त्या एक स्वराची बिजली
स्पर्शून निसटती गेली.....
ती मैफल मग जमलेली
ती बंदिश मज सुचलेली
....मग माझी उरली नाही
उघडता दार अज्ञात
होऊन अनावर आत
कोसळतो कुठुन प्रपात
हे काय भिने रक्तात
...त्या वेळी कळले नाही
ओथ॑बुन चिद्घन आला
निष्पर्ण वृक्ष सळसळला
डवरून फुलांनी गेला
अवचित मग कळले मजला
..... मी देही असुन विदेही!!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1829
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! क्या बात!
काय होता कुमारा॑चा किस्सा?
In reply to वा! क्या बात! by प्राची अश्विनी
बहुतेक वसंत पोतदारांनी
In reply to काय होता कुमारा॑चा किस्सा? by अनन्त्_यात्री
वा!
वाह रे व्वाह!
मस्त !!
खूप सुंदर! आवडेश..!!!
धन्यवाद !