✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र

प
पुस्तकमित्र यांनी
Wed, 10/15/2014 - 13:12  ·  लेख
लेख
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 ________________________________________________________ नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्‍यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया! आधीच्या यशस्वी भागांप्रमाणेच तुमच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे! चला तर लिहूया आपल्या आवडत्या आत्मचरित्र किंवा चरित्रांबद्दल! आधीच्या भागाप्रमाणेच मला न आवडलेली चरित्रे/आत्मचरित्रे याबद्दल दुसर्‍या एका भागात लिहूया!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सद्भावना
शुभेच्छा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
36201 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

धन्यवाद पुस्तकमित्रा.

प्रचेतस
Wed, 10/15/2014 - 13:34 नवीन
धन्यवाद पुस्तकमित्रा. आत्मचरित्रांची आवड अजिबातच नाही. एकमेव आहे माझ्याकडे ते म्हणजे मारुती चितमपल्लींचे 'चकवाचांदण' जे अजूनही वाचले नाही. चरित्रे मात्र कमल गोखलेकृत 'शिवपुत्र संभाजी', बाळ भागवतांनी लिहिलेले रिचर्ड बर्टनचे चरित्र ' शापित यक्ष' आणि अजून काही आहेत. पैकी कमल गोखल्यांचे 'शिवपुत्र संभाजी' हे सर्वोत्तम आहे. बर्‍याच दस्तऐवजांचा वापर करून लिहिलेले हे चरित्र अत्यंत अभ्यासपूर्ण आहे.
  • Log in or register to post comments

चकवाचांदण

पैसा
Wed, 10/15/2014 - 14:02 नवीन
चकवाचांदण मीही घेतलंय. अजून वाचायला मुहूर्त लागला नाहीये. पण त्यात आत्मचरित्रात्मक भागाइतकाच इतर जंगलाबद्दलचा भागही आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो.

प्रचेतस
Wed, 10/15/2014 - 14:05 नवीन
हो. जंगल जगणारा माणूस हा. जंगलांतील अनुभव आल्याशिवाय कसे राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चकवाचांदण वाचले नसेल सर्वात

दशानन
Fri, 10/17/2014 - 21:19 नवीन
चकवाचांदण वाचले नसेल सर्वात आधी, हे पुस्तक वाचायला घ्या. अप्रतिम पुस्तक आहे. मला खूप भावलेले व आवडलेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी माझा, मग माझा कोणाचा -

स्पा
Wed, 10/15/2014 - 22:36 नवीन
मी माझा, मग माझा कोणाचा - सुर्यकांत खोकले मी माझा न तु हि माझाच - गुरुकांत चोखले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते चरित्र/आत्मचरित्र नसून

प्रचेतस
Wed, 10/15/2014 - 22:50 नवीन
ते चरित्र/आत्मचरित्र नसून चारोळी संग्रह आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

त्या चारोळ्यांमधुन लेखकाचे

स्पा
Wed, 10/15/2014 - 23:18 नवीन
त्या चारोळ्यांमधुन लेखकाचे चरीत्रच उलगडत जाते .. मांडी घातलेले. त्यांचे भाऊ गुरुकांत चोखले लग्नानंतर गायबच झाले , त्यांच्या काही चारोळ्या अजरामर झाल्यात पण,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मारुती चितमपल्लींचे

विलासराव
गुरुवार, 10/16/2014 - 00:23 नवीन
मारुती चितमपल्लींचे 'चकवाचांदण' हे आजच अंबरनाथला एका नातेवाईकांच्या घरी पाहीले. त्यांनी वाचाच म्हनुन सुचवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चकवाचांदण वाचाचं

जिन्क्स
गुरुवार, 10/16/2014 - 13:48 नवीन
वल्ली तुम्ही चकवाचांदण वाचाचं. तुम्हाला नक्किचं आवडेल. कोणत्याही पानापसुन कधिही सुरु करावे असे हे पुस्तक. नवेगावबांध-अंधारी, कर्णाळा, महाबळेश्वर, ढेबेवाडी व इतर जंगलाचे आणि अनुभवांचे सुरेख वर्णन. पुलं, चित्रकार आमलेकर, जी ए यांच्यासोबतचे अनुभव ही सुरेख टिपलेले आहेत. मला चितमपल्लींचे लिखाण प्रचंड आवडते. त्यांनी निसर्ग सोडुन इतर ही ललीत लिखाण करावे असे वाटते. अवांतरः पुण्यातील युवाशक्ती ही संस्था पुर्वी चितमपल्लींसोबत महाबळेश्वर येथे जंगलवाचन कम ट्रेक आयोजीत करायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खूप आहेत!

पैसा
Wed, 10/15/2014 - 13:57 नवीन
सगळ्यात पहिला नंबर अर्थातच लक्षुंबाई टिळकांच्या स्मृतिचित्रांचा! त्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे माझी जन्मठेप, ही पटकन आठवलेली आत्मचरित्रे. स्मृतिचित्रे इतकी निरागस आणि प्रांजळ की काय सांगावे, इतक्या साध्या भाषेत लिहिलेलं आहे की एकदा वाचायला सुरुवात केली की खाली ठेवता येत नाही. माझी जन्मठेप सुद्धा विलक्षण अनुभव देतं. पु.लं. नी रवीन्द्रनाथ टागोरांच्या लहानपणच्या आठवणींचं भाषांतर केलं आहे. तेही आठवतं आहे. चरित्रांमधे अर्थातच बाबासाहेब पुरंदर्‍यांचं राजा शिवछत्रपती आहे, वीणा गवाणकर यांचं एक होता कार्व्हर आहे. अजून आठवेल तशी लिहीनच!
  • Log in or register to post comments

अरेच्चा, उपरोल्लेखित दोन

प्रचेतस
Wed, 10/15/2014 - 14:00 नवीन
अरेच्चा, उपरोल्लेखित दोन चरित्रे माझ्याकडे पण आहेत, आठवली नाहीत चटकन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एक होता कार्व्हर. झालेच तर

विजुभाऊ
Wed, 10/15/2014 - 15:40 नवीन
एक होता कार्व्हर. झालेच तर मंगला गोडबोलेंचे चीपर बाय डझन , मंगला निगुडकरांचे पॅव्हीलीयन ऑफ अ वूमन चेतना गोसावींचे तोत्तोचान. या पुस्तकांची पारायणे झालीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अाशक मस्त फकिर हे वीणा

अजया
Wed, 10/15/2014 - 14:36 नवीन
अाशक मस्त फकिर हे वीणा देवांनी त्यांच्या वडिलांवर अर्थात गोनिदांवर लिहिलेलं छोटेखानी पुस्तक आहे.वडिलांच्या निरनिराळ्या छंदांविषयी.त्यांचं लेखन यावर लिहिलंय.आवडतं ते पुस्तक मला.चार्ली चॅपलीनच्या आयुष्यावरचं भा.द. खेरांचं हसरे दुःख पण छान चरित्र आहे.चकवाचांदण तर अप्रतिम,नावासकट! अनिल अवचटांचं आत्मचरित्र नाही म्हणता येणार पण स्वतःविषयी हे पुस्तक आणि छंदांविषयी सुध्दा.माझे आवडते लेखक असल्याने त्यांच्या आयुष्याबद्दल वाचायला अावडलं. माझ्या अावडत्या आत्मचरित्रांतलं एक ,विंदाच्या पत्नी सुमा करंदीकरांचं रास.साध्यासुध्या गृहिणीने अापली संसारगाथा सांगावी तसं सोप्या शब्दात.एवढा महान कवि नवरा म्हणून असण्याची सुखदुःखं,त्यांच्या स्वभावाशी जुळवुन घेताना उडालेली तारांबळ,तरीही त्यांच्याबद्दलचा सार्थ अभिमान .मला त्यांचं ते सरल लिखाण भावुन गेलं.आहे मनोहर तरी ,सुनिता बाई देशपांड्यांचं आणि रास लागोपाठ वाचल्यावरही सशक्त लिखाण करणार्या सुनिता बाईंच्या आत्मचरित्रापेक्षाही हे अभिनिवेशरहित लिखाण आवडुन गेलं! अजून लिहिते नंतर,किती आवडता विषय काढला हो पुस्तकमित्र!!
  • Log in or register to post comments

अग्नीपंख

मित्रहो
Wed, 10/15/2014 - 14:40 नवीन
एपीजे कलाम. मी इंग्रजीत वाचले. तसेच रश्मी बंसलचे "Stay Hungry Stay Foolish" कुरीयनचे "I too had a dream". आदर्श आणि नफ्यातली सहकार चळवळ म्हणजे काय आणि कशी राबवायला हवी हे समाजायला कुरीयनचे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. भयंकर आवडले.
  • Log in or register to post comments

कऱ्हेचे पाणी

मित्रहो
Wed, 10/15/2014 - 15:46 नवीन
आचार्य अत्रे मी फक्त दोन खंड वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

मला आवडलेले चरित्र

Gayatri Muley
Wed, 10/15/2014 - 15:25 नवीन
वरील प्रतिसादापैकी भरपूर आवडीचे आहेत, पण वरील प्रतिसादात उल्लेख न झालेल एक चरित्र सांगते, बी. डी. खेर यांचे "हसरे दुख"
  • Log in or register to post comments

चरित्र/आत्मचरित्र

विशाखा पाटील
Wed, 10/15/2014 - 20:42 नवीन
'मेळघाटावरील मोहर' हे डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे ह्यांच्या विलक्षण कामाची ओळख करून देणारं पुस्तक उत्तम. ह्या दांपत्याचं चरित्र मृणालिनी चितळे ह्यांनी सुंदर लिहिलंय. 'तें दिवस' हे तेंडुलकरांचं आत्मचरित्र म्हणजे त्यांच्या नजरेतून तो आरंभीचा काळ बघणं. दुर्दैवाने हे आत्मचरित्र पूर्ण झालं नाही.
  • Log in or register to post comments

'मेळघाटावरील मोहर' हे डॉ.

विलासराव
गुरुवार, 10/16/2014 - 00:49 नवीन
'मेळघाटावरील मोहर' हे डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे ह्यांच्या विलक्षण कामाची ओळख करून देणारं पुस्तक उत्तम. ह्या दांपत्याचं चरित्र मृणालिनी चितळे ह्यांनी सुंदर लिहिलंय. मी वाचले आहे. माझा त्यांच्या़कडे प्रत्यक्ष जाण्याचा विचार आहे. ज्यांच्याबरोबर माझी आज चकवाचांदण बद्द्ल चर्चा झाली त्यांना मी हेच पुस्तक सुचवले. त्यात ज्या डॉ. आशीष सातवांचा उल्लेख आहे त्यांची संस्था आहे "महान". त्यांची माझी प्रत्यक्ष भेट आणी चर्चा झालीये मे २०१२ मधे बाबांच्या(आमटे) सोमनाथ येथील श्रमसंस्कार शिबीरात. त्यांच्याकडेही जायचे आहे. डॉ. विकास आमटेंबरोबर मनसोक्त गप्पाही तेथेच झाल्याच. त्यांना मी माझी ब्राझीलवारी सांगीतल्यावर त्यांनी मला त्यांच्या अशाच आठवणीही सांगीतल्या. येत्या वर्षात हेमलकसा आनी मेळघाट दौरा नक्की करणार आहे. परत येईल तेंव्हा त्यावर लिहीलच. पण तोवर मेळघाटावरील मोहर नक्की वाचा. मी खुप आत्मचरीत्र वाचले आहेत.पण आता नावे आठवत नाहीत. त्यातली काही नावे बाकी मिपाकरांनी लिहीलेली आहेत. परंतु व्हाय नॉट आय? हे एक मुलगी डॉक्टरच्या चुकीने कायमचे अंधत्व आल्यावर त्यामुलीने आनी तिच्या आईने त्याचा कसा सामना केला. त्याचे व्रुत्तांकन त्यांच्याच शब्दात वाचताना आनी त्यामुलीने तरीही अर्थशास्त्र हा विषय घेउन पदवी मिळवली तेही पहील्या नंबराने. अर्थशास्रावरील संशोधनात तिने काही रिसर्च पेपर लिहीले आनी आता बहुतेक ती आता परदेशात करियर/रिसर्च करत आहे. अवश्या वाचा. तसंच "जगायचंय प्रत्येक सेकंद" हेही वाचनेबल. मेळघाटावरील मोहर हे कोणी प्रकाशीत केलंय ते सांगु शकाल काय? मी विसरलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

'मेळघाटावरील मोहर'

विशाखा पाटील
गुरुवार, 10/16/2014 - 08:13 नवीन
श्रमसंस्कार शिबिराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यावर एक लेख लिहाल का? 'मेळघाटावरील मोहर' हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. १ ऑक्टोबर पासून त्यांनी एक उपक्रम सुरू केलाय. प्रत्येक विकल्या गेलेल्या प्रतीमागे ५० रुपये हे डॉ. कोल्हेच्या सामाजिक कार्यासाठी दिले जाणार आहेत. त्यात प्रकाशक आणि लेखक भर घालणार आहेत. राजहंसच्या websiteवर त्याची अधिक माहिती आहे. सर्वानीच जरूर बघावी. http://www.rajhansprakashan.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

श्रमसंस्कार शिबिराबद्दल जाणून

विलासराव
गुरुवार, 10/16/2014 - 14:49 नवीन
श्रमसंस्कार शिबिराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यावर एक लेख लिहाल का? लिहीन्याचा प्रचंड कंटाळा आहे. थोडक्यात सांगतो. बाबांनी ४५-४६ वर्शांपुर्वी हे शिबीर भरवायला सुरवात केली. उद्देश नवीन लोकांना समजासेवेत हातभार लावता यावा आनी त्यापेक्षा महत्वाचे एखाद्याला जर नवीन कार्यालाच हात घालायचा असेल तर त्याला पायाभुत माहीती बरोबरच सहकार्य मिळवुन देणे. बाबांपासुन प्रेरना घेउन अनेक लोकांनी जागोजागी सामाजीक काम सुरु केले आहेत. त्यातल्याच काही लोकांना तिकडे शिबीरात मार्गदरशनासाठी बोलावले जाते.ते त्यावर सर्व विवेचन करतात .मग आपण त्यांना प्रश्न विचारु शकतो. त्याशिवायही सेशन संपल्यावर त्या वक्त्याशी गप्पा मारु शकतो. दरवर्षी १५-२२ मे या वेळेत हे शिबीर असते. ५००-१००० लोक येतात. काही सहकुटूण्ब येणारे लोकही आहेत. पण ईन जनरल युवा लोकांचा भरणा जास्त असतो. ति़कडे सोमनाथला त्यावेळेस ४४-४९ या दरम्यान तापमान असते. झोपण्यासाठी मोठमोठे हॉल आहेत.सतरंज्या टाकलेल्या असतात बाकी चादर वगैरे आपण घेउन जायचे असते. पण उन्हाळा असल्याने थंडी नसते.सकाळी ४ ला ऊठायचे, पहील्या दिवशी ५-८ साधारण ग्रुप बनवले जातात. शेवटपर्यंत आपण आपल्याच ग्रुपमधे काम करायचे असते. प्रकल्पातील कार्यकर्ते ग्रुप लिडर असतात. सकाली चहा झाल्यावर प्रार्थना आनी लगेच साईअटवर प्रत्यक्ष काम करावे लागते साधारण २-३ तास. आम्हाला तळ्यातील माती उचलुन बाजुला टाकण्याचे काम मिळाले होते. त्यामुळे पाण्याचा साठा वाढावा हा उद्देश. मधेच साईटवरच नाष्टा मिळतो. ९ वाजता परत. आंघोळ आटपुन मग थोडा आराम. एका ग्रुपला रोज जेवनात मदतीसाटी कामातुन सुट्टी असते. मग त्यांनी जेवन बनवण्याबरोबरच सदा टाकणे , रांगोळ्या काढणे असे आपापले कौशल्य दाखवायचे असते. शेवटी एका ग्रुपला आपल्या कामाबद्दल छोटेसे बक्षीस दिले जाते. जेवनानंतर आराम झाल्यावर आलेले वक्ते त्यांच्या कार्याची माहीती देतात. मग एखादा विषय देउन त्यावर कुणीही दिलेल्या वेळेत त्यावर आपले विचार मांडू शकतो. कोणी उरलेल्या वेळेत योगा क्लासेश घेतो. कोणी भेंड्या खेळत बसतात. प्रत्येक ग्रूपला स्वतःचे नाटक बसवावे लागते. अशी एकंदरीत धमाल असते. आमच्या वेळेस शिबीरात नशा हा विषय दिला होता. जेवढे लोक बोलले ते सगळे आमुक नशा कशी वाईट वगैरेवर बोलले. चांगलच बोलले. मग मला रहावले नाही. मी नशामुक्तीवर बोललो आनी त्यावर विपश्यना कशी प्रभावी मदत करु शकते त्यावर बोललो. त्यात मी परीक्रमेमुळे दाढी वाढवलेली होती व सफेद लुंगी आनी शर्ट असल्याने लोक मला महाराजच म्हणत होते. अन मी तेथे सांगीतले की मी १५-१६ वर्श रोज दारु प्यायचो मग विपश्यनेला गेलो आनी नशेतुन मुक्त झालो. मग जवळजवळ प्रत्येक शिबीरार्थी म्ला भेटायला येउ लागला. हे पाहुन मग डॉ. विकास आमटेंनी मला बोलावुन घेतले आनी आमची छानच मैत्री झाली.बाबा स्वतः नर्मदाकिनारी मेघाताइंना पाठींबा द्यायला तब्बल दहा वर्श राहीले त्याकाळात विकारभाउंनी स्वतः आनंदवन सांभाळले. आज आनंदवन स्वयंपुर्ण असुन ते जवळपास २७ प्रोजे़क्ट चालवतात. विकासभाउंना इंजीनीयर व्हायचे होते पण त्यांना डॉ. व्हावे लागले. पण त्यांनी तिथले तळे आनी घरे बांधतानाकत्यांच्या ईंजीनियरींगच्या कौशल्याचा उपयोग केलाय. त्यांना तशी घरे बांधण्यासाठी लातुर भुकंपानंतर ति़कडे बोलावण्यात आले होते. एकंदरीत हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे. तिथुनच प्रेरणा घेउन स्नेहालय चालु करनार्यांचॉ मोठी टीम शिबीरात दरवर्षी येत असते. असो. अवांतरः डोंबोली २-९ नोव्हेंबरला एक ग्रुप आनंदवन/ सोमनाथ / हेमलकसा आनी अभय बंगाची सर्च संस्था येथे जाणार आहे. रेल्वे आरक्षनापासुन(३ एसी कारण आता स्लीपर आरक्षण मिळणार नाही. कोणी स्वतः आरक्षण करत असेल तरी चालु शकते.) जेवनखाण्यासह ९००० रुपये प्रतिव्यक्ती भरायचे आहेत. ति़कडे बसने प्रवास. ६ जागा शिल्लक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

वा छान आणि जास्त न ऐकलेल्या

सखी
गुरुवार, 10/16/2014 - 01:08 नवीन
वा छान आणि जास्त न ऐकलेल्या पुस्तकांची नावं (अजया, विशाखा, विलासराव) कळत आहेत. मला आहे मनोहर तरी, झिम्मा, अग्निपंख आवडले - मुख्य म्हणजे त्यातला प्रामाणिकपणा आवडला. सध्या मंगला गोडबोले यांच सुनिताबाई वाचतेय. एक होता कार्व्हर ह्याचं मराठी रुपांतर इतकं भावलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

लंडनच्या आजीबाई हे ताराबाई

अजया
Wed, 10/15/2014 - 22:03 नवीन
लंडनच्या आजीबाई हे ताराबाई वनारस्यांचं सरोजिनी बाबर यांनी लिहिलेलं चरित्र पण मनोरंजक आहे.लिहिता वाचता न येणारी खेडेगावातली मुलगी स्वकतृत्वावर कसे साम्राज्य निर्माण करते,घरादाराचा उध्दार करते,वाचायला छान आहे. नाच गं घुमा हे रणजित देसाईंच्या पत्नी आणि लेखिका माधवी देसाई यांचं आत्मचरित्र अस्वस्थ करुन सोडणारं. नाथ हा माझा हे कांचन घाणेकरांचं अतिशय प्रामाणिकपणे घडलं तसं अायुष्य सांगणारं चरित्र आहे. श्री ना पेंडश्यांचं अात्मचरित्र त्यांनी त्यांचा मित्र लिहितोय असं दाखवुन लिहिलंय!पण श्रीनांची शैली कुठे लपतीये!!
  • Log in or register to post comments

श्री ना पेंडश्यांचं

आदूबाळ
गुरुवार, 10/16/2014 - 02:17 नवीन
श्री ना पेंडश्यांचं अात्मचरित्र त्यांनी त्यांचा मित्र लिहितोय असं दाखवुन लिहिलंय!पण श्रीनांची शैली कुठे लपतीये!!
याचीच आठवण काढायला आलो होतो. एकच नंबर आत्मचरित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

नाव सांगाल का त्याचे?

सौंदाळा
गुरुवार, 10/16/2014 - 16:46 नवीन
नाव सांगाल का त्याचे? (श्री. ना. पेंडसेंचा पंखा ) सौंदाळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

श्री.ना.पेंडसे- लेखक आणि

अजया
Fri, 10/17/2014 - 07:56 नवीन
श्री.ना.पेंडसे- लेखक आणि माणूस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

उत्तम धागा.

अर्धवटराव
Wed, 10/15/2014 - 23:00 नवीन
विश्वास पाटलांचं महानायक (सुभाषबाबु) आणि संभाजी बरं वाटलं (छावा पेक्षा तर बरच उजवं). गंगाधर गाडगीळांचं दुर्दम्य अप्रतीम आहे. लोकमान्यांच्या गुणावगुणांचं रेखाटन उत्तम केलय गाडगीळांनी.
  • Log in or register to post comments

अजून काही-

भृशुंडी
गुरुवार, 10/16/2014 - 00:45 नवीन
स्मरणगाथा - गो.नी दांडेकर : खरंच वेगळं आणि वाचनीय असं जगलेली थोडकी माणसं असतात, त्यापैकी एक. अनुभव अस्स्ल आहेतच पण निव्वळ शब्दांमध्येही नाद आहे. दळवींचं "आत्मचरित्राऐवजी" हेसुद्धा आवडलं. बाकी ऐतिहासिक चरित्रं झेपली नाहीत.
  • Log in or register to post comments

कोल्हाट्याचं पोर. बलुतं.

विलासराव
गुरुवार, 10/16/2014 - 01:02 नवीन
कोल्हाट्याचं पोर. बलुतं. पाथरवाटा. सुरेंद्रनाथ कांबळीचं पुस्तक त्याचं नाव आठवत नाही आता.ह्या कांबळींनी अंधत्व असताना केलेले अनेक मोठमोठे उद्यागधांदे. एक असतो बिल्डर. ही श्रींची ईच्छा- श्रीनिवास ठाणेदार. ईडली ऑर्कीड आनी मी- विट्ठ्ल कामत.
  • Log in or register to post comments

माझे सत्याचे प्रयोग ... ले मो.क.गांधी...

मुक्त विहारि
गुरुवार, 10/16/2014 - 01:04 नवीन
गांधी हत्या आणि मी.. ले.नथुराम गोडसे. राजा शिव छत्रपती श्रीमन योगी माझी जन्मठेप चीपर बाय द डझन आयडा स्कॅडर चार्ली चॅप्लीन (हसरे दु:ख) शांतारामा प्रथम पुरषी एक वचनी कर्‍हेचे पाणी एक होता कार्व्हर नाझी भस्मासुराचा उदय आणि अस्त विन्सटन चर्चील नशायात्रा (ले. तुषार नातू... वाचले नसेल तर नक्की वाचा....) क्लोरोफॉर्म हेलन केलर आहे मनोहर तरी स्म्रुतीचित्रे आमचा बाप अन आम्ही द रूट (चार पिढ्यांची कहाणी... अप्रतिम पुस्तक जरूर वाचा... फार येडे करून सोडते हे पुस्तक) आणि प्राण देव आनंद मधुबाला इडली,आर्किड आणि मी (विठ्ठल कामत) जगाच्या पाठीवर शोभना समर्थ (ह्यांच्या पुस्तकाचे नांव विसरलो) माझंही एक स्वप्न होते (वर्गीस... अमूल) कॉलनी (लेखकाचे नांव विसरलो... बरे आहे पुस्तक... चार घटका करमणूक) राऊ त्रिंबक डेंगळे पाटील (जमल्यास नक्की वाचा....) संघर्ष एका आईचा - नौदलाशी (आमच्या डोंबोलीतल्याच एका सुपुत्राची कथा आणि व्यथा) स्टीव्ह जॉब्ज एका चीनी वेश्येचे आत्मचरित्र वाचलेले आठवत आहे... (नेहमी प्रमाणे नांव विसरलो. माओच्या राजवटीच्या काळातले आहे. सरदार कन्या असून पण लहान-पणी केलेल्या एका चूकीची शिक्षा म्हणून तिची रवानगी जपानला केली जाते.पुढे ती जपानसाठीच हेर म्हणून चीनच्या विरिधात काम करते. एक खिळवून ठेवणारे पुस्तक.) तसेच एका बार बार-बालेचे आत्मचरित्र वाचले होते. (हळदणकर असे नांव असावे...आमच्या मेंदूतली हार्ड-डिस्क बरीच कमकुवत झाली आहे...) ही श्रींची इच्छा (श्रीनिवास ठाणेकर ह्यांचे सुंदर आत्मचरित्र...कर्नाटकातला एक मध्यम्वर्गीय मुलगा अमेरिकीत जातो काय आणि १००० एकर शेतीचा मालक होतो काय... प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे... ह्याचा अर्थ शिकवणारे आत्मचरित्र...आम्हाला नावांपेक्षा , त्या पुस्तकातून काय शिकलो? हेच शिकायला मिळेते... शेवटी नावांत काय आहे?) आणि असाच एक टाइमपास म्हणून ऑन लाइन चरित्र आहे. फसवेच आहे पण चार घटका निव्वळ करमणूक म्हणून एकदम योग्य... गरजूंनी व्य.नि. करावा.
  • Log in or register to post comments

>>> गांधी हत्या आणि मी.. ले

श्रीगुरुजी
Mon, 11/10/2014 - 20:57 नवीन
>>> गांधी हत्या आणि मी.. ले.नथुराम गोडसे. या पुस्तकाचे लेखक गोपाळ गोडसे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

येस...

मुक्त विहारि
Mon, 11/10/2014 - 23:51 नवीन
यु आर राईट... गलतीसे मिस्टेक हो गयेली है... गरीब हुं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गरीब हुं...

अर्धवटराव
Mon, 11/10/2014 - 23:54 नवीन
=)) मनोजकुमारचा क्लर्क बघितला का इतक्यात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

म्या फ्लिपकार्ट वरुन बेअर

स्पा
गुरुवार, 10/16/2014 - 09:37 नवीन
म्या फ्लिपकार्ट वरुन बेअर ग्रील्स चे आत्मचरीत्र मागवलयं, अजुन आलेलं नाही
  • Log in or register to post comments

हो!

पैसा
गुरुवार, 10/16/2014 - 09:40 नवीन
लंडनच्या आजीबाई, सांगत्ये ऐका, ईडली ऑर्किड आणि मी, तसंच स्मरणगाथा ही सुद्धा खूप आवडलेली पुस्तकं.
  • Log in or register to post comments

राजा शिव छत्रपती,श्रीमान योगी

जेपी
गुरुवार, 10/16/2014 - 09:49 नवीन
राजा शिव छत्रपती,श्रीमान योगी, माझी जन्मठेप. संभाजी. माधवराव पेशवेयांच्या जीवनावरील "स्वामी".आणखिन बरिच आहेत. नाव आठवत नाहित.
  • Log in or register to post comments

मला वाटते

पैसा
गुरुवार, 10/16/2014 - 09:53 नवीन
जेप्या, श्रीमान योगी आणि स्वामी यांना चरित्र म्हणता येणार नाही. त्या कादंबर्‍या आहेत. सुभाषचंद्र बोसांवरील 'महानायक' सुद्धा याच कॅटॅगरीत येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

जेप्या, श्रीमान योगी आणि

जेपी
गुरुवार, 10/16/2014 - 09:56 नवीन
जेप्या, श्रीमान योगी आणि स्वामी यांना चरित्र म्हणता येणार नाही. त्या कादंबर्‍या आहेत. सुभाषचंद्र बोसांवरील 'महानायक' सुद्धा याच कॅटॅगरीत येते. मान्य आहे. आपल्याला चरित्र आणी कादंबर्यात फरक कळत / जाणवत नाही.
  • Log in or register to post comments

थोडक्यात सांगते

पैसा
गुरुवार, 10/16/2014 - 10:01 नवीन
चरित्र असते ना, ते ऐतिहासिक संदर्भ तसेच्या तसे घेऊन लिहिले जाते. त्यात लेखक स्वतःच्या कल्पनेने काही लिहीत नाही. मात्र कादंबर्‍यांमधे लेखक भरपूर स्वातंत्र्य घेऊन लिहितो. खर्‍या प्रसंगांबरोबर काही काल्पनिक प्रसंग लिहितो, तसेच काल्पनिक व्यक्तिरेखाही अ‍ॅड करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ओके.

जेपी
गुरुवार, 10/16/2014 - 10:03 नवीन
ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एक झाड दोन पक्षी ....

विटेकर
गुरुवार, 10/16/2014 - 09:57 नवीन
एक झाड दोन पक्षी .... अजिबात आवडले नाही ! उगाच आपल्या अविवेकी वागण्याचे लंगडे समर्थन वाटले. कसे-बसे पूर्ण केले.
  • Log in or register to post comments

स्मरण गाथा

विटेकर
गुरुवार, 10/16/2014 - 10:00 नवीन
स्मरण गाथा अणि कुण्या एकाची ... दोन्ही क्लास ! पूर्वी त्याबद्दल लिहए आहेच.
  • Log in or register to post comments

माझ्या विशेष आवडीचा धागा.

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 10/16/2014 - 10:03 नवीन
माझ्या विशेष आवडीचा धागा. १. पु.ल. देशपांडे (सगळी पुस्तकं) २. माझी जन्मठेप (विनायक दामोदर सावरकर) सिडने शेल्डन (सगळी पुस्तकं) गांधीहत्या आणि मी (नथुराम गोडसे) वारस (मला हे पुस्तक हवयं विकतं पण मिळत नाहिये) (वासंती वाळिंबे) श्यामची आई (पुर्वी आवडायचं आता त्यामधला फोलपणा लक्षात आलाय) (साने गुरुजी) शिवचरित्र (बाबासाहेब पुरंदरे) मृत्युंजय (शिवाजी सावंत) बाजार (लेखकाचं नाव लक्षात नाही पण कादंबरी फार सुंदर आहे, मिळत नाहीये ही पण आता) श्रीमानयोगी (रणजित देसाई) शाळा (मिलिंद बोकील) गारंबीचा बापु (श्री.ना.पेंडसे) शितु (गो.नी.दांडेकर) पानिपत (विश्वास पाटील) आहे मनोहर तरी (सुनिता देशपांडे) झोंबी (आनंद यादव) पडघवली (बहुतेक श्री.ना.पेंडसे) द.मा.मिरासदार (सगळी पुस्तकं) प्लेजर बॉक्स (व.पु. काळे) ऐक सखे (व.पु. काळे) वपुर्झा (व.पु. काळे) पार्टनर (व.पु.काळे) कथाकथन मधल्या बहुतेक गोष्टी (व.पु.काळे) सुहास शिरवळकर (सगळी पुस्तकं) गॉडफादर (मारिओ पुझो) सिसिलिअन (मरिओ पुझो) ओमेर्ता (मारिओ पुझो) फुल्स डाय (मारिओ पुझो) द पेट सिमेटरी (स्टिफन किंग) द तालिस्मान (स्तिफन किंग) रेझ द टायटॅनिक (क्लाईव्ह कसलर) पोसायडॉन्स अ‍ॅरो (अनुवादित) (क्लाईव्ह कसलर) डीप सिक्स (क्लाईव्ह कसलर) मे डे (अनुवादित) (क्लाईव्ह कसलर) व्हाईट डेथ (क्लाईव्ह कसलर) ट्रोजन डेथ ( सद्ध्या वाचतोय, कालचं चालु केलय) (क्लाईव्ह कसलर) पोलर शिफ्ट (क्लाईव्ह कसलर आणि पॉल केंप्रेकोस संयुक्तपणे) द टाईम मशिन (एच.जी.वेल्स) जंपर्स (स्टिव्हन गौल्ड) पॅपिलॉन (ईंग्लिश अनुवादित)(हेन्री शॅरिअर) बँको (ईंग्लिश अनुवादित)(हेन्री शॅरिअर) ट्वेंटी थाउसंड लिग्स अंडर द सी (ज्युल व्हर्न्स) जर्नी टु द सेंटर ऑफ अर्थ (ज्युल व्हर्न्स) अराऊड द वर्ल्ड ईन एटी डेज (ज्युल व्हर्न्स) तुन्त्सा (लेखक आठवत नाही, अमेरिकेमधल्या रेड ईंडियन्स चा उगम शोधायसाठी बालसा लाकडाच्या तराफ्यावरुन एक गट समुद्रातुन प्रवास करतो अशी गोष्ट आहे) अजुन बरीच आहेत. वेळ मिळाला की टंकीन नावं.
  • Log in or register to post comments

कॅप्टन

पैसा
गुरुवार, 10/16/2014 - 10:05 नवीन
या धाग्यात प्लीज आवडत्या चरित्र आणि आत्मचरित्राबद्दल लिवा, कादंबर्‍यांसाठी वेगळा धागा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हो आत्ता लक्षात आलं. तिकडे

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 10/16/2014 - 10:07 नवीन
हो आत्ता लक्षात आलं. तिकडे पेस्ट करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

>>> गांधीहत्या आणि मी (नथुराम

श्रीगुरुजी
Mon, 11/10/2014 - 20:55 नवीन
>>> गांधीहत्या आणि मी (नथुराम गोडसे) या पुस्तकाचे लेखक गोपाळ गोडसे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

वा मस्त धागा..वर येउन

Maharani
गुरुवार, 10/16/2014 - 13:43 नवीन
वा मस्त धागा..वर येउन गेलेल्यातली काही वाचली आहेत.बरीच नवीन add झाली वाचली पाहिजेत च्या यादीत..
  • Log in or register to post comments

JACKPOT - Sarita Wakalkar

स्नेहल महेश
गुरुवार, 10/16/2014 - 13:45 नवीन
खूप छान आत्मचरीत्र आहे १९५०-६० च्या शतकात हॉर्स रेसिंग सारखं क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होऊन दाखवणे, कठीण काळात आलेले अनुभव खूप छान प्रकारे लिहिले आहेत नि:पक्षपाती लिखान
  • Log in or register to post comments

ह्रदयस्थ (डॉ. नितू मांडके)

विवेक्पूजा
गुरुवार, 10/16/2014 - 14:05 नवीन
ह्रदयस्थ (डॉ. नितू मांडके) झोंबी (आनंद यादव) माझी जन्मठेप (विनायक दामोदर सावरकर) नशायात्रा (तुषार नातू) शांतारामा
  • Log in or register to post comments

वाचनखूण साठवत आहे.

शिद
गुरुवार, 10/16/2014 - 14:32 नवीन
तुमच्या ह्या धाग्यामूळे बर्‍याच नविन पुस्तकांची माहिती मिळाली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त धागा

सानिकास्वप्निल
गुरुवार, 10/16/2014 - 15:10 नवीन
माझी जन्मठेप - वि. दा. सावरकर ढोर - भगवान इंगळे बलुतं - दया पवार हसरे दु:ख - भा.द.खेर आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे इडली ऑर्किड आणि मी - विठ्ठल कामत साम्राज्य बुरख्यामागचे द व्हेल्ड किंगडम - कारमेन बिन लादेन दी ग्लास कॅसल - जेनेट वॉल्स दी डायरी ऑफ अ यंग गर्ल - अ‍ॅनी फ्रँक सोल सर्फर - बेथनी हॅमिल्टन वार्ड नं ५ - डॉ. रवी बापट एका खेळियाने- दिलिप प्रभावळकर एका मारवाड्याची गोष्ट - गिरेश जाखोटिया केतकर वहिनी- उमा कुलकर्णी
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा