Skip to main content

...त्या वेळी कळले नाही

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 26/02/2017 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
त्या एक स्वराची बिजली स्पर्शून निसटती गेली..... ती मैफल मग जमलेली ती बंदिश मज सुचलेली ....मग माझी उरली नाही उघडता दार अज्ञात होऊन अनावर आत कोसळतो कुठुन प्रपात हे काय भिने रक्तात ...त्या वेळी कळले नाही ओथ॑बुन चिद्घन आला निष्पर्ण वृक्ष सळसळला डवरून फुलांनी गेला अवचित मग कळले मजला ..... मी देही असुन विदेही!!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1841
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by अनन्त्_यात्री

बहुतेक वसंत पोतदारांनी लिहिलंय की एकदा एका मैफलीत कुमारांनी त्या रागात वर्ज्य सूर लावला. कुणीतरी त्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की तो सूर केव्हापासून दरवाजातून येऊका असं खुणवत होता, मला नाही म्हणवेना . तुमचं पहिलं कडवं वाचून हे आठवलं.