उद्योजक, प्रभावी/मुलखावेगळ्या व्यक्ती ह्यांची आत्मचरित्र आजही वाचायला आवडतात. असो. ही माझी आवडती काही चरित्र/आत्मचरित्र. माही विशेष क्रम नाही, पण जशी आठवतील तशी लिहितो - (१) मी अल्बर्ट एलिस (अंजली जोशी) - मानसशास्त्रात रस असलेल्यांनी तर वाचावेच, पण इतरांनीही आवर्जुन वाचावे असे पुस्तक. REBT च्या जनकाची ही गोष्ट मुळातुनच वाचण्यासारखी आहे. आणि त्याच्या अत्मचरित्रावर आधारीत असली तरी अनुवाद नसल्यामुळे भाषा आणि संगत दोन्हीही छान नैसर्गिक आहे. बरेचसे आपल्याला धक्कादायक वाटावेत अशे तपशील असले तरी त्यातून सतत जाणवणारी अल्बर्ट एलिस ह्याची सकारात्मक विवेकवादाची जाणीव ही कित्येक REBT च्या पुस्तकांपेक्षा जास्त परिणामकारक आहे. (२) स्वतःविषयी (अनिल अवचट) - आत्मचरित्र नसले तरीही बरेचसे आत्मपर लिखाण. मी ह्यावर माझ्या ब्लॉगवर एक मोठा लेखही लिहिला होता. स्वतःविषयी हे पुस्तक म्हणून खूप परिणामकारक आहे. केवळ आत्मपर साहित्यलेखन यापलीकडे ते खूप काही आहे आणि हे यश केवळ अनिल अवचट यांच्या साध्या, सरळ आणि चित्रमय शैलीचं नाही. हे पुस्तक त्यांना वेगळ्या वाटेने जगतांना आलेल्या अनुभवांच्या नोंदींचे (memoirs ) आहे. त्यात कुठेही बडेजाव, आढ्यता नाही. हे अनुभव रोजच्या जगण्यातील आहेत – कुठल्याही क्रांतीच्या रोमहर्षक कथा नाही. कित्येक वेळा असे वाटते, अरे इतक्या साधेपणे आणि सहजपणे आपल्यालाही जगता आले तर? अर्थातच ते साधं आणि सहज असलं तरी सोपं नाही. (३) कैफी आणि मी (शौकत आझमी अनुवादः जयश्री देसाई )- हे असेच पुस्तक प्रदर्शनात अचानक सापडलेले एक रत्न. 'कैफी आझमी' ह्यांच्या पत्नी आणि शबाना आझमी ह्यांची आई शौकत आझमी ह्यांनी लिहिलेले. उदारमतवादी, साम्यवादी/समाजवादी, शायर कैफी ह्यांच्याविषयी - त्यांच्या विचारांविषयी, लिखाणाविषयी आणि कुटूंबाविषयी उत्सुकता होतीच म्हणून हातात घेतले आणि खूपच आवडले. तेंव्हाच्या समाजवादाचा, आदर्शवादाचा आणि जीवनाचा एक छानसा तुकडा आपण प्रत्यक्ष अनुभवतो ह्या पुस्तकात. त्यांच्या आयुष्यात मनस्वी निर्णयांतुनही जपलेले व्यक्तिस्वातंत्र्य, प्रेम आणि त्यांचा अगदी शायराना/फिल्मी रोमांस हे फार लोभसपणे येते ह्या पुस्तकात. शबानाची वैचारीक बैठक कशी निर्माण झाली असेल ह्याचाही अंदाज येतो. खुपच छान आहे पुस्तक हे. नक्की वाचा. मुस्लिम समाजातील रजिया पटेल, हमीद दलवाई, कैफी आझमी अशा उदारमतवादी विचारधारा नंतर फारशी प्रबळ का झाली नसावी ह्याची खंत वाटते! असो. हे पुस्तक आता कित्येक अमेरिकन विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतात! : P अजूनही आहे बरीच अनवट चरित्रे, लिहितो जमेल तसा नंतर!
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला

पैसा
Fri, 10/17/2014 - 13:10 नवीन
सगळ्यांनी अशीच थोडक्यात ओळख करून दिली तर अजून कितीतरी पुस्तके माहिती होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

चांगला धागा आहे.

एस
Sun, 10/19/2014 - 12:07 नवीन
मुसाफिर, तराळ-अंतराळ, आमचा बाप आणि आम्ही, अशी बरीच आहेत.
  • Log in or register to post comments

हो,मुसाफिर छानच आहे.अच्युत

अजया
Sun, 10/19/2014 - 12:41 नवीन
हो,मुसाफिर छानच आहे.अच्युत गोडबोले या माणसाच्या बुध्दीला काय म्हणावे?किती निरनिराळ्या क्षेत्रात प्रभुत्व!!
  • Log in or register to post comments

(No subject)

प्रचेतस
Sun, 10/19/2014 - 13:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

१.नाझी भास्मासुराचा उदयास्त

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/20/2014 - 10:31 नवीन
१.नाझी भास्मासुराचा उदयास्त २.एक होता कार्व्हर ३.वोल्गा जेव्हा लाल होते ४.अब्राहम लिंकन फ़ाळणी टाळणारा महापुरुष ५.ओपेन्हायमर ६.हसरे दुःख ७.महानायक ८.मृत्युंजय ९.दुर्दम्य १०.इये सयाजीचिये नगरी ११.अकियो मोरिता एंड सोनी स्टोरी १२. ली आयकोका अजुन ही खुप आहेत आता आठवेनात , मुख्य आवड चरित्रे वाचन आहे
  • Log in or register to post comments

नाझी भस्मासुराचा ... आणि

आदूबाळ
Wed, 10/22/2014 - 01:44 नवीन
नाझी भस्मासुराचा ... आणि व्होल्गा जेव्हा .... हे चरित्र म्हणता येईल का याबद्दल शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आदूबाळ, सहमत आहे भाऊ साहेब!

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/22/2014 - 07:58 नवीन
आदूबाळ, सहमत आहे भाऊ साहेब! पण त्या बुक्स चं जे एक लेखाजोखा टाइप स्वरुप आहे त्याच्यामुळे मी बेंबट्या झालोय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

इंग्रजी चालतील असं समजून

वेल्लाभट
Mon, 10/20/2014 - 12:52 नवीन
मला वाचनाची आवड फार उशीरा म्हणजे चोविशीत वगरे लागलेली आहे. त्यामुळे अर्थातच वाचलेली पुस्तके मोजकी. पण आत्मचरित्र विशेष आवडतात. त्या व्यक्तीशी जवळून बोलता येतं. मोजक्या वाचलेल्या पुस्तकातून आवडलेली आत्मचरित्रः ओपन - आंद्रे आगासी - हे खूप आवडलं. इम्पल्सिव्ह परचेस. दिसलं, उचललं. पण इथूनच सुरुवात झाली खरी वाचनाची आवड जागृत व्हायला. द लास्ट लेक्चर - रँडी पौश - हे ही छान आहे. बरं आहे म्हणजे. कार्व्हर आणि इतर वर दिलेली नावं नोंद करून घेतोय. पुढे वाचायला.
  • Log in or register to post comments

सद्ध्या

वेल्लाभट
Mon, 10/20/2014 - 12:55 नवीन
सी पी श्रीवास्तव लिखित, अशोक जैन अनुवादित लाल बहादुर शास्त्री वाचतोय.
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम पुस्तक

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/22/2014 - 07:56 नवीन
अतिशय उत्तम पुस्तक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

करुणाष्टक

सिरुसेरि
Mon, 11/10/2014 - 13:48 नवीन
करुणाष्टक हे व्यंकटेश माडगुळकर लिखित पुस्तकही खुप छान आहे . त्यामध्ये त्यांनी आपल्या आईच्या आठवणी , जुने औन्ध संस्थान , तिथले कर्मचारी , त्यांचे कौटुंबिक जीवन , बदल्या व त्यामुळे होणारी ओढाताण या मनाला हलवुन सोडणारया घटना सांगितल्या आहेत .
  • Log in or register to post comments

'ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी' हे

श्रीगुरुजी
Mon, 11/10/2014 - 20:52 नवीन
'ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी' हे श्री श्री परमहंस योगानंदाचे इंग्लिशमधील आत्मचरीत्र मराठीत 'योगीकथामृत' या नावाने भाषांतरीत झालेले आहे. हे आत्मचरीत्र अतिशय आवडले. हे अनेकवेळा वाचलेले आहे. डॉ. हिम्मतराव बावस्करांचं 'बॅरीस्टरचं कार्टं', डॉ. नरेंद्र जाधवांचं 'आमचा बाप आणि आम्ही', रमेश देवांचं 'या सुखांनो या', गोपाळ गोडसेंचं 'गांधीहत्या आणि मी' ही चरित्रे/आत्मचरित्र चांगली आहेत.
  • Log in or register to post comments

अजून

श्रीगुरुजी
Mon, 11/10/2014 - 21:02 नवीन
अजून 'ही श्रींची इच्छा' (श्रीनिवास ठाणेदार), 'आहे मनोहर तरी' (सुनीता देशपांडे), 'अग्निपंख' (डॉ. अब्दुल कलाम), 'जिहाद' (अस्लम जमादार), 'इन्फिडेल' (या सुदानी लेखिकेचे नाव विसरलो) इराण, इराक, पाकिस्तान, सुदान, सौदी अरेबिया इ. कर्मठ मुस्लिम देशातील महिलांनी लिहिलेली स्वतःची चरित्रे अत्यंत हृदयद्रावक आहेत. या अनेक पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments

ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी इज द गेट....

वडगावकर
Tue, 03/07/2017 - 09:28 नवीन
अगदी खरंय.... कितीही वेळा वाचलं तरी कंटाळा येत नाही गम्मत म्हणजे हे पुस्तक म्हणजे अध्यात्माचं प्रवेश द्वार आहे.... अजून थोडी..... माय विकेड विकेड वेज-एरॉन फ्लीन (मराठी ) दिव्य स्पर्श -डॉ भोसले प्रकाशाच्या वाटेवर- श्री.कृष्णानंद सांगत्ये ऐका-हंसा वाडकर एकटा जीव -दादा कोंडके शांतारामा- व्ही शांताराम माझा लढा-हिटलर (मराठी ) पॅपिलॉन-हेन्री शॅरीयर
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा